Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दामदुपटीने फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या २५ महिन्यांत दाम दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून निफाड तालुक्यातील एका तरुणाची ३७ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. सरकारवाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

एकनाथ सुधाकर नागरे (३७, डोंगरगाव, ता. निफाड) यांनी फिर्याद दिली आहे. ते नायझेरिया येथे एका खासगी कंपनीत नोकरीस होते. मात्र मार्चपासून ते नाशिकमध्ये वास्तव्यास आले आहेत. नाशिकमध्ये साई डे स्टार मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी असून, त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला पुण्यातील मित्र डॉ. शीतल सूर्यवंशी यांनी दिल्याचे नागरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. नागरे यांनी कंपनीचे संचालक विजय वानखेडे, अमोल बाविस्कर, अजय राणे, सिमा वानखेडे, या सर्वांशी संपर्क साधून त्यांची भेट घेतली. ही कंपनी गर्व्हन्मेंट रजिस्टर्ड असून, एक्स्पोर्ट इम्पोर्ट, गोट फार्मिंग, फार्म हाऊस, रियल इस्टेट, कांदा शीतगृह आदी व्यवसायांमध्ये असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. पैसे गुंतविल्यास २५ महिन्यांत दुप्पट होतील, असे आमिषही त्यांना दाखविण्यात आले. नागरे यांनी गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली. कंपनीचे संचालक त्यांना रत्नागिरीतील दापोली येथे एका हॉटेलचे बांधकाम दाखविण्यासाठी घेऊन गेले. हे रिसॉर्ट आमच्या कंपनीचे असून, लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. येथे पैसे गुंतविल्यास त्या पैशांवर २५ टक्के किंवा त्याहून अधिक मोबदला मिळेल असेही त्यांना सांगण्यात आले. नागरे यांनी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. सन २०१३ आणि २०१४ या दोन वर्षांत त्यांनी टप्प्याटप्प्याने विविध बँकांमधील खात्यांच्या माध्यमातून या कंपनीत सुमारे ३४ लाख ६७ हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्याबदल्यात त्यांना दामदुप्पट रक्कम असलेले धनादेश, शेअर्स सर्टिफिकेट देण्यात आले. मात्र काही खात्यांवर रक्कम नसल्याने तर काही खाती बंद झाल्याने धनादेश परत आल्याचे त्यांच्या लक्षात आले. नागरे यांनी संचालकांकडे विचारणा सुरू केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जाऊ लागली. कंपनीचे कार्यालयही बंद असल्याने फसवणूक झाल्याचे नागरे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीसाठी ८४ अर्ज दाखल

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

निफाड, दिंडोरी व चांदवड या तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या निफाड तालुका एज्यकेशन सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक १९ डिसेंबर रोजी होत आहे. संचालक मंडळाच्या सर्वसाधारण १३ जागांसाठी तब्बल ८४ अर्ज दाखल झाले आहेत. तर, शिक्षक प्रतिनिधीच्या दोन जागांसाठी नऊ अर्ज दाखल झाले आहेत.

सर्वसाधारण गटातून विद्यमान अध्यक्ष अॅड. बाळकृष्ण देशमाने, उपाध्यक्ष बाळासाहेब बनकर, सचिव बाळासाहेब जाधव, सहसचिव सोमनाथ मोरे आदींसह माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, भास्करराव बनकर, राजेंद्र डोखळे, चंद्रभान बोरस्ते, रवींद्र मोरे, उध्दव निरगुडे, अॅड. संजय शिंदे, उपसरपंच संजय मोरे, शिवाजी निरगुडे आदी मातब्बरांनी अर्ज दाखल केले आहेत. शिक्षक प्रतिनिधी गटातून विद्यमान शिक्षक संचालक रामराव बनकर, मुकुंद जाधव आदींसह व्ही. एन. मातेरे, मनीषा शेळके, मिलिंद चव्हाण आदी नऊ शिक्षकांनी अर्ज दाखल केले आहेत.

एक ते दोन अपवाद वगळता आतापर्यंत निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. यावेळी निवडणुकीत प्रस्थापितांना धक्के बसण्याचे संकेत दिसत आहेत. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अॅड. बाळकृष्ण देशमाने यांनी अडीच वर्षे अध्यक्षपद बाळासाहेब जाधव यांना देण्याचे कबूल करूनही शब्द पाळला नाही. यामुळे नाराज बाळासाहेब जाधव यांनी यावेळी स्वतंत्र पॅनल निर्माण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भास्कराव बनकर तिसऱ्या पॅनलची निर्मिती करण्याच्या प्रयत्नात आहेत. मतदानावेळी सत्ताधारी गटावर गंभीर आरोप होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारागृहातील कैद्यांचे आश्वासनानंतर बंड मागे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड कारागृहातील कैद्यांनी आश्वासनानंतर अखेर आपले आंदोलन मागे घेतले. औरंगाबादचे (मध्य विभाग) कारागृह उपमहानिरीक्षक राजाभाऊ धामणे आणि नाशिकरोड कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी बुधवारी कैद्यांशी यशस्वी चर्चा केली. कैद्यांच्या मागण्या सरकारला कळविण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

संचित रजेवर जाताना कैद्यांना दहा हजार रुपये अनामत रक्कम ठेवावी लागते. ती पाच हजार करावी तसेच रजेवरून परत येण्यास विलंब झाला तर गुन्हा नोंदवू नये, या दोन प्रमुख मागण्यांसाठी कैद्यांनी दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. संचित रजेवर जाण्याचा हक्क नाकारला जात असल्याचा कैद्यांचा आरोप आहे. मात्र, कारागृह सूत्रांनी त्याचा इन्कार केला. संचित रजा वर्षाला पंधरा दिवस तर अभिवचन रजा वर्षाला ३० दिवस मिळते. ती ९० दिवसांपर्यंत वाढवता येते. उपमहानिरीक्षक संचित रजा तर विभागीय आयुक्त अभिवचन रजा मंजूर करतात. कैदी रजा संपली तरी हजर होत नाही. काही कैदी फरार होतात. पोलिसांत गुन्हा नोंदवून त्यांना पकडून आणावे लागते. अशा कैद्यांना कोर्टात हजर करण्यासाठी आयुक्तालयाकडून पोलिस मिळत नाही. हे ताण टाळण्यासाठीच संचित रजा नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिल्पी पुसदकरला दुहेरी मुकुट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्त्री मंडळ व जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे नुकत्याच झालेल्या उषाताई वैशंपायन स्मृती करंडक जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत खुल्या गटात सिद्धार्थ ठाकूरने, तर १५ व १७ वर्षांखालील गटांत शिल्पी पुसदकर विजेतेपदासह दुहेरी मुकुटाची मानकरी ठरली. अन्य गटांत तनय आखेगावकर, ऋषिकेश होले यांनी विजेतेपद मिळविले.

संस्थेच्या विश्वस्त सुजाता दीक्षित, स्मिता वैशंपायन, अलका कुकडे यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. बॅडमिंटन संघटनेचे सचिव अनंत जोशी, योगेश एकबोटे या वेळी उपस्थित होते. पराग एकांडे, राजू लोहार यांनी सहकार्य केले.

स्पर्धेचा निकाल१० वर्षांखालील वयोगट ः

मुली ः प्रथम- हेतल विश्वकर्मा, द्वितीय- श्रावणी वाळवेकर.

मुले ः प्रथम- प्रज्वल सोनवणे, द्वितीय- अंश दुबे१३ वर्षांखालील वयोगट ः

मुली ः मिहिका थत्ते, द्वितीय- रिया सेठी

मुले ः प्रथम- स्कंद शानबाग, द्वितीय- अमेय खोंड१५ वर्षांखालील वयोगट ः

मुली ः प्रथम- शिल्पी पुसदकर, द्वितीय- आशू खताळे

मुले ः प्रथम- अमेय खोंड, द्वितीय- कौशल शिरोडे१७ वर्षांखालील वयोगट ः

मुली ः प्रथम- शिल्पी पुसदकर, द्वितीय- विशाखा पवार

मुले ः प्रथम- तनय आखेगावकर, द्वितीय- ऋषिकेश होले१९ वर्षांखालील वयोगट ः

मुले ः प्रथम- ऋषिकेश होले, द्वितीय- तनय आखेगावकरपुरुष गट ः

प्रथम - सिद्धार्थ ठाकूर, द्वितीय- अजिंक्य पाथरकरदुहेरी ः

प्रथम- अजिंक्य पाथरकर व विनायक दंडवते, द्वितीय- विक्रांत करंजकर व पराग एकांडे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संसरी नाका, धोका ओ‍ळखा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

दिवसेंदिवस वाढती वाहन संख्या अन् त्यामुळे निर्माण होणारी वाहतुकीची अडचण ही देवळालीकरांना नवीन राहिली नसली तरी लामरोड वरील संसरी नाका येथे असणाऱ्या चौफुलीवर दिवसागणिक अपघातांची वाढती संख्या ही गंभीर बनत चालली आहे. पोलिस व कॅन्टोन्मेन्ट प्रशासनाने याबाबत आता लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.

लामरोडवरील सर्वाधिक वाहतुकीला सामोरे जाणारी एकमेव चौफुली म्हणून या चौफुलीकडे पाहिलेजाते. प्रशासनाने शहराच्या मध्यवर्ती अडथळा नको म्हणून जुन्या बस स्थानकावरून ये-जा करणाऱ्या शहरी बससाठी नवीन बसस्थानक आनंद रोडवर असणाऱ्या मोकळ्या भूखंडावर तयार करीत वाहतुकीची कोंडी फोडली असली तरी संसरी नाक्यावरून ही बस आनंद रोडकडे वळवून देवळाली बस स्थानकाकडे जातेय नेमके सकाळ व सायंकाळच्या वेळी ह्या भागात वाहन चालवतांना मोठी कसरत करावी लागत आहे. बस जेथून वळते, तेथेच संसरी नाका बस थांबा असून, अनेकदा अपघात घडत असतात. बस चालकांनी नियोजित जागी जर बस उभी केली तर त्या ठिकाणी वेळोवेळी निर्माण होणारी वाहतुकीची कोंडी फुटली जाऊन वाहन चालविणे सोयीचे होईल व अपघातांना आळा बसेल.

चौफुलीवर नेहमीच रिक्षाचालकांची गर्दी

संसरी नाका रिक्षा स्टॅन्ड एका बाजूला असून, तेथील रिक्षाचालक नियमाने नंबर लावत, प्रवासी घेत असतात. मात्र, देवळाली कॅम्प व भगुरकडून येणारे रिक्षाचालक व टॅक्सी चालक नेमके चौफुली समोर रिक्षा उभी करीत प्रवासी घेण्यासाठी धडपडत असतात. चौफुलीवर रिक्षा थांबल्याने बसेससह अन्य वाहतुकीवर त्यांच्या या रस्त्यात उभे राहण्याने अडथळा निर्माण होत असतो.

बेलतगव्हाण फाटाही धोकादायकच

लामरोडवर असलेल्या बालगृह रोड व बेलतगव्हाण या दोन्ही रस्त्यांवर जैन धर्मियांची मंदिरे असल्याने या भागात सतत खाजगी प्रवासी बस सतत ये-जा करीत असतात. त्यामुळे येथील चौकात कायमच वर्दळ राहत असते त्याठिकाणी देखील वाहतूकीचा खोळंबा होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनधारकांना हवे एटीएम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बँकांच्या संपामुळे निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळण्यासाठी विलंब होतो. बँकामधील गर्दीमुळे त्यांना तासनतास प्रतीक्षा रांगेत थांबावे लागते. वेतनधारकांची ही गैरसोय दूर व्हावी, यासाठी पेन्शनधारकांना एटीएम कार्ड देण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील पेन्शनधारकांनी बुधवारी मेळाव्यात केली. मात्र, पेन्शनधारकांना एटीएम दिले जाऊ नये, अशी सरकारची भूमिका असल्याने ही मागणी कशी मान्य होणार याकडे लक्ष लागले आहे.

पेन्शनधारकांच्या अडीअडचणींवर चर्चा करण्यासाठी नाशिक जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनमध्ये हा मेळावा झाला. लेखा व कोषागार विभागाचे सहसंचालक बाळासाहेब घोरपडे, नाशिक जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष माधवराव भणगे, जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे सहसचिव प्रकाश तांबट, बँक प्रतिनिधी अनिता अग्रवाल, स्टेट बँकेचे कोषागार मुख्याध्याधिकारी लक्ष्मण गायकवाड, अपर कोषागार अधिकारी संतोष जाधव, सहायक लेखा कोषागार अधिकारी मानसी पाटील आदी यावेळी उपस्थित होते. पेन्शनरांच्या विविध प्रश्नांवर मेळाव्यात चर्चा करण्यात आली. पेन्शनसंदर्भात कोणाकडे तक्रार करावी, या प्रश्नाचे निराकरण येथे झाल्याचे समाधान अनेकांनी व्यक्त केले. बँकांमधून पेन्शनचा धनादेश वटण्यासाठी आठ दिवसांहून अधिक कालावधी लागतो. तर, काही बँकामध्ये पेन्शन मिळविण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते, अशी तक्रार काही पेन्शनधारकांनी केली. बँकामध्ये पेन्शनधारकांसाठी स्वतंत्र काउंटर असावे, अशी मागणीही करण्यात आली. लेखा व कोषागार कार्यालयाचे लवकरच विस्तारीकरण होणार असल्याने पेन्शनधारकांना सुविधा मिळतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. पेन्शनधारकांकडून यावेळी एटीएमची मागणी करण्यात आली. मात्र, त्यांना एटीएम कार्ड दिल्यास त्यांच्या पाल्यांकडून त्याचा गैरवापर होणे किंवा एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेल्यास चोरट्यांकडून लूट होण्यासारखे प्रकार घडू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे वित्त विभागानेच एटीएम न देण्याबाबतचे धोरण स्पष्ट केल्याचे यावेळी सांगण्यात आले. कोषागार कार्यालयातील कार्यप्रणालीत होत असलेल्या बदलाबाबत संघटनेचे अध्यक्ष भणगे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना निवडश्रेणी मिळवून देण्याकरिता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिरावणी परिसरात वाढले अपघात

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकरोडवरील महिरावणी येथील ग्रामपंचायतीच्या समोरील रस्ता दुभाजकावर मागील काही महिन्यांपासून अपघाताची संख्या वाढली आहे. या ठिकाणी संपूर्ण महिन्याभरात साधारणपणे किमान तीन ते चार गंभीर अपघात होत असतात.

सिंहस्थाच्या निमित्ताने त्र्यंबकरोडचे नूतनीकरण झाले. रस्ता प्रशस्त झाला असला तरी त्यासाठी आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव असल्या कारणाने या भागात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महिरावणी येथील ग्रामपंचायती समोरील रस्ता दुभाजकावर होणाऱ्या अपघाताचे प्रमुख कारण म्हणजे येथे गतिरोधकचा असलेला अभाव. प्रामुख्याने रात्री-बेरात्री या ठिकाणी अपघात होतात. त्र्यंबक रस्त्याला हॉटेल्स व बारची संख्या वाढल्याने मध्यरात्री उशिरापर्यंत परिसरात लोकांचा राबता असतो. त्यामुळे अनेकदा रात्रीच्या वेळी होणा-या अपघातांस मद्यप्राशन केलेल्या व्यक्ती कारणीभूत ठरलेल्या आहेत.

तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरमुळे या रस्त्यावर वाहनांचा सतत राबता असतो. तसेच या रस्त्यावर कॉलेजेस तसेच शाळांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शैक्षणिक वाहनेही मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. त्यातुलनेत रस्त्यावर आवश्यक तेथे दिशादर्शक फलक, गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंगचा अभाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खैरनारांच्या आठवणींना शोकसभेत उजळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजातील कोष्टकात कधीही न अडकणारा, कोष्टके उधळू पाहणारा, स्वतःचे मत ठामपणे मांडणारा अशा मुरलीचा स्वर स्वतंत्र होता. त्याचा स्वर त्याला सापडला, त्याने तो मांडला आणि लोकांनीही तो जाणला, ही खरेच मोठी गोष्ट आहे. अशा शब्दात कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे यांनी मुरली खैरनार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात बुधवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. खैरनार यांचे परममित्र धनंजय खराडे यांनी कवितेच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या. स्मृतींचा असा हा बोचतो फुलोरा, तुलाही रुचावा मलाही रुजावा, विपरित जाणे झोंबले, किती हा दुरावा.. या ओळींमधून भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले. नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम यांनीही आपल्या भावनांना यावेळी वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले, मुरलीचा पिंड संघर्षाचा होता. त्याच्या लिखाणातही हा संघर्ष दिसून यायचा. नाशिकची रंगभूमी, कुशल संघटक, परखड सल्लागार व आवाजाची विशिष्ट शैली असलेला कलाकार, दिग्दर्शकाला आपण मुकलो आहोत. अभिनेता भगवान पाचोरे यांनी मुरली खैरनारांचा त्यांना लाभलेल्या सहवासाच्या आठवणी मांडल्या. मकरंद हिंगणे, मिलिंद जहागिरदार, खैरनार यांचे शाळेतील शिक्षक मुरलीधर देवधरे, अ. भा. नाट्यशाखेचे दीपक करंजगीकर आदींनी भावना व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपनगर नाक्याची कोंडी फोडा !

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक नाशिक-पुणे रोड येथील उपनगर नाक्यावर रविवारी अपघातात माय लेकांचा मृत्यू झाला. त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही पावले उचलली नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको व रास्ता खोदो आंदोलन केले. दरम्यान, लोकप्रतिनिधी, महापालिका व राजकीय पक्षांनी या आंदोलनाकडे पाठ फिरविल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, 'त्यांना' नागरिकांच्या समस्यांचे भान राहिले नसेल आम्ही रस्त्यावर उतरत राहणार, असा इशारा उपनगर नाका परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

उपनगर चौकातील सिग्नल यंत्रणा त्वरित सुरु करावी, यासाठी स्थानिक नागरिकांनी नाशिक महापालिका व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. 'दोन दिवसात कार्यवाही करतो' असे त्यावेळी अधिकाऱ्यांकडून आश्वासन देण्यात आले होते; मात्र दोन दिवस उलटूनही प्रशासन हालचाल करीत नसल्याने स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. सोशल मीड‌ियाच्या माध्यमातून उपनगर नाक्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलनात सहभागी होण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याचे अवाहन करण्यात आले. त्यानुसार मंगळवारी सकाळी ११ वाजता उपनगर चौकात नागरिक जमा होऊ लागले. नागरिकांच्या आंदोलनाचा पोलिसांना सुगावा लागताच उपनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त लावण्यात आला.

'यावेळी जोपर्यंत ठोस उपाय निघत नाही तोपर्यंत येथून हालणार नाही' अशी भूम‌िका आंदोलकांनी घेतली. यावेळी पोलिसांनी महापालिका आणि महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवावे व ठोस उपाय काढावा त्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात येईल, असे आंदोलकांनी सांगितले. मात्र बराच वेळ होऊही अधिकारी येत नसल्याने आंदोलकांनी आपल्या सोबत आणलेल्या टिकाव फावड्यांनी रस्ता खोदण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी त्यांना मज्जाव केला; मात्र आंदोलक ऐकण्यास तयार नव्हते. उपनगर बसस्टॉपसमोर असलेले पंक्चर बंद करावे, असा आंदोलकांनी पवित्रा घेतला.

पोलिसांनी वाहन पाठवून तातडीने बॅरिकेड्स आणून रस्ता बंद केला. शेवटी पोलिसांनी बसस्टॅँडसमोरचे पंक्चर बंद केले. आंदोलक ऐकत नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर करुन रवी पगारे व विक्रम कदम यांच्यासह इतर आंदोलकांना अटक केली व उपनगर पोलिस ठाण्यात आणले. आंदोलनाच्यावेळी पोलिस आणि आंदोलनकर्ते यांच्यात झटापटी सुरु असल्याने नाशिक-पुणे रोडवरीचा वाहतूक जाम झाली होती. एकिकडे आंदोलन सुरु असताना रस्त्यावर लावलेल्या बॅरिकेड्समधूनही नागरिक मार्ग काढताना दिसत होते.

दरम्यान, शिखरेवाडी चौकातही अशीच परिस्थिती असल्याने येथेही सिग्नल यंत्रणा बसवावी, अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोख पैसे आणि औषधांचीही सक्ती

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक मेडिक्लेमधारकांनी हॉस्पिटलमधून उपचार घेतल्यानंतर डिस्चार्ज घेतेवेळी चेकचा स्विकार न करणे, रोख पैशांचा आग्रह करणे आणि हॉस्पिटलच्याच मेडिकलमधून औषधांची सक्ती करणे असे प्रकार सुरु आहेत. यामुळे मेडिक्लेमधारक चिंतेत असून, इंडियन मेडिकल असोसिएशनने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

मेडिक्लेमधारकांनी विमा घेतल्यानंतर प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये उपचार घेतेवेळी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हॉस्पिटलचे आडमुठे धोरण हा त्याचा एक भाग आहे. कधी हॉस्पिटलकडून तर कधी विमा कंपनीची अडवणूक मेडिक्लेमधारकांना त्रासदायक ठरते आहे. उपचार घेतल्यानंतर डिस्चार्ज देतेवेळी मेडिक्लेमधारकांकडे रोख पैशांची मागणी होत आहे. मोठी रक्कम असल्याने चेक दिल्यास त्यालाही नकार दिला जात आहे. उपचारांचे एकूण बील ३८ हजार रुपये झाले असता चेक घेण्याचा आग्रह करण्यात आला. पण, रोख पैशांची मागणी करण्यात आली. एटीएममधून दिवसाकाठी इतके पैसे निघू शकत नाहीत. त्यामुळे निम्मे पैसे चेकने आणि निम्मे चेकद्वारे घेण्याची विनंतीही फेटाळण्यात येत आहे. त्यामुळे मेडिक्लेमधारकांची मोठीच अडचण होत आहे. चेक न घेऊन मेडिक्लेमधारकांवर अविश्वासच दाखविला जात आहे.

दरम्यान, याप्रकरणी काही हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क केला असता चेक बाऊंन्स होण्याचे प्रमाण अधिक होत असल्याने खबरदारी म्हणून रोख स्विकारली जाते. शिवाय चेक बाऊन्स झाल्याने त्याचा दंडही भरावा लागतो. शिवाय गुन्हा दाखल करुन खटला दाखल करण्याने कोर्टाच्या चकरा माराव्या लागतात, असे हॉस्पिटलकडून स्पष्ट केले.

हॉस्पिटलला लागून असलेल्या मेडिकलमधूनच औषधे घेण्याची सक्ती अनेक हॉस्पिटलमधून केली जात आहे. अनेकदा या मेडिकलमध्ये चढे दरही आकारले जातात. तर, बाहेरच्या मेडिकलमधून आणलेली औषधे नाकारली जातात. त्यामुळे मेडिक्लेमधारकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. अनेकदा हॉस्पिटल्स त्यांच्याकडीलच औषधे वापरतात. त्याचे कुठलेही बिल मिळत नसल्यानेही मेडिक्लेमधारकांना दावा दाखल करण्यात अडचणी येत आहे.

ऑनलाइन का नाही घेत?

शहरात मल्ट‌िस्पेशालिटी, सुपरस्पेशालिटी अशा दर्जाचे हॉस्पिटल्स कार्यरत आहेत. मात्र, या हॉस्पिटलकडून अद्यापही रोखीने पैसे घेतले जातात. चेकला नकार दिला जातो. मग क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड स्वाईप करण्याचे मशीन का हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केले जात नाही तसेच, नेटबँकिंग किंवा ऑनलाइन पद्धतीने पैसे का स्विकारले जात नाही, असा प्रश्न मेडिक्लेमधारक विचारत आहेत.

(समाप्त)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर परिसर ठरतोय मृत्यूचा सापळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

गंगापूर धरण परिसरात बॅक वॉटरला सुटीच्या दिवशी आनंद घेण्यासाठी तरुण, तरुणी येत असतात. काही जण कुटुंबासहही येत असतात. परंतु, उत्साही तरुण, तरुणींना या भागात असलेले पाण्याचे पाझर तलाव, धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अनेक जण बुडून मरण पावतात. गंगापूर शिवारात गंगापूर धरण, पाझर तलाव व सोमेश्वर धबधबा येथे तरुणांचा रोजच ओढा असतो. जलसिंचन विभाग व पोलिस यंत्रणेने पाण्यात उतरण्यास सरसकट मनाई करण्याची मागणी केली जात आहे.

शहराच्या वाढत्या शहरीकरणात प्रत्येक जण एकांत मिळावा यासाठी ठिकाण शोधत असतो. त्यातही तरुणांची सर्वाधिक पसंती असते ते गंगापूर धरण व सोमेश्वर धबधबा परिसराला. यात आता तरुणांनी आणखी एक ठिकाण शोधून काढले आहे. ते म्हणजे गंगापूर, वासाळी व दुडगाव शिवारात असलेले पाझर तलाव. गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरला दरवर्षी पाच-सात तरुणांचा बुडुन मृत्यु होत असतो. असे असूनही तरुणांचा ओढा गंगापूर धरणाकडे कमी होत नाही. त्यातच पाझर तलावातील पाण्याचाही अंदाज तरुणांना नसतो. यामध्येही बुडून मरण पावल्याच्या घटना घडल्या आहेत.उत्साही तरुण, तरुणी मद्य प्राशन करून सुटीच्या दिवशी गंगापूर धरण परिसरात धिंगाणा घालत असतात. त्यातूनच सुटीच्या दिवशी किमान चार ते पाच अपघात होत असल्याचे येथील रहिवाशी सांगतात. स्थानिक रहिवाशीही पाण्याच्या खोलीबाबत सांगत असत. मात्र, त्यांना उलट पर्यटकांकडून सुनावले जात असल्याने स्थानिकांनी आता सहकार्य करणे बंद केले आहे.

सुरक्षारक्षकच नाहीत

नाशिक जिल्हा व मराठवाड्यासाठी वरदान ठरलेल्या गंगापूर धरणावर सुरक्षारक्षकच नसल्याचे समोर आले आहे. कुणालाही, वाटेल त्या वेळी धरणाच्या बॅक वॉटरला जाऊन मौजमजा करता येते. धरणाच्या पाण्यात वाहनेही उतरविण्याचे प्रकार केले जातात. उन्हाळ्यात पाण्याचा साठा कमी झाल्यावर तर पर्यटकांची अधिक गर्दी होत असते. सहा महिन्यांपूर्वीच एकाने धरणाच्या पाण्यात गाडी उतरवली होती. परंतु, जास्त प्रमाणात गाडीला रेस दिल्याने गाडी जागेवरच पेट घेतला होता. यावेळी उपस्थितांनी गाडीवर माती टाकल्याने गाडीचा स्फोट होता-होता टळला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीला पळविल्याची तक्रार

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

मुलीला राहत्या घरातून पळवून नेण्यात आल्याची तक्रार तिच्या आईने इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. पाथर्डी फाटा परिसरात हा प्रकार घडला. दरम्यान, मुलीला पळवून नेतेवेळी आपणास मारहाण करण्यात आल्याची या महिलेची तक्रार आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आबिद इस्माईल शेख (वय २२) याच्यावर मारहाण तसेच युवतीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्डी फाटा परिसरात एक मराठी कुटुंब राहाते. या कुटुंबातील मुलीस घरात घुसून पळवून नेण्यात आले. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष केले. यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या कुटुंबीयांना धीर दिला. त्यांनी बुधवारी दुपारी पोलिस आयुक्तालयात धाव घेतली. स्थानिक पोलिस दखल घेत नाहीत याचा निषेध करण्यात आला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाला जाग येणार का?

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक मुंबई-आग्रा महामार्गावरील रासबिहारी चौफुली मृत्यूचा सापळा बनली आहे. या ठिकाणी रोज लहान मोठे अपघात घडतात, त्यामुळे या अपघातामध्ये काही लोक मृत्युमुखी पडले तर काहीना कायम स्वरूपी अपंगत्व निर्माण झाले आहे.

अपघात होऊ नयेत म्हणून प्रशासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. या प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांनी अनेकदा आंदोलन व पाठपुरावा केला आहे. मात्र यातून मार्ग निघू शकलेला नाही. अजूनही किती अपघातांनंतर प्रशासन हलणार आहे, असा सवाल नागरिक करू लागले आहेत.

महामार्ग ओलांडावा लागत असल्याने नागरिकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. अपघातांचा प्रश्न सोडविण्यासाठी या चौफुलीवर सिग्नल बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तर भविष्यात हा प्रश्न अधिक तीव्र होणार

असल्याने प्रशासनाने येथे उड्डाणपुलाची व्यवस्था करून वाहतूक नियोजन करावे अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काठेगल्लीतून ट्रक चोरीस

0
0

नाशिक : काठेगल्ली परिसरातील शंकर नगरमधून शनिवारी पहाटे टाटा कंपनीचा ट्रक चोरीस गेला. गजानन मनोहर विनकर (रा. बालाजीनगर, मोरेमळा, जेलरोड) यांनी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यांचा एमएच १५ डीके २५४० क्रमांकाचा चार लाख रुपये किमतीचा ट्रक चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच आहे. दुचाकी, कार या वाहनानंतर ट्रकसारखे मोठे वाहनही चोरट्यांची लक्ष्य बनत आहेत. यामुळे वाहनचालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोजगार मेळाव्याचे आयोजन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कॅनडा कॉर्नर येथील क्रां. व्ही. एन. नाईक एज्युकेशन संस्थेच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे येत्या १५ डिसेंबरला सकाळी १० वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

मेळाव्यासाठी डब्ल्युएनएस ग्लोबल सर्व्हिसेस, मे. शारदा मोटर्स इंडस्ट्रीज लि.सातपूर, मे.आर्ट रबर इंडस्ट्रीज लि.अंबड, मायलॉन लॅबरोटरीज,माळेगांव,सिन्नर, जनरल मिल्स इंडिया प्रा.लि. माळेगांव, सिन्नर आदी उद्योगसंस्थांचे उद्योजक मुलाखत घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. एकूण ट्रेनी पदाची २१५ पदे मेळाव्यात भरण्यात येणार आहेत. एससी, आयटीआय उत्तीर्ण, एचएससी आयटीआय उत्तीर्ण, पदवीधर आदी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना विविध पदांसाठी संधी आहे.

इच्छुक उमेदवारांनी रोजगार स्वयंरोजगार विभागाचे www.maharojgar.gov.in या वेबसाईटवर लॉग इन करुन जॉब फेअर ऑपशन मध्ये अर्ज करावा लागणार आहे. तसेच, मेळाव्यास उपस्थित रहावे लागेल. बेरोजगार युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहाय्यक संचालक म. नि. धाकड यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुठे वाजली घंटा, कुठे लागल्या काळ्याफिती!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य कृती समितीतर्फे गेल्या महिनाभरापासून केल्या जाणाऱ्या विविध आंदोलनांमधील शाळा बंद आंदोलनाला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही शाळा बंद राहिल्या, तर काही शाळांमध्ये मागण्या मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ शिक्षकांनी काळ्या फिती लावून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले. आज दुसऱ्या दिवशी काही शाळा आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता शिक्षक संघटनांना वर्तविली आहे.

राज्यभरातील शाळा बंद ठेवून नागपूरला हिवाळी अधिवेशनावर मोर्चा नेण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य कृती समितीतर्फे करण्यात आले होते. नाशिकमधीलही १८ संघटनांचा यामध्ये सहभाग होता. मात्र याच दिवशी विनाअनुदानित शाळांच्या संघटनांचा मोर्चाही नागपूरला होणार असल्याने शिक्षक व शिक्षकेतरांनी या आंदोलनाला स्थगिती देत १५ डिसेंबरला हे आंदोलन करण्याचे नियोजन केले आहे.

या समितीतर्फे राज्यस्तरावर राबविल्या जाणाऱ्या आंदोलनाचे पहिले तीनही टप्पे सोपस्कारपणे पार पडले. आंदोलनाचा चौथा व शेवटचा टप्पा शाळा बंद आंदोलन करून शिक्षक व शिक्षकेतरांनी नागपूरला जाण्याचे नियोजन केले होते.

यापूर्वीही घंटानाद आंदोलन, झोपमोड आंदोलन व पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले होते. मात्र तरीही सरकारी यंत्रणेकडून कोणतीही सकारात्मक

भूमिका घेतली गेली नसल्याच्या निषेधार्थ थेट नागपूरला हा मोर्चा काढला जाणार आहे. १५ डिसेंबरला शाळा पूर्णतः

बंद ठेवण्यात येणार आहे. शहरातील आरपी विद्यालय, नाशिक एज्युकेशन सोसायटी, मराठा विद्या प्रसारक

संस्थेच्या शाळा सुरू होत्या. तर व्ही. एन. नाईक, महात्मा गांधी विद्यामंदिर आदी संस्थांच्या शाळा बंद होत्या. त्यामुळे शहरात संमिश्र प्रतिसाद लाभल्याचे चित्र होते.

विद्यार्थी-पालक गोंधळात

गेले काही दिवस सातत्याने शाळा बंद आंदोलनाबाबत बिंबवले गेले असल्याने ऐन शाळा बंदच्या दिवशी शाळा खरेच बंद आहे की नाही, याबाबत विद्यार्थी-पालकांचा मोठा गोंधळ उडाला. अनेकांनी सकाळीच शाळांमध्ये फोन करुन खात्री करुन घेतली. तर काही ठिकाणी शाळा वाहतूकदारांच्या गाड्याच घरासमोर येऊन उभ्या राहिल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यात आले.
रिक्षाचालक, पालक यांनी विद्यार्थ्यांना शाळेत आणून सोडल्यामुळे शाळा सुरू ठेवाव्या लागल्या. या संपाला शंभर टक्के पाठिंबा आहे. मागण्या मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ सर्व शिक्षकांनी काळ्याफिती लावून तास घेतले.

- राजेंद्र निकम, अध्यक्ष,

नाएसो शिक्षणमंडळ

शाळा बंदला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. ज्या शाळांपर्यंत शाळा बंदची माहिती पोहोचली नव्हती, त्या शाळा सुरू होत्या. आज मात्र अनेक शाळा या आंदोलनात सहभागी होतील. तसेच येत्या १५ व १६ डिसेंबरलाही शाळा बंद आंदोलन जोर धरेल.

- मोहन चकोर,

उपाध्यक्ष, नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारपासून हेल्मेट, सीटबेल्ट सक्ती

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने रस्ता सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या हेल्मेट आणि सीटबेल्ट सक्ती मोहिमेचा दुसरा टप्पा १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत शहरात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात या विभागाने ८६४ कारवाया केल्या असून, ४५० वाहनधारकांचे समुपदेशन केले.

हेल्मेट तसेच सीटबेल्टच्या वापराअभावी अनेक वाहनधारकांचा नाहक बळी जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशाचा आधार घेऊन नाशिकमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत केळकर यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा दिवाळीपूर्वी शहरात राबविण्यात आला. दोषी वाहनधारकांचे समुपदेशन करतानाच त्यांच्याकडून ४८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आता सोमवारी १४ डिसेंबरपासून मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू होत असल्याची माहिती कळसकर यांनी दिली.

मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात हेल्मेट, सीटबेल्ट, वाहन चालवताना मोबाइलचा वापर आणि अतिभार वाहून नेण्याच्या गुन्ह्यात दोषी आढळलेल्या सुमारे ९५० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये हेल्मेटचा वापर न करणारे ८४५, सीटबेल्ट न लावणारे १९ आणि वाहन चालविताना मोबाइलचा वापर व अतिभार वाहून नेताना दोषी आढळलेल्या ७२ वाहनधारकांचे परवाने निलंबनाची कारवाई केली आहे.अशी होणार तपासणी

सोमवार : नाशिक-पेठ व नाशिक- मुंबई रोड

मंगळवार : नाशिक-दिंडोरी व नाशिक - त्र्यंबकेश्वर रोड

बुधवार : नाशिक - धुळे व नाशिक - गंगापूर रोड

गुरुवार : नाशिक - औरंगाबाद व कॉलेज रोड

शुक्रवार : नाशिक - पुणे रोड व उंटवाडी, सिडको रोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केटीएचएमचे शनिवारपासून श्रमसंस्कार शिबिर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मविप्रच्या केटीएचएम कॉलेजचे श्रमसंस्कार शिबिर शनिवार (दि. १२) पासून सुरू होणार आहे. यंदा नाशिक तालुक्यातील सिध्द पिंप्री येथे हे शिबिर होणार आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता या शिबराचे उद्‍घाटन होणार आहे.

अध्यक्षस्थानी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रचे चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक मुरलीधर पाटील, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, पंचायत समितीचे उपसभापती अनिल ढिकले, जिल्हा परिषदेच्या सदस्या अल्का साळुंके, भाऊसाहेब ढिकले हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शिबिरात व्यक्तिमत्व विकास व सामाजिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल. शनिवारी 'युवक व्यसनाधिनता व महिला आरोग्य' या विषयावर डॉ. सुनील व डॉ. प्रतिभा औंधकर, दि. १३ रोजी 'आपत्ती व्यवस्थापनात युवकांची भूमिका' प्रा. योगेंद्र पाटील यांचे, दि. १४ रोजी 'स्वच्छ व स्वस्थ भारत' या विषयावर जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, दि. १५ रोजी 'ग्रामविकास योजना' या विषयावर गटविकास अधिकारी रविंद्र परदेशी, दि. १६ रोजी 'स्पर्धा परीक्षा एक आव्हान' या विषयावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, दि. १७ रोजी 'व्यक्तिविकास व मुलाखत तंत्र ' या विषयावर डॉ. सतीश श्रीवास्तव, दि. १८ रोजी 'माती व पाणी परीक्षण व जीआयएस मॅपिंग' या विषयावर प्रा.बी.एम.पडवळ , प्रा. आर. आर. मिश्रा हे मार्गदर्शन करणार आहेत. शुक्रवार दिनांक १८ डिसेंबर रोजी शिबिराचा समावेश होणार आहे. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रताप सोनवणे, सभापती नितीन ठाकरे, दैनिक सकाळचे संपादक श्रीमंत माने, संचालक नाना महाले उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जळगावच्या चिमुरड्यांनी जिंकली मने

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने आयोजित तेराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत बुधवारी जळगावच्या चिमुरड्यांनी चांगलीच रंगत आणली. परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे ही बालनाट्ये सुरू आहेत. बुधवारी सर्वच बाहेरगावची बालनाट्ये सादर झाली. यावेळी मुलांनी अप्रतिम अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली. विशेषत: शेतकरी आत्महत्येच्या विषयावर असलेले 'दुष्काळ' हे नाटक सर्वांचं मन हेलावून गेले.

बुधवारी इगतपुरी येथील नूतन मराठी शाळेतर्फे 'सूर्याची लेकरे' हे नाटक सादर झाले. लेखन व दिग्दर्शन दीपक नारळे, प्रकाशयोजना नीलेश कोठावदे, नेपथ्य कैलास एकलारे, रंगभूषा अर्चना खैरनार तर संगीत मेघराज भोये यांचे होते. नाटकात ओवी कुलकर्णी, तन्वी अहिरे, मृण्मयी बिडे, प्रज्ञा पवार, अनामिका निकम व क्रांती सरोदे यांनी भूमिका केल्या. त्यानंतर कोकमठाण येथील ओम गुरूदेव गुरूकुलतर्फे होळी नाटक सादर करण्यात आले. लेखन पांडूरंग घांग्रेकर यांचे होते तर दिग्दर्शन संजय निकुंभ यांनी केले. नेपथ्य योगेश निळे, वेशभूषा अजित पवार व अमोल शिंदे, रंगभूषा सिध्दी गाडगीळ, ज्ञानेश्वर भिंगारे, प्रकाशयोजना भगवान सूर्यवंशी, संतोष मेढे, संगीत दीपक सूर्यवंशी व तालतंत्र समाधान चव्हाण यांचे होते. नाटकात रसिक जाधव, ज्ञानेश्वरी गायकवाड, आत्मका जाधव, भक्ती जाधव यांनी भूमिका केल्या.

जळगावच्या पी. एम. मुंदडे विद्यालयातर्फे 'उडाणटप्पू' हे नाटक सादर झाले. लेखन प्रदीप भोई, दिग्दर्शन रविकुमार परदेशी, प्रकाशयोजना कल्पेश नन्नावरे, नेपथ्य भाग्यश्री मनोहर, रंगभूषा व पार्श्वसंगीत पूनम परदेशी यांचे होते. नाटकात सपना पाटील, जयेश विसावे, सचिन सपकाळे, तनुश्री सपकाळे, चारूशिला सोनवणे, दर्शन सोनार, गौरव बाविस्कर यांनी भूमिका केल्या.

जळगावच्या मानवता शिक्षण मंडळातर्फे दुष्काळ हे नाटक सादर करण्यात आले. यात लेखन व दिग्दर्शन हनुमान सुरवसे यांनी केले. प्रकाशयोजना निखील मिस्तरी, नेपथ्य सागर भडगर, रंगभूषा मिलिंद येवतेकर यांनी केली. नाटकात लखन मोरे, तुषार पाटील, नीलेश भालेराव, यश मोरे, मयूर मरसाळे, कृष्णा जमदाळे यांनी भूमिका केल्या.

राहुरीच्या नटेश्वर मंडळातर्फे 'शाळा वाट पहाते' हे नाटक सादर करण्यात आले. लेखक दिग्दर्शक प्रशांत सूर्यवंशी, प्रकाशयोजना संजय वाणी, पार्श्वसंगीत राजेंद्र क्षीरसागर, नेपथ्य विशाल तागड, रंगभूषा देवीदास जगधने तर विशेष सहाय्य गणेश इंघे व राजेंद्र विधाटे यांचे होते. नाटकात आदर्श नालकर, केतन घाडगे, श्रीकांत भगत, प्रतीक कवडीवाले, आदित्य घाडगे, सई सूर्यवंशी व कृपा आनारसे यांच्या भूमिका होत्या.

आजची नाटके

सपान - कृपा संस्था, नाशिक, स. १० वा. अंधार फुले - लोकहितवादी मंडळ, स. ११. १५ वा. बुळबुळे - दूध उत्पादन संस्था, जळगाव, दु. १२. ३० वा. भूत, भविष्य, भुतावळ - नाशिक शिक्षण मंडळ, नाशिक, दु. १. ४५ वा. हे तुम्हीही करू शकता - प्रताप विद्यालय, भुसावळ, दु. ३ वाजता. थेंबांचे टपाल - लोकमान्य मंडळ, जामखेड, दु. ४. १५ वाजता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ ठेकेदाराला मिळणार बिल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीदरम्यान साधुग्राममध्ये स्वच्छता करण्यासाठी स्थायी समितीने नाकारलेल्या विशाल इंटरप्राईजेस या ठेकेदाराच्या बिलाला अखेर स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्याला लवकरच बिल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

साधुग्राममध्ये स्वच्छता कुणी करायची, याबाबत अनेक सभासदांमध्ये मतभेद होते. साधुग्रामचा ठेका वॉटर ग्रेस या कंपनीला द्यावा असे काहींचे म्हणणे होते, तर काही सदस्य क्रिसल इंटरप्राईजेस या कंपनीच्या नावाचा आग्रह धरीत होते. मात्र, प्रशासनाने या दोघांनाही ठेका न देता शाही मार्गाची व रामकुंडाची सफाई करणाऱ्या विशाल इंटरप्राईजेस यांच्या ठेक्याला मंजुरी दिली होती. कुंभमेळा संपताच बील देण्याच्या वेळी स्थायी समितीने या कंपनीला बिल देण्यास नकार दिला होता. मात्र ऐन वेळी चांगल्या प्रकारे काम केल्याने विशाल एंटरप्राईजेसचे बिल द्यावे असे काही सदस्यांचे म्हणणे होते, तर काही सदस्य या कंपनीच्या देण्यात येणाऱ्या बिलाला विरोध करीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images