Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मनमाडमध्ये कडकडीत बंद

$
0
0
नाशिक जिल्हा बँकेचे चेअरमन अद्वय हिरे यांनी मनमाडमध्ये जाहीर सभेतील भाषणात पालकमंत्री छगन भुजबळ, खा.समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्यावर टीका करुन अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समता परिषद व मित्र पक्षांतर्फे मनमाड बंद पुकारण्यात आला होता. व्यापा-यांनी कडकडीत बंद पाळल्यामुळे शहरात शुकशुकाट पसरला होता.

सोन्याला मागणी अधिक; पुरवठा कमी

$
0
0
नाशिकच्या बाजारपेठेत सोन्याला मोठ्या प्रमाणात मागणी असली तरी मागणीच्या तुलनेने पुरवठा कमी होत असल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

सिडकोवासीयांच्या आरोग्याचे तीन तेरा

$
0
0
वातावरणातील बदलांमुळे नाशिक शहरावर सध्या ‌विविध आजारांचे सावट असूनही सिडको परिसरात मात्र जागोजागी कचऱ्याचे ढीगच्या ढीग पडलेले दिसतातत. या कचऱ्यामुळे परिसरातील रहिवाशांना आजारांना सामोरे जावे लागत आहे. घंटागाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने हे घडत असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे.

गुजरातला जाणारा कापूस रोखा!

$
0
0
महाराष्ट्र आज कापूस उत्पादनात अव्वल क्रमांकावर असून राज्यातील उत्तम दर्जाचा कापूस मोठ्या प्रमाणावर गुजरातला जात आहे. त्यामुळे राज्याचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने गुजरातला जाणारा हा कापूस रोखावा, अशी मागणी आपण महाराष्ट्र कापूस परिषदेच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांकडेकरणार असल्याची माहिती खान्देश जिन प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी दिली.

बेकायदा सुरक्षा एजन्सींविरुद्ध गुन्हे

$
0
0
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या तसेच कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची योग्य नोंद न ठेवणाऱ्या पाच खासगी सुरक्षा एजन्सींवर गुन्हे दाखल केले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी एका सुरक्षारक्षकांची चौकशी केली असता त्याची नेमणूक करणारी एजन्सी अधिकृत नसल्याचे समोर आले होते.

नाशिककरांना कोकण पर्यटनाची संधी

$
0
0
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकण सहलींचे आयोजन केले आहे. यात कोकणातील नेहमीच्या स्थळदर्शनाबरोबरच आंबा, काजू, फणस, करवंद या कोकणमेव्याचा आस्वाद घेता येणार असल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक प्रज्ञा बढे यांनी पत्रकाद्वारे दिली.

'महिंद्रा' वाद: उद्धव ठाकरेंची मध्यस्थी

$
0
0
महिंद्रा अँड महिंद्राच्या तळेगाव (इगतपुरी) येथील प्लाण्टमध्ये सुरू असलेल्या टूल डाऊन (कामबंद आंदोलन)बाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केली आहे. त्यानुसार उद्धव यांनी बाचाबाची आणि हाणामारी करणाऱ्या सुनील यादव आणि मदन जाधव यांची गुरुवारी रात्री उशीरा मातोश्रीवर भेट घेतली.

सुरेश वाडकरांचे अपील फोटाळले

$
0
0
जमीन व्यवहार प्रकरणात गायक सुरेश वाडकर यांनी प्रांतांकडे दाखल केलेले अपील अखेर फेटाळण्यात आले आहे. याप्रकरणी प्रांत विनय गोसावी यांनी गुरुवारी निकाल दिला.

'स्थायी'साठी शिवसेना मनसेसोबत

$
0
0
स्थायी समिती सभापतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेची भूमिका ठरवण्यासाठी मुंबईत गुरूवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मनसेसोबत राहण्याचे आदेश दिले असून ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसेचा मार्ग मोकळा झाला आहे. आता, मनसेचे अशोक मुर्तडक आणि रमेश धोंडगे यांच्यापैकी सभापती म्हणून कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

देशांतर्गत वाद ही समस्या

$
0
0
'सीमावाद केवळ भारत-पाकिस्तानात नसून देशातील प्रांतांमध्येही आहे. त्यामुळे आपल्यासाठी सरहद्दीची सुरक्षा हीच समस्या नसून प्रांतवाद, जातीवाद, गरिबी या देशासमोरील मुख्य समस्या आहेत', असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. गुरुवारी नाशिकमध्ये आयोजित भाषणात सरसंघचालकांनी देशांतर्गत व देशाबाहेरील समस्यांवर प्रकाशझोत टाकला.

'नाएसो'च्या बदलत्या शाळा

$
0
0
वर्षानुवर्षे एकच विषय शिकविणारे शिक्षक आणि घोकंपट्टी करणारे विद्यार्थी ही पारंपरिक शिक्षण पद्धती आजही अनेक शाळांमध्ये आहे. परंतु या शिक्षण पद्धतीबरोबर शिक्षकांमध्येही बदल घडवून स्पर्धेत टिकण्यासाठी नाशिक एज्युकेशन सोसायटी (नाएसो) या जुन्या शिक्षण संस्थेने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.

RSSला संपवण्याचे प्रयत्न: भागवत

$
0
0
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे वक्तव्य आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागत यांनी नाशिक येथे केल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र आम्हाला संपवण्याची ताकद कुणातच नाही, असा विश्वासही भागवत यांनी व्यक्त केला आहे.

पर्यावरणपूरक बांधकामांना चालना देणार

$
0
0
बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई)च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी अनंत राजेगावकर यांची निवड करण्यात आली आहे.

'रायझिंग फोटोग्राफर्सचा' अनोखा आविष्कार

$
0
0
सूर्यास्ताच्या वेळी अर्घ्य देणारा भाविक... विस्मरणात गेलेल्या हातगाड्याच्या जीर्ण झालेल्या पायऱ्या, आजुबाजुच्या वातावरणाचा विसर पडलेला व गिऱ्हाईकाची दाढी करण्यात मग्न असलेला नाभिक यासारखे अनेकविध फोटो पाहताना रसिक मंत्रमुग्ध होऊन गेले.

यात्रा सुरू, प्रशासकीय कामे अपूर्णच

$
0
0
शुक्रवारपासून सप्तश्रुंग गडावर चैत्रउत्सव यात्रेची सुरुवात झाली आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. मात्र यात्रा सुरू होऊनही प्रशासकीय पातळीवरील तयारी अजूनही सुरूच असल्याचे दिसून येत होते.

कापूस परिषदेसाठी जळगाव सज्ज

$
0
0
जळगावात आज पहिली महाराष्ट्र कापूस परिषद होत आहे. सकाळी साडे नऊपासून दिवसभर चालणाऱ्या या कापूस परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करणार आहेत.

वाइनच्या दर्जावर कॅपिटलमध्ये विचारमंथन

$
0
0
गेल्या दोन दशकांपासून देशभरात बहरलेल्या वाइन उद्योगाने आता वाइनची व्याख्या आणि दर्जा निश्चित करण्यासाठी ठोस मार्गक्रमण सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून वाइनचा दर्जाबाबत वाइन उद्योगातील स्टेक होल्डरची बैठक वाइन कॅपिटल असलेल्या नाशिकमध्ये शनिवारी होणार आहे.

पुस्तकांशिवाय सुरू झाल्या १० वीच्या व्हेकेशन बॅच

$
0
0
अभ्यासक्रम बदलल्यामुळे अद्यापही बाजारात दहावीची पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. यातच पुस्तके उपलब्ध झाल्याची चुकीची माहिती मिळाल्यामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे पुस्तके उपलब्ध न झाल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे.

तपोवनात चेनस्नॅचिंग

$
0
0
कधी तोतया पोलिस बनून तर कधी पायी चालणाऱ्या महिलांच्या मागून येत सोनसाखळी लांबविण्याचे चोरट्यांचे उद्योग सुरूच आहेत. अता तर चोरट्यांची मजल अंगावर गाडी घालण्यापर्यंत गेली आहे.

'विसा'तर्फे वुमेन्स स्पेशल रॅली

$
0
0
घरकामापासून एअरोस्पेसपर्यंत आपली योग्यता सिद्ध केलेल्या महिलांना आपल्या ड्रायव्हिंगचे कसब दाखविण्याची संधी आहे. निमित्त आहे वेस्टर्न इंडिया स्पोर्ट्स असोसिएशन अर्थात 'विसा'तर्फे आयोजित वुमेन्स स्पेशल कार रॅलीचे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images