Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

स्वयंसेवकअभावी भाविकांचे झाले हाल

0
0

नामदेव पवार, सातपूर

नाशिकमधील अखेरच्या पर्वणीत स्वयंसेवक गायब झाल्याने भाविकांचे हाल झाले. परराज्य तसेच राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना परतीचा मार्ग सापडत ताटकळत उभे रहावे लागले. रिक्षाचालकांनी संधी साधत भाविकांना अपेक्षित ठिकाणी सोडण्यासाठी अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी केली.

पहिल्या पर्वणीत कडक पोलिस बंदोबस्ताचा अतिरेक झाल्याने भाविकांनी पाठ फिरवली होती. दुसऱ्या आणि आता तिसऱ्या शाहीस्नानाच्या पर्वणीत भाविकांनी गोदावरीत मनोभावे स्नान केले. स्नान झाल्यावर परतीच्या मार्गावर निघालेल्या भाविकांना मात्र मार्ग शोधतांना कसरत करावी लागली. पंचवटी परिसरात ठिकठिकाणी तैनात असलेले स्वयंसेवक गायब झाल्याने भाविकांना परतीचा मार्ग सापडत नव्हता. एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी व पोलिस देखील योग्य माहिती देत नसल्याने भाविकांना अडचणींचा सामना करावा लागला.

बस कहाँ से मिलेगी?

शहर बससेवेची माहिती नसल्याने परराज्यातील अनेक भाविकांना घराकडे परततांना त्रास करावा लागला. मार्ग मिळत नसल्याने त्यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडे 'भैय्या, बस कहाँ से मिलेगी?' अशी विचरणा केली. परंतु, बाहेरगावहून आलेल्या पोलिस आणि महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाच नाशिकची पुरेशी माहिती नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदाकाठी रात्री मुक्काम

0
0

दिलीप आहिरे, पंचवटी

तिसऱ्या आणि अंतिम पर्वणीत शाही ‌मिरवणूक पहाता यावी तसेच शाही स्नानाची संधी साधता यावी यासाठी अनेक भाविकांनी गुरुवारी (दि. १७) रात्रीच पंचवटीमध्ये येऊन गोदावरी ‌नदीकाठी मुक्काम केला. मात्र, रात्री उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे त्यांची धावपळ उडाली.

कुंभमेळ्याच्या पहिल्या शाहीस्नानाला प्रशासनाचे कडक बंदोबस्त ठेवल्यामुळे तसेच अनेक ठिकाणी मार्ग बंद केल्यामुळे भाविकांच्या मनात नियोजनाबद्दल धास्ती बसली होती. त्यामुळे पहिल्या पर्वणीमध्ये बाहेरील भाविकांसह स्थानिक नाशिककरांनीही कमी प्रमाणात सहभाग नोंदविला होता. भाविकांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याचे खापर पोलिस यंत्रणा आणि प्रशासनाच्या माथी फोडण्यात आले होते. यापासून धडा घेत दुसऱ्या आणि आता तिसऱ्या पर्वणीत भाविकांना मोकळीक देण्यात आली. याचा फायदा घेत भाविकांनी गोदातीरी रामकुंडावर शाहीस्नान केले.

सजावटीवर 'पाणी'

शेवटची ‌तिसरी पर्वणी असल्याने शाही मिरवणूक दिमाखदार असावी म्हणून सर्वच आखाड्यातील संतांच्या रथांच्या सजावटीवर विशेष भर देण्यात आला. मात्र, पावसाच्या संततधार सरींमुळे मिरवणूक सजावटीची मजा गेली. शुक्रवारची मिरवणूक आकर्षक करण्याचा प्रयत्न होता. त्या अनुषंगाने ढोल ताशे, विविध वाद्यांची व्यवस्थाही करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत रथ सजविण्याचे काम सुरू होते. मात्र, पावसाने भाविकांसह ‌साधू महंतांचा हिरमोड झाला.

कपिला संगम आेस

तपोवनातील कपिला संगमावर पर्वणीसाठी भाविकांची प्रचंड गर्दी होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, शुक्रवारच्या पावसाचा परिणाम झाल्याने सकाळपासून संगमावर तुरळक गर्दी दिसून आली. संगमावर भर पावसात पाण्यामध्ये डुबकी मारण्यापेक्षा भाविकांनी हात पाय धुणेच पसंद केले. यापूर्वीच्या दोन्ही पर्वणीला भाविकांनी कपिला संगमावर गर्दी केली होती.

४५० भाविक बेपत्ता

जुने नाशिक : बाहेरगावाहून आलेल्या ४५५ भाविक हरविले. मात्र, पोलिसांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे काही ‌तासात यापैकी ४५० भाविकांचा शोध घेण्यात यश आले.

लक्ष्मी नारायण पूल निर्मनुष्य

भाविकांच्या सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र असलेल्या तपोवनातील लक्ष्मी नारायण पुलावर शुक्रवारी सकाळपासून कोणीच फिरकले नाही. यापूर्वीच्या दुसऱ्या पर्वणीला भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याचा अनुभव असल्याने पोलिस प्रशासनाने दक्षता घेत तसे नियोजनही केले होते. परंतु, पावसामुळे पुलाकडे कुणी भाविक फिरकलेच नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन अपडेटची ‘पर्वणी’!

0
0

जिल्हाधिकारी, आयुक्तांपासून सारेच लाइव्ह

bhavesh.brahmankar@timesgroup.com

नाशिक : एकविसाव्या अत्याधुनिक शतकातील नाशिकच्या दुसऱ्या कुंभमेळ्यातील क्षणाक्षणाची लाईव्ह आणि अपडेट माहिती देण्याचीही अनेकांनी पर्वणी साधली. त्यात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह सरकारी अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक आणि नाशिककरांनी शाही पर्वणीची माहिती क्षणार्धात सोशल नेटवर्किंगद्वारे जगभरात पोहचविली. त्यामुळे यंदाच्या सिंहस्थाला वैश्विक सोहळ्याचे कोंदण लाभले.

'भाविकांचा ओघ वाढू लागल्याने सादुग्रामकडे येणारे रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आले आहे'... 'रामकुंडासह सर्व घाट शाही पर्वणीसाठी सज्ज झाले आहेत'... तिसऱ्या पर्वणीची ही काही क्षणचित्रे, साधू-महंतांच्या शाहीस्नानाचा हा सोहळा.. नाशकात मुसळधार पाऊस सुरु... ही आणि अशी कितीतरी प्रकारची माहिती सेकंदा सेकंदाला सोशल नेटवर्किंग साईटससह ऑनलाईन अपडेट होत होती. २१ व्या शतकातील पहिला कुंभमेळा २००३ मध्ये नाशकात झाला पण त्यावेळी इंटरनेटचा फैलाव तितका नव्हता. तसेच सोशल नेटवर्किंगचाही उदयच होत असल्याने साहजिकच नेटीझन्सची संख्या अत्यल्प होती. मात्र, २१व्या शतकातील दुसरे दशक हे इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंगचेच असल्याने आणि याच काळात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने अत्याधुनिक साधनांद्वारे सिंहस्थातची खडान् खडा माहिती जगासमोर मांडण्याचे यत्न कसोशीने करण्यात आले.

महापालिका आयुक्त प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले, नाशिक शहर पोलिस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यापासून तर विविध सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच रामकुंड, साधुग्राममध्ये कार्यरत असलेले स्वयंसेवक, नाशिककर, सिंहस्थासाठी आलेले परदेशी पर्यटक, विविध सामाजिक संस्था-संघटना, सरकारी कार्यालये या आणि अशा कितीतरी जणांनी सिंहस्थ पर्वणीच्या प्रत्येक घटनेची माहिती ऑनलाईन विश्वात पाठविली. ट्विटर, फेसबुक, लिंकडेन, व्हॉटसअप, टेलिग्राम, वुई चॅट, ब्लॉग, वेबसाईटस, यू ट्यूब, आदींद्वारे सिंहस्थाचा आँखो देखाँ हाल जगभरात पोहचविला जात होता. ही माहिती कोट्यवधी लोकांपर्यंत क्षणार्धात पोहचत असल्याने तिचा मोठा प्रभाव पडत होता. प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच सोशल नेटवर्गिंवर सातत्याने माहितीचे आदान-प्रदान होत असल्याने यंदाच्या सिंहस्थाला अत्याधुनिकतेचे सोशल कोंदण लाभले.

'मटा लाइव्ह' अग्रेसर

जगभरात मराठीतून ऑनलाईन बातम्या देणाऱ्या 'मटा लाइव्ह'वर सिंहस्थाच्या प्रत्येक घटना आणि प्रसंगाची माहिती दिली जात होती. जगभरातून त्यास मोठा प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमानी विक्री, सेवेची ‘पर्वणी’!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तिसऱ्या पर्वणीच्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने साधुग्रामसह शहर परिसरात मनमानी विक्री आणि सेवेचीही पर्वणी साधली गेली. प्लास्टिकच्या घोंगड्यापासून ते रिक्षा सेवेपर्यंत सर्वच स्तरावर भाविकांची लूट करण्याचे प्रकार घडत होते.

गुरुवारी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने भाविकांची तारांबळ उडाली. या साऱ्या प्रकारात विविध विक्रेत्यांची आणि रिक्षा चालकांची चांदी झाल्याचे पहायला मिळाले. साधुग्राममध्ये पहाटे व सकाळच्या सुमारास प्लास्टिकचे रिकामे लहान कमंडलू थेट ४० रुपयांना, तर मोठे कमंडलू १००, प्लास्टिकचा रिकामा कॅन १०० ते १५० रुपयांना विक्री होत असल्याचे दिसून आले. खासकरुन परप्रांतीय भाविकांची अशा प्रकारे आर्थिक पिळवणूक सुरू होती. 'अडला नारायण गाढवाचे पाय धरी' या उक्तीप्रमाणेच भाविकही आवश्यकता असल्याने या वस्तूंची खरेदी करीत होते. साधुग्राम, द्वारका, तपोवन येथून नाशिकरोड किंवा शहराच्या कुठल्याही भागात जाण्यासाठी रिक्षाचालक मनमानी पद्धतीने भाडे घेत होते. १०० रुपयांपासून पुढे भाडे घेत होते. पाऊस सातत्याने सुरू असल्याने भाविकांनीही नाईलाजाने मागणी एवढे भाडे देणे भाग पडत होते. आर्थिक पिळवणूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर भरारी पथकांद्वारे कारवाई केली जाईल, हा आरटीओचा विभागाचा दावा फोल ठरला. कुठल्याही प्रकारचे पथक शहरात दिसून आले नाही. कुणा रिक्षाचालकावरही कारवाई करण्यात आली नाही.

घोंगडे मौल्यवान

प्लास्टिकचे कापड आणि घोंगडे यांची मोठी मागणी वाढली होती. साहजिकच याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची अक्षरशः चांदीच झाली. १०० रुपयांपासून प्लास्टिक कापड आणि घोंगड्यांची विक्री शहरात सर्वत्र होत होती. कुठल्याही परिस्थितीत पावसापासून बचाव करण्यासाठी भाविकांना या वस्तूंची खरेदी अपरिहार्य बनली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवामान खात्याचा अंदाज ठरला 'परफेक्ट'

0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : बेभरवशाचा मानला जाणारा मान्सून हवामान खात्याची इभ्रत नेहमीच पणाला लावतो. प्रत्येक पावसाळ्यात हेच चित्र सर्वसामान्यांना पाहायला मिळते. तिसऱ्या शाही पर्वणीला मात्र हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज चक्क तंतोतंत जुळला, नव्हे तो खरा ठरला. त्यामुळे मुसळधार पावसाला सुरुवात होताच, पाटबंधारे विभागाने गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग हळूहळू बंद केला.

ऐन दुष्काळात आलेला सिंहस्थ कुभंमेळा सर्वांच्या औत्सुक्याचा विषय ठरला. मात्र, दुसऱ्या पर्वणीपर्यंत पावसाने ओढ दिल्याने बळीराजाची चिंता वाढली. मात्र, शुक्रवारी तिसऱ्या पर्वणीच्या दिवशी पहाटे तीन वाजल्यापासून मुसळधार पावसाने शहराला अक्षरशः धुवून काढले. तिसऱ्या पर्वणीसाठी गुरुवारी सकाळी २३० क्यूसेस वेगाने नदी पात्रात पाणी सोडण्यात आले होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्यानंतर हे पाणी बंद करण्यात येणार होते. शुक्रवारी पहाटे तीन वाजेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शाहीस्नानादरम्यान पाण्याची पातळी वाढली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय आखाडा रंगलाच नाही

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राजकीय नेत्यांनी तिसऱ्या पर्वणीकडे सपशेल पाठ फिरवली. पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, मनसे नेते बाळा नांदगावकर, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमीत बग्गा यांच्यासह निवडकच नेत्यांनी हजेरी लावली होती. विशेषत: काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाठ फिरवल्याने तिसऱ्या पर्वणीला राजकीय आखाडा रंगलाच नाही.

तिसऱ्या पर्वणीला भाविकांची हजेरी कमी राहणार असल्याचा राजकीय नेत्यांना अंदाज आला होता. त्यात पावसाने हजेरी लावल्याने राजकीय नेत्यांच्या उपस्थितीवरही परिणाम झाला. सकाळपासून राजकीय व्यासपीठ सांभाळून बसणाऱ्यांची भाऊगर्दी दिसलीच नाही. पालकमंत्री महाजन, राज्यमंत्री भुसे, महापौर मुर्तडक, मनसे नेते बाळा नांदगावकर, राहुल ढिकले, अनिल मटाले, संभाजी मोरुस्कर, तानाजी जायभावे, सुधाकर बडगुजर यांच्यासह निवडक नेत्यांसह नगरसेवकांनी हजेरी लावली. राजकीय मचानावर सकाळापासूनच आर्वजून हजेरी लावणारे काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते मात्र शेवटपर्यंत दिसलेच नाहीत. महापालिकेतील नगरसेवक सुद्धा सोहळ्याकडे फिरकले नाहीत.तिसऱ्या पर्वणीचा संपूर्ण भार महाजन व मुर्तडक यांनीच झेलला. साधू-महंताच्या स्वागतासह त्यांची मनधरणी, रामकुंडाचे नियोजन, भाविकांची गर्दी रोखण्याचे प्रयत्न दोघेच करतांना दिसत होते. साधू-महंतांची मनधरणी करण्यासाठी पालकमंत्री स्वतःला झोकून देत होते.

उपमहापौरांची कामगिरी

मुसळधार पाऊस सुरू झाल्याने शहरातील रस्ते आणि भुयारी गटारीचे पाणी थेट गोदापात्रात येवू लागले होते. शाही स्नानापूर्वीच हे पाणी रामकुंडावर आले असते, तर पात्रच खराब झाले असते. मात्र, हा अनर्थ टाळण्यासाठी उपमहापौर गुरूमीत बग्गा यांनी किल्ला लढवला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बरोबर घेवून त्यांनी पुराचे पाणी रामकुंडावर येवू देण्यापासून रोखले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोंधळ अन् वादानेच सांगता!

0
0

vinod.patil@timesgroup.com

नाशिक : सुरुवातीपासूनच वादात राहिलेल्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तिसऱ्या पर्वणीची सांगता वाद व गोंधळानेच झाली. वरूणराजाने जोरदार हजेरी लावल्याचा परिणाम भाविकांच्या उपस्थितीवर होऊन प्रशासनासह पोलिसांचीही धावपळ उडाली होती. अष्टदेवतांच्या स्नानावरून साधू महंतांच्या आडमुठ्या धोरणामुळे शाहीस्नानाला तब्बल दोन तास उशीर झाला. मात्र, भाविकांनी व खालशांनी साधू-महंतांच्या वादाकडे दुर्लक्ष करीत स्वतःच शाहीस्नानाचा आनंद घेतला. पालकमंत्री व प्रशासनाने पायघड्या घातल्यानंतर आखाड्यांच्या महंतांचे शाहीस्नान उरकल्याने नाशिकचा कुंभमेळा निर्विघ्न पार पडला. दिवसभरातून जवळपास आठ ते दहा लाख भाविकांनी शेवटच्या शाहीस्नानाची पर्वणी साधली.

सिंहस्थ कुंभमेळा आणि वाद हे जणू या कुंभमेळ्याचे वैशिष्ट्येच राहिले. कुंभमेळ्याच्या सोयीसुविधा आणि ध्वजारोहणापासून सुरू झालेला वाद शेवटपर्यंत कायम राहिला. तिसरी पर्वणी निर्विघ्न व शांततेत पार पडेल, अशा विचारात असलेल्या पालकमंत्र्यांसह प्रशासनाला आखाड्यांनी शेवटी धक्का दिला. तिसऱ्या शाहीस्नानाला तब्बल दोन तास उशिराने सुरूवात झाली. भाजीबाजार पटांगणावर तब्बल दीड तास आखाड्यांनीच ठरवलेल्या क्रमवारीवरून दिगंबर आखाड्याने गोंधळ घातला. निर्मोही, दिगंबर आणि निर्वाणी असा शाही मिरवणुकीचा लिखीत क्रम ठरला असला तरी, सुरूवातीला स्नान निर्वाणी आखाडाच करेल असे निश्चित करण्यात आले होते. मात्र, सात वाजता निर्मोहीचे राजेंद्रदास भाजीबाजारावर थांबले असतांनाच या आखाड्यांच्या खालशांनी व भाविकांनी स्नानाला सुरूवात केली. त्यामुळे दिगंबरच्या रामकिशोरदास यांनी थयथयाट सुरू करीत, स्नानावरच आक्षेप घेत बहिष्काराचे अस्र उगारले.

दिगंबर आखाड्याने बहिष्कार टाकल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने रामकुंडावर पोलिसांची व प्रशासनाची एकच धावपळ सुरू झाली. पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, मेळा अधिकारी महेश पाटील यांनी दोन्ही आखाडा प्रमुखांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रामकिशोरदास यांनी आडमुठी भूमिका घेतल्याने आणि निर्वाणीच्या मिरवणुकीला उशीर झाल्याने भाजीबाजारावर तणाव निर्माण झाला. काही साधू आक्रमक झाल्याने भाविकांनी पळापळ सुरू केली. आखाड्यांच्याच लिखित क्रमानुसार स्नान सुरू असल्याच्या विनवण्या पालकमंत्र्यासह जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांनी केल्या. राजेंद्रदास महाराजांनीही रामकिशोरदास यांची समजूत काढली. दीड तासाच्या नाराजीनाट्यनंतर वाद मिटल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर निर्वाणीचे ग्यानदास महाराज, दिगंबरचे रामकिशोरदास आणि राजेद्रदास यांनी स्नान केले. रामकुंडावर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने काही काळ भाजीबाजारावर गोंधळ उडून भाविकांची धावपळ सुरू झाली होती. मात्र, पालकमंत्र्यांसह पोलिसांनी संयमाने प्रकरण हाताळल्याने मोठी दुर्घटना टळली.

प्रशासनाची पाठराखण

शेवटच्या पर्वणीत शाहीस्नानाच्या वेळी तीनही आखाड्यांमध्ये थोडासा वाद झाला. मात्र, त्यात प्रशासनाची कोणतीही चूक झाली नसल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री महाजन यांनी दिले. आखाड्यांनी दिलेल्या क्रमानुसार त्यांना स्नानासाठी सोडण्यात आले. त्यासंदर्भातील लेखी संबंधिताकडून घेण्यात आले होते. दिगंबर आणि निर्मोहीत काही गैरसमज झाले होते. मात्र, त्यांची समजूत काढण्यात आल्यानंतर त्यांनी टाकलेला बहिष्कार मागे घेतला. यात प्रशासनाची कोणतीही चूक नव्हती, असा दावा त्यांनी केला आहे.

भाविकांनी साधली संधी!

रामकुंडावर तीन आखाड्यांच्या स्नानानंतरच भाविक स्नान करतात. मात्र, निर्मोही आणि दिगंबर आखाड्यांमध्ये सुरू असलेल्या वादाकडे भाविकांसह खालशांनीच दुर्लक्ष केले. या वादात पडण्याऐवजी पर्वणीचे पुण्यसंचय भाविकांसह आखाड्यांमधील साधूंनी करून घेतले. त्यामुळे प्रथम स्नान करण्याची आखाड्यांची परंपरा तिसऱ्या पर्वणीत मोडीत निघाली. आखाड्यांचा वाद सुरू असतांना तब्बल ५० ते ६० हजार भाविकांनी शाहीस्नानाचा लाभ घेतला. शेवटची पर्वणी असल्याने वाद वाढवून घेण्यापेक्षा मिटवणेच समजूतदारपणाचे ठरणार असल्याने भाविक आणि खालशांनंतर महंतानी मुकाटपणे स्नान करून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या माणुसकीमुळे भाविक गदगद

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन पर्वण्यांना भाविकांशी अत्यंत कडक भाषेत संवाद साधणारे पोलिस तिसऱ्या व शेवटच्या पर्वणीत मात्र सर्वांना मार्गदर्शन करीत होते. अनेक वृध्दांना पोलिसांनी स्वत: उचलून स्नान घडविल्याच्या घटना रामकुंडावर अनेक ठिकाणी पहायलाप मिळाल्याने पोलिसांच्या या माणुसकीमुळे भाविक गदगद झाल्याची भावना यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

पोलिस म्हटले की अत्यंत कडक शिस्त, जरबी संवाद साधणारे, नियम म्हणजे नियम अशाच भाषेत बोलणारे असा समज सर्वत्र पसरलेला असताना हा समज शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या पर्वणीने खोटा ठरवला. पोलिसांनी अनेकांना मदत करीत त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन यावेळी घडविले. गुलालवाडी जीवरक्षक दलाच्या स्वयंसेवकांसमवेत स्वत: पाण्यात उतरून पोलिस भाविकांची मदत करीत होते. ही परिस्थिती केवळ रामुकंडापुरतीच मर्यादित नव्हती तर संपूर्ण गोदाघाटावर मदतीचा हा ओघ सुरूच होता. कुणाला ठिकाण सापडत नसल्यास त्याची मदत कर, रामघाट, लक्ष्मणघाट, गौरीशंकर पटांगणावर जाण्यासाठी मदत कर अशा प्रकारची कामे अत्यंत विनयशीलपणाने पोलिस करताना दिसत होते. त्यामुळे भाविकांमध्येही जरा आश्चर्याचेच वातावरण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालकमंत्र्यांकडून नियम धाब्यावर

0
0

जामनेरकरांची वाहने सोडली रामकुंडापर्यंत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुरक्षित कुंभमेळ्यासाठी पालकमंत्र्यांसह संपूर्ण प्रशासन तिसऱ्या पर्वणीपर्यंत कसोशिने सर्व प्रयत्नांचे पालन करीत निर्विघ्न कुंभमेळा पार पाडण्यासाठी प्रयत्र केले. मात्र, अखेरच्या क्षणी पालकमंत्री गिरीश महाजन यांनीच आपल्या मतदारसंघातील नागरिकांसाठी नियम धाब्यावर बसविले. सायंकाळच्या सुमारास जामनेर या आपल्या मतदारसंघातील नागरिकांची पायपीट टाळण्याचे फर्मान त्यांनाच सोडावे लागले. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातीलच भाविक असल्याने पोलिसांनीही हवी तशी ढील देत जामनेरकरांची शाही पर्वणी घडवून आणली.

कुंभमेळ्यातील बॅरिकेडिंग व सुरक्षिततेवरून पहिली शाही पर्वणी चांगलीच गाजली. नाशिकमध्येच मोठ्या वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला. दुसऱ्या ते तिसऱ्या पर्वणीपर्यंत हे नियम पाळण्यात आले. तिसऱ्या पर्वणीत नो व्हेईकल झोनपर्यंत वाहनांना बंदी घालण्यात आली. त्यामुळे भाविकांना तरीही दीड ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागली.

सायंकाळपर्यंत हा नियम पाळण्यात आला असला तरी सायंकाळच्या सुमारास प्रशासनाला आपल्या पालकमंत्र्यांसाठी हा नियम मोडावा लागला. कारणही तसेच होते. खुद्द पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील लोकांनाच थेट रामकुंडावर शाहीस्नान करायचे होते. त्यासाठी एक लक्झरी बस व दहा छोट्या गाड्या थेट मालेगाव स्टँडपर्यंत सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी पोलिस यंत्रणाच कामाला लागली. रामकुंडावर जाऊन मतदारसंघातील शंभरच्या वर मतदारांनी रामकुंडावर व्हीआयपी शाही स्नान केले. त्यानंतर त्याच शाही इतमामात त्यांना परत पाठविण्याची व्यवस्थाही करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२८ सप्टेंबरला पुढील पर्वकाळ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ऋषिपंचमीच्या दिवशी असलेली तिसरी मुख्य शाही पर्वणी संपल्याने आता इतर छोट्या पर्वकाळांकडे भाविकांचे लक्ष लागले आहे. वर्षभर चालणाऱ्या या पर्वण्यांच्या वेळी भाविक रामकुंडावर येऊन स्नान करणार असल्याने या उर्वरित पर्वण्यांनाही गर्दी होण्याची शक्यता आहे. परप्रांतातून येणारे भाविक तसेच नाशिककर या पर्वण्यांना स्नान करणार आहेत.

येत्या २८ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा असल्याने यादिवशी पुढील पर्वकाळ असेल. त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या असल्याने त्यादिवशी पर्वकाळ आहे. २६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा असल्याने रामकुंडावर स्नानासाठी गर्दी असेल. १३, २४ व २५ नोव्हेंबर रोजी पर्वकाळ असून, २२ नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशी व त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने प्रमुख पर्वकाळ आहे. डिसेंबर महिन्यात २१ तारखेला मोक्षदा एकादशी व गीता जयंती असल्याने तो प्रमुख पर्वकाळ आहे. नव्या वर्षामध्ये १५ जानेवारीला मकरसंक्रांत व ९ फेब्रुवारीला गोदावरी उत्सव प्रारंभ असल्याने प्रमुख पर्वकाळ असेल. १२ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी व १४ फेब्रुवारी रोजी रथसप्तमी असल्याने यादिवशीही रामकुंडावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. १७ रोजी गंगा गोदावरी जन्मोत्सव, ७ मार्च रोजी महाशिवरात्र, ९ मार्च रोजी अमावस्या सूर्यग्रहण, १५ एप्रिल रोजी श्रीरामनवमी, १४ एप्रिल रोजी श्रीराम रथ यात्रा, २२ एप्रिल रोजी पौर्णिमा, ३ मे रोजी कृष्ण एकादशी, ८ मे रोजी अक्षय तृतीया, २० मे रोजी नृसिंह जयंती, ४ जून रोजी अमावस्या, १४ जून रोजी गंगादशहरा, १६ रोजी निर्जला एकादशी, २० रोजी वटपौर्णिमा, ४ जुलै रोजी सोमवती अमावास्या, १५ रोजी शयनी एकादशी, ३० रोजी कामिका एकादशी, २ ऑगस्ट रोजी अमावस्या दीप पूजन, ७ ऑगस्ट रोजी माघ पंचमी असे प्रमुख पर्वकाळ आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शतकातील दुसऱ्या कुंभातील शाहीपर्वाचा अस्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधुनिक युगाचा साज चढलेल्या एकविसाव्या शतकातील दुसऱ्या सिहंस्थ कुंभमेळ्यातील तिसरी शाही पर्वणी शुक्रवारी पार पडली. याबरोबरच कुंभमेळ्यातील शाही पर्वणीचा देखील अस्त झाला. कुंभ पर्व या पुढे काही काळ सुरू असणार असले तरी शाही थाट अनुभवण्यासाठी भाविकांना आता पुन्हा बारा वर्षे वाट पहावी लागेल.

गेल्या वर्षी कुंभ मेळ्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची लगभग शहरात सुरू झाली. जसे जसे कामांनी जोर पकडला तसे शहरात कुंभमेळ्याचा फीवर वाढू लागला. एकविसाव्या शतकातील सर्वात मोठ्या वैश्विक सोहळयाची प्रतीक्षा लाखो साधू-महंतासह नाशिककरांना लागली होती. अलाहाबादनंतर नाशिकमध्ये आयोजित झालेला शतकातील हा दुसराच कुंभमेळा ठरला. शुक्रवारी या कुंभ पर्वातील तिसरी आणि अंतिम शाही पर्वणी पार पडली. या कुंभ मेळ्यातील ही शेवटची शाही पर्वणी ठरली. ऑगस्ट २०१६ पर्यंत छोट्या छोट्या पर्वण्या पार पडतील. मात्र, आजचा अनुभव घेण्यासाठी सर्वसामान्यांना २०२७ या वर्षाची वाट बघावी लागेल.

साधू-महंतांना उज्जैनचे वेध

कुंभ पर्वातील तिसऱ्या आणि शेवटच्या शाही स्नानानंतर आखाड्यात परतलेल्या साधू-महंतांना आता मध्यप्रदेशातील उज्जैन येथे एप्रिल महिन्यात होणाऱ्या कुंभमेळ्याचे वेध लागले आहेत. त्र्यंबकेश्वर येथील शाही पर्वणी पार पडल्यानंतर आखाड्यांचे प्रमुख महंत आणि आखाडा परिषदेचे साधू उज्जैनकडे रवाना होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निर्मोही’च्या मिरवणुकीचा शाही थाट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ढोलताशाच्या गजरात आणि 'सियावर रामचंद्र की जय' च्या जयघोषात शुक्रवारी निर्मोही आखाड्याचे तिसरे शाही स्नान पार पडले. यावेळी सकाळी सव्वासहा वाजता निघणारी मिरवणूक पावसामुळे सकाळी साडेपाच वाजताच काढण्यात आली.

नेहमीप्रमाणे पहाटे चार वाजता निर्मोही आखाड्यातील साधू-महंतांच्या हस्ते इष्ट देवतांचे पूजन झाले. यावेळी आखाड्याचे अध्यक्ष राजेंद्रदास महाराज यांच्या हस्ते निशाण पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली. त्यानंतर आखाड्यातील पहिलवानांनी साहसी खेळांचे प्रदर्शन करीत दाणपट्टा, चक्र, तलवारी, भाले, काठ्या यांचे विविध खेळ सादर केले. त्यानंतर मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी बॅँडपथक भजन सादर करीत होते. सांडणीस्वार नागारा वाजवीत मिरवणूक आल्याची सूचना देत होते. मिरवणुकीच्या सुरुवातीला आखाड्यातील निशाण धरलेले साधू चालत होते.

मिरवणूक तपोवन, श्रीकृष्ण आइस फॅक्टरी, काट्या मारुती चौक, गणेशवाडी, तिळ्या गणपती, आयुर्वेद भवन, गौरी पटांगण मार्गे जुन्या भाजी बाजारात पोहचली. यंदाच्या मिरवणुकीत सहभागी होण्याचा प्रथम मान निर्मोही आखाड्याला, दुसरा मान दिगंबर आखाड्याला तर तिसरा मान निर्वाणी आखाड्याला होता. मात्र, स्नानाची क्रमवारी उलट होती. तीनही आखाड्याच्या महंतांचे गौरी पटांगणावार आगमन होताच परंपरेनुसार निर्वाणी आखाड्याच्या महंतांनी प्रथम स्नान केले. दिगंबर आखाड्याच्या महंतांनी द्वितीय स्नान तर र्निमोहीच्या साधू-महंतांनी सर्वात शेवटी तिसरे स्नान केले. तिनही आखाड्यांचे स्नान झाल्यानंतर रामकुंड, नरोत्तम भूवन, पंचवटी कारंजा, निमाणी बंगला, पांजरापोळ, सुविधा हॉटेल, काट्या मारुती चौक, आडगाव नाका मार्गे सर्व मिरवणुका साधुग्राममध्ये पोहचल्या.

वीज प्रवाह खंडित

पहाटे साडेपाच वाजता मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिराजवळ शाही मिरवणूक येताच वीज प्रवाह खंडित झाला. यामुळे स्वामी नारायण मंदिर ते तपोवन कॉर्नरपर्यंतचा मार्ग साधूंना अंधारात पार करावा लागला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काही वेळातच मार्गावरचा वीजपुरवठा सुरळीत केला.

भाविकांची संख्या कमी

पहिल्या आणि दुसऱ्या शाही मिरवणुकीच्यावेळी साधूंचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी केली होती. मात्र तिसऱ्या पर्वणीच्या मिरवणुकीत भाविकांची संख्या अगदी नगण्या होती. त्याचा परिणाम मिरवणुकीवर जाणवला. बघणारेच कुणी नसल्याने साधू-महंतांच्या गाड्या वेगाने रामकुंडाकडे जात होत्या. त्याच वेगात साधुग्रामकडे परततही होत्या. तिसरे शाही स्नान निर्विघ्न पार पडल्याने साधू-महंतानी आखाड्यात परतल्यावर मिठाई वाटून आनंद साजरा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्वणीवर जलाभिषेक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तडाखा बसेल इतका मुसळधार पाऊस, क्षणाक्षणाला वाढणारे गोदेचे पाणी, पाण्यात भाविक उतरले तर त्यांच्या बचावासाठी सरसावलेले जीवरक्षक, मुसळधार पावसाची व गोदेच्या पाण्याची पर्वा न करता कमरेपर्यंतच्या पाण्यात मानवी साखळी करून उभे असलेले पोलिस आणि तिसऱ्या पर्वणीत शाहीस्नानासाठी आतुर झालेले भाविक अन् या सर्व भाऊगर्दीत प्रशासनाकडून नाडले गेल्याचा आरोप करीत स्नानासाठी अडून बसलेले दिगंबर व निर्मोही आखाडे असे वातावरण होते तिसऱ्या व शेवटच्या पर्वणीचे. भाद्रपद ऋषिपंचमीचा मुहूर्त साधत ही तिसरी पर्वणी शुक्रवारी पार पडली. पहिल्या दोन पर्वण्या निर्विकार गेल्याने समाधानाचे वातावरण पसरलेले असतानाच तिसऱ्या पर्वणीला मात्र वादाचे गालबोट लागले.

ऋषिपंचमीच्या दिवशी रामकुंडात स्नान केल्याने पुण्यसंचय होतो, अशी आख्यायिका प्रचलित असल्याने यादिवशी देशभरातील लोक नाशिकला स्नानासाठी येतात. विशेष म्हणजे ऋषिपंचमीच्याच मुहूर्तावर तिसरी पर्वणी आल्याने भाविकांच्या गर्दीचा आकडा फुगला होता. यावेळी पहिल्या क्रमांकावर निर्मोही दुसऱ्या क्रमांकावर दिगंबर तर तिसऱ्या क्रमांकावर निर्वाणी आखाडा असे प्रशासनाकडून ठरवून देण्यात आले होते. त्यानुसार स्नानासाठी निघालेला निर्मोही आखाडा निशाण्यांसह अहिल्यादेवी धर्मशाळेपुढील पटांगणावर काही काळ थांबून राहिला. काही वेळात दिगंबर आखाडाही तेथपर्यंत येऊन पोहोचला. या दोन्ही आखाड्यांनी बराच वेळापर्यंत येथे ठिय्या मारल्याने तणावाचे वातावरण पसरले तसेच बहिष्कार टाकल्याची अफवाही काही काळ पसरली; मात्र निर्मोही आखाड्याचे महंत राजेंद्रदास यांनी स्पष्ट शब्दात हा बहिष्कार नसल्याचे सांगितले. परंतु दिगंबर आखाड्याचे रामकिशोरदास महाराज काही केल्या ऐकायला तयार नसल्याने वातावरण अधिकच चिघळले. अर्धा तासाहून अधिक कालावधी उलटून गेल्यावर सिंहस्थ अधिकारी महेश पाटील, पोलिस आयुक्त जगन्नाथन, जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह, मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी एकत्र येत सर्व साधुंची समजूत घातली मात्र वाद मिटेना. इष्टदेवतांच्या आधी खालशांनी स्नान का केले असा तो वाद निर्माण झाला होता. बराच काळानंतर या वादावर पडदा पडला व नऊ वाजून वीस मिनिटांनी निर्मोही आखाड्याने प्रथम स्नान केले. त्यानंतर थोड्याच वेळात दिगंबर व निर्वाणी आखाड्यानेही शांततेत स्नान केले. त्यांच्या निशाण्या वाजत-गाजत येऊन त्यावर प्रथम रामकुंडातील तीर्थ शिंपडण्यात आले. यावेळी भाले, तलवारी, दांडपट्टा, चंद्रभान घेऊन अनेक कसरती दाखविण्यात आल्या. त्यात पायाखाली ठेवलेला बटाटा दांडपट्ट्याने कापण्यात आल्याचे साधूचे कर्तब थक्क करणारे होते. आता मुख्य पर्वण्या संपलेल्या असून, भाविकांसाठी काही छोट्या पर्वण्या वर्षभर चालणार आहेत. ११ ऑगस्ट २०१६ रोजी ध्वजावतरणाने सिंहस्थाची सांगता होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंदवर्षा! जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन

0
0

टीम मटा

दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या नाशिक जिल्हा व परिसरात गुरूवारी मध्यरात्रीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. बाप्पांच्या आगमनाबरोबर गुरुवारी रात्रीपासून दीर्घ विश्रांतीनंतर शुक्रवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने सामान्यांबरोबरच बळी राजाच्याही आनंदाला पारावर उरला नाही. शेवटी देवालाच काळजी अशीच भावना सारे जण व्यक्त करीत होते.

रात्री उशिरापर्यंत पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात भरघोस वाढ होत आहे. शनिवारीही दमदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला असल्याने नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी शहराच्या अनेक भागांत वीजपुरवठा वारंवार खंडीत होत होता. रस्ते जलमय झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. काही भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. शाहीपर्वणीसाठी आलेल्या भाविकांचे या पावसाने अतोनात हाल केले.

नाशिक व उत्तर महाराष्ट्राबरोबर दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या संपूर्ण राज्याला या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. बळीराजाच्या जखमांवर फुंकर घालण्याचे काम वरुणराजाने केले आहे. नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याबरोबरच खरिपाची पिकेही वाचण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास पुढे गहू, हरभऱ्यासह रब्बीच्या पिकांनाही फायदा होणार आहे.

गेले अडीच-तीन महिने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला आहे. जूनमध्ये एकदा हजेरी लावून पाऊस गायब झाला होता. मराठवाड्यात भीषण पाणीटंचाईचे संकट होते. उत्तरा नक्षत्रातील हा पाऊस आनंदवर्षाव करणारा ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनहित याचिका चुकीच्या माहितीवर

0
0

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तीन टीएमसी नव्हे तर पाव टीएमसीच पाणी वापरण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका चुकीच्या माहितीवर दाखल झाल्याचा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. अभ्यास करून याचिका दाखल करायला हवी होती, असा टोलाही महाजन यांनी देसरडा यांना लगावला आहे. नाशिकच्या तीनही पर्वण्या शंभर टक्के यशस्वी झाल्याचाही दावा त्यांनी केला.

रामकुंडावर पत्रकारांशी बोलतांना, महाजन यांनी कुंभमेळ्यादरम्यान सोडण्यात येणाऱ्या तीन टीएमसी पाण्यासंदर्भातील याचिकेवर टीका केली आहे. हायकोर्टात दाखल केलेली याचिका चुकीच्या माहितीवर आधारित आहे. पहिल्या दोन पर्वण्यांसाठी केवळ २४० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. तर तिसऱ्या पर्वणीत केवळ ७० ते ८० दशलक्ष पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाव टीएमसीच पाण्याचा वापर तीन पर्वणींसाठी झाला आहे. हे पाणी सुद्धा खालच्या धरणांमध्ये वाहून गेले आहे. त्याचा कोणताही दुरूपयोग झाला नाही. त्या संदर्भातील स्पष्टीकरण राज्य सरकारतर्फे कोर्टात दिले जाणार आहे. याचिकाकर्त्यांना अभ्यास करून याचिका दाखल केली असती, तर न्यायालयाने असा निर्णय दिला नसता, असा टोलाही महाजन यांनी लगावला. नाशिकचा कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्यात राज्य सरकारसह स्थानिक प्रशासनाला यश आले आहे, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रामकुंडावर उघड झाले साधूंचे `अर्थकारण`

0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

नाशिक : 'पैसा तो माया है' हा चित्रपटातील डायलॉग ऐकण्यासाठी बरा वाटतो. सामान्यांच्याबाबतीत अक्रियाशील असलेला हा डायलॉग तसे पाहता साधूंच्या बाबतीत मात्र खरा ठरायला पाहिजे. त्यांना कसलीही मोहमाया नको, कारण त्यांनी संन्यास घेतानाच संसाराची माया, मोह सर्व सोडलेले असते. परंतु, काही साधूंनी पैसा ही जमविण्याचीच बाब आहे, जितका जास्त जमवता येईल तितका तो जमवायला हवा हेच सूत्र अंगी बाणवलेले दिसून येते. रामकुंडावर अशाच काही कथित साधूंचे अर्थकारण उघडकीस आले.

पहिल्या दोन्ही पर्वणींमध्ये अनेक खालशांनी भाविकांना एका रात्रीत सदस्यत्व देऊन त्यांना शाहीस्नान घडविल्याचे उघड झाले होते. यात आर्थिक व्यवहार झाल्याचाही आरोप होत होता. शुक्रवारीही तसाच काहीसा प्रत्यय आला. आखाड्यांचे स्नान सुरू असताना साडेनऊ वाजेच्या दरम्यान गंगा गोदावरी मंदिराजवळ तीन महिलांना घेऊन एक बलदंड साधू आला. त्याने या स्त्रियांना आखाड्यासमवेत आणले होते. त्यानंतर रामकुंडावरील पोलिसांना चकवत-चकवत तो गंगा गोदावरी मंदिराच्या खाली असलेल्या छोट्या खडकांकडे आला व त्या स्त्रियांना स्नानासाठी पुढे आणले. येथे उभ्या असलेल्या पोलिसांनी त्याला तसे न करण्याविषयी सुनावले. मात्र, त्यांचे न ऐकताच तो एक एक करून त्या महिलांना खडकावर नेऊन स्नानाविषयी सूचना करू लागला. त्याचवेळी दहा बारा पोलिस तेथे धावून आले व साधूला मागे खेचायला लागले असता, त्याने त्या सर्व पोलिसांना दोन्ही हातांनी रोखून धरले व 'माताजी, आप स्नान कर लिजिए' असा धोशा लावला. तो पोलिसांना हिंदीत काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होता. शेवटी त्यांना काही समजत नाही असे पाहून 'अरे, हमनें पैसा थोडाही ‌लिया है, हमें इतना तो पुण्य कमाने दो' असे म्हणत त्याने काही पोलिसांना चक्क लोटून दिले. त्या सर्व पोलिसांना पुरून उरत या तीनही महिलांना त्याने स्नान घातले व मगच तेथून हलला आणि आखाड्यामध्ये स्नान करण्यासाठी निघून गेला.

बाबाजीने दक्षिणा ली है!

कुंभमेळ्यात साधूंसमवेत स्नान करण्यासाठी भाविक पैसे देतात ही गोष्ट खोटी वाटावी अशीच आहे. मात्र, तिसऱ्या पर्वणीत पैसा घेऊन काही भाविकांना साधूने स्नान करण्यासाठी रामकुंडापर्यंत आणले. केवळ येथपर्यंत आणलेच नाही तर तेथील दहा ते बारा पोलिसांशी दोन दोन हात करीत त्यांना स्नान घडवून दिले. थांबविण्यासाठी आलेल्या दहाहून अधिक पोलिसांना या बलदंड साधूने दोन्ही हाताने रोखून धरले. या महिलांचे स्नान होत नाही, तोपर्यंत हा साधू तेथून हटला नाही. या परप्रांतीय महिलांशी संवाद साधला असता, `स्नान के लिए पैसा नहीं दिया है, वो तो बाबाजी ने पाच हजार दक्षिणा ली है`, असे सांगत अर्थकारणाचे गणित उलगडून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओलाचिंब ‘बंदोबस्त’

0
0

pravin.bidve@timesgroup.com

नाशिक : सिंहस्थातील कायदा आणि सुव्यवस्थेची भिस्त खऱ्या अर्थाने ज्यांच्या खांद्यावर होती, त्या पोलिस कर्मचाऱ्यांना पावसात भिजतच बंदोबस्ताचे कर्तव्य पार पाडावे लागले. रेनकोटशिवायच बंदोबस्त करावा लागल्याने त्यांचे अतोनात हाल झाले. धांदल उडविणाऱ्या पावसापासून बचावासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी आडोसा शोधून तेथूनच कर्तव्य पार पाडण्यात धन्यता मानली.

तब्बल १२ वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यावर तब्बल २४०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था, कंपन्या यांनी स्वत:हून उपलब्ध करून दिलेली मदत वेगळी. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था राखणारे पोलिस उपेक्षितच राहिल्याचे नाशिक शहरात झालेल्या तिसऱ्या पर्वणीत पहावयास मिळाले. पोलिसांचे कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन यशस्वी झाले असले तरी राज्यातील विविध भागातून आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची पुरेशी काळजी पोलिस प्रशासनाकडून घेतली गेली नसल्याचे पहावयास मिळाले. शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने पोलिसांची चांगलीच परीक्षा पाहिली. भद्रकाली, दहीपूल, धुमाळ पॉईंट, गाडगे महाराज चौक, सराफ बाजार, फळ मार्केट या परिसरातून गोदाघाट, रामकुंडाकडे जाण्यासाठी भाविकांचा मोठा ओघ होता. येथील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेडिंग केले होते. मात्र, यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांना पोलिस प्रशासनाकडून रेनकोटच प्राप्त झाले नाहीत. रात्रीपासूनच पावसाचा जोर असताना तसेच सकाळपासून भाविकांचा ओघही वाढला असताना पोलिसांना भर पावसात थांबूनच कर्तव्य पार पाडावे लागले.

दिवसभर पावसाचा जोर होता. सायंकाळी तो अधिकच वाढला. भाविकांची गर्दीही वाढल्याने भरपावसातच हे पोलिस कर्मचारी कर्तव्य पार पाडत असल्याचे पहावयास मिळाले.

क्राऊड कंट्रोल

आखाड्यांचे शाहीस्नान झाल्यानंतर लगेचच भाविकांची रामकुंड परिसरात गर्दी होत असल्याचा पोलिसांचा पहिल्या दोन पर्वण्यांचा अनुभव होता. म्हणूनच या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी तिसऱ्या पर्वणीतील नियोजनात बदल केला होता. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रामकुंडाजवळ बीएसएफच्या जवानांचे कडे करण्यात आले. त्यामुळे शाही स्नानानंतर लगेचच होणारी गर्दी आटोक्यात आणणे पोलिसांना शक्य झाले. त्यामुळे अनुचित प्रकार रोखण्यासही मदत झाली.

पोलिस- भाविकांत वाद

दुपारी साडेतीनच्या सुमारास भरपावसातही रामकुंडाकडे येणाऱ्या भाविकांचा ओघ वाढला होता. मात्र पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागल्याने भाविकांनी रामकुंड आणि गोदाघाट परिसरात गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाकडून केले जात होते. रामकुंडात स्नानासाठी शेकडो किलोमीटर अंतर कापून आलेले भाविक त्यामुळे संतप्त झाले. बंदोबस्तावरील पोलिसांसोबत त्यांचा वाद झाले. भाविक आक्रमक झाल्याने अखेर पोलिसांनी टप्प्या टप्प्याने भाविकांना सोडण्याचा निर्णय घेतला.

व्यावसायिकांचाही बुडाला व्यवसाय

पहिल्या पर्वणीत पोलिसांच्या अतिरेकी बंदोबस्तामुळे व्यावसा‌यिकांनी दुकाने बंद ठेवणेच पसंत केले. दुसऱ्या पर्वणीत ही दुकाने बऱ्यापैकी खुली असल्याने व्यवसायही चांगला झाला. तिसरी पर्वणी साधण्याची तयारी भाविकांनी केली होती. मात्र, मध्यरात्रीपासून धो धो बरसणाऱ्या पावसाने व्यावसायिकांना घराबाहेरही पडू दिले नाही. त्यामुळे इच्छा असूनही बरेचसे भाविक आज दुकाने उघडू शकले नाहीत.

डोंगरे वसतिगृह चिखलमय

पावसाने डोंगरे वसतिगृहावरील नियोजनाचे तीन तेरा वाजविले. तेथे भाविकांसाठी पत्र्याचे निवारा शेड उभारण्यात आले होते. मात्र, त्याखालीही पाणी साचल्याने हे शेड कुचकामी ठरले. भाविकांना चिखलातच बसावे लागले. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी उभारलेल्या शेडची स्थितीही यापेक्षा वेगळी नव्हती. त्यामुळे या पोलिसांच्या गाद्याही पावसाच्या पाण्यात ‌भिजत असल्याचे पहावयास मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील सर्वाधिक पाऊस नाशकात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनापाठोपाठ पावसानेही जोरदार पुनरागमन केल्याने दुष्काळाच्या विघ्नावर मात करता येणार आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने जिल्ह्यावर कृपादृष्टी केली आहे. ऐन पर्वणीलाच वरुणराजाने जिल्ह्यावर जलाभिषेक केल्याने बळीराजा सुखावला आहे. अवघ्या साडेसहा तासांत जिल्ह्यात ७१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राज्यातील हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. भक्तांच्या हाकेला बाप्पा पावल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे.ो

गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण भागाकडे पाठ फिरविणाऱ्या पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. चारा टंचाई, पाण्याचे दुर्भिक्ष्य सारख्या संकटांपासून सुटका होईल, अशी आशा पल्लवीत झाल्या आहेत. पावसाअभावी दुबार पेरणीची वेळ टळून गेल्याने जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावेत या मागणीने जोर धरला होता. त्यासाठी अनेक तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचे हत्यारही उपसले होते. मात्र आता पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

शहरासह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. दुपारी बारानंतर पावसाचा जोर ओसरला. तरीही दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. सकाळी आठपर्यंत जिल्ह्यात ७१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ हजार ३९२.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात धरणसाठ्यातील पाणीपातळी वाढली

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यात उत्तरा नक्षत्रातील पाऊस धो-धो बरसल्याने जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यातील २३ धरणांमध्ये ४२ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील हा साठा ७७ टक्के होता. त्यामुळे धरणक्षेत्रांना अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, शनिवारी शहरात आणि जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. मात्र पावसाचा जोर ओसरल्याचे पहावयास मिळाले.

गत वर्ष अखेरीस अवकाळी आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. हातची पिके डोळ्यांदेखत मातीत गेली. एकीकडे हंगाम नसताना धुडगूस घालणारा पाऊस ऐन हंगामात गायब झाल्याचा अनुभव बळीराजा घेत आहे. गेल्या तीन महिन्यांत मृगापाठोपाठ आद्रा नक्षत्रानेही हुलकावणी दिली. पुनर्वसू नक्षत्राने जिल्हाभर हजेरी लावून बळीराजाला दिलासा दिला. त्यावेळी जिल्ह्यातील २३ धरणांमध्ये केवळ १७ टक्के पाणीसाठा होता. पुढे तो २३ टक्क्यांवर गेला. जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्यात आला. मात्र तोही अपयशी ठरला. पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्याला दुष्काळी जाहीर करावे, अशी मागणी जोर धरू लागली असताना गुरूवारी मध्यरात्री उत्तरा नक्षत्रातील पावसाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी दिवसभर पाऊस बरसल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात थोडी वाढ झाली आहे.

उत्तरा नक्षत्रामुळे धरणांमधील पाणीसाठयात तब्बल १० टक्के वाढ झाली. शुक्रवारी सकाळपर्यंत धरणांमध्ये ३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. शुक्रवारी दिवसभरात कधी संततधार तर कधी मुसळधार सुरू होती. त्यामुळे एक दीड दिवसातच धरणांमधील पाणीसाठ्यात १० टक्के एवढी वाढ झाली आहे. त्यामुळे रब्बी पिकांसाठीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणांमधील पाणी पातळीत झपाट्याने वाढली आहे. कळवण तालुक्यात सर्वाधिक १४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल इगतपुरीत १२६ मि.मी, सुरगाण्यात १५१ मि.मी, निफाड, दिंडोरी आणि पेठमध्ये ९७ मि. मी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खरिपातील काढणीच्या अवस्थेतील पिकांना फटका बसला. कापूस, सोयाबीन, भात, भुईमूग, उडिद पिकांचे नुकसान झाले आहे. संततधारेमुळे फळबागांना मात्र दिलासा मिळाला आहे.

गंगापूर ६३ वरून ६७ टक्क्यांवर

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा ६३ वरून ६७ टक्क्यांवर पोहोचला आहे. कश्यपी धरणात ४९, गौतमी गोदावरीत ४७, पालखेड ८६, करंजवणमध्ये ३३, वाघाड ५२, ओझरखेड २७, पुणेगाव ३७, तिसगाव ४०, दारणा ६९, भावली ९७, मुकणे ३१, वालदेवी ६७, कडवा ७९, आळंदी ५७, भोजापूर १८, चणकापूर ८३, पुनद ७२, हरणबारी ९०, गिरणामध्ये फक्त चारच टक्के पाणीसाठा आहे. तर गिरणा खोऱ्यातील चरकापूर, पुनद, हरणबारी आणि केळझर या धरण क्षेत्रांमध्ये शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस पडला. त्यामुळे तेथील पाणी साठ्यामध्ये एकाच दिवसात कमालीची वाढ झाली आहे. या चार धरणांमध्ये सरासरी २२ ते ४७ टक्के एवढी मोठी वाढ झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन पर्वणींमध्ये दीड कोटी भाविक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा एक मोठे आव्हान आमच्यासमोर होते. निर्विघ्न कुंभमेळा पार पडेल की नाही याची चिंता होती. मात्र, प्रशासनाच्या प्रयत्नाने आणि भाविकांसह नाशिककरांनी सहकार्य केल्याने कुंभमेळा अविस्मरणीय झाला असून, नियोजनाचे एक उत्तम उदाहरण ठरल्याचा दावा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला. तीन पर्वण्यांमध्ये जवळपास दीड ते पावणेदोन कोटी भाविक नाशिकमध्ये आल्याचा दावा त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपेक्षित स्वच्छ व हरित कुंभमेळा केल्याचेही त्यांनी म्हटले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या पर्वणीनंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी कुंभमेळा कोणतेही संकट न येता निर्विघ्न पार पडलेला आहे. जवळपास तीन पर्वण्यांमिळून दीड कोटी भाविकांनी कुंभमेळ्यात हजेरी लावली. गर्दी म्हटली की चेंगराचेंगरी होते असा अनुभव आहे. त्यामुळे कुंभमेळ्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर होते. सुरक्षिततेची चिंता होती. त्यासाठी आम्ही यशस्वी प्रयत्न केले. नियोजनाचे उत्तम उदाहरण आम्ही समोर ठेवले आहे. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, मेळा अधिकाऱ्यांसह सर्वच यंत्रणांनी चांगले काम केल्याने कुंभमेळा यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी केला.

हरिद्वारच्या धर्तीवर गोदावरी नदीवर महाआरती सुरू करण्याचा विचार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. त्यासाठी पाण्याची अडचण आहे. गंगा नदीत वाहते पाणी असते. मात्र, गोदावरीचा प्रवाह खळखळता नाही. त्यामुळे अडचण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images