Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सत्ताधारी, प्रशासन ढिम्म

$
0
0

खास प्रतिनिधी, नाशिक

हरित लवादाने नाशिक शहरातील बांधकामे थाबविण्याचे आदेश देवून महिना लोटला तरी त्यावर अपील झाले नसल्याने शहराच्या विकासाला ब्रेक लागला आहे. सत्ताधारी मनसे आणि प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे शहर संकटात सापडले असल्याची टीका शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे. महापौरांनी तातडीने बैठक बोलावून या विषयावर तोडगा काढला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा बोरस्ते यांनी दिला आहे.

कपाटामुळे शहरातील बांधकाम परवानग्या रखडल्या असतांना पुण्याच्या हरित लवादाने खत प्रकल्पाची व्यवस्थित देखभाल केली नसल्याने शहरातील बांधकाम परवानग्या थांबविल्या आहेत. हरित लवादाच्या या निर्णयाला महिना लोटला तरी अद्याप अपील केले नाही. लवादाच्या आदेशामुळे शहरातील बांधकामे ठप्प आहेत. महिनाभरापासून एकाही इमारतीच्या बांधकामाला परवानगी मिळालेली नाही. प्रशासनाच्या वतीने अपील करण्यासंदर्भात व पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यासंदर्भात कोणतीही हालचाल केली नसल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला आहे. लोकप्रतिनिधी सोबतच चर्चा करून यात तोडगा काढता आला असता, परंतु तेही काम सत्ताधाऱ्यांनी केलेले नाही. त्यामुळे ही उदासीनता शहराला संकटात लोटणारी आहे. महापौरांनी तातडीने प्रशासनाला आदेश दिले पाहिजे. परंतु, तसे होत नाही. त्यामुळे महापौरांनी तातडीने लोकप्रतिनिधी व प्रशासनाची एकत्रित बैठक घेवून तोडगा काढा अन्यथा शिवसेना स्टाईल आम्ही आंदोलन करू असा इशारा बोरस्ते यांनी दिला आहे.


सत्ताधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

प्रशासन व सत्ताधारी यांच्या ढिम्म कारभारामुळे शहराचा विकास थांबला आहे. संबंधित नागरिकांची समजूत काढून हा 'स्टे' उठवता आला असता; मात्र सत्ताधारीच याबाबत गंभीर दिसत नाहीत. महापालिकेत बेभरवशाचे व बेफिकीरीचे कामकाज चालू आहे. शहर अस्वच्छ असल्याचा संदेश बाहेर जात आहे. लवादाच्या आदेशावर साधा अभ्यासही केलेला नाही, असा आरोप बोरस्ते यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनधिकृत होर्डिंग्जविरोधात कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याबाबत शहर पोलिसांनी पुढाकार घेतला असून मंगळवारी दिवसभरात सहा ठिकाणी होर्डिंग्ज हटवून गुन्हे दाखल करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याशी अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याबाबत चर्चा केली होती. त्यानुसार कारवाई सुरू झाली असून पोलिसांनी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये तीन, तर गंगापूर, पंचवटी आणि भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये प्रत्येकी एक गुन्हा दाखल केला.

गावठी कट्टा, बुलेट जप्त

क्राईम ब्रँच युनिट तीनच्या ताब्यात असलेल्या संशयित चोरट्यांकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. राहुल संदीप सोनवणे, महेश आंधळे आणि नीलेश उर्फ बाल्या भोसले असे या संशयित चोरट्यांची नावे आहेत. या संशयितांना क्राईम ब्रँचने एक जानेवारी रोजी नाशिकरोड भागातून सापळा रचून अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून कार, सहा एलसीडी, लॅपटॉप, मोबाइल हॅण्डसेट, दोन मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त केला होता. पोलिसांनी चौकशी करीत त्यांच्याकडून बंदूक व काडतूस सुध्दा जप्त केली असून, आरोपींनी केलेले १० गुन्हे उघडकीस आले असल्याचे

सिनीअर पीआय संजय सानप यांनी सांगितले.

बेदम मारहाण

संघटनेचा राजीनामा का दिला, अशी कुरापत काढून महाराष्ट्र विश्वकर्मा सेनेच्या संस्थापक अध्यक्षाने घरात घुसून मुलांना बेदम मारहाण केल्याबाबतची तक्रार सीमा राजेंद्र खैरनार दिली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलास मोरे यांच्यासह नितीन खैरनार, नंदलाल बाविस्कर, जगदीश बागुल यांच्याविरोधात मारहाण, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र खैरनार यांनी संघटनेच्या कलहामुळे राजीनामा दिला. याचा राग आल्याने कैलास मोरे यांनी संशयितांसह खैरनार यांना शिवीगाळ करीत चौघांनी खैरनार यांच्या मुलांना बेदम मारहाण केली.

दागिन्यांची चोरी

निमाणी ते द्वारका असा रिक्षाने प्रवास करीत असताना सहप्रवाशांनी बॅगेतील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे राहणारे दत्तात्रय किसन लांडगे (वय ६७) हे सोमवारी निमाणीहून रिक्षाने द्वारकाकडे जात होते. त्यांच्यासोबत बसलेल्या दोघांनी लांडगे यांच्या बॅगेतील एक लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून घेत पळ काढला.

तिजोरीची चोरी

भाभानगर परिसरातील नवशक्ती चौकात असलेल्या गोदामाचे कुलूप तोडून चोरट्याने तिजोरीतील रोकडसह तिजोरीच चोरून नेली. या प्रकरणी सचिन रमेश तेजाळे यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, चोरट्यांनी पाच हजार रुपये किमतीची सेफवे कंपनीची तिजोरीच चोरून नेली. या तिजोरीत ३५ हजार २३० रुपयांची रोकड होती.

गायी व गोऱ्हांची सुटका

भद्रकाली परिसरातील चौक मंडई भागात कत्तलीसाठी बांधलेल्या सात गायी आणि चार गोऱ्हांची भद्रकाली पोलिसांनी सुटका केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्राणी सरंक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चौक मंडई भागातील जलाउद्दीन फ्रुट डेपो येथील पत्र्याच्या शेडमध्ये पाच गायी, दोन गोऱ्हे, दोन जर्सी गोऱ्हे आणि दोन जर्सी गायी बांधलेल्या आढळून आल्या. या गोधनाची किमती एक लाख २५ हजार रुपये इतकी असून या गोधनाची कत्तल होणार होती, असे पोलिस तपासात निष्पण झाले आहे.

दोन वृध्दांचा मृत्यू

जिन्यावरून पाय घसरून पडल्याने शहरातील दोन वृध्दांचा मृत्यू झाला. माधवराव रामचंद्र बोराडे (वय ८५) आणि जगन्नाथ महादू सोनार (वय ८३) अशी या दोघा वृद्धांची नावे आहेत. पहिल्या घटनेत कुंभारवाडा परिसरात राहणाऱ्या बोराडे यांचा पाय जीन्यावरून घसरल्याने ते जखमी झाले होते. दुसऱ्या घटनेत चेहडी पंपिंग स्टेशन परिसरातील भगवा चौक येथे राहणारे सोनार हे रविवारी जीन्यावरून पडल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांच्या गैरहजेरीमुळे महासभा गुंडाळली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाणी प्रश्नासह कपाटीच्या प्रश्नावर आक्रमक असलेल्या सत्ताधारीसह विरोधी नगरसेवकांनी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम उपस्थित नसल्याने मंगळवारी महासभा आटोपती घेतली. केवळ विकासकामांचे विषय मंजूर करत, धोरणात्मक विषयांवर आयुक्त नसल्याने चर्चा करणे सत्ताधाऱ्यांनी टाळले. त्यामुळे एक कोटीची गोदासफाई, तारांगण सल्लागार समिती, अगंणवाडी सेविकांना वाढीव मानधन देण्याचे विषय तहकूब ठेवण्यात आले. तर कपाट आणि पाणीकपातीवर चर्चा टळली. त्यामुळे आता आयुक्तांच्या उपस्थितीतच पुन्हा या विषयांना घुमारे फुटणार आहे.

महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली महासभा झाली. गरसेविका सुजाता डेरे यांच्या मातोश्री निर्मलाबाई कुटे यांना श्रद्धाजंली वाहून सभा अर्धा तास तहकूब करण्यात आली. त्यानंतर सभा सुरू होताच महापौरांनी विकासकामांचे विषय मंजूर करत, धोरणात्मक विषयांवर आयुक्तांच्या उपस्थितीत चर्चा करण्याचे जाहिर केले. डॉ. गेडाम हे अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जमाती कल्याण समितीच्या साक्षीसाठी मुंबईला गेले. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांच्या उपस्थितीत सत्ताधाऱ्यांनी पाणीप्रश्न व कपाटीच्या विषयावर चर्चा करण्याचे टाळले. प्रशासनाने सोशल ऑडिट केले होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने या दोन्ही मुद्यांवर आयुक्तांकडूनच उत्तरे अपेक्षित होती. त्यामुळे आयुक्तांच्या उपस्थितीतच या विषयावर चर्चा करण्याची नगरसेवकांची इच्छा होती. त्यामुळे महापौरांनी विकासकामांचे विषय मंजूर केले. एक कोटींची गोदासफाई, तारांगण सल्लागार समिती, अगंणवाडी सेविकांना वाढीव मानधन देण्याचे विषय तहकूब ठेवण्यात आले. त्यामुळे आयुक्तांच्या उपस्थितीत पुन्हा महासभा होवून त्यावर पुन्हा वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. तर कपाट धोरणाचाही हीच स्थिती असल्याने आता आयुक्तांच्या उपस्थितीतच पुढील महासभा घेण्यावर सत्ताधाऱ्यांचा भर आहे. मात्र, आयुक्त त्यास किती प्रतिसाद देतात यावर महासभेचे भविष्य अवलंबून आहे.

पाण्याची धग कायम

महासभेत पाणीप्रश्नासह सोशल ऑडिटवर झालेल्या चर्चेत नगरसेवकांनी अभ्यास केल्याचे दिसून आले. मात्र, आयुक्तच नसल्याने आता ऐकवायचे कुणाला अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली. प्रशासनाने केलेल्या सोशल ऑडिटमुळे नगरसेवकांमध्ये संतापाची भावना होती. सोशल ऑडिटच्या विरोधातील खदखद नगरसेवकांना आयुक्तांपुढे व्यक्त करायची होती. मात्र, आयुक्तांच्याच उपस्थितीत चर्चा करण्याचा नगरसेवकांचा अट्टाहास होता. पाणीप्रश्नाची धग पुढील महासभेपर्यंत कायम राहणार असल्याचे चित्र आहे.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुविधा द्या; अन्यथा बेमुदत उपोषण

$
0
0

शिवाजी चौकात असलेल्या भाजी मंडई मैदानाला सुविधा पुरवाव्यात म्हणून येथील ज्येष्ठ नागरिकांनी यापूर्वी अनेकदा महापालिकेला निवेदन दिले. मात्र, महापालिका मैदानाला सुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप ज्येष्ठ नागरिकांना केला आहे.

मैदानाला दोन प्रवेशद्वार आहे. ती नेहमी उघडी असतात. त्यामुळे या मैदानावर कुणीही यावे आणि कचरा फेकून जावे, अशी परिस्थिती आहे. अस्वच्छतेमुळे मैदानावर मोकाट जनावरांचा सतत मुक्त वावर असतो. परिसरातील भाजी आणि चिकन विक्रेते या मैदानात उघड्यावर कचरा टाकतात. या विक्रेत्यांना हटकले तर त्यांच्याकडून उलट दमबाजी केली जाते. या मैदानातच महापालिकेची अभ्यासिका आणि वाचनालयाची इमारत आहे.

वाढत्या अस्वच्छतेमुळे महापालिकेच्या या इमारतीला दुरवस्थेने ग्रासले आहे. वाचनालयात वर्तमानपत्र वाचण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या घाणीतून रस्ता काढत यावे लागते, असे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.

टवाळखोरांचा धुडगूस मैदानावर अंधार पडल्यावर टवाळखोरांचे मद्यपानासाठी दररोज घोळके जमा होतात. या तरुणांकडून मद्यपान केल्यानंतर मैदानात धुडगूस घातला जातो. मात्र, याकडे महापालिका आणि पोलिस प्रशासन कधी लक्ष घालणार असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित केला आहे. मैदानाच्या सुविधेबाबत ज्येष्ठ नागरिकांनी वृक्षांगण, ग्रीन जिम, स्वच्छता मोहीम व गेट बंद करून गोल फिरणारे गेट बसविण्याबाबत मागणी केली आहे. महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीकडे लक्ष न दिल्यास येत्या प्रजासत्ताक दिनी महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा ज्येष्ठ नागरिकांनी दिला आहे.

शिवाजी चौकातील भाजी मंडईला लागून असलेल्या मैदानाची दुरवस्था झाली आहे. यासाठी महापालिकेकडे वेळोवेळी मैदानाला सुविधा पुरविण्याबाबत निवेदन दिले आहे. महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने २६ जानेवारीला उपोषणास बसणार आहोत. - सावळीराम तिदमे, ज्येष्ठ नागरिक, शिवाजी चौक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंबाखूजन्य पदार्थांची होळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दारू, सिगारेट, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करून युवा पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहे. अशा युवकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विद्यार्थी कृती समितीतर्फे केटीएचएम कॉलेजजवळील मॅरेथॉन चौकात तंबाखूजन्य पदार्थांची होळी करण्यात आली. राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून हा जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आल्याचे विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी सांगितले.

महाराष्ट्रात गुटखा बंदी असतानाही चोरून विक्री होत असल्याने अनेक तरूण व्यसनाधीन होत आहेत. तंबाखूजन्य पदार्थांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, अनेक समाजोपयोगी काम करणारे नेते व कार्यकर्त्यांना या व्यसनामुळे आपण मुकलो आहोत. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांपासून युवकांनी लांब रहावे, असे आवाहनही पगार यांनी यावेळी केले. तसेच येत्या काळातदेखील व्यसनापासून दूर राहण्याची शपथ यावेळी राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी विशाल गांगुर्डे, रोहित कळमकर, ललित पिंगळे, केदार कुरकुरे, विजय विश्वकर्मा आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटी पार्कची इमारत आता भाड्याने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुमारे दशकभरापासून वापराविना असलेली आयटी पार्कची इमारती भाडे तत्वाने देण्यास अखेरीला मुहूर्त लागला आहे. स्थानिक उद्योजक आणि लोकप्रतिनिधींच्या दीर्घ पाठपुराव्याअंती या निर्णयाला मुहूर्त लाला. अंबड एमआयडीसीतील १५ गाळे असलेल्या या इमारतीत भाडेकरांरावर आता गाळे देण्यात येणार आहेत.

सन २००३ पासून ही इमारत बांधून तयार आहे. मात्र, आजवर हे गाळे भाडे कराराने देण्याची सुविधा येथे नव्हती. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर आयटीचे लहान युनिट्स कार्यरत आहेत. या युनिट्सचे स्वरूप विशेषत: लघु असल्याने येथे गाळे खरेदी करणे आयटी व्यावसायिकांसाठी शक्य नव्हते. यामुळे काही दिवसांपासून नाशिकच्या आयटी उद्योजकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नांनी गती घेतली होती. यानंतर उद्योग विभागाकडे याप्रश्नी सातत्याने पाठपुरावा झाल्यानंतर आता एमआयडीसीने ही इमारत भाडे करारावर देण्याची घोषणा मंगळवारी केली आहे. पाच वर्षांसाठी भाडेकरारावर या गाळ्यांचे वितरण उद्योजकांना करण्यात येणार आहे. यासाठी १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत उद्योजकांना जागेसाठी अर्ज करता येईल.

एमआयडीसी उद्योगभवन येथे खासदार हेमंत गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीचे अधिकारी, जिल्हा उद्योग व निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष रमेश पवार व शहरातील आयटी उद्योजकांची बैठक काही दिवसांपूर्वी झाली होती. या बैठकीतूनही आयटी पार्क इमारतीतील गाळे भाड्याने द्यावे अशी मागणी करण्यात आली होती. या प्रश्नी गाळे भाड्याने द्यावेत अशी सूचनाही खासदार गोडसे यांच्या वतीने मांडण्यात आली होती. यानंतर एमआयडीसीचे 'सीईओ' भूषण गगराणी व जॉईंट सीईओ विक्रमकुमार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता.

आयटी उद्योगात भक्कम पावले रोवण्याची क्षमता नाशिकमध्ये आहे. मात्र, एका छताखाली हे उद्योग नाहीत. खास आयटी पार्कसाठी उभारण्यात आलेली इमारत १३ वर्षांपासून उपयोगात नव्हती. भाडेतत्वावर उद्योजकांसाठी ही इमारत आता खुली झाल्याने नाशिकच्या आयटी इंडस्ट्रीला बूस्ट मिळेल.

- रमेश पवार, अध्यक्ष, जिल्हा उद्योग व निर्यातदार संघटना

आयटीसाठी गुड न्यूज आहे.

खास आयटी उद्योगासाठी बांधण्यात आलेली इमारत वापराविना पडून होती. दीर्घ पाठपुराव्यानंतर एमआयडीसीकडून ही इमारत भाडे तत्वावर देण्यास झालेला निर्णय नाशिकच्या आयटी इंडस्ट्रीसाठी गुड न्यूज आहे.

- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी दिले ट्रॅफिकचे धडे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
ताई, सफेद पट्ट्याच्या मागे वाहन उभे करा, दादा कशासाठी ऐवढे वेगात वाहन चालवून जीव धोक्यात घालताय? तुमचे कुटुंबीय घरी तुमची वाट पहात असतात. काका, तुम्ही तर सरकारी अधिकारी ना? तरीही सीटबेल्ट न लावताच निघालात! कळत नकळतपणे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे लहानग्यांनी अशाप्रकारे प्रबोधन केले. शहरातील मुख्य चौकांमध्ये मंगळवारी वाहतूक पोलिसांची जागा विद्यार्थ्यांनी घेतली अन् दुपारी एकपर्यंत हजारो वाहनधारकांच्या प्रबोधनाचा वर्ग पार पडला.

सर्रास नियमांची पायमल्ली करून वाहन चालविणारे वाहनचालक स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात आणत आहेत. जीवन अमूल्य असल्याने त्याचा सन्मान करा, वाहतुकीचे नियम आपल्या हितासाठी असून, ते पाळा असा संदेश देण्यासाठी शहरातील विविध शाळांचे आठवी आणि नववीत शिकणारे एक हजार विद्यार्थी पोलिस, प्रादेशिक परिवहन विभाग आणि नाशिक फर्स्ट संस्थेच्या सादेला प्रतिसाद देत सकाळी सातपासूनच रस्त्यावर उतरले. स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून कुमारावस्थेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना ‌वाहतुकीच्या नियमनाबाबत प्रेरीत करण्यात आले.

चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्युकेशन पार्कमध्ये वाहतुकीच्या नियमांचे प्रशिक्षण घेणाऱ्या आरएसपीच्या एक हजार विद्यार्थ्यांची या अभिनव उपक्रमात मदत झाली. सीबीएस सिग्नलवर महापौर अशोक मुर्तडक, पोलिस उपायुक्त विजय पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उदघाटन झाले. हेल्मेट आणि सीटेबल्टचा वापर न करता वाहन चालविणारे, मोबाईलवर बोलणारे, पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी जागा न सोडणाऱ्या वाहनचालकांचे प्रामुख्याने प्रबोधन करण्यात येत होते. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांचा एक दिवसीय विमा उतरविल्याची माहिती नाशिक फर्स्टच्या स्वयंसेवकांनी दिली. तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर्सचे पथकही प्रत्येक सिग्नलजवळ थांबविण्यात आले होते.

एरवी शाळेत पाठ्यक्रमाचे धडे गिरविणारे विद्यार्थी रस्त्यावर वाहतुकीचे नियमन करीत असल्याचे पाहून नागरिकांनाही आश्चर्य वाटले. वेगावर नियंत्रण ठेवा, वाहतुकीचे नियम पाळा, विनाकारण हॉर्न वाजवू नका, हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करा असे आवाहन करणारे सूचना फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतल होते. प्रत्येक सिग्नलवर विद्यार्थ्यांच्या सोबतीला दोन वाहतूक पोलिस आणि दोन शिक्षकही होते. एका चौकात ३० विद्यार्थी रस्ता सुरक्षित वाहतुकीबाबत जनजागृतीचे काम करीत होते. विशेष म्हणजे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांमध्ये सामान्य नागरिकांप्रमाणेच सरकारी अधिकारी आणि कर्मचारीही मोठ्या संख्येने असल्याचे विद्यार्थ्यांना आढळून आले. अशा सर्वांच्याच प्रबोधनाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडली. तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे, त्यांच्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा अशी भावनिक साद त्यांना घालण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत सूर्यनमस्कार

$
0
0

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने देवळाली महोत्सवाच्या माध्यमातून केवळ विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे एवढेच कर्तव्य पार न पडता विद्यार्थ्यांचे आरोग्यही अबाधित रहावे या उद्देशाने शालेय स्तरावर सूर्यनमस्कार स्पर्धा झाली. यात सेंट पेट्रिक्स हायस्कूल, कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूल, नूतन विद्यामंदिर, दर्शन अॅकॅडमी, डॉ. गुजर सुभाष हायस्कूल, देवळाली हायस्कूल आदी शाळांनी सहभाग घेतला.

स्पर्धेदरम्यान आयोजक जीवन गायकवाड, संजय गिते यांनी परिसरातील विविध शाळांमध्ये भेटी देत विद्यार्थी करीत असलेल्या सूर्यनमस्कार आणि योगांचे परिक्षणही केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी मनोज कनोजिया, अनिरुद्ध सिद्धगणेश, अनिल ढोकणे, आर. आर. यशवंते, रंगनाथ जाधव, निर्मला धुरिया आदी शिक्षक प्रयत्नशील होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजप सिडकोचा वाद प्रदेशाध्यक्षांच्या दारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

सिडको मंडल अध्यक्ष निवडीवरून निर्माण झालेल्या वाद थेट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या दारात पोचला आहे. मंडल अध्यक्षपदी गिरीश भदाणे यांची निवड पक्षाने केली असली तरी त्यांना कार्यकारिणीच्या निवड करण्यास पक्षातर्फे प्रतिबंध करण्यात आला असल्याचा दावा आमदार सीमा हिर यांनी केला आहे. तीन दिवसात सिडकोच्या मंडल अध्यक्षाचा निर्णय करण्याचे आश्वासन दानवे यांनी हिरे यांना दिले आहे. त्यामुळे मंडल अध्यक्षपदाचा वाद चिघळला आहे.

नाशिक भाजपच्या वतीने सिडकोच्या मंडल अध्यक्षपदी आमदार डॉ. अपूर्व हिरे गटाच्या गिरीश भदाणे यांची निवड केली. मात्र, या निवडीला आमदार हिरे यांनी विरोध करत त्यांच्या गटाकडून बाळासाहेब पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे या निवडीवरून भाजपमध्येच राडा झाल्याचे समोर आले होते. आमदार हिरे यांनी मंगळवारी दीडशे समर्थकांसह प्रदेशाध्यक्षांकडे धाव

घेतली. हिरे यांनी भदाणे यांच्याबाबतीत झालेल्या निर्णयाची माहिती देण्यात आली. पक्षाचे प्राथमिक सदस्य सुद्धा नसलेल्यांना पद दिल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. दानवे यांनी आपल्याला वस्तुस्थिती माहिती नसल्याचे सांगून तूर्तास भदाणे यांना कार्यकारिणी करण्यास मनाई करण्याचे आदेश देण्यात आले. तीन दिवसाच्या आत या संदर्भात अंतिम निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दोन आमदारांमधील शीतयुद्ध थेट प्रदेश पातळीवर पोचले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिनी कोंबड्यांची नाशिककरांनाही भुरळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर
उत्तर भारतात पाळल्या जाणाऱ्या चिनी कोंबड्या नाशकात विक्रीसाठी आल्या आहेत. या आगळ्यावेगळ्या कोंबड्यांनी नाशिककरांना भुरळ घातली आहे. ही प्रजात मूळची चीनची मानली जात असली तरी उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्ये या कोंबड्या सर्रास पाळल्या जातात. मागील काही वर्षांत महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांतही या कोंबड्यांना मागणी वाढली आहे.

उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद शहराला लागून असलेल्या खेडेगावातून काही व्यापारी चिनी कोंबड्या विक्रीसाठी नाशिक शहरात दाखल झाले आहेत. त्र्यंबकेश्वर रस्त्यावर कुबेर स्वामी पेट्रोल पंपच्या बाजूला या कोंबड्या उपलब्ध आहेत. साधारण पाचशे रुपयाला नर-मादीची जोडी विक्रीला आहे. तीन महिने वय असलेल्या या कोंबड्यांची दोनशे जोडपी विक्रेत्यांनी आणली आहेत.

दरवर्षी देशातील विविध राज्यात चिनी कोंबड्या विक्री करीत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शहराच्या लगत असलेल्या गावांच्या बाजूला तीन ते चार दिवस चिनी कोंबड्या आम्ही विक्री करणार असल्याचे विक्रेते बाकेलाल सोनावर यांनी सांगितले.

या कोंबड्या शांत असतात. त्या पळूनही जात नाहीत. सहा महिन्यांचे झाल्यावर ही कोंबडी अंडी देते. शिवाय, तीन महिन्यात एक किलो वजन असलेली ही कोंबडी सहाव्या महिन्यात पाच किलो वजनाची होते, असेही सांगण्यात आले. तिचे मांस चविष्ट असल्याचाही दावा विक्रेते करीत आहेत.

महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, कर्नाटक, बंगलुरू आदी राज्यांमध्ये दरवर्षी वर्षांच्या सुरुवातीला चिनी कोंबड्या विक्रीचा व्यवसाय गेल्या दहा वर्षांपासून करीत असल्याचे बाकेलाल यांनी सांगितले. नाशिक शहरातही कोंबड्या पाळणाऱ्यांनी चिनी कोंबड्या विकत घेतल्याचेही बाकेलाल म्हणाले. इतर कोंबड्यांसारखेच खाद्य चिनी कोंबड्याही खातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता आठवड्यातून एक दिवस `ड्राय डे`!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
गंगापूर धरणातील उपलब्ध आरक्षण आणि शिल्लक दिवसांच्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनात ४९ दिवसांचा तुटवडा जाणवत असल्याने पाणीकपात आणखी वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आता आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. ही कपात विभागनिहाय करण्याचाही विचार सुरू आहे. नाशिककरांना मात्र यापुढे पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. प्रत्यक्षात ही कपातही पुरेशी नसल्याने शहरात पाणीबाणीची स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर महापालिकेतर्फे सध्या शहरात १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. परंतु, सध्याची कपात कायम ठेवून पाणीपुरवठा केला तरी जुलै अखेरपर्यंत उपलब्ध पाणी पुरविणे शक्य नाही. गंगापूर धरणात २७०० दशलक्ष घनफूट, तर दारणात ५०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित आहे. दारणा धरणातून फक्त ३०० दशलक्ष घनफूटच साठा उचलता येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या वाट्याला तीन हजार दशलक्ष घनफूट पाणी आले आहे. आतापर्यंत पालिकेने यापैकी ११०६ दशलक्ष घनफूट पाणी वापर केला आहे. त्यामुळे उर्वरित २०२ दिवसांसाठी फक्त १८९३ दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा उपलब्ध आहे. सध्याच्या १३.३५ दशलक्ष लिटरनुसार पाणीपुरवठा केल्यास हा साठा फक्त १५२ दिवस पुरेल. त्यामुळे पाणीपुरवठ्यात ४९ दिवसांचा तुटवटा पडणार आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी पाणीकपात वाढविण्याशिवाय कोणाताही पर्याय उरला नसल्याने अखेरीस महासभेने एक दिवस आठवड्यातून पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश महापौर अशोक मुर्तडक यांनी प्रशासनाला दिले आहेत.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनानेही तयारी केली आहे. विभागनिहाय कपात लागू करावी, की पूर्ण शहरात एक दिवस कपात ठेवावी याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबत गटनेत्यांची व आयुक्तांची बैठक घेवून तातडीने निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे नाशिककरांना आता रोजच्या १५ टक्के पाणी कपातीसोबतच एक दिवस कोरडा काढावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ दोघी कुंटनखान्यातून शिक्षणाच्या प्रवाहात!

$
0
0


pravin.bidve@

timesgroup.com

नाशिक : त्यांचा जन्मच कुंटनखान्यातला. त्यामुळे ना स्वत:चे नाव ना ओळख. जन्मल्यापासूनच त्या चिमुकल्यांच्या झोळीत पडले नरकयातनांचे दान. दुर्धर आजाराने त्रासलेली त्यांची माता लेकींच्या चिंतेने अधिकच खंगत चाललेली. दाही दिशांना असा अंधार दाटला असताना एज्युकेशन ऑन व्हील्सने या मायलेकींच्या जीवनात आशेचा किरण आणलाय. त्या चिमुकल्यांची कुंटणखान्यातून सुटका करीत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश आले आहे. चांगले जीवन जगण्याची मिळालेली ही संधी या मायलेकींसाठी नववर्षाचे गिफ्ट ठरले आहे.

कुंटनखानाच तो. तेथे आयुष्याचे कल्याण ते कसे होणार? भद्रकालीतील कुंटनखान्याने अनेकींचं आयुष्य उध्वस्त केले आहे. या दोघींचेही असे होऊ नये याची मातेला काळजी. चरितार्थासाठी देहविक्रय करतानाच झालेल्या अपत्याला ना नाव ना भविष्य! त्यातही तो जीव मुलगी असेल तर दृष्टचक्राचा फेरा ठरलेला. अशाच दोन कळ्यांना या नरकातून बाहेर काढण्यात एज्युकेशन ऑन व्हील्सचे सचिन जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले आहे.

येथील कुंटनखान्यात दोन मुली शाळा बाह्य असल्याचे प्रवरा मेडिकल ट्रस्टचे संदीप चंद्रमोरे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी एव्हरी चाईल्ड काऊंटच्या हेल्पलाइनशी संपर्क साधून त्याबाबत माहिती दिली. सात ते आठ वर्ष वयाच्या या मुली शिक्षणापासून वंचित होत्या. एज्युकेशन ऑन व्हील्सशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी लगेचच भद्रकालीतील रेड लाइट परिसरात धाव घेतली. या मुली आणि त्यांच्या मातेचा शोध घेतला. मुलींच्या मातेला आरोग्याच्या गंभीर समस्या आहेत. तेथील वातावरण मुलींच्या विकासाला मारक असल्याने त्यांना तेथून बाहेर काढणे आवश्यक होते. मात्र, सरकारी दप्तरावर ही महिला आणि मुलींचे काहीच अस्तित्व नसल्याने काही अडचणी भेडसावल्या. इगतपुरी तालुक्यातील एका आश्रमशाळेत या मुलींना प्रवेश मिळाला आहे. एक मुलगी पहिल्या इयत्तेत तर दुसरी दुसऱ्या इयत्तेत शिकते आहे. सामाजिक कार्यकर्ते हेमंत भांबरे, साधना पवार, मुख्याधापक वसंत खैरनार यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले असून, त्यांचे अंधकारमय आयुष्य उजळणार आहे. एज्युकेशन ऑन व्हील्सने आतापर्यंत ९०० हून अधिक मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहेत.

तेथील अशा वयोगटातील मुलींचा शोध घेऊन त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कार्यात सहकार्यासाठी आमच्या एव्हरी चाईल्ड काऊंटच्या ८९८३३३५५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सचिन जोशी, एव्हरी चाईल्ड काऊंट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तो मी नव्हेच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको
मंत्रालयात कामाला असल्याचे सांगून अनेकांना उल्लू बनविणाऱ्या ठगाने अनेक महिलांना जाळ्यात ओढल्याचे पुढे आले आहे. पती बेपत्ता झाल्याची तक्रार शहरातील तब्बल तिसऱया पत्नीने केल्याने या ठगाचा भांडाफोड झाला आहे. पंचवटीतील किराणा व्यापाऱ्यानेही तक्रार दिली असून, हा ठग आता पोलिसांच्या रडारवर आहे.

टीव्ही सिरीयल प्रमाणेच एक ठग महिलांसह इतरांची फसवणूक करीत असल्याचे दिसून येत आहे. मंत्रालयात नोकरीला असल्याचे सांगून फसविणाऱ्या या ठगाचे नाव आहे सचिन चंद्रकात नगरकर. महिलांना प्रेमाचे आमिष दाखवत जाळ्यात ओढण्याचे काम तो करीत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी माझे व्यवसाय आहेत, असेही तो काही महिलांना सांगतो. तीन वर्षांपूर्वी जेलरोडला राहणाऱ्या रेणुका या महिलेशी नगरकर याचा परिचय झाला. नगरकरने रेणुका यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नगरकर ठग असल्याचे लक्षात येताच रेणुका या मूळ गावी अमरावती येथे वास्तव्यास गेल्या. नगरकरने रेणुका यांचे अश्लिल फोटो नातेवाईकांमध्ये शेअर करुन त्यांच्याकडून पैसेही उकळले. याप्रकरणी रेणुका यांनी अमरावतीच्या गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. नगरकरचा माग घेणाऱ्या रेणुका यांना धक्कादायक माहिती मिळाली. पती बेपत्ता असल्याची

तीन महिलांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचे दिसून आले. हा फरार पती दुसरा तिसरा कुणी नसून नगरकरच असल्याने रेणुका यांनी नाशकात धाव घेतली. नगरकर हा अंबड एमआयडीसीतच फिरत असल्याची माहिती रेणुका यांनी पोलिसांना दिली आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यातील एका हवालदारालाही या ठगाने ५० हजार रुपयांना गंडा घातला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पळालेल्या किशोर कैद्यांपैकी १० जणांना अटक

$
0
0

नाशिक : शहरातील मध्यवस्तीतील किशोर सुधारालयातातून (ब्रोस्टल स्कूल) पळालेल्या १२ किशोरवयीन कैद्यांपैकी १० जणांना अटक करण्यात आली. या मुलांनी सोमवारी पहाटे सुधारालयातून पळ काढला होता.

दहीहंडीचा मनोरा करीत १२ अल्पवयीन गुन्हेगारांनी किशोर सुधारालयाच्या १६ फूट उंच भिंतीचा अडथळा पार केल्याची घटना सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली होती. या मुलांनी दहीहंडीप्रमाणे मनोरा तयार केला. यानंतर पांघरण्यासाठी दिलेल्या चादरीचा वापर करीत सर्व मुलांनी भिंतीच्या पलीकडे उड्या मारल्या. दरम्यान, ही घटना उघडकीस येताच सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पळालेल्या मुलांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने सरकारवाडा पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ तपास सुरू केला. यात पुणे शहरातील कैद्यांचा सर्वाधिक समावेश होता. त्यामुळे पोलिसांनी आपला मोर्चा पुण्याकडेच वळवला. पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळपर्यंत १० मुलांना पुणे तसेच सातारा भागातून अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण विभाग रामभरोसे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण पंचायत समितीच्या आधिपत्याखालील शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे. बुधवारचा आठवडे बाजार असताना या विभागात एकही कर्मचारी व अधिकारी दालनात उपस्थित नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. दुपारी चार ते पाच वाजेदरम्यान शिक्षण विभागात एकही कर्मचारी अधिकारी उपस्थित नसल्याचे अनेकवेळा दिसून येते.

शिक्षण विभाग विविध कारणांनी आजवर चर्चेत राहिलेला आहे. सकाळी १० ते ५ या शासकीय कालावधीत उपस्थित राहणे बंधनकारक असताना कळवण पंचायत समितीच्या शिक्षणाधिकारी दालनाची ही परिस्थिती भयावह दिसून आली. शिक्षण क्षेत्राशी निगडीत उपस्थितांनी या विभागाची करून कहाणी सांगताना कामांच्या पूर्ततेनंतरही स्वच्छतागृहांची उर्वरित पाच टक्के बिले अद्यापही मिळालेली नसल्याचे स्पष्ट केले. शालेय पोषण आहाराची बिलेही वेळेत मिळत नाहीत. वेतन बिले वेळेत सादर होत नसल्याने शिक्षण विभागाशी निगडीत प्रत्येकाचा पगार लांबतो. असेही शिक्षण विभागाशी संबंधितांनी सांगितले.

प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून ई. एन. पवार कामकाज पाहत आहेत. इन्स्पेक्शनच्या नावाखाली शिक्षण विभागाच्या कार्यालयात एकही अधिकारी व कर्मचारी निर्धारित वेळेत दिसून आला नाही. या विभागाचा शिपाई देखील दुपारी चार ते पाच या शासकीय कालावधीत उपस्थित नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. बुधवारचा आठवडे बाजार असल्याने भुरट्या चोरांचाही शहरात धुमाकूळ असतो. शिक्षण विभाग रामभरोसे असल्याने या विभागात असलेले लाखोंचे संगणक, कपाटे, इतर महत्त्वाचे ऐवज हे देखील रामभरोसे होते. याबाबत गांभीर्याने घेतले जाणार का नाही? हा प्रश्न अद्यापही निरुत्तरीतच आहे. जिल्हा परिषद प्रशासन पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारीची नियुक्ती करणार तरी कधी? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गटविकास अधिकाऱ्यास तीन वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश रामजी जेधे यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. दि. ३० जानेवारी २०१० रोजी तक्रारदार यांच्याकडून पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मालेगाव न्यायालयाने त्यांना ही शिक्षा ठोठावली.

तालुक्यातील दहिदी येथील ग्रामसेवक मनोज दिलीप कुमावत हे या प्रकरणी तक्रारदार होते. कुमावत हे २००९ साली सप्टेंबर महिन्यात तब्बेत ठीक नसल्याच्या कारणाने कामावर गैरहजर होते. त्यानंतर ७ डिसेंबर २००९ रोजी कामावर हजर करून घेण्यासाठी त्यांनी टपालद्वारे गटविकास अधिकारी जेधे यांच्याकडे अर्ज पाठविला होता. मात्र, गटविकास अधिकारी जेधे यांनी तक्रारदार यांना कामावर हजर करून घेण्यास टाळाटाळ करीत प्रकरण मिटवण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार कुमावत यांनी एसीबी नाशिक यांच्याकडे याबाबत तक्रार नोंदवली होती. तक्रारीवरून एसीबी नाशिकच्या पथकाने २९ जानेवारी २०१० रोजी येथील पंचायत समिती कार्यालय परिसरात सापळा रचून जेधे यास पंधरा हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले होते. या प्रकरणी येथील कॅम्प पोलिस स्थानकात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा सन १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन मालेगाव न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्यात बुधवारी येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयतील न्यायाधीश एस. एस. खडांगळे यांनी निकाल जाहीर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडीचे सत्र थांबता थांबेना!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड शहरातील जनार्दन स्वामी नगर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून घरफोड्या आणि मोटरसायकल चोऱ्यांचे प्रमाण वाढल आहे. निफाड पोलिसांकडून गुह्याचा तपास गंभीरतेने होत नसल्याने चोरट्यांचे मनोबल उंचावले आहे. चोरट्यांना आळा घालण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

जनार्दन स्वामी नगर येथे राहत असलेले वैनतेय विद्यालयाचे शिक्षक ठोके हे बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्याने कंपाउंडमधील अॅक्टिवा गाडी चोरून नेली. याच भागातील सुभाष खाटेकर यांची डिस्कव्हर ही मोटरसायकल चोरट्यांनी लंपास केली आहे. अॅड. जंगम यांच्या घरीही चोरीचा प्रयत्न झाला. सुरेश राऊत हे गावी गेले असताना त्यांच्या घरीही चोरी झाली. उगाव रोडलगत असलेल्या स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. या एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज असूनही निफाड पोलिसांनी अजूनपर्यंत कोणताही तपास लागू शकलेला नाही.

विशेष म्हणजे ज्या भागात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या होत आहेत, त्या भागात निफाडचे पोलिस उपाधीक्षक दीपक गिरे राहतात. यावरून चोरट्यांचे धाडस वाढले असल्याचे दिसून येत आहे. सोनसाखळी चोऱ्या, घरफोडी, मोटरसायकल चोरी अशा रोजच्या गुन्ह्यांकडे पोलिस दुर्लक्ष करीत असल्याने चोरट्यांचे मनोबल उंचावले आहे. विशेष म्हणजे चोरी केल्यानंतर फिर्याद घेऊन गेल्यास फिर्याद घ्यायची पोलिस टाळाटाळ करतात.

निफाडमधील जनार्दन स्वामीनगर व परिसरात होत असलेल्या चोऱ्यांमुळे रहिवासी भयभीत झाले आहेत. कोणत्याही चोरीचा तपास लागत नसल्याने नागरिक संतप्त आहेत. घरफोडी व वाहनचोरीचे प्रकार वाढले आहेत. तक्रारीही नोंदवल्या जात नाहीत. पोलिसांनी झालेल्या चोऱ्यांचा तपास त्वरित लावावा. चोरट्यांना आळा घालून नागरिकांना दिलासा द्यावा. - देवदत्त कापसे, नगरसेवक, निफाड नगरपंचायत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरणबारी डावा कालव्यासाठी रास्तारोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

गत वीसवर्षांपासून प्रलंबित असलेल्या हरणबारी डावा कालव्याचे काम सुरू करावे, या मागणीसाठी कालव्याच्या लाभक्षेत्रातील ग्रामस्थांनी विचूंर प्रकाशा राज्य महामार्ग मांगीतुंगी फाट्यावर सुमारे चार तास रास्तारोको आंदोलन केले. आता पुढील आंदोलन नाशिक येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर करण्यात येणार आहे.

बागालण तालुक्यातील हरणबारी डावा कालवा तत्कालीन युती सरकारच्या काळात मंजूर झाला आहे. त्याला गती देण्यात आली. मात्र, त्यांनतर ही कामे लालफितीच्या कारभारात अडकल्याने हा प्रश्न आजही प्रलंबित आहे. या कामासाठी दरेगाव, नांदीन, पिंपळकोठे, वाडीपिसोळ, राजापूर, कातरवेल, दसवेल गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांगीतुंगी फाट्यावर अगोदर रास्तारोको आंदोलन छेडले असता आश्वासनापलिकडे काही मिळाले नाही. परिसरातील शेतकरी व महिला भगिनींनी बुधवारी ठिय्या आंदोलन केले असता माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रशांत पाटील यांच्या चर्चेअंती आंदोलनकर्त्यांनी नाशिक येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख, सुभाष नंदन, भाजपा नेते प्रदीप कांकरिया, काँग्रेस तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया, प्रवीण पवार, भाऊसाहेब अहिरे, जगदीश पवार, आबा बच्छाव, पंकज भामरे, नितीन भामरे, केवळ भामरे, सुंनदा पवार, सविता पवार, संगिता सोनवणे आदींसह शेकडो शेतकरी व महिला सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिलिंडरमधून खुलेआम गॅसचोरी!

$
0
0

कॅनडा कॉर्नर परिसरातील एका गॅस वितरकाचे सिलिंडरचे गोडाऊन गंजमाळ परिसरात आले. त्या गॅस वितरकाकडे काम करणाऱ्या 'डिलिव्हरी बॉय'कडून सिलिंडरमधील गॅस काढण्याचा जीवघेणा खेळ दररोज केला जात असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. एका ‌सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये साध्या नळीने आणि बेकायदेशीरपणे गॅसची देवाणघेवाण केली जात आहे. भर नागरी वस्तीत होत असलेल्या या प्रकारामुळे रहिवाशी धास्तावलेले आहेत. मुळात गॅसची देवाणघेवाण करणे बेकायदेशीर आहे. तसेच अशी देवाणघेवाण नाग‌री वस्तीत करणे अतिशय घातक आहे. विशेष म्हणजे गॅससोबत असा खेळ करीत असतांना निव्वळ एक साधी नळी वापरली जात आहे. अशा परिस्थितीत काही दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सिलिंडरमधील गॅस वाहनांमध्ये भरला जातो. गॅस पंपांपेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या सिलिंडरमधील गॅसची खरेदी करण्यासाठी अनेक वाहनचालक येथे येतात. या प्रकाराला आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दुर्घटनेची धास्ती दोन महिन्यांपूर्वी सिलिंडर गोडाऊन जवळील भंगार दुकानाला आग लागली होती. मात्र, अग्निशमन दलामुळे अनर्थ टाळण्यात यश आले होते. गेल्या महिन्यात मुंबईतील कांदिवली भागात सिलिंडरचा साठा असलेल्या झोपडपट्टी भागात आग लागली होती. तशी घटना गंजमाळ भागात गॅस काढण्याच्या माध्यमातून होऊ नये अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पोलिस चौकीला कायम कुलूप गंजमाळ पोलिस चौकीच्या जवळच सिलिंडरमधून गॅस काढला जातो. यात कोणतीही सुरक्षितता बाळगली जात नाही. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या प्रकाराला आळा घालण्याची नागरिकांना अपेक्षा असतांना पोलिस चौकीच बंद असल्याने दाद मागावी तरी कुठे आणि दुर्घटना घडल्यास जबाबदार कोणाला धरावे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोंगळ्यांमुळे तलाव अर्धा रिकामाच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला दौऱ्यावर आलेल्या माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी मंगळवारी दुपारी येवला शहराला पाणीपुरवठा केला जाणाऱ्या नगरपालिकेच्या गंगासागर साठवण तलावास भेट देत पाहणी केली. शेतकऱ्यांनी कालव्यात डोंगळे टाकल्याने एरवी तीन दिवसात भरणारा तलाव सहा दिवस उलटूनही पूर्ण भरू शकलेला नाही.

येवला नगरपालिकेच्या शहरानजीकच्या गंगासागर साठवण तलावात सध्या पालखेड पाटबंधारेतर्फे सोडलेल्या पिण्याच्या पाण्यासाठीचे आवर्तन सुरू आहे. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी अन् नगरसेवकांसमवेत भुजबळांनी यावेळी साठवण तलावात पालखेडच्या आवर्तनातून सध्यस्थितीत पोहचलेले एकूण पाणी आदींचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी साठवण तलावात श्रीफळ अर्पण करत पूजन केले.

येवला शहरासाठी सोडण्यात आलेल्या या आवर्तनातील पाणी गेल्या आठवड्यातील गुरुवारी सकाळी गंगासागर साठवण तलावाच्या मुखाशी पोहचले होते. एरवी तलावात पाणी भरण्यास सुरुवात झाल्यानंतर हा ५० दशलक्ष घनफूट क्षमतेचा पाणी साठवण तलाव जवळपास तीन दिवसात भरला जातो. मात्र, यावेळेस तब्बल सहा दिवस उलटले तरी अद्याप साठवण तलाव अवघा ५० टक्केच भरला आहे. पालखेड डाव्या कालव्याच्या मार्गावर अगदी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी डोंगळे टाकत अनधिकृतपणे सर्रास सुरू केलेला पाणी उपसा यामुळे पाण्याचा विसर्ग कमी होताना हा साठवण तलाव भरण्यास विलंब होत आहे.

साठवण तलाव पूर्ण भरण्यास अजून किती दिवस लागतील, येवला शहरासाठी पुढील काळात किती पाणी लागेल आदी माहिती यावेळी भुजबळांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून प्राप्त करून घेतली. पालखेडचे पुढील आवर्तन मिळेपर्यंत सध्या मिळालेले पाणी वापरायचे असल्याचे लक्षात घेऊन शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य नियोजन करा, अशा सूचना यावेळी आमदार भुजबळ यांनी नगरपालिका प्रशासनाला केल्या.

यावेळी नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे, नगरसेविका उषा शिंदे, पाणीपुरवठा सभापती पद्मा शिंदे, नगरसेविका भारती येवले, राजश्री पहिलवान, नगरसेवक बंडू क्षीरसागर, मुश्ताक शेख, पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता जनार्धन फुलारी आदी उपस्थित होते. दरम्यान, येत्या तीन दिवसात गंगासागर साठवण तलाव पूर्ण भरण्याचा अंदाज पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images