Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अनुदानाचा गैरवापर झाल्यास फौजदारी गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने शौचालय उभारणीसाठी प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे साडेचार हजार लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले आहे. वैयक्तिक स्वरूपात मिळणाऱ्या अनुदानाचा गैरवापर झाल्याचे आढळल्यास संबंधितावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिला आहे.

केंद्र व राज्य सरकारमार्फत स्वच्छ भारत (नागरी) अभियानांतर्गत शौचालय उभारणीचा कार्यक्रम महापालिकेने हाती घेतला आहे. यासाठी महापालिकेने काही महिन्यांपूर्वी शहरात सर्वेक्षण केले होते. त्यात ५१ हजार ५८४ कुटुंबांच्या घरात शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले. ४४ हजार ६८० कुटुंबांकडून सार्वजनिक शौचालयांचा वापर होत असून, ७ हजार १७४ कुटुंबे मात्र उघड्यावरच शौचविधी पार पाडत असल्याचे स्पष्ट झाले.

या माहितीच्या आधारे महापालिकेने त्या ७ हजार १५४ कुटुंबांकडून शौचालय उभारणीसंबंधी अर्ज भरून घेतले होते. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर त्यातील ८७७ अर्ज तांत्रिक मुद्द्यांवरून बाद ठरविण्यात आले. तर, ६ हजार ०७३ लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधून देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान प्रशासनाकडून देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना एकत्रित करून त्यांच्याकरिता २२४ ठिकाणी सामूहिक शौचालय उभारले जाणार आहेत. दरम्यान, शौचालयासाठी देण्यात येणाऱ्या निधीचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित लाभार्थीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. लाभार्थीने अनुदानाचा वापर योग्य होईल हे पहावे, असे आरोग्यधिकारी डॉ. डेकाटे यांनी स्पष्ट केले.

अडीच कोटी रुपयांचे वाटप

महापालिकेने आतापर्यंत ४ हजार ५०० लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यावर प्रत्येकी ६ हजार रुपयांचे अनुदान जमा केले आहे. उर्वरित अनुदान शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अदा केले जाणार आहे. महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत उपलब्ध निधी २ कोटी ५३ लाख रुपयांचे वाटप केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाळांमध्ये नाताळाची धूम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या रंगुबाई जुन्नरे प्राथमिक शाळेत ख्रिसमस, ईद, दत्तजयंती साजरी करण्यात आली. काही जण सांता क्लॉजची लाल टोपी घालून तर काहीजण सांतासारखीच वेशभूषा करून शाळेत दाखल झाले. ख्रिसमस ट्री, सोनेरी रंगाचे बॉल्स यांची आकर्षक सजावट शाळेत करण्यात आली. राधा देसाई यांनी विद्यार्थ्यांना या तिन्ही सणांची माहिती दिली.

स्ट्रॉबेरी स्कूल

नाशिक : अक्षर संस्कार फाऊंडेशन संचलित स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन करण्यात आले. सांता क्लॉजची वेशभूषा करीत विद्यार्थी शाळेत आले. शिक्षकांनी ख्रिसमस सणाची माहिती दिली. 'जिंगलबेल, जिंगलबेल' या गीतावर नृत्य करीत विद्यार्थ्यांनी सेलिब्रेशनची मजा लुटली. शाळेच्या संचालक सायली काळे व मुख्याध्यापिका रिना गोविल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

वाघ गुरूजी शाळा

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित वाघ गुरूजी बाल शिक्षण मंदिर व आदर्श शिशु विहार या शाळेत नाताळ सण उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. शाळेतील संगीत शिक्षक शेवाळे यांनी नाताळ सणाची विविध गाणी सादर केली. विद्यार्थी सांताक्लॉजच्या विविध वेशभूषेत आल्यामुळे परिसर आनंदमय झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका मंदाकिनी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या व खाऊवाटप करण्यात आला. शाळेतील शिक्षिका ललिता शिंदे यांनी नाताळ सणाची माहिती सांगितली. अनिता हांडगे यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमास कल्पना पाटील, सरला ठाकरे, विशाखा पवार, वैशाली रकिबे, अनिता पवार, कविता जाधव, लता हांडोरे, तनुजा वाघ, नूतन गायकवाड, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॅमेज कंट्रोलचा पक्षांकडून प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संभाव्य पक्षातंराचा कमीत कमी फटका बसावा, यासाठी सर्वच पक्षांकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू झाला आहे. भाजपाकडे आकर्षित होणाऱ्या इतर पक्षांतील कार्यकर्ते व नगरसेवकांचा ओढा कमी होत असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात असून, पक्षातंरनाट्याचे सस्पेन्स २७ डिसेंबरपर्यंत आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे.

शहरात २७ तारखेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा मोठा सोहळा पार पडणार आहे. या दरम्यान अपक्ष नगरसेवक संजय चव्हाण यांच्यासहीत मनसेचे ९ नगरसेवक व शेकडो कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेणार असल्याचे सांगितले जात आहे. चव्हाणांचे पक्षांतर नि​श्चितच मानले जात असून, मनसेच्या नगरसेवकांमध्ये द्विधा मनस्थिती असल्याची चर्चा आहे.

सुरुवातीस हा आकडा १२ च्या पुढे होता. आता, तो नऊपर्यंत आला असून, आणखी दोन दिवसात यात आणखी घट होणार असल्याचा दावा विरोधकांकडून होत आहे. मनसेला बाय करून नेमके भाजपाची वाट पकडावी की शिवसेनेची, असा प्रश्न महत्त्वाचा असून त्यावर खल होत असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहेनजी चार किलो सोना देना है !

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घराचा पाया खदताना सोने सापडले. किमान चार किलो आहे. दुर्देवाने आम्ही खूप गरीब असून, राजस्थानमध्ये त्याची विक्री करण्याचा प्रयत्न केला तर अडचण येईल. आम्ही तुमचा नंबर सोशल साईटवरून घेतला. तुम्ही हे सोने निम्म्या किमतीत घ्या किंवा एखाद्या सोनाराला विका, बहेनजी बहुत जरूरत है, असा काकुळतीला आलेला संवाद साधत सर्वसामन्यांना गंडा घालणारा भामटा सध्या नवे सावज शोधतो आहे. पुढील 'शिकार' करेपर्यंत पोलिसांनी कारवाई केली तर फसवणुकीचा मोठा प्रकार टळू शकतो.

उपनगर पोलिसांनी दोन दिवसापूर्वी स्वस्त सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या राजस्थानी भामट्यांना जेरबंद केले. यामुळे परराज्यातील ही टोळी संपुष्टात आल्यासारखे वरवर दिसते. प्रत्यक्षात राजस्थानमधून शहरात आलेल्या किंवा राजस्थानमधून ऑपरेट होणाऱ्या या टोळ्यांचा उच्छाद सुरूच असून, दररोज नवनवीन सावज ते मोबाइलच्या माध्यमातून शोधत आहेत. गंगापूररोडवरील श्रीकृष्ण कॉलनीत राहणाऱ्या स्मिता कुलकर्णी यांना असाच एक कॉल १२ डिसेंबर रोजी आला. तुम्ही एका खरेदी विक्रीचे काम करणाऱ्या साईटवर टाकलेला नंबर आम्ही पाहिला आणि तुम्हाला फोन केला, असे समोरील व्यक्तीने सांगितले. आमच्या घराचे काम सुरू असताना आम्हाला चार किलो सोने सापडले. हे सोने परराज्यात विकले तर कमीत कमी त्रास होईल, असे वडिलांचे म्हणणे असून तुम्ही आम्हाला मदत करा, अशी विनंती त्या व्यक्तीने कुलकर्णी यांना केली. त्यावर कुलकर्णी यांनी त्यास पैसे नसल्याचे वारंवार सांगितले. मात्र, सदर व्यक्तीने पिच्छा सोडला नाही. त्याने कुलकर्णी यांच्या मोबाइलवर सोन्याच्या ​​चिप्सचे फोटो, स्वतःचे ड्रायव्हिंग लायसन्स व राजस्थानमधील पत्ता इतकी माहिती पुरवली. आजही सदर मोबाइलवरून कॉल येत असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

सोशल साईट धोकादायक

तात्पुरत्या व्यवहारांसाठी सोशल साईटवर टाकण्यात येणाऱ्या मोबाअल नंबरचा वापर चोरटे सहजतेने करतात. कुलकर्णी यांनी आपल्याकडील एका श्वानांच्या पिल्लांची अॅड सोशल साईटवर टाकली होती. तिथूनच आरोपींना हा क्रमांक मिळाला. दरम्यान, पोलिस देखील प्रत्यक्ष तक्रारदार समोर येण्याची प्रतीक्षा करतात. तर, सर्वसामन्य नागरिक माहिती देण्यासाठी पोलिसांकडे जाण्याचे टाळतात. नागरिक व पोलिसांमधील याच ताणलेल्या संबंधाचा फायदा भामट्यांना होत आहे.

हा प्रकार फसवणुकीचा असू शकतो, याची कल्पना आहे. तसाच तो इतरांची फसवणूक करीत असेल याची खात्री वाटते. मात्र, पोलिसांची मदत घेणे सोयीस्कर ठरणार काय याबाबत शाश्वती नसल्याने तक्रार दिली नाही. पोलिसांना आवश्यकता असल्यास आपण माहिती देऊ शकतो.

- स्मिता कुलकर्णी, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खो-खो निवड चाचणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या वतीने ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय किशोर किशोरी राज्य खो-खो स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी नाशिक जिल्हा किशोर किशोरी खो-खो अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २ व ३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता सीबीएससमोरील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे होत आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडू ५ फेब्रुवारी २००२ नंतर जन्मलेला असावा. तरी संलग्न संस्थांनी संस्थेच्या प्रमुखाच्या स्वाक्षरीसह प्रवेशअर्ज उमेश आटवणेद्वारा श्रीराम विद्यालय, पंचवटी, रमेश सानपद्वारा वैनतेय विद्यालय निफाड, आर. डी. चौधरी, अलंगुण ता. सुरगाणा यांच्याकडे जमा करावा, असे आवाहन जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले व सचिव मंदार देशमुख यांनी केले आहे. स्पर्धेतील विजेत्या संघांना १५०१ व उपविजेत्या संघांना ११०१ रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय प्रत्येक गटात वैयक्तिक १५१ रुपयांचे प्रत्येकी तीन बक्षिसे दिली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडकरांची कामगिरी

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय राजीव गांधी खेल अभियान अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या जयभवानी व्यायामशाळा व छत्रे विद्यालयाच्या संघाने चमकदार कामगिरी करत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. नाशिक संघातील प्राजक्ता काळे, साक्षी पांडे आणि अनामिका शिंदे यांनी सुवर्णपदक मिळवले. केरळ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात त्यांची निवड झाली आहे.

नूतन दराडे, खुशाली गांगुर्डे यांनी रौप्यपदक पटकावले. संघातील मंदार खालकर, समीर कुणगर विद्यार्थी खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली. या खेळाडूंना प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी खेळाडूंचे जयराम सानप, मोहन गायकवाड, बाळासाहेब पाटील, दत्ता शिंपी, दिलीप कोळपकर, छत्रे विद्यालयाचे पी. जी. धारवाडकर, दिनेश धारवाडकर प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक विजयकांत आहेर, के. एस. लांबोळे यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात नाशिक सर्वाधिक थंड

0
0

सर्वात कमी तापमानाची नोंद

--

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सर्व हिलस्टेशनवर मात करीत नाशिकमध्ये थंडीचा पारा सर्वात खाली घसरला. कडाक्याच्या थंडीमुळे नाशिककर गारठले असून, मंगळवारी ७.४ अंश सेल्सियसवर असणारा थंडीचा पारा आणखी घसरून ६ अंश सेल्सियसवर आला. सध्या राज्यातील सर्वात थंड ठिकाण म्हणून नाशिक अव्वल ठरले आहे. हुडहुडी भरविणारी ही थंडी ख्रिसमसनंतरच कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.

महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे म्हणून राज्याला सुपरिचित असली तरी यंदा या पर्यटनस्थळांपेक्षाही नाशिकमध्ये तापमानाने निचांक गाठला आहे. मंगळवारी देखील नाशिकमध्ये सर्वात कमी म्हणजे ७.४ अंश से‌ल्सियस तापमानाची नोंद झाली होती. कमाल तापमान २८ अंश सेल्सियस होते. नाशिकनेच हा रेकॉर्ड तोडला असून, बुधवारी अवघ्या सहा अंश सेल्यियस तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानही २७.८ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे नाशिक लगतच्या जळगाव जिल्ह्यात १० तर पुणे जिल्ह्यात ९.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. ख्रिसमस होईपर्यंत अशाच वातावरणाचा अनुभव नाशिककरांना येऊ शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हुडहुडी भरविणाऱ्या या थंडीमुळे सुर्योदयापूर्वीच धुके पडत असून, शेकोटी आणि जॉगिंगचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत आहे. उबदार कपडे परिधान करण्यास अबाल वृध्दांकडून प्राधान्य दिले जात आहे.

--

पाच दिवसातील तापमानाची नोंद

दिनांक किमान तापमान

१९ डिसेंबर ११.५

२० डिसेंबर १३.२

२१ डिसेंबर १३.०

२२ डिसेबंर ७.४

२३ डिसेंबर ६.०

--

गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद

दिनांक तापमान

७ जानेवारी २०११ ४.४

९ फेब्रुवारी २०१२ २.७

६ जानेवारी २०१३ ४.४

२९ डिसेंबर २०१४ ६.१

११ जानेवारी २०१५ ५.६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक पिशव्यांचा वापर पडला महाग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरांवर प्रतिबंद असतानाही अशा पिशव्यांचा शहरात वापर होत आहे. महापालिकेने अशा व्यापाऱ्यांवर वर्षभरात कारवाई करीत ७५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. मात्र, हे हिमनगाचे टोक असून, हानिकारक पिशव्यांचा वापर पाहता महानगरपालिकेकडून नावापुरती कारवाई होत असल्याचे दिसून येते.

पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या पर्यावरणास हानिकारक ठरतात. या पिशव्या लवकर नष्ट होत नाहीत. तसेच, नाला किंवा गटारीत पिशव्या अडकून बसल्या तर पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर करू नये, असे आवाहन महापालिकेकडून नियमितपणे करण्यात येते. तसेच, या पिशव्या वापरताना कोणी आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. चालू वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत आरोग्य विभागाने १३७ केसेस करीत ७५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. यात सर्वाधिक केसेस मे महिन्यात झाल्या. ऑगस्ट महिन्यात बऱ्यापैकी केसेस करीत महापालिकेने सर्वाधिक म्हणजे ३३ हजार ७०० रुपयांचा दंड व्यापाऱ्यांकडून वसूल केला. महापालिकेकडून कारवाईत सातत्य नसते. व्यापारी याचा फायद घेत सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर करतात. महापालिकेची कार्यपध्दती पाहता याविषयी नागरिकांमध्येही जागरूकता येण्याची गरज असून, नागरिकांनीच या पिशव्यांची मागणी न केल्यास हा प्रश्न बऱ्याच अंशी सुटेल, असे मत पर्यावरणप्रेमी व्यक्त करतात.

--

महिना - केसेस - दंड

एप्रिल - १५ - २५ हजार २००

मे- ४८ - ७ हजार ३००

जून - १८ - २ हजार ४००

जुलै - ४ - १ हजार ७००

ऑगस्ट - ३९ - ३३ हजार ७००

सप्टेंबर - ११ - २ हजार १००

ऑक्टोबर - १ - २ हजार

नोव्हेंबर - १ - २००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिलेची पर्स लांबवली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेकडील पर्स ओढून दुचाकीवरील दोघा चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना मंगळवारी गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरात घडली. शंकरनगर परिसरात राहणाऱ्या उषा विश्वास भानोसे (वय ५७) या दुपारच्या सुमारास शिशुविहार बालक मंदिर या शाळेतून घरी जात असताना सावरकरनगर येथील टकले ज्वेलर्सच्या पुढे येताच पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी भानोसे यांच्या खांद्यास अडकवलेली पर्स ओरबाडून पळ काढला. या पर्समध्ये मोबाइल, रोकड असा सुमारे १० हजार रुपयांचा ऐवज होता.

प्रवासादरम्यान चोरी

बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेकडील ८३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये रंजना प्रकाश यादव (वय ४९) यांनी फिर्याद दिली. यादव सीबीएस येथून दिंडोरीकडे जाण्यासाठी बसमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी संशयित महिलेने यादव यांचे लक्ष विचलित करून त्यांच्याकडील ८३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

विद्यार्थ्यास मारहाण

किरकोळ कुरापत काढून चार संशयितांनी शाळकरी विद्यार्थ्यांस लोखंडी शस्त्राने बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सम्राट हॉटेलसमोर घडली. पीडित विद्यार्थी एच. वाय. पाटील हा शाळेतून घरी जात असताना त्याला चौघा संशयितांनी अडवून कुरापत काढून चौघांनी मिळून मारहाण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच स्वीकारताना तलाठ्याला अटक

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील अजंग येथील तलाठी वसंत भीमराव चव्हाण यास दोनशे रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. दोन दिवसापूर्वीच येथील भूमापकास अडीच हजाराची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते.

अजंग येथील तक्रारदार यांनी मालेगाव देना बँक येथून चार लाख वीस हजार रुपये पीककर्ज घेतले होते. या कर्जाची त्यांनीसंपूर्णपणे परतफेड देखील केली होती. शेतीच्या सातबाऱ्यावरील पीककर्जाचा बोजा कमी करण्यासाठी त्यांनी बँकेकडून दाखला देखील आणला होता. सदरचा दाखला तलाठी वसंत चव्हाण यांच्याकडे देऊन साताबाऱ्यावरील बोजा कमी करावा, अशी विनंती केली.

मात्र, तलाठी चव्हाण यांनी यासाठी ५०० रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती २०० रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. याबाबत तक्रारदाराने एसीबी नाशिक यांच्याकडे तक्रार दिली. एसीबीने बुधवारी सापळा रचून चार वाजेच्या सुमारास तलाठी चव्हाण यांना मालेगाव येथील रावळगाव नाका परिसरात तक्रारदाराकडून २०० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केटीएचएमच्या विद्यार्थ्यांची कामगिरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या रोशनी मुर्तडक, शरयू पाटील, शिवानी देशमुख, सायली सूर्यवंशी या मुलींची भोपाळ येथे २५ ते ३० डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंचे राष्ट्रीय स्तरावरील शालेय तलवारबाजी स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर अमरावती येथील मोशीरोडच्या विभागीय क्रीडा संकुलात होणार आहे.

या खेळाडूंची मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून निवड झाली होती. आठ विभागांतून प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांनी पात्रता सिद्ध केली होती. खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे, सरचिटणीस नीलिमाताई पवार, सभापती अॅड. नितीन ठाकरे, उपसभापती नानाजी दळवी, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. बी. बी. शिंदे, प्रा. सुनील जाधव, प्रा. डी. एम. आहेर, प्रा. के. पी. लवांड व प्रा. बी. बी. पेखळे, शरद पाटील, सचिन पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनाक्षीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

महाराष्ट्र राज्य क्रीडा युवा संचालनालय, पुणे यांच्या तर्फे शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत नांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या सोनाक्षी शिंगाडे हिने प्रथम पारितोषिक पटकावले. तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ५५ किलो वजनी गटात सोनाक्षीने हे यश संपादन केले. या यशाबद्दल मविप्रचे संचालक दिलीप पाटील, मुख्याध्यापक डी. व्ही. गोटे, उपमुख्याध्यापक पी. एस. कापडणीस, क्रीडा शिक्षक बी. एम. आहेर, जे. आर. काळे, मार्गदर्शक पृथ्वीराज वडघुले यांनी सोनाक्षीचा गौरव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेतर्फे आज पुरस्कार वितरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेतर्फे दरवर्षी वर्धापनदिन सोहळ्याचे औचित्य साधून संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समाजगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदाही विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी केलेल्या पाच व्यक्तींना असा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. आज, शुक्रवार २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता सच्चिदानंद सद‌्गुरू श्रीराम महाराज बडवाह, तसेच ज्येष्ठ रंगकर्मी शरद पोंक्षे यांच्या हस्ते परशुराम सायखेडकर नाट्यगृहात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या वतीने समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्यातील यंदाचे पुरस्कार जाहीर झाले असून, पुरस्कारार्थींमध्ये नाशिकमधील दोन समाजसेवींचा समावेश आहे. वेदशास्त्रसंपन्न भालचंद्रशास्त्री गोडसे, बडोदा यांना वैदिक क्षेत्र, पुण्याचे रमाकांत परांजपे यांना संगीत क्षेत्र, नाशिकच्या मीना बापये यांना वैद्यकीय क्षेत्र, तर सोलापूरच्या अपर्णाताई रामतीर्थंकर, नाशिकच्या शैला उघाडे यांना समाजसेवेसाठी या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्यानिमित्त पुण्याच्या षड्ज-पंचमतर्फे 'स्वतंत्रते भगवती' कार्यक्रम सादर होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील पाच प्रमुख संत, छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर अशा एकूणच ७०० वर्षांतील कालखंडात राष्ट्रातील मानसिक, सामाजिक जडण-घडण उलगडून दाखविणारा निवेदनात्मक गीतांचा समावेश असेल. अभिनेते शरद पोंक्षे, हेमंत बर्वे यांचा कार्यक्रमात सहभाग असणार आहे. कार्यक्रमाला समाजबांधवांसह नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था समाज सहायक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड‌ीकॅथलॉनतर्फे ख्रिसमस सोहळ्याचे आयोजन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विल्होळी येथील डीकॅथलॉन या स्पोर्टस् स्टोअरतर्फे डिसेंबर महिन्यात ख्रिसमस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील नामांकित ब्रँडस््च्या खेळांच्या साहित्यावर भरघोस डिस्काऊंट देण्यात येत आहे. तसेच विविध खेळांच्या स्पर्धांचे देखील आयोजन केले आहे.

डीकॅथलॉनतर्फे सुरू झालेल्या ख्रिसमस सोहळ्यात ग्राहकांना ‌विविध स्किम्सचा लाभ घेता येणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये २६ ते २८ डिसेंबरपर्यंत ख्रिसमस किड्स स्पोर्टस् कॅम्प, २५ डिसेंबर रोजी ड्यूएथलॉन, २७ डिसेंबर रोजी रीलॅक्स अँड बॅलन्स योगाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्या दरम्यान ग्राहकांना क्रीडा साहित्यावर आकर्षक डिस्काऊंट देण्यात येणार असून, ग्राहकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रमसंस्कारातून जिंकली मने

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

के. के. वाघ. इंजिनीअरिंग कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) विल्होळी येथे विशेष श्रमसंस्कार शिब‌िर सुरू आहे. यात विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम घेवून तसेच श्रमदान करून ग्रामस्थांचे मन जिंकले. शिब‌िरात सहभागी विद्यार्थ्यांनी गावातर्फे सर्व सहकार्य मिळेल. त्यांच्या कल्पनांचा, शिक्षणाचा गावाला उपयोग व्हावा, असे मत विल्होळीचे सरपंच बाजीराव गायकवाड यांनी व्यक्त केले.

शिबिरात ग्रामस्वच्छता, जलसंधारण, पर्यावरण संवर्धन, महिला सबलीकरण,अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छ व स्वस्थ भारत यासंबंधी उपक्रम राबविण्यात आले, अशी माहिती कार्यक्रम अधिकारी नानासाहेब गुरुळे यांनी दिली. यावेळी प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर उपस्थित होते. शिबिरात जॉगिंग ट्रॅक परिसरात श्रमदान, पत्रक वाटप, गावातील जैन मंदिर परिसरातील गोशाळेत श्रमदान, रक्तदान शिब‌िर आदी कार्यक्रम घेण्यात आले. तसेच लेक वाचवा, जलसंवर्धन, स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.

शिबिरात आकाशवाणीचे निवेदक ऋषिकेश आयाचित म्हणाले, की आजच्या मार्केंटिंगच्या युगात संवादकौशल्यांची पकड महत्त्वाची आहे. लहानपणापासून वाणी शुद्धता अवगत करण्यासाठी प्रयत्नशील रहावे. डॉ. शेखर जोशी यांनी व्यक्तिमत्त्व विकासावर, डॉ. पुरुषौत्तम पुरी यांनी आहार व योगा या विषयावर, डॉ. आदिती वाघमारे यांनी हास्ययोगावर, जिल्हा परिषदेचे गटविकास अधिकारी रवींद्र परदेशी यांनी स्पर्धा परीक्षा व अभियांत्रिकी क्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेतील स्थान याविषयावर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवीर यांनी स्वच्छतेतून सम्रुद्धीकडे या विषयावर व्याख्यान दिले. शिबिर समारोपप्रसंगी वाचनालय व अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यक्रम अधिकारी प्रा. नानासाहेब गुरुळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भिकेला लावणाऱ्या पालकांवर गुन्हे

0
0

कारवाईला गती देण्याचे पोलिसांचे संकेत; शहरातून तीस मुलांची सुटका

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेल्वे स्टेशन, सिग्नल, गंगाघाट, विविध मॉल्सच्या बाहेर केविलवाण्या चेहऱ्याने भीक मागणाऱ्या ३० मुलांची सुटका करून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. एवढेच नव्हेतर मुलांना भीक मागण्यास प्रवृत्त केले म्हणून चार पालकांविरोधात वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये बाल न्याय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलिस, महिला व बालकल्याण विभाग तसेच चाइल्ड लाईन संस्थेच्या संयुक्त विद्यामाने हाती घेण्यात आलेल्या मोहिमेत ० ते १४ वयोगटातील ३० मुलांची सुटका करण्यात आली. भीक मागणाऱ्या महिला व लहान मुलांना ताब्यात घेण्यासाठी शहर पोलिसांनी नऊ पथके तैनात केली होती. यात, जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महिला पोलिस कर्मचारी इत्यादींचा समावेश होता. या पथकाने सीबीएस, शालिमार, त्र्यंबक नाका, बिटको चौक, शरणपूररोड, शरणपूररोड पोलिस चौकी, गंगापूररोड तसेच शहरातील बहुतांशी वाहतूक सिग्नलवर तपासणी केली. त्र्यंबक नाका, सीबीएस, बिटको चौक, शरणपूररोड पोलिस चौकी व गंगाघाटावर भीक मागताना लहान मुले व महिला मोठ्या संख्येने आढळून आल्या. शहरातून ० ते ६ या वयोगटातील १६ तर ६ ते १४ वयोगटातील १४ मुलांना ताब्यात घेण्यात आले. या मुलांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली असून, मुलांना भीक मागण्यास प्रवृत्त करणाऱ्या चार पालकांविरोधात सरकारवाडा, पंचवटी, भद्रकाली तसेच उपनगर पोलिस स्टेशनमध्ये बाल न्याय अ​धिनियम २००० च्या कलम २४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अशा प्रकारे गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांनी दिली. हा एक सामाजिक प्रश्न असून, पालकांच्या निष्काळजीपणामुळे कोवळ्या वयातील मुलांच्या हक्कांवर गदा येते. यापुढे असे प्रकार घडू नये म्हणून थेट पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. दरम्यान, अपहरण करून आणलेल्या मुलांचा भीक मागण्यासाठी वापर केला जातो काय याबाबत चौकशी सुरू असून, तसा कोणताही पुरावा अद्याप समोर आला नसल्याचे उपायुक्त अंबिका यांनी स्पष्ट केले. ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांची मेडिकल करून त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात आल्याचे जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी ​देवेंद्र राऊत यांनी स्पष्ट केले. संबंधित मुलांच्या पालकांचे समुपदेशन करून मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे व गणेश कानवडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेतील नोकरीसाठी साडेसात लाखांची फसवणूक

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील ओळखीचा फायदा घेऊन मुलीला कामाला लावून देणार असे खोटे आश्वासन देऊन तिघा महिलांनी तब्बल ७ लाख ८५ हजार रुपये उकळले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

रविवार कारंजा परिसरातील गोरेराम लेनमध्ये राहणाऱ्या हेमा धनजी चव्हाण (वय ५९) यांची मुलगी हर्षा हिस नोकरी पाहिजे होती. त्यासाठी हेमा यांनी संशयित हंसा लालजी मकवाना, मनीषा मकवाना आणि विजया मकवाना यांच्याशी ७ नोव्हेंबर २०१२ रोजी संपर्क साधला. सदर मुलीला नाशिक महापालिकेत चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून नोकरी देऊ असे सांगत संशयितांनी पैशांची मागणी केली. त्यानुसार चव्हाण यांनी मनीषा आणि विजया मकवाना यांच्याकडे जानेवारी २०१५ पर्यंत तब्बल ७ लाख ८५ हजार रुपये दिले. तर, दोघा संशयितांनी वेगवेगळ्या कागदपत्रांवर चव्हाण यांच्या सह्या करून घेत नोकरी देण्यास टाळाटाळ केली.

वारंवार चालढकल होत असल्याचे लक्षात आल्याने चव्हाण यांनी पैसे मागितले असता तिन्ही महिलांनी पैसे देण्यास नकार दिला. तसेच, नोकरी देण्याबाबत हात वर केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने चव्हाण यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तिघींविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. महापालिकेच्या नावाखाली झालेल्या लुबाडणुकीच्या प्रकारात आणखी संशयितांचा सहभाग आहे काय याचा सखोल तपास करण्याची मागणी केली जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुलांना जबाबदारीची जाणीव करून द्या’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'न्यायालयीन कर्मचाऱ्यांना कुटुंबासाठी वेळ देणे क्वचितच शक्य होत असल्यामुळे त्यांनी आपल्या पाल्यांना जबाबदारीची जाणीव करून दिल्यास त्यांचे भविष्य उज्ज्वल करता येईल,' असे प्रतिपादन प्रभारी जिल्हा सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी-पालखे यांनी केले. नाशिक जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या पाल्य गुणगौरव सोहळ्याचे आयोजन प. सा. नाट्यगृहात करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या उपस्थित होत्या.

कार्यक्रमात शालेय स्तरापासून विविध मोठ्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा गौरव करण्यात आला. जोशी-पालखे यांनी मार्गदर्शन करतांना वेळेचे बिघडते गणित मुलांकडे दुर्लक्ष होण्यास कारणीभूत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप मिळाल्यास त्यांचा उत्साह वाढून पुढील अभ्यासासाठी मदतच होते. त्यामुळे असे समारंभ गरजेचे आहेत असेही त्यांनी

नमुद केले. जिल्हा सरकारी वकील आर. वाय. घोंगडे यांनी पाल्याच्या आरोग्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले. चौफेर विकासासाठी व्यायाम, आहार व ध्यान आवश्यक असल्याचे त्यांनी नमुद केले. इतर आमंत्रित पाहुण्यात दिवाणी न्यायाध‌ीश एस. झेड. पवार, वकील संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे, सहदिवाणी न्यायाधीश पठारे आदींनीही मार्गदर्शन केले. पतसंस्थेचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यामुळे यावेळी विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन व पतसंस्थेचे अध्यक्ष अयुबखान पठाण यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या संचालक वर्गाने परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफारीसह फरार संशयित अटकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई-आग्रा महामार्गावरील कंचन शोरूम येथून सोमवारी रात्री सातच्या सुमारास टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने चोरी झालेली सफारी कार पोलिसांनी परत मिळवली. या प्रकरणी पोलिसांनी नांदुरमध्यमेश्वर येथील रवींद्र पांडूरंग पगारे यास ताब्यात घेतले. पगारेने नवी कोरी सफारी स्टोर्म ही कार चोरून नेल्यानंतर भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

द्वारका परिसरातील शोरूममध्ये सोमवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे वर्दळ होती. यावेळी पायी आलेल्या संशयित पगारेने शोरूममध्ये जाऊन सफारी गाडीची टेस्ट ड्राईव्हची मागणी केली होती. त्यानुसार शोरूमचे सेल्समन देवेंद्र पवार हे त्याच्यासोबत गेले होते.

विशेष म्हणजे एक मोबाइल क्रमांक वगळता इतर कोणतीही माहिती शोरूम व्यवस्थापनाने घेतली नाही. टेस्ट ड्राइव्हसाठी बाहेर गेलेली कार उड्डाणपुलावर जाताच संशयित पगारे याने पवार यांना चाकूचा धाक दाखवून गाडीतून उतरवून दिले व सफारी घेऊन तो मुंबईच्या दिशेने पसार झाला. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी शोध पथक

तयार करून अंधेरी, येवला, वैजापूर आदी ठिकाणी जाऊन वाहनाचा शोध घेतला. दरम्यान, पगारेने दिलेला नंबरची माहिती पोलिसांनी घेतली असता तो मुंबईतील एका व्यक्तीचा असल्याचे स्पष्ट झाले. मूळचा निफाड येथील असलेला सदर व्यक्ती पगारेचा मित्र आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली.

पोलिसांचा शोध सुरू असताना मंगळवारी निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयाजवळील जिल्हा परिषद शाळा क्र. २ येथे चोरी झालेली टाटा सफारी बेवारस स्थितीत आढळून आली. पोलिसांनी तब्बल ४८ तास थंडीच्या कडाक्यात साध्या वेषात सापळा रचून संशयितास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बुधवारी सकाळपर्यंत वाहन घेण्यासाठी संशयित आला नाही. पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता नांदुरमध्यमेश्वर येथील एका व्यक्तीने गाडी विकण्यासाठी आणल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी नांदुरमध्यमेश्‍वर येथे जाऊन संशयित पगारेला ताब्यात घेतले.

संशयित हा आठ महिन्यापूर्वी होमगार्डमध्ये काम करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्याचा तपास सिनीअर पीआय मधुकर कड, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे, पोलिस नाईक सोमनाथ सातपुते, पोलिस कर्मचारी मिलिंद परदेशी, राजेंद्र काळोखे, कवि खराटे आदींनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकांसाठी आता ‘उद्योग सारथी’ संकल्पना

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उद्योगाची पायाभरणी करताना विविध विभागांचे परवाने कमीत कमी वेळेत आणि एकाच ठिकाणी मिळावेत, यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे 'उद्योग सारथी' ही एक खिडकी संकल्पना नाशिक विभागात राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिली.

परवान्यांच्या कामातील किचकटता कमी होईल, असा आशावादही यावेळी डवले यांनी व्यक्त केला. सूक्ष्म, लघू किंवा मध्यम स्वरुपाचा उद्योग सुरू करताना किंवा निर्मिती अथवा सेवा प्रकल्प सुरू करताना उद्योजकाला महावितरण, कामगार आयुक्त, औद्योगिक सुरक्षा, प्रदूषण नियंत्रण कार्यालय, बाष्पके संचालनालय अशा अनेक प्रकारच्या कार्यालयांकडून विविध परवाने प्राप्त करवे लागतात. मात्र, ते मिळवताना प्रत्येक कार्यालयाकडे व्यक्तिश: पाठपुरावा करावा लागतो. यात वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. ही किचकटता टाळण्यासाठीच 'उद्योग सारथी' ही एक खिडकी संकल्पना राबविण्यात येत आहे.

या समितीची कार्यकक्षा व कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. समितीची बैठक महिन्यातून एकदा किंवा आवश्यकतेप्रमाणे अधिकवेळा होईल. उद्योजकाला यापुढे अनेक ठिकाणी अर्ज न करता एक खिडकीतच अर्ज द्यायचा आहे. सदस्य सचिव तो संबंधितांकडे पाठवून त्यावर कार्यवाही करतील.

उद्योग सारथी कक्षामार्फत द्यावयाच्या विविध सेवाही निश्चित करण्यात आल्या आहेत. उद्योग, कामगार, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण, बँकिंग, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, नगर रचना, अन्न व औषध प्रशासन, कामगार विमा संचालनालय आदी विभागांच्या सेवांचा यात समावेश आहे.

अशी आहे समिती

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नाशिक विभागातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महांडळाचे प्रादेशिक अधिकारी किंवा क्षेत्र व्यवस्थापक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक किंवा उपप्रादेशिक अधिकारी, बाष्पके संचालनालयाचे सहसंचालक, कामगार उपायुक्त, आरोग्य व औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे सहसंचालक, विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक, विशेष निमंत्रित असे या समितीचे सदस्य असतील. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images