Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सिन्नरमध्ये आगीत साडी दुकान खाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गणेशपेठेतील राधाकृष्ण टेक्सटाइल्स अॅन्ड सारिस या दुकानाला बुधवारी पहाटे अडीच तीन वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशामक दलाच्या सहा बंबांनी प्रयत्न करीत आग विझवली. या आगीत दुकानातील सर्व माल जळून खाक झाला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. लाखो रुपयांचे कापड, रेडिमेड कपडे, साड्या, ड्रेस मटेरियल आगीत जळून खाक झाले.
नुकसानीचा अंदाज संध्याकाळी उशिरापर्यंत लागलेला नव्हता. आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज आहे. आग वेळीच आटोक्यात आणल्यामुळे शेजारी असलेल्या इतर दुकानांना त्याची झळ पोहचू शकली नाही. गणेश पेठेत शेजारी शेजारी दाटीवाटीने असलेल्या बाजार पेठेत हे दुकान आहे. मूळचे राज्यस्थान येथील सुरेंद्र शर्मा यांनी ही जागा भाडे तत्वावर घेवून कापड दुकानाचा व्यावसाय करीत होते. या दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावर शर्मा कुटुंबीय राहतात. बुधवारी अडीच तीन वाजेच्या सुमारास दुकानाच्या खालच्या मजल्यावर आग लागली. दुकानाच्या दुसऱ्या बाजूला मनोज भंडारी यांच्या दुकानाचे बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी असलेल्या स्लॅब वरून शर्मा कुटुंबीयांना शिडीच्या सहायाने उतरवून घेण्यात आले. दुकानाच्या वरच्या मजल्यावर शर्मा हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. त्यांना सुखरूप खाली उतरवल्यानंतर अग्निशामक दल व सिन्नर पोलिसांना माहिती देण्यात
आली.
सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशमक दलाचे बंब पहाटे साडेतीनच्या दरम्यान घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धार केले होते. इंडिया बुल्सचे दोन अग्निशामक बंबही घटनास्थळी दाखल झाले. नाशिक येथूनही बंब बोलविण्यात आले. आग वेळीच आटोक्यात आणल्याने शेजारी असलेल्या दुकानांचे कुठलेही नुकसान झाले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिका शाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूरच्या शिवाजीनगर परिसरातील मनपा माध्यमिक विद्यालयात वर्गात घुसून तरुणाने विद्यार्थिनीस मारहाण करुन तिचा विनयभंग केला. गंगापूर पोलिसांनी अनंत महादू काळे (१९) याला ताब्यात घेतले आहे. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. शाळेतील १४ वर्षीय मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत बसलेली असताना संशयित काळे तेथे आला. त्याने असभ्य भाषेत पीडित मुलीसोबत संवाद साधला. त्यानंतर तिचा हात पकडला. तिच्या मैत्रीनीने तिला काळे याच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने दोघींना मारहाण केली. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी विनयभंग, मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल लांबविले

शहरात वेगवेगळ्या घटनांत दोन महागडे मोबाइल चोरीस गेले. शालिमार येथे बसची वाट पाहणाऱ्या कामिनी सचिन भालेकर (रा. कानडे मारुती लेन) यांच्या पर्समधील २१ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही चोरी झाली. चोरट्याने गर्दीचा फायदा घेत मोबाइल चोरल्याचे त्यांनी भद्रकाली पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दुसऱ्या घटनेत दिगंबर हरीश्‍चंद्र कंहाडळ (रा. ओढा) यांचा ४० हजार रुपयांचा मोबाइल चोरीला गेला. बुधवारी ते ओढा येथील आठवडे बाजारात आले होते. त्यांनी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

मोबाइल लंपास

दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने ५० हजार रुपये किंमतीचे मोबाइल आणि रोकड चोरून नेली. सोमवारी मध्यरात्री भद्रकालीतील प्रभात चित्रपटगृहासमोर हा प्रकार घडला. प्रवीण गोपीनाथ साळी (रा. डिंगर आळी, जुने नाशिक) यांनी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

रोकड हिसकावली

डीजीपी नगरकडून वडाळारोडकडे जाणाऱ्या तरुणाजवळील बॅग चोरट्यांनी हिसकावून नेली. या बॅगेत ५४ हजारांची रोकड होती. किरण विजय भालेराव (३३, रा. लक्ष्मण नगर, लोखंडे मळा, जेलरोड) यांनी फिर्याद दिली आहे. हिरोहोंडा स्प्लेंडर मोटरसायकलवरील दोघांनी त्यांना अडवले. मागे बसलेल्या संशयिताने त्यांच्याजवळील पैशांची बॅग हिसकावून पोबारा केला.

सहा लाखाचा ऐवज जप्त

नाशिकरोड : घरफोड्या करून विविध साहित्या चोरणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना युनिट तीनच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल व सहा लाखांचा ऐवज जप्त केला. न्यायालयाने त्यांना ८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

संशयित राहुल सोनवणे, महेश आंधळे, निलेश भोसले यांना अटक झाली. किरण पाटील उर्फ गुजर फरार आहे. संशयितांकडून सॅन्ट्रो कार (एमएच १५ बीएन १८४), सहा एलसीडी टीव्ही, एक लॅपटाप, दोन व्हिडिओ प्लेअर, दोन मोबाइल, एक कॅमेरा, गॅस सिलिंडर शेगडी, चार तोळे सोन्याचे दागिने, संसार उपयोगी वस्तू, गावठी पिस्तुल असा सहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. संशयितांपैकी एकाने २०१२ साली गावठी पिस्तुल जप्त करुन दुसऱ्या संशयिताला विकले होते. त्याच्याकडून पोलिसांना चोरीचा सुगावा लागला. नाशिकरोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक तर उपनगर हद्दीत सहा गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

दांडका मारून लूट

दुचाकीवर आलेल्या दोघांनी लाकडी दांड्याने मारहाण करीत ५३ हजार रुपये लुटले. उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण विजय भालेराव (३३, लक्ष्मणनगर, लोखंडे मळा, जेलरोड) ५ जानेवारीला अंबड येथील मारुती ऑटोमोटिव्ह कंपनीतर्फे पेमेंटचे पैसे घेण्यासाठी उपनगरच्या सिंधी कॉलनी येथे आले. रोकड घेऊन दुचाकीवर जात असताना डीजीपीनगर येथे दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना लुटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवतींसाठी ‘आनंदींचा उत्सव’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक 'हमारी दौड... सपनोंकी और...' हे ब्रीद घेऊन नाशिक शहरातल्या १५ ते ३५ वयोगटातील युवतींसाठी 'आनंदींचा उत्सव' नाशिक येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. गुरुवार ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विश्वास लॉन्स, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड येथे हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

यशस्विनी सामाजिक अभियान, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, अक्षरा स्त्री संसाधन केंद्र-मुंबई, अभिव्यक्ती म‌ीड‌िया फॉर डेव्हलपमेंट, नाशिक, रेडिओ विेशास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विेशास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, महिला व मुलांकरीता सहाय्य कक्ष, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा आनंदींचा उत्सव होणार आहे.

युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी या संस्था एकत्र येऊन सातत्याने विविध उपक्रम करणार आहेत. आनंदींचा उत्सव ही या उपक्रमाची सुरुवात आहे. देशाच्या सक्षम नाग‌रिक घडविणे हा या मागचा प्रमुख उद्देश आहे. सध्याच्या माहितीच्या युगाच्या विस्फोटामुळे अपूर्ण माहिती असलेला युवावर्ग इंटरनेटच्या मायाजालात दिवसेंदिवस अडकत जाताना दिसतो आहे. या वर्गाला या मायाजालाचा स्वतःच्या तसेच समाजाच्या सक्षमीकरणासाठी कसा उपयोग करावा यासारख्या अनेक विषयांवर खेळांच्या माध्यमातून चर्चा या आनंदी उत्सवात होणार आहे. भविष्यात या युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यशाळा प्रशिक्षण शिब‌िरे यांचे आयोजन या माध्यमातून करण्यात येणार आहे. शिक्षण, आरोग्य, सबलीकरण, सुरक्षितता या विषयांवर प्रामुख्याने यात भर देण्यात येणार आहे.

याप्रसंगी बीबीसीच्या जगातील पहिल्या १०० पॉवरफुल वुमेन किताबाच्या मानकरी मुमताज शेख, नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंबळे, सपकाळ नॉलेज हबच्या संचालिका कल्याणी सपकाळ, फ्रॉवशी अ‍ॅकेडमीच्या संचालिका शर्वरी लथ, जामा मस्जिद चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त रऊफ पटेल, यशस्विनी सामाजिक अभियानाचे संचालक विेशास ठाकूर, उपाध्ये क्लासेसचे संचालक रमेश उपाध्ये, अक्षरा स्त्री संसाधन केंद्राच्या अध्यक्षा नंदिता शहा, विश्वास को-ऑप. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सारिका देशपांडे आदी याप्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत.

या उत्सवात विविध स्टॉल्स् उभारण्यात येणार असून, त्या माध्यमातून युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या विविध विषयांवर खेळांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विविध नृत्याविष्कार, मनोरंजनाचे कार्यक्रम, मल्लखांब प्रात्याक्षिके हे कार्यक्रमही यात सादर होणार आहेत. मोबाइलचा वापर कसा करावा? शिक्षणातील संधी, शिक्षणाचा सक्षमीकरणासाठी काय उपयोग, छेडछाडीला प्रतिबंध कसा करावा, सायबर गुन्हेगारी, सौंदर्य, आहार व खेळ, वयात आलेल्या मुलींचे शारी‌रिक व मानसिक बदल या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी उपाययोजनेचा जागतिक पातळीवरील पेटंट मिळवणारी नाशिकची सृष्टी नेरकर व ग्लोबल वॉर्मिंगवर काम करणारी चिण्मयी पेडणेकर या प्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ठाकूर, अनिता पगारे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पायपिटीतून व्यसनमुक्तीचा संदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तरुणांनी व्यसनाधिनता सोडून व्यायामाकडे वळावे याचा प्रचार करण्यासाठी नाशिक मधील उद्योजक रंजय त्रिवेदी यांनी सलग सहा दिवस त्र्यंबकरोड येथील गोल्फ क्लब मैदानाला १००८ फेऱ्या मारण्याचा विक्रम बुधवारी सायंकाळी पूर्ण केला.

त्रिवेदी यांनी त्र्यंबकरोड येथील गोल्फ क्लब मैदानाला गुरुवारी (दि. ३१) डिसेंबरपासून चालण्यास सुरुवात केली. गोल्फ क्लब मैदानाचा जॉगिंग ट्रॅक ८०० मीटरचा असून, बुधवारी (दि. ६) रोजी दुपारी ४ वाजता १००८ फेऱ्या पूर्ण केल्या.

त्यांच्या विक्रमाचा समारोप महापौर अशोक मुतर्डक, उपमहापौर गुरुमीत बग्गा यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी महापौर म्हणाले, की रंजय त्रिवेदी यांचा आदर्श घेऊन अधिकाधिक युवकांनी खेळाकडे वळावे. दिवस-रात्र अविश्रांत चालत फक्त शारीरिक तपासणी आणि नैसर्गिक विधीसाठी थांबण्याचा अपवाद वगळता त्रिवेदी हे सलग चालत होते. नाशिकमध्ये 'अॅथेलॅटिक' खेळासाठी पोषक वातावरण आहे. खेळाडूंनी खेळात करिअर करावे असे आवाहन महापौरांनी युवकांना केले. मार्शल आर्ट राजीव आग्रे यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्रिवेदी यांनी सलग चालण्याचा विक्रम केला आहे. फेरी मारण्याच्या काळात त्रिवेदी यांनी दररोज १८ ते २० अंडी, २५० ग्रॅम मासांहार असा आहार घेतला पाण्याऐवजी ताक पिण्याचे प्रमाण जास्त असल्याचे त्रिवेदी यांनी सांगितले. दरवर्षी विविध विक्रम करणाऱ्या त्रिवेदी यांनी सलग १०० तास चालणे, गोल्फ क्लब मैदानाला १०० फेऱ्या मारणे, सलग २४ तास चालणे असे वेगवेगळे विक्रम केले आहेत.

गुरुवारपासून सुरू केलेल्या विक्रमी वाटचालीसाठी त्रिवेदी दररोज प्रोटीन पावडर, सफरचंद, संत्री, मिक्स ड्रायफ्रुट्स पावडर, उकडलेले चिकन असा आहार घेत होते. त्यांच्या या उपक्रमासाठी मिलिंद खरे यांनी विशेष सहाय्य केले गोल्फ कल्ब येते झालेल्या समारोपाच्या कार्यक्रमाला जॉगर्स कल्बचे अध्यक्ष नाना निकुंभ, कृष्णा नागरे, हेमंत गोसावी, डी. जी. सूर्यवंशी, मधुकर जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरवस फाटा-शिर्डी रस्त्यावर आढळला युवकाचा मृतदेह

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

भरवस फाटा शिर्डी या महामार्गावरील सातमोरी परिसरात बाळासाहेब सोनार यांच्या क्षेत्रात बुधवारी सकाळी २५ वर्षे वयाच्या तरुणाचा रक्तबंभाळ अवस्थेतमृतदेह आढळून आला आहे. निफाडचे पोलिस उपाधीक्षक दीपक गिरे, पोलिस निरीक्षक आर. बी, सानप आदिंनी घटनस्थळी भेट दिली.

सातमोरी हा परिसर कोपरगाव व निफाड या दोन्ही तालुक्यांचे मध्ये येत असल्याने गुन्हा कुठे दाखल करावा यावर वाद निर्माण झाला. अखेर शिरवाडे हद्दीत घटना घडल्याचे तलाठ्याने सांगितल्याने या गुन्ह्याची नोंद लासलगाव पोलिसांनी केली. सतमोरी हा परिसर 'डेथ स्पॉट' म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी एका महिलेचा याच परिसरात खून झाला होता. या रस्त्यावर रस्तलुटीचे प्रकार सातत्याने होत असतात. त्यामुळे या भागात पोलिस चौकी व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे. मात्र, पोलिस येथे न राहता वाकद फाटा येथे राहतात. येथे पोलिस चौकिसाठी ग्रामसभेने ठरावही पाठवले आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्याने गुन्हेगारांचे फावत आहे.

विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी माहेराहून पैसे आणावेत या मागणीसाठी छळ होत असल्याने विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केला. ध्रुवनगर परिसरात हा प्रकार घडला. आरती सोमनाथ ठाकूर असे त्या विवाहितेचे नाव आहे. तिने मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आरती यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये पती आणि दिराविरोधात फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जल‌वाहिनी कामाची प्रतीक्षा

$
0
0

अनेक वर्षांपासून मुख्य रस्त्यांचे तरी खडीकरण व डांबरीकरण करावे अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. महापालिकेचे उंबरठे झिजवले आहेत पण काहीही उपयोग होत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. मुख्य जलवाहिनी कॉलनी अंतर्गत अद्याप टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरात राहूनही चौकात जाऊन पाणी आणावे लागत आहे. शिवाय रस्त्यापासून घरापर्यंत जलवाहिनी सर्वांना टाकणे गरजेचे असल्याने हजारो रुपये खर्च करावे लागत आहे. परंतु, पैसे खर्च करूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याची महिला वर्गाची तक्रार आहे.

परिसरात इतर कॉलनींकडे जाण्यासाठी नारायण नगरचा मुख्य रस्ता आहे. पण अजूनही त्याचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. याच मार्गायवर पथदीप उभे करण्यात आले. मात्र, त्यावर दिव्यांची जोडणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे पथदीप बंद आहे. अशी परिस्थिती अजुन किती काळ रा‌हील, असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केलेला आहे. रात्री अंधारात येतांना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गाला सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो.

बंद पथदीपांमुळे महिला व विद्यार्थी भयभीत होतात. काही प्रसंगी भुरट्या चोरांचा त्रास सहन करावा लागतो. टेलिफोन लाईन अद्याप टाकण्यात आलेली नाही. - वसंत चव्हाण

कॉलनीचा मुख्य रस्ता तयार करावा. खडीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासन दिरंगाई का करीत आहे. - अशोक मेधने

मुख्य जलवाहिनी त्वरित टाकावी. जलव‌ाहिनी अभावी पिण्याचे पाणी अतिशय कमी दाबाने येते. पाणी भरण्याचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो. - जगदीश अमृतकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदलीच्या धास्त‌ीमुळे अधिकाऱ्यांची धावाधाव

$
0
0

अपेक्षित ठिकाणी वर्णी लागावी यासाठी काही अधिकारी कर्मचारी नगरसेवकांच्या दारी पोचले आहेत. यात महापालिका आयुक्तांनी वर्षांनुवर्ष एकाच ठिकाणी ठिय्या मांडून बसलेल्यांची सर्वात अगोदर माहिती घेऊन बदली करण्याची मागणी होत आहे. यामध्ये नगरसेवकांच्या नावाने महापालिकेत जणू आपलीच चलती असल्याच्या रुबाबात मिरणाऱ्यांवर महापालिका आयुक्तांनी बदली केली पाहिजे. तसेच सहाही भागात काही कर्मचारी केवळ सह्याजी रावच असल्याने त्यांच्यावर देखील आयुक्तांनी अंकुश लावावा असे मत प्रामाणिक काम करणारे कर्मचारी व्यक्त करत आहेत.

महापालिकेत बदली दुसरीकडे टाळण्यासाठी काही अधिकारी व कर्मचारी आर्थिक व्यवहार देखील करतात. याबाबत कर्मचारी नाव न सांगता म्हणतात. परंतु, धडाडीने निर्णय घेणारे आणि स्वच्छ प्रतिमा असलेले आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वच्छ प्रशासन चालविण्यासाठी पैशांचे अमिष दाखविण्यांना धडा शिकविला पाहिजे, असे देखील मत प्रामाणिक काम करणारे कर्मचारी व्यक्त करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएफ’कडून दोन कोटींची वसुली

$
0
0

कंत्राटी व रोजंदारी कामगारांचा पीएफ भरावा याबाबत पीएफ कार्यालयाने महापालिका व नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी आवाहन केले. मात्र, याचा फारसा विचार महापालिका व नगरपालिकांनी केला नाही. या पार्श्वभूमिवर पीएफ आयुक्त तांबे यांनी नोटीसा बजावत रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश संबंधित चारही महापालिका व नगरपालिकांना दिले. यात रेकॉर्डच नसल्याचे आढळून आले. त्यातच नाशिक महापालिकेचे रेकाँर्ड जमा करण्याचे काम सुरू आहे. तसेच सिन्नर, इगतपुरी, येवला, मनमाड, त्र्यंबकेश्वर आदी नगरपालिकांना नोटीसा देऊन रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती तांबे यांनी दिली.

दरम्यान धुळे, जळगाव महापालिका व चाळीसगाव, नंदुरबार नगरपालिका यांची बँक खाते पीएफ कार्यालयाने सिल केल्यानंतर त्यांनी तब्बल दोन कोटी रुपयांचा पीएफचा भरणा केला आहे. यामध्ये १ कोटी २९ लाख ४० हजार रुपये धुळे महापालिकेने १४ डीडीद्वारे भरले आहेत. नंदुरबार नगरपालिकेने २० लाख ९२ हजार स्टेट बँकेचा एक डीडीद्वारे भरले आहेत. जळगाव महापालिकेने २९ लाख रुपये अलहाबाद बँकेचे चेकने दिले आहेत. चाळीसगाव नगरपालिकेकडे थकित असलेले ८५ लाखांपैकी २० लाख रुपयांचा भरणा केला आहे. उर्वरित रक्कम महिन्याभरात देण्याचे कबूल केले आहे. आपल्याकडे काम करत असलेल्या प्रत्येक कामगाराचा पीएफ भरलाच पाहिजे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा तांबे यांनी दिला. दरम्यान, वसुली करण्यासाठी कामगिरी बजावणारे पीएफचे सहाय्यक आयुक्त शैलेंद्रसिंग, ललित लहामगे व आर. डी. शिरसाठ यांचे आयुक्त तांबे यांनी अभिनंदन केले आहे.

यूएएनसाठी प्रबोधन युनिर्व्हसल अकाऊंन्ट नंबरची (यूएएन) नोंदणीबाबत प्रबोधन शिबिर घेतले जात आहे. यात कारखाने असो किंवा कुठल्याही आस्थापना कामगारांचा पीएफ भरणे अनिर्वाय आहे. शैक्षणिक संस्था, रुग्णालये व हॉटेल येथे काम करणाऱ्यांनाही यूएएन नोंदणीबाबत प्रबोधन केले जात अाहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘महोत्सवातून दिसावा ६४ कलांचा संगम’

$
0
0

सकाळच्या गुलाबी थंडीत, कोवळ्या उन्हात शेकडो विद्यार्थ्यांनी महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शेकडो विद्यार्थ्यांसह चित्रकारांनी सहभागी घेतला. यात शेतात काम करणारा शेतकरी, झाडे लावणारे बहिण भाऊ किंवा कुटुंब, माझे आवडते कार्टून, स्वच्छता अभियान, मी संगणकावर चित्र काढतो अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी चित्रे रेखाटली. गेल्या ३ वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. उदघाटनप्रसंगी नगरसेवक बाबुराव मोजाड, तानाजी करंजकर, विश्वनाथ काळे, भाऊसाहेब धिवरे, राजेंद्र ताजनपुरे आदी उपस्थित होते. जीवन गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेनकोटऐवजी स्वेटरची खरेदी !

$
0
0

नाशिक : आदिवासी आश्रमशाळांमधील पावणेतीन लाख विद्यार्थ्यांना अव्वाच्या सव्वा दरात वुलनचे स्वेटर खरेदी करण्याच्या वादग्रस्त प्रकरणात आता आणखीनच धक्कादायक बाब समोर आली आहे. आश्रमशाळांमधील मुलांना स्वेटरची मागणी केली नसतांनाही, मंत्रालयातील सरकारी बाबूंनी रेनकोट ऐवजी परस्पर स्वेटर खरेदीची प्रक्रिया सुरू केल्याचे समोर आले आहे. आदिवासी आयुक्तालयाने एप्रिल २०१५ मध्ये पावसाळ्यात विद्यार्थ्यांसाठी रेनकोट खरेदी करण्यासाठी दिलेल्या प्रस्तावावर अंमलबजावणी करण्याऐवजी परस्पर प्रस्ताव बदलून ३१ कोटीच्या स्वेटर खरेदीला चालना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराने अगोदरच बदनाम झालेल्या विभागाचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे.

नेहमीच आपल्या अजबगजब कारभारासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्याच्या आदिवासी विकास विभागाचा आणखी एक गजब नमुना समोर आला आहे. आदिवासी विभागाने चालू वर्षासाठी आश्रमशाळेतील पावणेतीन लाख विद्यार्थ्यांना स्वेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे नेहमीच कॉटनमिश्रीत स्वेटर खरेदी करणाऱ्या विभागाने या वर्षी शंभर टक्के वूलनचे स्वेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. परंतु जानेवारी सुरू झाला तरी, अद्याप विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले नाहीत. बाजारात एका स्वेटरची किंमत ही ५०० ते ७०० रुपयांपर्यत असतांना, वूलन खरेदीच्या नावाखाली विभागाने तब्बल ११०० ते २१०० रुपयांना एक स्वेटरची खरेदी केला. पुण्यातील प्रेस्टीज गारमेंट या कंपनीची निविदा विभागाने स्विकारली असून, त्याला ३१ कोटीच्या या खरेदीची वर्कऑर्डरही देण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु या तयारीपूर्वीच ही खरेदी आता वादात अडकली आहे. वर्कऑर्डर दिली तरी, पुरवठ्याला अजून महिन्याचा कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत हिवाळाच संपणार आहे. त्यामुळे वर्कऑर्डर द्यायची की नाही, याबाबतीत विभागच संभ्रमात आहे.

या खरेदी प्रक्रियेत धक्कादायक बाब म्हणजे आदिवासी आयुक्तालयाने मंत्रालयात स्वेटर खरेदीचा प्रस्तावच पाठविलेला नव्हता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. डोंगराळ भागात जास्त पाऊस पडत असल्याने विद्यार्थ्यांना रेनकोट पुरवठा करावा, असा प्रस्ताव एप्रिल २०१५ मध्ये आदिवासी मंत्रालयात पाठविण्यात आला होता. मात्र त्या प्रस्तावावर पावसाळा संपेपर्यंत काहीच हालचाल झाली नाही. मार्चपर्यंत निधी खर्चाची मर्यादा पूर्ण करण्यासाठी मंत्रालयातील बाबू आणि ठेकेदारांनी एकत्र येऊन स्वेटर खरेदीचा परस्पर निर्णय घेतला. यासाठी आदिवासी आयुक्तालयाच्या रेनकोटचा प्रस्तावाचाच अधार घेण्यात आला. हिवाळा सुरू होताच त्यात परस्पर बदल करून रेनकोट ऐवजी स्वेटर खरेदीच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. त्याला परस्पर आदिवासी मंत्र्यांसह नियोजन विभागाचीही परवानगी घेण्यात येऊन खरेदी प्रक्रियेलाही वेग देण्यात आल्याची चर्चा आता विभागातच सुरू झाली आहे. त्यामुळे आदिवासी विभागाच्या योजना नेमके राबविते कोण यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



टक्केवारीसाठी परस्पर बदल

आदिवासी विभागातील काही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे विभागात भ्रष्टाचाराची साखळी निर्माण झाली आहे. विभागातील भ्रष्टाचाराची व त्यातून निर्माण झालेल्या टक्केवारीची न्यायालयीन आयोगामार्फत चौकशीही सुरु आहे. विद्यार्थ्यांना रेनकोटची खरेदी केली असती, तर हा प्रस्ताव आठ कोटीच्या आतच आटोपला असता. त्यातून मिळणारी टक्केवारी ही कमी झाली असती. त्यामुळे रेनकोट ऐवजी परस्पर वूलन स्वेटरची खरेदी करण्याचा निर्णय झाला. स्वेटरमुळे या प्रकरणातील खरेदी ही ३१ कोटीवर गेली. सहाजिकच यातून टक्केवारीची रक्कम वाढून ठेकेदाराचेही भले झाल्याची विभागातच चर्चा आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना अद्यापही शैक्षणिक गणवेश पुरवू न शकलेल्या विभागाच्या थेट वूलनच्या महागड्या स्वेटरच्या खरेदीमागे मोठी टक्केवारीच कारणीभूत असल्याची चर्चा आहे. त्यासाठी थेट निविदा प्रक्रिया राबवितानाच प्रक्रियेत बदल करण्यात आल्याने ही प्रक्रियाच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आराईच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा
सटाणा तालुक्यातील आराई ग्रामपंचायतीचे सरपंच विजय सोनवणे यांच्याविरूध्द दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. आराई ग्रामपंचायतीचे सरपंच सोनवणे हे सदस्यांना कामकाजात विश्वासात घेत नाहीत, तसेच कामकाज करीत असतांना मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्या कारणाने १२ सदस्यांनी त्यांच्या विरूद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.

आराई ग्रामपंचातीच्या कार्यालयात तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करून अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. सभेस ग्रामपंचातीचे १५ सदस्य उपस्थित होते. त्यापैकी त्यांच्या विरूध्द १२ सदस्यांनी मतदान केल्याने सरंपच सोनवणे यांच्यावरील अविश्वास बहुमताने मंजूर करण्यात आला. यावेळी माजी सरपंच दिलीप सोनवणे, सदस्य छाया तलवारे, ज्योती अहिरे, एकनाथ अहिरे, साधना वसंत अहिरे आदि उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवमामलेदारांचा दुमदुमला जयघोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

`श्री यशवंतराव महाराज कि जय`, `श्री साधू देवमामलेदार महाराज कि जय`च्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात श्री यशवंतराव महाराज याची पालखी मिरवणूक मुख्य मंदिरातून मंगलमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत भागवत एकादशीच्या शुभ मुहूर्तावर निघाली. यशवंतराव महाराज यांच्या चांदीच्या मुकुटाचे आणि पादुकांचे भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. पालखी निघण्यापूर्वी सकाळी प. पु. श्री अण्णासाहेब माळी यांचे श्री देव मामलेदार यांच्या चरित्रावर सकाळी व्याख्यान झाले. त्यानंतर महापौर आणि मान्यवर यांच्या हस्ते श्री देव मामलेदार यांच्या समाधीचे पूजन झाले.

सकाळी १० ते १२ यावेळात श्रीमद भगवती पाठ झाला आणि सायंकाळी प्रभुणे महाराज यांचे श्री महायोग पूर्वाभ्यास या विषयावर प्रवचन झाले. रात्री ह. भ. प. भास्कर बुवा इंदोरकर यांचे कीर्तन झाले. त्यानंतर भजन व महाआरती करण्यात आली.


पंचवटी : कर्माशिवाय काहीच

साध्य होत नाही. त्यामुळे प्रत्येकाने जीवन जगत असताना आपले कर्म नीट करावे. कर्म नीट केल्यास आपले जीवन नक्की फुलते. जीवनाचा सर्वांगीण विकास होतो. कर्म चांगले असेल तर आपली अधोगती न होता प्रगती होते, असे प्रतिपादन मुंबई येथील प्रमोद केने यांनी केले. `जय गिरनार` या विषयावर ते बोलत होते. आपल्याजवळ अध्यात्माची बैठक असेल तर गुरू शोधण्यासाठी आपल्याला कोठेही जावे लागत नाही. आपली आपल्या गुरूवर आणि कार्यावर नितांत श्रद्धा असली पाहिजे. आपल्या जवळ जर श्रद्धा, भक्ती आणि दृढता असेल तर आपणास गुरूंचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीला जाळून मारले; पतीला जन्मठेपेची शिक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड
पत्नीने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून ठार मारल्या प्रकरणी निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने एकास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संजय संपत मोरे, रा. वडाळीभोई, ता. चांदवड असे आरोपीचे नाव आहे.
१२ डिसेंबर २०१२ रोजी पती संजय संपत मोरे याने त्याने दारु पिण्यासाठी पैसे मागितले होते. पत्नी शोभाने पैसे नकार दिल्यानंतर संजयने घरातील स्टोव्हमधून रॉकेल तिच्या अंगावर फेकले. त्यानंतर घरातील पेटता दिवा अंगास लागल्याने आपण भाजलो असल्याचा जबाब शोभा हिने उपचारांदरम्यान दिला होता. त्यानंतर शोभाचा मृत्यू झाला होता. संपत मोरे याच्याविरुध्द वडाळीभोई पोलिस स्टेशनला भादवि कलम ३०७ अन्वये, तर उपचारादरम्यान शोभाचा मृत्यू झाल्याने भादवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तपासाअंती सदर खटल्याचे आरोपपत्र निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अॅड यू. डी. गवांदे यांनी तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक प्रिया थोरात यांच्यासह एकूण बारा साक्षिदारांची साक्ष नोंदविली.
सदर खटल्याची अंतिम सुनावणी होऊन आरोपी संजय संपत मोरे यास भादवि कलम ३०२ अन्वये दोषी ठरवत जन्मठेप व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. जे. मंत्री यांनी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेहेर : चैतन्याचे माहेर

$
0
0

धनंजय गोवर्धने

चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी नाशिक आजच्या इतकं अवाढव्य वाढलेलं नव्हतं. नाशिकची लोकसंख्याही कमी होती. माणसं सर्वसाधारणपणे एकमेकांना ओळखत होती. किराणावाला, दूधवाला, न्हावी, कापड दुकानदार, मिठाईवाला हे सारेच ठरलेले असे. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना तेव्हा प्रचारात नव्हती; पण अस्तित्त्वात होती. आजच्या सारखे वेगवेगळे तज्ज्ञ नव्ह‌ते. सर्वच आजार एकच डॉक्टर तपासून औषध लिहून देई. त्याला प्रत्येक व्यक्तीची फॅमिली हिस्ट्री माहित असे. अशी सर्व माणसं जवळ असत. आज गावात असलेलं म्हसरूळ, चामरलेणी, पांडवलेणी, तपोवन, सोमेश्वर ही त्यावेळी आमची सहलीची ठिकाणं असत.

एचपीटी कॉलेजला असतांना ते खूप दूर वाटे. आजच्या सारख्या दुचाकींचा सुळसुळाट नव्हता. बहुतेक जण सायकलच वापरत, फारच थोड्यांकडे स्कूटर, मोटारसायकल असे. स्कूटरसाठी तेव्हा नंबर लावावा लागे आणि काही महिन्यांनी किंवा वर्षांनी ती मिळे. त्यामुळे आम्ही कॉलेजला सायकलनेच जात असू. पंचवटीच्या घरातून रविवार कारंजावरच्या मित्राकडे जमून पुढे जात असू. पण पावसाळ्यात मात्र सायकलवर कॉलेजला जाणं अवघड असे. आणि मुख्य म्हणजे अशा ओल्या अवतारात आपल्याला कोण कोण बघणार या कल्पनेनं अंगावर काटा येत असे. अशावेळी सिटीबस हा एकमेव उपाय असे. पंचवटीतून कॉलेजच्या बसला फारशी गर्दी नसे. पण रविवार कारंजा आणि मेहेर स्टॉपला बस रंगीबेरंगी कपड्यांनी आणि ऋतू कालोद्भव पुष्पांनी आणि सुगंधानी भरून जात असे. सुगंधीत पाऊस बसभरून दरवळत राही. केसात अडकलेला पाऊस, फुलांच्या पाकळ्यावर थबकलेला पाऊसस, पाठीवर घुसमळणारा, पाऊस श्वासात भरलेला पाऊस, बस बाहेर कोसळणारा आणि बसच्या आतही कोसळत असे.

आजच्या मेहेर स्टॉपच्या समोर पूर्वी 'मेहेर हॉटेल' होतं आणि त्यामुळे त्या स्टॉपला मेहेर बसस्टॉप असं नाव पडलं. आता त्या जागेवरती एक नवीन इमारत उभी आहे. मेहेर हॉटेल हे एका इराणी अब्बास नावाच्या इसमाचं टिपीकल इराणी हॉटेल होतं. वेताच्या काळ्या रंगवलेल्या खुर्च्या संगमरवरी टॉप असलेली लाकडी टेबलं, भिंतीवरती मोठे आरसे आणि वरती चार पात्यांचे जुने पंखे,

डाव्या हाताला कॅश काऊंटर त्यांच्या उजव्या बाजूला एक मोठा फोटो, त्यात वर्तमान पत्रातलं कात्रण आणि एक फोटो, ज्यात एक शिकाऱ्याच्या पोषाखातला रुबाबदार इसम आणि त्याच्या पायाशी एक मारलेला वाघ. हा फोटो आणि त्यातला आपल्या नात्याविषयी अब्बास शेठच्या चेहऱ्यावर एक अभिमान आणि गर्व दिसून येत असे. त्या फोटोविषयी कोणी चौकशी केली तर सर्व अभिमानाने सांगत.

समोर काचेच्या बरण्यांत बि‌स्किट, नानकटाई, आणि मेहेर बेकरीतले इतर पदार्थ ठेवलेले असत. त्याच्या बाजूसच जुना काळा टेलिफोन ह्याचा नंबर सर्वांकडे असे. कधीही कोणाला अडचणीत हा टेलिफोन हक्काचा आणि कामाचा वाटे. तेंव्हा मोबाईल नव्हते. पण मेहेरला अब्बासशेठकडे निरोप ठेवला तर तो नक्की मिळणार ह्याची खात्री असे. कित्तेकवेळा मित्र मेहेरला जमत आणि तिथंच त्यांचे फोनही येत, आणि अब्बासशेठ कंटाळा न करता प्रेमाने तो देत असत.

मेहेरमध्ये टिपीकल इराणी चहा मिळायचा. अर्धा अर्धा चहा पिवून तासन् तास गप्पा मारत बसणारे ग्रुप काही रिकाम टेकडे काडेपेटी बोटांनी उडवून छापाकाटा खेळत, पैंज लावत आणि चहा बरोबर केळी, खिमापाव फस्त करत. काहींचे तर टेबलखुर्ची ठरलेले, तर कुणी एखादी इंग्रजी जाडजूड कादंबरी घेवून कोपऱ्यात शांत वाचत बसलेला असे. एकदा श्रीकांतनेकडे अभ्यासक्रमातलं इंग्रजीच पुस्तक नव्हतं. मेहेरला मित्रांकडे चर्चा आणि पुस्तकाच्या मुखपृष्ठावरचा मजकूर वाचून त्याने तो पेपर लिहीला होता आणि त्यात तो पासही झाला होता. अडलेल्या प्रत्येकाला मेहेरला आपली अडचण सोडवली जाईल. निदान काही तरी मार्ग निघू शकेल कोणीतरी मदत करु शकेल, अशी आशा असायची आणि ह्या आशेनेच अडचणीत मित्र मेहेरला जमत. समजा मदत नाही मिळाली तरी मनावरचं ओझं कमी करणारा एखादा तरी आधार असायचा, एकदा विवेकला त्याच्या नातेवाईकांसाठी एक विशिष्ट औषधाचं इंजेक्शन औरंगाबादेत हवं होतं. नाशिकमध्ये ते कुठे मिळेल का? ह्यासाठी त्यांनी चौकशी केली होती. विवेकने ती अडचण सांगितली. कारण मेहेरच्या मागे बरेच औषध कंपन्यांचे प्रतिनिधी रहात असत. जवळपास काही एजन्सीही होत्या. जोगीने त्याला औरंगाबादेत औषध कुठे मिळेल हे त्याचं नाव संदर्भ देवून मिळेल हे सांगितले आणि दोन तासात, औरंगाबादेत ‌ते इंजेक्शन रूग्णाला दिलं गेलं.

आजच्या सारखे फोन तेव्हा फार नव्हते. मोबाईल तर नव्हतेच. त्यामुळे अडचणींना रक्त लागलं तर मेहेरच्या एका मित्राकडे डायरी होती, त्यात जे रक्त देवू शकतात. ज्यांना आपला रक्तगट माहीत आहे, अशा रक्तदात्यांची नावं, त्यांचा पत्ता आणि रक्तगट ह्याची डायरी होती, मेहेरच्या मित्रांनी अशा अनेक अडचणीच्या रुग्णांना मदत केली आहे. मग तो आपला मित्र असो किंवा मित्राचा मित्र असो, मेहेरला जात, धर्म, पक्ष, आर्थिकस्तर, शैक्षणिकस्तर यांच्या पलिकडचं आहे. एक मित्रत्वाच नात तरंगत असायच, कधी कधी ही मैत्री फक्त सिगारेटच्या दोन झुरक्यातूनही झालेली असायची. काही जण फक्त सिगारेट पिण्यासाठी तिथपर्यंत येत. तिथला पानवाला, तरुण मुलांना सिगारेट देतांना म्हणायचा असे, 'बाबु ये अच्छा नही है' समोर मित्रविहार आजही आहे. तिथं टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, पत्ते खेळणारी मंडळी येत, कोर्टातही थकून आलेली वकील मंडळी असत. तर घरी जावून फ्रेश होवून फिरायला आलेली बँकर्स असत. राजकीय खलबत इथं चालत अनेक आमदार, खासदार, मेहेरमधूनच चहा पिले आहेत. अनेक खलबत, डाव, इथं आखले गेले आहेत.

मेहेरमध्ये खिमापाव, आमलेट पावचा खमंगवास असेपर्यंत मेहेरला मागच्या बाजूला वरती, पिणाऱ्यांची सोय होती. तेथे हलक्या आवाजात बरेच डाव शिजत. त्यांना मागच्या बाजूने रस्ता होता. मेहेरला मॅनेजमेंट बदलली आणि त्यांनी नाशकात पहिल्यांदा बारमध्ये महिला वेटर्स मुंबईहून आणल्या. सुरुवातीला गर्दी झाली आणि वाद, मारामाऱ्या होऊन हे प्रकरण लगेचच बंद झालं. मेहेरला हे मुंबईच कल्चर सहन झालं नाही.

मेहेरच्या समोरच्या बसस्टॉपच्या मागे ग. ग. हायस्कूलची कम्पाऊंड वॉल आहे. ही भिंत म्हणजे अनेकांची बसायची जागा होती. काहींचा तो टेहाळणी बुरुज होता. इथं प्रत्येकाचं काही तरी टोपण नाव होत. बोक्या, ढापण्या, भट्या, धन्या, पम्या, गज्या, विक्या, पाट्या आणि त्यांनाही त्या नावानं हाक मारलेल्या आवडायचं, त्यात मैत्रिचा गोडवा, आपलेपणा होता. तिथून सर्वांवर लक्ष ठेवता यायचं. त्यावेळी 'सातच्या आत घरात' अशी परिस्थिती होती. त्यामुळे मुली ग्रुपनेच पायी फिरत असत. काहींच्या हलक्या जखमा ह्या कट्यावर भळभळून वाहत. काहींच्या कवितांना जन्म दिलाय, काहींच्या कविता संग्रहाच्या कल्पना, त्याची वाटचाल, अशा साहित्यिक भवितव्याची मूळ इथंही आहेत. नाटकवाल्यांच्या चर्चा, गाणारे, डॉक्टर्स, खेळाडू, सारेच मेहेरला येत. अनेकांना ती चावडी वाटे. मला मात्र नेहमीच चैतन्याचे माहेर वाटे. मेहेरने अनेक उनाड, घरातल्या कटकटींना कंटाळलेल्या मुलांना, अपघात, अडचणीत असलेल्या अनेकांना जगण्याची उमेद हरवून बसलेल्यांना जगण्याच चैतन्य दिलंय, म्हणून मेहेर मला नेहमी चैतन्याच माहेर वाटतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात रंगणार ‘वायपीएल’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

इंडियन प्रिमिअर लीग अर्थातच 'आयपीएल'च्या धर्तीवर आता जिल्ह्यातील येवला शहरात 'वायपीएल' क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व सामने प्रकाशझोतात होणार आहेत. येत्या २० जानेवारीपासून येवला प्रिमीअर लीग स्पर्धेचा शुभारंभ होईल. तब्बल १० दिवस येवेलकरांना स्पर्धेचा थरार बघावयास मिळणार आहे. या 'वायपील' स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी होणार आहेत.

येवला शहर व तालुक्यातील उगवत्या क्रिकेट खेळाडूंच्या अंगी असलेल्या गुणांना वाव मिळावा या हेतूने 'आयपीएल'च्या धर्तीवर आता जिल्ह्यातील येवला शहरात 'वायपीएल' स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेसाठी १० संघांची निवड नुकतीच केली. या संघांची मालकी दानशूर व्यक्तींनी घेतली आहे. संघ निवडीसाठी गेल्या महिन्यात शहर व तालुक्यातून क्रिकेट खेळाडूंचे अर्जही मागविण्यात आले होते. त्यास भरभरून प्रतिसाद मिळताना ३२२ क्रिकेट खेळाडूंनी अर्ज दाखल केले होते. त्यातून स्पर्धेसाठीच्या १० संघांसाठी १७० खेळाडूंची गुणवत्तेवर निवड करण्यात आली असल्याची माहिती स्पर्धेचे मुख्य संयोजक राजेंद्र पवार यांनी दिली.

स्पर्धेत युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी प्रत्येक संघात १८ वर्षे वयाखालील ४ खेळाडूंची निवड केली गेली आहे. प्रत्येक संघाला या सर्व खेळाडूंची वाटणीही करून देण्यात आली असून सध्या १० संघांचे वाय.पी.एल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध मैदानांवर सराव सामने सुरू असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

येवला शहरातील विंचूर रोडवरील गोशाळा मैदानावर येत्या २१ जानेवारीपासून या 'वायपील' क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होईल. दररोज ५ सामने होणार असून प्रत्येक सामना हा ६ षटकांचा असणार आहे. सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत हे सामने रंगतील. प्रकाशझोतासाठी मैदानावर ८ टॉवर्स उभारले जाताना त्यावर एकूण १२८ फ्लडलाईट्स तर खेळपट्टीवर ४ फ्लडलाईट्सचा प्रकाशझोत येणार असल्याने स्पर्धेचे मैदान उजळून जाणार आहे. प्राथमिक फेरीत विजेत्या संघाला ४ गुण देण्यात येणार असून प्रत्येक संघाला स्पर्धेत ९ सामने इतर संघांबरोबर खेळवायचे आहे. स्पर्धेत सर्वाधिक गुण घेणारे ४ संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना ३१ जानेवारी रोजी होणार आहे. सामन्यांचे लाईव्ह स्कोअर, स्पर्धेची माहिती वेबसाइटवरून क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे. फेसबुकवरही 'वाय.पी.एल' या नावे ऑफिशियल पेज उघडण्यात आलेले आहे.

मैदानावर प्रत्येक संघाला बसण्यासाठी वेगवेगळी 'पॅव्हेलियन' उभारले जाणार असून त्याला प्रत्येक संघाचे नाव देण्यात येणार आहे. महिलांनाही बसून क्रिकेट खेळाचा आनंद लुटता यावा यासाठी बैठकीची विशेष व्यवस्था केली जाणार आहे.

संघ अन् त्यांचे मालक

सहारा-गौतम रॉकर्स : ऋषी पाटील, शशी पाटील, गौतम मंडलेचा

सूर्यदीप सनरायझर्स : संदेश शिंदे, दीपक शिंदे

गुरुकृपा टारपोलीन टायगर्स : श्याम कंदलकर, सचिन पाटील, रवींद्र भदाणे

पवार फायटर्स : मच्छिंद्र पवार, आकाश पवार

एस.एन.एस. रॉयल चलेंजर्स :

नितीन गायकवाड, सुहास अलगट, सचिन मंडलेचा

शिवनेरी वॉरीयर् : कलीम शेख

A-स्टार ग्रुप : आलमगीर शेख, अकबर शहा, अश्पाक सागर, आरिफ शेख

कंचन-होंडा : अजय जैन, यती गुजराथी

अकबर लॉयन्स : शफिक शेख, अब्दुल चोपदार

शान्स हायब्रो फुड्स : रिझवान शेख, शान शेख

संघांसाठी ड्रेस कोड

'वायपील' साठी निवडण्यात आलेल्या दहा संघांना विविध रंगांचे ड्रेस कोड देण्यात येणार आहेत. पिवळा, निळा, करडा, नारंगी, आकाशी, निळा, लाल, काळा, नारंगी, काळा, गुलाबी, काळा, मोरपंखी, करडा, जांभळा, पांढरा, निळा, आकाशी, पोपटी, काळा या रंगांचे ड्रेसकोड संघांना असणार आहेत.

स्पर्धेचा शुभंकर 'दगड्या'

'वायपील' स्पर्धेचा शुभंकरदेखील एक खास आकर्षण असणार असून क्रिकेटप्रेमींची जत्रा या मथळ्याखाली शुभंकरला 'दगड्या' हे नामांकन केले गेले आहे. एका हाती 'बॅट' तर दुसऱ्या हाती 'स्टम्प' घेतलेला हा 'दगड्या' सर्वांचेच लक्ष वेधून घेणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशकातही ‘राईट टू पी’ चळवळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छ आणि मोफत मुताऱ्या उपलब्ध करून देण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने नुकताच राज्यभरातील महापालिकांना दिला आहे. महिलांचा हा हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी नाशिककरही सरसावले असून शहरात लवकरच यासाठी एक सक्रिय ग्रुप तयार केला जाणार आहे. 'राईट टू पी' चळवळीच्या कार्यकर्त्या मुमताज शेख यांच्यासह या कार्यकर्त्यांची पहिली बैठक गुरुवारी नाशिकमध्ये घेण्यात आली.

मुबंई हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिकांना महिलांसाठी स्वच्छ व मोफत मुताऱ्या करून देणे बंधनकारक असले तरीही या नियमाची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी एक दबावगट तयार करणेही आवश्यक आहे. त्यामुळेच हा सक्रीय ग्रुप तयार करण्यात येणार आहे. सध्या या ग्रुपमध्ये १० मेंबर्स असून त्यांच्यामार्फत शहरात 'राईट टू पी'च्या योग्य अंमलबजावणीसाठी काम केले जाणार आहे. महिलांना ज्या ठिकाणी त्यांच्या या नैसर्गिक हक्कापासून ‌वंचित ठेवले जाईल, त्यांच्याकडून पैसै आकारले जातील किंवा त्यांना सुविधेचा लाभ घेऊ दिला जाणार नाही त्या ठिकाणी या ग्रुपमार्फत आवाज उठविला जाणार आहे. तसेच याबाबत महिलांमध्येही जागृती केली जाणार आहे.

महिलांच्या या नैसर्गिक हक्कावर गदा आणणारी परिस्थिती राज्यात सर्वत्र आहे. नाशिकही त्याला अपवाद नाही. 'कोरो' या संस्थेच्या माध्यमातून मुमताज शेख व तिच्या सहकाऱ्यांनी मुंबईमध्ये 'राईट टू पी' ही चळवळ उभारून चार वर्षांपासून या समस्येला वाचा फोडण्याचे काम केले आहे. या अनुषंगाने मुंबईमध्ये प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली असून 'कोरो'मार्फत या कार्यवाहीच्या अंमलबजावणीकडे लक्ष दिले जात आहे. अशाच पध्दतीने नाशिकमध्येही या आदेशाची चोख अंमलबजावणी करण्यासाठी एक सक्रीय ग्रुप तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुमताज शेख यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना दिली.

अधिकाधिक नाशिककरांनी यामध्ये सहभाग घेतल्यास महिलांना त्यांच्या हक्कापासून कोणीही वंचित ठेऊ शकणार नाही, असा विश्वास मुमताज यांनी व्यक्त केला.

महापालिकेतर्फे अंमलबजावणी

मुंबई हायकोर्टाच्या आदेशाची नाशिक महापालिकेमार्फत अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. शहरातील कोणत्या भागात मुताऱ्या उभ्या करण्याची गरज आहे याचे सर्व्हेक्षण सध्या सुरू आहे. त्यानुसार महासभेत याबाबतचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धा परीक्षार्थींसाठी स्वतंत्र लायब्ररी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्पर्धा परीक्षार्थींसाठी यंदाच्या वर्षात जिल्हा प्रशासनाकडून दोन गिफ्ट मिळणार आहेत. दर महिन्याला स्वतंत्र मार्गदर्शन सत्रासह सुसज्ज लायब्ररी आणि इंटरनेट सेवेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार असून त्याचे युद्धपातळीवर नियोजन सुरू झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील युवकांमध्ये असलेला स्पर्धा परीक्षेकडील कल लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी आता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी विशेष सत्र दर महिन्याला घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्याद्वारेच येत्या सोमवारी (दि. ११) पहिले मार्गदर्शन सत्र घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात सायंकाळी ४ वाजता यूपीएससी आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिर होणार आहे. यावेळी भारतीय प्रशासकीय सेवेतील २०१४ बॅचच्या अधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी मंजू लक्ष्मी आणि २०१४ बॅचचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या शिबिरात प्रश्नोत्तराचे विशेष सत्रही होणार आहे. शिबिरात विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार असून प्रत्येक महिन्यात कार्यशाळेच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी तसेच स्पर्धा परिक्षेतील यशस्वी उमेदवार युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुक युवक-युवतींनी शिबिराला उपस्थित राहून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी कुशवाह यांनी यापूर्वी देखील नांदेड आणि सांगली येथे या स्वरुपाच्या मार्गदर्शन वर्गाचे यशस्वी आयोजन केले आहे. जिल्ह्यातील आणि विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी या शिबिराच्या माध्यमातून चांगली संधी उपलब्ध होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजरोडवर चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॉलेजरोड परिसरातील येवलेकर मळा परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. याबाबत विद्या धनशाम कोठवदे यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली.

कोठवदे आपल्या घराजवळून गुरूवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास जात असताना त्या ठिकाणी एक मुलगा निवांत उभा असल्याचे त्यांनी पाहिले. काही वेळातच मोबाइल पाहण्यात गुंग असलेला हा मुलगा पुढे आला आणि त्यांनी कोठवदे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून पोबारा केला.

मोबाइलचोरास अटक

पंचवटी परिसरात दोघा युवकांचे मोबाइल हिसकावून पळणाऱ्या दोघा भामट्यांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले. जेलरोड येथील कमलेश महेश माळवे (१६) हा २५ डिसेंबर रोजी आसाराम बापू पुलाजवळ उभा असताना दुपारी दोन वाजेच्या एमएच १५ एफए ५७७० क्रमाकांच्या बाइकवरून एक संशयित आला. त्याने माळवेकडील १५ हजार रुपये किंमतीचा मोबाइल ओरबाडून दुचाकीवर बळजबरीने बसवले. त्यानंतर संशयितासह इतर दुचाकीवरील संशयितांनी माळवे यास केटीएचएम कॉलेजसमोर सोडून पळ काढला. तसेच चेहेडी पंपिंग स्टेशन परिसरात राहणारा वैभव पांडुरंग घोडे (१९) हा मित्रासमवेत पंचवटी परिसरात फिरत असताना चोरट्यांनी धमकावत त्यांच्याकडील मोबाइल व रोख रक्कम असा ४२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या दोन्ही प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करीत तपास सुरू केला. यात दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तलवारीसह एकास अटक

वडाळागाव परिसरात तलवार घेऊन फिरणाऱ्या संशयित समीर उर्फ सोनू निजामुद्दीन शेख (२५) यास इंदिरानगर पोलिसांनी अटक केली. वडाळागावातील महापालिकेच्या उद्यानाजवळ बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास संशयित शेख गंजलेली तलवार घेऊन फिरत होता.

प्रदूषणप्रकरणी गुन्हा

गोदापात्रात कपडे धुणाऱ्या दोन महिलांवर सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सरला प्रकाश लहामगे (४०) आणि वैशाली अनिल लहामगे (३५) अशी या महिलांची नावे आहेत. अशोकस्तंभ परिसरात राहणाऱ्या या महिला गोदाघाटावरील सिद्धेश्‍वर मंदिरासमोरील गोदापात्रात बुधवारी सकाळी कपडे धूवत असताना पोलिसांनी ही कारवाई केली.

पंचवटीत चोरी

पंचवटी : बळी मंदिराजवळील सरस्वतीनगर येथील प्रमोद महाजन उद्यानासमोरील हॉटेल, किराणा दुकान आणि एका घराचा कडी कोयंडा तोडून रोख रक्कम आणि २० हजार रुपयांचा टीव्ही चोरट्यांनी पळविला आहे.

अभिलाष सोनुजी भामरे यांच्या भाऊची मिसळ या हॉटेलचे लोखंडी सेंटर वाकवून गल्ल्यातील रोख रक्कम तर जवळच सुरीतराम शेलार यांच्या पूजा किराणा मालाच्या दुकानाचे सेंटर वाकवून दुकानातील गल्ल्यातील सुमारे दोन हजार रोख रक्कम आणि नोकिया कंपनीचा मोबाइल चोरट्यांनी पळविला. तसेच चोरट्यांनी शेजारील रमेश पाटील यांच्या घरातून वीस हजार रुपये किमतीचा एलसीडी टीव्ही चोरून नेला.

पाच म्हशींची चोरी

देवळाली कॅम्प : भगूरपासून जवळच असणाऱ्या वंजारवाडी येथून पाच म्हशी आणि एक पारडू यांची चोरी झाली आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन तुकाराम शिंदे हे शेतीस जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करतात. त्यांनी २९ डिसेंबर रोजी रात्री ११.३० च्या दरम्यान म्हशींना चारा घातला. सकाळी ६.३० वाजता त्यांना गोठ्यात एकही म्हैस दिसली नाही. त्यांनी सर्वत्र शोधाशोध केला. म्हशी आढळून न आल्याने त्यांनी बुधवारी (दि. ७) तक्रार दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वत:च्याच जिवाशी खेळ

$
0
0

पार्थडी फाटा, राणेनगर ते लेखानगर कार्नरपर्यंत उड्डाणपुलाखाली टाकण्यात आलेले सर्व्हिस रोडचे दुभाजक वाहनचालक व पादचाऱ्यांनी पंक्चर केले आहेत. यामुळे उड्डाणपुलाखालून शॉर्टकट मारतांना अनेकदा अपघात झाले आहेत. याबाबत प्रसिद्धी माध्यमांनी उड्डाणपुलाखाली सर्व्हिसरोडवरून शॉर्टकट मारतांना होणाऱ्या अपघातांची देखल घेत वाहनचालक घातक प्रवास करत असल्याचे मांडले होते. मात्र, यापासून बोध न घेता आजही वाहनचालक व पादचारी जीव धोक्यात घालून प्रवास करतांना दिसतात. महामार्ग प्राधिकरणाने विविध ठिकाणी पंक्चर केलेले दुभाजक दुरुस्ती करण्याचे काम ठेकेदाराकडे सोपविले आहे. मात्र, या दुभाजकांची दुरुस्ती करत असतांना वाहनचालक, पादचारी व उड्डाणपुलाखाली वाहने पार्क करणाऱ्यांकडून विरोध केला जात असल्याचे ठेकेदाराच्या कामगारांनी सांगितले. शार्टकट मारतांना होणाऱ्या अपघाताबाबत वाहनचालक व पादचाऱ्यांना माहिती असून दुभाजकांना विरोध करत असल्याने ते आपल्या जिवाशीच खेळ करत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. महामार्ग प्राधिकरणाने विरोध करणाऱ्यांवर पोलिस कारवाईची मागणी केली जात आहे.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी उड्डाणपुलाखाली दुभाजक टाकण्यात आले आहेत. शॉर्टकट मारण्यासाठी दुभाजकांची अनेक ठिकाणी तोडफोड केली आहे. यात महामार्ग प्राधिकरणाने दुभाजक टाकले पाहिजे. भविष्यात अपघातात जीव गेल्यास जबाबदार कोण राहिल? - नितीन अमृतकर, सिडको

उड्डाणपुलाखाली चारचाकी वाहने पार्क करता यावीत म्हणून काही वाहतूकदार दुभाजकांना विरोध करत आहेत. परंतु, तोडलेल्या दुभाजकातून सर्व्हिसरोडवर येतांना अनेक अपघात झाले आहेत. असा जीव धोक्यात घालणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे. - चेतन नेहते, रहिवाशी, राणेनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..तर हल्ला झाला नसता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किरकोळ हाणामाऱ्या, दमबाजीसारख्या अदखलपात्र गुन्ह्यांकडे पोलिस गंभीरतेने पाहत नाही. परिणामी, अशा किरकोळ वादातूनच थेट जीवघेणे हल्ले होण्याचे प्रमाण शहरात वाढीस लागले आहे. सातपूर परिसरात रिक्षाचालक समाधान पाटील यांच्यावर झालेला हल्ला याच प्रकारातील असून सरकारवाडा पोलिसांकडे नोंद असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यांबाबत संशयित आरोपींवर कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

हप्ता देण्याच्या कारणावरून तीन ते चार जणांनी रिक्षाचालक पाटील यांच्यावर बुधवारी सातपूर परिसरात जीवघेणा हल्ला केला. हप्तावसुलीस त्रासलेल्या रिक्षाचालकांनी नवीन संघटना तयार करून त्याचा फलक ठक्कर बझारजवळ लावल्याच्या रागातून हा प्रकार घडला. यामुळे संतप्त झालेले संशयित संतोष सोनवणे, प्रकाश जाधव व अक्षय शिंदे यासह त्यांचे साथीदार मागील तीन ते चार दिवसांपासून रिक्षाचालकांना एक-एकटे गाठून मारहाण करीत होते. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी हप्तावसुलीच्या कारणावरून चंद्रकांत वाघमारेसोबत रिक्षचालकांचा वाद झाला. त्यानंतर चार जानेवारीला काही आरोपींनी सादिक अन्वर पिंजारी या रिक्षाचालकास मारहाण करून त्याच्याकडील पाचशे रुपये काढून घेतले होते. अन्य एका प्रकरणानंतर सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. एकाच ठिकाणावरील तीन अदखलपात्र गुन्हे दाखल झाल्यानंतर सुध्दा पोलिसांनी कोणतीही कारवाई का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. या परिसरातील दोघा भावांना बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांचेच साथीदार आता वसुली करीत आहेत. पोलिसांचा त्यांना वरदहस्त असल्याचा आरोप रिक्षाचालकांनी केला आहे.

एकास अटक

सातपूर : रिक्षाचालक पाटील हल्ल्याप्रकरणी सातपूर पोलिसांनी तीन संशयित आरोपींपैकी संतोष सोनवणे यास ताब्यात घेतले. अक्षय शिंदे व गणेश झाल्टे हे दोघे अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. संशयित आरोपींनी कट रचून पाटीलला एकटे गाठले आणि हल्ला केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. अधिक तपास पोलिस निरिक्षक के. व्ही. पाटील करत आहेत.

तांब्याच्या पट्ट्यांची चोरी

अंबड एमआयडीसीतील गोडावूनमध्ये ठेवलेल्या ९० हजार रुपये किंमतीच्या तांब्याच्या पट्ट्या चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणी तानाजी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. अंबड एमआयडीसी, ग्लॅक्सो पाईंट येथील गोदामात हा प्रकार घडला.

२० हजार लंपास

बसमधून प्रवास करणाऱ्या नाना बाळू जाधव (५५) या प्रवाशाच्या खिशातील २० हजार रुपये चोरट्याने लंपास केले. म्हसरूळ परिसरातील वरवंडी रोड येथे राहणारे जाधव हे सीटी बसने सीबीएस ते मेहेर सिग्नलदरम्यान बुधवारी दुपारी चोरीचा प्रकार घडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images