Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

संत्री २० रुपये किलो

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सध्या बाजारपेठेत ‌हिवाळी फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संत्रा, पपई, अॅपल बोर, कडाखा, उमराण जातीची बोरं या फळांची आवक प्रचंड वाढली आहे. यामुळे त्यांचे दरही कमी असूनही ग्राहकांना आकर्षिक करीत आहेत. संत्रा वीस रुपये किलोप्रमाणे मिळत आहे.

नाशिक शहरात संत्र्यांची प्रचंड आवक झाली आहे. यामुळे चौकाचौकात संत्री विकणारे दिसू लागले आहेत. गेल्या महिन्यात चाळीस रुपये किलोप्रमाणे विकली जाणारी संत्री आज पंधरा ते वीस रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. बंफर आवकमुळे दर घसरल्याचे विक्रेत्याने सांगितले. आणखी काही दिवस ही आवक ‌‌टिकून राहणार आहे. पपईची आवक टिकून असून दरात पाच रुपयांनी घसरण झाली आहे. पंचवीस रुपये किलोप्रमाणे पपई मिळत आहे. या म‌हिनाभर आवक चांगली राहण्याची शक्यता आहे.

बोरांची आवक वाढली आहे. साधारणतः नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून बोरांची आवक सुरू होते. फेब्रुवारी महिन्यापर्यंत बारोंचा हंगाम सुरू राहतो. सध्या हा हंगाम ऐन भरात असल्याने बोरांची आवक वाढली आहे. वीस ते तीस रुपये किलोदराने बोर मिळत आहेत.

सफरचंदाचे भाव जैथे आहेत. ८० ते १२० रुपये किलोदराने सफरचंद मिळत आहेत. किवी फळाचा दरही तीस रुपये टिकून आहे. डाळिंबाची आवकही वाढली असून ५० ते ८० रुपये किलोप्रमाणे मिळत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गेल्या स्पर्धा कुणीकडे?

$
0
0

अशांत किरकिरकर

नोव्हेंबर व निम्मा डिसेंबर महिना नाशिकच्या सांस्कृतिक वर्तुळात विशेष चर्चेचा ठरला, त्याला कारणही तसेच आहे. राज्य नाट्य स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा झाल्यात. राज्य नाट्यनंतर निकालावर अनेकांचे ताशेरेही ओढून झालेत. कुणी म्हणे माहितीच्या अधिकारात निकालच मागवतो तर कुणी म्हणे निकालात फेरफार झाली. जितकी तोंडे तितकी मते. निकालात काही तरी गफलत झाली आहे असे अनेक रंगकर्मींचे म्हणणे तर निकालावर बोलण्याचा अधिकार रंगकर्मींना नसतोच असे सरकारचे अर्थात संचालनालयाचे म्हणणे त्यामुळे हे भिजत घोंगडे पडणार हे स्पष्टच आहे. निकालावरून वादंग उठणे हे नवीन नाही. नंबरात आलेल्या नाटकांविषयी, त्यांच्या निर्मितीप्रक्रियेपासून तर रंगमंच सहाय्य करणाऱ्यांपर्यंत अनेकांवर आरोपांची चिखलफेक करून झाली. परंतु निर्णय तोच राहणार यावर संचालनालय ठाम आहे.

आणखी एक चर्चेचा विषय म्हणजेच, नोव्हेंबर व डिसेंबर हा स्पर्धांचा महिना म्हणून नावारूपाला आला मात्र बाबाज्, राज्य नाट्य व बाल नाट्य सोडल्या तर इतर स्पर्धांना झालेय काय असा प्रश्न पडावा. कामगार कल्याण नाट्यस्पर्धा, पु. ल. करंडक, संस्कृत नाट्य, या स्पर्धा यंदाच्या वर्षी अद्यापतरी जाहीर झालेल्या नाहीत. असे का व्हावे? या स्पर्धा म्हणजे रंगकर्मींसाठी हक्काचे व्यासपीठ आहे मात्र त्यांचा अजूनपर्यंत कोणताही ठावठिकाणा नाही त्यामुळे रंगकर्मींमध्ये चर्चा रंगत आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे सामान्य रसिकाला खंत वाटावी अशी गोष्ट की, पारंपरिक कलांचे आश्रयदाते म्हणविणाऱ्या नाशिकमध्ये अद्यापही संगीत राज्यनाट्य स्पर्धेचे केंद्रच नाही. ही मोठीच शोकांतिका आहे.

अगदी छोट्या एकांकिका महोत्सवापासून राज्यनाट्य स्पर्धेपर्यंत अनेक स्पर्धा नाशिकमध्ये यशस्वी होतात. मात्र ज्या संगीत नाटकांनी रंगभूमीला कलावैभव प्राप्त करून दिले त्यांच्या स्पर्धेसाठीच नाशिकला केंद्र नसावे ही नामुष्कीची बाब आहे. नाशिक शहराला संगीत नाटकांची दीर्घ परंपरा आहे. 'नाट्यसेवा'चे राजेंद्र जाधव पूर्वी संगीत नाटकांचा महोत्सव भरवित. जयमाला शिलेदार, कीर्ती शिलेदार स्वत: नाट्यसंगीताचे धडे देण्यासाठी नाशिकला येत असत. ज्येष्ठ रंगकर्मी व अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष नेताजी भोईर यांनी संगीत नाटके लिहिली आहेत. मात्र त्यांना ते सादर करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणच्या केंद्राचा शोध घ्यावा लागतोय. रामदास कामत, शुभदा दादरकर यांच्या माध्यमातून शहरात नाट्यसंगीताचे वर्ग सध्या सुरू आहेत. या जमेच्या बाजू आहेत संगीत स्पर्धा झाल्यास त्याला एन्ट्री व प्रेक्षकही उपलब्ध होईल. परंतु असे असताना अद्यापही नाशिकला संगीत राज्यनाट्य स्पर्धा होत नाहीत.

राज्यनाट्यसाठी केंद्र मिळते मग संगीत नाटकांसाठी का नाही, असा सवालही उपस्थित होतो. पूर्वीपासून केवळ सांगलीलाच संगीत राज्यनाट्य स्पर्धा होत असत. विष्णुदास भावे यांनी सांगलीला रंगभूमीची स्थापना केल्याने तेथेच संगीत नाट्यप्रेमी आहेत, असा सरकारचा समज असावा. परंतु गेल्या तीन वर्षांपासून मात्र संगीत राज्यनाट्य स्पर्धेची ठिकाणे बदलण्यात येत आहेत. त्यात नाशिकला मात्र अद्यापही यजमानपद मिळालेले नाही. नाशिकला संगीत राज्यनाट्य स्पर्धा व्हाव्यात यासाठी दीपक मंडळ अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. संस्थेतर्फे तसे पत्रही सांस्कृतिक कार्य संचालनालयाला देण्यात आलेले आहे, मात्र अद्याप त्यांना काही उत्तर नाही.

आता नाशिकमध्ये संस्कृत नाट्य स्पर्धाही हाेत आहेत, परंतु या स्पर्धांच्या बरोबरीने संगीत स्पर्धा व्हाव्यात अशी अनेक रंगकर्मींची इच्छा आहे. 'कट्यार काळजात घुसली' मुळे या आशा आणखीच पल्लवीत झाल्या आहेत. लवकरच नाशिकला संगीत स्पर्धांचेही केंद्र मिळावे अशी अपेक्षा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षतोडीला ‘बाबूं’कडून प्रोत्साहन

$
0
0

१ जानेवारी १४ ते ३० जून १५ या कालावधीत संस्थेने अनधिकृत वृक्षतोडींबाबत माहिती मागितली. संस्थेने सहा विभागांना माहितीच्या अधिकारात पत्र देऊन ही माहिती घेतली. वृक्षतोडीच्या किती तक्रारी प्राप्त झाल्या, किती प्रकरणी पोलिसांकडे गुन्हे दाखलसाठी पत्रे दिली आणि किती गुन्हे दाखल झाले अशी माहिती विचारली. सिडको विभागातील वृक्षतोडीविरोधात उद्यान निरीक्षकांनी १६ पत्रे अंबड पोलिस ठाण्याला दिली. परंतु, एकही गुन्हा दाखल झालेला नाही. या पत्रांची प्रत मिळवली असता फक्त तीन पत्रांवर पोलिसांची पोहोच आहे. उद्यान अधिकारी पोलिसांकडे जातच नाही हे स्पष्ट होते. पूर्व विभागाच्या उद्यान विभागाने १३ पत्रे पोलिसांना दिली. यापैकी एकच गुन्हा दाखल झाला. नाशिकरोडला एक पत्र दिले. त्यावरून चार ठिकाणी गुन्हे दाखल झाले. वर्षभरात सातपूर विभागातून नऊ व पंचवटी विभागातून सात गुन्हे दाखल झाले आहेत. उद्यान विभागाकडील तक्रारी व दाखल झालेले गुन्हे यात प्रचंड तफावत आहे.

पश्चिम विभाग गोत्यात पश्चिम विभागाच्या उद्यान निरीक्षकांना माहितीच्या अधिकारात पत्र देऊन अवैध वृक्षतोडीची माहिती संस्थेने मागितली होती. परंतु, दोन महिन्यानंतरही ती दिली नाही. संस्थेने उद्यान अधीक्षकांकडे अपिल दाखल केल्यावर त्यांनीही सुनावणीला बोलावले नाही. त्यामुळे माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाकडे त्यांच्या विरोधात तक्रार केल्याची माहिती जीवन नागरी संस्थेचे जिल्हा संचालक दीपक जाधव यांनी दिली. या विभागात उद्यान निरीक्षकांची कामे बिगारी सांभाळतात, असा आरोप जाधव यांनी केला.

वृक्ष समितीकडे लक्ष संस्थेने महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य संजय चव्हाण, प्रा. कुणाल वाघ, संजेय साबळे, दीपाली कुलकर्णी यांना पत्र देऊन वृक्षतोडीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अधिकाऱ्यांना जाब विचारावा अशी विनंती केली आहे. संस्थेने महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना पत्र देऊन उद्यान विभाग पूर्णपणे अकार्यक्षम झाल्याची तक्रार केली आहे.

मेहनतीवर पाणी : जाधव दीपक जाधव म्हणाले, की बेकायदा वृक्षतोड होत असल्याचे समजल्यावर आम्ही वृक्षप्रेमी पदरमोड करून घटनास्थळी जातो, फोटो काढतो, महापालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार करतो. मात्र, उद्यान अधिकारी घटनास्थळी जात नाहीच. तक्रार घेतलीच तर पोलिसांकडे जात नाही. पोलिसांकडे गेलेच तर गुन्हे नोंद दाखल करत नाहीत. झाडे तोडून देणाऱ्या टोळ्याच काही नगरसेवकांच्या संपर्कात असल्याचाही आरोप जाधव यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला दरात घसरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या आठवड्यापासून भाज्यांची आवक वाढल्याने दरात थोडी घसरण झाली आहे. बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक या पोलभाज्यांची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. बाजारात सध्या गाजराचीही प्रचंड आवक होत आहे. इतर भाज्यांचे दरही पाच ते दहा रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, कमी पाण्यावर पिके फुलवूनही दरात घसरण झाल्याने उत्पादक निराश झाले आहेत. आवक व मागणीनुसार भाज्यांचे दर ठरत असतात. सध्या बाजारात सर्वच प्रकारच्या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे त्याचा दरावर परिणाम झाला आहे. पालेभाज्यांची आवक वाढल्याने त्यांचे दर खूपच कमी झाले आहेत. गेल्या महिन्यात तीस ते चाळीस रुपये किलोने मिळणारे मेथी, कोथिंबीर आज दहा ते पंधरा रुपये जुडीने मिळत आहे. कारले, गिलके, दोडके यांचेही दर दहा ते पंधरा रुपयांनी कमी झाले आहेत.

कांदा दरात घसरण

कांद्याची स्थानिक बाजारपेठेत आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात वीस ते पंचवीस रुपये किलोने मिळणारा कांदा पंधरा रुपये किलोने मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवकाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

विषारी औषध सेवन करून वैभव पांडूरंग पवार (वय २८) याने त्रिमूर्ती चौक, नवीन नाशिक येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. वैभवने शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान घरातच विषारी औषध सेवन केले. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्यास तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याबाबत अंबड पोलिसांनी​ आकस्मात मृत्यूची नोंद केली. दरम्यान, चेहेडी शिवारातील भागवत मळ्यात राहणाऱ्या कन्हय्यालाल चैनीलाल सहानी (वय ५०) यांनी शनिवारी दुपारच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली. आत्महत्त्येचे कारण समोर आले नसून, नाशिकरोड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

चेन स्नॅचिंग

ना​शिक : पायी जात असलेल्या महिलेची सोन्याची पोत खेचून नेल्याची घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. पंचवटीतील हनुमानवाडी परिसरात राहणाऱ्या अनिता राजमल बागरे जुना गंगापूर नाक्यावरील हॉटेलजवळून जात असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची पोत खेचून धूम ठोकली. शनिवारी दिवसभरात स्नॅचिंगच्या तीन घटना घडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेट सक्तीसाठी आरटीओ सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक हेल्मेट वापरण्याची इच्छा असो अथवा नसो वाहनधारकांना आजपासून (दि. १४) हेल्मेट परिधान करूनच वाहनावर स्वार व्हावे लागणार आहे. हेल्मेट वापराबाबतचा जागर करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाची दोन पथके आजपासून पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. हेल्मेटशिवाय वाहने चालविणाऱ्यांना समुपदेशनाबरोबरच कारवाईलाही सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिला आहे.

अपघाती मृत्यूंमागे हेल्मेटचा अभाव हेच महत्त्वाचे कारण असल्याचे निष्कर्ष नोंदविण्यात आले आहे. वाहन चालवितेवेळी हेल्मेटचा वापर बंधनकारक असला तरी या नियमाचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे पहावयास मिळत आहे. आरटीओने शहरातील रस्त्यांवर केलेल्या एका पाहणीत केवळ पाच टक्केच लोक हेल्मेटचा वापर करीत असल्याचे खेदजनक वास्तव पुढे आले होते. सुप्रीम कोर्टाच्या एका परिपत्रकाचा आधार घेऊन आरटीओने २६ ऑक्टोबरपासून शहरात एक विशेष मोहीम उघडली. हेल्मेट आणि सीटबेल्ट वापराचा आग्रह धरणारी ही मोहीम शहरात ठिकठिकाणी राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत शहरात हेल्मेटशिवाय वाहने चालविणाऱ्या ८४५ जणांवर तर सीटबेल्टचा वापर न करणाऱ्या १९ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अशा वाहनचालकांना पेठरोडवरील आरटीओ कार्यालयात शनिवारी होणाऱ्या दोन तासांच्या समुपदेशनाला हजर राहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. ‍आतापर्यंत ५५० जणांचे समुपदेशन करण्यात आले आहे. या कारवाईत ४८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

दिवाळीच्या सुट्यांमध्ये थंडावलेली हेल्मेट आणि सीटबेल्ट सक्तीची मोहीम पुन्हा हाती घेण्याचा निर्णय प्रादे‌शिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी घेतला आहे. सोमवारपासून मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत शहरात तसेच महामार्गांवर ही मोहीम ‍राबविण्यात येणार आहे.

वार रस्ता

सोमवार नाशिक - पेठ, नाशिक - मुंबई

मंगळवार नाशिक - दिंडोरी, नाशिक - त्र्यंबकेश्वर

बुधवार नाशिक - धुळे, नाशिक - गंगापुर

गुरूवार नाशिक औरंगाबाद, नाशिक - कॉलेजरोड

शुक्रवार नाशिक - पुणे, नाशिक -उंटवाडी

महाविद्यालयांत गुंजणार लोकगीताचे स्वर...

हेल्मेट तसेच सीटबेल्ट वापराबाबत महाविद्यालयीन तरुणाई उदासीन असल्याचे निरीक्षण प्रादेशिक परिवहन विभागाने नोंदविले आहे. तरुणाई हेल्मेट वापरासाठी प्रेरीत व्हावी, यासाठी 'जवा नवीन पोपट हा'च्या उडत्या चालीवर लोकगीत तयार करण्यात आले आहे. 'आता कॉलेजला जायाचं हाय मला हेल्मेट घालायचं हाय' हे बोली भाषेतलं गीत तरुणाईला आकर्षित करतानाच हेल्मेट वापराचे महत्त्वही सांगेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. महाविद्यालयांच्या आवारात जाऊन कलापथकांच्या माध्यमातून हेल्मेट वापराबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे.

आम्ही ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सक्ती किंवा कारवाई हा उद्देश नसून, हेल्मेट वापराची सवय लागावी हा मुख्य उद्देश आहे. एकीकडे पथकांद्वारे कारवाई सुरू राहील तर दुसरीकडे शहरातील चौकांमध्ये पीए (पब्लिक अड्रेसिंग सिस्टम)च्या माध्यमातून वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. त्यासाठी ध्वनीफित बनविण्याचे कामही सुरू आहे.

भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर रोड बनला पार्किंगचा अड्डा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर नाशिक शहरातील अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा गंगापूररोड सध्या वाहनांच्या पार्किंगचा अड्डा बनला आहे. रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहनचालकांना रोजच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यातच हॉटेल्स, मंगल कार्यालये यांनी हाऊसफुल असलेल्या गंगापूररोडला शिस्त लावणार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.

नाशिक शहरातील उच्चभ्रृ वस्ती म्हणून गंगापूररोड भागाची ओळख आहे. त्यातच नावाजलेले यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, फ्रवशी इंटरनँशनल स्कूल, जवाहर इन्स्टिट्युट, गंगापूर धरण आणि वाईनरी देखील या परिसरात असल्याने रोजच वाहनांचा मोठा ताफा गंगापूररोडवरून जात असतो. महापालिकेने कुंभमेळ्यात रस्त्याचे काम केले खरे परंतु न्यायप्रविष्ट प्र्रकरणांमुळे रस्त्यातील झाडे तसेच असल्याने अपघाताचा धोका सहन करत नागरिकांना वाहने चालवावी लागतात. त्यातच वाहनचालकांकडून रस्त्यालगत व अगदी रस्त्यावरही वाहने उभी केली जात असल्याने गंगापूररोड पार्किंगचा अड्डा बनला आहे. याचा त्रास इतर वाहनांना होत असल्याने वाहतुककोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

दुभाजकांचे गौडबंगाल

गंगापूररोडवर दुभाजकदेखील बसविण्यात येणार होते; परंतु काही कारणास्तव तो प्रस्ताव बारगळला. यामध्ये काही ठिकाणी, तर हॉटेल्स चालकांना त्यांच्याकडे येणारी वाहने रोडवर व्यवस्थित लावता यावीत व वळवता यावीत यासाठी दुभाजक बसविणे टाळल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दुभाजकांचे नेमके गौंडबंगाल काय असा प्रश्न वाहनधारकांच्या मनात उपस्थित होतो आहे. त्यातच भोसलाने जागा न दिल्याने परिसरातील रस्त्याचे रूंदीकरण रखडल्याचे नागरिकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कबड्डी स्पर्धेत एकलहरे, शिवरे अजिंक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या क्रीडामहोत्सवातील कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात एकलहरे, तर मुलींच्या गटात शिवरे (ता. निफाड) येथील माध्यमिक विद्यालयाने विजेतेपद पटकावले. क्रांतिवीर व्ही. एन. नाईक यांच्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा झाली.

संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. या वेळी नाईक कॉलेजचे प्राचार्य व्ही. बी. खेडकर, उपप्राचार्य टी. बी. गोस्वामी, ई. के. भाबड, शिक्षणाधिकारी एस. व्ही. कुटे, क्रीडा समितीप्रमुख मधुकर वाघ, प्रशांत भाबड आदी या वेळी प्रमुख पाहुणे होते.

मुलींमध्ये येवला उपविजेता

मुलींच्या गटातील अंतिम फेरीत शिवरे विद्यालयाने येवला संघाचा २७-२५ असा अवघ्या दोन गुणांनी पराभव केला. शिवरे संघातर्फे मीना सानप, सोनाली सानप, प्रतीक्षा सोनवणे, प्राजक्ता साबळे, माधुरी आव्हाड यांनी उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात सिन्नर संघाने नाशिकचा २८-२४ असा पराभव केला.

मुलांमध्ये दिंडोरी तिसऱ्या स्थानी

मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात एकलहरेच्या संघाने सिन्नरचा ५३-२८ असा २६ गुणांनी सहज पराभव केला. एकलहरे संघातर्फे राष्ट्रीय खेळाडू एजाज मन्सुरी, दर्शन कट्टीमणी, रवींद्र मोरे, प्रमोद सोनवणे, आदर्श खैरे यांनी आक्रमक चढाया करत सिन्नरवर सुरुवातीपासून वर्चस्व मिळविले. दिंडोरी संघाने निफाडचा ३४-७ असा एकहाती पराभव करीत तिसरा क्रमांक मिळविला. शरद पाटील, विलास पाटील, चंद्रकांत ढिकले, मेघनाथ माळोदे, सुरेश शिंदे, विजय ढिकले, मनोज मते, गौरव पाटील, संतोष मते, राकेश खैरनार, नीलेश चौधरी, दीपाली खोडदे पंच होते. प्रशांत भाबड, मधुकर वाघ, उदय केदार, दिनकर गिते, बी. के. सानप, गंगाधर दराडे यांनी सहकार्य केले.

सर्वोत्कृष्ट खेळाडू

उत्कृष्ट खेळाडू ः एजाज मन्सुरी (नाशिक), मीना सानप (निफाड)

उत्कृष्ट पकड ः निशांत गांगुर्डे (दिंडोरी), कोमल नाईकवाडे (येवला)

उत्कृष्ट चढाई ः ऋतिक रामराजे (सिन्नर), माधुरी डोमाडे (सिन्नर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बुद्धिबळ स्पर्धेत जितेंद्र पाटील प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जैन उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भवरलाल जैन यांच्या वाढदिवसानिमित्त कांताई सभागृहात रविवारी झालेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत शहाद्याच्या जितेंद्र पाटीलने, तर महिला गटात साक्षी शिंपीने प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेतील साडेपाच वर्षांची सर्वांत लहान खेळाडू माही संघवी हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

दलिचंद जैन, जी. डी. बेडाळे कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. रामप्रकाश गुप्ता, जैन स्पोर्टस अॅकॅडमीचे सहसचिव फारूक शेख, अनिता कोल्हे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. प्रवीण ठाकरे, परेश देशपांडे, प्रवीण सोमाणी, शोभराज खोंडे पंच होते.

स्पर्धेचा निकाल (कंसात गुण)

१. जितेंद्र पाटील, शहादा (८), २. विवेक चव्हाण (७.५), ३. कल्पेश देवांग, नंदुरबार (७.५), ४. भावेश कहाणे, जळगाव (७), ५. केतन पाटील, जळगाव (७), ६. मयूर पाटील, शहादा (७), ७. हर्ष पाचील, नाशिक (७), ८. वैभव बारहाते, अमरावती (६.५), ९. धीरज शिंदे, अमरावती (६.५), १०. किरण पाटील, जामनेर (६.५), ११. प्रशांत कासार, जळगाव (६.५), १२. शुभम बाविस्कर, नंदुरबार (६.५), १३. शिवप्रसाद काळे, श्रीरामपूर (६.५), १४. रोहित पाटील, जळगाव (६), १५. तेजस तायडे (६)

महिला गट ः १. साक्षी शिंपी, जळगाव (५), २. कांचन पाडवी, चोपडा (५), ३. शिल्पा भंगाळे, जळगाव (४.५)

७ वर्षांखालील गट ः १. प्रगल्भ चौधरी, २. पार्थ पाटील, ३. अमेय सावळे

९ वर्षांखालील गट ः १. मुकुल तारे, २. उज्ज्वल आमले, ३. वैभव पाटील

११ वर्षांखालील गट ः १. गुणवंत कासार, २. देवांश सतरा, ३. अथांग शिंपी

१३ वर्षांखालील गट ः १. ध्रुव काबरे, २. ऋषिकेश सोनार, ३. श्रेयस सोमपूरकर

१५ वर्षांखालील गट ः १. विवेक तायडे, २. कल्पेश आमले, ३. सौरभ पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी हिरवे महाराष्ट्राच्या संघात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रंगूबाई जुन्नरे हायस्कूलचा विद्यार्थी दर्शन हिरवे याची १७ वर्षांखालील वयोगटातील राष्ट्रीय शालेय व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे १६ ते २० डिसेंबरदरम्यान ही स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्र संघाचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण गोंदियातील रामनगरमध्ये सुरू असून, त्यानंतर राज्याचा संघ १५ डिसेंबर रोजी अलाहाबादला रवाना होणार आहे.

नंदुरबार येथे नुकत्याच झालेल्या शालेय विभागीय स्पर्धेत रंगूबाई जुन्नरे हायस्कूलच्या संघाने उपविजेतेपद पटकावले होते. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे दर्शनची गडचिरोली येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. दर्शन उत्कृष्ट स्मॅशर असून, त्याला प्रशिक्षक राजेंद्र शिंदे, छत्रपती पुरस्कारप्राप्त आनंद खरे, प्रशांत भाबड, दिनेश जाधव, प्रत्युष खुने, क्रीडाशिक्षक विलास पाटील, वीणा जोशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात २८ हजार नवीन पदवीधर मतदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पदवीधर मतदार नोंदणीसाठी राबविण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या पुनर्रीक्षण कार्यक्रमांतर्गत २८ हजार १३७ नवीन पदवीधर मतदारांची नावे मतदार यादीमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामध्ये १८ हजार ८३७ पुरुष तर ९ हजार ३०० महिलांचा समावेश आहे. सर्वाधिक १६ हजार ४३७ मतदारांची नोंदणी एकट्या नाशिक तालुक्यात झाली असून, त्र्यंबकेश्वरमध्ये अवघ्या ९४ पदवीधरांनी नावनोंदणी केली आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी अद्ययावत करण्याचे आणि मतदार नोंदणी करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले होते. त्यासाठी ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत मतदार नोंदणीचा पुनर्रीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या कार्यक्रमात तब्बल ३० हजार १०७ नवीन पदवीधर मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवण्यासाठी अर्ज दिले. त्यापैकी १ हजार ९७० मतदारांचे अर्ज बाद ठरले. महसुल आयुक्त एकनाथ डवले यांच्या हस्ते सोमवारी प्रसिध्द केलेल्या मतदार यादीत नव्याने २८ हजार १३७ नवीन पदवीधर मतदारांची नावे समाविष्ठ झाली आहेत. जिल्ह्यात पदवीधर मतदारांची संख्या १ लाख १९ हजार ९९५ झाली आहे.

पदवीधरांसाठी एकच मतदार यादी

पदवीधर मतदारसंघासाठी मतदान करू इच्छिणाऱ्या मतदारांची प्रत्येक निवडणुकीवेळी स्वतंत्र नोंदणी केली जात होती. ही पद्धती बंद करत यंदा आयोगाने आता कायमस्वरूपी याद्या तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित याद्यांप्रमाणेच याही मतदारांच्या याद्या राहणार आहेत; मात्र यापूर्वी मतदार यादीत नावे नोंदविलेल्यांनी आपला रहिवास पत्ता, ओळखपत्र आणि फोटोसह मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे. ही यादी सर्वसामान्यांना अवलोकनार्थ विभागातील पाचही जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ठेवण्यात आली आहे.

तालुका निहाय एकूण पदवीधर मतदार

तालुका ..............मतदार संख्या


नाशिक .................. ५८,८२५

मालेगाव .................. १३,७४२

निफाड .................. ९०३६

बागलाण ................. ८५३५

सिन्नर .................... ६४१९

नांदगाव .................. ४०५१

येवला .................... ३९९५

चांदवड .................. ३२१७

दिंडोरी ................... ३१३७

देवळा .................... २४३५

इगतपुरी .................. २०१९

कळवण .................. १९१७

सुरगाणा .................. १०९८

पेठ ....................... ८८४

त्रंबकेश्वर ............... ६८५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसडेपोत टोळक्याचा धुडगूस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक
पंचवटी बस डेपो क्रमांक दोनवर चार ते पाच जणांच्या टोळक्याने रात्री उशिरा हल्ला चढवला. या हल्ल्यात एका कर्मचाऱ्यासह दोन सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी शहर बस सेवा बंद केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सव्वाआठ ते साडेआठच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळक्याने पंचवटी बस डेपो क्रमांक दोनमध्ये दुचाकींवर प्रवेश केला. यानंतर त्यांनी सुरक्षा रक्षकाकडे साहेब आहेत काय, अशी विचारणा केली. त्यावर, यावेळी साहेब नसतात, असे उत्तर सुरक्षारक्षक जाधव यांनी दिले. त्यानंतर टोळक्याने सुरक्षारक्षकास शिवीगाळ करीत मारहाण सुरू केली. बस चालक एन. के. जाधव यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्या टोळक्याने धारदार शस्त्राने त्यांच्यावर गंभीर वार केले. जखमी कर्मचाऱ्यांना सोडवण्यासाठी आलेल्या सुरक्षारक्षक गाढवे यांच्यावरही हल्ला झाला. यानंतर टोळक्याने धूम ठोकली. एसटी महामंडळाच्या इतर कर्मचाऱ्यांच्या आक्रमणामुळे हल्लेखोर दुचाकी तेथेच टाकून पळाले. जखमी कर्मचाऱ्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

प्रवाशांना उतरवले

हल्ल्याचे वृत्त समजल्यानंतर पंचवटी बस डेपोशी संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांनी एसटी बस उभ्या केल्या. बसेसमधील प्रवाशांना उतरवून देण्यात आले. बसचालक एन. के. जाधव ड्युटी संपून घराकडे जाणार होते. त्यामुळे कट मारल्याच्या कारणावरून हा हल्ला झाला का याचा तपास पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटाळ्याप्रकरणी वाघच्या अटकेचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

परदेशात गुंतवणूक केलेल्या पैशांचा मोठा आर्थिक मोबादला देतो, असे सांगत सर्वसामान्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या प्रदीप वाघ या संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज कोर्टाने फेटाळून लावला. आता वाघला अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, वाघच्या अटकेनंतर या घोटाळ्यातील पाळेमुळे शोधून काढणे पोलिसांना शक्य होणार आहे.

हाँगकाँगमध्ये ब्राईट सिनो इंटरनॅशनल होल्डिंग लिमिटेड ही कंपनी आपण विकत घेतली असून, लवकरच घाणा देशातील अबुथनान इन्व्हेस्टमेंट ही कंपनी खरेदी करणार असल्याचा प्रचार प्रदीप वाघ २०११ मध्ये केला होता. त्यावेळी काठेगल्लीत वास्तव्यास असलेल्या वाघचे परदेशात नेहमीच जाणे-येणे असायचे. त्यामुळे शहरातील काही गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक त्याच्याकडे केली. हळूहळू वाघने पैसे देण्यास टाळटाळ केली. पैसे कुठेही जाणार नाहीत, असे आश्वासन देत नव्याने पैसे गुंतवण्यास त्याने गुंतवणूकदारांना उद्युक्त केले. कालातंराणे ठाणे येथे राहण्यास गेलेल्या वाघने गुंतवणूकदारांशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आलेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी १ डिसेंबर रोजी शहर पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला. आर्थिक गुन्हे शाखेने तपास करीत काही कागदपत्रे जप्त केली. तसेच पोलिसांना गुंगारा देणाऱ्या वाघचा शोध सुरू केला. या दरम्यान त्याने अटकपूर्व जामीन अर्जासाठी नाशिक कोर्टात अर्ज सादर केला. त्यावर दोन दिवसापूर्वी दोन्ही बाजूने युक्तिवाद केला. कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. प्रदीप वाघने गुंतवणूकदारांना इंग्लंड येथील बँकेची कागदपत्रे सादर केली होती. या बँकांमधून पैसा भारतात आल्यानंतर तो त्यांना देण्याचे आश्वासन त्याने दिले होते. पोलिसांनी संबंधित बँकेकडे चौकशी केली असता, अशा कोणत्याही ग्राहकाचा आपला संबंध नसल्याचे बँकेने लेखी पोलिसांना दिले.

बँकेच्या त्या अभिप्रायासह इतर पुरावे ग्राह्य मानून कोर्टाने सोमवारी वाघचा अर्ज फेटाळून लावला. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, फरार असलेल्या वाघला अटक केल्यानंतर त्यातील अनेक बाबी स्पष्ट होतील, असे मत पोलिस सूत्रांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्लॅमरस होतंय क्रीडा क्षेत्र

$
0
0

पूजा धारणकर

सिनेमातल्या अॅक्टर अॅक्ट्रेसप्रमाणेच मैदानावरचे खेळाडू आता टीव्हीवर चमकू लागले आहे. एकूणच देशपातळीवर सर्वच स्तरातून क्रीडा क्षेत्राकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलल्याने क्रीडा क्षेत्र कात टाकून ते ग्लॅमरस वळण घेताना दिसते आहे. क्रिकेट म्हणजेच खेळ आणि स्पर्धा हे भारतातील समीकरण बदलत चालले आहे.

कोणत्याही क्षेत्रात उभारी मिळविण्याकरिता प्रत्येक वेळी पैसा ही बाब महत्त्वाची ठरते. हाच नियम क्रीडाक्षेत्राला देखील लागू होतो. व्यावसायिकदृष्ट्या विचार केला तर भारतात फक्त क्रिकेटलाच पूजले गेले. इतर क्रीडा प्रकाराच्या मानाने क्रिकेटचे पारडे कायमच जड राहिले. पण आता परिस्थिती बदलत चालली आहे. विदेशी कंपन्यांप्रमाणे देशी कंपन्यांनीही क्रीडा क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या पंखात नवीन बळ देण्याचे प्रयत्न करीत आहे. व्यावसायिक क्रिकेट या खेळाप्रमाणेच आता कुस्ती, खो-खो, कबड्डी, फूटबॉल, हॉकी या खेळांच्या व्यावसायिक स्पर्धांचे आयोजन आंतरराष्ट्रीय पातळीवर होऊ लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे या सर्व स्पर्धांमध्ये भारताचे स्थान वरचे आहे.

या व्यावसायिक क्रीडा स्पर्धांच्या थेट प्रक्षेपणामुळे क्रिकेटप्रमाणे इतर खेळाकडे भारतीय क्रीडा चाहते आकर्षित होत आहे. या निमित्ताने सर्व क्रीडा प्रकाराची खेळांची माहिती सहज उपलब्ध होत आहे. टीव्हीवर होणाऱ्या प्रक्षेपणामुळे खेळातील बारकावे सर्वसामान्यांना देखील कळू लागले आहे. तसेच त्या त्या खेळातील उत्कृष्ट खेळाडू, प्रशिक्षक, पंच, जगासमोर येत आहे. त्यांच्या कार्याला काही अंशी न्याय मिळू लागला आहे.

अगदी पाच वर्षांपूर्वी क्रीडा क्षेत्रात पैसा हा केवळ क्रिकेटलाच मिळणार अन्य खेळांच्या खेळाडूंवर अनेकदा उपासमारीची वेळ यायची. त्यांना शासकीय खात्यात नोकरी मिळत नसे. खेळासाठी अनेक खेळाडूंनी शिक्षण अर्धवट सोडल्याने खासगी क्षेत्राचे दरवाजे देखील खेळाडूंसाठी बंद झालेले होते. अशावेळी हाताला मिळेल ते काम खेळाडूंनी केले आहे. वेळ पडल्यास अनेक खेळाडूंनी मोल मजूरी करुन आपला खेळ जपला होता. अनेकांनी परिस्थितीमुळे हताश होऊन खेळाकडे पाठ फिरवली. याच खेळाडूंच्या परिश्रमामुळे आज क्रीडा क्षेत्राला सोनियाचे दिवस आले आहे. जवळपास सर्वच खेळांच्या व्यावसायिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत असल्याने खेळाडूंना नवी उभारी मिळत आहे. त्यांच्या भावी वाटचालीकरिता हातभार लाभत आहे. या व्यावसायिक क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने खेळाडूंना टिव्हीवर झळकण्याची संधी मिळाली आहे. व्यावसायिक क्रीडा स्पर्धामुळे या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना जाहिरातीचे एक श्रीमंत व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

क्रिकेटरप्रमाणे आता इतर खेळाडूदेखील विविध जाहिरातीत दिसू लागले आहे. क्रीडाक्षेत्राकडे वळल्यास उपजिवेकचा प्रश्न निर्माण होणार अशा परिस्थितीमुळे पालकांनी आपल्या मुलांना क्रीडा क्षेत्राकडे वळू दिले नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्याची क्षमता असूनही अनेक खेळाडू नाइलाज म्हणून न आवडणारे काम करीत आहे. पण व्यावसायिक क्रीडा स्पर्धांमुळे आता क्रीडा व शारीरिक शिक्षण हे नवीन क्षेत्र समोर आले आहे. व्यावसायिक खेळाडूंनासाठी हे ग्लॅमरस क्षेत्र समोर आले आहे. तसा व्यावसायिक खेळाडू हा प्रकार जूनाच आहे. पूर्वी राजे महाराजे मल्ल, कुस्तीगीर यांची नियुक्ती करत त्यांचे सामने भरवून त्यांना विविध किमती वस्तू भेट देत असत. आताही व्यावसायिक क्रीडा स्पर्धांतून खेळाडूंवर बोली लागत आहे. या व्यावसायिक स्पर्धांकरिता गुतंवणूकदार कंपन्या गुणी, कौशल्यवान खेळाडूंच्या शोधात असतात. त्या-त्या खेळातील सर्वोत्तम खेळाडू प्रत्येक संघाला स्वतःकडे हवा आहे. त्यामुळे खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची आणि स्वतःची किंमत स्वतः ठरविण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे.

सर्वोत्तम खेळाडू आपल्या संघात असावा याकरिता सर्व व्यावसायिक कंपन्या खेळाडूंना जास्तीत जास्त किंमत देत आहेत. या व्यावसायिक स्पर्धामुळे क्रीडा क्षेत्राकडे पाहाण्याचा अनेकांचा दृष्टीकोन बदलला आहे. क्रीडा क्षेत्र फक्त मनोरंजनाचे साधन आहे ही संकल्पना या निमित्ताने मागे पडत चालली आहे.

(लेखिका राष्ट्रीय खेळाडू आहे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन ब्रँडिंगसाठी आता सायकल!पर्यटन

$
0
0

bhavesh.brahmankar@timesgroup.com

नाशिक : राज्यभरात किऑस्कद्वारे पर्यटन ब्रँडिंगचा प्रयत्न सपशेल फसल्यानंतर आता पर्यटकांना सायकल भाड्याने देण्याचा घाट महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) घातला जात आहे. या सायकलद्वारे पर्यटन ब्रँडिंगची संकल्पनाच पंक्चर होऊन हा मुद्दा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.

पर्यटनाचे ब्रँडिंग आणि पर्यावरणाचे हित लक्षात घेऊन पर्यटकांना सायकल भाड्याने देण्याच्या संकल्पनेने एमटीडीसीमध्ये जोर धरला आहे. विशिष्ट स्वरुपाची आणि एमटीडीसीचा लोगो असलेली सायकल पर्यटन स्थळी उपलब्ध करुन देण्याच्या हालचाली एमटीडीसीने सुरू केल्या आहेत. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एमटीडीसीच्यावतीने मोठ्या प्रमाणात सायकलची खरेदी केली जाईल. त्यानंतर या सायकल, संबंधित पर्यटनस्थळे असलेल्या शहरांमध्ये महिला बचत गटांकडे सोपविण्यात येतील. बचत गट नाममात्र दरात पर्यटकांना सायकल भाड्याने देतील, असा हा प्रस्ताव आहे. मात्र, या सायकलच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काय, असा प्रश्न आहे. शिवाय पर्यटकाने ती सायकल परत आणलीच नाही तर? सायकल पंक्चर किंवा नादुरुस्त करुन आणली तर त्याचे काय? याचा विचार करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, ही संकल्पना नाविन्यपूर्ण असून याद्वारे संबंधित पर्यटनस्थळांचे चांगले ब्रँडिंग होईल, अशी अपेक्षा एमटीडीसीला आहे.

कोकणातील दिवे आगर येथे वर्षाकाठी ८ ते १० लाख पर्यटक येतात. त्यामुळे याठिकाणी सायकलचा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येण्याचे प्रस्तावित आहे. याठिकाणी सायकलद्वारे पर्यटकांना वाहतुकीचे साधन उपलब्ध होतानाच पर्यावरणाचे हित जपले जाईल, असे एमटीडीसीचे म्हणणे आहे. सायकल पर्यटनाच्या संकल्पनेलाही यातून बूस्ट देण्यात येणार असून, टप्प्याटप्प्यात राज्यभरातील पर्यटनस्थळांमध्ये सायकलची उपलब्धता केली जाणार आहे. दरम्यान, एमटीडीसीने पर्यटन प्रचारासाठी किऑस्कची संकल्पना पुढे आणली. त्यानुसार कोट्यवधी रुपये खर्चून किऑस्क खरेदी करुन ते वितरीत करण्यात आले. प्रत्यक्षात जवळपास सर्वच किऑस्क धूळखात पडल्याने हा सर्व खर्च वाया गेला आहे. पर्यटनस्थळी पायाभूत सोयी-सुविधा आणि योग्य गाईड उपलब्ध करुन देण्याऐवजी एमटीडीसीला अन्य बाबींमध्येच रस असल्याचे दिसून येत आहे.

पर्यटकांना सायकल उपलब्ध करुन देण्याचे आमच्या विचाराधीन आहे. महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देतानाच पर्यटन ब्रँडिंग करण्याचा हेतू आहे.

स्वाती काळे,

महाव्यवस्थापक, एमटीडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केंद्राकडे ८२२ कोटींची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने केंद्र सरकारकडे २०१५-१६ या वर्षासाठी ८२२ कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. गेल्या महिन्यात आलेल्या केंद्रीय पथकाला प्रशासनाकडुन अहवाल सादर करण्यात आला.

यंदा पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामातील अंतिम पैसेवारी प्रशासनाने जाहीर केली असुन त्यामध्ये खरीपातील १३६८ तर रब्बीतील २०९ अशा १५७७ गावांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात दररोज कोठे ना कोठे शेतकरी आत्महत्येच्या घटना घडत आहेत. केवळ पिके, द्राक्षबागाच नव्हे तर विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांजवळील पशुधनही हिरावून नेले. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील दुष्काळी भागाची केंद्रीय पथकाकडुन पाहणी करण्यात आली. नीती आयोगाचे अध्यक्ष मानस चौधरी व केंद्रीय ऊर्जा प्राधिकरणाचे सचिव शंतनू विश्वास यांनी येवला, सिन्नर या तालुक्यांमध्ये पाहणी करून परिस्थिती जाणून घेतली. जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी ८२२ कोटी रूपये मिळावेत अशी मागणी जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यामध्ये खरिप हंगाम शेतकरी मदत ६५० कोटी, चारा टंचाई निवारणासाठी १२५ कोटी, तात्पुरता पाणी पुरवठा व अस्तित्वात असलेल्या पाणी योजनांच्या दुरूस्तीसाठी १५ कोटी, बैल गाडी व टॅकरने पाणी पुरवठा करण्यासाठी १५ कोटी, विहीर खोल करुन गाळ काढण्यासाठी १० कोटी, नविन बोरवेल खोदण्यासाठी ४ कोटी, पिण्याच्या पाण्याकरीता विहीरी अधिग्रहणासाठी ३ कोटी, रुपयांची मागणी करण्यात आली आहे. यातून चारा छावण्या तत्काळ सुरू करणे, नागरिकांना पिण्याचे पाणी, वीजबिलात सवलत, शैक्षणिक शुल्कमाफी करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस-राष्ट्रवादीची दिंडोरीत आघाडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय झाला आहे. आमदार नरहरी झिरवाळ व माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाणार आहे. काँग्रेस दहा, तर राष्ट्रवादी काँग्रेस सात जागांवर निवडणूक लढविणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांनी दिली.

काँग्रेसचे प्रभारी डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, निरीक्षक प्रदीप पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, निरीक्षक धर्मराज खैरनार, बाळासाहेब जाधव यांनी आघाडी करण्यासंदर्भात विचारविनिमय केला. दोन्ही पक्षांनी आघाडी करीत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काँग्रेस प्रभाग क्र. ३, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १६,१७ या दहा तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्र. १,२,४,१२, १३, १४, १५ या सात जागांवर निवडणूक लढविणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चळवळीची 'सोशल' वाटचाल

$
0
0

प्रमोद गायकवाड

फेसबुकवरील धार्मिक आणि जातीयवादी प्रचार-प्रसार बघून या माध्यमाचा चांगला वापर करता येणे शक्य नाही का असा विचार करत असताना एक बातमी वाचनात आली. ती म्हणजे बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या निवडणुकीत सोशल साइटसचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आणि ते निडवणुक जिंकले. या माध्यमातून एखादी व्यक्ती देशातील प्रमुखपदावर पोहोचू शकते तर तरूण पिढीमध्ये जाती धर्म विरहित सामाजिक कार्याची आवड का निर्माण केली जाऊ शकणार नाही असा प्रश्न मनात आला. या प्रश्नाच्या उत्तरा दाखल सुरू झालेली चळवळ म्हणजेच 'सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज' हे अभियान.

आजवर या अभियानाच्या माध्यमातून तीनशेहून अधिक उपक्रम राबिवले गेले आहेत. सोशल माध्यमाचा वापर करून तरुणांच्या सहकार्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर उभी राहिलेली देशातील ही पहिलीच सामाजिक चळवळ असावी. खरंतर हे या चळवळीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले आहे. आजवर राबविल्या गेलल्या उपक्रमात प्रामुख्याने सात शहीद भारतीय जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे संगोपन, वॄद्धाश्रम, अनाथालये, आदिवासी आणि ग्रामीण भागातील शाळा या ठिकाणी शैक्षणिक, क्रीडा आणि जीवनोपयोगी साहित्य भेट देण्यात आले आहे.

पहिली चार वर्षे अनौपचारिक स्वरूपात सुरू असलेल्या या अभियानाला कालांतराने संस्थात्मक व्यासपीठाची गरज भासू लागली. यातून १५ डिसेंबर रोजी २०१४ रोजी या कार्याला संस्थात्मक स्वरूप देण्यात आले. सोशल नेटवर्किंग फोरम या नावाने संस्था नोंदणी अधिनियम आणि मुंबर्इ सार्वजनिक विश्वत अधिनियमांतर्गत अधिकृत संस्था म्हणून मान्यता मिळाली. या अनुषंगाने आज १५ डिसेंबर २०१५ हा सोशल नेटवर्किंग फोरम या चळवळीचा पहिला संस्थात्मक वर्धापन दिन आहे. तरुणांमध्ये सामाजिक भान आणि देशप्रेमाची भावना निर्माण करणाऱ्या या चळवळीला मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळाले. या चळवळीचे सुरुवातीपासूनचे आपण साक्षीदार तर आहातच पण आम्हाला मार्गदर्शन करून साथीदार म्हणुनही सातत्याने आपण आपली भूमिका निभावली आहे.

ही चळवळ सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सोशल साइटचा सामाजिक कार्याचा वापर करणे हा होता. तसेच या साइटच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांमध्ये तरुणांचा सहभाग वाढवून त्यांच्या सहकार्याने समाजातील दुर्बल, वंचित घटकांना मदत करणे हा होता. यानुसार आतापर्यंत सोशल फोरमच्या माध्यमातून विविध स्तरावर मदत पोहोचविली आहे. त्यानंतर मागील वर्षी सोशल फोरमची अधिकृत स्थापना होऊन या कार्याला प्रोत्साहन मिळाले आणि आमच्या या कार्याचा आलेख अधिक उंचावत गेला. राज्य आणि देशातील विविध भागात ही चळवळ पोहोचविण्यात यामुळे नक्कीच आधार मिळाला.

गेल्या वर्षभरात सोशल फोरमने विविध पातळीवर लोकांपर्यंत देणगी, आवश्यक वस्तू, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य पोहोचविले. यामध्ये समाजातील अनेक व्यक्तींचे मोलाचे सहकार्य लाभले. वर्षभरात कुणाचा वाढदिवस असो एखादा विशेष दिन या निमित्ताने सामाजिक जाणीव जपण्याचा प्रयत्न केला गेला. आज या कार्याला अनेकांचा हातभार लाभला आहे.

त्र्यंबकेश्वर तालूक्यातील सर्वात जास्त दुष्काळी परिस्थिती तोरंगण येथे आहेत. या गावात जानेवारी ते जून या दरम्यान पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याची दरवर्षी मोठी समस्या निर्माण होते. गावातील महिलांना हंडा दोन हंडा पाण्यासाठी कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागते. म्हणूनच फोरमने आपल्या वर्धापन दिनानिमित्त तोरंगण या आदिवासी गावचा पाणी प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत पाइपलार्इन सँड फिल्ट्रेशन प्लांट बसविण्यात येणार आहे. या माध्यमातून गावाला पूर्ण शुद्व पाणी आणि वापरासाठी पुरेसे पाणी पुरवण्याचे प्रयोजन तज्ञांनी केले आहे. या निमित्ताने आम्ही हा खारीचा वाटा उचलत आहोत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चीनसोबत सावध मैत्री फलदायी ठरेल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'महासत्ता बनण्याची क्षमता असणारे आशिया खंडातील राष्ट्र हे भारत व चीन यांमधील मोठे साम्य आहे. हजारो वर्षांची उज्ज्वल परंपरा असणारी जगाच्या पाठीवरील ही दोनच राष्ट्र आहेत. युरोपीयन राष्ट्रांना या आशियायी राष्ट्रांच्या संयुक्त क्षमतेची भीती वाटते. यासाठी कूटनीतीने आपसात ही राष्ट्र झुंजविण्यावर भर दिला जातो. हे लक्षात घेऊन भारताने चीनशी मैत्री नक्कीच करावी मात्र यात सावधानता प्राधान्याने ठेवावी,' असे मत ऑर्गनायझर या साप्ताहीकाचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी व्यक्त केले.

सेंट्रल हिंदू मिल‌टिरी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित डॉ. बा. शि. मुंजे व्याख्यानमालेचे समारोपाचे पुष्प केतकर यांनी गुंफले. कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात ही तीन दिवसीय व्याख्यानमाला पार पडली.

केतकर म्हणाले, 'स्वातंत्र्यानंतर साठच्या दशकातील भारत व चीन या शेजारी राष्ट्रांमधील वितुष्टाची जखम युरोपीयन राष्ट्रांकडून अधिकाधिक ठसठसती ठेवण्याचे रणनीती आहे. जगाच्या पाठीवर गटबाजीच्या तंत्रात या दोन्ही आशियायी राष्ट्रांनी युरोपीयन राष्ट्रांच्या वरचढ बनू नये, यासाठी या देशांची शक्ती खच्ची केली जाते. 'टायगर' विरूध्द 'ड्रॅगन' हे तंत्र अमेरिकेसारखी राष्ट्र वापरतात. मात्र, त्याची कुटनीती लक्षात घेऊन या दोन्ही देशांचा हजारो वर्षांचे चांगले संबंध पुनरूज्जीवीत करण्याची आवश्यकता आहे. भारताप्रमाणेच अफाट क्षमतेच्या चीनला घाबरून मुळीच चालणार नसले तरीही या राष्ट्रावर अंधविश्वास ठेवूनही चालणार नाही.'

भारत चीनच्या पूर्वापार संबंधांचा विचार करून नीतीविषयक धोरण असण्याची आवश्यकता आहे. याचमुळे जगाच्या राजनीतीमध्ये भारत आणि चीन या देशाची महत्त्वाची भूमिका आगामी काळात राहील, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. रंजिता राठोड यांनी केले. या प्रसंगी व्यासपीठावर सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष नारायण दीक्षित, सदस्य नितीन गर्गे विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सजली खंडेराव टेकडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

चंपाषष्ठीनिमित्त देवळाली कॅम्प येथील प्राचीन खंडेराव टेकडी येथे यात्रा भरत असते. त्यामुळे या उत्सवासाठी जोरदार तयारी सध्या सुरू आहे. अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या यात्रेमुळे मंदिर रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आले असून चंपाषष्ठीसाठी टेकली सज्ज झाली आहे.

शिवाजी महाराजांनी या ठिकाणी मुक्काम केल्याचे दाखले मिळत असल्याने परिसरातील सर्वच लोक या यात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. चंपाषष्ठी निमित्त मंदिरात आमले परिवाराच्या वतीने महापूजा करण्यात येते, दिवसभर वाघ्या मुरळीचा गाण्यांचा कार्यक्रम व सांयकाळी खंडेराव भक्त उत्तम मांडे हे बारा गाड्या ओढत असतात. हा बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पाहाण्यासाठी जिल्हाभरातील भक्त व भाविकांसह लष्करी अधिकारी देखील हजेरी लावत असतात. तसेच यात्रेच्या दुसऱ्या दिवशी प्रथेप्रमाणे कुस्त्यांची दंगलदेखील भरविण्यात येते. यामध्ये जिल्ह्यातील नामवंत कुस्ती शाळेतील कुस्तीगीर हजेरी लावत मानाचा नारळ घेण्यासाठी सहभागी होतात. म्हणूनच या यात्रेला विशेष महत्त्व आहे.

अण्णाज् ग्रुपची स्वच्छता मोहीम

देवळाली व नाशिकरोड परिसरातील अनेक मान्यवरांचा सहभाग असलेला 'अण्णाज टेंपल हिल ग्रुप'च्या वतीने खंडेराव टेकडी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही आमच्या ग्रुपच्या वतीने चंपाषष्ठीनिमित्त व सभासदांच्या वाढदिवसाच्या दिवशी येथे स्वच्छता करीत असल्याची माहिती अण्णाज् ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नागेश देवाडिगा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images