Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

'महिंद्रा'तील संप कामगार सेनेचा नाही!

0
0
गेल्या आठ दिवसांपासून इगतपुरीतील महिंद्रा कंपनीत सुरू असलेला संप लवकर मिटण्यासाठी सर्व क्षेत्रांतून दबाव वाढत असताना भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनी 'कंपनीत भारतीय कामगार सेनेची युनियन असली तरी हा संप आम्ही पुकारलेला नाही', असे स्पष्ट केले आहे.

अनधिकृत टॉवरवर कारवाई

0
0
महापालिकेची परवानगी न घेता बेकायदा टेरेसवर मोबाइल टॉवर उभारणाऱ्या नागरिकांविरुद्ध महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी सकाळी शहरातील अग्रवालनगर परिसरातील एका बंगल्याच्या टेरेसवर उभारलेला टॉवर काढण्यास सुरुवात केली.

५००० इंजिनांच्या निर्मितीला ब्रेक

0
0
दोन कामगारांचे निलंबन मागे घेण्यावरून महिंद्रा अँड महिंद्राच्या तळेगाव (इगतपुरी) येथील प्लाण्टमध्ये तब्बल आठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे सुमारे ५ हजार इंजिनांची निर्मिती होऊ शकलेली नाही.

पुण्यातील चोरीची तवेरा नाशकात

0
0
पुणे शहरातील विश्रामबाग येथून चोरी केलेली तवेरा शहर पोलिसांनी शिताफीने हस्तगत केली. यासाठी पोलिसांनी पाळत ठेऊन संशयितांचा पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी पोबारा केला.

टीडीआरची ४३ प्रकरणे प्रलंबित

0
0
पालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी घेतलेल्या जमिनींचे टीडीआर देण्याची ४३ प्रकरणे प्रलंबित असून त्यातील तब्बल ३३ प्रकरणे डीपीरोडशी संबंधित आहेत. यात सन २००७पासूनच्या काही प्रकरणांचाही समावेश आहे.

मुले हरविल्यास अपहरणाचा गुन्हा

0
0
देशात मुले हरविण्याचे प्रमाण प्रचंड आहे. त्यातुलनेत पोलिसांकडून होणार तपास अदखलपात्र आहे. याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने मुले हरविण्याची तक्रार अपहरण म्हणून नोंदवून त्याचा तपास करावा असे आदेश दिले होते.

बोर्डामार्फत शनिवारी परिपत्रकाचे वाटप

0
0
शैक्षणिक वर्ष २०१३-१४ पासून दहावी बारावीच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांबाबत काही नवीन नियम लागू करण्यात आले असून हे नियम सर्व विभागिय शिक्षण मंडळांना लागू असणार आहेत.

रस्ता कुठे अन् पथदीप कुठे?

0
0
महापालिकेच्या अजब कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. मखमलाबाद रोडवरील काही पथदीप हे चक्क रस्त्यापासून लांब खासगी जागेत लावण्यात आले आहेत.

भटक्या विमुक्तांचे साहित्य संमेलन शनिवारपासून

0
0
महाराष्ट्र भटक्या-विमुक्त जाती-जमाती शिक्षण, विकास व संशोधन संस्थेच्या वतीने २० व २१ एप्रिल रोजी भटक्या विमुक्तांचे आठवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन होत आहे. जुना आडगाव नाक्यावरील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयात हे संमेलन होईल.

'रेजीमेंटल'मध्ये बॉम्बस्फोट होतो तेव्हा...

0
0
बिटको चौकातील रेजीमेंटल प्लाझामध्ये बॉम्बस्फोट झाल्याच्या आवाजाने नागरिक सैरभैर धावू लागतात. स्फोटाच्या ठिकाणी जखमी अवस्थेत पडलेल्यांना सुरक्ष‌ितपणे बाहेर काढण्यासाठी फायरब्रिगेडचे जवान दाखल होतात.

'रायझिंग फोटोग्राफर्सचा'चा आज उघडणार 'तिसरा डोळा'

0
0
गेल्या काही दिवसांपासून उदयाला येणाऱ्या महानगरा‌विषयी, महानगराच्या वर्तमान व भविष्यकाळाविषयी 'महाराष्ट्र टाइम्स' सातत्याने वाचकांसाठी काही न काही नवीन माहिती देत आहे.

म्हाडातर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांना घरे

0
0
नाशिक जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना म्हाडातर्फे घरे देण्याबाबत विचार व्हावा याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांना अल्पदरात घरकुल मिळावे यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन म्हाडाचे नवनिर्वाचीत सभापती नरेंद्र दराडे यांनी दिले.

बनावट चलनाचा वापर सुरूच

0
0
सातपूर परिसरातील विविध बँक शाखांमध्ये बनावट नोटांचा चलनात वापर केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्यानंतर आता भद्रकालीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत १४ बनावट नोटांचा भरणा झाल्याचे उघडकीस आले आहे.

चणकापूरच्या पाण्यावरून संघर्ष

0
0
दुष्काळी परिस्थिती बिकट बनत असताना मालेगाव शहर विरुद्ध कळवण, सटाणा, देवळा तालुक्यांत चणकापूरच्या पाण्यावरून संघर्षाची ठिणगी पेटली आहे. चणकापूरमधील मालेगावच्या पाण्याचे आरक्षण बंद करून ते पाणी या परिसराला मिळावे यासाठी देवळा माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.

गिरणेचे पाणी जामदापर्यंत पोहचले

0
0
गिरणा धरणातून सोडलेले पाणी चाळीसगाव तालुक्यातील जामदा बंधाऱ्यापर्यंत पोहचले आहे. यामुळे तीन तालुक्यांतील १४५ गावांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील नऊ पालिका व १५४ गावांत पाण्याची टंचाई जाणवू लागल्यामुळे गिरणा धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती.

अनधिकृत बांधकामांना महापालिकेचे संरक्षण

0
0
मुंब्रा येथे झालेल्या दुर्घटनेनंतर जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने अनधिकृत आणि बेकायदा बांधकामांवर हातोडा टाकणार असल्याचे संकेत दिले आहेत.

उतरलेल्या सोन्याची अशीही झळाळी

0
0
सोनं हा महिलांचा वीक पॉईंट. जिच्याकडे सोनं जास्त तिचा रुबाब काही औरच! परंतु नुकत्याच सोन्याच्या घसरलेल्या दरामुळे या महिलांचा भावही काहीसा घसरला आहे. असा एक किस्सा दोन दिवसांपूर्वी घडला.

नाशिककर आज साधणार सोनेरी गुरूपुष्यामृत

0
0
सोन्याच्या कमी झालेल्या किमती आणि त्यातच आलेला गुरूपुष्यामृत मुहूर्त असा दुग्धशर्करा योग गुरुवारी जुळून येत असल्यामुळे नाशिककरांच्या सोने खरेदीवर अक्षरशः उड्या पडणार आहेत.

नाशकात होताहेत १५०० कोटींची बांधकामे!

0
0
घरकुलासाठी सर्वोत्तम पर्याय तसेच सेकंड होम म्हणून परिच‌ित असलेल्या नाशिक शहर परिसरात तब्बल १५०० कोटी रुपयांची विविध बांधकामे सुरू आहेत. ही बांधकामे दीड कोटी चौरस फुट क्षेत्रावर करण्यास नाशिक महापालिकेने परवानगी दिली असून ही बाब नाशिकच्या बांधकाम क्षेत्राची क्षमता सिद्ध करणारी आहे.

दाखले दिलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत घ्या

0
0
फी न भरल्याच्या कारणावरून दाखला दिलेल्या विद्यार्थ्यांना त्वरित शाळेत सामावून घेण्याचा आदेश महापालिका शिक्षण मंडळामार्फत रासबिहारी शाळेला मंगळवारी देण्यात आला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images