Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

फलोत्पादनासाठी १०० टक्के अनुदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेती क्षेत्र नैसर्गिक संकटांनी त्रस्त असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेती व्यवसाय करणाऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण असल्याने त्यांना शासनाकडून मदत केली जाणार आहे. एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागांमधून शासनाने फलोत्पादन वाढीसाठी १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे कृषी व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.

ह्यूमन सर्व्हिस फाऊंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स यांच्या विद्यमाने आयोजित कृषीथॉन-२०१५ या प्रदर्शनाला कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. ना. खडसे पुढे म्हणाले, की एकीकडे शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण असताना दुसरीकडे युवा वर्ग कृषीतील उच्च शिक्षण घेण्यासाठी कल दर्शवित आहे. शेतीत नवनवीन संशोधन होत आहे. त्याचे प्रतिबिंब कृषीथॉनसारख्या प्रदर्शनातून व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी येथे येऊन त्याचा अभ्यास, तंत्र अवगत करून शेतीत उत्पन्न, नफावाढ करावी.

कृषीथॉनबाबत ना. खडसे म्हणाले की, आजच्या आणि उद्याच्या शेतीचे स्वरूप कसे असावे, भविष्यातील शेती कशी असू शकते, त्याला कोणते तंत्र पुरक आहे आणि शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी काय उपाययोजना आखता येऊ शकते याचे परिपूर्ण मार्गदर्शन कृषीथॉन या कृषी प्रदर्शनामुळे मिळते. कारण या प्रदर्शनात शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील नैराश्य कमी करणारे सर्व उपक्रम, चर्चासत्रे, तंत्रज्ञानाची माहिती शेतीतील नवनवीन प्रयोग आणि युवा, महिला शेतकऱ्यांकडून केले जात असलेले नवीन प्रयोग यांची माहिती या प्रदर्शनातून अवगत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते कृषी विद्यापीठातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे अॅग्रो डिलर्स असोसिएशन (नाडा) च्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. तसेच, राज्यातील प्रयोगशील युवा शेतकरी, गुणवंत कृषी ‌विद्यार्थी सूची असलेल्या फेअर कॅटलॉग या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रास्तविकात आयोजक संजय न्याहारकर यांनी कृषीथॉन-२०१५ या प्रदर्शनाची रुपरेषा स्पष्ट केली. साहिल न्याहारकर यांनी आभार मानले.

या सोहळ्यात आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सिमा हिरे, गटनेते संभाजी मोरूस्कर, भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, नाडाचे अध्यक्ष विजय पाटील, कृषीथॉन प्रदर्शनाचे आयोजक संजय न्याहारकर, साहिल न्याहारकर, अश्विनी न्याहारकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रकल्प बाधितांची आता मोबदल्याची गैरसोय टळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लघू पाटबंधारे भूसंपादन विभाग-१ आणि राष्ट्रीय हमरस्ता प्रकल्पात संपादीत केलेल्या जमिनींचा मोबदला आता थेट त्या त्या तालुक्यांच्याच ठिकाणी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वारंवार आपल्याच हक्कांच्या पैशांसाठी प्रकल्पग्रस्तांना आता जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत.

विविध विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून खासगी जमिनी संपादीत केल्या जातात. सरकारी दरानेच त्याचा मोबदला मिळेल, अशी अट अशा व्यवहारांमध्ये असते. तरीही नागरिक कधी स्वेच्छेने तर कधी नाईलाजास्तव सरकारी प्रकल्पांसाठी जमिनी देतात. परंतु, अनेकदा त्याचा मोबदला त्यांना वर्षानुवर्षे मिळत नाही. असे अनेक प्रकल्प बाधित अजूनही मोबदल्यासाठी सरकारदरबारी खेटा मारत असून, त्यांना कोणती ना कोणती कारणे सांगून परत पाठविले जात आहे. सरकारी यंत्रणांकडून मिळणाऱ्या अशा वागणुकीमुळे आता शेतकरी तसेच अन्य घटकही सरकारी प्रकल्पांसाठी जमिनी देण्यास धजावत नसल्याचे वास्तव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवसेनेच्या नेत्यांचे काम आनंददायी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय जनता पक्षाला टीकेचे लक्ष्य करण्यापेक्षा शिवसेनेचे नेते कामात रस दाखवून मराठवाड्यातील दुष्काळी भागास भेट देत आहेत, याचा आनंद अधिक असल्याचा टोला महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी लगावला. तर, मुख्यमंत्री गृहमंत्रीपद सांभाळण्यास सक्षम असल्याची पावती देत खडसे यांनी फडणवीसांची पाठराखणही केली.

लेवा समाज मंडळाच्या एका कार्यक्रमानिमित्त ते नाशिकमध्ये आले होते. पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. या विस्तारात शिवसेनेला दोन राज्यमंत्रिपदे मिळू शकतात. मंत्रिमंडळात विस्तारात नाशिकमध्येही मंत्रिपद मिळायला हवे, अशी आग्रही मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून, नाशिकसाठी एखादे मंत्रिपद मिळेल अशी शक्यता आहे, असे ना. खडसे म्हणाले. मात्र हे मंत्रिपद कुणाला मिळणार हा प्रश्न मात्र गुलदस्तातच राहिला. मोठ्या शहरांचे प्रश्न वेगळे असतात. तेथील गुन्हेगारी आटोक्यात आणू तसेच राज्यात जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठीही प्रयत्न करू, असे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घटस्फोट रोखण्यासाठी प्रयत्न गरजेचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजात घटस्फोटीतांचे प्रमाण वाढत असून, वधू-वर सूचींमध्ये घटस्फोटीतांसाठी स्वतंत्र जागा ठेवावी लागणे ही फार चांगली गोष्ट नाही. ग्रामीण भागापेक्षा शहरात आणि त्यातही सुशिक्षितांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. घटस्फोट होऊच नयेत, यासाठी व्यापक स्तरावर सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी केले.

लेवा समाज कल्याण मंडळ, विभागीय मंडळ व समाज बांधवांच्या वतीने आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यात ते बोलत होते. दादासाहेब गायकवाड सभागृहात हा मेळावा झाला. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, जळगावचे आमदार राजूमामा भोळे, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, माजी आमदार वसंत गिते, आयोजक संजय वायकोळे आदी मान्यवर उपस्थित होते. समाजाच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी ५१ हजाराचा धनादेश खडसे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. खडसे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी खडसे म्हणाले, समाज प्रगती करतोय ही गोष्ट आनंददायी असली तरी यामध्ये अपप्रवृत्तींचा शिरकाव वाढला आहे. हुंडा घेण्याचे प्रमाण मोठे असून, हुंडाबळीसारख्या घटनाही घडत आहेत. हुंडा पध्दतीला आळा घालण्याचे आव्हान आपल्याला स्वीकारावे लागेल. हल्ली बहुतांश समाजांचे वधू-वर मेळावे होतात. त्याची वधूवर सूचीही प्रकाशित होते. मात्र त्यामध्ये घटस्फोटीतांचे लक्षणीय प्रमाण असणे ही चिंताजनक बाब आहे. र्दुदैवाने वधू-वर सूचीमधील घटस्फोटीतांची यादी वाढतेच आहे. घटस्फोट होऊच नयेत यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत खडसे यांनी व्यक्त केले.

समाजात मुलींची संख्या कमी होत असून, प्रत्येक मुलीला सु‌शिक्षित आणि नोकरी करणाराच वर हवा आहे. शेती करणारा वर हवा अशी अट कुणीच घालत नाही. त्यामुळे सु‌शिक्षितांना मुली मिळतात. अन्य मुलांचे वय वाढत जाते. शेतकऱ्यांची ही उपेक्षा थांबली नाही तर समाजातील दोन घटकांमधील दरी वाढत जाईल. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मेळावे घेण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हे माझे अपयश

लेवा समाज विवाह सोहळ्यांमध्ये पैसा आणि वेळही मोठ्या प्रमाणावर खर्च करतो. मी अनेक समाजांचे सामुदायिक विवाह सोहळे पाहिले आहेत. जे समाज प्रगत नाहीत ते देखील असे सोहळे करतात. ज्यामध्ये १०० ते ३०० वधू-वरांचे विवाह पार पडले आहेत. मात्र, लेवा समाजात अद्याप सामुदायिक विवाह सोहळा होऊ शकला नाही, हे माझे आणि समाजातील कार्यकर्त्यांचे अपयश असल्याची खंत खडसे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नीतिमूल्यास प्राधान्य हवेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अलीकडील कालाधीत वकिली व्यवसायिकांच्या विरोधातील कट कारस्थानेही वाढत आहेत. व‌किलांवर विविधांगाने दबाव वाढविण्याच्या प्रकरणांमध्ये होणारी वाढ ही चिंताजनक बाब आहे. तरीही, कायदा आणि सुव्यवस्थेच्या ब्रिदाचे रक्षण करण्यासाठी वकिलांनी व्यवसायात नीतिमूल्यांना प्राधान्य देत खडतर आव्हानातून मार्ग काढावा, अशी अपेक्षा केंद्रीय अतिरिक्त महाधिवक्ता अनिल सिंह यांनी केली.

गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्स येथे आयोजित वकिलांच्या दोन दिवसीय मार्गदर्शन सत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा व नाशिक बार असोसिएशन यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन ्कले आहे. वकिली व्यवसायात नव्याने पदार्पण करणाऱ्यांना अद्ययावत कायदे आणि कायद्यातील बारकाव्यांबाबत मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या समस्यांचे मंथन व्हावे यासाठी ही परिषद आयोजित केली आहे.

महाधिवक्ता सिंग यांनी 'वकिलांचे हक्क, अधिकार आणि कर्तव्य' या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की समाजातील ढासळत्या नीतिमत्तेच्या परिणामी गुन्हेगारी प्रवृत्तींकडून वकिलांनाच लक्ष्य करण्याचा धोका वाढला आहे. हे लक्ष्य करणे म्हणजे विविध पध्दतीने वकिलांवर दबाव आणून वादग्रस्त प्रकरणांमध्ये त्यांनाच गोवण्याचा प्रयत्न असू शकतो. अशावेळी वकिलांनी संभ्रमात न पडता केवळ कायदेशीर मार्गाचाच अवलंब करावा्र असे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त महाधिवक्ता अनिल सिंह, मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ राजीव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. परिषदेच्या पहिल्या दिवशी शनिवारी चार सत्र पार पडली. यामध्ये 'वकिलांचे हक्क, अधिकार व कर्तव्य', ऑम्निशन्स अॅण्‍ड कॉन्‍ट्रॅडिक्शन्स', 'बेल प्रोसिजर' आणि 'आयटी इव्हीडन्सेस अॅण्ड आयटी अॅक्ट' या विषयांवरील चर्चासत्रात विधीज्ञ गजानन चव्हाण, मिलिंद ठोंबरे, अविनाश भिडे, आर. वाय. घुमरे, गजेंद्र सानप, पी. के. गांधी, अजय तोष्णीवाल, सुधीर कोतवाल, आदी कायदेतज्ज्ञांनी सहभाग घेतला.

परिषदेचा आज समारोप

या परिषदेच्या समारोपाच्या आजच्या (दि.२९) सत्रात 'कायदा आणि न्याय' क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञांचा सत्कार सोहळा होणार आहे. यावेळी विधीज्ञ जयंत जायभावे लिखीत ' इव्हीडन्स अॅक्ट : अप्रोच टू सिव्हिल ट्रायल' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. या सोहळयासाठी प्रमुख पाहूणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासमवेत भारताचे महाधिवक्ता अनिल सिंह आणि महाराष्ट्राचे विधीज्ञ श्रीहरी अने हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रकार सावंत बंधूंवर असूयेतून होताहेत आरोप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सोशल मीडियावर चित्रकार सावंत बंधू यांच्याविषयी रंगलेली चर्चा अनाठायी असल्याचे आता पुढील चर्चेअंती निदर्शनास येत आहे. चिन चूंग वी या चित्रकाराने केलेले आरोप खोटे ठरताना दिसत असून, सावंत बंधूंच्या बाजूनेही चित्रकार उभे ठाकले आहेत. चिन चूंग वी यांनी काढलेल्या चित्रांसारखेच इतर चित्रकारांचेही चित्र असल्याने त्यालाही कॉपी चित्र म्हणावे का? असा प्रश्न संबंधित चित्रकाराने विचारला आहे. सोशल चर्चेचे हे गुऱ्हाळ लांबत चालले असून, सावंत बंधूंविषयी मात्र काही लोक जाणूनबुजून खोटे किस्से पसरवत आहेत. यावरून या घटनाक्रमामध्ये सावंत बंधूंना गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचे आता स्पष्ट होत आहे.

'सोशल मीडियावर रंगतेय कॉपीचित्र चर्चा' अशा आशयाचे वृत्त 'मटा'मध्ये प्रसिध्द झाले होते. त्यात काहीजणांनी धुराळा उठवून दिल्याप्रमाणे चित्रकार सावंत बंधूंबाबत अमेरिकेच्या घटनेबद्दल पॉक्सनचा संदर्भ जोडून हवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पॉक्सनचा ब्लॉग वाचल्यानंतर असे काहीही सावंत बंधूंच्या बाबत घडले नसल्याचे उघडकीस आले. सोशल मीडियावरून विनाकारण त्यांच्याविषयी हा धुराळा उठविण्यात आला व त्याला आणखी रंजक बनविण्यात आले. हा धुराळा उठत असताना सावंत बंधू मात्र अल्बेनियात होते. तेथेही त्यांना सन्मानाने मार्गदर्शनासाठी बोलाविण्यात आले होते.

राजेश सावंत व प्रफुल्ल सावंत हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहेत. त्यांची कारकीर्द भारताचे नाव उजळवणारी आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात ही मोहीम काही लोकांनी उघडली होती. अल्बेनियाहून परतलेल्या सावंत बंधूंशी याबाबत संवाद साधला असता 'सातत्याने अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके प्राप्त करत असून, अनेक देश आम्हाला सन्मानाने वर्कशॉप्स व प्रात्यक्षिके यासाठी बोलावीत आहेत. नावलौकिक वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रस्थापित चित्रकारांच्या लॉबीला संकट वाटू लागले आहे. आमची ही घोडदौड असूयेतून सोशल मीडियाचा गैरवापर करून रोखण्याचा प्रयत्न काहीजण करीत आहेत. घडल्या प्रकाराला न जुमानता, न डगमगता आम्ही दोघे सावंत बंधू कायम आमच्या कलेची श्रध्देने साधना करून देशाचा नावलौकिक उत्तरोत्तर वाढविण्याचा प्रयत्न करू' अशी प्रतिक्रिया दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनी निर्व्यसनी रहावे

$
0
0

देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये शहीद दिनाचे औचित्यानिमित्त संतकृपा हॉस्पिटल, सहारा व्यसनमुक्ती केंद्र व देवळाली कॅम्प पोलिस स्टेशन यांच्या वतीने आरोग्य तपासणी व व्यसनमुक्ती मार्गदर्शन शिबिर झाले. यावेळी ते बोलत होते. नियमित व्यायाम करून अमूल्य अशा शरीररुपी मंदिराचे पावित्र्य राखा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. डॉ. मनीष बोथरा यांनी पोलिसांचा आहार कसा व केव्हा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश आखाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक लीलाधर पाटील, पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब पाटील, प्रकाश निकम, जयश्री अनवणे, आदी उपस्थित होते. दरम्यान आरोग्य तपासणी शिबिरात सर्व पोलिसांच्या इसीजी, पल्स आदी चाचण्या करण्यात आल्या. मुंबईतील '२६-११'च्या हल्ल्यातील सर्व शहीद पोलिस अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांनी केले पैठणी पर्यटन केंद्राला लक्ष्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला शहरानजीकच्या अंगणगाव येथील पर्यटन खात्याच्या येवला ग्रामीण पैठणी पर्यटन केंद्रालाच चोरट्यांनी लक्ष्य केले. अंगणगाव येथील पोलिस वसाहतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या पर्यटन केंद्रातील जरदोसी साड्यांच्या विक्री केंद्राचे शटर तोडताना अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज शनिवारी मध्यरात्री लंपास केल्याने खळबळ उडाली.

येवला शहर परिसरात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. येवला- नाशिक महामार्गावरील अंगणगाव येथील शासनाच्या पैठणी पर्यटन केंद्रावर शनिवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास प्रवेश करीत चोरी करण्यात आली. येवला ग्रामीण पैठणी पर्यटन केंद्रात पैठणीच्या विक्रीसह माहिती प्रदर्शन केंद्राचे दालने असून, हातमागावरच तयार होणाऱ्या जरदोसी वर्कमधील साड्या विक्री व प्रदर्शनाचेही दालन आहे. स्वतंत्र असलेल्या या दालनाचे शटर चोरट्यांनी लोखंडी रॉडने वाकवून आत प्रवेश करीत सुमारे दीड लाख रुपयांची रोख रक्कम, जरदोसी वर्क असलेल्या ३० हजार रुपये किमतीच्या २० ते २२ साड्या, तीन १५ हजार रुपये किमतीचे शेरवानी असा जवळपास दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.या केंद्रात खासगी सुरक्षारक्षक असतानाही चोरट्यांनी चोरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनमाडच्या गजलक्ष्मी ज्वेलर्समध्ये चोरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड शहरातील गुरुद्वारानजीक असलेल्या गजलक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाचे कुलूप तोडून आणि शटर वाकवून चोरट्यांनी पंचवीस हजार रुपयांचे चांदीचे दागिने चोरून नेले. यामुळे व्यापारी वर्गात भीती निर्माण झाली आहे.

मनमाड शहरात चोरीचे सत्र दिवसागणिक वाढू लागले आहे. या आठवड्यात किराणा व्यापारी वाल्मीक घायाळ यांच्या घरी घरफोडी करून चोरट्यांनी सहा लाखाचा ऐवज लुटल्याची घटना ताजी असताना पुन्हा मध्यवर्ती ठिकाणी धाडसी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. जयशंकर शहाणे यांचे ज्वेलरी दुकान चोरांनी शनिवारी रात्री फोडले. चांदीच्या वस्तू लंपास केल्या. चोरांना तिजोरी फोडता न आल्याने लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने मात्र वाचले.

दरम्यान, या घरफोडीच्या सलग दुसऱ्या घटनेने व्यापारी वर्गात भीती पसरली आहे. शहर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कर्णवाल पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धान्य घोटाळा; चौघे शरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर उघडकीस आलेल्या सिन्नर येथील रेशन धान्य अपहार प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसात मोक्कान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींपैकी चौघे जण र​विवारी संध्याकाळी वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले. यातील मुख्य सूत्रधार अरुण घोरपडे अद्याप फरार असून, त्याला लवकरच ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

हजारो कोटी रुपयांचा धान्य घोटाळा उघडकीस आल्यानंतर वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये संशयित आरोपी संपत घोरपडे, अरुण घोरपडे, विश्वास घोरपडे, रतन पवार व रमेश पाटणकर यांच्यावर मोक्कान्वये गुन्हा दाखल झाला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून धान्य घोटाळ्यातील संशयित फरार झाले. पोलिस त्यांच्या मागावर असताना संशयित त्यांना सातत्याने चकमा देण्यात यशस्वी ठरले. दरम्यान, फरार आरोपींच्या मालमत्तेचा शोध घेऊन त्या जप्त करण्यात यावी, अशा प्रकारची विनंती पोलिसांनी विशेष मोक्का कोर्टात केली होती. कोर्टाने ही विनंती ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस मंजूर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आरोपींच्या मालमत्तेवर टाच आणली. पेट्रोल पंप, प्लॉट, बंगले अशी मालमत्ता जिल्हा प्रशासनाने जप्त केली. एकीकडे आर्थिक नाडी आवळली गेली तर दुसरीकडे पोलिस मागावर असल्याची जाणिव झालेल्या आरोपींपैकी अरुण घोरपडे वगळता इतर संशयित रविवारी संध्याकाळी साडेचार वाजता वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले.

पोलिसांनी त्यांना अटक केली असून आज, सोमवारी सर्वांना कोर्टात हजर करण्यात येईल. सिन्नर तालुक्यातील रेशन दुकानासाठी पाठविण्यात आलेला तांदूळ दुकानात न पोहोचविता तो टेम्पोमध्ये भरून घोटी येथे नेत असताना पोलिसांनी पाठलाग करून वाडीवऱ्हे येथे पकडल्यानंतर या घोटाळ्याचे धागेदोरे समोर आले होते. राज्यात या घोटाळ्याची महती चर्चिली गेल्यानंतर संशयिताविरोधात मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना आरक्षणाची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'दुष्काळामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्या आहेत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ९० टक्के मराठा शेतकरी आहेत. शेतकरी कुटुंबातील तरुणांना गुणवत्ता असूनही आरक्षणाअभावी नोकरी मिळत नाही. आरक्षण मिळाले तर शेतकरी कुटुंबातील तरूण नोकरी करून कुटुंबाला सावरू शकतील. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही. म्हणूनच दुष्काळामुळे उदभवणाऱ्या समस्यांवर आरक्षण हेच उत्तर असून, ती काळाची गरज आहे.' असा मत आमदार नितेश राणे यांनी रविवारी नाशिकमध्ये व्यक्त केले. आरक्षणासाठी मराठ्यांना पेटून उठावे लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.

नाशिक जिल्हा मराठा एक‌ीकरण समितीतर्फे आयोजित मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. रावसाहेब थोरात सभागृहात हा मेळावा झाला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार माणिकराव कोकाटे, माजी खासदार माधवराव पाटील उपस्थित होते.

यावेळी राणे यांनी चौफेर फटकेबाजी करीत राज्य सरकारवर निशाणा साधला. मराठा समाजातील मुले सुशिक्षित आणि गुणवंत आहेत. मात्र आरक्षणाअभावी त्यांना नोकरी मिळत नाही. त्यांचे आई-वडिल अगतिकता व्यक्त करीत आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह शिवसेना भाजप सरकारवर राणे यांनी तोफ डागली. मराठ्यांना सहजासहजी आरक्षण देण्याची फडणवीस सरकारची लायकीच नाही. म्हणूनच आरक्षणासाठी मराठ्यांना तीव्र लढा द्यावा लागेल असे आवाहन त्यांनी केले. विनोद तावडेंनी मराठा आरक्षणाबाबत अनेक बैठका घेतल्या. मात्र काहीच साध्य झाले नाही. वेळप्रसंगी मंत्रीपद त्यागून तावडेंनी मराठ्यांना आरक्षण दिले तर मराठा समाज त्यांना ग्रेट मानेल असे राणे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाराही महिने चालावे कोर्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जनतेसाठी प्रमुख प्राधान्याच्या असणाऱ्या संस्थांपैकी न्यायसंस्था ही एक महत्त्वाची संस्था आहे. दिवाळी आणि मे महिन्यासारख्या कालावधीत दीर्घकालीन सुट्यांच्या परिणामी मोठ्या संख्येने केसेस निर्णयाअभावी राहतात. ही प्रकरणे अधिक शीघ्रगतीने निकाली काढण्यासाठी रोटेशनसारख्या पध्दतींचा अवलंब करून सुट्यांचा समतोल साधावा, अशी संकल्पना महाराष्ट्राचे विधीज्ञ श्रीहरी अने यांनी मांडली.

गंगापूर रोड येथील चोपडा लॉन्समध्ये आयोजित दोन दिवसीय परिषदेच्या समारोपात ते बोलत होते. अने म्हणाले, काळाच्या प्रत्येक टप्प्यावर समाजाचेही स्थित्यंतर होत असते. गुन्ह्यांशी संबंधित घटनांवर, आकडेवरही अशी स्थित्यंतर परिणाम घडवितात. प्रत्येक कार्यास विशेष गती प्राप्त झाल्याने न्यायप्रक्रियेसमोरही कामाच्या तुलनेत तास अत्यल्प ठरतात. त्यातही दीर्घकालीन सुट्यांमुळे या क्षेत्रात महत्त्वाची प्रकरणे लांबणीवर पडतात. यामुळे कोर्टातही रोटेशन किंवा पर्यायी सुट्यांच्या पध्दतीसारखा अवलंब व्हायला हवा, अशी संकल्पना अने यांनी मांडली.

यावेळी बार कौन्सिलचे उपाध्यक्ष सतीश देशमुख म्हणाले, कायद्याच्या प्राथमिक शिक्षणाचे निकष कॉलेज जीवनात पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्षात काम करतानाचे अनुभव अत्यंत वेगळे असतात. सत्य बाजूच्या रक्षणासाठी कौशल्य आत्मसात कशी करावीत अन् ती पणाला कशी लावावीत याचा आदर्श सूक्ष्मनिरीक्षणातून येईल, असा आशावादही देशमुख यांनी मांडला. कौन्सिलचे सदस्य हर्षद निंबाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. समारोपाच्या दिवशीही विविध कायदा विषयक चर्चासत्रे पार पडली.

कायद्याच्या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या वकिलांना यावेळी गौरविण्यात आले. या सत्कारार्थींमध्ये ज्येष्ठ विधीज्ञ एन. ए. गिते, विलास लोणारी, एल. जी. उगांवकर, आर. के. ओढेकर, जे. एच. आहुजा, एम. व्ही. गोरवाडकर, एल. के. निकम, इंद्रभान रायते, एन. जी. गायकवाड, एन. जी. भुतडा, एम. वाय. काळे यांना गौरविण्यात आले.

यानंतर विधीज्ञ जयंत जायभावे लिखीत ' इव्हीडन्स अक्ट : अप्रोच टू सिव्हील ट्रायल ' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती अभय ओक, महाराष्ट्राचे विधीज्ञ श्रीहरी अने आदी उपस्थित होते. समारोपाच्या सत्रात अॅड. नितीन ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपूर्णता दर्शवणारे ‘हयवदन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अपूर्णतेचा शाप मानवी जीवनाला लाभलेला असतो. कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते. निर्मात्याने कुणाला बुध्दी दिलेली असते, तर कुणाला सुंदर शरीर. नाटकातील पद्मिनीला दोन्ही पुरूष जेव्हा भेटतात तिच्या भावना अस्वस्थ होतात. हे 'हयवदन' या नाटकातून सादर करण्यात आले.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ५५ व्या राज्य नाट्य स्पर्धेत के. के. वाघ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सतर्फे रविवारी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हयवदन नाटक सादर करण्यात आले. गिरीश कर्नाड हे भारताचे एक महत्त्वाचे नाटककार नव्या-जुन्याच्या पल‌िकडे जाऊन केवळ नाटक या प्रकाराचाच सातत्याने पाठपुरावा करणारे व्यक्तिमत्व. त्यामुळेच भारतीय परंपरेच्या कक्षा अद्ययावत नवनाट्याशी भिडव‌िण्यात कर्नाड यशस्वी ठरले असून, 'हयवदन' हे नाटक म्हणजे त्याचाच पुरावा आहे. अपूर्णता पूर्ण करण्याचा प्रयत्न असताना मानवी भावभावना संवेदना यांच्यात उडणारी तारांबळ मानवाला अधिक दुखी करत असते. नाटकातील पद्मिनीला बौध्दिकदृष्ट्या आवडणारा देवदत्त आणि शारीरिकदृष्ट्या आवडणारा कपिल हे जेव्हा तिला मिळतात तरी आंतरीक भावभवना तिला अस्वस्थ करते. या अपूर्णतेच्या शापावर आधारीत हे नाटक आहे. नाटकाचे लेखन गिरीश कर्नाड यांचे तर अनुवाद चिं.त्र्य. खानोलकर यांचा होता. दिग्दर्शन रोहित पगारे यांनी केले. यात पद्मिनीची भूमिका प्रिया सातपुते यांनी साकारली तर देवदत्त चैतन्य ढोमसे यांनी साकारला.

कपिलची भू‌मिका सागर पगारे यांनी वठवली. हयवदन जालिंदर कांगणे, भागवत परिष जुमनाके, बाहुबली एक मोहिनी येवलेकर, बाहुबली दोन निवेदिता बार्हे, देवी- कविता गोसावी, नीलेश राजगुरू, अजिंक्य जाधव यांनी विविध भूमिका साकारल्या. नाटकाला साजेस नेपथ्थ प्रा. शैलेद्र गौतम आणि प्रा. विशाल सुतार यांनी साकारले होते. प्रसंगानुरूप संगीत श्रीपाद भालेराव आणि सुविधा यांनी दिले. रंगभूषा माणिक कानडे यांची होती. प्रकाश योजना रवी रहाणे आणि विलास चव्हाण यांनी केली. ध्वनी संकलन मंदार पाटील यांचे होते. निर्मिती सचिन जाधव व प्रा. बाळ नगरकर यांची होती. कार्यक्रमाला नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींसाठी त्रिसूत्रीवर भर देऊ

$
0
0

नाशिक : आदिवासी बांधव अद्यापही मुख्य प्रवाहात आलेले नाहीत. या घटकाच्या सर्वांगिण विकासासाठी आदिवासी विकास मंत्रालयाच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या त्रिसूत्रीवर विशेष भर देण्यात येईल, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिले.

आदिवासी बांधवांचा अद्याप बाह्य जगापासून उपेक्षित राहिलेला उज्ज्वल इतिहासही नव्याने मांडण्यात येईल, अशी ग्वाहीही सावरा यांनी भोसला शैक्षणिक संस्थेत आयोजित वनवासी कल्याण आश्रमाच्या बैठकीत दिली. उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह जळगाव, नंदुरबार आणि धुळे असे चार जिल्हे आदिवासीबहुल आहेत. या जिल्ह्यांमध्येही राज्यातील आदिवासी बांधवांप्रमाणे अद्याप बहुतांश प्रश्न प्रलंबित आहेत. वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आदिवासी परिसरात चालणाऱ्या सेवा प्रकल्पांचे परिक्षेत्रही मोठे आहे. या क्षेत्रात काम करताना येणारे अनुभव आणि जाणवणारी आव्हाने यांच्या मंथनातून आदिवासींसाठी भरीव कामे उभारण्यासाठी या चिंतनपर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, क्षेत्रीय संघटनमंत्री संजय कुलकर्णी, जैताराम पवार, प्रा. लक्ष्मण टोपले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालेभाज्या झाल्या स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आवक वाढल्याने मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक, कांदापात या पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. टोमॅटोचे दरही दहा रुपयांनी कमी झाले आहेत. महागलेल्या डाळी घेणे परवडत नसल्याने हिरव्या पालेभाज्यांचे दर कमी झाल्याने गृहिणींची चिंता काही अंशी कमी झाली आहे.

नोव्हेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्यापासून पालेभाज्यांची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यात पालेभाज्यांचे दर गगनाला ‌भिडले होते. मेथी, कोथिंबीरची जुडी पन्नास ते साठ रुपयांपलीकडे गेली होती. यामुळे सर्वसामान्यांच्या आहारातून या भाज्या हद्दपार झाल्या होत्या. मात्र, या महिन्यात पालेभाज्यांचे दर बऱ्यापैकी आवाक्यात आले आहेत. या भाज्यांच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. रविवारी मेथीची जुडी ८ ते १५ रुपये तर, कोथिंबीरची जुडी ३ ते ८ रुपयांनी विकली गेली.

टोमॅटोचे दरही गेल्या आठवड्यात वाढले होते. सुमारे ३५ ते ४० रुपये किलोप्रमाणे टोमॅटोची विक्री होत होती. मात्र त्याच्या किमतीतही दहा रुपयांनी घसरण झाली आहे. कांदापातचे दरही पाच रुपयांनी कमी झाले आहेत. शेपू सहा ते आठ रुपये जुडी तर पालक मातीमोल भावात विकला जात आहे. यामुळे शेतकरी नाराज असले तरी ग्राहक मात्र समाधानी आहे. वांगे, दोडके, कारले, गिलके यांचे दर अजूनही पन्नाशीच्या आत-बाहेर आहेत. कोबी-फ्लॉवरचे दर जैसे थे आहेत.

कांदा घसरला

बाजारात लाल कांद्याची आवक वाढल्याने दरावर परिणाम झाला आहे. या आठवड्यात कांदा दोन हजाराच्या खाली आला आहे. यामुळे किरकोळ बाजारातही १५ ते २० रुपये किलाप्रमाणे कांद्याची विक्री होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोड बोर झाली बाजारात दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बाजारात अॅपल बोर, कडाखा, उमराण या बोरांची आवक वाढली आहे. यामुळे तोंडाला पाणी आणणारे बोरं वीस ते पत्तीस रुपये किलोप्रमाणे मिळत आहेत. सध्या मागणीही कमी असल्याने दर कमी आहेत. सीताफळ व पपईची आवकही चांगली असून दर जैसे थे आहेत.

साधारणतः जूनमध्ये झाडांना पाणी दिल्यानंतर चार महिन्यांनी फळ परिपक्व होऊन बाजारात दाखल होते. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बोरांची आवक वाढली आहे. अॅपल बोर गेल्या महिन्यापासूनच बाजारात दाखल झाले आहे. मात्र, आता कडाखा व उमराण या जातीची गोड गोड बोर बाजारात दाखल झाल्याने खाणाऱ्यांच्या तोंडाला पाणी आणत आहेत. पपईची आवक वाढूनही तीस रुपये भाव जैसे थे आहे. सीताफळाचे दरही ‌टिकून आहेत. चिकूचे दरही थोडे कमी झाले असून साठ रुपये किलो दराने मिळत आहेत. डहाणू भागातून मोठ्या प्रमाणात चिकूची आवक होत आहे. सफरचंदचे दरही जैसे थे आहेत. अॅपल बोरांची आवक वाढल्याने वीस ते तीस रुपये किलो दराने मिळत आहेत. डाळिंबाची आवक वाढू लागली असून दरात घसरण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरज महिला सक्षमीकरणाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

महिलांचे सक्षमीकरण करणे काळाची गरज आहे. समाजात वावरतांना आणि इतर व्यवसाय करतांना महिलांना अनेक समस्या जाणवतात. महिलांना खंबीरपणे व्यवसायात संधी शोधता आल्या पाहिजे, त्यांची मानसिकता बदलली पाहिजे, सर्व प्रकारचे काम सहज आणि सुलभ पद्धतीने करता आले पाहिजे, अशा अनेक बाबींवर इनरव्हील क्लब ऑफ नाशिकच्या राज्य परिषदेत विचार मांडण्यात आले.

आडगाव नाका येथील श्री स्वामी नारायण मंदिरातील सभागृहात दोन दिवसीय परिषद झाली. यावेळी इनरव्हीलच्या राष्ट्रीय अध्यक्षा अंजली जाधव, ममता अग्रवाल, राज्यस्तरीय अध्यक्षा प्रेरणा बेळे यांच्यासह मराठी अभिनेत्री आदिती सारंगधर, उषा दीदी, अमी सेठ आदींनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.

महिलांनी महिलांसाठी घेतलेल्या या परिषदेत अनेक महिलांनी विविध प्रदर्शनीय वस्तूंचे प्रदर्शन भरविले.

परिषेदत संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात राज्य अध्यक्षपदी प्रेरणा बेळे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीच्या अन्य सदस्यांमध्ये जुलेखा शुक्ल, संगीता घोडगांवकर, गौरी धोड, आरती चौधरी, वैजयंती पाठक (उपाध्यक्षा), अंजली जाधव (क्लब अध्यक्षा), मृदुला जाधव, सुशीला चंद्रशेखर, मधुरा पारखी, कांचन निकम, डॉ. अश्लेषा पाटेकर, पूजा जोशी, लता पिल्लई, आशा पगार आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नवीन बसेस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-पुणे आणि पुणे-नाशिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्होल्वो बसेसपैकी दोन बसेसची किलोमीटर क्षमता संपल्याने त्या सेवेतून बाद करण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. मात्र त्या बदल्यात अद्ययावत वातानुकुलीत चार स्कॅनिया बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत असून, नववर्षाच्या सुरूवातीला ही बससेवा सुरू होईल, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

एकपदरी रस्त्यामुळे नाशिक-पुणे प्रवास नागरिकांना कंटाळवाणा वाटतो. रस्ता रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर असले तरी ते पुर्ण होण्यासाठी आणखी काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे. हा प्रवास सुलभ व्हावा यासाठी या मार्गांवर व्हॉल्वो बसेस चालविल्या जातात. दोन्ही बाजूने व्हॉल्वो बसेसच्या प्रत्येकी तीन फेऱ्या होतात. मात्र यातील काही बसेस मार्गात बंद पडण्याचे, नादुरूस्त होण्याचे प्रकार घडू लागल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडे प्रवासी वळू लागले. महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या आणि गेली अनेक वर्ष पुणे-नाशिक दरम्यान सेवा देणाऱ्या दोन व्हॉल्वो बसेसने किलोमीटरची मर्यादा ओलांडल्याचे महामंडळाच्या निदर्शनास आले. म्हणूनच त्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी पूर्वी इतक्या उपयुक्त ठरत नसल्याचे महामंडळातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

परिणामी नाशिक आणि पुणे अशा दोहो बाजूकडील प्रत्येकी एक व्हॉल्वो बस बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यांचे तिकीट आरक्षणही बंद करण्यात आले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद आणि त्या तुलनेत अपुऱ्या ठरणाऱ्या बसेस यांमुळे प्रवाशांची गैरसोय देखील होत आहे. मात्र ती टाळण्यासाठी अशाच प्रकारच्या लक्झरीयस स्कॅनिया बसेस खरेदी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. या बसेस नववर्षाच्या सुरूवातीला प्रवाशांच्या सेवेत रूजू होतील असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दोन व्हॉल्वो बसेसची सेवा बंद करण्यात आली असली तरी चार नवीन बसेस दाखल होणार असल्याने नाशिक पुणे आणि पुणे नाशिक यादरम्यान एकूण आठ अशा लक्झरीयस बसेस सेवा पुरवू शकणार आहेत. नाशिक ते मुंबई आणि नाशिक ते औरंगाबाद दरम्यानही अशा प्रकारची सेवा पुरवायला हवी अशी प्रवाशांची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघाचे दात मोजणारे मराठेच आमदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारे आम्ही आहोत', असे वक्तव्य करून मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी अलिकडेच टाळ्या मिळविल्या. ही वाक्य फडणवीसांच्या तोंडी शोभत नाहीत. दात मोजण्याचे कॉन्ट्रॅक्ट आता ते घेऊ लागले तर मग बेराजगार झालेल्या मराठ्यांनी वाटीत चणे घेऊन चावत बसायचे का? अशी खोचक टीका आमदार नितेश राणे यांनी रविवारी केली.

मराठा एकीकरण समितीच्या वतीने आयोजित मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यासाठी राणे नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस, विनायक मेटे यांच्यासह अनेकांवर सडकून टीका केली. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांच्यात वाद उदभवला. आवेशात भाषण करताना फडणवीस यांनी वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारे आम्ही आहोत असे वक्तव्य केले. मराठ्यांचे काम फडणवीस केव्हापासून करू लागले असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. वाघ वगैरे म्हणणे हे बाळासाहेब ठाकरेंपुरते ठीक होते. पण फडणवीस यांनी हे काम आपल्याकडे घेऊन तमाम मराठा समाजालाच बेरोजगार केल्याचा टोला राणे यांनी लगावला. आमदार विनायक मेटेंवरही यावेळी राणे यांनी तोफ डागली. शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती पसरविणाऱ्या पुरंदरेंच्या सत्कार सोहळ्यात मेटे पुढच्या रांगेत बसतात, याचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला.

माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनीही यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ, मधुकर पिचड यांच्यावर टीका केली. आपण संख्येने अधिक आहोत, म्हणूनच विखुरले गेले आहोत. त्यामुळे आपल्यात ताकद आणि क्षमता असूनही ती कमी झाल्याची खंत पिचड यांनी व्यक्त केली. आपण विरोधकांची जास्त दखल घेतो, हेच चुकते. मराठा आरक्षण आणि तत्सम कारणांसाठी निवेदन देण्यासाठी का म्हणून भुजबळ, पिचड यांना भेटायचे? आपल्याला मराठा नेते दिसत नाहीत का असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित केला. प्रत्येकजण कर्नल बनू पहात असेल तर सैन्य बनून लढायचे कुणी असा सवालही त्यांनी विचारला. नितेश राणे माझ्यापेक्षा वयाने लहान असले तरी त्यांचे नेतृत्व मला मान्य असल्याचे कोकाटे यावेळी म्हणाले.

प्रक्षोभक भाषण अन् गोंधळ

मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष अविनाश खापे यांनी मनसे नेते राज ठाकरे, माजी मंत्री छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्यावर टीकेची तोफ डागली. मात्र, त्यास एका ज्येष्ठ नागरिकाने आक्षेप घेतला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्या ज्येष्ठ नागरिकाने व्यासपीठाकडे धाव घेतली. परंतु, त्यांना लगेच अडविण्यात आले. 'तुम्ही अपशब्द वापरू नका' असे आवाहन त्यांनी केले. मात्र, 'आम्ही कुणाला भीत नाही. आमचे मत परखडपणेच मांडू' असा इशारा देत ज्येष्ठ नागरिकाला प्रत्युत्तर देण्यात आले. राणे यांनाही या ज्येष्ठ नागरिकाने विरोध केला. मात्र, पुरंदरेना पुरस्कार देतेवेळी अशी विरोध करण्याची हिंमत का दाखविली नाही, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावर व्यवसाय करायचायं फक्त पावती फाडा !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक शहराचा समावेश स्मार्टसिटीत केला असला तरी शहर सुंदर व्हावे यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. शहर परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे हटविणार कोण असा सवाल नाशिककर विचारत आहेत. त्यात 'फक्त पावती फाडा आणि व्यवसाय करा' असे जाहीर रस्ता परवाने मिळत असल्याने त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत बाजार थाटले जात आहेत. याचा त्रास वाहनचालकांना होत असून, शहराचे रूपडे गलिच्छ होत असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करतात.

महापालिकेची वीस, तीस रुपयांची पावती फाडा अन् रस्त्यावर व्यवसाय करा अशीच अवस्था शहरातील अनेक भागात पहायला मिळत आहे. त्र्यंबकेश्वररोडवर अनधिकृत बाजार दररोजच पहायला मिळतो. यात महापालिकेचे कर्मचारी केवळ पावती फाडण्यातच आपली धन्यता मानतात. यात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे भले होत असल्याने यावर कारवाई करणार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.

कोणताही व्यवसाय करताना व्यवसायिकाला गाळा विकत किंवा भाड्याने घ्यावा लागतो. त्यातच शासनाचे सर्व प्रकारचे कर भरून व्यवसायाला परवानगी मिळते. परंतु शहरातील मुख्य रस्त्यांवर महापालिकेची वीस, तीस रुपयांची पावती फाडून व्यवसाय करणाऱ्यांवर अतिक्रमण विभाग कारवाई का करत नाही. याचा फटका इतरांना बसतो.

- शोभा नाईकवाडे,

कापड दुकान व्यवसायिक

प्रत्येक रस्त्यांवर असे व्यवसाय करणारे वाढले आहेत. एकिकडे महापालिका आयुक्त शिस्त लावण्यासाठी गंगापूररोडवर अतिक्रमण मोहीम राबवितात. परंतु या रस्त्यावर महापालिकेची पावती फाडली जात असल्याने या व्रिक्रेत्यांकडे दुर्लक्ष केले जाते. याकडे महापालिका आयुक्तांनी लक्ष घालण्याची गरज आहे.

- जमिल पठाण,

बूट दुकान व्यवसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images