Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शिवाजीनगर परिसरातील गुंडांवर कारवाईची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

शिवाजीनगर आणि श्रमिकनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढली आहे. यामुळे रहिवासी भयभित होऊन रहात आहे, अशी तक्रार करणारे निवेदन परिसरातील उत्तर भारतीय रहिवाशांनी पोलिस उपायुक्त विजय पाटील यांना भेटून नुकतेच दिले. रहिवाशांनी ठिकठिकाणी नाक्यांवर उभ्या राहणाऱ्या टोळक्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून गुंडगिरी करणाऱ्यांचा त्रास रहिवाशांना रोजच त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे दिवसाढवळ्या नागरिकांची गुंडांकडून लूट केली जात आहे. त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रश्नी गंगापूर पोलिस ठाण्यात अनेकदा तक्रारी करून देखील दखल घेतली जात नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. रहिवाशांनी दिलेल्या निवेदनाची दखल पोलिस उपायुक्त यांनी घ्यावी अशी मागणी केली. याप्रसंगी नगरसेवक दिनकर पाटील, अमोल पाटील, ब्रिजेश यादव, धर्मेंद्रसिंह, नन्हेलाल यादव, राकेशसिंह, सुरेश यादव, राम चौहान आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनधिकृत बांधकामाला टाळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्पमधील हौसन रोडवरील केंद्र सरकारच्या मालकीच्या व वेळोवेळी शासकीय धोरणानुसार नागरिकांना भाडे तत्वावर देण्यात आलेल्या जमिनीवर विनापरवाना बांधकाम केल्याबद्दल कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. दरम्यान, या कारवाईच्या विरोधात देवळाली मर्चंट वेल्फेअर असोसिएशनने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विलास पवार यांच्या आदेशान्वये अधिकारी व कर्मचारी यांनी पोलिस बंदोबस्तात हौसन रोडवरील सिया कलेक्शन या दुकानावर अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाई करण्यात आली. यात हे दुकान सील करण्यात आले. यावेळी व्यापारी व प्रशासन अधिकारी यांच्यात वादविवाद झाला. यावेळी बहुसंख्येने नागरिक जमा होत झालेल्या प्रकाराबद्दल चर्चा करीत होते. याच दरम्यान व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या कारवाईच्या विरोधात बाजारपेठ बंदची हाक दिली. बुधवारी सकाळी शहरात बंदबाबत संभ्रमाचे वातावरण दिसून आले. व्यापारी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने बोर्ड अध्यक्षांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, भेट होऊ न शकल्याने देवळाली कॅम्प पोलिस स्टेनशमध्ये झालेल्या प्रकाराबाबत निवेदन देण्यात आले तसेच कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांविरूध्द कारवाईची मागणी करण्यात आली.

दरम्यान, बोर्डचे 'सीईओ' विलास पवार यांनी पत्रकारांशी झालेल्या चर्चेत माहिती देतांना सांगितले, की देवळालीतील बाजार भागातील जागा केंद्र सरकारच्या मालकीच्या असून हौसन रोडवरील ज्या जागेवरून वाद निर्माण झाला ती जागा सरकारने सरकारी नियमानुसार सन १९१२ मध्ये आर. एस. गोवावला यांना दिलेली आहे. त्यानंतर या जागेचा परवाना एच. पी. रॉय यांच्याकडे सुपूर्द केल्याची कागदपत्रांवरून दिसून आले आहे. सन १९६५ नंतर सदर जागेच्या परवान्याचे नुतनीकरण अद्यापपर्यंत करण्यात आले नाही. नियमानुसार ते दर ३० वर्षांनी करणे आवश्यक असते. सदर जागेवर होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार प्रशासनाने खातिरजमा केली आणि संबंधित व्यावसायिकास कॅन्टोन्मेंट अधिनियम कलम २४७, २४८ अन्वये नोटीस बजावली. तरीही काम थांबविण्यात न आल्याने संबंधित जागेवर व्यावसायिकाने बांधकाम करीत व्यवसाय सुरू केला.

यामुळेच प्रशासनाकडून कारवाई

प्रशासनाने संबंधित व्यावसायिकास कार्यालयात बोलावून आपल्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येत असून आपण त्यात अडथळा आणू नका, अशा सूचना दिल्या. कलम २४९ अन्वये आपणास असलेल्या अधिकारात आपण माणुसकीच्या दृष्टीकोनातून कोणाचेही नुकसान होऊ नये या हेतूने दुकानास लावलेले सील काढू, असे स्पष्ट केले. संबंधित व्यावसायिकाने ते मान्य केले. परंतु, कारवाईच्या वेळी नागरिकांना गोळा करत अडथळा निर्माण केला. त्यामुळेच संबंधित व्यावसायिकास कलम ३२० अन्वये नोटीस देऊन कारवाई येत आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळी सुट्ट्यांसाठी कोकणला पसंती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीतील सुट्ट्यांच्या आऊटींगसाठी नाशिककरांना कोकणाला पसंती दिली असून यंदा दिवाळी आणि विकेण्ड हा जोडून आल्याने अनेक चाकरमान्यांनी कोकणाकडे धाव घेतली आहेत. नाशिकमधून अनेकांनी कोकणात जाण्यासाठी बुकींग केले आहे.

दिवाळी सणाला जोडूनच विकेण्ड आल्यामुळं पर्यटकांची चांगलीच चंगळ झाली आहे. सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी लाखो लोकांनी कोकणाकडे धाव घेतली आहे. पर्यटकांना समुद्रकिनारी डान्स पार्ट्यांसह कोकणी पदार्थांची लज्जतही चाखायला मिळते. कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांनी हे फुलून गेलेत. दिवाळीच्या सार्वजनिक सुट्ट्या आणि त्याला शनिवार रविवार जोडून आल्यामुळे अनेक पर्यटकांनी कोकणात आपली सुट्टी घालविण्याचा विचार केला. यामुळं कोकणातील मुरुड, गणपतीपुळे, रत्नागिरी, केळशी, आंजर्ले, तारकर्लीचे बीच पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यातही गणपतीपुळेला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. कोकणातील एमटीडीसीची सर्व हॉटेल्स फुल्ल झाली आहेत. डीजेच्या तालावर बीच पार्ट्या चागंल्याच रंगू लागल्या आहेत. हॉटेल व्यावसायिकांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खास कोकणी पद्धतीच्या जेवणाची मेजवानीही देत आहेत. यंदाचा दीपोत्सव अर्थातच पर्यटकांसह कोकणातल्या व्यावसायिकांसाठी पर्वणीच ठरत आहे. म्हणूनच कोकणवासीय 'येवा कोकण आपलाच आसा' अशी साद घालत आहेत.

तारकर्ली हॉट फेव्हरेट

नाशिकमधून सर्वाधिक बुकींग तारकर्लीसाठी झाले आहे. अंडरवॉटर स्पोर्टसची मजा लुटण्यासाठी पर्यटक तारकर्लीची निवड करतांना दिसत आहेत. तारकर्ली येथील जेट स्की, बनाना राईड, पॅरा सिलींग, सॅन्ड बाईक्सचे बुकींग जोरात आहे. ऐनवेळेस रेल्वेचे बुकींग होत नसल्याने व सामान्य पर्यटकांना हवाई सफर परवडत नसल्याने अनेकनी खासगी टूर्स चालकांचा पर्याय स्वीकारला आहे.

आवाक्यातील पॅकेजेस

दापोली, मुरुड, जंजिरा, दिवे आगार, गुवागार गणपतीपुळे येथे भेट देण्यासाठी पर्यटकांसाठी वेगवेगळी पॅकेजेस तयार केली आहेत. तसेच पर्यटकांची गर्दी नसलेल्या गणेशगुळे या ठिकाणी जाण्यासाठी देखील पर्यटकांनी बुकींग सुरू केले आहे. कोकणची ट्रीप ५ हजार ९०० पासून सुरू होत असल्याने सामान्य पर्यटकांच्या आवाक्यात आहे. त्यामुळे येथे जाण्यासाठी गर्दी होत आहे.

दिवाळीच्या पर्यटनासाठी बहुतांश नागरिकांनी कोकणाचा पर्याय स्वीकारला आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमधील बुकींग फुल होण्याच्या मार्गावर आहे.

- दत्ता भालेराव, पर्यटन व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मध्य रेल्वे मार्गावरून राजधानी एक्सप्रेस न्यावी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई-दिल्ली राजधानी एक्सप्रेस मध्य रेल्वे मार्गावरून सुरू करावी, या मागणीसाठी खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
सध्या राजधानी एक्सप्रेस वेस्टर्न रेल्वे मार्गावरून धावत असून ही ट्रेन महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेशहून दिल्ली येथे पोहचत आहे. राजधानी एक्सप्रेस मध्य रेल्वेच्या मार्गावरून न्यावी, अशी अनेक वर्षापासून मागणी आहे. ही या मार्गावरून नेल्यास महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथील प्रवाशांचा फायदा होणार आहे. या ट्रेनसाठी तीन कोचची गरज आहे. तसेच निजामुद्दीन आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे याच्या मुक्कामाची व्यवस्था होऊ शकेल, असेही त्यांनी सूचविले आहे. ही गाडी रात्री ११ वाजता मुंबईहून निघाल्यास दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता दिल्लीला पोहचेल. तसेच दिल्ली येथून सकाळी ८ वाजता निघाल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता मुंबईला पोहचेल, असे नियोजन करण्यात आले आहे. गाडी ताशी ७० किलोमिटर वेगाने धावेल असे नियोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचाराच्या चौकशीला हिरवा कंदील?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील ६३ कोटी ५४ लाखाच्या भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीला तत्कालीन पणन मंत्र्यांनी दिलेली स्थगिती सहकार व पणनमंत्री चंद्रकात पाटील यांनी उठविल्याचा दावा संचालक शिवाजी चुंभळे यांनी केला आहे. सहकार मंत्र्याकडे बुधवारी याबाबतची सुनावणी पूर्ण झाली असून चौकशीची स्थगिती उठविण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र, अशा प्रकारचे आदेश आमच्यापर्यंत आले नसल्याचा खुलासा सहकार विभागाने केला आहे. दरम्यान सभापती देविदास पिंगळेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पिंगळे सभापती असतांना त्यांच्या कारर्किदीत ६३ कोटी ५४ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका सहकार विभागाच्या चौकशीत समोर आला होता. त्याप्रकरणी चौकशीचे आदेश सहकार विभागाने काढले होते. मात्र, तत्कालीन सहकार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगिती दिली होती. मात्र, ही स्थगिती उठविण्याचा पाठपुरावा सुरू केला होता. ही स्थगिती उठविण्याच्या प्रकरणावर बुधवारी सहकार व पणनमंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडे सुनावणी झाली. त्यात दोन्ही बाजूंच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. शिवाजी चुंभळे, बबनराव घोलप, आमदार बाळासाहेब सानप यावेळी उपस्थित होते. तर बाजार समितीच्या वतीने सचिव काळे यांनी बाजू मांडली. सहकार मंत्र्यांनी दोन्ही बाजूचे म्हणून ऐकून घेतल्याने चौकशीला हिरवा कंदील दिल्याचा दावा चुंभळे यांनी केला आहे. या चौकशीमुळे मात्र पिंगळेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान सहकार विभागातील अधिकाऱ्यांना मात्र याबाबत कानावर हात ठेवले आहेत. याबाबत लिखित स्वरूपात आमच्याकडे कोणतेही आदेश आलेले नसून केवळ सुनावणी पूर्ण झाली आहे. लिखित आदेश आल्यानंतरच कारवाई केली जाईल असा खुलासा त्यांनी केला आहे.

बाजार समितीत देविदास पिंगळे यांनी पदाचा गैरवापर कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे. कोट्यवधीच्या जमिनी स्वस्तात विक्री केल्या आहेत. त्यामुळे चौकशीतून सत्य बाहेर येवून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.

- शिवाजी चुंभळे, संचालक, बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिनाभर मोफत स्लाईड-शो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक मधुमेह दिन हा १४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने मधुमेही व त्यांच्या नातलगांसाठी महिनाभर मोफत स्लाईड शोचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूररोडवरील सुमती मधुमेह सल्ला केंद्रातर्फे प्री-डायबेटीस (मधुमेह सिनेमाचा ट्रेलर) हा स्लाईड-शो व डॉक्टरांचे व्याख्यान असा उपक्रम सादर केला जाणार आहे.

भारतात येऊ घातलेली मधुमेहाची त्सुनामी रोखण्यासाठी प्री-डायबेटीसचे योग्य वेळी निदान होणे व त्यावर शास्त्रीय उपचार करणे आवश्यक असल्याचे केंद्राचे डॉ. अजित कुमठेकर यांनी म्हटले आहे. या दुर्लक्षित विषयाकडे समाजाच्या महत्त्वाच्या घटकाचे लक्ष वेधून घेण्यासाठीच सदर उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याआधी काही औद्योगिक कंपन्यामध्ये सदर केलेल्या या कार्यक्रमास उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद मिळाला हे ध्यानात घेऊन समाजातील इतर घटकांपर्यंत पोहोचून हा विषय समजावून सांगण्याचे निश्चित करण्यात आल्याचे डॉ. कुमठेकर यांनी सांगितले आहे. या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनकर्मचाऱ्यांचे ‘स्मार्ट’ रिपोर्टिंग

$
0
0

bhavesh.brahmankar@timesgroup.com

नाशिक : अवैध वृक्षतोडीसह विविध प्रकारच्या गुन्हे तत्काळ उघड होणारी स्मार्ट प्रणाली वनविभागात कार्यरत झाली आहे. जंगलात असलेल्या वनकर्मचाऱ्यांद्वारे तेथील सद्यस्थिती तसेच गुन्ह्याची माहिती स्मार्टफोनद्वारे थेट ऑनलाइन कळविली जात आहे. त्यामुळे वनविभागाच्या कामकाजाच कमालीची पारदर्शकता आली आहे.

वृक्षतोड, वणवे, जनावरांची चराई, शिकार, अतिक्रमण यासह विविध वन गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच हे गुन्हे उघड करण्यासाठी राज्याच्या वनविभागाने पीडीए (पर्सनल डिजिटल असिस्टंट) ही प्रणाली कार्यन्वित केली आहे. व्हॉटसअॅपसारख्याच असलेल्या या प्रणालीद्वारे जंगलातील वनरक्षक तेथील वन गुन्ह्यांची माहिती तत्काळ फोटोसह देत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून चालणाऱ्या या प्रणालीत गुन्हा घडला ते ठिकाण, त्याचे भौगोलिक स्थान, गुन्ह्याची गंभीरता, गुन्हेगाराची माहिती, साक्षीदारांची माहिती, पुरावे, कुठल्या कायद्याचा भंग करण्यात आला आहे, आदींची माहिती क्षणार्धात संकलित होतानाच ती पाठविली जात आहे. यामुळे उपवनसंरक्षकांपासून ते थेट वनविभागाच्या नागपूर येथील मुख्यालय किंवा मंत्रालयातील वन विभागाच्या प्रधान सचिवांना ही माहिती मोबाइलवरही उपलब्ध होत आहे. या कार्यप्रणालीमुळे वनविभागाचे कामकाज स्मार्ट होतानाच या कामकाजात पारदर्शकता येण्यास मोठी मदत झाली आहे.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

नाशिक जिल्ह्यातील ३७६ वनकर्मचाऱ्यांना पीडीएचे सॉफ्टवेअर स्मार्टफोनमध्ये देण्यात आल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी दिली आहे. या कर्मचाऱ्यांना त्याच्या वापराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पीडीए प्रणालीमुळे पेठ, सुरगाणा सारख्या आदिवासी भागातील वनक्षेत्रातील गुन्हे तातडीने उघड होत असल्याचे चित्र आहे. तसेच, जंगलात प्रत्यक्ष वन गुन्ह्यांची स्थिती काय आहे, हे सुद्धा स्पष्ट होत आहे.

कर्मचाऱ्यांवरही असणार नजर

पीडीएच्या वितरणामुळे वनकर्मचारी फिल्डवर आहेत की नाही याची शहानिशाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना होत आहे. नाशिकमधील वनविभागाच्या मुख्य कार्यालयातील कंट्रोल रुममध्ये नाशिक व नगर जिल्ह्यातील वनकर्मचाऱ्यांनी पीडीएद्वारे पाठविलेली माहिती संकलित केली जाते. मोबाइलशिवाय कॉम्प्युटरद्वारेही माहिती पाठविण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच, ज्या ठिकाणी मोबाइल नेटवर्क नसेल तेथे वनकर्मचारी फोटो काढून त्याची विस्तृत माहिती भरतात. ज्यावेळी नेटवर्क येईल तेव्हा ती माहिती आपोआप पाठविली जाते. या प्रणालीमुळे वनविभागाच्या कामकाजात अमूलाग्र बदल झाल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी होणार पाणीकपात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही नकार दिल्याने नाशिककरांनी आता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे धाव घेतली आहे. जायकवाडीत पाणी सोडताना मराठवाडावासियांची नेमकी गरज विचारात घेतली नसल्याचा दावा प्राध‌किरणाकडे केला जाणार आहे. लोकप्रतिनिधीसह महापालिकाही त्यात स्वतंत्र पार्टी झाली असून, आमचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी मागणी महापौरांनी अशोक मुर्तडक केली आहे. अर्ज मंगळवारी दाखल करण्यात आला असून त्यावर आज मुंबईत सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांच्या आशा प्राधिकरणाच्या निर्णयावर लागल्या आहेत. पाणी वाटपाच्या वादाबाबत जलचिंतन संस्थेसह नाशिक तसेच नगरमधील लोकप्रतिनिधींनी प्राधिकरणाकडे अपिल दाखल केले आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाकडून तपश‌ीलवार माहिती घेऊन त्याआधारे वस्तुस्थिती पटवून देण्याचा प्रयत्न याचिकेत केला आहे. गंगापूर धरण समुहातून २०१५-१६ करीता पिण्यासाठी ७३३० दशलक्ष घनफूट पाणी लागणार आहे. सद्यस्थितीत समूहात (खरीप वापरासह) २२५.३८ दशलक्ष घनमीटर (७९५८ दलघफू) पाणी उपलब्ध आहे. म्हणजेच पिण्याचा वापर वजा जाता १६.८१ दलघमी (६२८ दलघफू) पाणी शिल्लक राहते तर शेतीसाठी पाणीच शिल्लक राहत नाही. पिण्याच्या पाण्यात कपात केली तरी जेमतेम ५०० दलघफू इतकेच पाणी उपलब्ध होऊ शकते. ३० जुलै २०१६ पर्यंत जिल्ह्यात पाऊस पडला नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी समूहावर अवलंबून असणारे नाशिक शहर, नाशिक आणि निफाड तालुका यांना पाणीच शिल्लक राहणार नाही.

शहरात आणखी पाणीकपात

गंगापूर धऱणसमूहातून जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर धरणातात शहरासाठी केवळ साडेतीन टीएमसीच पाणी शिल्लक राहणार आहे.यातून बाष्पीभवनामुळे तब्बल २०० दशलक्ष घनफुट पाणी वाया जाण्याची शक्यता असल्याने नाशिककरांवर जानेवारीपासून पुन्हा पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.



आणखी होणार पाणीकपात गंगापूर धरण समुहातून जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर धरणात शहरासाठी केवळ साडेतीन टीएमसीच पाणी शिल्लक राहणार आहे. बाष्पीभवनामुळे तब्बल २०० दशलक्ष घनफूट पाणी वाया जाण्याची शक्यता असल्याने नाशिककरांवर जानेवारीपासून पुन्हा पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. उपलब्ध साठा ऑगस्टपर्यंत टिकवण्यासाठी दिवसाआड पाण्याचा पुरवठा शहरावर ओढावण्याची शक्यता असल्याने नाशिककरांवर पाण्याचे बिकट संकट ओढावणार आहे.

गंगापूर धरणसमूहात सद्यस्थितीत पाच हजार ७२८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. यातून १३५५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा हा जायकवाडीसाठी सोडावा लागणार आहे. त्यामुळे धरणात ४ हजार ६६६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. एकलहरे प्रकल्प ६०० दशलक्ष घनफूट मेरी- ७५, एमआयडीसी २५० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित आहे. त्यामुळे पालिकेच्या वाट्याला केवळ साडेतीन टीएमसीच पाणी शिल्लक राहणार आहे. त्यात बाष्पीभवनातून पाव टीएमसी पाणी जाण्याची शक्यता आहे. ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेला ३ हजार ८०० दशलक्ष घनफूट पाण्याची गरज आहे.

उपलब्ध साठाके हा ऑगस्टपर्यंत पुरविण्यासाठी पालिला आणखी पाणीकपातीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे जानेवारीपासून शहराला पाणीकपातीचा पुन्हा सामना करावा लागणार आहे. फेब्रुवारीपासून दिवसाआड पाणीकपात ओढावणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे पाणीबाणीची भयावह स्थिती निर्माण होणार असल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. त्यामुळे पाण्याच्या उद्रेकाचा सामना नाशिककरांना करावा लागणार आहे.

विभागीय अधिकाऱ्यांवर कारवाई?

पाणीकपात झाल्यानंतर पालिकेने पाण्याच्या गैरवापर करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, सहाही विभागातील विभागीय अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याने सर्रास पाण्याचा गैरवापर सुरू आहे. सर्व्हिस सेंटर्स, तरणतलाव, हॉटेल्समध्ये मोठा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे कारवाई न करणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यांवर कारवाईची तयारी पालिकेन सुरू केली आहे. अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला असून, कारवाई करा अथवा कारवाईला सामोरे जा, असा इशारा दिला आहे.

... तर नगरसेवकांचे फिरणे बंद

जानेवारीपासून गंभीर पाण्याची परिस्थिती ओढावणार आहे. तर वर्षाच्या कालावधीतच निवडणुका आहेत. मात्र, त्याची तयारी अगोदरपासूनच नगरसेवकांना करावी लागणार आहे. त्याच वेळी पाण्याचा तुटवडा राहणार असल्याने पहिला प्रश्न पाणीपुरवठ्याच उपस्थित होणार आहे. नगरसेवक काय करत होते, असा सवाल मतदारांकडून होणार असून, त्यांचे फिरणेही बंद होणार आहे. विशेषतः भाजप आमदारांसह नगरसेवकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नस्तनपूरच्या शनिदेवाची महती

$
0
0

संदीप देशपांडे

शनीच्या साडे तीन पीठापैंकी महत्त्वाचे एक पीठ असलेल्या नांदगांव तालुक्यातील नस्तनपूर येथील शनिदेवाची महती आता म्युझिक अल्बमद्वारे सर्वांसमोर येणार आहे. गायक आदर्श शिंदे याच्या आवाजामध्ये यातील दोन गाण्यांचे मुंबईमध्ये नुकतेच रिकॉर्डिंग झाले असून 'नस्तनपूरचा राजा' हा अल्बम लवकरच प्रदर्शित होणार आहे.

दर शनिवारी या मंदिरात हार्मोनियम सेवा करणाऱ्या सचिन पगारे या संगीतवेड्या तरुणानेच या कल्पनेला मूर्त स्वरुप दिले आहे. प्रभू रामचंद्रांनी साक्षात नस्तनपूर येथे येऊन शनी देवाच्या मूर्तीची स्थापना केल्याचे सांगितले जाते.

या स्थळाचे धार्मिक महत्त्व सर्वदूर पोहोचावे अशी या ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार अनिल आहेर यांची मनस्वी इच्छा होती. विजय चोपडा आणि सहकाऱ्यांनी ही योजना प्रत्यक्षात आणत 'नस्तनपूरचा राजा' हा म्युझिक अल्बम साकारला आहे. यातील गाणी नाशिकच्या विनायक पाठारे यांनी लिहिली असून सचिन पगारे व विजयराज निकम यांनी सुरेल चाली लावल्या आहेत.

या अल्बममध्ये एकूण ९ गाणी असून आदर्श शिंदे, विजयराज यांच्यासह गायिका उत्तरा केळकर, वैशाली भैसने माडे यांनी विविध गाण्याना आपला स्वर दिला आहे. सचिन पगारे, विजयराज, प्रशांत पंचभाई यांची संगीत साथ या गीतांना लाभली आहे. या अल्बमचा प्रकाशन सोहळा गायक आदर्श शिंदे, उत्तरा केळकर यांच्या उपस्थितीत लवकरच नांदगावमध्ये केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉर्ट फिल्मचा स्मार्ट पर्याय

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

शहरातील समस्यांची केवळ चर्चा न करता त्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून समाजासमोर मांडून त्यावर सोल्युशन शोधण्यासाठी प्रा. वृंदा भार्गवे यांनी 'दवप्रभा प्रॉडक्शन' या मंचाची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे 'विकास' या विषयाला प्राधान्य देऊन त्याला वाहिलेल्याच शॉर्ट फिल्मस् या माध्यमातून तयार केल्या जाणार आहेत.

नाशिक शहराची स्मार्ट सिटीकडे होत असलेली वाटचाल कौतुकास्पद असली तरी शहरात आजही अनेक समस्या आहेत, ज्याकडे प्रशासनाचे तसेच नाशिककरांचेही दुर्लक्ष होत आहे. अशा विकासाला बाधक असलेल्या समस्या हेरुन त्या दवप्रभा प्रॉडक्शनच्या शॉर्ट फिल्मसव्दारे मांडण्यात येणार असल्याची माहिती याबाबत बोलताना प्रा. भार्गवे यांनी दिली. तसेच केवळ परिस्थितीची मांडणी न करता समस्या सोडविण्याचा पर्याय देऊन प्रशासनासमोर या फिल्मस् सादर केल्या जाणार आहेत. नाशिकच्या पोटेन्शियलची ओळख करुन देणारी 'नाशिक बाईट्स' ही ४ मिनिटे ४० सेकंदांची शॉर्ट फिल्म नुकतीच या ग्रुपमार्फत तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये धार्मिकतेसोबतच नाशिकचा औद्योगिक विकासही अधोरेखित करण्यात आला आहे. ही शॉर्ट फिल्म यू ट्युबवर उपलब्ध आहे.

प्रा. वृंदा भार्गवे आणि मार्मिक गोडसे यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या या मंचामध्ये सृष्टी, रुचिता, योगेश, सुरेश, ऋषिकेश, प्रणव यांचाही सहभाग आहे. कोणत्याही आर्थिक बाबींचा समावेश नसल्यामुळे कोणतीही शॉर्ट फिल्म व्यावसायिक दृष्टीकोन समोर न ठेवता तयार करण्यावर या ग्रुपचा भर असणार आहे. या अंतर्गत २ ते १० मिनिटे कालावधीच्या शॉर्ट फिल्मस् बनविल्या जाणार असून विकासासोबत 'कला' हा विषयही काही प्रमाणात हाताळला जाणार आहे.

प्रियांका डहाळेला समर्पित

नाशिकची दिवंगत पत्रकार प्रियांका डहाळेला फिल्म या माध्यमाची खूप चांगली जाण होती. या माध्यमाव्दारे काम करण्याची तिची इच्छा होती. परंतु काही महिन्यांपूर्वी तिचे अपघाती निधन झाले. ती आज असती तर आम्ही दोघींनी मिळून हे काम केले असते अशी भावना वृंदा भार्गवे यांनी व्यक्त केली. त्यामुळे 'दवप्रभा'ची प्रत्येक कलाकृती प्रियांकाला समर्पित करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

ओव्हरस्मार्टनेस करा व्हॉट्सअॅप

अनेक नागरिक उपलब्ध संसाधनांचा गैरवापर करताना दिसतात. उदा. पाणी वाया घालवणे, रस्त्यात कचरा टाकणे. नेमके हे प्रकारच विकासाला खीळ घालतात. असे प्रकार आढळल्यास तसा फोटो ९५९५८९३४७९ या नंबरवर व्हॉट्सअॅप करावा असे आवाहन या ग्रुपमार्फत करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार मेडिटेशनचा

$
0
0

प्रतीक गंगेले, कॉलेज क्लब रिपोर्टर

सध्याच्या धावपळीच्या जगण्यात काहीतरी हरवत चालल्याची जाणीव होते आणि प्रत्येक जण त्या गोष्टीच्या शोधात निघतो. पण घर, ऑफिस, आसपास घडणाऱ्या घटना या सगळ्यांचा रोजच्या जगण्यात असलेल्या प्रभाव त्यातून बाहेर पडू देत नाही. या अवस्थेतूनच बाहेर पडण्यासाठी सध्या विपश्यना म्हणजे मेडिटेशन करण्याकडे अनेकांचा कल वाढताना दिसतो आहे.

कुठलाही व्यायमाचा प्रकार नाही, कोणत्याही साधनांची गरज नाही. धर्म, पंथ, जात-पात यांच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या चुका दाखवणारा, आपल्या दु:खासाठी आपणच कारणीभूत असतो या सर्वांची जबाबदारी घ्यायला लावणारा हा दु:खमुक्तीचा मार्ग म्हणजे विपश्यना. स्पर्धेच्या काळात भारतातच नव्हे तर परदेशातही हा आनंद प्राप्तीचा सोपा मार्ग ठरत आहे.

स्पर्धेच्या जगात प्रत्येकाची लाईफस्टाइल बदलत चालली आहे. बक्कळ पैसा कमावणे, उत्तम जीवन जगण्यासाठी प्रत्येकजण धडपड करताना दिसतो. जीवनाचा वेग प्रचंड, स्वयंनिर्भर राहण्यालाच प्राधान्य, विभक्त कुटुंब पद्धती या सगळ्यांचा प्रभाव वाढल्याने शरीर आणि मन यावरील तणाव वाढला आहे. म्हणूनच यामधून बाहेर पडण्यासाठी विद्यार्थी, नोकरदार, व्यवसायिक, महिलांना मेडिटेशनचा आधार होतो आहे. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा तणाव जणवतो. अशा मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी मेडिटेशन हा पूरक पर्याय असल्याने डॉक्टर्सही याचा सल्ला देतात.

सध्या अनेक ठिकाणी यामुळे विपश्यना केंद्रांमध्ये वाढ होताना दिसते आहे. भौतिक जगापासून काही काळ दूर राहून मेडिटेशनच्या माध्यमातून मिळणाऱ्या ऊर्जेचा फायदा होत असल्याची भावना अनेक लोक व्यक्त करताना दिसतात. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याने अनेक लोक याकडे वळताना दिसत आहेत.

बरीच मंडळी आता दहा दिवसांचा कोर्स एकदाच नव्हे तर वर्षातून दोनदा करण्याचा अनुभव घेतात. तसेच अगदी वीस किंवा चाळीस दिवसांचाही कोर्स करण्याचीही पद्धत रुढ होताना दिसते आहे. यामधून मिळणाऱ्या फायद्यांमुळे काही जण विपश्यनेचे शिक्षक म्हणून काम करताना दिसतायत तर काही लोक याचे महत्त्व पटवून देण्याचे सामाजिक कार्य करताना दिसत आहेत.

माणूस कायम बाहेर बघत असतो. या माध्यमातून आपण स्वतःकडे लक्ष देतो. आपल्या चुका समजण्यास मदत होते. मन एकाग्र करण्यासाठीे विपश्यना हे सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. यामुळे नक्कीच एक सक्षम आणि चिंतामुक्त समाज निर्मित होऊ शकतो. - अनिल डेर्ले, विपश्यना आणि योग गुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इकोफ्रेंडली दिवाळी

$
0
0

पवन बोरस्ते, कॉलेज क्लब रिपोर्टर

दिवाळीमध्ये सर्वच वयोगटातील लोक आनंदाचे क्षण साजरे करतात. तरुणाईचा यातील उत्साह जास्त असतो. पण यंदा मात्र तरुणाईने दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणाचे महत्त्व आणि राज्यात असलेली दुष्काळ परिस्थिती लक्षात घेत यंदा अनेकांनी साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला आहे.

यंदा दिवाळी साजरी करण्याबाबत कल्पेश घोलप म्हणतो, दिवाळी म्हणजे सणांचा राजा. मी दरवर्षी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतो. पण यंदाची दिवाळी मी साधेपणाने साजरी करणार आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असल्याने मी दुष्काळग्रस्तांना व गोरगरिबांना माझ्या परीने दिवाळीत फराळाचे पदार्थ वाटप करणार आहे.

राज्यातील दुष्काळामुळे अनेक भागात दिवाळी साजरी होते की नाही असी परिस्थिती आहे. याविषयी बोलताना सूरज भोर म्हणतो, महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे आमच्या फाऊंडेशनतर्फे आम्ही दुष्काळ निधी जमा करत आहोत. ही मदत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. या कामात व्यस्त असल्यामुळे मी दिवाळीकडे दुर्लक्ष केलयं. ही दिवाळी मी साधेपणाने सेलिब्रेट करणार आहे.

दरवर्षी दिवाळीला मी हजारोंचे फटाके फोडतो. फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण व वायूप्रदूषण होते. याचे गांभीर्य लक्षात घेत मी इकोफ्रेंडली व कमी आवाजाचे फटाके खरेदी करणार आहे. जेणेकरून कुणालाही त्रास होणार नाही, असा संकल्प गौरव आरोटे याने यंदा केला आहे. तर इकोफ्रेंडली सेलिब्रेशनविषयी कृतिका झा सांगते, नेहमीच्या प्लास्टिक कंदीलाला फाटा देत यावेळी मी पेपरमेड कंदील लावणार आहे. घरच्यांनीही निर्णय चांगला असल्याचे सांगितले. तसेच दिवाळीनंतर परिसरात झालेला फटाक्यांचा कचरा मी साफ करणार आहे. यंदाची दिवाळी मी पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त दिवाळी म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूरज गावंडे याविषयी म्हणतो, वायफळ खर्चाला फाटा देत गोरगरिबांना एक पणती देत त्यांचे घर प्रकाशमय करण्याचा निर्णय मी घेतला आहे. फराळाचे वाटपही मी करणार आहे. दिवाळी व्हेकेशनमध्ये मी करत असलेल्या एका छोट्याशा कृतीने समाधान व अनुभवाची शिदोरी मला मिळणार हे नक्की. मागील काही महिन्यात राज्यात घडलेल्या घटना, दुष्काळ आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास लक्षात घेत तरुणाई यासाठी पुढे सरसावली आहे. सामाजिक भान जपत मदतीचा हात या सर्वांनी पुढे केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकवून तिला जीवे मारणाऱ्या पतीला कोर्टाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. देवळा येथे २१ ऑक्टोबर २०१० रोजी ही घटना घडली होती.

दिपक दैलत गुंजाळ असे आरोपीचे नाव असून त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. यामुळे दिपकचे त्याची पत्नी आशा हिच्यासोबत वाद होत होते. यातूनच दिपकने २१ ऑक्टोबर २०१० रोजी गुंजाळनगर येथील घरात दारूच्या नशेत आशाला रॉकेल टाकून पेटवून दिले. तिला अत्यावस्थ अवस्थेत सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एच. मोरे यांच्यासमोर चालला. या खटल्यात आरोपीचा १० वर्षाचा मुलगा आदित्य याची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. २ पंच एक साक्षीदार फितूर झाल्यानंतर सरकारी वकील गायत्री पटनाला यांचा युक्तिवाद महत्त्वपूर्ण ठरला.

कापड दुकानात चोरी

सरदार चौकातील श्रीराम वस्त्र भांडार या दुकानाचे लाकडी दरवाजा तोडून चोरट्यांनी आतील २ लाख ५५ हजार रुपये किंमतीच्या साड्या, ब्लाऊज पीस, ड्रेस मटेरियल आणि रोख रक्कम चोरी केली. विशेष म्हणजे चोरट्यांनी पहिल्या मजल्यावर चढून हे कृत्य केले. या प्रकरणी किरण सुधाकर धारबळे यांनी​ दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दोन चेन स्नॅचिंग

चेनस्नचर्सने पुन्हा एकदा महिलांच्या गळ्यातील स्त्रीधन लुटून नेले. ​दिंडोरी रोडवरील पोकार कॉलनी येथे राहणाऱ्या कविता धनंजय देवकर बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आशिष बिल्डींग येथून पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र तोडून नेले. यानंतर चोरट्यांनी पुन्हा एकवार चोपडा लॉन्स येथील रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून पोबारा केला. ही घटना बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. यापूर्वी सुध्दा चोरट्यांनी याच परिसरात चेन स्नॅचिंग केल्याच्या घटना अद्याप ताज्या आहेत. दरम्यान याप्रकरणी पवननगर परिसरात शंकुतला सुरेश खैरनार यांनी तक्रार दाखल केली आहे.

अंगरक्षकास मारहाण

‍देवळाली कॅम्प : माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांचे तत्कालीन अंगरक्षक व देवळाली कॅम्पचे रहिवासी काशिमित्रा पुनानाथजी माथुर यांना देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलिस दलाच्या जवानाने यांनी मारहाण केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माथुर ८५ वर्षीय यांनी निवेदनात दिले आहे. त्यात नमूद केल्यानुसार, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन मास्तर यांना भेटण्यासाठी जात असतांना प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर गोहाटी एक्सप्रेस आली. त्यावेळी आपण बाजूला उभे होतो. याप्रसंगी आरपीएफ कर्मचारी राऊत यांनी अंगात गणवेश परिधान केलेला नसतांना 'तुम्ही कोणाला हात करत छेडछाड करत होते' अशी विचारणा करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन तपासणी ‘जैसे थे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑटोमेटिक व्हेईकल इन्स्पेक्शन सर्टिफिकेशन सेंटरच्या (एव्हीइएस) विरोधात उभे ठाकलेल्या वाहनचालकांच्या मागणीवर गुरूवारी समाधानकारक तोडगा निघू शकला नाही. जुन्या तसेच शोरूम वाहनांना सर्रास दोषी ठरवणाऱ्या यंत्रणेचे काम काही दिवस बंद ठेवण्याची मागणी वाहनचालकांसहीत विविध संघटनांनी केली आहे.

प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) ५ एकर जागेत साकारण्यात आलेली राज्यातील पहिलीच एव्हीइएस यंत्रणा सुरुवातीपासूनच वादात सापडली आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एआरएआय) सहकार्याने सुरू झालेल्या या प्रकल्पात अगदी किरकोळ कारणांसाठी वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र नाकारले जाते. इव्हीएस यंत्रणेद्वारे ट्रक, बसेस, रिक्षा, व्यावसायिक कार, जीप आदी वाहनांचे ब्रेक, हेडलाइट, टायर्स व इंजिनाची स्थिती, चेसीज, ध्वनी व वायू प्रदूषणाचे प्रमाण या बाबी तपासण्याचे काम केले जाते. मात्र, जुन्यासहीत अगदी शोरूममधून आणलेल्या वाहनांना सुध्दा परदेशातून आयात केलेली यंत्रणा दोषी ठरवत आहेत. सदर चाचणीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या वाहनाला पुन्हा चाचणीसाठी वेळ घ्यावी लागते. दंड तसेच शुल्कही भरावा लागतो. दिवसभरात बोटावर मोजता येईल, इतक्याच वाहनांची चाचणी होत असल्याने शेकडो वाहनचालकांना आरटीओ कार्यालयात ठाण मांडून बसावे लागते. यामुळे व्यवसाय बुडत असून सर्वसामान्य वाहनचालक आर्थिक दृष्ट्या भरडला जात असल्याचा आरोप वाहनचालकांकडून होतो आहे.

याबाबत बोलताना श्रमिक रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक चालक मालक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष भगवंत पाठक यांनी सांगितले, की अनेक वाहनचालक १०० किलोमीटर अतंर तुडवत येतात. परदेशातून आयात केलेली यंत्रणा भारतीय वाहनांची चाचणी कशी घेऊ शकते, हाच खरा प्रश्न आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची मॅन्युअल चाचणी घ्यावी, संबंधित कंपनीने आपले सर्व्हिस स्टेशन सुरू करेपर्यंत वाहनचालकांची अडवणूक करू नये या मागण्यांसाठी आरटीओ अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असल्याचे पाठक यांनी सांगितले. दरम्यान, 'आरटीओ' आमच्या मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत एकही वाहन चाचणीसाठी पाठवण्यात येणार नाही, असे महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालकमालक संघटनेचे उपशहर प्रमुख राहुल मैंद यांनी स्पष्ट केले. यामुळे बुधवारपासून चाचणीचे काम ठप्प पडले आहे.

यांत्रिक तपासणीस वाहनचालकांची 'ना'

पुढील दोन दिवस वाहनांच्या हेडलाईटचे काम सेंटरमध्येच करून वाहनांना उत्तीर्ण केले जाऊ शकते, असे डेप्युटी आरटीओ भरत कळसकर यांनी वाहनचालकांच्या बैठकी दरम्यान सांगितले. मात्र, ही भूमिका रास्त नसून संबंधित कंपनीने सर्व्हिस सेंटर सुरू करेपर्यंत वाहनांची यांत्रिक पध्दतीने तपासणीच करू नये, असे मत वाहनचालकांनी मांडले आहे.

गुरुवारी दिवसभर तब्बल २०० पेक्षा जास्त वाहने आणि त्याहून अधिक चालक-मालक कार्यालयात उपस्थित होते. दरम्यान, ऑल इंडिया टूरिझम अॅण्ड ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनिवाल यांनीही निवेदन सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी सरसावली महापालिका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्याविरोधातील आंदोलनाची दखल मुख्यमंत्री घेत नसल्याने लोकप्रतिनिधी आणि महापालिका आता आक्रमक झाली आहे. आपल्या हक्काच्या पाण्याला धक्का लावू नये म्हणून महापालिकेच्या वतीने शनिवारी (दि. ७) तातडीची महासभा बोलविण्यात आली आहे. यात सरकारला संभाव्य पाणीटंचाई व कायदा सुव्यवस्थेसंदर्भातील परिस्थितीची जाणीव करून दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप आमदारांचेही ऐकत नसून नाशिकच्या प्रश्नांसाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याची टीका कृती समितीने केली आहे.

जायकवाडीला पाणी सोडण्याला भाजप वगळता सर्व पक्षांचा तीव्र विरोध आहे. भाजपच्या आमदार सीमा हिरेंनीही पाणी सोडण्यास तीव्र विरोध केला आहे. न्यायालयीन लढाई पाठोपाठ राजकीय दबाव टाकण्यासाठी नाशिकमधील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, माकप, आरपीआय यांनी एकत्रित मोट बांधत आंदोलन तीव्र केले आहे. पाणी सोडण्याच्या निषेधार्थ भाजप आमदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. तर मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी दोन दिवसापासून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, मुख्यमंत्री नाशिकच्या प्रश्नांसदर्भात गंभीर नसल्याचा आरोप शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांनी केला आहे. भाजप सरकार नाशिकवर अन्याय करत असून नागरिकांना संकटात ढकलत आहे. त्यामुळे आता अधिक आवाज बुंलद करण्यासाठी गुरुवारी महापालिकेच्या गटनेत्यांनी तातडीने बैठक घेतली. त्यात महापौरांना तातडीची महासभा घेवून सरकारला आपल्या पाण्याची दाहकता दाखवावी अशी विंनती करण्यात आली. महापौर अशोक मुर्तडक यांनीही तातडीने शनिवारी सकाळी दहा वाजता तातडीची महासभा आयोजित केली आहे. आमच्या हक्काचे चार टीएमसी पाणी आम्ही कोणालाच देणार नाही असा ठराव करून तो तातडीने शासनाला सादर केला जाणार आहे. तर शुक्रवारपासून सर्वपक्षीय आंदोलन सुरू केले जाणार आहे.

प्राधिकरणाकडून न्यायाची पायमल्ली

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महापालिकेचे म्हणणे ऐकून घ्यावे यासाठी महापौरांनी बुधवारी प्राधीकरणाकडे अर्ज दाखल केला होता. मात्र, प्राधिकरणाने त्यांच्या अर्जाकडे दुर्लक्ष करत त्यांना सुनावणीसाठी बोलावले नाही. त्यामुळे महापौर संतप्त झाले असून त्यांनी प्राधिकरणाने नैसर्गिक न्यायाची पायमल्ली केली असल्याचा आरोप केला आहे. महापालिकेची भूमिका मांडू द्यायला हवी होती. मात्र महापालिकेचाही आवाज दाबला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


कायदाच रद्द करा

सन २००५ मध्ये तयार झालेला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरण हा कायदाच रद्द करावा अशी मागणी कृती समितीने केली आहे. जागतिक बँकेच्या कर्जासाठी हा कायदा पास करण्यात आला होता. मात्र हे कर्जच मिळाले नसल्याने व हा कायदा अन्यायी असल्याचे सांगून तो तात्काळ रद्द करावा, अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्यापाऱ्यांना नोटिसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एलबीटीचे विवरण पत्र सादर करण्याची मुदत उलटून गेल्यानंतरही विवरणपत्र दाखल न करणाऱ्या व्यापारी, बिल्डर, ऑनलाइन कंपन्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. वेळेत विवरणपत्र सादर न केल्याप्रकरणी शहरातील १३ हजार १३६ व्यापारी व विकसकांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली आहे. १५ दिवसाच्या आत व्यापाऱ्यांकडून खुलासा मागविण्यात आला आहे.

राज्य सरकारने छोट्या व्यापारी व व्यावसायिकांना एलबीटी माफ केल्यामुळे विवरण पत्रही सादर न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया पालिकेच्या एलबीटी विभागाने सुरू केली आहे. एलबीटी माफ झाल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही अशी अटकळ बांधून असलेल्या या व्यापाऱ्यांना महापालिकेने दिवाळीत झटका दिला आहे. गेल्या वर्षीचे एलबीटीचे विवरण सादर करण्याची मुदत ही ३१ ऑक्टोबर होती. त्या मुदतीत व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे एलबीटी विभागाने या व्यापाऱ्यांना थेट नो‌िटसाच बजावल्या आहेत. संबंधितांना खुलासा देण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

या काळात खुलासा केला नाही तर थेट बँक खाते सील केले जाणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत व्यापारी संकटात सापडले आहे. महापालिकेने पाठविलेल्या नोटिसेला उत्तर देण्याचा पर्याय त्यांच्यापुढे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी कार्यालयास संतप्त विद्यार्थ्यांचा घेराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वसतीगृहांसह आदिवासी विद्यार्थ्यांना विविध सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याच्या मुद्यावरून आदिवासी विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनात गुरूवारी आदिवासी आयुक्त कार्यालयास घेराव घालण्यात आला. विद्यार्थ्यांना वेळ न देता आयुक्त निघून गेल्याचा मुद्दा उचलून धरीत गुरूवारी संतप्त विद्यार्थ्यांनी आयुक्तालयातील पाच ते सहा कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत कार्यालयातच कोंडून ठेवले.

औरंगाबाद विभागातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा गुरूवारी अकरावा दिवस पार पडला. सकाळपासून विद्यार्थी अस्वस्थ होते. त्यांनी आदिवासी आयुक्त सोनाली पोंक्षे-वायंगणकर यांच्याशी बोलण्याचा आग्रह धरला होता. यानुसार सायंकाळी विद्यार्थी प्रतिनिधींची चर्चा सुरू झाल्यानंतर काही वेळातच आयुक्तांनी मागील दरवाजाने कार्यालयाबाहेर पळ काढल्याचा आरोप भारतीय आदिवासी पँथरच्या विद्यार्थ्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक विभागातील १३ तहसीलदारांच्या बदल्या

$
0
0

नाशिक जिल्ह्यातील ५ तहसीलदारांचा समावेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महसूल विभागातील एकूण १३ तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी काढण्यात आले आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील ५ तहसीलदारांचा समावेश आहे. बदली झालेले तहसीलदार, त्यांचे सध्याचे पद आणि नियुक्तीनंतरचे पद पुढीलप्रमाणे.

१) एस. बी भाटे - तहसीलदार, पाथर्डी - करमणूक शुल्क, नाशिक २) वंदना खरमाळे - निवडणूक शाखा, नाशिक - तहसीलदार, श्रीगोंदा, ३) डॉ. राजश्री अहिरराव - तहसीलदार, राहुरी- तहसीलदार, नाशिक. ४) गणेश राठोड - तहसीलदार, नाशिक - तहसीलदार, निवडणूक शाखा, नाशिक. ५) शर्मिला मोसळे - तहसीलदार, देवळा - तहसीलदार, साक्री. ६) कैलास पवार - तहसीलदार, अकोला - तहसीलदार, देवळा. ७) वैशाली हिंगे - तहसीलदार, भुसावळ - तहसीलदार, पुरवठा, विभागीय आयुक्तालय. ८) सुरेश कोठी - तहसीलदार, पारोळा - तहसीलदार, मालेगाव. ९) महेश चौधरी - तहसीलदार, संजय गांधी योजना नाशिक - तहसीलदार, नगरपालिका, विभागीय आयुक्तालय. १०) गायत्री सौंदाणे - तहसीलदार, शिंदखेडा - धाविअ, मालेगाव. ११) अनिल कंबाडे - धाविअ, मालेगाव - तहसीलदार, सुरगाणा. १२) माणिक आहेर - तहसीलदार, साक्री - तहसीलदार, चांदवड. १३) मनोज देशमुख - तहसीलदार, चांदवड - तहसीलदार, अकोले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस आदिवासींचा प्रश्न राष्ट्रीय आयोगाकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने बोगस आदिवासींना संरक्षण देण्यासाठी काढलेल्या २१ ऑक्टोबर २०१५ परिपत्रकाविरोधात भाजप खासदारांनी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे धाव घेतली आहे. दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिल्लीत अध्यक्ष रामेश्वर ओरायण यांची भेट घेवून हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली आहे. ओरायण यांनी पुण्यात यासंदर्भात होणाऱ्या बैठकीत मुद्दा उपस्थित कऱण्याचे आश्वासन दिले असून, सचिवांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे.

राज्यातील भाजपच्या सरकारने बोगस आदिवासींना संरक्षण देण्यासाठी २१ ऑक्टोबर २०१५ रोजी परिपत्रक काढले आहे. त्यामुळे २००५ पर्यंतच्या बोगस आदिवासींच्या नोकऱ्या वाचणार आहेत. मात्र, या निर्णयाला भाजप आमदार व खासदारांनी विरोध केला आहे. रामेश्वर ओरायन यांच्या बरोबरच्या चर्चेत हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले की, जे बिगर आदिवासी ज्याही पदावर कार्यरत असतील जर अवैध प्रमाणपत्र असेल तर त्यांना शासनाने ज्या वर्गाचे जातीचे प्रमाणपत्र असेल त्या वर्गाच्या जातीमध्येच सामील करावे. त्यांना अनुसूचित जमातींचे जात प्रमाण पत्र नसताना (बोगस आदिवासी प्रमाणपत्र )पदावर सामावून घेणे हे घटनेच्या विरोधात आहे.

शासन निर्णय आदिवासी बांधवांवर अन्यायकारक आहे. ही सर्व पदे शासनाने मूळ आदिवासी असणाऱ्यांनाच दिली पाहिजे. ओरायन यांनी यासंदर्भात पुणे येथे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे बैठक ठेवली आहे. तेथे आदिवासी विभागाचे मुख्य सचिवांना बोलावून शासन निर्णय बदलण्यास सांगणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेला महागाईची झाली आठवण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कल्याण-डोंबवली महापालिकेत सपाटून मार खाल्यानंतर जनतेशी नाळ तुटलेली मनसे गुरूवारी महागाई व पाण्याच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरली. मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले. भाजप सरकार नाशिकला मराठवाडा करीत असल्याचा आरोप करतानाच महागाई हे शासनाचेच कटकारस्थान असल्याचा आरोपही मनसेच्या नेत्यांनी केला. मनसेच्या सर्व नेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेवून पक्षाची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

ऐन दिवाळीच्या सणात महागाईने कळस गाठला असून, डाळी सर्वसामान्यांच्या आहारातून हद्दपार होत आहेत. तर पाणीटंचाई असतांनाही नाशिकचे हक्काचे पाणी जायकवाडीला दिले जात आहे. त्यामुळे शासनाच्या या दुटप्पी वागणुकीच्या विरोधात मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा आयोजित केला होता. माजी आमदार वसंत गिते यांनी पक्ष सोडल्यानंतर प्रथमच गुरुवारी मनसे जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरली होती. त्यामुळे मनसेच्या या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. राज्य सचिव प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापौर अशोक मुर्तडक, डॉ. प्रदीप पवार, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, जिल्हाप्रमुख सुदाम कोंबडे, शशीकांत जाधव, सलिम शेख, अनिल मटाले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक या आंदोलनात सहभागी झाले होते. मनसेच्या कार्यालयातून शालीमारमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आला. जवळपास दीड ते दोन हजार कार्यकर्त्यांसह महिलांनी या मोर्चात हजेरी लावून मनसेची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.

पिक्चर अभी बाकी है!

या आंदोलनात बोलतांना महापौर अशोक मुर्तडक यांनी पाणी व महागाई विरोधातील पक्षाची भुमिका स्पष्ट करताना, आजचा केवळ ट्रेलर आहे. पूर्ण पिक्चर बाकी असून, सरकारला आम्ही आता सळो की पळो करून सोडणार असल्याचा इशारा दिला. शुक्रवारी सर्वपक्षीय आंदोलन केले जाणार असून, आता दररोज सरकारला आम्ही उघडे पाडणार आहोत.

उणीव भरून निघाली!

कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा असलेले माजी आमदार वसंत गिते यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत मनसेची आंदोलने होत होती. मात्र, प्रथमच गितेंविना हा मोर्चा काढण्यात येणार होता. मोर्चा फुसका ठरू नये, याची पूरेपूर जबाबदारी स्थानिक नेत्यांनी घेतली. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमवत गितेंची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे शहरातील रस्ते व व्यापारपेठांमधील रस्ते चांगलेच जाम झाले होते. त्यातून नागरिकांचेही हाल झाले.

दरवाढ व साठेबाजी हे शासनाचे कटकारस्थान आहे. अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची फसवणूक केली जात आहे. मनसेचा सरकार विरोधात एल्गार आहे. त्यांना मराठवाड्याप्रमाणेच नाशिकही उजाड करायचे आहे. या सरकारची पोलखोल आम्ही करणार आहोत.- प्रमोद पाटील, सचिव, मनसे

राज्य सरकार लुटपूटची लढाई खेळत आहे. नाशिकच्या हक्काचे पाणी पळवून नेण्याचा हा प्रयत्न असून, या सरकारला आम्ही उघडे पाडणार आहोत. सरकार नाशिककरांना सापत्न वागणूक देत आहे. येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.- अशोक मुर्तडक, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images