Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सरसंघचालक आज नाशिकमध्ये

0
0
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत गुरुवारपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यात ते संघाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींसह गुरुवारी संध्याकाळी पंचवटीत जाहीर सभेद्वारे मार्गदर्शन करणार आहेत.

पाण्याचे 'नो टेन्शन'

0
0
गंगापूर धरण क्षेत्रात उपलब्ध असलेला पाणीसाठा मुबलक असून ऑगस्ट महिन्यांपर्यंत शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा

0
0
मोकाट कुत्र्यांनी शहरात घातलेला धुमाकूळ पाहता नाशिक महापालिकेने या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी शहर काँग्रेसतर्फे करण्यात आली. यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त संजय खंदारे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे.

शहरातील आर्थिक प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी

0
0
शहरातील मलशुद्धीकरण प्रकल्प जमिनीप्रकरणी महापालिकेला बसलेल्या ३६ कोटींच्या भुर्दंडाबाबत नगरविकासमंत्री भास्कर जाधव यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

स्थायीसाठी शिवसेनेची उद्धव ठाकरेंकडे धाव

0
0
मनपाची आर्थिक घडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चबांधणीला सुरुवात केली आहे. या ​निवडणुकीत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असल्याने महाआघाडी की महायुती?

जुंदालविरोधात भक्कम पुरावे

0
0
नाशिक शहरातील महत्त्वपूर्ण स्थळांची रेकी केल्याप्रकरणी दोषारोप असलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी सय्यद जबीउद्दीन ऊर्फ अबू जुंदालविरोधात भक्कम पुरावे असल्याचे विशेष सरकारी वकील अॅड्. अजय मिसर यांनी स्पष्ट केले.

'महिंद्रा'बाबत पक्षप्रमुखांकडे आज बैठक

0
0
महिंद्रा अँड महिंद्राच्या तळेगाव (इगतपुरी) येथील प्लाण्टमध्ये सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाप्रश्नी गुरुवारी दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. यात तोडगा निघण्याची शक्यता असल्याने या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

तक्रार आल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईकळवण जिप

0
0
दुष्काळी परिस्थितीत जनतेकडून तक्रार आल्यास संबंधित कर्मचारी आण‌ि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांनी दिला. पाणीप्रश्नाबाबतच्या अडचणी, प्रलंबित प्रस्ताव आपण सरकारी स्तरावर मार्गी लावू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

पक्ष तितक्या प्रवृत्ती

0
0
मनसे आणि शिवसेनेने प्रभाग समितीवर वर्चस्व निर्माण केल्यानंतर सत्तेचा सोपान महायुतीच्या खांद्यावर सहज विसावला. त्यानंतर महापालिकेची आर्थिक नाडी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीत देखील अशीच परिस्थिती राहिल असा सर्वांचा होरा होता. मात्र महापालिकेतील पक्ष तितक्या प्रवृत्तींमुळे राजकीय घडामोडी गतीमान झाल्याने स्थायी समिती सभापतीसाठी अधिक चुरस निर्माण झाली आहे.

'रिव्हॅल्युएशन'चे निकाल १५ दिवसात

0
0
निकालातील दिरंगाईने त्रस्त झालेले विद्यार्थी आणि मनुष्यबळाअभावी हतबल झालेले पुणे विद्यापीठ असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. दुसऱ्या सत्राची परीक्षा तोंडावर आली तरी हे निकाल लागत नसल्याने विद्यार्थी मात्र टेन्शनमध्ये आहेत. त्यामुळे १५ दिवसात सर्व अभ्यासक्रमांचे रीव्हॅल्युएशनचे निकाल जाह‌‌ीर करण्याचे आश्वासन विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे.

निधीविना ‘मराठी भाषा संवर्धन’ पंधरवडा

0
0
मराठी भाषा संवर्धनासाठी कार्यक्रम आयोजित करायचे, मात्र त्यासाठी निधी पुरवायचा नाही, असा सरकारी अनुभव कायमचा आहे. राज्य सरकारने १ मेपासून राज्यभरात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे आदेश सरकारी कार्यालयांना दिले आहेत. मात्र निधी देण्याऐवजी संबंधित कार्यालयांनाच त्यासाठी खर्च करण्याचा सल्ला दिला आहे.

गुरूपुष्यामृतला लाभले हिरे-रत्नांचे कोंदण

0
0
गुरूपुष्यामृताच्या मुहूर्तावर नाशिककरांनी सोने खरेदीबरोबरच हिरे आणि रत्नांचीही मनसोक्त खरेदी केली. नेहमीच्या तुलनेत काल हिरे-रत्नांच्या विक्रीमध्ये पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली असून शहरात हिरे-रत्नांची उलाढाल सुमारे तीनशे कोटीवर असल्याची समजते.

सुट्यांमुळे रेल्वेगाड्या फुल्ल!

0
0
शाळा-कॉलेजातील परीक्षा संपल्याने गावी जाण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर नागरिकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली आहे. रोजच्या तुलनेत तिप्पट गर्दी झाल्याने तिकीट काढण्यासाठी लोकांना तास् न तास रांगेत उभे रहावे लागत आहे. तसेच दोन महिन्यांपूर्वीच आरक्षण फुल्ल झाल्याचे चित्र आहे.

टाऊनशीपचे माहेरघर

0
0
मानसिक, शारीरिक व बौध्दिक विकासाच्या क्षितीजाला स्पर्शण्यासाठी माणसाला समाजाशिवाय तरणोपाय नाही. हे सत्य देशाच्या पायाभूत सुविधांचा आत्मा असलेल्या बांधकाम जगताने देखील टाऊनशीप संकल्पनेतून आत्मसात केले आहे.

शिधावाटप दक्षता समितीवर मिलींद पगारे

0
0
महाराष्ट्र सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यातर्फे जिल्हा स्तरावर दक्षता समिती गठीत करण्यात येते. या दक्षता समितीवर नाशिकरोड मधील सामाजिक कार्यकर्ते मिलींद सखाराम पगारे यांची अनुसुचित जातीचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

जलव्यवस्थापनासाठी विद्यापीठांची धावपळ

0
0
शहराच्या हद्दीतील आरोग्य व मुक्त विद्यापीठाला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. गंगापूर धरणाच्या कुशीत वसलेल्या मुक्त विद्यापीठाला दुष्काळी परिस्थ‌ितही भरपूर पाणी मिळत असल्याने पाणी जपून वापरण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. तर आरोग्य विद्यापीठाचा पाण्याचा स्त्रोत असणाऱ्या परिसरातील तळे कोरडे पडल्याने गरजेपुरत्या पाण्यासाठी विद्यापीठाला टॅन्करवर विसंबून रहावे लागत आहे.

ओळखीच्या व्यक्तीचा दीड लाखांवर डल्ला

0
0
एकाच भागात राहत असल्याचा आणि ओळखीचा फायदा घेत फ्लॅटची बनावट चावी बनवून त्याआधारे तब्बल एक लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी पंचवटी परिसरातील मालविय चौक येथे उघडकीस आली.

राहिलेला सत्कार

0
0
उत्साहाच्या भरात एखादी छोटी चूक सगळ्या 'किए कराये'वर पाणी फिरवते. गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अर्धा डझनहून अधिक मंत्री नाशिक दौऱ्यावर होते. आता एवढी सगळी मंडळी येणार म्हटल्यावर कार्यकर्त्यांना चेव येणारच.

लोकशाही दिनात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी

0
0
लोकशाही दिनात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून त्यात आयएएस व आयपीएस महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नाशिक विभागासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिव मिता लोचन व मुंबई पोलिस मुख्यालयातील उपायुक्त शारदा राऊत यांची नेमणूक झाली आहे.

जिल्हा बँक संचालक मंडळ बरखास्त?

0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नियमांची पायमल्ली करून कारभार चालत असल्याने बँकेच्या संचालक मंडळाच्या बरखास्तीची शिफारस सहकार आयुक्तांनी रिझर्व्ह बँकेकडे केल्याची माहिती सहकार राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी विधिमंडळात दिली. तसेच, बँकेच्या फेरलेखापरीक्षणात दोषी आढळणाऱ्या संचालकांविरोधात फौजदारी कारवाई करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images