Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

धात्रक फाटा येथे प्राणघातक हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धात्रक फाटा येथे युवकावर गोळीबार करून फरार झालेले आरोपींचा कोणताही माग लागलेला नसताना रविवारी पहाटे अज्ञात आरोपींनी याच परिसरातील राज आनंद मंगल कार्यालयामागे असलेल्या रो हाऊसमध्ये राहणाऱ्या अविनाश कृष्णराव सवई (वय ४२) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.

गंभीर जखमी असलेल्या सवई यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पोलिस तपास थंडावला आहे. सवई रात्रीच्या सुमारास घराबाहेर का पडले याचेच उत्तर पोलिसांना अद्याप मिळालेले नाही. हाणामारी झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी औरंगाबाद येथे राहणाऱ्या रमेश कृष्णराव सवई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणीस मारहाण

कौटुंबीक कारणावरून एका तरुणीचे अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये विवाहितेसह सहा संशयितांविरोधात अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत गडकरी चौक परिसरात राहणाऱ्या तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शताब्दी हॉस्पिटलच्या आवारातून संशयित सविता छगन विधाते आणि प्रशांत यांनी कौटुंबीक कारणावरून बेदम मारहाण केली. तसेच, संशयितांनी तिचे दुचाकीवरून अपहरण करीत गोविंदनगर परिसरातील अनमोल शिल्प अपार्टमेंट नेले. संशयित सविताच्या घरच्यांनीदेखील सोनलला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली.

भिंत मालकांवर गुन्हा

घराची भिंत कोसळून जखमी झालेल्या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिसांनी काझीगढी येथील घरमालकावर गुन्हा दाखल केला आहे. अशा पध्दतीचा गुन्हा प्रथमच दाखल झाला असून, यामुळे जुन्या घरांमध्ये किंवा वाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.

गेल्या महिन्यात जुन्या घराची भिंत कोसळून एक महिला जखमी झाली होती. या प्रकरणी सतरा दिवसांनंतर महिलेने भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये संबंधित घरमालकाविरोधात तक्रार दाखल केली. २० ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास काझीगढी, कुंभारवाडा येथे राहणाऱ्या कुसुमबाई सोमनाथ वासनकर (वय ५०) या थकवा लागल्याने काझीची गढी येथील घर क्रमांक १५१६ च्या पायरीवर बसल्या होत्या. त्याचवेळी अचानक घराची ‌भिंत त्यांच्या अंगावर कोसळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. या प्रकरणी सविता सुदाम उखाडे (कुंभारवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी घर नंबर १५१६ आणि १५१७ क्रमाकांच्या घराच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आठ लाखाची चोरी

सातपूर परिसरातील पवन ठाकूरदास चांदवाणी यांची बाबासाई बेकरीचे छत उचकटून चोरट्याने सुमारे आठ लाखांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास बेकरीच्या छताचा पत्रा उचकटून आणि पीओपी सिलिंग तोडून बेकरीत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने बेकरीच्या कार्यालयातील लॉकर तोडून तेथून ७ लाख ९५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


९० पेशंटची मधुमेह तपासणी

$
0
0



नाशिक : जागतिक मधुमेह दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. मृणालिनी केळकर व मधुमेह स्वास्थ संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने केळकर हॉस्पिटल येथे शनिवारी मधुमेह तपासणी आणि प्रबोधन शिबिर आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ९० पेशंटची तपासणी करण्यात आली.

दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक : वेगात असलेली दुचाकी डिव्हायडरला धडकून सातपूर परिसरातील कामगारनगर येथील रहिवाशी दिनेश धर्माजी आहिरे (वय ३०) याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री एक वाजेच्या सुमारास मायकोसर्कलजवळील वेद मंदिरासमोर घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली.

घरफोडी करणारा अटकेत

नाशिक : दिंडोरीरोडवरील पोकार कॉलनीत घरफोडी करून एक लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या संशयित बाळू राजाराम प्रधान (वय २३) या युवकास पोलिसांनी अटक केली. मखमलाबाद परिसरातील इरिगेशन कॉलनीत राहणाऱ्या प्रधानने चंद्रशेखर गायकवाड यांचे घर फोडून चोरी केली होती.

संशयित चोरटा ताब्यात

नाशिक : घरफोडी करण्याच्या इराद्याने अंधारात लपून बसलेल्या संशयितास भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले. सोहेल मोईनोद्दीन शेख (वय १९) असे या संशयिताचे नाव असून, पंचशीलनगर येथे राहतो. पिंपळ चौक परिसरात शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास अंधारात लपून बसलेला असताना पोलिसांनी त्याला पकडले.

अदखलपात्र गुन्हा

नाशिक : मनपा प्रशासनाची पूर्व परवानगी न घेता भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक लावल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये मुंबई नाका येथील युवक मित्र मंडळाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. अंकुष म्हसुजी आंबेकर यांनी या प्रकरणी भद्रकाली पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडमध्ये विकासकामांची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठवाड्याला सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबतच्या लढ्यात आक्रमक भूमिका बजावणारे आमदार अनिल कदम निफाड तालुकावासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात किमान पहिल्या वर्षात तरी अपयशी ठरल्याचे दिसते. तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय असून, ग्रामीण रुग्णालयासारखी वर्षानुवर्षे रेंगाळलेली कामेही पूर्णत्वाकडे गेलेली नाहीत. अनेक कामे प्रस्तावित असली तरी ती पूर्ण होण्यासाठी मतदारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बागायतदारांचा तालुका असा निफाडचा लौकीक आहे. काळी माती, कसदार जमिनी यामुळे येथे सुपीकता नांदते. मात्र, हाच शेतकरी यंदा अवकाळी, गारपीट यासारख्या अस्मामानी संकटांमुळे उद्ध्वस्त झाला. मुबलक पाण्याचा अभाव, रस्त्यांची दुरवस्था अशा तालुकावासीयांच्या प्रमुख समस्या आहेत. काही कामांना मंजुरी मिळाली असून, प्रस्तावित कामांची मोठी यादी आहे. ही कामे मार्गी लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असल्याचा दावा कदम यांनी केला.

निफाड तसेच, ओझर महामार्गावर अद्ययावत बसस्थानक उभारण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येकी एक कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमाकेअर सेंटर उभारणीत जागेची अडचण होती. ती दूर झाली असून, हे कामही लवकर मार्गी लागेल, असा विश्वास आहे. निफाडमध्ये मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या काम मार्गी लागावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. सुमारे १८ कोटींचा खर्च त्यास अपेक्षित असून, सचिव समितीची मान्यताही प्राप्त झाली आहे. तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला होता. येथे सिन्नर, वन्यजीव आणि नाशिक पूर्व अशा वनखात्याशी संबंधित तीन कार्यालयांशी समन्वय साधावा लागतो. एकच विभागीय कार्यालय असावे यासाठी पाठपुरावा सुरू असून, हे कामही अंतिम टप्प्यात आहे. गावागावांत अंधारामुळे बिबट्यांचे फावते. म्हणूनच गावोगावी हायमास्टचे दिवे बसविण्यावर भर दिला असून, जिल्हा नियोजन समितीकडे तसा प्रस्तावही देण्यात आला आहे. ओझर येथे तरण तलावाची उभारणी, ग्रामीण भागात रस्ते बनविण्याचे प्रस्तावही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक होत नसल्याने कामे मंजुरीला अडथळे निर्माण होत आहेत.

शेतकऱ्यांची पाण्याअभावी गैरसोय होऊ नये, यासाठी गावोगावी छोटे बंधारे उभारणीवरच भर दिला जात आहे. पाणीवाटपाचा मुद्दा निकाली निघावा, यासाठी पाणीवापर संघ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तालुकावासी तसेच, जवळपासच्या वाहनधारकांना पिंपळगाव बसवंतचा टोल परवडत नाही. अशा वाहनधारकांसाठी पाचोरे ते आहेरगाव, आहेरगाव ते लोणवाडी, लोणवाडी ते कारसूळ असा पर्यायी रस्ता बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दारणा-गोदावरी संगमावर रस्ता करून निफाड आणि सिन्नर तालुक्याला जोडावयाचे आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्यांचे बरेचसे अंतर वाचू शकेल. निफाड साखर कारखाना किंवा परिसरात छोटा कारखाना कार्यान्वित करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. ओझर, पिंपळगावला अजूनही ग्रामपंचायत असून, परिणामी विकासाला मर्यादा येत आहेत. या ठिकाणांच्या नेटक्या विकासासाठी नगरपंचायत होणे आवश्यक असून, सर्वांच्या एकविचारानेच त्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. निफाड शहरासाठी पाणीपुरवठा योजना, ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी स्वतंत्र निधी मिळण्यासाठीही पाठपुरावा सुरू आहे. या कामांना मंजुरीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापसाचे आंदोलन ही माझी चूक!

$
0
0

विजय पाठक, जळगाव

भाजपने कापसाला सात हजारांचा भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांना भडकवण्याचे योजनाबद्ध काम केले. त्यात भाजपचे तत्कालीन आमदार आणि आजचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी २०१२ मध्ये दहा दिवस उपोषण केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांशी शनिवारी औपचारिक बोलताना कापसाचा विषय निघाल्यानंतर आपण केलेले कापसाचे आंदोलन ही चूकच होती, असे प्रांजळपणे महाजन यांनी मान्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था वाढती महागाई, डाळींचे चढते भाव याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उपोषणस्थळी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी महाजनांच्या स्वभावानुसार राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत गप्पा रंगल्या.

तुमच्या मागण्या काय आहेत, असे महाजनांनी विचारता जिल्ह्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, डाळींचे चढते भाव, मिळणारे निकृष्ट दर्जाचे धान्य याबाबत चर्चा झाली. नंतर चर्चा कापसाकडे वळली. जामनेरचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी, 'भाऊ, कापसाचे काय विचारता? कापसावर बोलू नका' म्हणून गिरीश महाजनांनी सांगितले. यावर तुम्ही तर दहा दिवस कापसाला सात हजाराचा भाव मिळावा म्हणून उपोषण केले होते, याची पाटलांनी आठवण करून देता, 'हो, ते उपोषण केले चूक झाली.. फसलो!' अशी प्रामाणिक कबुली देऊन टाकत हा विषय अधिक वाढत असता शरद पाटील यांना यावर आपण जामनेरमध्ये बोलू म्हणत संपवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...म्हणून मराठवाड्याला पाणी सोडले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'नाशिक व नगर जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्याला जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सदस्य एस. व्ही. सोडल हेच कारणीभूत आहेत. सोडल यांच्या अट्टाहासापुढे राज्य सरकारही हतबल होते,' असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी केला आहे. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने केवळ पिण्यासाठीच पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतरही प्राधिकरणाने पुनर्विचार याचिकेवर निर्णय दिले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा असे सांगत अतिरिक्त पाणी कोणासाठी दिले, असा सवाल त्यांनी केला आहे.

शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी पाण्याच्या राजकारणावरून सरकारवर टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही त्याचे गांभीर्य शासन व प्राधिकरणाला समजले नाही. पिण्यासाठीच पाणी सोडा असे सांगीतले. मात्र सोडल यांचा हट्ट पानी सोडण्यावर कायम होता. त्यांचा हा हट्ट राज्य सरकारने सुद्धा पुरविला. नाशिक व नगरमधून पुनर्विचार याचिका दाखल झाल्या. मात्र त्यावर निर्णयच झाले नाहीत. त्यामुळे हे अतिरिक्त पाणी कोणासाठी सोडले गेले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'पिण्याच्या पाण्याला आमचा विरोध नाही, मात्र या दोन जिल्ह्यातही चांगली स्थिती नाही. शासनाने यात पुढाकार घेऊन उर्वरीत पानी थांबवायला हवे होते. मात्र सोडल यांच्या हट्टापुढे शासनही हतबल झाले होते. त्यामुळे प्राधिकरणातच अनागोंदी असल्याची टिका त्यांनी केली.

समान पाणी वाटपाचा कायदा हा एका वेगळ्या उद्देशासाठी होता. जागतिक बँकेच्या कर्जासाठी ही अट असल्याने रात्रीतून हा कायदा केला. मात्र तो आता कालबाह्य झाला आहे. त्याचा आता वेगळाच अर्थ लावला जात आहे. या संदर्भात आता १७ नोव्हेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्यात ही वस्तुस्थिती मांडली जाणार असल्याचे त्यांनी सांग‌तिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थगिती आमदार बाळासाहेब सानप

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नरेंद्र मोदींच्या लाटेवर विजयाची माळ गळ्यात पडलेल्या नाशिक पश्चिमचे आमदार बाळासाहेब सानप यांची वर्षभरातील कारकिर्द ही निराशाजनक आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांची जवळीक व पदरात पाडून घेतलेला समितीचा लालदिवा या कामगिरीपलीकडे मतदारसंघातील प्रश्न व समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. दर्शनही दुर्लभ झाल्याने त्यांच्याविषयी मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे. वर्षभरात त्यांनी विकास कामांऐवजी शहरातील विकासकामांना स्थगितीसाठी प्रयत्न केल्याने नाशिकमध्ये स्थगिती आमदार अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे.

नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे आणि तपोवनातील मोदींच्या एका सभेमुळे एका रात्रीत बाळासाहेब सानप यांचे भविष्य बदलले. नगरसेवकपदासोबतच आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडाली. तब्बल ४६ हजार ३७४ अशा भरघोस मतांनी मतदारांनी त्यांना निवडून दिले. सर्वाधिक जास्त मते त्यांना मिळाल्याने नागरिकांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. नगरसेवक व आमदार पद अशी दुहेरी जबाबदारी त्यांच्यावर जनतेने टाकली. मात्र, वर्षभरातील त्यांची कामगिरी ही समाधानकारक नाही. दोन्ही पदाला ते न्याय देत नसल्याची मतदारांची ओरड आहे. प्रभागातील विकासकामांसाठी ते प्रभागातच काय महापालिकेतही फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात मतदारांमध्येच असंतोष आहे. तसेच, महाराष्ट्र विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदाचा लालदिवा त्यांच्याकडे आहे.

गेल्या वर्षभरात सानप यांची कारकिर्द ही वादग्रस्त राहिली आहे. पोलिसाच्या मदतीने हॉटेलवर छापा मारण्याचे प्रकरण त्यांच्या चांगलेच अंगलट आले होते. वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला असला तरी, तो मिटवताना त्यांना नाकीनव आले होते. या सोबतच शहर विकासाच्या कामांना स्थगिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर विरोधकांकडून केला जात आहे. शिक्षण समिती असो व शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारा मुकणे पाणीपुरवठा योजनेला स्थगिती देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांनी टीका ओढवून घेतली. विकासकामांऐवजी स्थगिती आमदार अशी त्यांची प्रतिमा तयारी झाली. तसेच, सिंहस्थादरम्यान साधू-महंताचा कोपही त्यांनी ओढवून घेतला. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी त्यांच्यावर जाहीर टीकास्र सोडले होते. ग्यानदासांवर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या साध्वी त्रिकालभंवता यांना आश्रय दिल्यामुळे त्यांच्यावर त्या काळी चांगलीच टीका झाली होती. नाशिकचे पाणी मराठवाड्याला जात असताना त्यांनी कोणतीच भूमिका घेतली नसल्याने ग्रामीण मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे. दरम्यान, वर्षभरात केलेल्या विकासकामांसंदर्भात आमदार सानप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिनी वस्तूंमुळे कुंभारांचे हाल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, भुसावळ

जागतिकीकरणामुळे व्यवसायांमध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. याचाच परिपाक म्हणून कुंभार व्यवसाय धोक्यात आला असून, त्यांचे दिवाळे निघण्याची वेळ आली आहे.

दिवाळी आली म्हणजे कुंभारांची दोन महिने अगोदरपासून कामाची प्रचंड लगबग सुरू होते. पणत्या बनविणे, महालक्ष्मीच्या मूर्ती बनविणे, धुपाटणे तसेच लहान मुलींसाठी मातीची खेळणी तयार करणे यासाठी ही लगबग असते. परंतु या दिवाळीत चायनाच्या पणत्या, चिनीमातीच्या पणत्या, लायटिंग असलेल्या पणत्या यामुळे मातीच्या पणत्यांकडे दुर्लक्ष झालेले आहे. मातीच्या पणत्या पंधरा रुपये डझन असूनही ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. यापेक्षा चिनी मातीच्या पणत्या किंचीत स्वस्त आहेत. महालक्ष्मीच्या मूर्ती मातीच्या ऐवजी पीओपीच्या आल्याने त्या अधिक सुबक दिसत आहेत. यामुळे ग्राहकांनी मातीच्या महालक्ष्मी खरेदी करण्यास उदासीनता दाखविली आहे. याचा परिणार कुंभार व्यवसायावर झाला आहे. यामुळे देशोधडीला लागण्याची वेळ त्यांच्यावर आली असून, नवीन व्यवसाय शोधण्याची वेळ आली आहे.

सद्यस्थितीला मातीची खेळणी बाद झाली असून प्लास्टिकची खेळणी स्वस्त व टिकाऊ असल्याने लोकप्रिय होऊ लागलीत. याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचे जारही वापरू लागल्याने हा व्यवसाय वाढला आहे. परंतु या सर्वांचा फटका पूर्णपणे कुंभारी व्यवसायावर पडला आहे. त्यांच्या मटक्यांची खरेदी थांबली. यामुळे कुभांरांकडे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून मातीचे मटके पडून आहेत. मातीच्या कुड्यांऐवजी प्लास्टिकच्या कुंड्या वापरात आल्याने मातीच्या कुंड्याही विकणे कुंभारांना मुश्किल झाले आहे. ऐन दिवाळीत कुंभारांचे दिवाळे निघण्याची वेळ आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅरिकेडवर सुकतायत कपडे

$
0
0


पवन बोरस्ते, कॉलेज क्लब रिपोर्टर

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिकप्रमाणे त्र्यंबकेश्वरमध्ये चोख पोलिस बंदोबस्त होता. त्र्यंबकेश्वरमध्ये २५ सप्टेंबर रोजी शेवटची तिसरी पर्वणी आटोपली. या पर्वणीला लाखो भाविकांनी हजेरी लावली. कुंभमेळा उलटून आता दीड महिना उलटला. कुंभमेळ्यासाठी आणलेले बॅरिकेड्स विनावापर पडून असल्याने त्याचा नागरिकांकडूनच अनोख्या पद्धतीने केला जात आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला बॅरिकेड्स ठेवलेले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील काळात कुठलाही मोठा कार्यक्रमही नसल्याने रस्त्याच्या कडेला बॅरिकेड्स कशासाठी हा प्रश्न अनेकांना पडत आहे. बॅरिकेड्समुळे पायी जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्र्यंबकेश्वर ते नाशिक या हायवेवर ठिकठिकाणी असे बॅरिकेड्स दिसून येत आहेत. जव्हारकडे जाणाऱ्या हायवेच्या बाजुलाही काही ठिकाणी बॅरिकेड्स आहेत. त्र्यंबकेश्वरमधील कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेजसमोर चार ते पाच बॅरिकेड्स पडून आहेत. काही बॅरिकेड्सचा तर चक्क वापर कपडे वाळत घालण्यासाठी वापर केला जात आहे. दिवाळीमुळे अनेकांची आवराआवर, साफसफाई सुरू आहे. त्यामुळे बॅरिकेड्स आडवे टाकून त्यावर धुतलेले डबे, भांडी व बरण्या सुकवण्यासाठी उपयोग केला जात आहे. सरकारी मालमत्ता असलेले हे बॅरिकेड्स कारण नसताना रस्त्याच्या बाजूला नेमके का पडून आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शहर पोलिसांनी आपल्या ताब्यातील बॅरिकेडस परत पाठवण्याची सुरुवात केली आहे. त्याचेच अनुकरण ग्रामीण पोलिसांनी करावे. किंबहुना हे बॅरिकेडस त्र्यंबकेश्वरसाठी राखीव असतील तर त्याची निगा ठेवण्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांनी पार पाडावी, असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भातशेतीचे नुकसान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव शिवारात भेसळीच्या व बोगस भात बियाणांमुळे भात पीक उद्ध्वस्त झाले आहे. भात बियाणे वितरक कंपनीने या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा फसवणूक केल्याच्या कारणावरून कंपनी व वितरकाच्या विरोधात न्यायालयात जाऊ, असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

कांचनगाव शिवारातील जवळपास अकरा भात उत्पादक शेतकऱ्यांनी वितरकांच्या सल्ल्यावरून प्रत्येकी दहा किलो प्रमाणातील बियाणांच्या पिशव्या खरेदी केल्या होत्या. हजारो रुपये किमतीचे बियाणे, रासायनिक खतांचा खर्च, लागवडीचा खर्च असा अवाढव्य खर्च करूनही भाताचे उत्पादन हाती आले नाही. शंभर पोते भात होणाऱ्या शेतात एक पोतेही भात पीकला नाही. भाताची सोंगणी करूनही उत्पादन मिळणार नसल्याने या शेतकऱ्यांनी अद्याप सोंगणीही केली नाही. सोंगणीचा खर्चही परवडनार नसल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभाग, ग्राहक पंचायत, लोकप्रतिनिधी यांच्याकडे दाद मागितली आहे.

माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, सोसायटी चेअरमन सुनील जाधव, काँग्रेसचे सखाराम चंद्रमोरे, बाजार समितीचे माजी संचालक केरू देवकर, धोंडू गव्हाने आदींसह संतप्त भात उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जावून भाताची पाहणी केली. राताड पीक पहावयास मिळाले. हे भात पीक सोंगणीलाही महाग झाल्याने हतबल शेतकरी डोक्याला हात लावून बसला आहे.

कांचनगाव येथील शांताराम लक्ष्मण गव्हाणे, कचरू गव्हाणे, शांताराम नथू गव्हाणे, ज्ञानेश्वर गव्हाणे, कचरू उगले, हरी गव्हाणे, मधुकर गव्हाणे, गजीराम गव्हाणे, धोंडू गव्हाणे, भरत सोनवणे, संदीप झाडे आदी शेतकऱ्यांच्या भातशेतात भेसळीच्या बियाणांमुळे एक टक्काही भाताचे पीक आले नाही. या शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभाग, पंचायत समिती, बियाणे कंपनी यांच्याकडे याबाबत तक्रारी केल्या असून, कृषी विभागाने पंचनामे केले आहेत. बियाणे कंपन्यांनी अद्यापपर्यंत अद्याप दखल घेतलेली नाही.

दरम्यान, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे कंपन्यांनी तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा वितरक व कंपन्यांच्या विरोधात तालुक्यात आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार शिवराम झोले, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांनी दिला. या प्रकाराबाबत बियाणे कंपनी, कृषी विभाग व वितरक दोषी असून, याबाबत कृषि विभागाला जाब विचारू, असा इशारा पंचायत समिती उपसभापती पांडूरंग वारुंगसे यांनी दिला.

कंपन्यांनी भेसळीचे बियाणे दिल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे दहा पोतेही भात मिळणे मुश्किल आहे. भात सोंगणीसही लायक नसल्याने खर्चात पडण्यापेक्षा भाताचे शेत पेटवावे लागणार आहे. - शांताराम गव्हाणे, भात शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'गिरणा'चे पाणी पेटणार

$
0
0


कैलास येवला, सटाणा

गिरणा धरणच्या वरच्या बाजूस असलेल्या धरणांमधून सन २०१५-१६ मध्ये समन्यायी पाणी वाटपाच्या हेतून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या दालनात होणारी सुनावणी १ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. यामुळे या सुनावणीकडे कसमादेचे लक्ष लागून आहे. दरम्यान, या बैठकीत कसमादेच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी एकमुखी विरोध दर्शविल्याने नाशिक-नगरसह गिरणा खोऱ्याचे पाणी देखील आपसूकच पेटले आहे.

सन २०१५ च्या पावसाळ्यामध्ये अपुरा पाऊस झाल्याने तापी खोऱ्यामध्ये अवर्षण प्रवण स्थिती उद्भवली. यामुळे वरील धरणांमधून पाणी सोडण्याची मागणी होऊ लागली आहे. मालेगाव, कळवण, जळगाव या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये कमी पाणीसाठा झाल्याने या शहरांना आगामी काळात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार आहे. या अनुषंगाने चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यानी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला दिलेल्या निवेदनावरून प्राधिकरणाने याचिकेत रूपांतर करून उपरोक्त विषयान्वये दि. २ नोव्हेंबर रोजी मीटिंग घेऊन तिसऱ्याच दिवशी दि. ५ रोजी सुनावणी ठेवल्याने शंका उपस्थित करण्यात आली.

गिरणा उपखोऱ्यातील लोकप्रतिनिधींना सुनावणीकरिता उपस्थित रहाण्याचे आवाहन केले होते. या अनुषंगाने या सुनावणीस राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे, मालेगाव मध्यचे आमदार आसिफ शेख, बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर, सुरगाणा-कळवणचे आमदार जे. पी. गावित, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, पारोळ्याचे आमदार डॉ. सतीश पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या सुनावणीस हरकत घेत विरोध दर्शविल्याने १ डिसेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.

दरम्यान, बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी या सुनावणीदरम्यान आपली भूमिका स्पष्ट करताना गिरणा खोरे तुटीचे खोरे असून, गत दहा वर्षात अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेती सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या गंभीर परिस्थितीत गिरणा धरणामध्ये पुनद, चणकापूर, हरणबारी व केळझर या प्रकल्पातून पाणी सोडण्यास विरोध दर्शविला आहे. हा पाणीसाठा भविष्यातील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पिण्यासाठी आरक्षित करण्याची भूमिका व्यक्त केली. चणकापूर व पुनद प्रकल्पांवर कळवण, बागलाण, मालेगाव शहरातील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. हरणबारी धरणांवर मोसम नदीवरील बागलाण व मालेगाव तालुक्यातील गावे व पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. त्यात हरणबारी धरण हे द्वाररहीत असल्याने ३५० ते ४०० घनफूट प्रतिसेंकद इतकाच विसर्ग सोडता येत असल्यामुळे या प्रकल्पातून पाणी सोडणे अशक्य असल्याचे सप्रमाण सिद्ध केले. त्यासोबतच तापी नदीवरील तीनही बॅरेजचे विनावापर वाहून जाणारे पाणी गिरणा खोऱ्यास उपसाद्वारे उपलब्ध करून देण्याचा पर्याय याचिकेद्वारे नमूद केला आहे.

दि. ३० ऑक्टोंबर रोजी होणारी पाणी आरक्षण बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली नाही. परिणामी नाशिक व जायकवाडी पाणीप्रश्न

निर्माण झाला. आज दि. ९ नोव्हेंबर रोजी होणारी बैठक पालकमंत्र्यांनी रद्द केली. यामुळे पालकमंत्री गिरीश महाजन यांना गिरणा खोऱ्यातील पाणी गिरणा डॅममध्ये सोडून घेण्याची घाई झालेली दिसत आहे. - दीपिका चव्हाण, आमदार, बागलाण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसमादेचा पाणीप्रश्न बिकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गिरणा-मोसम खोऱ्यात अत्यल्प पावसामुळे पिण्याबरोबरच सिंचनाचा प्रश्न बिकट झाला आहे. अशा परिस्थितीत चणकापूर, पुनद, केळझर व हरणाबरी या धरणांमधून गिरणा धरणात पाणी सोडण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. हा निर्णय कुठल्याही परिस्थितीत हाणून पाडला जाईल. गरज पडल्यास व्यापक जनआंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जयंत पवार यांनी दिला आहे.

यंदा पावसाने पाठ फिरवल्याने गिरणा खोऱ्याचे पाणीही पेटले आहे. जळगावसाठी गिरणा धरणात पाणी सोडण्याचा घाट घातला जात आहे. यासंदर्भात सोमवारी होणारी बैठकही पालकमंत्र्यांनी रद्द केली. यावर्षी गिरणा धरण अवघे अकरा टक्केच भरले आहे. यामुळे मालेगावसह व जळगावचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे. यामुळे चणकापूर, पुनद, हरणबारी व केळझर या धरणांमधून गिरणा धरणात पाणी सोडण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे. मात्र, या धरण क्षेत्रातील गावांचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे. अशा परि‌स्थितीत नाशिकचे पालकमंत्री व महसूलमंत्री जळगाव जिल्ह्यातील असल्याने कसमादेचे हक्काचे पाणी पळविण्याच्या विचारात आहेत. मात्र, एक थेंबही पााणी गिरणा धरणात जावू देणार नाही, अशा इशारा डॉ. पवार यांनी दिला आहे.

गिरणा व मोसम खोऱ्यातील पाणीप्रश्न बिकट होत आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे २०१६ पर्यंत नियोजन झाले आहे. अशातच चणकापूर, केझर, पुनद व हरणबारी धरणातून पाणी सोडल्यास कसमादेत पाणीटंचाईचे संकट उभे राहणार आहे. यामुळे शासनाने निर्णय घेताना कसमादेचा विचार करावा, असे डॉ. पवार यांनी सुचित केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोसले मामकोचे चेअरमन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील मामको बँक निवडणुकीत राजेंद्र भोसले व अस्मर यांच्या सहकार पॅनलने १३ जागांवर विजय मिळवित आपली सत्ता स्थापन केली. सोमवारी बँकेच्या या नवनिर्वाचित संचालक मंडळातून बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. विद्यमान चेअरमन राजेंद्र भोसले यांची फेरनिवड करण्यात आली. तर, व्हाईस चेअरमन म्हणून शंकर बागूल यांची निवड करण्यात आली.

मालेगावची अर्थावहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मामको बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत विद्यमान चेअरमन राजेंद्र भोसले प्रणित सहकार पॅनलला १३ जागांवर विजय मिळाला तर, विरोधी दशपुते-कलंत्री-गायकवाड गटाच्या आपलं पॅनलला सहा जागांवर समाधान मानावे लागले. तेरा संचालकांसह राजेंद्र भोसले यांनी आपले वर्चस्व कायम राखले.

मामको बँकेच्या मुख्य कार्यालयात दुपारी १२ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाने, बँकेचे सचिव बागड यांच्या निरीक्षणात चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवड प्रक्रिया पार पडली. सहकार पॅनलला निर्विवाद बहुमत असल्याने आणि राजेंद्र भोसले व शंकर बागुल यांच्या नावावर एकमत झालेले असल्याने त्यांची निवड निश्चित मनाली जात होती. निवडणूक प्रक्रियेनुसार दोन्ही पदांसाठी भोसले व बागुल या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने चेअरमनपदी राजेंद्र भोसले तर व्हाईस चेअरमनपदी शंकर बागुल यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

यावेळी हरिलाल अस्मर, संजय दुसाने, नरेंद्रकुमार सोनवणे, भिका कोतकर, दादाजी वाघ, रवींद्र दशपुते, गौतम शहा, सतीष कासलीवाल, भरत पोफळे, सुरेश सोयगावकर, विठ्ठल बागुल आदी उपस्थित सदस्यांनी भोसले व बागुल यांचे अभिनंदन केले. भोसले यांना सलग दुसऱ्यांदा चेअरमनपदाचा संधी मिळाली.

बँकेची आजवर झालेली प्रगती लक्षात घेऊनच सुज्ञ मतदारांनी आम्हाला निवडून दिले. सभासद व मतदार, ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेला हा विश्वास आम्ही सार्थ ठरवू. मामको बँक ही आज अग्रगण्य बँक ठरली आहे. बँकेची गेल्या पाच वर्षातील विकासाची वाटचाल कायम ठेवून ग्राहक हितालाच आमचे प्राधान्य असेल. - राजेंद्र भोसले , चेअरमन मामको बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजटंचाईने नागरिक त्रस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा बागलाणमधील समस्त शेतकरी वर्गासह सर्वसामान्य वीज ग्राहकांना फटका बसला आहे. सटाणा उपविभागात तब्बल एक हजारांहून अधिक वीज मागणीचे अर्ज प्रलंबित असल्याने वीज ग्राहकांची गैरसोय होत असून, वीज ग्राहकांनी वारंवार उंबरठे झिजवून देखील मनस्तापच सहन करावा लागत आहे.

सटाणा उपविभागात १७९ पैकी निम्म्या गावांचा समावेश होतो. या सर्व ग्रामस्थांना विजेची आपली दैनंदिन कामे उरकण्यासाठी सटाणा येथील उपविभागाच्या कार्यालयात उंबरठे झिजवावे लागत आहेत. सन २०१० पासून वीज ग्राहक व शेतकऱ्यांनी कोटेशन मिळावेत म्हणून सटाणा उपविभागात अर्ज दाखल केलेले असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी बहुतांश प्रकरणे प्रलंबित आहेत.

वीज वितरण कंपनी संबंधित शेतकऱ्यांकडून हॉर्स पॉवर प्रमाणे व किती खांब बसतील यांच्या हिशेबनुसार कमीत कमी ४ हजार ५०० ते २० हजार रुपयांपर्यत रक्कम स्वीकारीत असते. वीज ग्राहक व शेतकरी विजेच्या कनेक्शनसाठी संबंधित रक्कम देखील भरून मोकळे होतात. वेळप्रसंगी शेतातील पिके वाचविण्यासाठी वाटेल ते करून शेतकरी कोटेशनसाठी पैसे भरत असतात. मात्र, सदरचे पैसे भरून केवळ पावती हातात मिळून शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत वीज उपलब्ध झालेली नसल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीमुळे आठवड्याभराची सुटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

दिवाळीच्या सणाची लगबग सर्वसामान्यांपासून सर्वांच्याच घरात सुरू आहे. सिडको, सातपूर एमआयडीसीतील रोजच सुरू राहणारी मशिनरींची धडधड तात्पुरती थांबणार आहे. दीपोत्सवात पुढील पाच ते सात दिवस कारखाने बंद राहणार आहेत. कामगारांना सुट्ट्या लागल्यावर नाशिक बाहेरील बहुतांश कामगारांनी गावाकडे प्रस्थान करण्यास सुरुवात केल्याने रेल्वे व बसेसला गर्दी होऊ लागली आहे.

सिडको, सातपूर एमआयडीसीमध्ये सुमारे दीड हजार लहान-मोठ्या कंपन्या आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक दिवाळी सणाला मोठे महत्त्व आहे. त्यातच लहानांपासून मोठ्यापर्यंत दिवाळीच्या सणाचा आनंद लुटण्यासाठी घरात नवीन वस्तू, वाहने व कपडे खरेदी करण्याचा आनंद लुटतात. दिवाळीसाठी एमआयडीसीतील कामगार देखील सुट्टीची वाट पहात असतात. यावर्षी एमआयडीसीतील काही कारखान्यांनी १० ते १४ नोव्हेंबरपर्यंत कामगारांना सुटी जाहीर केली आहे. तसेच काही कारखान्यांनी कामाचे नियोजन पाहून १० ते १६ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या दिल्या आहेत. पाच दिवस कामगारांना सुट्या लागणार असल्याने कामगार कुटुंबातील सदस्य देखील गावाकडे दिवाळीचा सण साजरा करण्याच्या तयारी लागले आहेत. बहुतांश कारखान्यांमधील कामगारांना मंगळवारी (दि. १०) सुट्या लागणार असल्याने पुढील पाच दिवस एमआयडीसीतील मशिनरींची धडधड बंद राहणार आहे.

सिन्नर एमआयडीसीत बोनसमुळे उत्साह

सिटू युनियच्या वतीने सिन्नर एमआयडीसीतील कंपन्यांमध्येही खेळीमेळीच्या वातावरणात कामगारांचे बोनस जाहीर केले आहेत. यामुळे सिटू युनियनच्या कामगारांमध्ये उत्साह आहे. या अगोदरच सातपूर व अंबड एमआयडीसीत अनेक कंपन्यामध्ये सिटूने कंपनी व्यवस्थापनाकडून बोनस जाहीर केले आहे. सिन्नर एमआयडीसीतील माळेगाव व मुसळगाव येथील कंपन्यांचे बोनस पुढीलप्रमाणे : आर. डी. इंजिनिरींग (२० टक्के), कॉसमॉ इंडस्ट्रीज ८.३० टक्के व २ हजार, श्री. इंडस्ट्रीज (१३ टक्के), एचएनजी १७ हजार, केटा फार्मा (२० टक्के), हिन्दुस्थान युनिलिव्हर ८ हजार ४००, एफडीसी ११ हजार, रेन्कू फार्मा (२१ टक्के), फुड्स अॅण्ड इन्स ८ हजार ४००, सूर्या कोटींग्ज दोन पगार, मार्को केबल ३६ दिवसांचा पगार, बेलोटा अग्री सोल्युशन १० ते १५ हजार, एचएनजी कंत्राटी कामगार (२० टक्के) व फुड्स कार्पोरेशन ५००० हजार आदी कंपन्यांना बोनस जाहीर झाल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.

पोलिसांकडून होणार पेट्रोलिंग

दिवाळीनिमित्त पुढील पाच दिवस औद्योगिक शांतता राहणार असल्याने पोलिसांकडून चोख पेट्रोलिंग करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी मटाशी बोलतांना सांगितले. आयमात झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार सोमवारी ९ नोव्हेंबरपासूनच सिडको व सातपूर एमआयडीसीत पेट्रोलिंगला सुरुवात करण्यात येणार असल्याचेही धिवरे म्हणाले.

२५ हजाराचा बोनस

सातपूर एमआयडीसीतील जयनिक्स इंजिनीअरिंग कंपनीतील कामगारांना त्यांच्या कामाच्या वयोमर्यादानुसार २५ ते ३० हजार बोनस कंपनी व्यवस्थापन व सिटू युनियनच्या सहमतीने झाला आहे. बोनसची चर्चा करण्यासाठी कंपनीनेचे निखिल दिवाकर व निनाद दिवाकर उपस्थित होते. सिटू कामगार संघटनेच्या वतीने डॉ. डी. एल. कराड, सिताराम ठोंबरे, अरुण केदार, एकनाथ बागूलव राजेंद्र पाटील बैठकीला उपस्थित होते. अपेक्षित त्या प्रमाणात बोनस जाहीर केल्याने कामगारांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भद्रकालीत हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लहान मुलांच्या भांडणानंतर जुने नाशिक येथील गुमशाहबाबा दर्गाजवळ दोन गटात तुफान हाणमारी झाली. ही घटना रविवारी रात्री नऊ ते पावणेनऊ वाजेच्या सुमारास घडली. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी ग्राहकांची या भागात मोठी गर्दी होती. त्यातच दोन गटात हाणामारी झाल्याने सर्वांची तारंबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह सर्व फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी गणेश सपकाळ व त्याचे सात ते आठ साथीदार आणि हसन व शोएब व त्याच्या सात ते आठ साथीदारांविरोधात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला.

हल्ल्याचा सूत्रधार बेपत्ता

धात्रक फाटा येथील राज आनंद मंगल कार्यालयामागे राहणाऱ्या अविनाश कृष्णराव सवई (वय ४२) यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या सूत्रधारांचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. सवई यांच्यावर रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला होता. गंभीर जखमी असलेल्या सवई यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सवई रात्रीच्या सुमारास घराबाहेर का पडले आणि त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचा उद्देश काय होता, याचे कोणतेही समाधानकारक उत्तर अद्यापपर्यंत पोलिस तपासात निष्पण झालेले नाही.

कुरियर बॉयची लूट

कुरियर वाटण्यासाठी मोटरसायकलवर निघालेल्या युवकास चाकूचा धाक दाखवून पल्सरवर आलेल्या चोरट्यांनी लुटून नेल्याची घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास महात्मानगर परिसरात घडली. एबीबी सर्कल येथून वैशंपायन शाळेसमोरून जात असताना पल्सरवर आलेल्या आरोपीने कुरियर बॉयला थांबवून चाकूचा धाक दाखवला. तसेच, त्याच्याकडील रोख रक्कम व कॅमेऱ्याची बॅग असा ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पंचवटीत घरफोडी

पंचवटी परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा दिवसा घरफोडी करीत एक लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास फिर्यादी घर बंद करून बाहेर गेले असता चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच, घरातील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुर्वेदीक वनस्पतींची लागवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपलं पर्यावरण ग्रुपतर्फे धन्वंतरी पूजनानिमित्त सोमवारी वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. औषधी वनस्पतींची कमी होत असलेली ओळख टिकवून ठेवण्याच्या व नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती यानिमित्ताने करण्यात आली.

वरुण, फाळसा, बारतोंडी, निर्गुडी, बाभूळ, पुत्रंज्वा, पळस, भोकर, अर्जुन, बुचपांगारा, बेल, कोकम अशा ५५ आयुर्वेदिक औषधी प्रजातीच्या रोपांची लागवड येथे करण्यात आली. औषधी वनस्पती शहरातून दिसेनाशा झाले असल्याने त्यांची संख्या पुन्हा वाढविण्याच्या उद्देशाने औषधी वनस्पतींच्या लागवडीला येथे प्राधान्य देण्यात आले. पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती व्हावी, वृक्षप्रजातींची ओळख व्हावी, या उद्देशाने शहरात हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच धन्वंतरी पूजनासाठी केवळ धन्वंतरीचे चित्र असलेल्या फोटोला न पूजता आयुर्वेदाला बळ देण्याचा उद्देश उपक्रमामागे होता. यावेळी वृक्षप्रेमी शेखर गायकवाड, डॉ. विनोद गुजराथी, डॉ. वर्षा चिट्टीवाड, डॉ. अभिनंदन कोठारी, डॉ. प्रणिता गुजराथी तसेच शिवसृष्टी स्प्रिंग व्हॅली मित्रमंडळाचे सदस्य आदी उपस्थित होते.

स्थानिकांमध्ये आयुर्वेदिय वृक्षांची ओळख व्हावी व त्यांच्यातील गुणधर्माची माहिती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केला. येत्या पिढ्यांनाही या वनस्पतींचा लाभ होईल.

- शेखर गायकवाड,

वृक्षप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणप्रश्नी आक्रमक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशातील आदिवासी जमातींच्या आरक्षण पद्धतीत फेरबदल करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकार तयार करीत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनादत्त अधिकारांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप माजी आदिवासी विकास मंत्री व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष मधुकर पिचड यांनी केला. तर, बोगस आदिवासींना संरक्षण देणाऱ्या शासनाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, आदिवासी जमातीच्या सर्व्हेक्षणासाठी येणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना गावबंदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत पिचड म्हणाले की, घटनेत बदल न करताच केंद्र सरकार आदिवासींच्या आरक्षण पद्धतीत बदल करण्याच्या तयारीत आहे. आदिवासी जमातींमध्ये एखाद्या जातीचा समावेश करायचा असेल तर, आतापर्यंत नऊ पायऱ्यांवरून सरकारला जावे लागत होते. आदिवासी संशोधन समितीच्या अहवालापासून सुरू होणारा हा प्रवास राष्ट्रपतींपर्यंत होता. मात्र, केंद्राने हे आरक्षण सूत्रच बदलण्याची तयारी सुरू केली आहे. राज्य सरकारने शिफारस केल्यानंतर केंद्रातील सचिवांची एक समिती तत्काळ त्यावर निर्णय घेऊ शकणार आहे. त्यामुळे कोणत्याही जमातीचा आदिवासींमध्ये सहज समावेश करता येणार असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्राचा हा सर्व डाव आरएसएसच्या इशाऱ्याने सुरू असल्याचे सांगत, आदिवासींनी वनवासी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आदिवासींना वनवासी म्हणू नये यासाठी कायदा करावा असे सांगत, बोगस आदिवासींना संरक्षण देणाऱ्या शासनाच्या पत्रकाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारमधील आदिवासी संशोधन समितीतील एका अधिकाऱ्याच्या पुढारपणासाठी राज्य सरकार सतरा आदिवासी जमातींचा अभ्यास करीत असून, त्याला आमचा विरोध असल्याचे त्यांनी नमूद केले. पुणे विद्यापाठीकडून या आदिवासींच्या सर्व्हेक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना गावात प्रवेश दिला जाणार नसल्याचा निर्णय आदिवासी समाजाने घेतल्याचा दावा त्यांनी केला. एमएमआरडी व स्मार्ट सिटी योजनांच्या धर्तीवर आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी एक प्राधिकरण नियुक्त करावे व त्या प्राधिकरणाचे अध्यक्षपद राज्यपालांकडे द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

मोर्चा

बोगस आदिवासींना संरक्षण, आदिवासींच्या १७ जमातींचा अभ्यास, आदिवासींच्या प्रश्नांसंदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने येत्या ११ डिसेंबरला विधानभवनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या मोर्चात राज्यातील आदिवासी समाजाचे सर्व नेते उपस्थित राहणार असून, हा सरकारविरोधात एल्गार असल्याचा दावा त्यांनी केला. आदिवासी विकास विभागाचा कारभार ठप्प आहे. सुमारे २९ पैकी २४ प्रकल्प कार्यालयाने प्रकल्प अधिकारी नाहीत. आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश नाही. आदिवासींच्या सर्व योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे आदिवासी समाजात असंतोष असून, त्याचा उद्रेक या भव्य मोर्चाद्वारे होणार असल्याचा इशार त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन तपासणी सेंटर बंदोबस्तात झाले सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वादाच्या भोवऱ्यात सापडून पाच दिवसांपासून बंद पडलेले ऑटोमेटीक व्हेईकल इन्स्पेक्शन सर्टिफिकेशन सेंटर (एव्हीइएस) सोमवारी अखेर सुरू झाले. ​​या सेंटरला विरोध होण्याची शक्यता गृहीत धरून सकाळपासूनच प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आवारात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे आरटीओ कार्यालयात तणाव दिसून आला.

वाहनांच्या फिटनेस टेस्टची स्वयंचलित पध्दतीने तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकाराने एव्हीइएस यंत्रणा सुरू करण्यात आली. मात्र, या चाचणीत सुरुवातीपासूनच शेकडो वाहने फेल होऊ लागली. यातून वाहनचालक आणि एजटांनी सदर केंद्र बंद करण्याची मागणी सुरू केली. हा वाद वाढल्याने वाहनचालकांनी केंद्रच बंद पाडून तोडफोड करण्याचा इशारा दिला. यामुळे धास्तवलेल्या रोझमेर्टा कंपनीच्या संचालकांनी सदर केंद्र काही दिवसांपुरते बंद केले. या दरम्यान स्थानिक अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीने तसेच केंद्र संचालकांच्या मदतीने काही बदल प्रस्तावित केले. यात एखादे वाहन तपासणीत अपात्र ठरले तर त्याची पुनर्तपासणी करताना कोणतेही शुल्क आकारायचे नाही असे ठरवण्यात आले. याबरोबर, हेडलाईट बीममुळे फिटनेस टेस्टमध्ये फेल होणाऱ्या वाहनांची संख्या मोठी होती. तसेच, मानांकनानुसार हेडलाईट दुरुस्त करण्याची यंत्रणाही उपलब्ध नव्हती. इतर सर्व टेस्टमध्ये पात्र ठरणारी वाहने फक्त हेडलाईटमुळे अपात्र होत असल्याने आजपासूनच सेंटरमध्ये दोन मेकॅनिक नियुक्त करण्यात आले आहेत. हे मॅकेनिक टेस्ट दरम्यानच हेडलाईट बीमचे काम करणार आहे. सोमवारी सकाळी सेंटरचे काम सुरू झाल्यानंतर आरटीओचे बहुतांश अधिकारी केंद्रावर हजर होते. तपासणीसाठी येणाऱ्या वाहनांमध्ये नेमकी काय अडचणी आहेत, याची दखल आरटीओ अधिकाऱ्यांनी घेतली. दरम्यान, सेंटर सुरू करताना वाहनचालक आणि एजंट विरोध करण्याची शक्यता गृहीत पकडून पंचवटी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. दंगल नियंत्रक पथकासह पोलिस अधिकारी आरटीओ कार्यालयात ठाण मांडून असल्याने येथे दिवसभर तणावपूर्ण शांतता होती.

हेडलाईटस नसताना वाहन तपासणीला

हेडलाईटस तपासणीत अपात्र होणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्येमुळेच हे केंद्र वाहनचालकांच्या रडारवर आले. अगदी किरकोळ समजल्या जाणाऱ्या हेडलाईटसमधील दोषांमुळे संबंध वाहनाला पुनर्तपासणीसाठी यावे लागत असल्याची ओरड वाहनचालकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी हेडलाईटस तपासणीबाबत सेंटरमधील कर्मचारी व आरटीओ अधिकारी सजग होते. मात्र, तरीही एक वाहन या चाचणीत फेल झाले. त्याची कारणमीमांसा करणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यांनी याविषयी कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. संबंधित वाहनाला हेडलाईटस नसल्याने पात्र कसे करायचे असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी विचारताच सगळ्यांना हसू फुटले. वाहनचालकांनी आपली मानसिकता बदलावी, असे आवाहन यानिमित्ताने आरटीओ अधिकाऱ्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑटोमोबाइल क्षेत्राची ‘दिवाळी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मंदीच्या फेऱ्यात अडकलेल्या ऑटोमोबाइल क्षेत्राला विजयादशमीने तारले. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कार आणि दुचाकी विक्रीत मोठी उलाढाल होण्याची विक्रेत्यांची अपेक्षा असून लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तावर किमान ७०० कार आणि अडीच हजारापेक्षा अधिक दुचाकींची विक्री होऊ शकते, असा दावा विविध शोरूम संचालकांकडून होतो आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या विजयादशमीच्या दिवशी अॅटोमोबाईल क्षेत्राला चांगला बुस्ट मिळाला. या दिवशी दुचाकी तसेच कार विक्रीमध्ये समाधानकारक विक्री झाली. मात्र, गत वर्षाच्या सरासरीच्या दृष्टीने हे प्रमाण कमीच ठरले. यात सुधारणा होण्याची अपेक्षा असून दिवाळीत ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध कंपन्यांच्या ६०० कार विक्रीस गेल्या होत्या. तसेच २ हजार २०० दुचाकींची विक्री देखील झाली. विक्री झालेल्या वाहनांमधून साधारणतः ४३ कोटी रुपयांची उलाढाल झाली. काही प्रमाणात मंदीत असलेल्या ऑटोमोबाइल क्षेत्रात यामुळे चैतन्य पसरले. सध्या, दुष्काळजन्य परिस्थिती असली तरी कार तसेच दुचाकी विक्रीने वेग पकडला असल्याचा दावा काही शोरूम चालकांनी केली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ७०० पेक्षा जास्त कार आणि अडीच हजारापेक्षा जास्त दुचाकींची विक्री होणार असल्याचा दावा संबंधितांनी केला. चालू वर्षात मोपेड (गेअर नसलेल्या दुचाकी) दुचाकींना चांगली पसंती असून यात लक्षणीय वाढ होऊ शकते, असा दावा आरटीओ अधिकाऱ्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरवलेले ४.५ लाख रुपये केले परत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

अलीकडे महाराष्ट्रात धावत्या रेल्वेत तसेच, विविध रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी रेल्वे पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे. असे असताना मनमाड रेल्वे पोलिसांनी एका रेल्वे वेंडरच्या जोडीने जागरूकतेने नांदेड येथील एका सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरची रेल्वे स्थानकात हरवलेली तब्बल साडेचार लाख रुपये असलेली बॅग परत करून प्रामाणिकपणाचा व सामाजिक बांधिलकीचा आदर्श सर्वांसमोर ठेवला.

रेल्वे पोलिसांची प्रतिमा उजळ करणारी आणि दिवाळीच्या प्रकाशापेक्षाही दैदीप्यमान असा माणुसकीचा लख्ख प्रकाश दाखविणारी ही घटना सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली. नांदेड येथे राहणारे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर प्रकाश गुट्टे ‌हे मुंबईहून रविवारी पहाटे मनमाड येथे आले आणि सचखंड एक्स्प्रेसने नांदेड येथे रवाना झाले. मात्र, या धावपळीत ते प्लॅटफार्म क्रमांक सहावर आपली एक बॅग विसरून गेले. त्यानंतर रेल्वे स्थानकात बी. एल. शर्मा यांच्या कॅन्टीनवर वेंडरचे काम करणाऱ्या संजय नरवडे यास ती बॅग दिसली. दिवाळीचे दिवस, त्यात सर्वत्र खरेदीचा माहोल असताना त्या बॅगेत काही असेल किंवा ती बॅग आपण आपल्याकडे ठेवावी असा मोह या वेंडरला झाला नाही. त्याने तत्काळ रेल्वेचे पोलिस नाईक राजेश बागुल, ठाणे अमलदार प्रकाश डोम, हवालदार हारून शेख, पोलिस कॉन्‍स्टेबल कौसर शेख आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सय्यद यांना या घटनेची माहिती दिली. सय्यद यांनी लगेच सदर बॅगची बॉम्बशोध पथक, श्वानपथक आणून रीतसर तपासणी केली. त्यात संशयास्पद काही आढळले नाही. त्यानंतर त्या बॅगेची पाहणी केली असता त्यात ४ लाख ५० हजार ५३५ रुपये असल्याचे स्पष्ट झाले. रेल्वे पोलिसांनी त्वरित बॅगमधील कागदपत्रांवरून नांदेड येथे शेख यांच्याशी संपर्क साधला आणि वरील प्रकाराची माहिती देत पैसे घेऊन जाण्यासाठी या, असा संदेश पाठवला. वेंडर आणि पोलिस यांची जागरूकता आणि सचोटीचे गुट्टे यांनाही कौतुक वाटले. माणुसकी आणि प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे असे शब्द त्यांच्या ओठांवर उमटले.

खाद्यपदार्थ विकणाऱ्या संजय नरवडेसह सपोनि सय्यद यांच्या टीमला नागपूर लोहमार्ग विभागाचे एसपी अनंत रोकडे आणि डीवायएसपी चंद्रशेखर भाबल यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images