Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

लकी ड्रॉ स्कीमवर संक्रांत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बक्षिसांचे प्रलोभन दाखवून वेगवेगळ्या स्किम चालवणाऱ्या संस्थांची पोलिसांनी झाडाझडती घेत संशयास्पद योजना चालवणाऱ्या व्यक्तींविरोधात देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. यामुळे देवळाली कॅम्प परिसरात खळबळ उडाली असून, कोणत्याही आर्थिक प्रलोभनांना बळी पडण्यापूर्वी खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी केले.

वेगवेगळे आर्थिक प्रलोभने दाखवत नागरिकांना आकर्षित करणाऱ्या कंपन्या वेगवेगळी बक्षिसे मिळणार असल्याचे दावे करतात. अशा बोगस योजनांची जाहिरात स्थानिक पातळीवर केली जाते. गुंतवलेल्या रक्कमेतून मोटरसायकल, फ्रीज किंवा प्लॅट तरी मिळेल, अशा अपेक्षेपायी गुंतवणूकदार सदर योजनेत पैसे गुंतवतात. सुरुवातीस सर्व आलबेल असताना एक दिवस अचानक कंपनी आपला गाशा गुंडाळून फरार होते. फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर गुंतवणूकदार पोलिसाकडे येतात. मात्र, बराच वेळ निघून गेल्याने काहीच निष्पण होत नाही. या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड तसेच देवळाली कॅम्प पोलिस स्टेशन हद्दीत अशा काही फसव्या योजना सुरू आहेत काय याचा तपास केला. तपासाअंती भाग्यरत्न स्किम, स्वप्न साकार स्किम, भाग्योदय स्किम, स्वप्नपूर्ती स्किम तसेच भाग्यलक्ष्मी स्किम चालवणाऱ्या व्यक्तींची माहिती संशयास्पद आढळून आली. त्यानुसार, संबंधितांविरोधात देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

अशा योजनांमधून फसवणूक होण्याचे प्रमाण जास्त आहे. या योजना कायद्याला अनुसरून नाहीत. फसवणूक झाल्यानंतर पोलिसांकडे फिर्याद घेऊन येण्यापेक्षा गुंतवणूक टाळणे हेच महत्त्वाचे आहे. आम्ही घेतलेल्या माहितीच्या आधारे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

- श्रीकांत धिवरे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केंद्रीय पथकाची कारमधून पाहणी

0
0

सातपूर : केंद्र सरकारने देशातील ७३ शहरांचा स्वच्छता अभियानात समावेश केला आहे. यात नाशिक महापालिकेचाही समावेश आहे. मात्र, सातपूर परिसरात स्वच्छता पाहणीसाठी आलेल्या केंद्राचे पथकाचे सदस्य राघवेंद्र यादव यांनी कारमध्ये बसूनच पाहणी केली. केंद्राचे पथक येणार असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिसरातील रस्ते, नेहमी कचरा टाकला जात असलेल्या जागा स्वच्छ केल्या होत्या. मात्र, केंद्रीय पथकाने कारमधून न उतरताच पाहणी केल्याबद्दल आर्श्चय व्यक्त केले जात आहे.

राघवेंद्र यादव यांनी सातपूर कॉलनी, अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर, ध्रुवनगर परिसराची कारमधूनच पाहणी केली. तर बालाजी मंदिर परिसरात गाडीतून उतरत स्वच्छतेची पहाणी केली. मात्र, कच ऱ्याचे नेहमी ढिग असणाऱ्या भाजी मार्केट अथवा स्लम भागात पथकाने का पाहणी केली नाही, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम मंजुरीला ‘खो’ नाही

0
0

आयुक्तांचे स्पष्टीकरण; बिल्डरांकडून पूर्णत्वासाठी अर्ज आले नसल्याचा दावा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्तांनी शहरातील बांधकाम परवानगी थांबवल्याचा आरोप आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी फेटाळून लावला आहे. शहरातील बिल्डर्स व आर्किटेक्टस बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी अर्जच करत नसल्याचा खुलासा आयुक्तांनी केला आहे. अर्ज करण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा केला आहे. बिल्डरांनी अर्ज केल्यानंतर त्यावर नियमानुसार तोडगा काढू असे सांगत, एफएसआय उल्लंघनाचे बांधकाम नियमित करण्याचा आपल्याला अधिकार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. सोबतच शहरातील बांधकामांचे सर्व्हेक्षण करणार असून अर्ज न दाखल करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा डॉ. गेडाम यांनी केला आहे.

शहराच्या बिल्डरांसह ग्राहकांच्या कोंडीला आयुक्त डॉ. गेडाम जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर डॉ. गेडाम यांनी पत्रकारांशी बोलतांना हा आरोप फेटाळून लावला. आपण नियमानुसार काम करीत आहोत. मुळात बांधकाम पूर्णत्वाचा व भोगवटा दाखल्यासाठी महापालिकेकडे अर्ज दाखल नाहीत. त्यामुळे परवानग्या थांबवल्याचा आरोप हा चुकीचा आहे. बिल्डरांनी अर्ज करावेत म्हणून आपण १८०० बांधकामाना नोटीसा दिल्या आहेत. परंतु, जाणीवपू्र्वक बदनाम करण्याचा प्रकार सुरू आहे. मुळात बिल्डर अर्जच करत, नसल्याने महापालिकेवरचा आरोप चुकीचा आहे. ग्राहकांची अडवणूक होत असल्याचा आरोपही चुकीचा असून ग्राहकांनीच बिल्डरांना पालिकेकडे पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी अर्ज केल्याची विचारणा करावी.

महापालिकेकडे केलेल्या अर्जाची प्रत बिल्डरांकडे मागावी. अनधिकृत बांधकामामुळे बिल्डरच अर्ज करत नसल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. ग्राहकांनी आपल्या फ्लॅटसंदर्भात थेट महापालिकेत चौकशी करावी. झेरॉक्सचा खर्च करून त्यांनी प्लॅन

घ्यावा. बिल्डर्सचे ब्रोशर्स, खरेदीचा करारनामा याची पडताळणी करावी. त्यात तफावत आढळल्यास थेट ग्राहक मंचाकडे, पोलिसांकडे किंवा महापालिकेकडे दाद मागावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, नगररचना विभागाकडे इंजिनीअर आणि कर्मचारी यांचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे सर्वेक्षण व बिल्डरांवरील कारवाईला उशीर होत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

सर्व्हेक्षण करून कारवाई

बिल्डरांनी अर्ज केली तर नियमातील बांधकामे ही पूर्ण करता येवू शकतात. परंतु, त्यासाठी अर्ज केले पाहिजेत. कपाट प्रकरणाची व्याप्ती किती आहे, त्यावर हा निर्णय अवलंबून आहे. एफएसआय उल्लंघन नियमित करण्याचा अधिकार आयुक्तांना नाहीत. त्यामुळे नियमाबाह्य काम करण्याचा प्रश्नच नाही. याउलट आता आपण शहरातील बांधकामांचे सर्व्हेक्षण करणार आहोत. बांधकाम करूनही अर्ज दाखल न करणाऱ्या बिल्डरांवर महापालिका कारवाई करेल असा इशाराही त्यांनी दिल्याने बिल्डरांच्या अडचणी वाढणार आहेत. यासोबतच आर्किटेक्ट यांनी सकारात्मक भूमिका घेवून स्वतः झालेल्या चुकांची माहिती सादर करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखेड कालव्यात तरुणाचा बुडून मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

उगाव येथे द्राक्ष व्यापाऱ्याकडे कामासाठी आलेला महंमद सोपान (वय २२, रा कारीकेक ता ब्राम्हणी जि. बेंगुसराई, बिहार) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

आर. के. नामक व्यापाऱ्याकडे शुक्रवारी द्राक्ष काढणीचे काम बंद असल्याने आठ दहा मजुरांचा गट वनसगावजवळून वाहणाऱ्या पालखेड डाव्या कालव्यावर स्नानासाठी गेला होता. यावेळी सर्व जण आंघोळीसाठी कालव्यात उतरले. या दरम्यान तिघांचा तोल गेला. यामुळे ते पाण्यात बुडू लागल्याचे दिसताच काठावरील नागरिकांनी आरडाओरड केली. त्याप्रसंगी काठावरून लुंगी फेकून मदतीचा प्रयत्न करण्यात आला. त्यास यश येऊन दोघांना पाण्याच्या प्रवाहातून काठावर आणण्यात यश आले. मात्र, महंमद सोपान हा मजूर पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महासभा इतिवृत्तासाठी अडली घंटागाडी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वादग्रस्त ठरलेल्या घंटागाडी चालविण्याच्या ठेक्याची मुदत ७ जानेवारीला संपली असतांनाच प्रशासनाने नव्याने चार महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. शुक्रवारी स्थायी समितीची सभा तहकूब झाल्याने यावर चर्चा झाली नसली, तरी स्थायी समिती मुदतवाढ देण्यास तयार नसल्याने घंटागाडीचा गोंधळ वाढला आहे. त्यातच सरकारने या ठरावा संदर्भातील इतिवृत्त सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. मात्र, नगरविकास विभागाकडून प्रशासनाला इतिवृत्तच मिळत नसल्याने घंटागाडीचा पेच अधिकच चिघळला आहे.

सरकारच्या हस्तक्षेपामुळे शहरातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या घंटागाडी योजनेचा बोजवारा उडण्याच्या दिशेने सध्या वाटचाल सुरू झाली आहे. महासभेनेने ५ वर्षांचा ठेका देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर आमदार देवयानी फरांदे यांनी आक्षेप घेतला. या ठरावाचा तिढा वाढला आहे. प्रशासनाने नगरविकास विभागाला या ठरावा संदर्भातील अहवाल पाठविला असला तरी नगरविकास विभाग आता या ठरावावरील इतिवृत्तावर अडून बसले आहे. इतिवृत्त पाठवा मगच निर्णय देवू अशी अडवणूक नगरविकास विभागाकडून झाली आहे. मात्र, नगरसचिव विभागाकडून प्रशासनाला या ठरावाचे इतिवृत्त मिळत नसल्याने ठरावावरील गोंधळ वाढला आहे. घंटागाडीची मुदत संपत आली असतांना या ठरावासंदर्भात नगरविकास विभागाकडून ग्रीन सिग्नल मिळत नसल्याने पेच वाढला आहे.

प्रशासनाने घंडागाडी ठेकेदारांवर किमान वेतन प्रकरणी काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली असतांना या ठेक्याची मुदतही ७ जानेवारीला संपली आहे. त्यामुळे शुक्रवारच्या स्थायी समिती सभेत चार महिने मुदतवाढाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शैलेश कुटे यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याने ही सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे यावर चर्चा झाली नाही. मात्र, आता मदतवाढ द्यायचीच नाही असा निर्धार समितीच्या सदस्यांनी व्यक्त केला. त्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली आहे. नगरविकास विभाग, ठेकेदार, स्थायी समिती असा तिहेरी वादात घंटागाडीचा विषय अडकला असून घंटागाडी कधीही बंद पडण्याची शक्यता आहे.

प्रशासन चालवणार घंटागाडी?

शासनाचा हस्तक्षेप, स्थायी समितीचा मुदतवाढीस नकार, ठेकेदारांनी असहकार केल्यास अशा परिस्थितीत महापालिका घंटागाडी चालविण्याचा विचार करू शकते. घंटागाड्या आणि महापालिकेच्याच आहेत. त्यामुळे अशा परस्थितीत घंटागाडी चालविण्याच्या तयारीत महापालिका आहे.

प्रशासनाच्या १० वर्षांच्या ठेक्यावर सत्ताधारी सहमत झाले होते. त्यामुळेच नव्याने ठराव करण्यात आला. परंतु, राज्य सरकारने त्यावर खुलासा मागविल्यानंतर महापालिकेने आपला अहवाल सादर केला आहे. त्यावर निर्णय नाही. मात्र, तरीही आम्ही मुदतवाढीसंदर्भात स्थायी समितीसोबत चर्चा करू.

- डॉ. प्रवीण गेडाम,

आयुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणी उकळण्यासाठी सातपूर पोलिसांचा वापर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्यासाठी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय म्हैसधुणेने सातपूर पोलिस स्टेशनमधील कर्मचारी तसेच, त्यांच्याकडील वाहनाचा वापर केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली असून, सातपूर पोलिसांचा या प्रकरणाशी कोणताही सहभाग नसल्याचा निर्वाळा दिला.

गंगापूररोडवरील समीर वंढेकर यांच्याकडून २५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या म्हैसधुणेसह साबिरअली वाहेद अली सय्यद, सलीम मोहम्मद शेख तसेच सुरेश रघुभाई थोरात इत्यादींविरोधात गंगापूररोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून, नऊ जानेवारीपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. वंढेकर यांचा वापी येथील मित्र सुरेश थोरातने एक वस्तू वंढेकर यांच्याकडे ठेवली होती. सदर वस्तू अत्यंत महागडी असून, तिची विक्री करून आपल्याला कोट्यवधी रुपये मिळतील, अशी बतावणी करीत थोरातने वंढेकरांकडून १२ ते १४ लाख रुपये उकळले. तसेच, ही माहिती शेखसह इतर साथिदारांना दिली. संबंधित वस्तूचे आवरण काढू नये, अशी तंबी थोरातने वंढेकरांना दिल्याने त्यांनी ती जपून ठेवली. हाती आलेल्या माहितीच्या आधारे म्हैसधुणेने सातपूर पोलिस स्टेशन गाठून गंगापूररोडवरील एका घरात स्फोटक वस्तू ठेवण्यात आल्याची माहिती दोघा कर्मचाऱ्यांना दिली. त्यांनी लागलीच पीआय मनोज करंजे यांना कळवले. साहेबांचा आदेश मिळताच म्हैसधुणेला घेऊन सातपूर पोलिस स्टेशनचे वाहन वंढेकरांच्या घरी पोहचले. यावेळी म्हैसधुणेने वंढेकरांशी १० मिनिटे चर्चा करून लागलीच घर सोडले. तसेच आक्षेपार्ह काहीच नसल्याचे सांगत पुन्हा सातपूर पोलिस स्टेशन गाठले. म्हैसधुणेने यावेळी वंढेकरांकडून अडीच लाख रुपये घेतले होते. त्यामुळे या रॅकेटमध्ये आणखी काही पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे काय याविषयी संशय वाढतो. दरम्यान, पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की, या प्रकरणाची सर्व तपास करण्यात आला असून, सातपूर पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांचा यात कोणताही सहभाग असल्याचा पुरावा आढळून येत नसल्याचे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रीम जिमचे नुकसान

0
0

सातपूर कॉलनीत महापालिकेने महिलांसाठी मीनाताई ठाकरे जॉगिंग ट्रॅकची उभारणी केली आहे. घराजवळच ट्रॅक असल्याने स्थानिक महिलांही व्यायाम आणि मॉर्निग वॉकसाठी येतात. मात्र, या ट्रॅककडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्षच केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

जॉगिंग ट्रॅकला बसविण्यात आलेल्या संरक्षित जाळ्याच चोरट्यांनी पळविल्या आहेत. तर खासदार निधितून दीड वर्षांपूर्वी लावण्यात आलेले ग्रीन जिमचे व्यायाम साहित्यांची देखील गायब करण्यात आले आहे. तसेच काही साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे. तरीही पहाटे जॉगिंग करण्यासाठी महिलांची गर्दी असते. याठिकाणी महिलांनी हास्य क्लब देखील सुरु केला आहे. परंतु, जॉगिंग ट्रॅकला महापालिकेने कुठलीच सुरक्षा पुरविली नसल्याने दुरवस्था झाल्याचे महिला सांगतात.

छोट्या स्वरुपातील असलेल्या मीनाताई ठाकरे जॉगिंग ट्रॅकला सुविधा पुरविण्याची मागणी महिला जॉगिंगपटूंनी केली आहे.

सातपूर कॉलनीत महापालिकेने मीनाताई ठाकरे जॉगिंग ट्रॅक निर्माण केले आहे. अनेक महिला जॉगिंग ट्रॅकवर रोज व्यायाम करण्यासाठी येतात. मात्र, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. - कल्पना जाधव, रहिवाशी, सातपूर कॉलनी

महापालिका वास्तू उभारल्यानंतर तिला वाऱ्यावरच सोडून देते. असाच प्रकार मीनाताई ठाकरे जॉगिंग ट्रॅकबाबत झाला आहे. येथील खेळणी व ग्रीन जिमचे टवाळखोरांकडून नुकसान केले जात असून महापालिकेने त्याची साधी दखल घेतलेली नाही. - रमाबाई पाटील, रहिवाशी, समतानगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांस तस्करीचे मुंबई कनेक्शन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संगमनेरहून मुंबईकडे जाणारे ४०० किलो गोमांस शहर पोलिसांनी जप्त करीत सहा जणांना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने जप्त केली असून, गुरुवारी मध्यरात्री पाथर्डी फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, संशयितांकडून जप्त केलेल्या मांसाची तपासणी करण्याचे काम सुरू आहे.

गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू झाल्यानंतर शहरी भागातील काही तस्करांनी ग्रामीण भागाकडे मोर्चाकडे वळवला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील काही जण संगमनेर येथून मध्यरात्रीच्या सुमारास गोमांसाचे मोठा साठा घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्यानुसार झोन दोनचे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाथर्डी फाटा येथे सापळा रचला. त्यावेळी सिन्नरच्या बाजूने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन संशयित वाहनांना पोलिसांनी थांबवले. या वाहनांची पोलिसांनी कसून तपासणी केली असता त्यात ४०० किलो मांस आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी कुर्ला परिसरातील कृषीनगर येथील मोहम्मंद हसन कुरेशी (वय ३८), मुंबईतील म्युन्सिपल कॉलनीतील अनिक युनूस कुरेशी (वय ४०), कसाईवाडा येथील शकील अहमद भुजबा (वय २२), शेख तौफीक अनिस अहमद (वय २६), म्युझीक शब्बीर अन्सरी (वय २५) आणि सर्फराज शौनक कोकणी (वय १९) यांना अटक केली. पोलिसांनी चौकशी केली असता जप्त करण्यात आलेले मांस गौवंशाचे असल्याचे संशयितांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुन्ह्यात वापरलेल्या स्कॉर्पियो (एमएच ०४- इएक्स ८९७५) आणि झायलो (एमएच ०४ डीई ९८०४) ही वाहने पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यातील तरतुदीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत माहिती देताना पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की, जिल्ह्याबाहेरून मांस घेऊन जाणाऱ्या वाहनांबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात आली. संशयितांनी संगमनेर येथून सर्व मांस घेतले असल्याची माहिती तपासात पुढे आल्याचे​ धिवरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, संशयितांकडून जप्त केलेल्या मांसाची तपासणी करण्याचे काम सुरू असल्याचे धिवरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘अंतर्गत सुरक्षेचे पोलिसांसमोर आव्हान’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय संरक्षण दलाच्या वायूदल, भूदल आणि नौदलाच्या सहाय्याने बाह्य सीमेला सुरक्षित ठेवण्याचे काम होते. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात अंतर्गत सुरक्षेला अभेद्य ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी बदलत्या काळानुसार पोलिसींगच्या नवनवीन पध्दती आत्मसात करणे आवश्यक असल्याचे मत नागालॅँडचे माजी राज्यपाल व आयबीचे संचालक शामल दत्ता यांनी केले.

लक्ष्मण विष्णू केळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या ओपन एअर थिएटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'चेजिंग डायनामिक ऑफ पोलिसिंग' या विषयावर दत्ता बोलत होते. पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी गुन्हे उलगडण्याच्या कालबाह्य कार्यपद्धती सोडून २१ व्या शतकातील आधुनिक पद्धतींचा वापर करून शोध कार्य केले पाहिजे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या कार्यपद्धतीतील बदल आत्मसात करून प्रशिक्षित यंत्रणा घडवण्याची गरज असल्याचेही दत्ता म्हणाले. यावेळी पोलिस अकादमीचे संचालक नवल बजाज, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथ्थन, पोलिस उपायुक्त विजय पाटील, एन. अंबिका, विजय केळकर, मितेश घट्टे, क्रीडातज्ज्ञ भीष्मराज बाम आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्मकार समाजाचा उद्या वधू-वर परिचय मेळावा

0
0

मेळाव्याला माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार योगेश घोलप, बाळासाहेब नांदगावकर, खासदार सदाशिव लोखंडे, संगमनेरचे नगराध्यक्ष अरुण वाघचौरे, भाऊसाहेब कांबळे, महापालिकेचे उपायुक्त दत्तात्रेय गोतिसे, नगरसेवक डॉ. विशाल घोलप, जिल्हा परिषदेचे शिवाजी वाघ आदी प्रमुख पाहुणे असतील. मेळाव्यास उपवर-वधूंसह पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे मार्गदर्शक खंडेराव सोनवणे, खजिनदार सुनील भोळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी www.santrohidas.weebly.com या वेबसाइटवर, तसेच अध्यक्ष सखाराम साबळे (९५०३९४३६८२), उपाध्यक्ष राजू सूर्यवंशी (९८८११७२२६६०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संस्कारवाणीचा मेळावा नाशिक : संस्कारवाणीतर्फे दहावा उच्चशिक्षीत वधू-वर मेळावा शनिवारी (दि. ९) होणार आहे. कालिदास कलामंदिरात सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत होणाऱ्या या मेळाव्यास सुमारे २०० विवाह इच्छुक वधू-वरांनी नोंदणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे शहर कार्यकारिणीला मुहूर्त

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनेक दिवसांपासून रखडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकारिणीला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर मुहूर्त लागला आहे. मनसेचे संपर्कनेते अविनाश अभ्यंकर यांनी नवी कार्यकारिणी जाहीर केली. त्यात शहराध्यक्ष अॅड. राहुल ढिकले यांच्यासह ९२ जणांचा समावेश आहे. यामध्ये १० उपाध्यक्ष व १४ सरचिटणीस असणार आहेत. नगरसेवक संदीप लेनकर यांना प्रवक्तेपदी नियुक्त करण्यात आले आली आहे.

माजी आमदार वसंत गिते यांनी पक्ष सोडल्यानंतर शहरातील मनसेची कार्यकारीणी बरखास्त करण्यात आली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांसह, अविनाश अभ्यंकर, राज्य सचिव प्रमोद पाटील, डॉ. प्रदीप पवार आणि अॅड. ढिकले यांनी नव्याने पक्षाची बांधनी केली. नगरसेवकांच्या धरसोड वृत्तीमुळे नगरसेवकांवर विश्वास ठेवण्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. त्यानुसार अभ्यंकर व पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून शुक्रवारी कार्यकारिणी जाहीर केली आहे.

यांची लागली वर्णी

प्रवक्ता : संदीप लेनकर, निरीक्षक : किशोर जाचक (नाशिक पूर्व), सचिन भोसले (नाशिक मध्य), सुरेश भंदूरे (नाशिक पश्चिम), कार्यालयीन कामकाज : मनोज कोकरे, मनोज जोशी व पराग शिंत्रे.

विभाग अध्यक्ष : अनंता सूर्यवंशी (पंचवटी), प्रकाश कोरडे (नाशिकरोड), रामदास दातीर (सिडको), सोपान शहाणे (सातपूर), अंकुश पवार (नाशिक पूर्व)

शहर उपाध्यक्ष : बाळू काकड, श्रीराम कोठुळे, सुरेंद्र शेजवळ, संतोष क्षीरसागर, नितीन साळवे, मिलिंद काळे, भाऊसाहेब खेडकर, तुकाराम कोंबडे, गोरख आहेर, किरण खाडम.

शहर सरचिटणीस : संतोष कोरडे, सत्यम खंडाळे, मन्सूर पटेल, निखील सरपोतदार, भाऊसाहेब निमसे, नंदू वराडे, प्रवीण भाटे, योगेश गांगुर्डे, शांताराम चौधरी, अजिंक्य नाईक, प्रवीण पवार, विजय अहिरे, अॅड. अतुल सानप, प्रमोद साखरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल ऑडिटचे पालिकेवर बुमरँग

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या वतीने गेल्या शनिवारी करण्यात आलेल्या सोशल ऑडिटमध्ये शहरात असमतोल पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. पाण्याच्या वितरणात मोठे दोष व त्रुटी असून, पाण्याचे असमतोल वितरण होत आहे. शहरातील नाशिकरोड, नाशिक पूर्व आणि नवीन नाशिकमध्ये प्रतीमानसी १३५ लिटर या मानकापेक्षा कमी पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. तर नाशिक पूर्व, पंचवटी, सातपूर या तीन विभागात मानकापेक्षा जास्त पाणीपुरवठा होत असल्याचे उघड झाले. पाण्याची उचल आणि प्रत्यक्ष नागरिकांपर्यत पोहच यादरम्यान ३० टक्के पाणीगळती होत असल्याचे समोर आहे.

जायकवाडीला गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानंतर उद्‍भवलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी व पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने गेल्या शनिवारी पाण्याचे सोशल ऑडिट करण्यात आले. शहरातील पाण्याच्या ९४ जलकुंभावरून घरापर्यंत होणारा पाणीपुरवठा मोजण्यात आला. महापालिकेच्याच वितरणातील त्रुटी व असमतोल पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. शहरात १५ टक्के कपातीत सरासरी प्रतिमानसी १३५ लिटर पाणीपुरवठा होत असल्याचा दावा या ऑडिटमध्ये करण्यात आला आहे. धरणातून ३५० एमएलडी पाणी उचलल्यानंतर प्रत्यक्ष नागरिकांपर्यत ते २५५ एमएलडी पोहचत असल्याचे निरीक्षण आहे. १९ लाख ५२ हजार लोकसंख्येला हे पाणी प्रतिमानसी १३० लिटरच होत असल्याचे समोर आले आहे. वितरणातील त्रुटीही आढळून आल्या आहे. तीन विभागात कमी, तर तीन विभागात जास्तीचा पुरवठा होत असल्याने वाद होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्मीळ नोटा, नाण्यांचा खजिना खुला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कलेक्टर्स सोसायटी ऑफ न्युमिसमॅटीक अॅण्‍ड रेअर आयटम्सने नाशिककरांसाठी इतिहासकालीन दुर्मीळ नाणी अन् नोटांसह विविध वस्तू बघण्याची अन् इतिहासाचे वैभव स्मरण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. गंगापूर रोडवरील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये शुक्रवारपासून हे प्रदर्शन भरले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन पोलिस उपायुक्त एन अंबिका यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शन १० जानेवारीपर्यंत सकाळी १०.३० ते रात्री ८ पर्यंत नाशिककरांसाठी खुले रहाणार आहे.

या प्रदर्शनात एक हजार वर्षापूर्वीची पंचमार्क नाणे, सातवाहन राजांची नाणी, मुगल राजांची नाणी, ब्रिटीश नाणी, स्वतंत्र भारतातील नाणी, नोटा तसेच दुर्मीळ वस्तूं मांडण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनात शिवाजी महाराजांच्या काळातील सुवर्ण होण, मुगल राजांच्या सोन्याची नाणी, गुलशनाबादच्या टाकसाळीत पाडलेली ५०० वर्षा पूर्वीची नाणी, भारतातील विविध संस्थानिकांची नाणी तसेच शस्त्रास्त्र ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे नाशिकचे चुंबळे यांची १९३८ सालची विंटेज बाईक नॉर्टन ठेवण्यात आली आहे. तिची आजची किमत पाच लाख आहे. भारतातील परंपरा व इतिहास यांची जपणूक करण्याची भावना सर्व लोकांमध्ये निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून हे प्रदर्शन विनामूल्य भरविण्यात आले आहे.

या प्रदर्शनात ओरिएंटल न्यमिसमॅटीक सोसायटी लंडन यांचे साऊथ एशिया विभागातर्फे नाण्यांवर चर्चासत्र व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यात पी. जी. भार्गवे यांनी शिवाजी महाराजांची नाणी, डॉ. दिलीप राजगोर यांनी सौराष्ट्र जनपदा नाणी, महेश कालरा यांनी मुगल राजांची डेक्कन विभागातील नाणी यावर मार्गदर्शन केले.

नाण्यांचा ‌ल‌िलाव
यावेळी विविध नाण्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्या गुलशनाबादच्या मुगलकालीन सूर्यशाफ अर्धा रुपया याचा लिलाव केला जाणार आहे. हे नाणे चार लाखावर विकले जाईल, असे आयोजकांचे मत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी स्वहस्ते वाटलेले सुवर्ण नाणे अर्थात 'होण', मुघल राजा अकबराची १०.८० ग्रॅमची सुवर्ण मोहोर, सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे सातवाहनांची महिला राज्यकर्ती राणी नागनिका यांचे चलनही याठिकाणी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे हे नाणे लवकरच एका लिलावात विकले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गँगवारमधून शहरातील दोघा गुंडांचा खून

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
नाशिकमधील दोन सराईत गुंडांचा खून करून त्यांचे मृतदेह त्र्यंबकजवळील तोरंगण घाटात फेकण्यात आल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. अर्जुन महेश आव्हाड (वय २९) रा. अशोकनगर, सातपूर व निखिल विलास गवळी, रा. गोपाळनगर, अमृतधाम अशी त्यांची नावे आहेत.
दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यांत हाणामारी, दंगल आदि गुन्हे दाखल आहेत. आव्हाड हा तडीपार होता. टोळीयुध्दातून या गुन्हेगारांचा काटा काढण्यात आल्याचे दिसून येत आहे. साधारण आठ दिवसांपूर्वी, ३१ डिसेंबरच्या रात्री दोघांना ठार मारून टाकण्यात आले असावे, असा अंदाज आहे. सरत्या वर्षाच्या शेवटच्या रात्री ते जिवंत असावेत, असे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले. ा आधार कार्डावरून अर्जुन याच्या कुटुंबीयांशी त्र्यंबक पोलिसांनी संपर्क साधला. दुसरा मृतदेह निखिलचा असल्याचेही समजले. दोन्ही मृतदेह नाशिक येथे पाठविण्यात आले. घटनास्थळी श्वानपथक, न्यायवैद्यक पथक, सातपूर पोलिस, गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे प्रशासनाला अपंगांकडून ‘दुवाँ’

0
0

अवनीत गुजराल यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकऱ्यांना नुकतेच व्टिट केले होते. नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर अपंगांना दुचाकी वाहने लावण्यासाठी पूर्वी जागा होती. इतर गाड्यांच्या अतिक्रमणामुळे अपंगांना गाडी लावण्यास जाग राहिली नव्हती. गुजराल यांनी व्टिट करून ही परिस्थिती रेल्वेच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. नाशिकरोड स्टेशन परिसरात बॅरिकेड लावून अपंगांच्या वाहनांना जागा करण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाने बेशिस्त पार्किंग करणाऱ्या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पार्किंगमध्ये थोडी शिस्त आली होती.

वाहनांसाठी जागा रामचंद्र देवरे हे अपंग असून मुंबईला नियमित प्रवास करतात. त्यांना देवी चौकात गाडी लाऊन रेल्वेगाडी वेळेत पकडणे शक्य होत नाही. गुजराल यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून ते म्हणाले, की अपंगांसाठी आरक्षित जागा कायम ठेवावी, पोलिसांनी गस्त घालावी, बेशिस्त वाहनाधारकांवर कारवाईत सातत्य ठेवावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘विद्यार्थ्यांचा भर शिक्षणावर हवा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्यांचा भर शिक्षणावर हवा. एकदा अभ्यास पूर्ण केला म्हणजे आपल्याला हव्या त्या क्षेत्रात मनाप्रमाणे काम करता येते. फिल्म इंडस्ट्रीत यायचे असेल तर आधी शिक्षण पूर्ण करा मगच या, असा प्रेमळ सल्ला गायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांनी दिला.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान ग्रंथ तुमच्या दारी व नॅब डॉ. एम. एस. मोडक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टिबाधित व्यक्तींसाठी साहित्याचा खजिना, 'ग्रंथ तुमच्या दारी बोलकी पुस्तके' या योजनेचा प्रारंभ अवधूत गुप्ते आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अजित भुरे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी गुप्ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बोलकी पुस्तके ही योजना स्तुत्य असून, या बोलक्या पुस्तकांच्या उपक्रमाशी जोडले जाणे हे आपले भाग्य असल्याचेही ते म्हणाले.

अजित भुरे म्हणाले की, या योजनेला माझा संपूर्ण पाठिंबा व भविष्यात सहकार्यही आहे. लवकरच मी व सहकलाकार कुसुमाग्रजांच्या नाटकांचे व कवितांचे अभिवाचन करून त्याच्या सीडीज या योजनेसाठी पाठवेन. अंध विद्यार्थ्यांना बोलकी पुस्तके, टॉकिंग बुक्स ही फक्त अभ्यासक्रमातीलच असतात. त्यामुळे इतर दर्जेदार साहित्यापासून, ज्ञानापासून ते वंचित रहातात. असे होऊ नये, त्यांनाही मुख्य प्रवाहात येता यावे व साहित्याचा हा खजिना लाभावा यासाठी ग्रंथ तुमच्या दारी- बोलकी पुस्तके या योजनेची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला निवासी शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर करून दाद मिळवली. गितेश बोऱ्हाडे विद्यार्थ्याने मनोगत अत्यंत आत्मविश्वासाने सादर केले. शंभर सीडींचा संच असलेली बोलक्या पुस्तकांची पहिली पेटी शासकीय अंध विद्यालयाला अवधूत गुप्तेंच्या हस्ते प्रदान करण्यात आली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विनायक रानडे व नॅबच्या शाहिन शेख हे या योजनेसाठी समन्वयक म्हणून काम बघणार आहेत. हौसला या अंध अपंगांसाठी असलेल्या संस्थेच्या गौरी चव्हाण यांनी या योजनेला तसेच अंध विद्यार्थ्यांच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे नमूद केले. येत्या १४ तारखेला औरंगाबाद येथे ग्रंथ तुमच्या दारी बोलकी पुस्तके या योजनेची सुरुवात होणार आहे.

श्याम पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी आभार मानले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे हेमंत टकले, विश्वस्त व विनायक रानडे, नॅबच्या शाहीन शेख, हौसला या संस्थेच्या गौरी चव्हाण, नॅब संस्थेच्या निरजा संगमनेरकर, भावना चांडक, महानॅब स्कूल फॉर ब्लाईंड्स तसेच एनएफबी ट्रेनिंग सेंटरचे शिक्षक व दृष्टिबाधित मुलं उपस्थित होते.



अवधूत गुप्तेंचा रॉकिंग परफॉर्मन्स

'बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला' व 'जय जय महाराष्ट्र माझा' या आपल्या गाजलेल्या गाण्यांनी गुप्ते यांनी मनोगताची सुरुवात केली. नेहमीच्या नर्मविनोदी शैलीतून अवधूत गुप्तेंनीही रसिकांची मने जिंकली. आपल्या गाण्यांवर दृष्टिबाधित मुलांना ताल धरायला लावत त्यांच्याकडून गाणीही म्हणून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शोध त‌णावग्रस्त बळीराजाचा

0
0

तहसीलदार, गटविकास, कृषी अधिकाऱ्यांकडे धुरा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध समस्या आणि अडचणींमुळे तणावात वावरणाऱ्या खेडोपाड्यांतील शेतकऱ्यांचा शोध घेण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. तणावग्रस्त शेतकऱ्यांना आत्महत्येसारख्या टोकाच्या विचारापासून परावृत्त करण्याची जबाबदारी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे याबाबत दरमहा आढावा बैठक घेण्यात येणार असून त्याचा अहवाल या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे.

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या शुन्यावर आणण्यासाठी राज्यात प्रथमच नाशिकने अशा प्रकारचे प्रयत्न सुरू केले असून ते यशस्वी झाल्यास राज्यभर ते राबविणे शक्य होणार आहे. जिल्ह्यात सन २०१४ च्या तुलनेत सन २०१५ मध्ये शेतकरी आत्महत्येच्या घटना दुपटीने वाढल्या. जानेवारी ते डिसेंबर २०१५ या एका वर्षात जिल्ह्यात ८० हून अधिक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, नापिकी, दुष्काळासारख्या कारणांमुळे जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. अशा घटनावाढीची अत्यंत संवेदनशीलपणे दखल घेऊन जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी स्वतंत्र हेल्पलाइनसारखा उपक्रम राबविण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच शेतकऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होणारी कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी आराखडा बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

सतत तणावाखाली वावरणाऱ्या शेतकऱ्यांना शोधून त्यांना सरकारी योजनांच्या लाभाद्वारे दिलासा द्या, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहेत. तालुक्यातील गटविकास अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीने तणावग्रस्त शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. समस्यांच्या निराकरणासाठी प्रशासकीय पातळीवर त्यांना शक्य ती मदत करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा लागणार आहे. त्यामुळे गावातील कार्यालयात बसून कारकूनी कामे करणाऱ्या तलाठी आणि ग्रामसेवकांना आता तणावग्रस्त आणि विपरित परिस्थितीमुळे आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचू शकणाऱ्या शेतकऱ्यांवर लक्ष ठेवावे लागणार

आहे.

कौटुंबिक सदस्यांच्या आजारपण खर्च परवडेनासा होणाऱ्या शेतकऱ्यांना राजीव गांधी जीवनदायी योजनेचे लाभार्थी बनविणे, याखेरीज बँका, सहकारी पतसंस्था, सोसायट्यांच्या कर्जाचे दडपण घेऊन वावरणाऱ्या शेतकऱ्यांचे समुपदेशन करणे, तणावाखाली वावरणाऱ्या शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या आर्थिक, आरोग्यविषयक आणि रोजगारविषयक समस्या हेरणे, शेतकरी पिकवित असलेले पिक चांगल्या दर्जाचे असावे अन त्याला चांगला मोबदला मिळावा यासाठी उपाययोजना करणे, शेतकरी कुटंबातील सदस्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, शेतकरी कुटुंबातील चिमुकल्यांनां शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडणे, मानसिक दृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना दिलासा देणे अशा जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपविण्यात आल्या आहेत. यामुळे १०० टक्के आत्महत्या रोखल्या जातील असा प्रशासनाचा दावा नसला तरी त्या कमी होण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी कुशवाह यांनी व्यक्त केला आहे.

'मित्रा'चा शेतकऱ्यांना मदत

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना संकटातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फॉर रुरल एरिया (मित्रा) या स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची आर्थिक, कौटुंबिक, आणि विशेषत: शेतीची परिस्थिती जाणून घेतली जाणार आहे. सर्वेक्षणाद्वारे मित्रा एक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे. या कुटुंबाकडील कर्जवसुली सध्या स्थगित केली जाणार आहे. तसेच शेतात कुठली पिके घेता येतील, तात्पुरत्या व कायम स्वरुपी उत्पन्नाचे स्त्रोत कसे बळकट करता येतील, याचे मार्गदर्शन त्यांना केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांसाठी खास व्यापारी संकुल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
दुर्बल घटकातील महिलांना उद्योजकतेचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी नाशिकमध्ये लवकरच महिलांसाठी व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. नाशिक महानगरपालिका व नगरविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे संकुल उभारले जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी केली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरतर्फे आयोजित 'प्रेरणा' हे महिला उद्योजिकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्सवर या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. देसाई म्हणाले की संकुलाच्या या प्रकल्पासाठी लवकरच भूखंड देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. कायमस्वरुपी प्रदर्शन भरविण्यासाठी, लघुद्योगास चालना देण्यासाठी या संकुलाची मदत महिलांना होणार आहे. प्रामुख्याने दुर्बल घटकातील महिलांना उद्योजकतेसाठी प्रेरणा दिली जाणार आहे. त्याबरोबरच महिला उद्योजकतेविषयी असलेले प्रलंबित प्रस्तावही लवकरच मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

'प्रेरणा' या प्रदर्शनाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. या प्रदर्शनात महिला उद्योजकांचे ८० स्टॉल्स मांडण्यात

आले आहेत. त्यामध्ये महिला बचतगटांचाही सहभाग मोठा आहे. वस्त्र प्रणाली, सौंदर्य प्रसाधने, गृहपयोगी वस्तू, दागिने, याबरोबरच तज्ज्ञ सल्ला प्रबोधन सेवा बँकिंग, विमा, आरोग्य, वाहन, उद्योग आदींचे स्टॉल आहेत. 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर हे प्रदर्शन आधारित आहे. उद्योजकांनी उत्पादित केलेल्या वस्तू ग्राहकांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावेळी

महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमीत बग्गा, आमदार सीमा हिरे, महाराष्ट्र चेंबर्सचे शंतनू भडकमकर, वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, दिग्विजय कपाडिया, चेंबर्सच्या महिला समितीच्या को-चेअरपर्सन प्रज्ञा पाटील, विक्रम सारडा, नगरसेवक योगिता आहेर, धावपटू कविता राऊत आदी

उपस्थित होते.

महिला औद्योगिक धोरणही लवकरच

उद्योग क्षेत्रात महिलांना संधी मिळावी व महिलांचे औद्योगिकदृष्ट्या सबलीकरण व्हावे यासाठी लवकरच 'महिला औद्योगिक धोरणा'ची घोषणा केली जाणार आहे, अशी माहितीही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. देसाई म्हणाले की, महिलांना उद्योग क्षेत्रात अधिकाधिक संधी देण्याचे उद्दिष्ट या धोरणामागे आहे. त्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात सध्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये महिलांसाठी रबर क्लस्टर सुरू करण्यात येत आहे. या क्लस्टरची संपूर्ण जबाबदारी महिलांवर आहे. पुण्यातील चाकणमध्येही उद्योग क्षेत्रात महिला उद्योजकांसाठी भूखंड

देण्याचे निर्णय लवकरच मार्गी लागणार आहेत.

ई-कॉमर्स उद्योग सध्या तेजीत आहे. या क्षेत्रात महिलांना संधी देण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. खरेदी आणि विक्री या दोन्ही प्रांतांवर महिलावर्गाचा हातखंडा असल्याने याचा लाभ महिलावर्गाला व पर्यायाने राज्याच्या औद्योगिकतेला होणार आहे. यातून महिला औद्योगिकीकरणाची चळवळ उभी राहण्यासही मदत होईल. महिला या पुरुषांपेक्षा सरस व प्रामाणिकपणे कामगिरी करीत असल्याने उद्योग जगतालाही प्रामाणिकपणाची ओळख मिळेल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. या धोरणांबरोबरच महिलांना उद्योग क्षेत्रात विशेष सवलती देण्यासाठीही उद्योग विभागाकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादांची संमेलने..

0
0

- प्रा. डॉ. विवेक खरे
मराठी भाषा आणि मराठी साहित्य यावर चर्चा घडावी तसेच त्याचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने अखिल भारतीय पातळीवर दरवर्षी एका उत्सवाचे आयोजन करण्यात येते. आपण सर्वजण या उत्सवाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या नावाने ओळखतो. म्हणायला अखिल भारतीय असलेले हे संमेलन आतापर्यंत महाराष्ट्राबाहेर काही विशिष्ट राज्यांत अपवादाने झालेले आहे. तर हे संमेलन आणि त्याला जोडून येणारे वाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या वाटतात. दरवर्षी होणाऱ्या या संमेलनात वाद होणे हे मराठी साहित्यप्रेमींच्या जणू अंगवळणीच पडले आहे. कधी हे वाद बोकड बळीमुळे, तर कधी स्मरणिकेत नथुराम गोडसेंचे नाव आल्यामुळे, कधी यशवंतराव चव्हाण यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे, तर कधी अध्यक्षांनीच लिहिलेल्या कादंबरीतील वादग्रस्त मजकुरामुळे, कधी नंदीबैल म्हणून साहित्यिकांची हेटाळणी झाल्याने अशा अनेक कारणांनी वाद निर्माण झाले. पिंपरी चिंचवड येथे पुढच्याच आठवड्यात होवू घातलेल्या ८९ व्या अ. भा. साहित्य संमेलनाच्या तोंडावर नियोजित अध्यक्ष्यांनीच यावेळी वादाला आमंत्रण दिले. एका कार्यक्रमात त्यांनी देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेल्या व्यक्तीचा एकेरी उल्लेख केला तसेच त्यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधानही केले. खरे तर अध्यक्षपदी निवडून आलेल्या व्यक्तीने अत्यंत जबाबदारीने आपली मते मांडायला हवीत याबाबत कोणाचेही दुमत होणार नाही. पण तरीदेखील कोणताही मनुष्य (मग तो संमेलनाचा अध्यक्ष का असेना) असे बेजबाबदारपणे का वागतो याचा शोध घेतला पाहिजे.

साहित्य संमेलनाच्या निवडणूक प्रक्रियेपासूनच वादाला सुरुवात होते. लोकशाही प्रक्रियेने होणाऱ्या या निवडणुकीत जिंकून येण्याच्या अहमहमिकेने उमेदवार परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करतात. आपली भाषा, त्या भाषेतून निर्माण होणारे साहित्य, त्या साहित्याबद्दल गंभीर चर्चा अशा महत्त्वपूर्ण विषयांना बगल देवून व्यक्तिगत पातळीवर आरोप-प्रत्यारोप करून साहित्यिक मंडळी सर्वसामान्य माणसांसारखे भांडतात, त्यावेळी साहित्यप्रेमींना आश्चर्य वाटते. या सगळ्या प्रक्रियेतून अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या साहित्यिकाला मग गगन ठेंगणे वाटणे स्वाभाविक आहे. अध्यक्ष झाल्यावर वेगवेगळ्या सभा-संमेलनामध्ये आपल्या लेखनाविषयी, भविष्यकालीन साहित्यिक योजनांविषयी, मराठी भाषेच्या विकासाविषयी, भविष्यात भाषेवर येणाऱ्या संकटांविषयी, विविध स्तरातील, विविध प्रदेशातील लेखन करू पाहणाऱ्या नवलेखकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांविषयी खरेतर गंभीरपणे मार्गदर्शन होईल, असे विचार संमेलनाध्यक्षांनी मांडणे अपेक्षित असते. मात्र, तसे होतांना अपवादानेच दिसते.

इंग्रजीत 'लार्जर दॅन लाईफ' असा एक वाक्प्रचार आहे. सकारात्मकरित्या वापरला जाणारा हा वाक्प्रचार संमेलनाध्यक्षांच्या बाबतीत मात्र नकारात्मकतेने वापरणे समर्पक ठरेल. अध्यक्ष आपली प्रतिमा आहे, त्या वास्तवापेक्षा मोठी करण्याचा जाणूनबुजून प्रयत्न करतात. आयुष्यापेक्षा मोठे होण्याचा प्रयत्न करतात. आपल्या अभ्यासाचा प्रांत सोडून नको, त्या विषयावर बोलण्याचा जणू आपल्याला अधिकारच प्राप्त झाला आहे, या अविर्भावात ते वर्षभर वावरतात. कोणत्याही विषयावर आपले मुक्तचिंतन करतात. अर्थात याबाबतीत ते पूर्णपणे दोषी आहेत असे नाही. भारतीय मानसिकतेतच मनुष्याच्या विचारांपेक्षा त्याची प्रतिमा मोठी मानण्याचा प्रघातच आहे. संमेलनाध्यक्ष देखील यातून सुटू शकत नाहीत. अध्यक्षांकडून सर्वसामान्य लोकांच्या अवास्तव अपेक्षा असतात. अध्यक्ष म्हणजे सर्व दुखण्यावर जालीम उपाय देणारा वैद्य या भूमिकेतून त्यांच्याकडे पाहिले जाते. मराठी शाळा बंद पडण्याचा प्रश्न असो, सीमाभागातील मराठी लोकांचा प्रश्न असो, नक्षलवाद्यांचा प्रश्न असो, शासकीय अनुदानाचा प्रश्न, प्रकाशकांचा प्रश्न असो असे कितीतरी प्रश्न घेवून सामान्य लोक अध्यक्षांकडे येतात. मात्र, हे सर्व प्रश्न आजवर झालेल्या किती संमेलनाध्यक्षांनी मुळापासून सोडविण्यासाठी काही प्रयत्न केले हा शोधाचा विषय होऊ शकतो. खरे तर अध्यक्षांच्या हातात काहीच नसते. ज्या मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने संमेलन भरविले जाते ते महामंडळ अध्यक्षाला फक्त तीन दिवस मिरवत असते आणि अध्यक्ष देखील अध्यक्षपदाची झूल पांघरून स्वतःला मिरवून घेण्यात धन्यता मानतात.

मागील काही वर्षांपासून संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत उभे राहणाऱ्या साहित्यिकांची नावे पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे सर्वसाधारण साहित्यनिर्मिती केलेली, साहित्यविषयक निश्चित भूमिका नसलेली मंडळीही नंबरगेमच्या आधारे निवडून येण्याची खात्री बाळगून निवडून येण्याचा प्रयत्न करतात. आज मराठी साहित्यात असे कितीतरी साहित्यिक आहेत, ज्यांच्या साहित्यावर वाचक मनापासून प्रेम करतात, त्यांना डोक्यावर घेवून नाचतात पण हे साहित्यिक अध्यक्षीय निवडणुकीपासून लांबच राहणे पसंत करतात. गुणवत्ता असूनही निवडून येण्याची खात्री त्यांना नसते आणि निवडून नाही आलो तर नाचक्की होईल असेही त्यांना वाटत असते. त्यामुळे सामान्य साहित्यिक कुवत असणाऱ्यांचे फावते. साहित्य संमेलन आज एक मोठा इव्हेंट झाले आहे. या इव्हेंटमध्ये पैसे ओतणाऱ्यांनाही असे बिनबुडाचे अध्यक्ष हवेच असतात. त्यांना साहित्यापेक्षाही आपली प्रतिमा लोकांसमोर नेण्यात रस असतो. म्हणून मागील काही वर्षांपासून संमेलन आयोजनकर्तेच आपण कोणाला अध्यक्षपदी निवडून आणायचे हे ठरवितांना दिसतात. पिंपरी चिंचवड येथे होऊ घातलेल्या संमेलनाचे चित्र काहीसे असेच दिसते आहे.

वाद घालणे हे जिवंतपणाचे, ज्ञानी होण्याचे लक्षण मानले जाते. पण वाद कोणत्या विषयावर घालावेत हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. नको त्या विषयांवर वाद घालून, पातळी सोडून आपल्या पदाची प्रतिष्ठा गमावण्यात काहीच अर्थ नाही. गुजराती भाषेत एक म्हण आहे, त्याप्रमाणे ज्याचे काम त्याने करावे दुसऱ्याने ते केले की तोंडघशी पडण्याची वेळ येते. मराठीत साहित्य संमेलनाध्यक्षांची एक वैचारिक परंपरा आहे. संमेलनाच्या याच मंचावरून दुर्गाबाई भागवतांनी जाचक आणीबाणीच्या विरोधात रणशिंग फुंकले होते. प्र. के अत्रे, आचार्य जावडेकर, गं. बा. सरदार, य. दि. फडके, नारायण सुर्वे, राम शेवाळकर, वसंत बापट अशा दिग्गज साहित्यिकांनी या पदाची शोभा वाढविली. किमान त्याची तरी आठवण निवडून आलेल्या अध्यक्षांनी ठेवणे संयुक्तिक ठरेल. साहित्यसंमेलने ही मराठी वाचकांच्या अस्मितेशी जोडलेली आहेत. ही अस्मिता टिकवून ठेवण्यात साहित्य संमेलनाशी संबंधित सर्वच घटकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

(लेखक एसएमआरके कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनावश्यक लाज सोडा

0
0

gayatri.kulkarni@timesgroup.com संकोच हा महिलांचा सर्वात मोठा शत्रू आहे. केवळ यामुळेच आज महिला काही नैसर्गिक अधिकारांपासूनही वंचित आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ आणि मोफत मुतारी उपलब्ध करुन मिळण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मग महिलाच का यापासून दूर आहेत. याबाबत बाळगली जाणारी अनावश्यक लाज महिलांनी बाजूला ठेवली तरच 'राईट टू पी' ही मोहिम पूर्णत: यशस्वी होईल. या मोहिमेतील महिलांचा सहभाग आणि हाय कोर्टाच्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत मुमताज शेख यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी संवाद साधला.

हायकोर्टाच्या आदेशानुसार काम सुरू झाल्याची काही माहिती मिळाली आहे का?

-मुंबईमध्ये तरी याबाबत काम सुरू झालेच आहे, पण आता अन्य महापालिकांमार्फतही तसे व्हावे अशी आशा आहे. प्रत्यक्ष रिपोर्ट आमच्यापर्यंत आलेला नसला तरी आम्ही विविध शहरांमध्ये 'राईट टू पी' चळवळ सुरू करीत आहोत, ज्यामुळे या आदेशाची योग्य आणि काटेकोर अंमलबजावणी होईल, यासाठी महिलांचा सहभाग अतिशय आवश्यक आहे.

यापुढे तुमच्यामार्फत कोणते काम हाती घेतले जाणार आहे?

-मुळात लघवी किंवा मुतारी हा शब्द उच्चारण्यातच महिला संकोचलेल्या असतात. केवळ या संकोचामुळेच आज अनेक महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ही गोष्ट लाजेशी जोडली गेल्यामुळे याबाबत होणारा अन्याय किंवा असुविधा यावर बोलायला महिला धजावत नाहीत. याचाच गैरफायदा घेतल्यामुळे आजवर महिलांना सार्वजनिक ठिकाणी या हक्कांपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे यबाबात महिलांसह सर्व नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम हे आमचे यापुढचे उद्दीष्ट आहे.

अन्य शहरांमध्ये ही मोहिम कशाप्रकारे राबविली जाणार आहे?

-मुंबईमध्ये या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. परंतु प्रत्येक शहराची परिस्थिती लक्षात घेऊन त्यावर काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे 'राईट टू पी' या चळवळीसाठी त्या-त्या शहरातील लोकांचा एक सक्रिय ग्रुप आमच्यामार्फत तयार केला जाणार आहे. हायकोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी योग्य पध्दतीने व्हावी तसेच याबाबत महिला व नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी हा ग्रुप काम करणार आहे.

ग्रामिण भागामध्ये याबाबत काही काम करणार आहात का?

-सध्या आम्ही विविध ग्रामपंचायती असलेल्या भागांचा अभ्यास केला आहे. ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी १० टक्के बजेट असते. ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करुन या निधीच्या वापरातून बाजार गावांमध्ये अशा प्रकारच्या मोफत मुताऱ्या उभारण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. ग्रामीण भागातील हा बदल निश्चितच सुधारणेच्या दृष्टिने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images