Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पाणी जिल्ह्यातच राहणार हरणबारीचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील हरणबारी धरणातून मोसम नदीपात्रात व केळझर धरणातून आरम नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी सुमारे ३०० शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घातला. सकाळी ११ वाजेच्या सुमाराला येथे ठिय्या आंदोलनही झाले. पाणी जिल्ह्याबाहेर न जाऊ देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी शेतकऱ्यांना दिले.

बागलाण तालुक्यावरही दुष्काळाचे सावट पडले. या परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईस नागरीक व शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते आहे. धरणातील पाणीसाठाही यंदा तळास चालला असून परिसरातील नद्या आटत असल्याने पाणीपुरवठा योजना कोलमडत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मामाकडून भाच्याचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लासलगाव

येथील संजयनगरमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या भांडणाच्या कुरापतीतून चौदा वर्षीय मुलाचा खून चुलत मामाने केल्याची घटना घडली.

पोल‌िस वसाहतीच्या पाठीमागील संजय नगरमध्ये मजुरी काम करणाऱ्या पुष्पा बाळू मोरे यांचा मुलगा सुरज बाळू मोरे पुष्पा यांच्या आई लीलाबाई सदू कुऱ्हाडे यांच्याकडे रहात होता. त्यांच्याच शेजारी राहणारा पुष्पाचा चुलत भाऊ समाधान रतन कुऱ्हाडे हा हे घर माझे असून, ते मला खाली करून द्यावे यासाठी दररोज दारूच्या नशेत धिंगाणा घालून मोरे कुटुंबाला त्रास देत होता.

जागेच्या भांडणावरून (दि.४) शुक्रवारी यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेल्याने आरोपी समाधानने सुरजला दम भरत तुझा काटा काढतो, असे सांगत निघून गेला. त्याच दिवशी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास आरोपीने मोरे यांच्या घरावर दगडफेक करीत धिंगाणा घालण्यास सुरूवात केली. सुरज मोरे आणि आरोपी समाधान रतन कुऱ्हाडे यांच्यात बाचाबाची होऊन मारामारी झाली असता आरोपीने लाथा बुक्क्याने मारहाण केल्याने अंतर्गत रक्तस्रावामुळे सुरज मोरे याचा मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणीत निष्पन्न झाले.

पोलिसांनी आरोपी समाधान यास ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास मनमाड विभागीय पोल‌िस उपाधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोल‌िस उपनिरीक्षक डी. बी. आवारे यांच्यासह पोल‌िस कर्मचारी भाऊसाहेब बिन्नर, शिंदे, एम. ए. शेख, लहरे, इप्पर, शिंदे, मोरे करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुण शेतकऱ्याची तळवाडे येथे आत्महत्या

$
0
0

त्र्यंबकेश्वर : येथून जवळच असलेल्या तळवाडे येथील शेतकरी कुटुंबातील रंगनाथ दामू बोडके (वय २२) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत रंगनाथ हा अविवाहीत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. त्याच्या कुटुंबाला एक हेक्टर ६० आर क्षेत्र जमीन आहे. त्यावर दहा लाखांपेक्षा अधिक कर्ज आहे. कर्जबाजारी किंवा नापिकीला कंटाळून ही आत्महत्या झाली आहे का, याची पडताळणी शासकीय यंत्रणेकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदिनीच्या घरी साजरा झाला आनंदोत्सव!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

अंबड लिंकरोडवरून १५ मे रोजी अपहरण झालेल्या नंदिनीचा शोध शुक्रवारी ४ डिसेंबरला लागला. त्यानंतर अवघ्या नाशिकसह सातपूरकरांनी पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षांव केला. दरम्यान, नंदिनी घरी आल्याने शनिवारी शर्मा कुटुंबीयांनी आनंदोत्सव साजरा केला.

शर्माच्या सर्व मुलांनी शाळेला दांडी मारत नंदिनीसाठी विविध मंदिरांमध्ये पूजा केली. साडेसहा महिने श्रीमंत घरात राहिलेली नंदिनी आज आपल्या आजी व आईच्या कुशीत विसावली होती. परंतु तीन महिने ज्याशाळेत ती जात होती, त्याशाळेतील आठवण तिच्या मनात दाटल्याचे पहायला मिळाले. महेंद्र शर्मा यांनी मुलगी मिळावी यासाठी देवांकडे नवस मागितला असल्याने मंदिरात पूजा केली असल्याचे सांगितले.

'ती' राजकन्याच !

नंदिनी उर्फ खुशी ज्या के. के. वाघ शाळेत शिकत होती. त्या शाळेतील शिक्षकांनी ती राजकन्याच असल्याचे सांगितले. अत्यंत सुंदर व आर्कषक पोशाख परिधान करून ती शाळेत येत असल्याने सर्वांनाच ती आवडत होती. परंतु अचानक अपहरण असलेले खुशी ही नंदिनी असल्याचे समजल्यावर शिक्षकांना देखील आर्श्चयाचा धक्का बसला.

अपहरणकर्त्यांना तीन दिवसांची कोठडी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूर अंबड लिंकरोडवरील नंदिनी शर्मा या चार वर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोघा संशयितांना कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तीन दिवसांच्या चौकशी दरम्यान अपहरणातील अनेक पैलुंवर प्रकाश पडू शकतो.

लिंकरोडवरील पेट्रोल पंपाजवळ राहणाऱ्या महेंद्र शर्मा यांच्या ४ वर्षीय नंदिनीचे १५ मे २०१५ रोजी अपहरण झाले होते. सातपूर पोलिसांनी तब्बल सात महिने जिद्दीने तपास करीत याप्रकरणी शिवदास पुंजा सातपुते (४२) आणि लोकेश पाटील या दोघांना अटक करीत नंदिनीची सुटका केली. शिवदास आणि लोकेशने अपहरणासाठी वापरलेली होंडा अमेझ कार जप्त करण्यात आली असून, शिवदासची पत्नी विद्याचीही पोलिस कसून चौकशी करीत आहेत. शिवदास आणि विद्याला अपत्य नसल्याने आणि दत्तक मुल मिळत नसल्याने शिवदासने त्याच्या मित्रासह अपहरणाचा डाव रचला होता, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पण्ण झाले आहे. अपहरणाच्या एक दिवस आगोदर शिवदासने याच परिसरातील तीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न देखील केला होता. दुर्दैवाने नंदिनीला उचलण्यात दोघे संशयित यशस्वी ठरले. पोलिसांनी अटक केल्यानंतर आज त्यांना कोर्टात सादर केले. युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

याबाबत माहिती देताना सहायक पोलिस आयुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की, संशयित आरोपीचा कॉलेजरोडवरील 'स्पा'शी संबंध असल्याने नंदिनी शर्माच्या अपहरणाच्या निमित्ताने अनेक पैलू समोर आले आहेत. अपहरणाचा प्लॅन नेमका कोणाचा होता? अपह्त नंदिनीच्या अपहरणाचा नेमका उद्देश काय होता? विद्या सातपूतेचा या अपहरणाशी थेट संबंध आहे काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे संशयितांच्या चौकशीमधून समोर येणार आहेत. संशयित आरोपी व त्याच्या पत्नीने नंदिनीचे एका इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये अॅडमिशन घेतले होते. हे अॅडमिशन घेताना संशयितांने काय कागदपत्रे सादर केलीत याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडीवरून आज घमासान?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका धुरणींसाठी कळीचा मुद्दा ठरलेल्या घंटागाडी ठेक्याबाबत सोमवारी जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. घंटागाडी ठेक्याचा कालावधी किती असावा यावरून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये वाद असून, सत्ताधारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

घंटागाडीद्वारे कचरा संकलन करण्याची अभिनव पध्दत सर्व प्रथम महापालिकेने सुरू केली. या योजनेच्या यशस्वीतेबाबत सर्वच स्थरातून कौतुक झाले. मात्र, हळूहळू या योजनेची त्रेधा उडाली. आतातर अनेक महिन्यांपासून मुदतवाढीच्या नावाखाली नवीन ठेकेदाराची नियुक्ती झालेली नाही. दरम्यान, सुरत महापालिकेचे कचरा संकलानाचे काम व्यवस्थित होत असल्याने तेथील पध्दतीचा अवलंब करण्यात यावा, असा आग्रह प्रशासनाकडून सुरू झाला आहे. काही पदाधिकारी व अधिकारी सुरत दौऱ्यावर जाऊन आले आहेत. प्रशासनाने लागलीच सुरतच्या धर्तीवर प्रस्ताव तयार करून महासभेला सादर केला. यावर आज, सोमवारी चर्चा होणार असून, नगरसेवकांकडून या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता आहे.

विभागनिहाय घंटागाडी ठेका देण्याचा निर्णय मनसेच्या काळात झाला. विभागनिहाय घंटागाडी सुरू झाल्यापासून त्यांच्या अनियमीतपणात वाढ झाली. त्यावर दंडाचा उतारा प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र, त्याचीही मात्रा अनियमीतपणाला रोखू शकली नाही. या ठेक्याची मुदत संपल्यानंतर वेगवेगळ्या कारणांमुळे घंटागाडी ठेक्यास मुदतवाढ देण्यात आली. अक्षरशः मुदतवाढ देण्याचा विक्रम सत्ताधारी व प्रशासनाने केला. यावरून टिकेला सामोरे जाणाऱ्या प्रशासनाने इतर महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या. या माहितीच्या आधारे घंटागाडीचा ठेका १० वर्षासाठी देण्यात यावा, असा प्रस्ताव प्रशासनाने तयार करून प्रस्ताव ठेवला आहे. लोकप्रतिनिधी मात्र एवढ्या काळासाठी देण्यासाठी इच्छूक नाहीत. हा प्रस्ताव तयार करताना ठेकेदाराचे हित जोपासले गेल्याचा आरोप लोकप्रतिनिधींकडून होतो आहे. तर कमी कालावधीमुळे ठेकेदारकडून कामामध्ये चालढकल होते. जबाबदारी घेण्यात ठेकेदार कसूर करतात, असा दावा प्रशासनाकडून होतो आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामन्यांचे लक्ष महापालिकेकडे लागले असून, जनतेच्या हिताचा विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे.

रस्त्यांच्या विकासासाठी पैशांची उपलब्धता

शहरातील विविध कॉलनी रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण, अस्तरीकरण करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेसमोर ठेवला आहे. या प्रस्तावाचे स्वागत लोकप्रतिनिधींकडून होत असले तरी सदर कामासाठी कोट्यवधी रूपये खर्ची पडणार आहेत. एकीकडे पैशांअभावी शेकडो कामे खोळंबली असून, दुसरीकडे मात्र हा प्रस्ताव सादर झाल्याने ही कामे पूर्ण होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

मनसेच्या भूमिकेकडे लक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत आल्यानंतर काही महिन्यातच घंटागाडी ठेक्याचा प्रस्ताव महासभेत आला होता. नागरिकांना व नगरसेवकांना सोय‌ीस्कर म्हणून घंटागाडी ठेका वार्डनिहाय करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, सभागृहाच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत सत्ताधाऱ्यांनी विभागनिहाय घंटागाडी पध्दतीने ठेका देण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा घंटागाडीचे भवितव्य मनसेच्या हातात असून, महापौर अशोक मुर्तडक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहो, पोलिसांची ‘हद्द’ निश्चित करा ना !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

हद्दीचा वाद अनेक ठिकाणी असतो, त्यावरून भांडणेही होतात; मात्र खुद्द पोलिस स्टेशनच हद्दीवरून भांडत बसले तर..! अशी परिस्थिती गंगापूर, गोवर्धन शिवारात अपघात घडल्यानंतर नेहमी ओढावते. या भागामध्ये कोणताही गुन्हा किंवा अपघात घडल्यास सातपूर, गंगापूर व तालुका पोलिस स्टेशनामध्ये चक्क बंदूक उगारल्यावर हात वर करतात तसे पोलिस हात वर करून मोकळे होतात. 'मी तो नव्हेच!' असेही नेहमीचे ‌ब्रीद त्यांच्या मुखातून बाहेर पडते अन् अपघाताची तक्रार घेऊन आलेल्याला भोवळ येते. तिन्ही ठिकाणांहून 'ती आमची हद्द नव्हे' असे उत्तर येत असेल तर 'आयुक्तसाहेब तुम्हीतरी लक्ष घाला' असे म्हणण्याची वेळ सामान्य नागरिकांवर येते.

सुटीच्या दिवशी मोजमजेसाठी तरुण मंडळी गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरला जातात. यात एकाच ठिकाणी सातपूर, गंगापूर व तालुका पोलिस ठाण्यांची हद्द आहे. परंतू गंगापूर, गोवर्धनच्या शिवारात अपघात किंवा एखादी दुर्दैवी घटना घडल्यास प्रथम पोलिस हद्द कुणाची याची माहिती घेण्यालाच जास्त महत्त्व देतात. यानंतर तिन्ही पोलिस ठाण्यातील पोलिस माहिती घेण्यासाठी वेळ लावत असल्याने अनेकदा अपघाताच्या ठिकाणी केवळ उभे राहण्याची वेळ अनेकांवर येते. त्यातून अपघातग्रस्ताचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याचा विषय नेमका अदखलपात्र ठरतो.

नंदुरबारचे प्रांत गोवर्धन रस्त्यावरुन सावरगावकडे जाताना त्यांच्या गाडीला एका डंपरने कट मारला होता. यावेळी प्रांत यांनी नाशिक महसुल विभागाला पोलिसांना माहिती देण्याबाबत सांगितले. त्यावेळी पोलिसांनी प्रथम गंगापूर पोलिसांना कळविले. गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी आले खरे, परंतु 'ती' हद्द तालुका पोलिस ठाण्याची असल्याचे सांगत उभे राहिले. यानंतर तालुका पोलिसांना कळविण्यात आले. यात प्रांत यांनाच तब्बल दोन तासांहून अधिक काळ ताटकळत उभे रहावे लागले. यामुळे या भागातील हद्दीचा वाद सुटणार कधी असा सवाल उपस्थित होत आहे. त्यातच पोलिस ठाण्यांच्या हद्दीच्या वादात नेहमीच याभागात मृतदेहांची हेडसांड होत असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. नुकतेच वासाळी शिवाराच्या हद्दीतील पाझर तलावात कुंदन नावाचा तरुण बुडाला होता. याप्रसंगी नागरिकांनी पोलिस व शासनाच्या १०८ नंबरच्या गाडीला बोलावले; परंतु पोलिसांनी मात्र हद्द कुणाची याचा शोध घेत दोन तास घालवले. सातपूर पोलिसांना कळविण्यात आले त्यांनी हद्द गंगापूरची असल्याचे सांगितले.

गंगापूर पोलिसांनी नेमका प्रकार कुठे घडला आहे याची संपूर्ण खात्री केल्यावर हद्द तालुका पोलिस ठाण्याची असल्याचे सांगितले. यामुळे यासर्व प्रकारात तब्बल दोन तासांहून अधिक वेळ वाया गेला. यानंतर सावरगावातीलच मुलांनीच तरुणाला वर काढले होते. परंतु पोलिसांच्या या नेहमीच्या हद्दीच्या वादाने मयत झालेल्याच्या नातेवाईकांना अधिक त्रास सहन करावा लागतो. यावर पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षक यांनी एकत्र बैठक घेऊन एकच हद्द ठेवत तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

जुगाराचे अड्डे बोकाळले

गंगापूर-गोर्वधन शिवारात शहरातील पोलिसी खाक्यामुळे जुगाराचे बंद झालेले अड्डे या भागात पुन्हा सुरु झाले आहेत. त्यातच अनधिकृतपणे सुरु असलेले ढाबे हे मद्दपींची अधिकृत ठिकाणे बनली आहेत. शासकिय अधिकारी या रस्त्यांवरुन जात असताना त्यांना अनाधिकृत ढाबे दिसत नाही, काय असा सवाल रहिवाशी केला आहे. सुटीच्या दिवशी, तर ढाब्यांवर हाणामारीचे देखील प्रकार होतात. मद्यपींनी हाणामारी केल्यानंतरही पोलिस काहीच करत नसल्याचे त्यांना जोर वाढतो आहे. त्यातच या भागात पोलिसांचे पेट्रोलिंगच होत नसल्याने अनधिकृत व्यवसायांचे या भागात वर्चस्व वाढले आहे. पोलिसांच्या हद्दीचा वाद त्यांना पोषक ठरतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक दिवसाच्या अलनिसाला आधार कार्ड !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

पखालरोड परिसरातील रहिवासी अकबर अय्युब शेख यांच्या घरी ५ डिसेंबरला दहा वर्षांनंतर मुलगी जन्मली. याचा आनंद त्यांनी त्याच दिवशी त्या मुलीचे आधार कार्ड काढून साजरा केला. एका दिवसाचे बाळाची आधार नोंदणी यापूर्वी कधीही न झाल्याने त्यांनी आधार नोंदणी तर केलीच शिवाय तिचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आयुर्विमाही काढण्यात आला.

जुने नाशिकच्या पखालरोड परीसरातील विजय टावरमधे राहणारे अकबर अय्युब शेख संगणक आपरेटर म्हणून काम करतात. दहा वर्षांपूर्वी त्यांचा लग्न झाले होते. त्यांना मुलगीच व्हावी, यासाठी त्यांनी नवसही केले होते. शनिवारी त्यांच्याखरी मुलगी जन्मल्याने त्यांनी मुलीचा भविष्य सुरक्षित करण्यासाठी तिचा आयुर्विमा काढला. बँकेत तिच्या नावाने फिक्स डिपाझीट केले व तिचे पहिल्याच दिवशी 'अलनिसा' असे नामकरण करुन जन्माची नोंदणीही केली. त्यानंतर अलनिसाचे आधार नोंदणी करण्यात आली. अलनिसाचे वडील शेख म्हणाले,'मुलींबाबत जनजागृती व्हावी व आधार कार्डचे महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी अलनिसालचे कार्ड काढले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षभरापासून पाणीगळती!

$
0
0

महाराष्ट्रात एकीकडे पाण्यावरून चांगलेच वातावरण तापले असतांना दुसरीकडे मात्र पाणीगळती रोखण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. परंतु, शिवाजीनगरच्या भवर टॉवर भागात एक वर्षांहून अधिक काळापासून जलवाहिनीला गळती लागल्याचे रहिवाशी सांगतात. गळती लागलेल्या जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाणीगळतीमुळे या भागातील रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यातच एका मोकळ्या भूखंडावर पाणी मुरत असल्याने मोठ्या प्रमाणात त्याठिकाणी झाडे वाढली आहेत. पाण्याची गळती रोखावी म्हणून अनेकदा येथील रहिवाश्यांनी पाणीपुरवठा विभागाला निवेदन दिले. परंत, पाणी पुरवठाचे अधिकारी केवळ पाहणी करून निघून जात असल्याचे रहिवाशी सांगतात. होत असलेल्या पाणीगळतीमुळे रस्त्यांवरून चालतांना रहिवाशांची कसरत होत आहे. जपून पाऊले टाकण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळेच महापालिकेने सातत्याने होत असलेली पाणीगळती रोखावी, असे भवर टॉवर परिसरातील रहिवाशांनी आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिककरांची महामानवाला मानवंदना

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त र‌विवारी शहरात विविध सामाज‌िक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले हाोते. विविध संघटना व पक्षांच्या वतीने शाल‌िमार येथील शिवाजी रोडवर असलेल्या डॉ. बाबसाहेब आंबडेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. तसेच शहरातील विविध भागात कार्यक्रमांतून मानवंदना देण्यात आली.

'चरित्र समजावून घ्या'

देवळाली कॅम्प : दलितांच्या उद्धारासाठी आयुष्यभर लढा देणारे डॉ. बाबासाहेब यांच्या खऱ्या कार्याची महान आठवण आजच्या पिढीला होणे गरजेचे आहे. त्यासाठी केवळ बौद्ध धर्मियांनीच नव्हे; तर इतर समाजातील युवकांनी देखील त्यांचे चरित्र वाचत समाजातील प्रखर परिस्थितीशी नाळ जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रशीद सैय्यद यांनी केले. देवळालीत आयोजित ५९ महापरीनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न झोंबाड, शहराध्यक्ष जहांगीर शेख अकिल सैय्यद, अक्रम सैयद, लकी जगताप, दीपक काळे आदी उपस्थित होते.

नूतन विद्यामंदिर

देवळाली कॅम्प : भगूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन विद्यामंदिर येथेही कार्यवाह श. रा. वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात रु. शा. करंजकर यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग कथन केले. कार्यक्रमास सहकार्यवाह म. वि. गायकवाड, मुख्याध्यापिका ल. चं. जोशी, कै. दा. वाघ आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर भाषण केले. सूत्रसंचालन वि. क. म्हसाळ यांनी तर आभार ज. तु. घरे यांनी मानले.

एसव्हीकेटी महाविद्यालय

लामरोड भाटीया कॉलेजसमोर युवा फाउंडेशनचे भीमसैनिकांनी महामानवास अभिवादन केले. या वेळी विश्वनाथ काळे, आर. डी. जाधव, सुभाष बोराडे, पंडित साळवे, पद्माकर दोंदे, राजेश पवार, रवी गायकवाड, विजय निकम, मिलिंद दोंदे, चंद्रकांत गोडसे, सोमनाथ खातळे, रवींद्र दोंदे, रामभाऊ सांगळे, सचिन भालेराव आदी उपस्थित होते. अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन युवा फाउंडेशन चे संस्थापक नितीन साळवे, अनिरुद्ध पगारे तुषार दोंदे, राहुल नेटावटे, संकेत निकम अभिजित जाधव आदींनी केले.

जुन्या नाशिकमध्ये विविध कार्यक्रम

जुने नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने जुने नाशिक परिसरात विविध संस्था व संघटनांच्या बाबासाहेबांना आदरांजली वा‌हिली.

पखाल रोडवरील मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यामंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्या महाजन, सुनील शेवाळे, प्रकाश खैरनार, जयश्री पवार, लक्ष्मण काशिद, मोहन माळी, वैशाली राजभोज, संगीता महाजन, ज्योती महाले, अनिता गायकवाड, प्रशांत गवळी आदी उपस्थित होते. तर हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विजयी दाणी, युवा हिंदु एकता अध्यक्ष करणसिंग बावरी, उदय तायडे, अशोक गांगुर्डे, माधव भोजने, किरणसिंग पवार, अनिल जाधव,

प्रसाद बावरी, दिनेश सकट, राहुल सकट, रोहित लोंढे, दीपक अहिरे आदी उपस्थित होते.

पंचवटीत कार्यक्रम

पंचवटी : पंचवटीतील विविध शाळा व महाविद्यालयात आणि सामाजिक संस्था कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी तथा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.

अमृतधाम येथी विडीकामगार वसाहतीत डॉ. आंबेडकर चौकात झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, महासचिव राजकुमार जेफ, सुरेश नेटावटे, रत्न सांगळे, मांगुलाल जाधव, संजय चव्हाण, हरीसचंद्र जाधव उपस्थित होते. पंचवटीतील विडीकामगार वसाहतीतील मनपाच्या शाळा क्र.६५ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी जेष्ठ शिक्षिका सुशीला पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी वासुदेव रणधीर, जयश्री गांगुर्डे, संगीता देवरे, पुष्पा निकम, लक्ष्मीकांत संत आदी उपस्थित होते.

रमाबाई आंबेडकर-मुंबई आग्रा महामार्गावरील रमाबाई आंबेडकर कन्या शाळेत महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. शाळा समिती अध्यक्ष डॉ. राम पटाईत अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रादेशिक उपायुक्त काशिनाथ गवळे, डॉ. सुनिता खरे, डॉ. संजय जाधव, चंद्रकांत गायकवाड, एकनाथ मोरे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका सरिता जोशी यांनी स्वागत केले. माधुरी जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर लता शिंदे व संजय शिंदे यांनी आभार मानले.

मेरी हायस्कूल

नाएसोच्या सीडीओ मेरी शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रभारी मुख्याध्यापिका आशा डावरे यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक कृष्णा राऊत, मुक्ता सप्रे, मुग्धा काळकर आणि सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

'एनएसजी'तर्फे अभिवादन

एन. एस. जी. फाऊंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिकरोड येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पा नाईकवाडे, अभिजित राउत, किरण पानकर, किरण जाधव, अनुराग तायडे, भूषण सोनवणे, चेतन बोराडे, अमित मैंद, अतुल कोथमिरे, पावन वाघुडे इत्यादी अनुयायी उपस्थित होते.

राष्ट्रवादीकडून अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शालीमार येथील शिवाजी रोडवर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी रंजन ठाकरे, रंजना पवार, अनिता भामरे, संजय खैरनार, अंबादास खैरे, भारत जाधव, महेश भामरे, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब सोनवणे, पंकज राहणे उपस्थित होते.

स्काऊट्स गाईड्स

नाशिक : भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. आंबेडकरांचा जीवनपट येथे उलगडून दाखविण्यात आला. यावेळी जिल्हा चिटणीस राजेंद्र निकम, हेमांगी पाटील, अशोक शिरुडे, गोरख सानप आदी उपस्थित होते.

बाबासाहेबांना अभिवादन

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शालिमार येथील त्यांच्या पुतळयास मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा, पश्चिम सभापती माधुरी खैरनार, नगरसवेक संजय साबळे, नगरसेविका सुमन ओहळ, पोलिस निरीक्षक मधुकर कड आदी उपस्थित होते.

भाजपातर्फे अभिवादन

नाशिक : भारतीय जनता पार्टीतर्फे भाजप कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी विचारवंत बी. के. थोरात, सरचिटणीस सुरेश पाटील, सुनील केदार, प्रशांत जाधव, राहुल निरभवणे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडीवरून आज घमासान?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक महापालिका धुरणींसाठी कळीचा मुद्दा ठरलेल्या घंटागाडी ठेक्याबाबत सोमवारी जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. घंटागाडी ठेक्याचा कालावधी किती असावा यावरून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये वाद असून, सत्ताधारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

घंटागाडीद्वारे कचरा संकलन करण्याची अभिनव पध्दत सर्व प्रथम महापालिकेने सुरू केली. या योजनेच्या यशस्वीतेबाबत सर्वच स्थरातून कौतुक झाले. मात्र, हळूहळू या योजनेची त्रेधा उडाली. आतातर अनेक महिन्यांपासून मुदतवाढीच्या नावाखाली नवीन ठेकेदाराची नियुक्ती झालेली नाही. दरम्यान, सुरत महापालिकेचे कचरा संकलानाचे काम व्यवस्थित होत असल्याने तेथील पध्दतीचा अवलंब करण्यात यावा, असा आग्रह प्रशासनाकडून सुरू झाला आहे. काही पदाधिकारी व अधिकारी सुरत दौऱ्यावर जाऊन आले आहेत. प्रशासनाने लागलीच सुरतच्या धर्तीवर प्रस्ताव तयार करून महासभेला सादर केला. यावर आज, सोमवारी चर्चा होणार असून, नगरसेवकांकडून या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता आहे.

विभागनिहाय घंटागाडी ठेका देण्याचा निर्णय मनसेच्या काळात झाला. विभागनिहाय घंटागाडी सुरू झाल्यापासून त्यांच्या अनियमीतपणात वाढ झाली. त्यावर दंडाचा उतारा प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र, त्याचीही मात्रा अनियमीतपणाला रोखू शकली नाही. या ठेक्याची मुदत संपल्यानंतर वेगवेगळ्या कारणांमुळे घंटागाडी ठेक्यास मुदतवाढ देण्यात आली. अक्षरशः मुदतवाढ देण्याचा विक्रम सत्ताधारी व प्रशासनाने केला. यावरून टिकेला सामोरे जाणाऱ्या प्रशासनाने इतर महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या. या माहितीच्या आधारे घंटागाडीचा ठेका १० वर्षासाठी देण्यात यावा, असा प्रस्ताव प्रशासनाने तयार करून प्रस्ताव ठेवला आहे. लोकप्रतिनिधी मात्र एवढ्या काळासाठी देण्यासाठी इच्छूक नाहीत. हा प्रस्ताव तयार करताना ठेकेदाराचे हित जोपासले गेल्याचा आरोप लोकप्रतिनिधींकडून होतो आहे. तर कमी कालावधीमुळे ठेकेदारकडून कामामध्ये चालढकल होते. जबाबदारी घेण्यात ठेकेदार कसूर करतात, असा दावा प्रशासनाकडून होतो आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामन्यांचे लक्ष महापालिकेकडे लागले असून, जनतेच्या हिताचा विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे.

रस्त्यांच्या विकासासाठी पैशांची उपलब्धता

शहरातील विविध कॉलनी रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण, अस्तरीकरण करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेसमोर ठेवला आहे. या प्रस्तावाचे स्वागत लोकप्रतिनिधींकडून होत असले तरी सदर कामासाठी कोट्यवधी रूपये खर्ची पडणार आहेत. एकीकडे पैशांअभावी शेकडो कामे खोळंबली असून, दुसरीकडे मात्र हा प्रस्ताव सादर झाल्याने ही कामे पूर्ण होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवाजावर हुकूमत असलेला अभिनेता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिग्दर्शनातील हुकूमी एक्का, व्यासंगी व्याख्याता, मार्केटिंगची गणिते जुळविणारा व्यवस्थापक, वेळप्रसंगी कमी पडेल ती भूमिका साकारणारा हरहुन्नरी कलाकार असे एक ना अनेक चेहरे धारण करणारा मुरलीधर खैरनार यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सांस्कृतिक वर्तुळाला पोरकेपण आल्याचे शोकसंदेश कलावंतांनी दिले.

मुरलीधर खैरनार गेल्याची वाईट बातमी कळली. 'वैष्णव' मालिकेच्या निमित्ताने आम्ही एकत्र काम केले होते. त्यावेळी त्यांची मेहनत व जिद्द पाहून खुद्द तात्यासाहेबांनी 'मुरलीधर हा अत्यंत जिद्दी तरूण आहे' अशी कामाची पावती त्यांना दिली होती. नाशिकमधून काहीतरी चांगले निर्माण व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. ते रंगभूमीकडे श्रध्दा म्हणून बघायचे. मोठा माणूस गेला.

-आनंद ढाकिफळे, चित्रकार

एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व. माहितीपट निर्माण करणारा चांगला निर्माता, नाट्यनिर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, कुशल संघटक आता निघून गेला आहे. नियती इतकी क्रुर होईल असे वाटले नव्हते. त्यांच्या शोध कादंबरीला प्रचंड वाचक लाभले. जुलैमध्ये प्रसिध्द झालेल्या त्यांच्या कादंबरीची आता दुसरी आवृत्ती निघणार आहे. साहित्य व कला क्षेत्राची मोठी हानी झाली.-जयप्रकाश जातेगावकर, नाट्य व्यवस्थापक

माझा जवळचा मित्र, अत्यंत स्नेही असलेला लेखक हरपला. शोधच्या निमित्ताने अशा तऱ्हेचे पहिलेच लिखाण मराठीत आले होते. आता तसे लिखाण येणार नाही याची खंत वाटते.

-लोकेश शेवडे, उद्योजक

समकालिन विचार करणारा आणि जसा विचार त्याच पध्दतीने वागणारा, एका आयुष्यात अनेक आयुष्य जगू पाहणारा, एक विचारवंत, संशोधक, संवेदनशील साहित्यिक तरीही स्वत:चे वेगळेपण जपणारा मित्र आज नाशिककरांनी गमावला आहे. 'शोध'च्या निमित्ताने मराठी साहित्यात लोकविलक्षण साहित्याचा प्रवास सुरू झाल्याची नांदी झाली आणि हा प्रवास अचानक थांबला.

- दत्ता पाटील, नाट्यलेखक

रंगकर्मींची मोठी हानी झाली आहे. राजेश शर्मा, अनिता दाते, श्रीपाद कोतवालसारखे कलाकार त्यांनी व्यावसायिक नाटकामध्ये आणले. गाढवाचे लग्न नाटकाची निर्मिती केली. आनंदरंग या त्यांच्या संस्थेतर्फे काही बालनाट्येही केली. ती व्यावसायिकला नेली. कुसुमाग्रज आश्रमशाळेत या नाटकांचे फ्री प्रयोग केलेत. त्यांना व्यावसायिक नाट्यनिर्मितीचे अंग होते. असा चांगला रंगकर्मी आज आपल्यातून निघून गेला.

- राजेश शर्मा, रंगकर्मी

आवाजावर प्रचंड हुकूमत असलेला अभिनेता, त्यांचे हुंकार अवगत करण्याचा आम्ही प्रयत्न करायचो. खर्ज्यातला त्यांचा आवाज प्रसिध्द होता. प्रचंड अभ्यासू, हरहुन्नरी कलावंत कोणतेही काम करण्याची तयारी असलेला अभिनेता. नाशकातून मालिका करणारा पहिला दिग्दर्शक, जबरदस्त व्याख्याता. व्यावसायिक रंगभूमीचे वेड नाशिककरांमध्ये त्यांनीच पेरले.

- अरूण गिते,

अभिनेता

व्यावसायिक रंगभूमीची बीजे पेरण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. गाढवाचे लग्न ३०० हून अधिक यशस्वी प्रयोग, शुभमंगल चे २६ व चुकभूलचे अधिकाधिक प्रयोग केले. अजब देशाची गजब गोष्ट हे नाटक प्रचंड गाजले. रंगमंचावर ते खूप खेळीमेळीचे वात‌ावरण निर्माण करायचे. नाटक चालण्याकरीता काय करायचे याचे पूर्ण ज्ञान त्यांना होते.

-महेश डोकफोडे, रंगकर्मी

गेल्या १५ ते २० वर्षांपासून आमची ओळख होती. खर्ज्यातले दोन अत्यंत गाजलेले अभिनेते नाशिकमध्ये होते. एक म्हणजे अनिल दीक्षित व दुसरे मुरलीधर खैरनार. भारदस्त आवाजातले हे नट नाशिकला सोडून गेले. अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रध्दांजली.

- विनोद राठोड,

प्रकाशयोजनाकार

मराठी कादंबरीमध्ये विलक्षण ऐतिहासिक आणि वर्तमानाची सांगड घालून सामान्य वाचकाला व अभिजात लेखनाच्या वाचकाला बांधून ठेवणारी कलाकृती निर्माण करण्याचे काम मुरलीधर खैरनार यांनी केले. कादंबरी लेखनासाठी भाषिक परंपरा, समाजशास्त्र एकंदर पारंपरिक चालिरिती यांची अभिनव सरमिसळ कादंबरीच्या फॉर्ममधून खैरनार यांनी केली. मराठीच्या मर्यादा शोधल्या व आशय व विषयाला नवीन घाट दिला. असा हा लेखक आपल्यातून निघून गेला आहे.

-राजू देसले, कवी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक

$
0
0

मुंबई-आग्रा हायवेवरील वाहनांची लुटमार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई-आग्रा हायेववर वाहनांना थांबवून लुटमार करणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. टोळीतील तीन सदस्य फरार झाले असून, स्थानिक गुन्हे शाखेमार्फत त्यांचा शोध घेतला जातो आहे. या टोळीच्या अटकेमुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील इगतपुरी, निफाड, चांदवड, मालेगाव तालुक्यांच्या हद्दीतून मुंबई-आग्रा हायवे गेला असून, या महामार्गावर देशभरातील लाखो वाहनांची दररोज वर्दळ असते. याचाच फायदा घेत काही गुन्हेगार रात्रीच्या वेळी रस्त्याला दगड आडवे लावून वाहनधारकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करीत असल्याचे प्रकार घडत होते.

या पार्श्वभुमीवर प्रभारी पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत मोहिते यांच्या यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी हायवेवर गस्त घालण्याचे काम करीत असतात. ४ नोव्हेंबर रोजी पोलिस निरीक्षक किशोर नवले व त्यांच्या पथकातील पीएसआय मच्छिंद्र रणमाळे, सहायक पीएसआय नवनाथ गुरूळे, हवालदार राजेंद्र पाटील, राजेंद्र लहारे, शिवाजी जुंदरे, संदीप हांडगे हायवेवर गस्त घालत होते.

दरम्यान, काही संशयित मुंढेगाव परिसरातील जिंदाल कंपनीच्या परिसरात दरोडा घालण्याच्या तयारी असल्याची माहिती पीआय नवले यांना समजली. आपल्या पथकासह नवले जिंदाल कंपनीजवळील रेल्वे पुलाजवळ पोहचले. तिथे त्यांना रस्त्याच्या कडेला

लहानमोठे दगड दिसून आले. पोलिसांनी खाली उतरून पाहणी केली असता काही व्यक्ती झाडाझुडपांमध्ये लपल्याचे दिसले.

संशयितांना संशय आल्याने त्यांनी अंधारात पळ काढला.

पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. त्यातील अरूण उर्फ संतोष लक्ष्मण धात्रक (२६) आणि सुदाम उर्फ शाम पंढरीनाथ कातोरे (२५) हे पोलिसांच्या हाती सापडले. धात्रक हा इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील तर कातोरे हा पेठरोडवरील कांदा बटाटा मार्केट येथील रहिवाशी आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चाकू, कोयता, लाकडी दांडा, मिरची पूड, पान्हे, स्क्रु ड्रायव्हर असा मुद्देमाल जप्त केला. संशयिताविरोधात मालमत्तेचे अनेक गुन्हे दाखल असून,

यापूर्वी हायेवर केलेल्या लुटमारीचे काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिव्हील’मध्ये ८० प्लास्टिक सर्जरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या व शारिरीक व्यंगाने ग्रस्त असलेल्या जवळपास ८० मुलांवर सिव्हील हॉस्पिटलमध्ये रविवारी मोफत प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. भारतीय जैन संघटना, नाशिकरोड, अखिल भारतीय परमेष्ठी फांऊडेशन आणि सिव्हील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यामाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले

आहे.

लहान मुलांमध्ये आढळून येणारे व्यंग म्हणजेच ओठ कापलेला असणे, चेहऱ्यांवर एखादी जन्मखूण असणे, नाक किंवा डोळ्यांमध्ये असलेल्या व्यंगावर यावेळी शस्त्रक्रिया करण्यात आल्यात. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील नागरिकांनी आपल्या मुलांसोबत सिव्हील हॉस्पिटलमध्ये शनिवारपासून (दि. ५) गर्दी केली. भारतीय जैन संघटनेचे रोशन टाटीया यांनी सांगितले, की जवळपास ३०० पेशंटची शनिवारी नोंदणी करण्यात आली. यातील जवळपास ८० पेशंटवर शस्त्रक्रिया पार पडली असून यासाठी न्यू जर्सी, अमेरीका येथील डॉ. राज लाला आणि त्यांचे पथक कार्यरत असल्याचे टाटीया यांनी सांगितले. डॉ. लाला यांच्या मदतीसाठी सिव्हील हॉस्पिटलमधील डॉक्टर तैनात करण्यात आले. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी सटाणा, कळवण, मालेगाव, घोटीसह ग्रामीण भागातील पेशंट मोठ्या प्रमाणावर आले. या ​शिबिरात शस्त्रक्रिया होऊ न शकलेल्या पेशंटला औरंगाबाद व त्यापाठोपाठ बीड येथे होणाऱ्या मोफत शिबिरात सहभागी होता येणार आहे. औरंगाबाद येथे येत्या ८ व ९ डिसेंबर तसेच बीड येथे १० डिसेंबर रोजी प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दुचाकींची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वेगवेगळ्या भागातून चोरट्यांनी तीन दुचाकींची चोरी केली. पंचवटी परिसरातील चिंचवणरोडवरील एकल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मयूर मागिंलाल जैन (३९) यांची सोसायटीमधून होंडा अॅक्टिव्हा गाडी चोरट्यांनी लंपास केली. पंचवटीतीलच इंद्रप्रस्थ, पेठरोडवरील निर्माल्य रो हाऊसमध्ये राहणाऱ्या सचिन विष्णू भावसार यांची पॅशन प्रो ही दुचाकी चोरट्यांनी चोरी केली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर धोंगडे मळा परिसरात राहणाऱ्या तसद्दक कुर्बन हुसेन यांची नाशिकरोड परिसरातील डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोरील ताज बिल्डींग येथे पार्क केलेल्या दुचाकीवर चोरट्यांनी हात साफ केला. दुचाकीची चोरी होऊन किमान आठवडा उलटला असून यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे स्पष्ट होते. दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे वाहनचोरीचे गुन्हे लागलीच दाखल करून वाहनचालकांचा मनस्ताप तरी कमी करावा, अशी मागणी होते आहे.

वादातून मारहाण

फेरीवाला संघटनेतून काढून टाकल्यामुळे एका जणाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. स्वरूप शरद बोडके असे संशयिताचे नाव असून त्याने अशोक आनंदराव सानप यांना संघटनेच्या वादातून काठीने मारहाण केली. ही घटना १६ व १८ नोव्हेंबर रोजी मेनरोड परिसरातील कासलीवाल यांच्या दुकानासमोर घडली. या प्रकरणी सानप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून घटनेच्या इतक्या दिवसांनी हा गुन्हा का दाखल झाला, याविषयी चर्चा सुरू आहे.

इलेक्ट्रिक साहित्याची चोरी

पेठरोडवरील निलम स्विटस येथील बॅटरी, आर्थिंग रॉड आणि कनेक्टींग केबल असा ६३ हजार ७७० रुपये किंमतीचा मुद्देमाल एक ते चार नोव्हेंबर दरम्यान चोरट्यांनी केला. या प्रकरणी विक्रम शिवराम जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसानी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

तरुणाचा मृत्यू

विजेच्या तारेला अटकलेला पंतग काढताना शॉक बसून सागर रामदास शिरसाठ (२६) या युवकाचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. राणा प्रताप चौक, सिडको भागातील ही घटना असून या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. संक्रातीच्या पार्श्वभूमीवर या घटनांची पुनर्रावृत्ती होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतनेतर अनुदानास पुन्हा सुरुवात व्हावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण क्षेत्रावर सद्यस्थितीत केंद्र सरकारकडून सुमारे तीन टक्के खर्चाची तरतूद केली जाते. तर , राज्य सरकार शिक्षणावर सुमारे २.७५ टक्के तरतूद करते. ही तरतूद वाढवावी. तसेच शैक्षणिक संस्थांचे वेतनेतर अनुदान पुन्हा वेळेवर सुरू करायला हवे, अशी अपेक्षा शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी व्यक्त केली.

महात्मा गांधी विद्यामंदिरच्या वतीने संस्थेंतर्गत पदाधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे चर्चासत्र झाले. यात संस्थेतील प्राचार्य, कुलसचिव, लेखापाल व संस्थेतील शिष्यवृत्तीच्या कामांशी संबंधित कर्मचाऱ्यांचा सहभाग घेतला. यावेळी प्राचार्य डॉ. हिरे म्हणाले, की अगोदरच्या कालखंडात तत्कालीन केंद्र सरकारच्या वतीने शिक्षणावर सुमारे सहा टक्क्यांची तरतूद केली जात होती. आता मात्र ही तरतूद निम्म्याने घटविल्याने मूलभूत सुविधांपासूनही शैक्षणिक क्षेत्राला दूर रहावे लागते आहे. सध्याच्या शिक्षण प्रणालीमध्ये बदल गरजेचेच आहेत. त्यासाठी मूलभूत सुविधांची तफावत मिटविणे व निधीची उपलब्धता करून देणे या बाबींवर सरकारने भर द्यायला हवा, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही. एस.मोरे यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. उच्च शिक्षण विभागाचे समन्वयक प्राचार्य डॉ. बापूसाहेब जगदाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. शालेय शिक्षण समन्वयक एम. एल. पाटील, प्राचार्य डॉ. आर. के. देवरे, मुकूंद कोकीळ, किशोर बिरारी यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सटाण्यातील तिघा युवकांचा अपघाती मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शेमळी फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री उशिरा तवेरा कारला म्हशींची वाहतूक करणाऱ्या ट्रकने समोरून धडक दिल्याने सटाणा शहरातील तीन युवक जागीच ठार झाले, तर दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मालेगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास मालेगावकडून सटाण्याकडे येणारी तवेरा कारला (एमएच २० बीसी ५१३०) मालेगावकडे म्हशी घेवून जाणाऱ्या मालट्रकने (जीजे १६ डब्ल्यू ८७९१) शेमळी ट्याजवळ जोरदार धडक दिली. ट्रकची पुढील दोघेही चाके निखळून पडतानाच तवेरा कार पूर्णत: चिरडत ट्रकखाली सापडली. तवेरा चालक सतीश कैलास परदेशी (वय २६, रा. अहिल्याबाई चौक, सटाणा) याच्यासह रोशन (काळ्या) विजय सोनवणे (वय २३ रा. संतोष नगर, सटाणा) व रौनक शांतीलाल भांगडीया (वय २५ रा. मित्रनगर, सटाणा) हे तिघेही जागीच ठार झालेत. प्रवीण रघुनाथ पवार (वय २२ रा. संतोष नगर मालेगावरोड, सटाणा) व रोशन अनाजी सोनवणे (२३, रा. संतोष नगर, सटाणा) हे दोघे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी मालट्रक चालक गयासुद्दीन दाऊदभाई मन्सुरी रा. झगडीया, सुलतानपुरा गुजरात यास ताब्यात घेतले आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेन स्नॅचर्सला महिलेकडून प्रतिकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबोडून धूम ठोकण्याच्या तयारीत असलेल्या स्नॅचर्सला ५० वर्षीय महिलेने प्रतिकार केला. अनपेक्षित प्रतिहल्ल्यामुळे भांबवलेल्या चोरट्यांनी हातात आलेले सोने घेऊन पोबारा केला. ही घटना रविवारी दुपारी तुपसाखरे लॉन्स परिसरात घडली.

सुनिता आवसकर असे या महिलेचे नाव असून त्या भंडारदरा येथे राहतात. लग्नानिमित्त त्या शहरात आल्या होत्या. दुपारी तुपसाखरे लॉन्स येथील लग्न आटोपून त्या रस्त्याने पायी जात असताना अचानक काळ्या रंगाच्या पल्सरवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र ओरबडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आवसकर यांनी चोरट्यंनी प्रतिकार केला. यात सोन्याची निम्मी पोत चोरट्यांच्या हातात आली. आवसकरांचा प्रतिकार वाढल्याने भांबवलेल्या चोरट्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर लॉन्स परिसरात गस्त वाढवण्याची मागणी केली जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय तोफखान्यामुळे देशसुरक्षा अभेद्य

$
0
0

म. टा. प्रति‌िनधी, देवळाली कॅम्प

भारतीय तोफखाना हा देशाच्या सुरक्षेसाठी अभेद्य सुरक्षा कवच निर्माण करणारा ठरला आहे. त्यात अद्ययावत सुविधा उपलब्ध झाल्याने देशाच्या सुरक्षिततेत अधिकच भर पडली आहे, असे प्रतिपादन लेफ्ट. जनरल ए. के. सहानी यांनी केले.

नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटर येथील ग्यानी स्टेडीयमवर झालेल्या १३ व्या तोफखाना विभागाच्या पुनर्मिलन सोहळा प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी पूर्व सेनाध्यक्ष गर्व्हनर ऑफ पंजाब एस. एफ. रोड्रिक्स, माजी डायरेक्टर लेफ्ट. जनरल पी. आर. शंकर, माजी सेनाध्यक्ष दीपक कपूर आदींसह देशाच्या २८२ आर्टिलरी युनिट, ५४ ब्रिगेड, ३ विभाग, हैदराबाद व नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटरचे आजी-माजी लष्करी अधिकारी उपस्थित होते.

हैदराबाद, नाशिकरोड, सदर्न कमांड व पंजाब येथील डोगरा रेजिमेंट या चारही ब्रॉस बॅण्ड पथकाच्या सुमारे ८० जवानांनी सुबेदार बसबराम पागे यांच्या नेतृत्वाखाली आकर्षक एलइडी गणवेश परिधान करीत उपस्थित अधिकारी व जवानांना मानवंदना दिली. यानंतर लष्कराच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तोफखाना विभागाचा प्रवास भव्य एलइडी पडद्यावर ध्वनिचित्रफितीद्वारे मांडण्यात आला. प्रत्यक्ष युद्धादरम्यान वापरल्या गेलेल्या तोफांचे सादरीकरण करण्यात आले.

तोफांचा उलगडला इतिहास

शेकडो वर्षांपूर्वी दगडाच्या टोकाला दारू बांधून ठिणगीद्वारे निर्माण होणाऱ्या आगीतून तोफेचा शोध लागला. यानंतर मुगल साम्राज्य, शिवाजी महाराज यांनी वापरलेल्या दगडी तोफा आणि त्यानंतर पंजाबच्या शीख साम्राज्यात केलेला पितळ व लोखंडाचा वापर करीत रणगाडे बनविण्यात आले. अफगाणिस्तानच्या पर्वतीय भागात युद्धात भारतीय सेनेने ६ फौंडर गन' या पहिल्या तोफेच्या सहाय्याने मिळवलेल्या विजय याची या कार्यक्रमात सविस्तर माहिती देण्यात आली.

रणभूमीचा आभास

भारतीय तोफेचा प्रवास उलगडतांना अनेकदा प्रत्यक्ष हत्ती, घोडे, उंट यांचा प्रत्यक्षात कसा वापर केला व त्याचबरोबर तोफांच्या माऱ्याच्या होणाऱ्या आवाजाने अनेकांच्या छातीत धडका निर्माण झाला. त्यामुळे आपण प्रत्यक्ष रणभूमीवर उपस्थित असल्याचा भास निर्माण झाला.

गीत संगीताने

शहिदांना मानवंदना

देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक जवानांची नामावली पडद्यावर दाखवत शहीद अधिकारी व जवान यांना 'वंदे मातरम... ए मेरे वतन के लोगो... सबसे आगे होंगे हिंदुस्थानी' अशा गाण्यांनी व ब्रॉस बॅण्ड पथकाच्या ठेक्याने गीत संगीताद्वारे मानवंदना देण्यात आली.

आजी-माजी जवानांची भेट

बऱ्याच वेळी युद्धात सहभागी झालेले अधिकारी व जवानांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या यानिमित्ताने गाठी भेटी या १३ व्या पुनर्मिलन सोहळ्यानिमित्त झाल्या. यावेळी त्यांनी एकमेकांना युद्धभूमीवरील आठवणी व अनुभव कथन केले. कौटुंबीक चर्चाही केल्या. दर पाच वर्षानंतर होणाऱ्या या कार्यक्रमाचे यानंतर २०२० मध्ये आयोजन केले जाणार असल्याचे लेफ्ट. जनरल पी. आर. शर्मा यांनी कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जाहीर केले.



भारतीय तोफांचा प्रवास

भारतात तोफांचा प्रवास सुरू झाला तो ते '६ फौंडर गन'च्या निर्मितीपासून ते १९१७ साली पहिल्या महायुद्धादरम्यान ३.७ इंच हॉवेचर, २५ फौंडर गन, १९४१ साली निर्माण झालेली २ फौंडर गन, ५.५ हॉवेचर गन, १९४४ साली दुसऱ्या महायुद्धादरम्यान २.७५ स्क्रू गन, १८ पौंडर गन, ४.५ एमएम हॉवेचर गन, १९४७-४८ दरम्यान झालेल्या काश्मिर आक्रमणप्रसंगी वापरल्या गेलेल्या २.५ मॉर्चर तोफापासून ते २००७ साली भारतीय तोफखाना विभागात दाखल झालेले ब्राह्मोस मिसाइल सिस्टम, २०१० साली ९० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेले पिनाका रॉकेट सिस्टम पर्यंतचा प्रवास प्रत्यक्ष विविध तोफांचे स्टेडियमवर सादरीकरणाद्वारे उलगडला गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुरलीधर खैरनार यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाट्यदिग्दर्शक व नाट्यलेखक मुरलीधर खैरनार (वय ५८) यांचे रविवारी दुपारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नाशिक अमराधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. खैरनार यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

माहितीपट निर्माता, नाट्यअभिनेता, दिग्दर्शक, व्याख्याता आणि कला संघटक म्हणून खैरनार यांची ओळख होती. शेतकरी संघटनेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणूनही त्यांनी काम केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कादंबरी लिखाणासाठीच्या पहिल्या राज्यस्तरीय शिष्यवृत्तीने त्यांना गौरविण्यात आले होते. सावानाचा कादंबरी लिखाणाचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. त्यांच्या शोध या पहिल्याच कादंबरीने प्रचंड वाचकप्रियता मिळवली. शेतकरी संघटनेच्या ग्यानबा मुखपत्राचे ते संचालक होते. `उठाठेव` साप्ताहिकही त्यांनी काही दिवस चालविले. नाटके : आवर्त, बिरबलाची गोष्ट, जास्वंदीचे ओले हात, आणखी एक नारायण निकम, गाढवाचे लग्न, सिरीयल : वैष्णव बालनाट्य : अजब देशाची गजब गोष्ट



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी वापराबाबत दक्षता घ्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलेले पाणी कुठल्याही परिस्थितीत सिंचनासाठी वापरले जाणार नाही, याची दक्षता घ्या असे आदेश जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. जलाशयांमधील उपलब्ध साठ्यांतून अनधिकृत उपसा होवू नये यासाठी उपाययोजना करा, असेही म्हटले आहे.

यंदा मान्सूनच्या हंगामात पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणे तहानलेली आहेत. बहुतांश धरणे केवळ ५० ते ६० टक्के भरल्याने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे. त्यातच मराठवाड्यासाठी जिल्ह्यातील गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवल्याने नाशिककरांपुढील पाणी टंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे. यंदा नाशिककरांना काटकसरीने पाणी वापरण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. उपलब्ध पाणी साठ्यात नाशिककरांची जुलैपर्यंत तहान भागवायची असल्याने महापालिकेनेही पाणीकपातीचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. धरणांमधील उपलब्ध पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य विनियोग व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आग्रही आहेत. धरणांमधील आरक्षित पाणीसाठा कोणत्याही प‌रिस्थितीत एकाचवेळी धरणातून सोडता येणार नाही असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी धरणातील उपलब्ध पाणी साठा, आरक्षित साठा व प्रत्येक महिन्याच्या शेवटी किती पाणी साठा शिल्लक राहील याचे समयबध्द नियोजन करावे. तसेच प्रत्येक महिन्याच्या अखेरीस त्याचा अहवाल न चुकता जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा असे आदेशात म्हटले आहे.

जबाबदारी अधिकाऱ्यांवर

जेथे नदीपात्रातून पिण्यासाठी पाणी सोडावे लागेल त्या ठिकाणी सोडलेल्या पाण्याचा वापर अन्य कारणासाठी होणार नाही याची जबाबदारी पाटबंधारे विभागासह जिल्हा परिषद, नगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच पंचायत समितीच्या गट अधिकाऱ्यांवर राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


पाणी सोडण्यापूर्वी परवानगी घ्या

पिण्याच्या पाण्याचा वार्षिक नियोजन आराखड्यानुसार आवर्तन सोडण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागावर निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार विद्युत पुरवठा खंडीत करणे, अनधिकृत पाणीउपसा बंद करणे, पिण्याचे पाणी सिंचनासाठी वापरले जाणार नाही, याची काळजी घ्या असे आदेश संबंधीत विभागांना देण्यात आले आहेत. लघु प्रकल्पातून पाणी सोडताना संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images