Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सरकारी गोदामांतील धान्य असुरक्षित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड आणि गोल्फ क्लब येथील सरकारी गोदामांत तब्बल दीड कोटींहून अधिक किमतीच्या साडे सात हजार क्विंटल धान्याची सुरक्षा धोक्यात आली आहे. गोदामांसाठी सुरक्षारक्षकाचे पदच मंजूर नसल्याने सध्या ही गोदामे रामभरोसे आहेत. सुरगाणा रेशन धान्य घोटाळा राज्यभर गाजत असताना घोटाळेबाज तसेच चोरट्यांना रानच मोकळे असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ऐन सणासुदीच्या काळात गेल्याच आठवड्यात नाशिकरोड येथील गोदामातून साखरेचे कट्टे चोरीस गेले होते. चोरट्यांना पकडण्यात आणि हे कट्टे जप्त करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, त्याचवेळी सरकारी गोदामांमधील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला. गोल्फ क्लब येथील सरकारी गोदामात सध्या ५ हजार १८५ क्विंटल तर नाशिकरोड येथील गोदामात २३७५ क्विंटल धान्य आहे. या धान्याची नियमित उचल होत असली तरी सरकारकडूनही गोदामात धान्याचा ओघ सुरूच असतो. त्यामुळे या गोदामांमध्ये कोट्यावधी रुपयांचे धान्य पडून असते. विशेष म्हणजे अशा या सरकारी मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी गोदामांमध्ये सुरक्षारक्षक असायला हवेत. परंतु, पदच मंजूर नसल्याने तेथे रात्री सुरक्षारक्षक नसतात. दिवसभर गोदामातील कामगारांच्या भरवशावर सुरक्षा होत असली तरी रात्री चोरट्यांना रानच मोकळे राहात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या भरवशावर गोदामातील धान्याची सुरक्षा केली जात असली तरी हे सीसीटीव्ही कुचकामी ठरत असल्याचे चोरीच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

दीड कोटींचा धान्यसाठा उपलब्ध

गोल्फ क्लब गोदामात सध्या २ हजार ६५० क्विंटल गहू, २ हजार ३८ क्विंटल तांदूळ आणि ४९७ क्विंटल साखर आहे. नाशिकरोड गोदामात १ हजार ४४२ क्विंटल गहू, ८०५ क्विंटल तांदूळ, ४ क्विंटल साखर आणि १२४ क्विंटल ज्वारी आहे. रेशनच्या सरकारी दरानुसार या धान्याची किंमत २३ लाख ४७ हजार ६५० एवढी होते. तर बाजारभावानुसार त्याची किंमत १ कोटी ५७ लाख ४१ हजार २०० रुपये आहे.

आपल्याकडे स्वतंत्र सुरक्षारक्षकाचे पद मंजूर नाही. त्यामुळे गोदाम परिसरात सुरक्षारक्षक नसतात. हे पद मंजुरीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला आहे. गोदामात दिवसा हमाल, गोदामपाल असतात. सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविले आहेत.

- गोरक्षनाथ गाडीलकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदारांना प्रतीक्षा आमंत्रणाची

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नावर भाजपच्या तीनही आमदारांनी नाशिककरांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आंदोलन करणाऱ्या कृती समिती ऐवजीसाठी महापौरांनी निमंत्रणे दिले असते तर आम्हीही या आंदोलनात सहभागी झालो असतो, असा पवित्रा पाणी वाहून गेल्यानंतर घेतला आहे.

जलसंपदा विभागाने सव्वा टीएमसी पाण्याची चुकीची आकडेवारी सादर केल्याचा आरोप आपल्याच खात्याच्या मंत्र्यांवर आमदारभूतींनी लावला आहे. तर मित्रपक्ष शिवसेनेच्या भूमिकेवर आक्षेप घेत सर्व पक्ष पाणीप्रश्नी गलिच्छ राजकारण करत असल्याचा थयथयाट भाजप आमदारांनी केला आहे. दरम्यान, नाशिकच्या पाणीप्रश्नी शनिवारी (दि. ७) एक वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करू केविलवाणे उत्तर देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

जिल्ह्यातील धरणांमधून हक्काचे पाणी चार दिवसापासून वाहून जात आहे. ते पाणी वाचविण्यासाठी शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्ष रस्त्यावर उतरले असतांना भाजपने मात्र मौन साधले होते. गंगापूरचे पाणी सोडल्यामुळे नाशिककरांना गंभीर पाणीसंकटाचा सामना करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत सर्वपक्षीय रान उठले असतांना आठ दिवसापासून गायब असलेले भाजपचे आमदार पक्ष कार्यालयात गुरूवारी प्रकटले. निम्म्यापेक्षा अधिक पाणी वाहून गेल्यानंतर आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत पक्ष आणि सरकारची भूमिका मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

आम्हाला शिवसेनेचे नव्हे; महापौर अशोक मुर्तडक यांचे रितसर आमंत्रण हवे होते. तसे आमंत्रण आले असते तर आम्हीही या आंदोलनात सहभागी होवून मुख्यमंत्र्यांची भेट घेवून पाणीप्रश्नावर आवाज उठविला असता, अशी भूमिका भाजप आमदारांनी घेतली. जलसंपत्ती नियमन कायद्याप्रमाणे पाणी देणे आवश्यक आहे. मात्र, सध्या पाणीप्रश्नावर गलिच्छ राजकारण केले जात असल्याची भूमिका आमदार फरांदे यांनी मांडली. या प्रश्नावर राजकारणा पलिकडे जावून विचार करायला हवे असे सांगत, असतांना फरांदे यांनाही रितसर स्वतंत्र आमंत्रण हवे होते. सिहंस्थ, गंगापूरचे लाईव्ह स्टोरेज, आळंदी धरणाचा गंगापूर धरण समूहात समावेशामुळे तब्बल १३०० दशलक्ष घनफूट पाण्याचे नाशिकचे नुकसान झाले आहे. ही आकडेवारी जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाकडे उपस्थित केले असते तर अधिकचे पाणी मिळाले असते अशी माहिती फरांदेनी दिली. मात्र, मंत्री भाजपचे असल्याचे सांगितल्यावर त्यांची बोलती बंद झाली. तर राजकीय आसूड घेण्याऐवजी एकत्र येवून मोट बांधू, असे आवाहनही त्यांनी केले.

अन् आमदारांची बोलती बंद

जनतेच्या प्रश्नावर आमदारांना रितसर आमंत्रणाची गरज होती काय? असा प्रश्न विचारल्यावर तीनही आमदारांची बोलती बंद झाली. जलसंपदा मंत्र्यांच्या खात्यानेच चुकीची आकडेवारी दिल्याचे पत्रकारांनी लक्षात आणून दिल्यावर आमदारांचे तर आवसान गळाले. आता काय बोलावे अशी त्यांची केविलवाणी अवस्था झाली. कृती समितीऐवजी पाणीप्रश्नावर आमदारांनीच लिड घेतले असते तर पाणी वाचले नसते का? पाणी आंदोलनाचे नेतृत्व आमदारांनीच का केले नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू झाल्यानंतर आमदारांचे चेहरे फिके पडले. कुठून पत्रकार परिषद घेतली असे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. पाण्यासाठी प्रयत्न करू असे सांगत असतांना वाहून गेलेल्या पाण्यासाठी कसे प्रयत्न करणार असा प्रश्न पडताच 'पाणी कमी पडू देणार नाही' हे एकच उत्तर देतांना त्यांची दमछाक होत होती.

भुजबळ, कदम काय करत होते?

पत्रकार परिषदेत आमदार फरांदे व लक्ष्मण सावजी यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर कडाडून टीका केली. शिवसेना रोज भूमिका बदलते, त्यांच्याबरोबर कसे जाणार असा प्रश्न शहराध्यक्ष सावजी यांनी उपस्थित केला. सन २००५ मध्ये कायदा पास होतांना छगन भुजबळ व आमदार अनिल कदम काय करत होते? शिवसेनेने तेव्हा आवाज उठवला नसता तर आज भुजबळ फार्म हाऊसवर जाण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती असा टोला फरांदे यांनी लगावला.

आमदारांना आमंत्रणाची गरजच का?

भाजप आमदरांच्या आमंत्रणाच्या भूमिकेवर कृती समितीच्या अजय बोरस्ते यांनी टीका केली आहे. उशिरा का होईना भाजपचे आमदार शहरात प्रकट झाल्याचा आनंद असल्याचा टोला लगावत 'पक्षभेद बाजूला ठेवून आम्ही लढतोय. भाजप आमदार सोबत आले असते तर पाणी वाचले असते. मात्र, त्यांना जनतेच्या प्रश्नावर सुद्धा आमत्रंणाची गरज वाटते का?' असा सवाल बोरस्ते यांनी उपस्थित केला आहे.

पाणीप्रश्नी आज महासभा

पाणीप्रश्नावर आवाज तीव्र करण्यासाठी महापालिकेची महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. ७) विशेष महासभा होत आहे. नाशिकचे पाणी जायकवाडीला पळवले जात असल्यामुळे भाजप वगळता सर्वच पक्ष संतप्त आहे. त्यामुळे सरकारच्या निषेधाचा ठराव करून व तात्काळ पाणी थांबविण्याची विनंती ठरावाद्वारे सरकारला केली जाणार आहे. या महासभेत भाजप नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेब्रुवारीपासून अलायन्स एअरची सेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नाशिककरांसाठी मोठी खुशखबर आहे. येत्या फेब्रुवारीपासून एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरची नाशिक-मुंबई ही विमानसेवा येत्या फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तसेच, पुढच्या टप्प्यात सूरत आणि हैदराबाद या शहरांसाठीची सेवा सुरू करण्याचे एअर इंडियाने जाहीर केले आहे. गो एअरही त्यांची सेवा लवकरच सुरू करण्याची चिन्हे असल्याने इतरही विमान कंपन्यांची सेवा येत्या काळात नाशिककरांना मिळण्याची दाट शक्यता आहे.

ओझर येथील विमानतळाच्या ठिकाणी अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनल आणि इतर सोयी-सुविधा असतानाही नाशिकहून विमानसेवेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. यासंदर्भात विविध प्रकारच्या मागण्या, पाठपुरावा झाला तरी त्यास यश आले नाही. मात्र, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर एअर इंडिया कंपनीने नाशिककरांना दिलासा दिला आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या एअर इंडियाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून येत्या फेब्रुवारीपासून एटीआर७२-६०० हे या अलायन्स एअरच्या विमानाद्वारे मुंबई-नाशिक-मुंबई ही सेवा देणार असल्याचे पत्र एअर इंडियाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी गोडसे यांना दिले आहे.

पॅसेंजर टर्मिनलची देखभाल करण्यासाठीचे टेंडर हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) काही दिवसांपूर्वीच काढले आहे. एअर इंडियाची सेवा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर टर्मिनलचा सांभाळ बहुराष्ट्रीय कंपनीकडे गेल्यास त्याचा विशेष परिणाम होणार आहे. गो एअर कंपनीनेही नाशिकहून विमान सेवा देण्याबाबत सकारात्मकता दाखविली आहे. एअर इंडियापाठोपाठ गो एअरची सेवाही सुरू झाल्यास अन्य विमान कंपन्याही नाशिकचा विचार गांभिर्याने करतील, असे असे हवाई क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे. परिणामी, २०१६ हे वर्ष नाशिककरांसाठी लाभदायी ठरणार असल्याची चिन्हे आहेत.

नाशिकहून फेब्रुवारीत

सेवा देण्याचे पत्र एअर इंडियाने दिले आहे. मात्र, जानेवारीपासूनच ही सेवा सुरू करावी, असा आग्रह मी त्यांना केला आहे.

- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅक्टर अपघातात तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, गंगापूररोड

गंगापूरगाव शिवारातील जलालपूर, चांदशी रस्त्यावरील कॅनॉलरोडवर जात असताना ट्रॅक्टर कॅनॉलमध्ये पडला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत नाशिक तालुका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जलालपूर गावातील किशोर भिका पवार (वय ३५) शेतीचे काम आटोपून गावाकडे परतत असताना जलालपूर, चादंशी शिवारातील कॅनॉलरोडवर ताबा सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. यात हुडाचा लोखंडी रॉड पाठीत घुसल्याने त्यांचा मृत्यू झाला. किशोरच्या पश्चात आई, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इन्स्पेक्शन सेंटर बंद

$
0
0

पुन्हा जुन्याच पद्धतीने 'आरटीओ'त वाहनांची तपासणी सुरू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध राजकीय संघटनांचा हस्तक्षेप, प्रादेशिक परिवहन विभागाची तटस्थ राहण्याची भूमिका आणि संबंधित केंद्र संचालकांची हतबलता यामुळे थाटामाटात सुरू झालेले राज्यातील पहिलेच ऑटोमेटीक व्हेईकल इन्स्पेक्शन सर्टिफिकेशन सेंटर (एव्हीइएस) अघोषित काळासाठी बंद करण्यात आले. शुक्रवारी जुन्याच पध्दतीने वाहन तपासणीचे काम सुरू झाल्याने वाहनचालकांची मात्र दिवाळी झाली.

वाहनातील तांत्रिक त्रुटी आणि प्रदूषणाचे प्रमाण तपासणीसाठी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एआरएआय) सहकार्याने प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) जागेत एव्हीइएस यंत्रणा सुरू करण्यात आली. मात्र, या यंत्रणेमुळे सदोष वाहन असलेल्या मालकांसमोर प्रश्न निर्माण झाले. यामुळे अनेक राजकीय संघटनांनी पुढे येत सदर सेंटर बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दोन दिवसापासून वाहनचालकांनी सेंटर चालकांवर दबाव टाकत तोडफोड करण्याची धमकी दिली. आरटीओ कार्यालयात सुरू असलेल्या गोंधळास पोलिसांसह आरटीओ अधिकाऱ्यांनी मुकसंमती दिल्याचे चित्र दिसून येत आहे. आजवर झालेल्या वाहन तपासणीमध्ये शेकडो वाहने ब्रेक, प्रदूषण, हेडलाईट बीम यासह इतर महत्त्वपूर्ण चाचण्यांमध्ये फेल ठरली. दुरुस्ती करून येणाऱ्या वाहनांमध्ये सुध्दा हे प्रमाण कमी झाले नसून, तपासणी सेंटर चालवणाऱ्या रोसमेर्टा टेक्नॉलॉजीज या कंपनीने सर्व्हिस सेंटर सुरू करावे, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. मात्र, असे सेंटर सुरू करण्यासाठी आवश्यक ती मंजूर घ्यावी लागेल, असे कंपनीचे डीजीएम सुमित ललित यांनी स्पष्ट केले. आमच्या कंपनीमार्फत आजवर साडेचारशेपेक्षा जास्त वाहनांच्या हेडलाईटचा प्रश्न जागेवर सोडवण्यात आला. दुर्दैवाने जुन्या वाहनांची संख्या मोठी असून, इंधनामध्ये भेसळ करण्याचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. या केंद्रावर सुरुवातीस अनेक रिक्षाचालक रॉकेल मिश्रित पेट्रोलचा वापर करणाऱ्या रिक्षा घेऊन येत. त्यामुळे साहजिकच प्रदूषणाच्या तपासणीत त्या रिक्षा नापास होत. हळूहळू सर्वांना समजावून सांगितले असता आता रिक्षा नापास होण्याचे प्रमाण कमी झाल्याचा दावा जैन यांनी केला. सातत्याने पोलिस संरक्षणाची मागणी करूनही ते मिळालेले नाही. त्यामुळे संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हे केंद्र बंद ठेवणार असल्याचे सुमित ललित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, खासदार हेमंत गोडसे यांनी आंदोलनकर्त्यांची तसेच डेप्यूटी आरटीओ अधिकारी भरत कळसकर यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी निवेदन सादर करीत हे केंद्र बंद करून जुन्या पध्दतीने वाहनांची तपासणी करण्याची मागणी केली. आंदोलकांच्या रेट्यापुढे नमते घेत पुढील दोन दिवस मॅन्युअल पध्दतीने वाहनांची तपासणी करण्याचे ठरले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळारामाला अखेर पावली ‘लक्ष्मी’!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

श्री काळारामासह लक्ष्मण व सीतेला सुवर्णहार करण्यासाठी सुवर्णकार ठरविण्याबाबत दोन विश्वस्तांमध्ये सुरू असलेल्या वादावर अखेर संस्थानच्या अध्यक्षांनी मध्यस्थी करीत पडदा टाकला आहे. सुवर्णहार बनविण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, दंडे आणि गुरव या सराफांकडून दागिने घडविले जात आहेत. येत्या लक्ष्मीपूजनाला श्री काळाराम, लक्ष्मण व सीतेला या सुवर्णहारांनी अलंकृत केले जाणार आहे.

श्री काळाराम संस्थानच्या दानपेटीत आलेल्या २१ तोळे सोन्यातून श्रीरामाला सुवर्णहार करण्याचा निर्णय संस्थानने घेतला होता. यासाठी शहरातील नामांकित सुवर्णकार विनामूल्य हार तयार करून देण्यास तयार होते. मात्र, हा सुवर्णहार कोणत्या सराफाकडून तयार करावा यावरून दोन विश्वस्तांमध्ये एकमत होत नव्हते. त्यामुळे अध्यक्षांनी हा प्रस्तावच बारगळवला होता. विश्वस्तांमधील या वादामुळे श्री काळारामाला पुन्हा वनवास मिळाल्याचे वृत्त 'मटा'ने ३ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केले. या वृत्ताची गंभीर दखल अध्यक्षांसह विश्वस्तांना घेत संस्थानची तत्काळ नव्याने बैठक बोलवली. पांडुरंग बोडके, अजय निकम, गिरीश पुजारी, मंडलेश्वर काळे, कुलकर्णी उपस्थित होते. यात अध्यक्षांनी या विश्वस्तांमध्ये समझोता करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्याला विश्वस्तांनी संमती दिली असून आता दोन सराफांकडून हे अलंकार बनविण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी केवळ श्रीरामालाच हार केला जाणार होता. मात्र, आता नव्याने दहा तोळे सोने घेवून श्रीराम व लक्ष्मणाच्या मूर्तीला प्रत्येकी दहा तोळे, तर सीतेच्या मूर्तीला ११ तोळ्यांचा हार करण्याचा निर्णय झाला आहे. लक्ष्मीपूजन मूहर्तावर श्री काळारामासह, लक्ष्मण व सीतेला प्रत्येकी १० तोळ्याचा हार चढविला जाणार आहे. त्यामुळे भक्तांच्या दानातून श्रीरामाला सुवर्णहार करण्याचे भक्तांची इच्छा पूर्ण होणार आहे तर सुवर्णहाराचा काळारामाचा वनवासही संपणार आहे.

विश्वस्तांमधील वाद मिटला असून, श्री काळारामासह, लक्ष्मण व सीतेलाही आता सुवर्णहार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन सराफांना हे काम देण्यात आले आहे. येत्या ११ तारखेला लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर तीनही हार अर्पण केले जाणार आहेत.

- पांडूरंग बोडके, विश्वस्त, श्री काळाराम संस्थान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारपेठेला झळाळी

$
0
0

शहरात दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी; वाहतुकीचा फज्जा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी शहरवासी वाहनांसह रस्त्यावर उतरल्याने शहरात वाहतुकीचा फज्जा उडाला. शहराची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या शालिमार, रविवार कारंजा, एमजी रोड परिसरात नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वाहतुकीचे नियोजन करताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचेही पहावयास मिळाले.

'दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा' असे म्हणतात ती काही अतिशयोक्ती नाही. गरीब असो अथवा श्रीमंत सर्वच जण या सणाची आतुरतेने वाट पहात असतात. अशा या दीपावलीला सुरूवात झाली असून, अबालवृध्दांच्या उत्साहाला भरते आले आहे. शनिवारी वसुबारस साजरी करण्यात आली. सोमवारी धनत्रयोदशी तर बुधवारी लक्ष्मीपूजन होणार असल्याने घराघरात त्याची तयारी सुरू आहे. दिवाळी निमित्त खरेदी करण्याची सवय नागरिकांमध्ये रूजली असल्याने शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. गेल्या तीन चार दिवसांपासून बाजारपेठेत उत्साह संचारला आहे.

सातपूर आणि सिडको या मुख्य औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांना शनिवारी असलेली साप्ताहिक सुटी आणि बच्चे मंडळींच्या शाळांनाही लागलेली सुटी असा दुहेरी योग शनिवारी जुळून आल्याने कामगारवर्ग कुटूंबीयांसह खरेदीसाठी घराबाहेर पडला. बाजारपेठाही सकाळी अकरापासूनच नागरिकांच्या गर्दीने गजबजून गेल्या. खासगी वाहनांसह नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर उतरल्याने सीबीएस, मेहेर, शालिमार, एमजी रोड, रविवार कारंजा, मेनरोड, पंचवटी, राजीव गांधी भवन चौकात वाहनधारकांना टप्प्या टप्प्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

वाहनचालकांचा बेशिस्तपणा!

दुपारी चारनंतर रस्त्यांची वाहनांची गर्दी अधिकच वाढली. किराणा, कपडे, पादत्राणे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मिठाई खरेदीसाठी सर्वाधिक गर्दी असल्याचे पहावयास मिळाले. वाहनतळांची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने मोकळी जागा दिसेल तेथे नागरिकांनी वाहने उभी केली. विशेष म्हणजे त्यामध्ये मोटरसायकलींप्रमाणेच कारची संख्याही मोठी असल्याने वाहतुकीचा प्रश्न अधिकच जटील बनला. दुकानांमध्ये खरेदीसाठी जाताना वाहने रस्त्यावरच बेशिस्तपणे उभी केली जात असल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्या वतीने ‘रन फॉर स्मार्ट नाशिक’

$
0
0

नाशिक : महापालिकेच्या वतीने 'रन फॉर स्मार्ट नाशिक' व सायकल रॅलीचे रविवारी सकाळी आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली सकाळी सात वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथून निघणार असून, शहरातील क्रीडा संघटना तसेच सर्व स्तरातील विद्यार्थी, नागरिक, विविध कंपन्यातील कर्मचारी सहभागी होणार आहेत.

महापौर अशोक मुर्तडक, आयुक्त प्रवीण गेडाम, उपमहापौर गुरुमीत बग्गा, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांच्यासह सर्व गटनेते, नगरसेवक या रॅलीत सहभागी होणार आहेत. धावपटू कविता राऊत, संजीवनी जाधव, किसन तडवी, सायकलपटू महाजन बंधू सहभागी होणार आहेत. या खेळाडूंचाही महापालिकेच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. 'रन फॉर नाशिक' ही रॅली हुतात्मा स्मारक, त्र्यंबकरोड मार्गे मायको सर्कल, शरणपूर पोलिस चौकी, कॅनडा कॉर्नर, कुलकर्णी गार्डन, राजीव गांधी भवन, रामायण बंगला मार्गे पुन्हा हुतात्मा स्मारकात पोहचणार आहे. शहर स्मार्ट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पसा’मध्ये रंगली ‘बाबाज् करंडक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'लायन्स क्लब ऑफ नाशिक' आणि 'बाबाज थिएटर' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 'बाबाज करंडक २०१५' या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा शनिवारी अंतिम टप्पा पार पडला. रंगकर्मींना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण २४ संघ या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. त्यापैकी शनिवारी दोन सत्रात ११ एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले.

नाशिक येथील 'नाट्यसेवा' संस्थेनी शंतनु चंद्रात्रे लिखित 'एव्हरी डे डझ सन डे', पुण्यातील 'टी स्कूल' या संस्थेनी तीन एकांकिकांचे सादरीकरण केले. दुसऱ्या सत्रात मुंबईतील 'रंगसुगंध महाड' या संस्थेनी ऋषिकेश कोळी लिखित 'अनुत्तरीत', 'फोर्थ वॉल ठाणे' संस्थेने मोहन बनसोडेलिखित 'मित्रा' आदी एकांकिकेचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचा समारोप पारितोषिक वितरणाने झाला. यावेळी बाबाज् थिएटरचे मुख्य प्रशांत जुन्नरे, लायन्स क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष उमेश सोनवणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणपूरक दिवाळीचा विद्यार्थ्यांनी केला जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळांमध्ये पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पर्यावरणपूरक दिवाळी साजरा करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत चिमुकल्यांनी दिवाळी साजरी केली.

साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिकरोड संस्थेतर्फे स्मार्टसिटीसाठी फटाकेविरहित जनजागृती अभियान राबविण्यात आले. राष्ट्रीय हरितसेना अंतर्गत इकोक्लबतर्फे या अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली. या अभियानाच्या माध्यमातून विविध शाळांमध्ये तसेच नागरिकांमध्येही जनजागृती करण्यात आली. नाशिक शहरातील सुमारे ३५ शाळांमधील ७५ हजार विद्यार्थी व शिक्षकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. या अभियानास शहरवासीयांनी प्रतिसाद देऊन पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे मॅनेजिंग ट्रस्टी गणपत मुठाळ, प्रवीण जोशी, मिलिंद पांडे, प्राचार्य डी. बी. वाकचौरे आदींनी केले आहे.

राज्य सरकारअंतर्गत सामाजिक वनीकरण संचालनालयाच्या राष्ट्रीय हरित सेना उपक्रमांतर्गत दिवाळीची सुट्टी पर्यावरणाशी गट्टी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बीज संकलन, घरच्या घरी रोपवाटिका, पक्ष्यांची यादी बनविणे, पक्ष्यांसाठी पाणपोई उघडणे व त्यांना घरकुल मिळवून देणे, जुन्या वह्यांमधील कोऱ्या कागदापासून वह्या तयार करणे आदींचा समावेश उपक्रमात करण्यात आले आहे.


`रंगुबाई जुन्नरे`त दिवाळी साजरी

नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित रंगुबाई जुन्नरे प्राथमिक शाळेत दिवाळी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थी नवीन कपडे घालून आले होते. स्नेहल काळे व शोभा रामिष्ट या शिक्षिकांनी यावेळी दिवाळीच्या सर्व दिवसांबद्दल व इकोफ्रेंडली दिवाळीबद्दल माहिती दिली. सामाजिक भान जपत या अनाथ बालकांनाही दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा रडके यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सचिन भालेराव, राधा देसाई, कांचन पाटील आदी उपस्थित होते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक संघटनांचा एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या नेतृत्त्वाखाली कार्यरत असणाऱ्या सर्व संघटनांतर्फे विविध मागण्यांसाठी शनिवारपासून राज्यस्तरीय आंदोलनाला घंटानाद आंदोलनाने सुरुवात करण्यात आली. शिक्षकांच्या मागण्यांना सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले. तसेच यासंबंधी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना निवेदन देण्यात आले.

सध्या अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा, शिक्षकभरती न करणे, कला व क्रीडाशिक्षकांची पदे रद्द करणे यामुळे शिक्षकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. तसेच शालेय पोषण आहार यंत्रणा स्वतंत्र राबविणे, प्राथमिक शाळांमध्ये लिपीक व सेवकांची पदे मान्य करणे, शालेय स्तरावर २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काचा परतावा करणे आदी मागण्याही पूर्ण होत नसल्याने याची पुन्हा एकदा आठवण सरकारी यंत्रणेला करुन देण्याच्या उद्देशाने आंदोलन करण्यात आले.

या सरकारने तरी आमच्या समस्यांना वाट करुन द्यावी, अशी मागणी यावेळी संघटनांनी केली. एकूण १८ संघटना आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. यावेळी नाशिक जिल्हा शिक्षण बचाव कृती समितीचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, रविंद्र जोशी, विलास सोनार, मोहन चकोर, अड. नितीन ठाकरे, एस. बी. देशमुख यांसह मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक लोकशाही आघाडी, संस्थाचालक आदी उपस्थित होते.


आता झोपमोड आंदोलन

१४ नोव्हेंबरला झोपमोड आंदोलन होणार असून, रात्री १० ते १२ दरम्यान लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊन त्यांना निवेदन दिले जाणार आहे. त्यानंतर ३० नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता पुण्यातील शिक्षण संचालक कार्यालय, शिक्षण भवन ते शिक्षण आयुक्त कार्यालय येथे भव्य मोर्चा काढला जाणार आहे. ९ व १२ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही आंदोलन केले जाणार आहे. १० डिसेंबरला राज्यभरात शाळा बंद ठेवण्यात येणार आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पं. वाडिकरांच्या स्वरांनी उजळणार पिंपळपार

$
0
0

संस्कृती नाशिकतर्फे हिंदुस्थानी क्लासिकलची मेजवानी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सलग दोन दशकांपासून शहरात दिग्गज गायकांना निमंत्रित करीत भारतीय शास्त्रीय संगीताचा नंदादीपतेवत ठेवणाऱ्या संस्कृती नाशिक या संस्थेने यंदाही पाडवा पहाटेचे निमित्त साधत रसिकांसाठी पं. कृष्णेंद्र वाडीकर यांची गायन पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. गुरूवारी (दि.१२) पहाटे ५ वाजता ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात दीपप्रज्ज्वलन करून पाडवा पहाटेच्या किनारीला पं. वाडिकरांचे सोनेरी स्वर स्वर्ण झळाळी आणणार आहेत.

नेहरू चौकातील पिंपळपारावरील पाडवा पहाटेचे यंदा अठरावे वर्ष आहे. यंदाच्या गायन सोहळ्यात संस्कृती नाशिकने धारवाड येथील पं.कृष्णेंद्र वाडिकर यांना निमंत्रित केले आहे. पं. वाडिकर किराणा घराण्याचे गायक असून, हिंदुस्थानी क्लासिकल गायनातील नैपुण्यासाठी ते विख्यात आहेत. क्लासिकल संगीतातील ठुमरी, संत वाणी, नाट्य संगीत, दास वाणी या गायन प्रकारांसाठीही त्यांची विशेष ओळख आहे. ग्वाल्हेर घराण्याचे गायक अर्जुनसा नाकोड यांचे पं.वाडिकर हे शिष्य आहेत. नाशिकचे तबलावादक नितीन वारे हे त्यांना तबल्यावर, उमेश पुरोहित हे त्यांना संवादिनीवर, दिगंबर सोनवणे हे पखवाजवर तर अमित भालेराव हे त्यांना तालवाद्यावर साथ संगत करणार आहेत.



विवेक पाटणकर यांना संस्कृती पुरस्कार

नाशिकच्या सांस्कृतिक वर्तुळात विशेष योगदान देणाऱ्या दिग्गजांनाही पाडव्याच्या या मैफलीत गौरविण्यात येते. यंदा नाशिक संस्कृतीच्या वतीने देण्यात येणारा 'संस्कृती' हा पुरस्कार विख्यात वास्तू विशारद व ज्येष्ठ रंगकर्मी विवेक पाटणकर यांना देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शाहू खैरे यांनी दिली. मैफलीनंतर पिंपळ पारावर यंदाच्या सिंहस्थातील निवडक क्षणचित्रांचे प्रदर्शनही मांडण्यात येणार आहे. या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमिका टेक्निकली बांधता आली पाहिजे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भूमिका अधिक प्रभावी व सहज होण्यासाठी ती टेक्नीकली बांधून ठेवता आली पाहिजे हे श्रीराम लागूंच्या जीवनातील तत्त्वानी मोठी मदत केली. सुरुवातीला भूमिका टेक्निकली बांधणे म्हणजे काय याचा अर्थ समजत नव्हता. मात्र, चारचौघी नाटक साकारताना याचा अर्थ कळला आणि पुढे त्याचा फायदा झाला, असे उत्तर ज्येष्ठ अभिनेत्री दीपा लागू यांनी दिले.

कुसुमाग्रज स्मारकात दीपा लागू यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुलाखतकार आशा साठे यांनी विचारलेल्या अभिनयात उत्स्फूर्तता कशी आली? या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. सत्यजित दुबे यांच्या दिग्दर्शनामुळे अभिनयाला एक नवी दिशा मिळाली. ते दिग्दर्शित करीत असलेल्या 'आधे-अधुरे' या नाटकात मला भूमिका मिळाली आणि तेव्हापासून कमिटमेंट पाळणंही शिकता आलं. पहिल्याच नाटकाच्या वेळी त्यांनी नाटक तुझा श्वास असला पाहिजे, अशी शिकवण दिले. त्यामुळे कामात प्रामाणिकपणा आपोआपच भिनला. या नाटकामुळेच श्रीराम लागूंसोबत ओळख झाल्याचे त्यांनी सांगितले. नाट्यक्षेत्रात मानाचे मानले जाणाऱ्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकण्यास गेल्याचा अभाव कधीही जाणवला नाही, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. लागू यांनी अभिनय क्षेत्रातील आयुष्याबरोबरच वैयक्तिक क्षेत्रातील अनुभवही मांडले.

'सृजनसेतू' या दिवाळी अंकाचे प्रकाशन दीपा लागू, नाटककार, लेखिका आशा साठे यांच्या हस्ते झाले. सृजनशीलता व माणूस यांच्यात नातं निर्माण करण्याच्या हेतूने सेतू क्रिएशन्सतर्फे हा दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आल्याचे संपादिका सीमा भानू यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. वंदना बोकिल, तर स्वागत लोकेश शेवडे यांनी केले. जयश्री बोकिले यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंद्रप्रस्थात भरले ‘सृजन साधना’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महानगरपालिका व अश्विनी देशपांडे यांच्या संयुक्त विद्यमाने 'सृजन साधना' या हस्तकला व कलाकुसरीच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उदघाटन शुक्रवारी महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंना तसेच व्यावसायिक म्हणून विकसित होऊ पाहत असलेल्या महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

गृहसजावटीच्या वस्तू, खाद्यपदार्थ, पर्सेस, ज्वेलरी, फोटो फ्रेम्स, कॅण्डल्स, हस्तकलेच्या वस्तू आदींचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आल्या आहेत. तसेच दिवाळीनिमित्त आवश्यक असलेल्या सर्व लहान-मोठ्या वस्तूंचा समावेशही येथे करण्यात आला आहे. ६० स्टॉल्स येथे असून दैनंदिन जीवनासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी येथे मिळतील अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे. उदघाटनाला उपमहापौर गुरुमीत बग्गा, योगिता आहेर, तानाजी जायभावे, शशी जाधव आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन ८ नोव्हेंबरपर्यंत इंद्रप्रस्थ हॉलमध्ये सुरू राहिल.

अतिशय कमी कालावधीत नियोजिलेल्या हे प्रदर्शन कौतुकास्पद आहे. येत्या ६ महिन्यांत मोठ्या स्तरावर असे प्रदर्शन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.

- अशोक मुर्तडक

महापौर

महापालिकेच्या सहकार्यामुळे प्रदर्शनाच्या आयोजनाला गती मिळाली. ही गती निश्चितच स्मार्ट सिटीच्या दिशेने

उचललेले सकारात्मक पाऊल आहे. महिलांनाही याद्वारे व्यवसायाचा आत्मविश्वास येईल, असा विश्वास

वाटतो.

- अश्विनी देशपांडे

आयोजिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांचा हल्लाबोल!

$
0
0

मराठवाड्याला पाणी देऊ नये म्हणून पालिका करणार रिटपीटीशन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला दिले जात असल्याने संतप्त झालेल्या पालिकेतील नगरसेवकांनी तत्काळ महासभा घेऊन शासनावर हल्लाबोल केला. सहा तास चाललेल्या महासभेत नगरसेवकांनी भाजप आमदारांसह सरकारचे धिंडवडे काढत, नाशिककरांना सापत्न वागणूक दिली जात असल्याच्या भावना व्यक्त केली. विसर्ग तत्काळ थांबवून पाण्याच्या फेरनियोजनासाठी हायकोर्टात रिटपिटीशन दाखल करण्याचा निर्णय शनिवारी महासभेत घेण्यात आला. दुसरीकडे पाण्याचा विसर्ग थांबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतलेल्या आमदारांची निराशा झाली आहे. 'पुढील काळात काळजी घेऊ' अशी बोळवण करीत मुख्यमंत्र्यांनी हात झटकले.

नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला सोडण्याविरोधात महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची विशेष महासभा झाली. अपेक्षेप्रमाणे सर्वपक्षीय नगरसेवकांनी भाजप आमदार व राज्य सरकारवर हल्लाबोल केला. तर अवसान गळालेल्या भाजप नगरसेवकांनी पाणी आंदोलनात महापौरासोबत असल्याचा दावा केला. पाणी आंदोलनासाठी आमंत्रणाची वाट पाहणाऱ्या आमदारांना सर्वपक्षीय नगरसेवकांनी झोडपून काढले.

३९ नगरसेवकांनी या प्रश्नावर संतप्त भावना व्यक्त करत, नाशिकच्या पाण्यासाठी काहीही करण्याची तयारी दर्शवली. पालकमंत्री गिरीश महाजन कुंभकर्ण असल्यापासून ते मराठवाड्यातील ब‌ियर व बिसलरीचे उद्योग पोसण्यासाठी हक्काचे पाणी पळवून नेले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. जपानच्या उद्योगाची भरभराट करण्यासाठी नाशिकचे दोन हजार कोटीचे नुकसान होणार असल्याचा दावा नगरसेवकांनी केला. तर सभागृहात सरकारविरोधात फलक झळकवण्यात आले. महापौरांनीही सरकार आमच्याशी पक्षपातीपणे वागत असल्याचा आरोप केला. दरम्यान आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, दीपिका चव्हाण यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र पाणी थांबवता येणार नसल्याचे सांगत 'भविष्यात काळजी घेऊ' अशी बोळवण केली.

प्राधिकरणावर दबाव की सावध पवित्रा?

मराठवाड्याला नाशिक आणि नगरमधून पाणी सोडण्यासंदर्भातील याचिकेवरील निकाल महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शनिवारीही जाहीर केला नाही. त्यामुळे प्राधिकरणावर निर्णय देण्यास दबाव आहे की प्राधिकरणाचा हा सावध पवित्रा, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

जायकवाडीला पाणी देण्याबाबत नाशिक आणि नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला आहे. याद्वारेच मुंबई उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल झाली. तसेच, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडेही याचिका दाखल करण्यात आली. प्राधिकरणाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे गुरुवारी ऐकून घेतले. निकाल शुक्रवारी देण्याचे प्राधिकरणाने जाहीर केले. मात्र, शुक्रवारीही तो जाहीर न झाल्याने शनिवारी निकाल जाहीर होईल, असे सांगितले जात होते. मात्र, शनिवारीही पुन्हा तोच प्रकार घडला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उच्च न्यायालयातील सुनावणी १७ डिसेंबरऐवजी १८ नोव्हेंबरला होणार आहे. या सुनावणीचाच धसका प्राधिकरणाने घेतला आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. न्यायालयाच्या कचाट्यात सापडू नये, यासाठीच सावध पवित्रा घेऊन निकाल जाहीर करण्यावर प्राधिकरणाचा भर असल्याचे समजते.


संकट नव्हे; सुलतानी आक्रमण

उपमहापौर गुरूमित बग्गा यांनी आक्रमक भाषण करत 'समान पाणीवाटपाचे धोरण हे संकट नसून आपल्यावरील सुलतानी आक्रमण आहे. यामुळे आत्महत्या नव्हे; तर हत्या होतील अशी स्थिती निर्माण होईल. नाशिककरांचा हिसका दाखविण्याची वेळ आली आहे. सरकाचा उद्दामपणा काढून घेण्याची क्षमता ही नाशिककरांमध्ये आहे.' ज्वालामुखीच्या उद्रेकाची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा बग्गा यांनी भाजप आमदारांसह सरकारला दिला.


आठ दिवस पाणीकपात रद्द

एकीकडे पाणी पळवून नेण्यावरून सभागृहात महाभारत रंगले असताना, महापौरांनी दिवाळीनिम‌ित्त आठ दिवस पाणीकपात तात्पुरती रद्द केली आहे. पाण्याचा अंदाज लक्षात घेऊन नागरिकांना दिवाळीत त्रास होऊ नये म्हणून अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यामुळे दिवाळीत नाशिककरांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मविप्रमध्ये आता पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस भरतीसारख्या संधींमध्ये शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही योग्य संख्येने स्थान मिळावे, यासाठी मविप्रमध्ये पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. 'ना नफा, ना तोटा' तत्वावर ते केटीएचएम कॉलेजमध्ये सुरू होणार आहे. नंतरच्या टप्प्यात तालुका स्तरावर हे केंद्र सुरू होणार आहे.

विद्यार्थ्यांना वर्षभर लेखी व मैदानी अशा दोन्हीही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येईल. पुरूषांसाठी १०० मीटर धावणे, गोळा फेक, लांब उडी, पूल अप्स, १६०० मीटर धावणे महिलांसाठी १०० मीटर धावणे, गोळा फेक, लांब उडी, ८०० मीटर धावणे या सरावाचा समावेश असेल. लेखी चाचणीसाठी अंक गणित, मराठी व्याकरण, बुध्दीमत्ता, सामान्य ज्ञान याबरोबरच इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यघटना, ग्राम प्रशासन, अर्थशास्त्र, समाज सुधारक, संगणक आदी विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. विद्यार्थ्यांना अद्यावत मैदान, उच्च प्रतीची साधनसामुग्री, तज्ज्ञ मार्गदर्शक, योगा प्रशिक्षण, आहार तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंद्रप्रस्थात भरले 'सृजन साधना'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महानगरपालिका व अश्विनी देशपांडे यांच्या संयुक्त विद्यमाने 'सृजन साधना' या हस्तकला व कलाकुसरीच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उदघाटन शुक्रवारी महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंना तसेच व्यावसायिक म्हणून विकसित होऊ पाहत असलेल्या महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

गृहसजावटीच्या वस्तू, खाद्यपदार्थ, पर्सेस, ज्वेलरी, फोटो फ्रेम्स, कॅण्डल्स, हस्तकलेच्या वस्तू आदींचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आल्या आहेत. तसेच दिवाळीनिमित्त आवश्यक असलेल्या सर्व लहान-मोठ्या वस्तूंचा समावेशही येथे करण्यात आला आहे. ६० स्टॉल्स येथे असून दैनंदिन जीवनासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी येथे मिळतील अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे. उदघाटनाला उपमहापौर गुरुमीत बग्गा, योगिता आहेर, तानाजी जायभावे, शशी जाधव आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन ८ नोव्हेंबरपर्यंत इंद्रप्रस्थ हॉलमध्ये सुरू राहिल.

अतिशय कमी कालावधीत नियोजिलेल्या हे प्रदर्शन कौतुकास्पद आहे. येत्या ६ महिन्यांत मोठ्या स्तरावर असे प्रदर्शन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.

- अशोक मुर्तडक

महापौर

महापालिकेच्या सहकार्यामुळे प्रदर्शनाच्या आयोजनाला गती मिळाली. ही गती निश्चितच स्मार्ट सिटीच्या दिशेने

उचललेले सकारात्मक पाऊल आहे. महिलांनाही याद्वारे व्यवसायाचा आत्मविश्वास येईल, असा विश्वास

वाटतो.

- अश्विनी देशपांडे

आयोजिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोखा प्रदूषण; अन्यथा भरा दंड!

$
0
0

bhavesh.brahmankar@timesgroup.com

नाशिक : प्रदूषण करणारेच आता यापुढे दोषी ठरणार असून, त्यासाठीची तजवीज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) केली आहे. ग्रीन ट्रिब्यूनलच्या निर्देशानुसार एमपीसीबीने पर्यावरण कायद्याच्या अंमलबजावणीसाठीचा कृती आराखडा प्रसिद्ध केला आहे. त्यात 'पोल्यूटर टू पे' याच तत्त्वाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे.

हवा, पाणी आणि जमीन यांच्या प्रदूषणाचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. त्या तुलनेत प्रदूषण रोखण्याच्‍या उपाययोजना कमी पडत आहेत. त्यामुळेच कोर्टात याचिका दाखल होण्यासह विविध प्रकारच्या अपर्यावरणीय प्रकारांबाबतच्या सुनावणीही वाढत आहेत. विविध प्रकारचे पर्यावरणीय कायदे अस्तित्वात असले तरी त्याचा कुठलाही परिणाम प्रदूषण रोखणे किंवा बंद करण्यावर होत नसल्याची बाब पुण्यातील ग्रीन ट्रिब्यूनलच्या निदर्शनास आली.

त्यामुळेच पर्यावरण कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भातील सर्वंकष धोरण (एन्फोर्समेंट पॉलिसी) तयार करावे, असे निर्देश ट्रिब्यूनलने गेल्या वर्षी एमपीसीबीला दिले. त्यानुसार एमपीसीबीने या धोरणाचा मसुदा तयार केला आहे. एमपीसीबीच्या वेबसाइटवर हा मसुदा सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यात पोल्यूटर टू पे अर्थात प्रदूषण करणारेच भरणार दंड या तत्त्वावर अधिक भर देण्यात आला आहे. या तत्त्वानुसार प्रदूषण करणाऱ्यास दंड, नोटीस किंवा अन्य इतर कारवाईला सामोरे जावे लागेल.

प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना नोटीस बजावण्यासह विविध प्रकारची कारवाई केली जाते. तसेच, परवान्यांचे नूतनीकरणही करताना फारशी काळजी घेतली जात नाही. म्हणूनच येत्या काळात ही सारीच प्रक्रिया पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक कडक केली जाणार आहे. त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांकडून होणाऱ्या प्रदूषणापोटी कारवाई करण्यातही अडचणी येतात. मात्र, नवीन मसुद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांवर कडक कारवाई होणार आहे. तसेच, बँक गॅरंटीसंदर्भातील अनेक नियम कडक होतानाच एमपीसीबीकडून दिल्या जाणाऱ्या संमतीपत्राचे (कन्सेन्ट) निकषही वाढणार असल्याचे मसुद्यात नमूद आहे.

पर्यावरण कायद्याच्या अंमलबजावणीचे धोरणाचा मसुदा आम्ही तयार केला आहे. हा मसुदा http://mpcb.gov.in/legal/legal.php या लिंकवर सर्वांसाठी उपलब्ध आहे. नागरिकांच्या काही सूचना किंवा हरकती असतील तर त्यांनी त्या आवर्जून द्यावात.

- पी. अनबलगन,

सदस्य सचिव, एमपीसीबी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठमोळ्या अजिंक्यची अॅपलसोबत भरारी!

$
0
0

वय अवघे २० वर्षाचे; वेतन २ कोटी रूपये!

अरविंद जाधव, नाशिक

वड‌िलांचे चप्पलांचे दुकान. घरात कम्प्युटरचा अर्थाअर्थी संबंध नाही. मात्र, असे असताना अजिंक्य शिवाजी लोहकरे या विद्यार्थ्याने फिनिक्स भरारी घेत थेट जगभरातील विख्यात कंपन्यांना आपल्या दारात उभे केले. त्यातील अॅपलने त्याला वार्षिक २ कोटी रूपये पॅकेज देण्याचे मान्य केले असून, याच महिन्यात तो कंपनीसोबत आपले काम सुरु करणार आहे.

कम्प्युटर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणारा अंजिक्य मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे राहणारा. १२ वीपर्यंत तेथेच शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंजिनीअरिंगसाठी तो नाशिकमधील भुजबळ नॉलेज सिटी कॉलेजमध्ये दाखल झाला. घरात कम्प्युटरबाबत तसे कोणतेही वातावरण नव्हते. त्यामुळे इंजिनीअरिंग कॉलेजला प्रवेश करेपर्यंत कम्प्युटर किंवा लॅपटॉप तेवढ्या विश्वासाने चालवता येत नव्हते, असे अजिंक्यने सांगितले. मात्र, हार्डवेअर, सॉफ्टवेअर किंवा विविध अॅप्ल‌िकेशन यात हळूहळू रस निर्माण झाला. त्यातूनच मग अजिंक्यने 'एजेबूक' हे एक सॉफ्टवेअर आणि अॅप्लिकेशन तयार केले. इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात असताना तयार केलेल्या या अॅप्लिकेशनबाबत त्याने काही दिग्गज कंपन्यांना माहिती दिली. व्हॉटसअॅप किंवा फेसबुकला टक्कर देण्याची क्षमता असलेल्या या सॉफ्टवेअरची दखल खुद्द फेसबुकने घेतली. त्यानंतर विप्रो, इन्फोसिस आदी कंपन्यांनी त्याच्याशी बोलणी सुरू केली. मात्र, अजिंक्यने थांबून घेण्याचा निर्णय घेतला. फेसबुकने त्याला १ कोटी ६७ लाख रूपयांची ऑफर दिली होती. शेवटी अजिंक्यला २ कोटी रुपये वार्षिक पॅकेज व इतर सवलती देत अॅपलने जवळ केले. २४ नोव्हेंबरपासून अजिंक्य पुणे येथील कार्यालयात रुजू होणार आहे. शिक्षणात खंड पडू नये म्हणून तो बाहेरुन आपले तिसऱ्या वर्षाची तयारी देखील करीत आहे.


अजिंक्यचे 'एजेबुक'

व्हॉटसअॅपमध्ये फक्त १०० एमबीपर्यंत डाटाशेअरिंग करता येते. मात्र, एजेबुकमध्ये २ जीबीपर्यंत डाटा शेअरिंग होऊ शकतो. ​विशेष म्हणजे यात इंटरनेट कनेक्शन हवेच असे नाही. इंटरनेट नसताना साडेतीन किलोमीटरपर्यंतच्या अंतरात दोन डिव्हाईस कनेक्ट होऊन डाटा शेअरिंग होऊ शकते. एखादा मॅसेज फॉरवर्ड करताना तो प्रत्येक वेळेस फॉरवर्ड करावा लागतो. तेच एजेबुकमध्ये सर्वांना एकादच फॉरवर्ड करण्याची सुविधा आहे. फेसबुक किंवा व्हॉटस अॅप मॅसेजशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीने यात फिचर उपलब्ध असून २०१६ मध्ये हे कार्यन्वित होऊ शकते.

अशा प्रकारचे अॅप बनवणारा पहिलाच विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो.

- अजिंक्य लोहकरे, इंजिनीअर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पं. वाडिकरांच्या स्वरांनी उजळणार पिंपळपार

$
0
0

संस्कृती नाशिकतर्फे हिंदुस्थानी क्लासिकलची मेजवानी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सलग दोन दशकांपासून शहरात दिग्गज गायकांना निमंत्रित करीत भारतीय शास्त्रीय संगीताचा नंदादीपतेवत ठेवणाऱ्या संस्कृती नाशिक या संस्थेने यंदाही पाडवा पहाटेचे निमित्त साधत रसिकांसाठी पं. कृष्णेंद्र वाडीकर यांची गायन पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. गुरूवारी (दि.१२) पहाटे ५ वाजता ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात दीपप्रज्ज्वलन करून पाडवा पहाटेच्या किनारीला पं. वाडिकरांचे सोनेरी स्वर स्वर्ण झळाळी आणणार आहेत.

नेहरू चौकातील पिंपळपारावरील पाडवा पहाटेचे यंदा अठरावे वर्ष आहे. यंदाच्या गायन सोहळ्यात संस्कृती नाशिकने धारवाड येथील पं.कृष्णेंद्र वाडिकर यांना निमंत्रित केले आहे. पं. वाडिकर किराणा घराण्याचे गायक असून, हिंदुस्थानी क्लासिकल गायनातील नैपुण्यासाठी ते विख्यात आहेत. क्लासिकल संगीतातील ठुमरी, संत वाणी, नाट्य संगीत, दास वाणी या गायन प्रकारांसाठीही त्यांची विशेष ओळख आहे. ग्वाल्हेर घराण्याचे गायक अर्जुनसा नाकोड यांचे पं.वाडिकर हे शिष्य आहेत. नाशिकचे तबलावादक नितीन वारे हे त्यांना तबल्यावर, उमेश पुरोहित हे त्यांना संवादिनीवर, दिगंबर सोनवणे हे पखवाजवर तर अमित भालेराव हे त्यांना तालवाद्यावर साथ संगत करणार आहेत.


विवेक पाटणकर यांना संस्कृती पुरस्कार

नाशिकच्या सांस्कृतिक वर्तुळात विशेष योगदान देणाऱ्या दिग्गजांनाही पाडव्याच्या या मैफलीत गौरविण्यात येते. यंदा नाशिक संस्कृतीच्या वतीने देण्यात येणारा 'संस्कृती' हा पुरस्कार विख्यात वास्तू विशारद व ज्येष्ठ रंगकर्मी विवेक पाटणकर यांना देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शाहू खैरे यांनी दिली. मैफलीनंतर पिंपळ पारावर यंदाच्या सिंहस्थातील निवडक क्षणचित्रांचे प्रदर्शनही मांडण्यात येणार आहे. या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images