Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

डॉक्टरांचे आंदोलन; पेशंटच्या त्रासात भर

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, नाशिक

सिव्ह‌‌िल सर्जन डॉ. एकनाथ माले यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन छेडले. संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या डॉक्टरांनी केली. डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनाचा फटका सर्वसामन्यांना बसला. जिल्ह्याभरात तब्बल १५ हजारांपेक्षा अधिक रूग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागली. दरम्यान, सायंकाळी हे आंदोलन मागे घेण्यात आले.

सिव्ह‌िल हॉस्पिटलच्या नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि तेथील होस्टेलमध्ये राहत असलेल्या सुप्र‌िया माळी या तरूणीचा बुधवारी मृत्यू झाला. तिच्या आजारावर उपचार होत असताना सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्येच तिने शेवटचा श्वास घेतला. सुप्र‌ियाच्या मृत्युस सिव्ह‌िल प्रशासन जबाबदार असल्याचा दावा करीत नातेवाईकांनी सिव्ह‌िल सर्जन डॉ. एकनाथ माले यांना घेराव घातला. तसेच त्यातील काहींनी त्यांना मारहाण केली. सुप्र‌ियाच्या मृत्युनंतर नर्सिंगच्या इतर विद्यार्थींनीनी सुध्दा प्रशासनावर गंभीर आरोप केलेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाने सहायक संचालक डॉ. बी. डी. पवार यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय कमिटी नियुक्त केली असून, या कमिटीचा अहवाल लवकरच सादर होणार आहे.

दरम्यान, डॉ. माले यांना झालेल्या मारहाणीची गंभीर दखल राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने घेतली. संघटनेशी संलग्न असलेल्या वर्ग दोन, तीन आणि चारच्या कर्मचारी संघटनांनी देखील त्यास पा‌ठिंबा दिला. आज, गुरूवारी सकाळी संघटनेच्या सदस्यांनी ११ वाजता धरणे आंदोलन करीत मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवला. डॉ. माले यांना मारहाण करणाऱ्या विवेक तांबेसह इतरांना त्वरीत अटक करण्यात यावी. संशयितांना अटक करीत नाही तोपर्यंत सिव्ह‌िल हॉस्पिटल, उपजिल्हा रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रातील इर्मजन्सी सेवा वगळता इतर आरोग्य सेवा बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी आरोग्य सेवाचे डॉ. बी. डी. पवार, संघटनेचे पदाधिकारी येथे उपस्थित होते.

पेशंटचे हाल

डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनाचा फटका सर्वसामन्य नागरिकांना बसला. सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये दिवसाकाठी १ हजार ५०० पेशंटवर उपचार केले जातात. तर जिल्ह्याभरात किमान १५ हजार पेशंट सरकारी हॉस्पिटलमध्ये येतात. आजच्या कामबंद आंदोलनामुळे या पेशंटची हाल झाली. इर्मजन्सी तसेच बाळतंपणासारख्या केसेसला यातून वगळण्यात आले होते. ऑपरेशनच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्याने पेशंटना त्रास सोसावा लागला.

संशयितांना अटक करण्याची आमची मुख्य मागणी आहे. वारंवार मारहाणीच्या घटना घडत असून, त्यास आळा न बसल्यास पेशंटवर उपचार करण्यास डॉक्टर धजावणार नाही.

- डॉ. एकनाथ माले, सिव्ह‌िल सर्जन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हेल्थ केअरमध्ये नाशिकची भरारी

$
0
0

vinod.patil‍@timesgroup.com

नाशिक : मुंबई-पुणे शहरातील वैद्यकीय सेवा सुविधा आता नाशिकमध्ये उपलब्ध होऊ लागल्याने वैद्यकीय क्षेत्रासाठी नाशिक नवीन डेस्ट‌िनेशन म्हणून उदयास येत आहे. शहरात कमी खर्चातील शासकीय उपचार सुविधांसोबतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाची कार्पोरेट स्पेशालिस्ट हॉस्प‌िटल्स व सुपर स्पेशालिटी हॉस्प‌िटल्सची साखळीच उभी राह‌िली आहे. तर आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वैद्यकीय महाविद्यालये, आयुर्वेद महाविद्यालय, नर्सिग कॉलेजेसचेही जाळे उभे राहिल्याने आता नाशिकचा प्रवास मेड‌िकल टूरिझमच्या दिशेन सुरू झाला आहे. सद्यस्थितीत शहरातील विविध प्रकारच्या स्पेशालिस्ट अशा १२७५ हॉस्पीटल्समधून उत्तम दर्जाची वैद्यकीय सुविधा रुग्णांना ‌मिळत आहे. वाढती लोकसंख्या आणि देश परदेशातून येणाऱ्या रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यासाठीची आरोग्य यत्रंणा नाशिकमध्ये उभी राहत आहे. त्यामुळे नाशिकचा प्रवास स्मार्टसिटीच्या सुरू झाला आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेत नाशिकचा समावेश केला असून, स्मार्ट सिटीच्या दिशेने झेपावणाऱ्या नाशिकला वैद्यकीय सुविधांचाही निकष पूर्ण करावा लागणार आहे. वैद्यकीय सुविधांचा हा निकष पूर्ण करण्यासाठी नाशिकचे वातावरण अनुकूल असून, त्या दृष्टीने नाशिकने अगोदरच पावले उचलली आहेत. सद्यस्थितीत शहरात ९० टक्के आरोग्यसेवा ही खाजगी हॉस्प‌िटल्समधून पुरविली जाते. त्यामुळेच देशात आरोग्य सुविधांबाबत उदयोन्मुख शहर बनल्याचा निष्कर्ष एका सर्व्हेक्षणातून समोर आल्यानंतर नाशिकला हेल्थ केअरमधील 'बेस्ट इमर्जिंग सिटी इन हेल्थ केअर' हा किताबही लाभले आहे. मल्टी फॅसिलिटी हॉस्पिटल्स, मर्क्युरी सुपर स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स पाठोपाठ मोठ्या आरोग्य क्षेत्रातील उद्योग समूहांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून शहरात एका छताखाली सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करणारी साखळी पद्धतीची हॉस्प‌िटल्स शहरात आता उभी राहत आहेत. मोठ्या प्रमाणावर हॉस्प‌िटल्सची साखळी उभी राहत असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्यात काही प्रमाणात चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधा आता येताना दिसत आहेत.

सद्यसिस्थितीत नाशिकची लोकसंख्या ही १८ लाखाच्या आसपास आहे. २०१५ मध्ये नाशिकची लोकंसख्या ही ५२ लाखाच्या आसपास जाणार आहे. त्यासाठीचे वैद्यकीय सोयी सुविधा उभारण्यावरही महापालिकेने भर दिला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या सामना करण्यासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. शहरात सद्यस्थितीत पाचशे लोकांमागे सरासरी एक डॉक्टर आहेत. त्यांची संख्या वाढविणे आवश्यक असून, त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील एकूण डॉक्टरांपैकी ५४ टक्के डॉक्टर्स शहरात आहेत. जिल्ह्यात सुमारे १४ हजार रुग्णखाटा असून, ४६९ लोकांमागे एक खाट असे प्रमाण. रुग्णखाटांपैकी ६१ टक्के नाशिक शहरात, २८ टक्के सार्वजनिक क्षेत्रात आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये ५-२० खाटांची रुग्णालये सर्वाधिक आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बराचसा फायदा शहराला होत आहे. एक शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालयही आहेत. शिवाय मविप्रचे भव्य रुग्णालयही आहे. त्यासोबतच सहा नर्सिंग कॉलेज, दंत महाविद्यालय, तीन आयुर्वेद महाविदयालय असल्याने वाढत्या लोकसंख्येची गरज पूर्ण करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करणारी यंत्रणा शहरात उभी राहिली आहे. शहरातील अनेक हॉस्प‌िटल्समधून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कोर्सेस राबविले जात असून, सुपर हॉस्प‌िटल्सला आवश्यक मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न होत आहे. डिप्लोमा, बॅचरल डिग्री ते अगदी पीजीपर्यंतचे कोर्सेस आता हॉस्प‌िलमध्ये राबविले जात आहेत.

शहराला वैद्यकीय सेवा सुविधा पुरवण्यासाठी खासगी कंपन्या या क्षेत्रात उतरत आहेत. क्रिटिकल आजार, ह्दयविकार, बायपास, किडनी ट्रान्सप्लान्टेशन, न्यूरोसह मानसोपचारपर्यंत अन् गंभीर अपघातग्रस्तांना उपचारासाठी मुंबई, पुण्यात घेवून जाण्याची प्रथा आता बंद झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वैद्यकीय सेवा अद्ययावत केल्या जात आहेत. आता वातानुकुलीत अतिदक्षता विभाग, डायलिसीस युनिट, पेरीटोनिअल डायलिसीस, किडनी बायोप्सी, प्लासमाफेरसीस, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, एमआरआय, हायस्प‌‌िड सिटी स्कॅन, सांधे प्रत्यारोपण, टेस्ट ट्यूब बेबी यासारख्या सुविधा देणारे मल्ट‌ि स्पेशालिटी, मर्क्युरी सुपर तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्प‌िटल नाशिकमध्ये उभी राहिली आहेत. अपघातग्रस्तांसाठी अॅक्सिडेंट हॉस्प‌िटल ट्रॉमाकेअर, क्रिटीकेअर सेंटरही सज्ज झाली आहेत. या सोबतच शासकीय रुग्णालयामध्येही आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने गोरगरिबांनाही कमी खर्चात आरोग्यसेवा उपलब्ध होत आहेत.

हॉस्प‌िटल्सच्या संख्येत वाढ

अपोलो ,सिक्स सिग्मा, वोक्हार्ट हॉस्प‌िटल, शताब्दी हॉस्प‌िटल , सह्याद्री हॉस्प‌िटल, मॅग्नम, क्युरी मानवता कॅन्सर सेंटर्स, ही साखळी हॉस्प‌िटल्स नाशिकमध्ये सध्या कार्यरत आहेत. अजूनही काही मोठ्या ग्रुपची स्पेशालिस्ट हॉस्पीटल्स नाशिकमध्ये येऊ घातली आहे. या कॉर्पोरेट हॉस्प‌िटलसोबत सुयश हॉस्पीटल, सोपान हॉस्प‌िटल, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, नामको हॉस्पिटल, राजे बहादूर हार्ट फाउंडेशन, नाशिक बर्न हॉस्प‌िटल, लोटस हॉस्प‌‌िटल, जेनेटिक हेल्थकेअर अॅण्ड रिसर्च सेंटर, सिटीकेअर हॉस्पीटल्स, अश्विनी हॉस्पिटल, श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट, श्री गुरूजी हॉस्प‌िटल, मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट, ऋषिकेश हॉस्पिटल, श्री गुरूजी हॉस्पीटल्स अशी आधुनिक हॉस्पिटल्स दर्जेदार आरोग्यसेवा पुरवत आहेत. तर शहर गेल्या चार-पाच वर्षात शहर मेडिकल टूरिझमच्या दिशेने झेपावतांना दिसत आहे. अनेक हॉस्प‌िटल्समध्ये मेडिकल टूरिझमचा स्वतंत्र विभागही चालवितो.

नाशिकमधील हॉस्पीटल्स

वैद्यकीय महाविद्यालये २

आयुर्वेद महाविद्यालय ३

नर्सिग कॉलेज ६

फार्मसी महाविद्यालये ११

शहरातील हॉस्पीटल्स १२४५

स्पेशालिस्ट हॉस्पीटल्स ३

सुपरस्पेशालीटी हॉस्पीटल्स २४

शासकीय हॉस्पीटल्स २

महापालिकेची हॉस्पीटल्स ५

पॅथॉलॉजी लॅब २८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशभक्तांचा उत्साह होणार द्विगुणीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्या लाडक्या बाप्पाच्या लोकप्रिय उत्सवात 'महाराष्ट्र टाइम्स'ही सहभागी झाला असून, याद्वारे नाशिककरांचा आनंद द्विगुणीत करण्याचा हेतू आहे. आपल्या घरातील गणपतीचे फोटो शेअर करुन ते वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यासह विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजनही 'मटा'तर्फे करण्यात आले आहे.

आपल्या घरातील लाडक्या गणपती बाप्पाचे फोटो http://www.mataganeshotsav.com या वेबसाईटवर अपलोड करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच हे फोटो ८८६६००१८३० या क्रमांकावर व्हॉट्स अॅपही करता येऊ शकतात. याचबरोबर वेबसाईटवर तुम्ही तुमची हटके रेसिपीही पोस्ट करु शकता. येत्या शनिवारी (२६ सप्टेंबर) 'मोदक माझा चविष्ट' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी ३ वाजता इंदिरानगरच्या बापू बंगल्याजवळ असलेल्या राधाकृष्ण मंगल कार्यालयामध्ये ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी मोफत असून, यामध्ये भाग घेण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुकांना ६६३७९३९ या नंबरवर नोंदणी करावी लागणार आहे. या स्पर्धेसाठी येताना घरुनच मोदक बनवून आणावे लागणार असून मोदकांची संख्या किमान ११ असणे गरजेचे आहे. तसेच, 'मटा'च्यावतीने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'माझा नजरेतला गणपती' ही अनोखी स्पर्धा घेण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या नजरेतला बाप्पा रेखाटला आहे. याच अप्रतिम बाप्पांचे दर्शन इतरांनाही घडावे यासाठी विशेष चित्र प्रदर्शनाचेही आयोजन येत्या शनिवारी करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत राधाकृष्ण मंगल कार्यालय, बापू बंगल्याजवळ, इंदिरानगर येथे हे प्रदर्शन होणार असून ते सर्वांसाठी खुले आहे. प्रदर्शनातील उत्कृष्ट चित्रांना 'मटा'तर्फे आकर्षक बक्षिसही दिले जाणार आहे.

'दगडूशेठ'चा प्रसाद मोफत

पुणे येथील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीचा प्रसाद 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'मटा कल्चर क्लब' सदस्यांना मोफत मिळणार आहे. यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिमेचाही समावेश आहे. शुक्रवारी आणि शनिवारी (२५ व २६ सप्टेंबर) रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत डिसुझा कॉलनीतील 'मटा'च्या कार्यालयात हा प्रसाद देण्यात येणार आहे. त्यासाठी कल्चर क्लब सदस्यांनी क्लबकार्ड घेऊन येणे आवश्यक आहे. कल्चरक्लब सदस्यांसाठी महाराष्ट्र टाइम्सने नेहमीच वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची भेट दिली आहे. याचाच एक भाग म्हणून सर्व कल्चरक्लब सदस्यांना बाप्पाचा हा प्रसाद देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् ‘विचारधना’पासून बचावले विद्यार्थी

$
0
0

जागरूक शिक्षक-पालकांमुळे साधकांचा भांडाफोड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बलात्कारप्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेले वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्या आश्रमातील साधकांनी बापूंची प्रतिमा सुधारण्यासाठी सुरू केलेला उपक्रम सजग शिक्षक व पालकांनी गुरुवारी हाणून पाडला. महापालिकेच्या शाळा क्रमांक ७७ मध्ये योग शिक्षणाच्या नावाखाली साधकांनी चक्क बापूंचे `विचारधन` विद्यार्थ्यांपुढे सादर करतानाच त्यावर परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने पालकांनी उदात्तीकरण थांबवले. शिक्षण समितीनेही आश्रमाला शाळांमध्ये योग शिकवण्याच्या दिलेली परवानगी रद्द केली आहे.

आसाराम बापू व त्यांचा मुलगा नारायण साई हे महिला साधकांवरील बलात्काराच्या आरोपांखाली तुरुंगात आहेत. असे असतानाही बापूंच्या विविध आश्रमांतून त्यांचे साधक त्यांच्या विचारधनाचा प्रसार व प्रचार करीत आहेत. त्यासाठी आता त्यांनी योगशिक्षणाचा आधार घेतला आहे. गंगापूर रोडवरील आसाराम बापू आश्रमातील साधकांनी शिक्षण समिती सभापतींकडून महापालिकेच्या शाळांमध्ये योग शिक्षणासाठी परवानगी मागितली. त्र्यंबकच्या योगधामच्या नावाखाली परवानगी घेण्यात आली. मात्र, या साधकांनी या परवानगीखाली छुपा अजेंडा राबविण्यास सुरुवात केली. गंगापूर रोडवरील शाळा क्रमांक ७७ मध्ये या साधकांनी योग शिक्षणाऐवजी बापूंचे विचारधन असलेल्या पुस्तकांचे वाटप सुरू केले. प्रतिविद्यार्थी सहा रुपये शुल्क आकारून पुस्तकावर परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली होती. काही शिक्षक व पालकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी साधकांच्या नावाने तक्रार केली.

त्र्यंबकेश्वरच्या योगसाधना केंद्राच्या नावाने या साधकांनी परवानगी घेतली होती. मात्र, शिक्षकांनी हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर या साधकांना दिलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे.

संजय चव्हाण, सभापती, शिक्षण समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांना तीन दिवस सुटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

शुक्रवारपासून तीन दिवस राष्ट्रीयकृत बँकांना सुटी असल्याने ग्राहक व व्यावसायिकांची अडचण होणार आहे. एटीएममधील पैसे संपल्यास त्र्यंबकेश्वरमधील सिंहस्थ पर्वणीसाठी शहरात दाखल होत असलेल्या भाविकांचे हाल होण्याची शक्यता आहे.

२५ सप्टेंबरला बकरी ईद असल्याने बँकांना सुटी आहे. नवीन नियमानुसार दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बँकांना सुटी राहणार आहे. त्यामुळे २६ ला शनिवारी आणि लगेचच रविवारी बँका बंद राहणार आहेत. काही बँकांनी एटीएममध्ये पुरेशा पैशाची व्यवस्था केल्याचा दावा केला असला तरी खबरदारी म्हणून ग्राहकांनी अगोदरच पैसे काढण्यास सुरवात केल्याने एटीएममध्ये पैसे नसल्याचे बोर्ड झळकत आहेत.

केरळ व तामिळनाडू या राज्यांत गुरुवारी बकरी ईद साजरी झाली. मात्र महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी ‍उर्वरित राज्यांत ईद शुक्रवारी साजरी होईल. त्यातच २८ पासून पितृ पंधरवड्याला सुरुवात होत आहे. या पंधरवड्यात बरेचजण नवी खरेदी करत नाहीत. त्यामुळे जोडून आलेल्या सुटीचा सदुपयोग करत या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणावर खरेदी होणार आहे. या खरेदीसाठी एटीएममधून पैसे काढताना रोकड टंचाईला तोंड देण्याची वेळ ग्राहकांवर येऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये आज शेवटचे शाहीस्नान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर नगरीत आज, शुक्रवारी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अखेरचा तिसरा शाहीस्नान सोहळा पार पडत आहे. या उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी शहरात भाविकांची गुरूवारपासूनच गर्दी होऊ लागली होती. यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील हे अखेरचे शाहीस्नान असल्याने ही पर्वणी साधण्यासाठी परप्रांतीय भाविकांपेक्षाही महाराष्ट्रीयन भक्तांचीच मांदियाळी जमल्याचे चित्र दिसून आले.

नाशिकमध्ये सिंहस्थाच्या तीनही पर्वणी उत्साहात आणि निर्विघ्न पार पडल्या. त्र्यंबकेश्वरमध्येही शैव साधूंनी पहिल्या दोन पर्वणींचा मनमुराद आनंद घेतला. येथे शेवटची म्हणजेच तिसरी शाही पर्वणी आज आहे. ही पर्वणी उत्साहात परंतु निर्विघ्न पार पाडावी असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी पोलिसही सज्ज झाले आहेत. सिंहस्थातील शेवटची शाही पर्वणी असल्याने तिचा आनंद लुटण्यासाठी त्र्यंबकेश्वरमधील महानिर्वाणी आखाडा, अटल आखाडा, निरांजणी आखाडा,आनंद आखाडा, पंचदशनाम जूना आखाडा,आवाहन आखाडा, पंचाग्नी आखाडा, बडा उदासीन आखाडा, नया उदासीन आखाडा, निर्मल हे आखाडे सज्ज झाले आहेत. कुशावर्तामध्ये शेवटचे शाहीस्नान करण्यासाठी आखाड्यांमधील साधूमहंत उत्सुक आहेत. सर्व आखाडे आकर्षक रोषणाईने उजळून निघाले आहेत. साधू-महंतांच्या मिरवणुकीची सर्वच आखाड्यांनी जय्यत तयारी केली आहे.

गत दोन पर्वणींमध्ये परप्रांतीय भाविकांचा ओघ अधिक असला तरी तिसऱ्या पर्वणीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून गुरूवारी भाविकांचा ओघ वाढला आहे. गुरूवारी सकाळपासूनच त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पाच अधीक्षक, २५ उपअधीक्षक, ६० पोलिस निरीक्षक, ४०० उपनिरीक्षक आणि सहा हजार ५०० पोलिस कर्मचारी, होमगार्डस असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अन्य घाटांवर स्नानाचे आवाहन

पर्वणीला होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांनी त्र्यंबकेश्वरमध्ये विकसित केलेल्या अन्य घाटांवरही स्नानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. साधू-महतांचे शाहीस्नान साधारणत: सकाळी अकराच्या सुमारास पूर्ण होईल. दुपारी बारापासून भाविकांना कुशावर्तावर प्रवेश देण्यात येणार आहे. होल्ड अॅन्ड रिलीजच्या माध्यमातून भाविकांना टप्प्या टप्प्याने कुशावर्तावर तसेच त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी सोडले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांसह पोलिसांचेही हाल

$
0
0

नामदेव पवार, सातपूर

सिंहस्थाच्या अखेरच्या पर्वला भाविकांची प्रमाणापेक्षा अधिक संख्या वाढल्याने भाविकांसह पोलिसांचेही हाल झाले. भाविक खासगी आणि एसटी बसने त्र्यंबकमध्ये दाखल होण्याची गती वाढतच गेल्याने पोलिसांची वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी दमछाक झाली.

शुक्रवारी पहाटे तुलनेने शांत असलेला त्र्यंबकरोड सकाळ उजाडताच भाविकांसह त्यांच्या वाहनांच्या गर्दीने फुलून आला. वाहतूक कोंडी वाढत असल्याने पोलिसांनी तातडीने बॅरिकेडींग वाढविण्यास सुरुवात केली. खासगी वाहनांना तर खंबाळे पार्किंगमध्ये रोखण्यात येत होते. नंतर तर खंबाळेच्या अलिकडेच वाहने थांबविण्यात आली. खंबाळे येथेही एसटी महामंडळाच्या बसेस रोखण्यात आल्या. भाविकांच्या रोषाचा पोलिसांना जागोजागी सामना करावा लागला. पोलिसांनी कधी समजावून तर कधी दरडावून भाविकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांची पुरती दमछाक झाली.

इतने भाविक कहाँसे आये भाई?

शाहीस्नानासाठी शुक्रवारी सकाळनंतर भाविकांच्या अचानक वाढलेल्या गर्दींमुळे पोलिस आयुक्त एस. जगनन्नाथन हे देखील अवाक् झाले. 'इतने भाविक कहाँसे, आये भाई?' असा सवाल आपल्या सहकाऱ्यांना आयुक्तांना आश्चर्य लपविणे शक्य झाले नाही. आयटीआय सिग्नल व पपया नसर्री येथे अचानक वाढलेली भाविकांची गर्दी, खाजगी वाहने व एसटी बसमुळे पोलिस आयुक्तांलयातील सर्वच अधिकारी वाहतूक सुरळीत करण्यात गुंतले. शहरातून येणाऱ्या बसेस फुल असल्याने त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भाविकांना ताटकळतच उभे राहवे लागले. एखादी बस उपलब्ध झाल्यास पोलिसांनी भाविकांना जागा करून देत बसविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसऱ्या पर्वणीला हॉटेलचे दर तिप्पट

$
0
0

vijay.mahale@timesgroup.com

त्र्यंबकेश्वर : शाहीस्नानाची अखेरची संधी म्हणून त्र्यंबकनगरीत लाखो भाविक दाखल झाले. याचा सर्वाधिक लाभ स्थानिक हॉटेल व्यावसायिकांसह पेईंग गेस्ट म्हणून भाविकांना आपल्या घरात मुक्कामाची संधी उपलब्ध करून देणाऱ्यांनी घेतला. गुरुवारी सायंकाळी तर व्यावसायिकांच्या गाळ्यांमध्येही भाविकांनी मुक्काम केला. त्यासाठीही त्यांना वारेमाप पैसे मोजावे लागले.

पर्वणीसाठी त्र्यंबकनगरीमध्ये भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा अधिक वाढल्याने रातोरात हॉटेलमधील रुमचे दर तिप्पट झाले. ऐरवी १५०० ते १७०० रुपये मोजावे लागणाऱ्या रुमसाठी भाविकांना साडे तीन हजार ते ५ हजार रुपये मोजावे लागले. अचानक इतके दर का वाढले? असा प्रश्न केला असता हॉटेलचालकांनी सगळीकडे दर वाढवले आहे. तुम्ही कुठेही जाऊन चौकशी करू शकता, असे उत्तर देत भाविकांची बोळवण केली. मात्र, पर्याय शिल्लक नसल्याने भाविकांनी जादा पैसे मोजत सुमार दर्ज्याच्या हॉटेलांमध्ये मुक्काम केला. काही थ्री स्टार हॉटेलमध्ये तर रात्रभर मुक्कामासाठी तब्बल २० हजार रुपये दर होता.

भाविकांना त्र्यंबकमध्ये हॉटेलमध्ये राहण्यासाठी प्रचंड पैसे मोजावे लागले. ऐरवी घेतल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा सुमारे तिप्पट रक्कम वसूल करण्यात आली.

- अनघा कुलकर्णी, भाविक

गाळे, पार्किंगमध्ये विश्रांतीची व्यवस्था

जादा पैसे देणे शक्य नसलेल्या भाविकांनी स्वस्तातला पर्याय मागितला असता हॉटेलचालकांनी त्यांना पार्किंगमध्ये गादी, ब्लँकेट टाकून देत आराम करण्याची व्यवस्था करून दिली. तसेच काही व्यावसायिकांनी आले बंद असलेले गाळ्यांमध्ये भाविकांची सोय केली. मात्र, यासाठीही भाविकांना प्रतिव्यक्ती २५० ते ५०० रुपये द्यावे लागले. ज्या भाविकांना जादा पैसे मोजणे शक्य नव्हते त्यांनी थेट झाडाखाली, फुटपाथवर पेपर टाकून रात्री मुक्काम केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाविकांची नियोजनावर टीका अन् स्तुतीसुमने

$
0
0

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथे तिसरी व शेवटची पर्वणी डोळ्यांची पारणे फेडणारी ठरली. त्र्यंबकेश्वरमध्ये खऱ्या अर्थाने शुक्रवारी वैश्विक मेळा भरल्याचे दिसून आले. या पर्वणीला महाराष्ट्रायीन भाविकांनी शाहीस्नानासाठी प्रचंड गर्दी केली होती. दिवसभर भाविकांचा ओघ सरूच होता. यामुळे पोलिस व एस. टी. प्रशासनाचाही नियोजनाचा फज्जा उडाला. भाविकांनी नियोजनावर टीका केली असली तरी हा सोहळा जवळून पहायला मिळाल्याने आनंद व्यक्त केला. पुण्यफल सहजासहजी मिळत नाही, अशा प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केल्या.

ही पहिलीच पर्वणी अनुभवयाला मिळाली. स्नानासाठी दोन दिवस वाट पहायला लागली. मोठ्या प्रयत्नानंतर स्नान करता आले. नागा साधूंना पहाण्याचा अनुभव वेगळाच होता. प्रशासनाचे नियोजन ठिकठाक होते. आम्ही हा सोहळा एन्जॉय केला.

- सचिन पाटील, मुंबई

त्र्यंबकेश्वरमध्ये भाविक व पर्यटकांची खूपच गर्दी झाली. यामुळे पोलिसांना नियंत्रण मिळविणे अवघड गेले. असे असूनही कुशावर्तात स्नान करावयास मिळाले, याचे समाधान वाटते. छोट्याशा जागेतही चांगले नियोजन झाले.

- चंद्रहास कलाल, कर्नाटक

सुंदर अन् छान नियोजन केले. भाविकांची अमाप गर्दी होऊनही प्रशासनाने व्यवस्थितरित्या हाताळले. याबाबत प्रशासनाला शंभर गुण द्यायला हवेत. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. भाविकांनी मिरवणूक पाहता आली अन् आनंदही घेता आला.

- सुरेश निपुरते, ठाणे

आम्ही तीनही पर्वण्यांमध्ये शाहीस्नान केले. प्रशासनाने चांगले नियोजन केले. लाखो लोकांवर नियंत्रण मिळविणे सापे काम नाही. आम्हाला वेळेत स्नान करण्यास मिळाले. मिरवणुकाही जवळून पाहता आल्या. स्वच्छता असल्याने आरोग्याची समस्या जाणवली नाही.

- विष्णू वेखंडे, वाडा, ठाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतुकीचा फज्जा

$
0
0

अडथळ्यांची शर्यत पार करीत भाविकांची त्र्यंबकपर्यंत धाव

pravin.bidve@timesgroup.com

त्र्यंबकेश्वर : नाशिकहून येणाऱ्या भाविकांसाठी खंबाळे येथे पार्किंगची व्यवस्‍था करण्यात आली होती. मात्र, भाविकांची गर्दी वाढल्याने रस्‍त्यांवरच वाहने पार्क करण्यात आली. तसेच रस्‍त्याच्‍या दुर्तफा भाविकांनी गर्दी केल्याने वाहनांना रस्‍त्यावर धावणे मुश्किल झाले. यामुळे पोलिसांनी त्र्यंबक शहराबाहेर जाण्यास तसेच, शहरात येण्यासही वाहनांना प्रतिबंध केला. परिणामी भाविकांना खंबाळेपासून तब्बल दहा ते बारा किलोमीटरची पायपीट करीत त्र्यंबकेश्वर गाठावे लागले. यामुळे भाविकांचे खूपच हाल झाले.

तिसऱ्या पर्वणीसाठी पोलिस प्रशासनाने त्र्यंबकेश्वर शहराबाहेरील बसस्‍थानकापर्यंत एस. टी. बसेस तसेच खासगी फोर व्हीलर, टू व्हीलर तसेच पासधारक वाहनांना एन्ट्री दिली होती. यामुळे त्र्यंबकमध्ये पार्किंगचा प्रश्न किचकट बनला होता. रात्री दोन वाजेपर्यंत गर्दीचा अंदाज न आल्याने पोलिस प्रशासनाने वाहने अडवली नाहीत. याचा परिणाम पुढे वाहतूक कोंडीवर झाला. पहाटे चार वाजेपर्यंत पोलिसांनी सुमारे तीन ते चार लाख भाविकांना त्र्यंबकमध्ये सोडले. परिणामी त्र्यंबकमधील सर्व रस्ते भाविकांनी गजबजले. वाहनेही रस्त्यावरच उभी करण्यात आली होती. यामुळे भाविकांना वाहतुकी कोंडीला सामोरे जावे लागले.

गर्दी वाढताच पहाटे चारनंतर पोलिसांनी 'होल्ड अॅण्ड रिलीज'चा अवलंब ‌केला. श्रीचंद्र घाटाजवळ पोलिसांना बॅरिके‌डिंग करावी लागली. यामुळे भाविकांच्या रांग लांबल्यानंतर भाविकांनी पूर्ण रस्ता काबीज केला. यामुळे वाहनांना मार्ग काढणे मुश्लिक झाले. भाविकांना आवरणे मुश्किल झाल्यानंतर पोलिसांनी खंबाळेपासून वाहनांना सोडणे बंद केले. परिणामी भाविकांना पायपीट करावी लागली. बसेसही भाविकांना घेत असल्याने लहान बालके व ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

१२५ बसेस 'स्टॉप'

भाविकांची गर्दी वाढल्याचे लक्षात येताच प्रशासनाने खंबाळे पार्किंगजवळ एस. टी बसेसना थांबण्याचे आदेश दिले. यामुळे खंबाळे पार्किंग ते महिंद्राच्या पार्किंग गेटपर्यंत एस. टी बसेसची दुर्तफा रांग लागली होती. भाविकांनी भरलेल्या सुमारे १२५ बसेस या मार्गावर थांबून होत्या. त्याहून दुप्पट खासगी वाहने रस्त्याच्या आजूबाजूला उभी करण्यात आली होती. यामुळे वाहने मुंगीच्या गतीनेही पुढे सरकत नव्हती.

रस्त्यावर झोपले भाविक

शहरातील हॉटेल फूल झाल्याने भाविकांनी बसस्‍थानक, नगरपालिका आवार, तहसील कार्यालय परिसर आणि मिळेल तेथे जागा धरीत हातपाय पसरवले. यामुळे त्र्यंबकमधील सर्व रस्त्यांवर, ओट्यांवर भाविकांनी कब्जा केल्याने भाविकांना वाट काढणेही मुश्किल झाले होते.

पोलिस वाहनांतून वाहतूक

गर्दीमुळे त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे बसेस सोडण्यात एसटी बसेसला अडचणी येत होत्या. त्यामुळे बरेचसे भाविक त्र्यंबकेश्वरमध्येच अडकून पडले होते. बाहेरून येणाऱ्या भाविकांचा ओघ पहाता त्र्यंबकमधील गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या वाहनांमधून प्रवाशांची खंबाळ्यापर्यंत वाहतूक केली. दरम्यान, बस फुल्ल झाल्याने प्रवाशांना रिक्षा पिकअपच्या टपावर बसून प्रवास करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटांनीही अनुभवला शाहीस्नान सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

पहिल्या दोन पर्वणींना भाविकांनी त्र्यंबकेश्वरमधील तीनही घाटांकडे पाठ फिरवली होती. मात्र, तिसऱ्या शाही पर्वणीला भाविकांची गर्दी उसळल्याने अहल्या घाट व श्रीचंद्रेश्वर घाट भाविकांनी गजबजले होते. श्रीचंद्रेश्वर घाटावर कुशावर्ताप्रमाणेच गर्दी दिसून आली. घाटाच्या टोकापासून शेवटपर्यंत भाविकांना शाहीस्नानाचा आनंद घेतला.

तिसऱ्या शाही पर्वणीला अनपेक्षितपणे भाविकांनी प्रचंड हजेरी लावल्याने प्रशासनावर दबाव निर्माण झाला होता. यामुळे होल्ड अॅण्ड रिलीज पध्दतीचा अवलंब करण्यात आला. पहाटे चार वाजेपर्यंत भाविकांना त्र्यंबक शहरात प्रवेश देण्यात येत होता. यामुळे रात्रीच सुमारे दोन ते तीन लाख भाविक त्र्यंबक शहरात दाखल झाले होते. सकाळी गर्दी वाढल्याने भाविकांना कुशावर्ताऐवजी घाटांकडे वळविण्यात आले. श्रीचंद्र घाट तर पहाटेपासूनच भाविकांनी फुलला होता. नाशिककडून येणारे भाविक श्रीचंद्र घाटावर स्नान करण्यास प्राधान्य देत होते. जव्हार व नाशिककडून येणारे भाविक अहल्या घाटाकडे वळत होते. दोन पर्वण्यांना शुकशुकाट अनुभवणारे हे घाट भाविकांमुळे फुलले होते.

पहिल्या पर्वणीला घाटांवर वस्‍त्रांतरगृहांचा अभाव होता तर तिसऱ्या पर्वणीत वस्त्रांतरगृह कमी पडले. यामुळे महिलांना उघड्यावर कपडे बदलण्याची वेळ आली. श्रीचंद्र घाटावर तर गर्दीमुळे कपडे बदलण्यासही जागा मिळत नव्हती. हीच अवस्था तर कुशावर्त परिसरातही अनुभवयाला आली. स्नान करून बाहेर पडल्यानंतर भाविक कुशावर्त परिसरातच कपडे बदलत होते. यामुळे तेथे गर्दी होत असल्याने पोलिसांना बळाचा वापर करून गर्दी हटवावी लागली.

नाथघाटाकडे दुर्लक्षच

निरंजनी आखाड्याच्या मार्गावर बांधलेल्या नाथ घाटाकडे तिसऱ्या पर्वणीतही दुर्लक्ष करण्यात आले. या घाटात सांडपाणी मिसळत असल्याने पाण्याचा वास येत होता. यामुळे भाविकांनी नाथ घाटात स्नान करणे टाळले. पहिल्या व दुसऱ्या पर्वणीतही भाविकांनी या घाटाकडे पाठ फिरवली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् पालकमंत्री फसले रेटारेटीत!

$
0
0

कुशावर्तावर गर्दीत भाविकांकडून धक्काबुक्की

sampat.thete@timesgroup.com

त्र्यंबकेश्वर : एखाद्या वधूपित्याप्रमाणे सिंहस्थ कुंभमेळ्याचा कार्यभार वाहणारे पालकमंत्री गिरीश महाजन यांना येथील तिसऱ्या व अखेरच्या पर्वणीत भाविकांच्या गर्दीचा फटका बसला. प्रोटोकॉल बाजूला ठेऊन स्वयंसेवकाप्रमाणे वागणारे महाजन कुशावर्त परिसरात अनेकदा भाविकांच्या रेटारेटीत सापडले. एकवेळी तर काही भाविकांनी त्यांना थेट धक्काबुक्की करीत पाच-सात फुटापर्यंत लोटत नेल्याचा प्रकारही घडला. या प्रसंगातून पालकमंत्री अगदी थोडक्यात बचावले.

सकाळी साडेसातच्या सुमारास बडा उदासीन आखाडा कुशावर्तावर स्नानासाठी येऊन थांबला. या आखाड्याचे मुख्य महंत मागे राहिल्याने ते पाण्यात उतरत नव्हते. एकीकडे हा गोंधळ सुरू असतानाच पावणे आठच्या सुमारास श्री कपर्दिकेश्वर महादेव मंदिरापासून अचानक भाविकांचा एक मोठा जथ्था कुशावर्तच्या दिशेने धावत आला. हे भाविक कुशावर्तात आले असते तर तेथे बाका प्रसंग उभा राहिला असता. कुणास ठाऊक त्यातून अनर्थही घडला असता!

भाविकांचा लोंढा पाहून एका बाजूने जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह त्यांना रोखण्यासाठी धावले, तर दुसऱ्या बाजूने पालकमंत्री महाजनही धावले. या वेळी त्यांच्यासोबत साधा एक पोलिस कॉन्स्टेबलही नव्हता. कपर्दिकेश्वर मंदिराजवळ पालकमंत्री भाविकांना रोखत असतानाच गर्दीने त्यांना कुशावर्ताच्या पायऱ्यांपर्यंत पाच-सात फूट अंतरांपर्यंत लोटत नेले. या दरम्यान काही भाविकांनी थेट महाजन यांना धक्काबुक्की केली. अर्थात हा कुणीतरी बडा मंत्री आहे, हे त्यांना माहिती नव्हतेच. काही भाविकांनी थेट महाजन यांचा हात पकडल्याचेही दिसून आले. अर्थात, महाजन यांनीही जोरदार ताकद लावत भाविकांना रोखून धरले. मात्र, काही भाविकांनी त्यांना जोरदार धक्के दिले. भाविकांचा लोंढा आणखी वाढला असता तर चेंगराचेंगरीसारखा प्रकार घडून थेट पालकमंत्री महाजन यांच्याच जीवाला धोका झाला असता. सुदैवाने तसे घडले नाही. हा प्रकार घडल्यानंतर महाजन यांनी चाणाक्षपणे जणू काही घडलेच नसल्याचे भासविले.

... अन्यथा मोठा अनर्थ!

खरं तर कुशावर्ताजवळ पालकमंत्र्यांनी बंदोबस्तातच जायला हवे होते. किमान एक-दोन पोलिस तरी त्यांच्यासोबत हवे होते. अर्थात, अनर्थ टाळण्यासाठी पालकमंत्र्यांनी सुरक्षा व प्रोटोकॉल बाजूला सारत ही धावाधाव केली असली तरी समजा त्यांना हानी पोहचली असती तर केवढा मोठा अनर्थ झाला असता. मंत्री व बड्या अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या अधिक असल्या तरी एवढ्या प्रचंड संख्येची गर्दी व उत्साहाच्या भरात त्यांनी स्वतःच्या सुरक्षेलाही तेवढेच प्राधान्य द्यायला हवे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकराजालाच पसंती!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील वैष्णवांच्या सर्व पर्वण्यांपासून दोन हात लांब राहिलेल्या मुख्यमंत्र्यांसह, केंद्रीय मंत्री, व्हीव्हीआयपींनी अखरेच्या पर्वणीत हजेरी लावून त्र्यंबकराजाला राजमान्यता मिळवून दिली. सोबतच दुष्काळाच्या सावटामुळे कुंभमेळ्यापासून लांब राहिलेल्या मराठी भाविकांनी शेवटच्या पर्वणीला उपस्थिती लावून पहिल्या दोन पर्वण्यांची उणीव भरून काढत लोकमान्यतेवर मोहर उमटवली. त्यामुळे सिंहस्थ खरा नाशिकचा की त्र्यंबकचा या वादाला भाविकांसह, राजकीय नेते व अधिकाऱ्यांनी आपल्या कृतीनेच उत्तर देत, वैष्णवांना चपराक लावली आहे.

सिंहस्थात नाशिकमधील वैष्णव आणि त्र्यंबकमधील शैवांच्या वादामुळे केंद्रीय व राज्यातील मंत्र्यांनी कुंभमेळ्याकडेच पाठ फिरवली होती. शैवांनी त्र्यंबकचा तर वैष्णवांनी नाशिकचाच कुंभमेळा खरा असल्याचा दावा करत शीतयुद्धच सुरू केले होते. मुख्यमंत्र्यानी नाशिकच्या ध्वजारोहण सोहळ्याला हजरे लावली. मात्र, पर्वण्यांकडे पाठ फिरवली होती. शैव आखाडे एकत्रित असतांना वैष्णवांच्या आखाड्यामध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धांमुळे राजकीय नेते, मंत्री व अधिकारी दूरच राहिले होते. मात्र नाशिकच्या तीनही पर्वण्या संपताच त्र्यंबकेश्वरची तिसऱ्या पर्वणीकडे भाविक आणि नेतेगण फिरकणार नाहीत अशी शक्यता होती. मात्र, सर्व अंदाज फोल ठरवत राजकीय नेत्यांसह भाविकांना तिसऱ्या पर्वणीला जोरदार प्रतिसाद देत अगोदरचे सर्व रेकॉर्डस मोडीत काढले आहेत.

बड्या अधिकाऱ्यांनीही साधली पर्वणी

राज्यातील बड्या अधिकाऱ्यांनीही शेवटच्या पर्वणीला त्र्यंबकेश्वरला हजेरी लावून त्र्यंबकच्या कुंभमेळ्याच झुकते माप दिले. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांच्यासह अनेक बड्या अधिकाऱ्यांनी सहकुटुंब व्हीआयपी स्नान करून त्र्यंबकलाच अधिकृत कुंभाचा दर्जा दिल्याचे दिसून आले. व्हीआयपी अधिकाऱ्यांपाठोपाठ भाविकांनीही लोकमान्यतेची मोहोर त्र्यंबकवरच उमटवली. देशभरातील भाविकांनी हजेरी लावून त्र्यंबकेश्वरच्या शेवटच्या पर्वणीला त्र्यंबकेश्वरच्या ऐतिहासिक महत्त्वावर शिक्कामोर्तब केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसऱ्या पर्वणीतही एसटीला ‘डबल बेल’

$
0
0

नाशिक : सिंहस्थात प्रवाशांना सेवा देण्याची जय्यत तयारी करणाऱ्या एसटी महामंडळाला प्रशासनाचे नियोजन आणि गर्दी यामुळे नफ्यासाठी डबल बेलच मिळाली. अखेरच्या पर्वणीसाठी तब्बल ६५० बसचा ताफा उभ्या करणाऱ्या एसटी प्रशासनाला त्र्यंबकच्या तुफान गर्दीमुळे सेवा खंडीत करावी लागली.

अखेरच्या त्र्यंबक पर्वणीत सेवा देण्यासाठी एसटी प्रशासनाने तयारी केली. पण, भाविकांनी गर्दी केल्याने पोलिसांनी वाहनांना मज्जाव केला. त्यात एसटीलाही बंदी करण्यात आली. विशेष म्हणजे, गुरुवारी रात्रीपासून ते शुक्रवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत एसटीला सेवा देण्याची संधीही मिळाली नाही. शुक्रवारी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० या वेळात नाशिक ते त्र्यंबक व त्र्यंबक ते नाशिक एसटीच्या एकूण ८५ फेऱ्यांद्वारे प्रवाशांची वाहतूक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्नानासाठी सत्वपरीक्षा

$
0
0

anil.pawar @timesgroup.com

नाशिक : अनपेक्षितपणे भाविकांनी गर्दी केल्यामुळे त्र्यंबकमधील शेवटच्या पर्वणीत प्रशासनासह भाविकांची तारांबळ झाली. सायंकाळपर्यंत भाविकांची संख्या वाढतच गेल्याने अखेर कुशावर्तावर स्नानासाठी भाविकांना आठ ते दहा तास प्रतीक्षा करावी लागणार, अशी लाऊडस्पीकरवरून घोषणा करावी लागली. यामुळे ही पर्वणी प्रशासन व भविकांची सत्वपरीक्षा पाहणारी ठरली.

पहाटे चारनंतर भाविकांची प्रचंड गर्दी झाली. दुपारनंतर त्यात भरच पडली. यामुळे पोलिस प्रशासनाने 'होल्ड अॅण्ड रिलीज'नुसार भाविकांना सोडण्यात आले. मात्र, संध्याकाळी गर्दीचा ओघ भरमसाठ वाढला. नाशिक-जव्हारकडून येणाऱ्या भाविकांना रोखणे मुश्किल झाले. यामुळे बॅरिकेडिंग लावून भाविकांना अटकाव करण्यात आला. भाविकांचा ओघ सुरूच रा‌हिल्याने अखेर प्रशासनाने कुशावर्तावर स्नानासाठी आठ ते दहा तास लागतील अशी घोषणा करावी लागली.

वाढत्या गर्दीमुळे रात्रीपासून बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना जागेवरून हलताही आले नाही. तसेच आरोग्य व सफाई कर्मचाऱ्यांनाही ३६ तास ड्यूटी करावी लागली. भाविकांना बॅरिकेडिंगमध्ये अडकवल्यामुळे चांगलेच हाल झाले. त्यांना रांगेतच मिळेत त्यावर पोटाची भूक भागवावी लागली. तसचे रात्र जागूनच काढावी लागली. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे यामध्ये जास्त हाल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाविकांची रेकॉर्डब्रेक गर्दी

$
0
0

vinod.patil@timesgroup.com

नाशिक : राज्याला पावसाने दिलेला दिलासा, लागोपाठ आलेल्या सुट्ट्या आणि एकादशी व प्रदोषचा मुहूर्तामुळे भाविकांनी त्र्यंबकमधील तिसऱ्या पर्वणीला रेकॉर्डब्रेक हजेरी लावली. विशेष म्हणजे नाशिकच्या तीन व त्र्यंबकेश्वरच्या दोन पर्वण्यापासूंन लाब राहिलेला मराठी भाविक शेवटच्या पर्वणीला घराबाहेर पडले आणि भक्तांचा महामेळाच भरला. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी आल्याने तिसऱ्या पर्वणीचे प्रशासनाने केलेले पूर्ण नियोजनच कोलमडले. त्र्यंबकमध्ये सुमारे २० लाख भाविकांनी हजेरी लावल्याने व कुशावर्तच्या क्षमतेपक्षा अधिक संख्या असल्याने लाखो भाविकांना स्नान व दर्शनाविनाच त्र्यंबक सोडावे लागले.

त्र्यंबकमध्ये शुक्रवारी कुंभमेळ्याची शेवटची पर्वणी असल्याने प्रशासनाने या पर्वणीचे नियोजन बेताचेच केले होते. पहिल्या पर्वण्यांना फारसा प्रतिसाद न मिळालेल्या त्र्यंबकमध्ये तिसऱ्या पर्वणीला मोजकीच गर्दी होईल असा प्रशासनाचा अंदाज होता. मात्र, राज्यात नुकताच झालेला दिलासादायक पाऊस, लागोपाठ आलेल्या चार दिवसांच्या सुट्ट्या,शेवटच्या पर्वणीच्या पूर्वसंध्येला एकादशी व प्रदोष व्रत आल्याने भाविकांनी प्रशासनाचा पूर्ण अंदाजच चुकविला. दिवसभरात पाच लाख भाविकांना सामावून घेण्याची क्षमता असलेल्या त्र्यंबकेश्वर आदल्या रात्रीच चार लाख भाविकांनी ठाण मांडले. त्यामुळे रात्रीच गर्दीने हाऊस फुल्ल झालेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये सकाळी आणखीन भाविकांना सामावून घेण्याची क्षमताच उरली नव्हती.

चार ते पाच लाख भाविकांचा अंदाज बांधून असलेल्या प्रशासनाला मराठी भाविकांनी शेवटच्या पर्वणीला मोठा धक्काच दिला. पहिल्या व दुसऱ्या पर्वणापासून दूर राहिलेला राज्यातील भाविकांनी तिसऱ्या पर्वणीला हजेरी लावून प्रशासनाला अंदाज खोटा ठरविला. दुष्काळामुळे दूर राहिलेल्या राज्यातील कानाकोपऱ्यातील भाविकांनी मिळेल त्या वाहनाने सकाळी नाशिकमध्ये दस्तक दिली. मिळेल त्या वाहनाने त्यांनी त्र्यंबक गाठायला सुरुवात केली. तर एसटी बस न मिळाल्याने काहीनी पायपीटच सुरू केली. त्यामुळे सकाळीच अचानक त्र्यंबकच्या दिशेने वाढलेली गर्दी बघताच प्रशासनाने धावपळ सुरू केली.

एवढ्या गर्दीची क्षमता नसल्याने 'होल्ड अॅण्ड रिलीज'चे आदेश सोडण्यात आले. त्यामुळे दुपारीच त्र्यंबकपासून नाशिक आणि घोटीकडे दहा किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. एसटी बसेस बंद कराव्या लागल्या. तर नाशिकची वाहतूक गंगापूर मार्गे वळविण्यात आली. एवढ्या भाविकांचे कुशावर्तावर स्नान व त्र्यंबकराजाचे दर्शन करणेच शक्य नसल्याने भाविकांना आहे, त्याच ठिकाणी रोखून हळू हळू गर्दी रिलीज करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला. मात्र, वाढती गर्दी आणि रिलीजचे ताळमेळ बसत नसल्याने हजारो भाविकांनी दुरूनच त्र्यंबक राजाचे दर्शन घेवून माघारी फिरणे पसंद केले. भाविकांना सुमारे २० किलोमीटर पायपीट करावी लागल्याने अनेकांनी रस्त्यावरूनच आपल्या गावी माघारी फिरणेच पसंत केले.

दोनदा स्टॅम्पेंड वाचवली

त्र्यंबकनगरीत क्षमतेपेक्षा जास्त भाविक दाखल झाल्याने चेंगराचेंगरीची शक्यता बळावली. मात्र, पोलिस व प्रशासनाने शिताफीने गर्दीचे नियंत्रण करत चेंगराचेंगरीची निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात केली. सकाळी कुशावर्तावर बडा उदासीन आखाड्याच्या स्नानावेळीच चेंगराचेंगरी होता होता वाचली. पालकमंत्री, जिल्हाधिकारी व पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून ही स्टॅम्पेड रोखली. तर गजाजन महाराज मंदिराबाहेरही गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी आपले जीव पणाला लावले. त्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये दोनदा चेंगराचेंगरी होता होता वाचल्याचे श्रेय पोलिस आणि प्रशासनालाच जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नर्सिंग कॉलेजच्या कारभाराची चौकशी

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, नाशिक

नर्सिंग कॉलेजची विद्यार्थींनी सुप्रीया माळी हीचा मृत्यू आणि त्यानंतर इतर विद्यार्थींनींनी केलेले गंभीर आरोप याबाबत चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालनालयाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय कमिटीने चौकशीस सुरूवात केली आहे.

या प्रकरणातील जाब जबाब नोंदवण्याचे काम येत्या सोमवारपर्यंत होण्याची शक्यता असून, त्यानंतर ही कमिटी आपला अहवाल सादर करेल. या समितीने चौकशीचे काम गुरूवारी सुरू केले. सुरूवातीस काही विद्यार्थींनीसह कर्मचाऱ्यांचे जाब नोंदवण्यात आले. बुधवारी आपला अहवाल आरोग्य संचालकांकडे सोपवण्यात येईल, अशी माहिती सहायक उपसंचालक डॉ. बी. डी. पवार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक बडगुजर यांच्यावर चौघांचा हल्ला

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, नाशिक

महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यावर चौघा जणांनी हल्ला केला. या घटनेत किरकाोळ जखमी झाले. शुक्रवारी संध्याकाळी साडेसात ते पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास सावता नगर येथील समर्थ नागरी सहकारी बँकेजवळ हा प्रकार घडला.

संध्याकाळी बडगुजर याठिकाणी कामानिमित्त गेले होते. त्याच वेळी दोन दुचाकींवर आलेल्या चौघांनी बडगुजर यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. मात्र, बडगुजर यांनी प्रतिकार केल्याने तसेच त्यांचे कार्यकर्ते धावून आल्याने हल्लेखोर पसार झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर शिवसेनेचे महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी अंबड पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. हल्लेखोरांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिस स्टेशनमध्ये सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटोग्राफर्सला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाविकांच्या सुरक्षिततेचचा बाऊ करीत पोलिसांनी त्र्यंबकेश्वरमधील तिसऱ्या शाहीपर्वणीत सामान्य नागरिक आणि माध्यमांच्या प्रतिनिधींवर मर्दुमकी गाजवित वर्दीच्या गुर्मीचे दर्शन घडविले. दैनिकांच्या फोटोग्राफर्सला मारहाण करीत त्यांचे कॅमेरे हिसकावण्यापर्यंत पोलिस कर्मचाऱ्यांची मजल गेली. पोलिस कॉन्स्टेबल एम. व्ही. गायकवाड आणि मच्छिंद्र देवरे यांनी केलेल्या अरेरावीची निश्चित दखल घेऊ, अशी ग्वाही पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

त्र्यंबकेश्वरमध्ये गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी त्र्यंबकेश्वर परिसरात तगडा बदोबस्त तैनात केला होता. मात्र सौजन्याने बोलण्याची पध्दती न बाळणाऱ्या या पोलिसांकडून भाविकांना तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींना अनेकदा अरेरावीची भाषा वापरली जात होती. माध्यमांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र साधू-महंतांचे स्नान आटोपल्यानंतर माध्यमांचे पाच ते सहा प्रतिनिधी कुशावर्ताकडून पायी जव्हार फाट्याकडे निघाले होते. लक्ष्मीनारायण चौकात काही भाविक बॅरिकेडींगवर चढून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करीत होते. तर तेथे कर्तव्यावर असलेले पोलिस या भाविकांना रोखण्याचा प्रयत्न करीत होते. माध्यमांच्या काही प्रतिनिधींनी लगेचच हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात टिपला. यामुळे संतप्त झालेल्या काही पोलिसांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबक्की व मारहाण करून कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला. छायाचित्रकारांना अरेरावीची भाषा वापरीत शिवीगाळ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडेखोरांच्या मारहाणीत चौघे गंभीर जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाडजवळील पानेवाडी शिवारात बेदाडेवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरावर गुरूवारी मध्यरात्री दरोडा पडला. दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा दीड लाखांचा ऐवज लुटला. दरम्यान, दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत ४ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दरोडयाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानेवाडी शिवारात एकवई रस्त्यालगत बेदाडे वस्ती आहे. गुरुवारी मध्यरात्री काशीनाथ वामन बेदाडे या शेतकऱ्याच्या घराचा दरवाजा तोडून ५ ते ६ दरोडेखोर घरात शिरले. पडवीत झोपलेल्या जनार्दन काशीनाथ बेदाडे (वय ४०), हरणबाई जनार्दन बेदाडे (वय ३५), भीमाबाई काशीनाथ बेदाडे (वय ५४) आणि सोमनाथ जनार्दन बेदाडे (वय १६) या चौघांना दरोडेखोरांनी लाकडी दांडा आणि दगडांनी बेदम मारहाण करीत रोख ७५ हजार रुपये आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने असा १ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटुन नेला. घराच्या गच्चीवर पळून गेल्याने काशीनाथ बेदाडे यांच्यापर्यंत दरोडेखोर पोहचू शकले नाही. पूजा बेदाडे ही ११ वर्षीय मुलगीही घाबरून घराबाहेर पळाल्याने ती वाचली. दरोडेखोरांनी तोंडाला काळे फडके बांधलेले होते. हाफचड्डया घातल्या होत्या तसेच ते मराठी व हिंदी बोलत होते. त्यांनी सर्वांना मारहाण केली त्यात चौघे जखमी झाले. दरम्यान, काशीनाथ बेदाडे यांनी गच्चीवरून आरडाओरड करून वस्तीवरील इतरांना दरोडेखोर घरात घुसल्याची माहिती दिली. आजूबाजूचे ग्रामस्थ मदतीला धावले मात्र दरोडेखोरांनी सर्वांना जीवेमारण्याची धमकी दिली व घराच्या मागील बाजूने पलायन केले.

जखमींना तातडीने मनमाडच्या डॉ. अजय भन्साळी यांच्या रुग्णालयात रात्री दाखल करण्यात आले. बहुतेकांच्या डोक्याला व हाताला जबर मार बसला असून, सर्वांच्या हातांना फ्रॅक्चर झाले असल्याचे डॉ. भन्साळी यांनी सांगितले. भीमाबाई बेदाडे यांना डोक्याला चेहऱ्याला जास्त मार लागल्याने त्यांना इतरत्र हलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान दरोड्याचे वृत्त समजताच पोल‌िस उप अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी परिस्थितीची पाहणी केली व तातडीने तपास पथके सर्वत्र रवाना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images