Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

SBH तर्फे दुष्काळग्रस्तांसाठी १ कोटीची मदत

$
0
0
दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी मदतीचा हात पुढे करत 'स्टेट बँक ऑफ हैदराबाद'तर्फे एक कोटीचा निधी देण्यात आला. बँकेचे कार्यकारी संचालक एम. भगवंतराव यांनी मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे निधीचा ड्राफ्ट सुपूर्द केला.

नराधम बाप अजूनही फरार

$
0
0
पोटच्या मुलीचा लैंगिक छळ करणारा नराधम बाप शनिवारी उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता. पंचवटीतील फुलेनगरातील ही धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली होती.

खूनप्रकरणी तिघांना कोठडी

$
0
0
पंचवटीतील गोदावरी पटांगणावरील खूनप्रकरणी पोलिसांनी दोन पुरुषांसह एका महिलेला अटक केली असून, स्थानिक कोर्टाने तिघांना शनिवारी पोलिस कोठडी सुनावली. दिंडोरी येथील सुनील इंगळे या तरुणाचा खून झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली होती.

वोक्हार्टमध्ये दुर्मिळ सर्जरी

$
0
0
नायजेरियातील एका बालरोगतज्ज्ञावर वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अतिशय दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आली. वोक्हार्टमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल कैचे यांनी या डॉक्टरवर हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली.

एसटीची वेतनवाढ १३ टक्के

$
0
0
एसटी कामगारांना १३ टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय शुक्रवारी रात्री मुंबईत झालेल्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे एसटीचा २३ एप्रिलपासून सुरू होणारा संप टळला आहे.

नाशिक होतंय मर्सिडीज सिटी

$
0
0
काळानुरूप बदलणारी व रायझिंग सिटी म्हणून अग्रक्रमाने नाव घेतल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये गेल्या वर्षभरात ८०हून अधिक मर्सिडीजची विक्री झाली आहे. त्यामुळे मर्सिडीजचे मालक असलेल्या नाशिककरांची संख्या ३००वर पोहोचली आहे.

कृपाशंकर आले,कुणी नाही पाहिले

$
0
0
कधी काळी काँग्रेसच्या हायकमांडचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी राज्यमंत्री तथा मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह नाशिकमध्ये येणार म्हटल्यावर त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची रांग लागायची.

विद्यार्थ्यांच्या ‌तक्रारींचे १० दिवसात निवारण

$
0
0
पुणे विद्यापीठांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे त्वरीत निवारण करण्यासाठी विद्यापीठाने पावले उचलली आहेत.

महायुतीची स्थायीसाठी फिल्डींग

$
0
0
सदस्यांची निवड होऊनही लांबणीवर टाकण्यात आलेल्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीला या आठवड्यात मुहूर्त लाभण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीकोनातून महायुतीने मोर्चे बांधणीस सुरूवात केली असून अंतर्गत गटबाजी रोखण्यात यश मिळाल्यास मनसेचा पहिलावाहीला सभापती होण्याची शक्यता आहे.

शिखरेवाडी कारंजा बनले अपघाती क्षेत्र

$
0
0
नाशिकरोडच्या शिखरेवाडी येथील कारंजा मृत्यूचा सापळा बनला असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना बेटाच्या उंचीमुळे पलिकडचे दिसत नसल्याने हा कारंजा अपघाती क्षेत्र झाला आहे.

परदेशवाला फिटर

$
0
0
सोहळ्यातल्या जेवणावळी संपल्या तसे काही लोक घराकडे, तर काही मंडपालगत असलेल्या सावलीखाली बसले. टळटळीत ऊन असल्याने सावलीत गप्पांचा फड जमला. तेवढ्यात लगबगीनं केसांत हात फिरवत आलेल्या शेंडीवाल्याने इतरांच्या सूरात सूर मिसळत नंतर मालकाच्या दुकानातले किस्से सांगायला सुरुवात केली.

पांडुरंगाला मिळाले वेबसाईटवर स्थान!

$
0
0
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठोबाला अखेर महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या वेबसाईटवर स्थान मिळाले आहे. 'मटा'ने याविषयी वृत्त प्रसिध्द केल्यानंतर एमटीडीसीने त्याची दखल घेऊन वेबसाईटवर अनेक चांगले बदल केले आहेत.

वाहनचोरीला पोलिसांचा 'ब्रेक'

$
0
0
दोन वर्षांपासून सुसाट सुटलेल्या वाहनचोरांना शहर पोलिसांनी ब्रेक लावला आहे. २०१२ आणि २०१३ मधील जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीचा विचार करता तब्बल ११२ गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे पोलिसांकडील आकडेवारीवरून स्पष्ट होते.

उध्दरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे

$
0
0
आभाळानं नाकारलेल्या पंखांना उड्डाणाचे सामर्थ्य देणारे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकरोड व परिसरात उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी संध्याकाळी बिटको चौकातून मिरवणूक काढण्यात आली.

गोरेवाडीत दोन गटात दंगल

$
0
0
नाशिकरोडच्या गोरेवाडी भागात दोन गटात दंगल होऊन पोलिस व्हॅनचे नुकसान झाले. रात्री सुरू झालेल्या दंगलीने परिसरात रविवारीही शुकशुकाट पसरला होता. नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी गोरेवाडी भागात मंडळांमध्ये आंबेडकर जयंतीच्या महोत्सवाची पूर्व तयारी सुरू होती.

नियम पाळल्यास अपघात टाळणे शक्य

$
0
0
वाहनांची वाढती संख्या आणि वाहनचालकांचे दुर्लक्ष यामुळे अपघातांची संख्या वाढली असून प्रादेशिक परिवहन विभागाने तयार केलेल्या वाहतूक नियमांचे वाहनचालकांनी काटेकोरपणे पालन केले तरी अपघातांचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी होईल, असा दावा सहाय्यक परिवहन आयुक्त, मुंबई (प्रशिक्षण) योगेश बाग यांनी केला आहे.

सफाई कामगार भरतीत प्राधान्य द्या

$
0
0
महापालिकेतील ठेकेदारी पद्धत बंद करुन सफाई कामगार भरती करावी, तसेच या भरतीत वंशपरंपरेने स्वच्छतेची कामे करणाऱ्या मेघवाळ, वाल्मिकी, मेहतर समाजातील बेरोजगारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी 'नाशिक मेघवाळ पंचायत'ने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

घाबरू नका, माहिती द्या

$
0
0
मुख्याध्यापकांनी माहितीच्या अधिकाराला घाबरुन न जाता माहिती वेळेत द्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एन. बी. औताडे यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे प्रश्न एप्रिलअखेरपर्यंत मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

धुळे मर्चंट बँकेचे विलीनीकरण

$
0
0
काही वर्षांपूर्वी सहकार क्षेत्रात प्रतिष्ठाप्राप्त केलेल्या येथील मर्चट्स को-ऑप.बँकेचे यापुढे नामोनिशाण मिटणार आहे. गेल्या काही वर्षांपासून समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या या बँकेवर आरबीआयने निर्बंध लादले होते. त्यामुळे सर्व बँकिंग व्यवहार ठप्प झाले होते.

जेलरोड परिसरात घरफोडी

$
0
0
जेलरोडपरिसरात घरातील सदस्य परदेशात गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करून कम्प्युटर, सोन्याची पॉलिश केलेला नेकलेस आणि म्युझिक सिस्टिम असा ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला. २८ जानेवारी ते ८ एप्रिल दरम्यान समर्थनगरमधील हरीविहार हौसिंग सोसायटीमध्ये घडली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images