Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सिंधी समाजातर्फे ‘लाललोई’चे दहन

$
0
0

सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचे जिल्हा सखी संगतच्या जिल्हा सचिव अंकिता कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली 'लाललोई'चे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्षा रितिका कलानी, उपाध्यक्षा मधू बोधानी, जनरल सेक्रेटरी दीपा चंगरानी, खजिनदार नेहा चावला, नाशिकरोड सचिव प्रिया साधवानी आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी सिंधी भगिनींसाठी तंबोला खेळाचे तर वेशभूषा व पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वेशभूषा स्पर्धेत बरखा कटारिया, पाककला स्पर्धेत भावना नागदेव, तृप्ती कलाल या विजेत्या ठरल्या.

सूर्यास्तानंतर महिलांनी एकत्र येत पंचायत हॉलच्या प्रांगणात लाकूड, गोवऱ्या, रेवड्या इ. सामग्री ​जमा करून ​'लाललोई'चे पूजन केले. यानंतर 'लाललोई'चे विधिवत पद्धतीने दहन करण्यात आले. त्यामध्ये तीळ, गजक (डिंक) गुळ, शेंगदाणे, मुरमुरे, मक्याचे दाण्याचे पोहे नैवैद्य म्हणून अर्पण केला. उरलेला प्रसाद म्हणून वाटप​ करण्यात आले. या 'लाललोई'ला महिलांनी प्रदक्षिणा मारल्या.

कार्यक्रमात हरीश कटारिया यांनी सिंधी भगिनींना समाजाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. देवी लखमियानी यांनी सूत्रसंचालन केले तर रचना कारडा यांनी आभार मानले.

कार्यक्रमास देवी वालेचा, राणी इसरानी, विणू वासवानी, वनिता शर्मा, हेमा ओछानी, पद्मा मगनानी, वंदना मगनानी, हेमा ग्यानचंदानी, प्रिया रिजवानी, मोनिका कटारिया आदींसह नाशिक जिल्हा सिंधी सखी संगत ट्रस्टच्या भगिनी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ओतूर धरणाच्या कामाला गती द्या’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

बहुचर्चित ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे. या प्रकल्पाच्या कामाला गती मिळावी, अशी मागणी शिरसमणी, ओतूर, कुंडाणे, भुसणी, दह्याणे, कळवण खुर्द, नरूळ आदी वीस गावातील शेतकरी बांधवांनी शिरसमणी येथे पाणी परिषदेत केली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी माधवराव वाघ होते. ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या कामाला गती मिळण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना भेटणार असून, या प्रश्नी लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी दिली.

नितीन पवार पुढे म्हणाले की, माजी आमदार ए. टी. पवार यांनी प्रशासकीय मान्यता मिळवली असल्याने या धरणाचे काम आपणच पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. मागील निवडणुकीत आपल्याला ओतूर येथे घेराव घातला होता. त्यावेळी ओतूर प्रकल्पाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. पाणीप्रश्नावर सर्वांनी राजकीय मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस संजय वाघ म्हणाले की, पाणीप्रश्नाची जाण माजी आमदार ए. टी. पवार यांना होती. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये फिरलो कळवणसारखे रस्ते, धरणे, सिंचन व्यवस्था व विकास कुठेच दिसून आला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी आमदार जे. पी. गावित यांचे नाव ने घेता टीका केली. कळवण तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, तरी आमदारांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कळवण तालुक्याला वेठीस धरले असून, जनता माफ करणार नाही, असा इशारा देवून कळवण तालुक्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद गटात विकास करणाऱ्या जयश्री पवार, नितीन पवार, रवींद्र देवरे यांच्‍या पाठीशी उभे राहा, असे आवाहन त्यांनी केले.

शेतकरी बांधवांमध्ये नाराजी

ओतूर लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याला गळती लागली. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी गळून जात असल्याने या प्रकल्पाचा या परिसरातील जनतेला फायदा होत नव्हता. शिवाय प्रकल्पावर खर्च झाल्यावर त्याच्या दुरुस्तीकरण्यासाठी शासनस्तरावर अडचणी निर्माण होत असल्याने कित्येक वर्षांपासून या प्रकल्पाच्या दुरुस्तीचे घोंगडे भिजत पडले होते. या कामाची निविदा निघून ठेकदार निश्चित झाला तरी कामाला गती मिळत नसल्याने ओतूरसह वीस गावातील शेतकरी बांधव कमालीचे नाराज आहेत. ओतूर प्रकल्पाचे काम मार्गी लावा, असे साकडे या भागातील शेतकरी बांधवांनी या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांना घातले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उर्दू शाळेला आयएसओ प्रमाणपत्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे लोन मोठ्या शहरांकडून लहान शहराकडे आणि अगदी गावातसुद्धा पोहचले आहे. त्यामुळे सातत्याने मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात आल्याची ओरड होते आहे. मराठी शाळांबाबतीत असे चिंताजनक वातावरण असताना मालेगाव शहरातील किनो एज्युकेशन सोसायटी संचलित रमजानपुरा भागातील उर्दू शाळा ही जिल्ह्यातील नव्हे तर बहुधा उत्तर महाराष्ट्रातील आयएसओ प्रमाणपत्र मिळविणारी पहिली शाळा ठरली आहे.

मालेगाव शहरात उर्दूभाषिक मोठ्या संख्येने आहेत. यंत्रमाग कामगारांना नेहमीच संघर्षमय जीवन व्यथित करावे लागत असताना शहरात उर्दू भाषेतून दर्जेदार शिक्षणाची तर वानवाच. अशा परिस्थितीत किनो एज्युकेशन संस्थेचे संस्थापक रईस शेख यांनी शहरातील यंत्रमाग कामगारांच्या मुलांना त्यांच्याच मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्दात हेतूने शहरातील रमाजानपुरा भागात २००० साली भाड्याने घेतलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पहिली उर्दूशाळा सुरू केली. मालेगावतील शैक्षणिक क्षेत्रात संस्थेच्या पाच शाळांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात नावलौकिक मिळवला. यातील रमजानपुरा भागातील उर्दू शाळा आयएसओ प्रमाणपत्र मिळवणारी पहिली शाळा ठरली आहे.

या शाळेत परिसरातील यंत्रमाग कामगारांची एक हजाराहून अधिक मुले मोफत शिक्षण घेत आहेत. बदलत्या युगात या शाळेने येथील मुलांना ई लर्निंगचे धडे देखील द्यायला सुरुवात केली आहे. संपूर्ण शाळेत स्मार्ट बोर्ड, प्रशस्त कॉम्प्युटर दालन, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. अत्यंत अल्पखर्चात शाळा डिजिटल करण्याचे खास किनो डिजिटल स्कूल मॉडेल देखील विकसित करण्यात आले आहे. संस्थेच्या याच कार्याची दखल घेत शाळेला आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

सहकार राज्यमंत्री दादा भुसे, गटशिक्षणाधिकारी बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक रियास खान, अजिज खान व शिक्षकवृंद यांच्याकडे हे प्रमाणपत्र समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा सर्वत्र बोलबाला असताना आम्ही जाणीवपूर्वक उर्दू भाषेतून मुलांना शिक्षण देत आहोत. त्यासाठी लागणारे शैक्षणिक साहित्यदेखील निर्माण केले जात आहे. संस्थेच्या उर्दू शाळेला आयएसओ प्रमाणपत्र मिळणे हे आमच्या शैक्षणिक प्रयत्नांना प्रोत्साहन देणारे आहे. - रईस शेख, संस्थापक, किनो एज्युकेशन सोसायटी

यंत्रमाग कामगारांच्या मुलांना या उर्दू शाळेतून मिळणाऱ्या शिक्षणाने आम्ही समाधानी आहोत. मुलांच्या गुणवत्ता विकासासाठी शाळेकडून विविध उपक्रम राबविले जातात. मुलांना शाळेत संगणकावर शिक्षण मिळत असल्याने त्यांना गोडी निर्माण झाली आहे. - अन्सारी मेहमूद, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयएलओ’चा चळवळीला पाठिंबा

$
0
0

श्रीधर देशपांडे

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला ६८ वर्षे झाली. या काळात सामाजिक, आर्थिक क्षेत्रात विविध बदल, स्थित्यंतरांना अनुसरून स्वाभाविकच कामगार चळवळीतही वेळोवेळी टप्प्याटप्प्याने बदल झाले. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला उद्योग, सार्वजनिक क्षेत्र, सरकारी कार्यालय आदींमध्ये कामगारांना संघटित करून पीएफ, पेन्शन, बोनस इत्यादी मागण्या, करार आदींमध्ये संघटना विशेषतः कार्यरत राहिल्या. करार, लाभ यामध्ये चळवळीने यश मिळविले. त्यामधून चळवळीला आकार व स्थैर्य लाभले. चळवळीने अशा विशिष्ट मार्गावरून दीर्घकाळ यशस्वीपणे वाटचाल केली.

अशा काही टप्प्यांमधून चळवळ आज जात असतांना त्यामध्ये दोन महत्त्वाचे अमूलाग्र बदल झाले. पैकी एक म्हणून असंघटित कामगार आणि कंत्राटी कामगार निर्माण होणे. त्यांची संख्या कोटींमध्ये म्हणजे तब्बल ९० टक्क्यांहून जास्त आहे. त्याची कारणमीमांसा समजण्यासारखी आहे. अत्यल्प वेतनात व वार्षिक वेतनवाढ, पेन्शनसारख्या कुठल्याही लाभांची जबाबदारी नाही. त्यामुळे या गोष्टींमध्ये मालक, उद्योजक, व्यवस्थापन या सर्वांची आर्थिक बचत करण्याची सोय असते. सरकारही याला अपवाद नाही. सरकारचे धोरण कामगारविरोधी राहिली आहेत. कामगारांचे खूप हाल होत आहेत. ही गोष्ट या धोरणात अपरिहार्य व उघड आहे. त्याच्या विश्लेषणाची गरज नाही.

या बदलाचा पुढचा भाग म्हणजे कामगार कष्टकऱ्यांमध्ये काही वर्षात प्रवेश केला तो महिला कामगारांनी. मोठ्या वेगाने महिला कामगारांची संख्या वाढत आहे. तो एक स्वतंत्र व मोठा घटक म्हणून निर्माण झाला आहे. या असंघटित घटकावर स्वतंत्र अभ्यासपूर्ण टिपण्णी आवश्यक आहे.

महिला कामगार ढोबळमानाने तीन चार घटकात विभागता येतील. उद्योगांमधील कंत्राटी कामगार, सरकारच्या योजनांमधील योजना कामगार आणि तीन घरेलू कामगार (मोलकरणी). त्यांच्यावर होणाऱ्या प्रचंड अन्यायामुळे देशातील प्रमुख कामगार संघटना त्यांना संघटित करण्यासाठी कष्ट घेत आहेत. त्यांची सतत आंदोलने उभी करीत आहेत. देशात सरकार विविध योजना राबवित आहे. त्यामध्ये अंगणवाडी, मध्यान्ह भोजन, पाडा शिक्षक, आशा वर्कर्स (आरोग्य) अशा सेविका मोडतात. त्यांच्याकडून सर्वसाधारण नोकरवर्गाप्रमाणे सेवा करून घेतली जाते. पण त्यांना वेतन म्हणून मिळतच नाही. त्या अल्प मानधनावर नेमल्या जातात. घरेलू कामगार घरोघर परिचित आहेत. त्यांना क्वचितच समाधानकारक वेतन (मानधन) मिळते. चार ते पाच ठिकाणी दिवसभर काम करून त्यांना मिळणारी एकूण रक्कमही अत्यल्पच ठरते. दोन्ही तिन्ही या प्रकारच्या या असंघटित महिला हाल अपेष्टांचे कष्टमय जीवन जगतात. खूप काम करून संसाराला हातभार लावून कसाबसा संसार ओढत असतात.

तीच कहाणी योजना महिला कामगारांची आहे. ऊन-पावसाची पर्वा न करता त्यांना पायपीट करावी लागते. सरकारला याची कल्पना नाही वा नसेल असे कोणी म्हणू शकेल का? पण मानधन अतिशय तोकडे! इतर सवलती नाहीच. अधिक तपशील बघा कामगार चळवळ, योजना कामगार, घरेलू कामगार व सर्व महिला कामगार त्यांच्या अन्यायाविरूद्ध आक्रोश करीत मोठमोठी आंदोलने, संप अनेक वर्षे करीत आहे. त्यावर विचार करण्याऐवजी सरकारने उलट या तथाकथित योजनांवरच्या बजेटमधील तरतुदीमध्ये मोठी कपात केली. सरकारजवळ पैसे नाहीत हे कारण दिले. पण त्याचवेळी सरकारने कार्पोरेट घराण्यांना मात्र सुमारे पावणे सहा लाख कोटींच्या सवलती दिल्या. हा किती अघोरी अन्याय? तोही महिला कामगारांवर!

खरे म्हणजेच आर्थिक वेतनाखेरीज महिला इतर मूलगामी प्रश्नांसाठीही आक्रोश करीत आहेत. बाळंतपणाची रजा, पाळणाघर, कामाच्या ठिकाणी अत्याचार, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, स्वतंत्र प्रसाधनगृह, रात्रपाळी इत्यादी प्रश्नांवर सरकारसकट सर्वजण उदासीन आहे. आता बघा या मागण्यांना कोणकोणता महत्त्वाचा पायाभूत आधार आहे. मानवी हक्क अधिकार संरक्षण नियम म्हणते - उपजीविकेचे पर्याप्त साधन मिळण्याचा अधिकार स्त्री व पुरूष नागरिकांना समान असावा. (जाहीरनामा, १४)

जागतिक महायुद्धानंतर जागतिक शांती, संरक्षण या विचारांमधून संयुक्त राष्ट्र (यूएन) जन्माला आले. यूएनतर्फे इतर संस्थांबरोबर १९१९ मध्ये आंतरराष्ट्रीय श्रम संघटना (आयएलओ) स्थापन करण्यात आली. कामाच्या ठिकाणी मानवता व न्यायाच्या आधारावर पुरूष-स्त्री कामगार, सर्वांसाठी चांगले वातावरण, परिस्थिती असले पाहिजे, असे 'आयएलओ'चे उद्दिष्ट आहे. तेव्हापासून कामगारांच्या हितसंरक्षणासाठी त्यांची वार्षिक संमेलने होतात. निरनिराळ्या देशांच्या मंजुरीसाठी ती पाठविली जातात. त्यामधील संमेलनाने (कन्व्हेनशन्स) कामगारांना पसंतीचे युनियन करणे, सामुदायिक सौदेबाजी, बाल कामगार पद्धतीचे निर्मूलन, घरेलू कामगारांना कामगारांचा अधिकार इत्यादी देण्यात आले आहेत. ते (रॅटीफिकेशन) वेळोवेळी सर्व देशांमध्ये मंजुरीसाठी पाठविण्यात आले. बहुसंख्य सदस्यांनी हे निर्णय मंजूर केले पण आपल्या भारताने अद्याप नाही. देशातील सप्टेंबर २०१३ ची दिल्ली बैठक 'आयएलओ'च्या अधिकाऱ्यांच्या समवेत झाली. त्यामध्ये वरील ठराव मंजुरीसाठी एकमताने आग्रह झाला. शिवाय त्यानंतर अनेक देशव्यापी संप व चळवळ झाली. पण सरकार अजूनही उदासिन आहे, किमान वेतनही देण्यात येत नाही. जगातील मोठी लोकशाही म्हणून आपला देश ओळखला जातो. तेव्हा सरकारने या प्रश्नांकडे गांभिर्याने पाहणे निकडीचे आहे.

(लेखक कामगार चळवळीतील ज्येष्ठे नेते आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अपघातात जखमींना मदत करावी, असे प्रतिपादन पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी केले.

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात २७ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. तहसीलदार डॉ. एस. एन. कोळी, प्राचार्य डॉ. आर. के. देवरे, डॉ. उज्ज्वला देवरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुधाकर मोरे, सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. कांचन वानेरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर. के. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाहतूक नियमांच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

या अभियानानिमित्त विद्यार्थ्यांसाठी पोस्टर, वक्तृत्व, शोधनिबंध स्पर्धा घेण्यात आली होती. तहसीलदार डॉ. कोळी म्हणाले की, आपल्यामुळे दुसऱ्याला इजा होणार नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल. यावेळी मोरे, डॉ. देवरे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. विकेश अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अनिल कदम यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशमुख मराठा समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाज संघटन व त्यातून चांगले उपक्रम राबविणे हे देशमुख मराठा समाजाचे कार्य स्तुत्य असून, मनपाच्या वतीने आयोजित स्मार्ट सिटी उपक्रमातही सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले. देशमुख मराठा समाजाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.

नाशिकमधील श्री कालिकामाता मंदिर सभागृहात नाशिक जिल्हा देशमुख मराठा समाजाच्या वतीने आयोजित दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व वधू-वर परिचय मेळावा या कार्यक्रमात डॉ. गेडाम बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष प्रतापराव देशमुख होते. यावेळी व्यासपीठावर महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी गिरीश देशमुख, भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, माजी नगरसेवक दत्ता पाटील, सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल देशमुख, कार्याध्यक्ष शैलेंद्र तनपुरे, उपाध्यक्ष रघुनाथ सोमवंशी, परमानंद कोठावळे, निफाडच्या उपनगराध्यक्ष सुनिता कुंदे, सरचिटणीस राजेंद्र देशमुख, चिटणीस अशोकराव देशमुख, फकीरराव देशमुख आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक उपाध्यक्ष रघुनाथ सोमवंशी यांनी केले. पाहुण्यांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले. समाजाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती राजेंद्र देशमुख यांनी दिली. यानंतर आयोजित वधू वर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र शेळके यांनी केले. विक्रम देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीततेसाठी तुषार देशमुख, राजाराम देशमुख, उल्हासराव देशमुख, उदय देशमुख, मंगला दळवी, भक्ती कोठावळे, दादासाहेब देशमुख, भैय्यासाहेब देशमुख, प्रशांत देशमुख यांनी परिश्रम घेतले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पादचाऱ्यांचे मूलभूत हक्क जपा...

$
0
0

मुजोर रिक्षाचालक आणि बेफिकीर मोटरसायकलस्वार यांचे रस्त्यांवरील तांडव यांचे यथार्थ चित्रण महाराष्ट्र टाइम्स सातत्याने मांडते आहे. नाशिककर घराबाहेर पडतो तेव्हा तो सुखरूप घरी परतेल की नाही याची खात्री नसते.

बऱ्याच अपघातांची नोंदच होत नाही. असे अपघात सिग्नलवर रस्ता ओलांडताना होतात किंवा सिग्नलजवळच्या भागात. सीबीएस येथील सिग्नलचा अपवाद सोडला तर अन्य कोठेच शिस्त पाळली जात नाही. पोलिस असो अथवा नसो वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. नियम मोडण्यात सीटी बसेसही पुढे असतात. प्रत्येक सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग, सफेद पट्टे, कोठे थांबावे याबाबतचे फलक असायला हवेत. परंतु ते नसतात. ते बसविणे आवश्यक आहे. नगरसेवकांनी आपापल्या भागात त्यासाठी पुढाकार घेतला तरी वाहतुकीच्या नियमनास मदत होऊ शकते. नियम समजावून सांगणे हे पोलिसांचेच काम आहे. ते मुजोर वाहनचालकांना वठणीवरही आणू शकतात. सिग्नलवर कोणते नियम पाळले गेले पाहिजेत हेच नागरिकांना माहित नाही. यासाठी जनजागृतीची गरज आहे. पादचाऱ्यांनाही सुरक्षितपणे रस्ता ओलांडणे त्यामुळे शक्य होईल.

बऱ्याच ठिकाणी चौकात सिग्नल नसतात. काही ठिकाणी रस्ता क्रॉसिंग भरपूर असते. अशा ठिकाणी देखील नगरसेवक स्वखर्चाने अथवा इतरांच्या मदतीने बऱ्याच गोष्टी करू शकतात. रस्त्यांवर पांढरे पट्टे मारणे, त्यावर रात्रीच्या वेळी झगमगीत उजेड पाडणे, सौरशक्तीवरील पिवळा दिवा लावणे, अशा गोष्टी सहज शक्य आहे. अशा ठि‌काणांहून सर्वच वाहनांनी हळू जाणे आणि पादचाऱ्यांना प्रथम रस्ता ओलांडू देणे अपेक्षित असते. पादचाऱ्यांनी देखील चालण्याची शिस्त पाळली पाहिजे. योग्य ‌ठिकाणांहून आणि योग्य पध्दतीनेच रस्ता ओलांडला गेला पाहिजे. रस्ता सर्वांचा असतो, कोणा एकाच्या मालकीचा नसतो. याचे भान ठेवले गेले पाहिजे.

विरुध्द बाजूने वाहन चालविणे हे मोटरसायकलस्वार आणि रिक्षाचालकांचे आवडते काम. यात सर्वच अग्रेसर असतात. बरे, असे नियम मोडताना शरमही बाळगली जात नाही हे विशेष. मग पादचाऱ्यांनी याबाबत जाब विचारला तर वाद निर्माण होतात. पोलिस कठोर बनले तर हे थांबविणे शक्य

आहे.

बरेच मोटरसायकलस्वार दुभाजकाच्या बाजूने मोठ्या वाहनांना ओव्हरटेक करतात. हे चुकीचे आहे. अन यात धोकाही खूप आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसही अशाप्रकारे जोखमी पत्करताना दिसतात.

रिक्षा आणि मोटरसायकलस्वारांना लेनची शिस्त काय असते हे माहितच नाही. वाहन खरेदी करण्याची ऐपत आली पण ते चालविण्याची अक्कल आलेली नाही. कोठूनही वाकडे ‌तिकडे वाहन चालवित लेन तोडायची अन अन्य वाहनचालकांच्या अपघातास कारणीभूत ठरायचे असे प्रकार वारंवार घडतात. विशेष म्हणजे वाहनधारकांना हे कौशल्याचे काम वाटते. मोठ्या वाहनांनी दुभाजकाच्या बाजूने चालावे तर छोट्या वाहनचालकांनी रस्त्याच्या कडेने चालावे जेणेकरून अपघात होणार नाहीत. अल्पवयीन मुलांनी वाहने चालविण्यावर बंधने आलीच पाहिजेत. प्रचंड वेगात आवाज करीत वाहने चालविणाऱ्यांवरही अंकुश असायला हवा. पालकांनी याबाबतची काळजी प्रामुख्याने घ्यायला हवी. शेवटी लगाम महत्त्वाचा.

प्रकाश ठोंबरे, नाशि‌करोड


ज्येष्ठांना संधी का नाही?

ट्रॅफिक बाबत बेशिस्तपणाचे दर्शन घडविणारे नाशिककर, निष्क्रीय पोलिस, डेंजरस मोबाइल पीपल, शोभा वाढविणारे सिग्नल्स, स्पीड ब्रेकर्स, याबाबत वर्तमान पत्रांतून बरेच उद्बोधक लिखाण गेली काही वर्ष सातत्याने प्रसिध्द होत आहे. परंतू त्यापासून बोध घेण्याची ना नाशिककरांची इच्छा आहे ना पोलिसांची. रोज स्व: म्हणून अपघातांमध्ये मनुष्य प्राण्याची आहुती पडतेच आहे. या सर्वांना काही मानवनिर्मित म्हणजे सुलतानी संकटही मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत. सर्व रस्ता म्हणजे आपलीच जहागिरी असल्यासारखे वावरायचे. समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारावा तसे रस्त्याने पायी चालायचे, मोबाइलशी चाळा करत, कधी साखळी करून, तर कधी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून सिग्नलचे भान न ठेवताच कुटुंब कबिल्यासह अनेकजण रस्ता ओलांडताना दिसतात. स्वत:ला सुलतान समजत बाइक चालविणारे, ३-४ जण बाइकवर बसणारे, शिड्या, बांबू, होर्डिंग्जपर्यंत बऱ्याच वस्तू बाइकवरून नेणारे, अनेक पिशव्या बाइकला लटकवणारे, पाच सात फुटापर्यंत बाहेर डोकावणारे, लोखंडी तसेच लाकडी सामान नेणारे टेम्पो, नादुरूस्त व प्रचंड आवाज करणारी वाहने, ब्रेक न लागणारी वाहने, इंडिकेटर न देता वळणारी वाहने, मंगल कार्यालये, हॉटेल्स, सोसायट्या येथे वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्ताने आलेली व जागा मिळेल तेथे वाट्टेल तशी उभी केलेली वाहने, समोरून मित्र मैत्रिणी येताना दिसताच कोणाचीही पर्वा न करता झटकन वळणाऱ्या बाइक, हाय हॅलो करणारे टपोरी, कधीही गिरकी घेणारा रिक्षावाला आणि कहर म्हणजे दुचाकी, चारचाकी, रिक्षावाले, बस प्रवासी इतकेच नव्हे तर कारचा दरवाजा उघडून रस्त्यांवर पिंक टाकून नक्षीकाम करणारे नाशिककर शहरात रोजच नजरेस पडतात.

यामध्ये पोलिसांची भूमिका अशी की १०० टक्के दोष न देता निष्क्रीय या विशेषणानेच यांचा गौरव करणे उचित ठरेल. सध्या लाचखोरीत क्रमांक दोनवर असलेले व क्रमांक एकवर येण्यासाठी जीवापाड मेहनत घेत असलेले, चिरीमिरीसाठी प्रसिध्द पोलिस असा अनुभव नाशिककर रोजच घेत आहेत. नवीन भरती होणारे अधिकारी व पोलिस त्यांचीच री ओढण्यात धन्यता मानत असल्याचे खेदजनक वास्तव आहे. आपल्या मूळ कर्तव्यापासून यांनी फारकत घेतली असून त्यांच्यातील इच्छाशक्तीचा केव्हाच अंत झाला आहे.

ज्येष्ठांना काही अधिकार देऊन त्यांची मदत घ्या असे आवाहन आम्ही वारंवार केला मात्र ही खाकी वर्दीवाली मंडळी ढिम्म हालायला तयार नाही. केवळ दिखावा म्हणून एक दिवस वाहतूक नियमनासाठी विद्यार्थ्यांची मदत घेणे चांगले की कुठल्याही स्वार्थाशिवाय सातत्याने मदत करण्यास आग्रही असणाऱ्या ज्येष्ठांची मदत घेणे चांगले हा खरा प्रश्न आहे. बेशिस्त नाशिककरांना शिस्त लावून रोजची प्राणहानी टाळण्यापेक्षा कागदपत्रांची पूर्ततेसारख्या निरर्थक आणि लाचखोरीला प्रोत्साहन देणाऱ्या अनुत्पादक बाबींकडेच खाकी मेंदूवाल्यांचे बारीक लक्ष असते. वरील उल्लेखलेल्या बाबींकडे यांनी बारकाईने लक्ष देऊन कारवाई करण्याचे ठरविले तर त्यांची पंचाईत होईल. हेच त्यांच्या क्रमांक एकीकडे कूच करण्यामधील अडथळ्यांचे कारणही ठरेल. पोलिस आयुक्तांनी वाहतूक नियमनासाठी ज्येष्ठांची मदत घेऊन पहावी. विद्यार्थ्यांची मदत घेता तसा हा प्रयोग करायला देखील काय हरकत आहे.

दिलीप देशमुख, ज्येष्ठ नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी साहित्याच्या दर्जाबाबत संमिश्र सूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठी साहित्य पूर्वीही दर्जेदार होते व यापुढेही दर्जेदार राहील, पण सध्या मराठीत दर्जेदार साहित्य निर्मिती होत नसल्याची खंत काही साहित्य‌िकांनी व्यक्त केली. सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने ग्रंथालय सप्ताहाच्यानिमित्त आयोजित केलेल्या परिसंवादात मराठीत दर्जेदार साहित्य निर्मिती मंदावली आहे या विषयावर सम‌िश्र प्रतिक्रिया उमटली.

परिसंवादात अंतर्नादचे संपादक भानू काळे, राजहंस प्रकाशनचे सदानंद बोरसे, जनशक्ती वाचक चळवळीचे श्रीकांत उमरीकर सहभागी झाले होते. परिसंवादाचे सूत्रसंचलन स्वानंद बेदरकर यांनी केले. श्रीकांत उमरीकर म्हणाले की, 'या परिसंवादाचा सूर असा होतो की, या अगोदर मराठीत दर्जेदार साहित्य निर्मिती सुरु होती, असा होतो. मराठी साहित्य हे शहरात पोहचत नसून ग्रामीण भागात याला चांगला वाचक मिळतो आहे. लेखकांना पोषक असे वातावरण निर्माण होण्याची गरज आहे. पुस्तकांच्या बाजारपेठेला गळती लागली असून, ती विकस‌ित होण्याची गरज आहे. त्यामुळे मराठीत दर्जेदार साहित्य निर्मिती मंदावली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सदानंद बोरसे म्हणाले,'श्रीकांत उमरीकर त्यांच्या विचाराशी मी सहमत नाही, साहित्याची गुणवत्ता मंदावलेली नाही. आपले साहित्य 'जैसे थे' व ठणठणीत आहे. जगात सर्वाध‌िक ३० भाषा बोलल्या जातात त्यापैकी मराठी ही १३ वी भाषा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर भानू काळे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डेजवर भाईगिरीचे सावट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील जुन्या कॉलेजेसपैकी एक असणाऱ्या बीवायके कॉलेजच्या सांस्कृतिक उपक्रमांना यंदा मात्र भाईगिरीचे ग्रहण लागले आहे. जानेवारीच्या सुरुवातीच्या कालावधीत आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि डेजच्या धम्माल वातावरणाला बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही धुडगूस घालणाऱ्या तरुणाईच्या दंगलीचे गालबोट लागले.

बीवायकेसह विविध कॉलेजेसमध्ये सद्यस्थितीत विविध उपक्रम पार पडत आहेत. विविध संकल्पनांवर सादरीकण करीत डेजही येथे साजरे करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना खुल्या करून दिल्या जाणाऱ्या या व्यासपीठाचा गैरवापर कॅम्पसमधील कुप्रवृत्तींकडून वाढीला लागत आहे. परिणामी, या उपक्रमात विद्यार्थिनींचा सहभाग आणि त्यांच्या सुरक्षेविषयीही पालकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कॉलेज प्रशासनाने या उपक्रमांच्या कालावधीत स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था उभारावी. पोलिस यंत्रणेनेही शहरातील कॉलेजेसमध्ये पेट्रोलिंगला सुरुवात करावी, अशी मागणी पालक आणि विद्यार्थी संघटनांकडून होत आहे.

कॉलेज रोडवरील टवाळखोरांनीही काही दिवसांपासून पुन्हा डोके वर काढले आहे. गत महिन्यात बीवायकेच्या गेटवर विद्यार्थिनींच्या दोन गटात झालेली फ्री स्टाईल चर्चेचा विषय ठरली होती. या पाठोपाठ गेल्या आठवड्यापासून बीवायकेमध्ये डेज साजरे करण्यात येत आहेत. यात सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीनही दिवशी बीवायकेच्या कॅम्पसमध्ये टोळक्याने उपद्रव घालून उत्साहाच्या वातावरणाला भयाचे गालबोट लावलेे. आपसातील वादाचे पर्यवसन हाणामारीत अन् एकमेकांना जखमी करण्यात झाल्याने सलग तीन दिवसापासून बीवायकेच्या कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण आहे. याबाबत प्राचार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

बीवायकेमध्ये साडी आणि टाय डेचे सेलिब्रेशन सुरू असताना एकट्या तरुणास २५ ते ३० टवाळांच्या जमावाने दुपारी दीडच्या सुमाराला केलेली मारहाणही कॅम्पसमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. मुलींच्या छेडछाडीचे प्रकारही येथे वाढीला लागले आहेत. तीन दिवसापासून हाणामारीचे प्रकार होत असले तरीही टवाळांना अटकाव घालण्यासाठी पुरेश्या सिक्युरिटीजचा अभाव, ताबडतोब कॉलेज बंद करण्याचा काढण्यात आलेला तोडगा या प्रकारांमुळे कॅम्पसमधील विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण होत आहे. शहरातील सर्वच कॉलेज कॅम्पसमध्येही पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून जोर धरत आहे.
पोलिसांची डोळेझाक

गोखले कॅम्पसच्या गेटबाहेर सातत्याने धुडगूस सुरू असतो. या परिसरात बहुतेकदा पोलिसांकडून वाहन तपासणीवरही भर देण्यात येतो. मात्र, धूमस्टाईल बाईकस्वारी अन् दादागिरी करून दंगा घालणाऱ्या टवाळांच्या मुसक्या आवळण्यात या चेकनाक्यावरील पोलिसांना मात्र अजिबात रस नाही. सामान्य कुवतीच्या दिसणाऱ्या कॉलेजियन्सकडून पावत्यांच्या नावाखाली विनापावत्यांची मनमानी दंडवसुली इतकेच या चेकनाक्यावरील उद्दिष्ट बनले आहे. पोलिसांचा या तरुणांवर धाक उरलेला नाही. या चेकनाक्यावरील ताफ्यातील काही पोलिसांनी कॉलेज कॅम्पसमध्ये डोकावण्याची तसदी घेतली तरीही टवाळांवर वचक बसेल, अशा भावनाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटच्या मुलीवर बापाकडूनच अत्याचार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुक्यातील ब्राह्मणवाडे करंजी शिवारात सामुदायिक बलात्काराची गंभीर घटना व्हिडीओ क्लिपमुळे उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आपल्या पोटच्या मुलीवर बापानेच अत्याचार केला असून, नराधाम पिता अद्याप फरार आहे. ही घटना घडून तीन आठवडे उलटले असून, या घटनेतील इतर तिघांना २२ जानेवारीपर्यंत न्यान्यालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पीडित मुलगी ही १७ वर्षांची असून, ती २२ डिसेंबर रोजी वडिलांसोबत कावीळ उतरविण्याचे औषध घेण्यासाठी गेली होती. तेथून परतत असताना सकाळी साडेआठ वाजता वडिलांनी करंजी शिवारात नाल्याजवळ दर्शन घेण्याच्या निमित्ताने सदर पीडित मुलीवर अत्याचार केला. तू माझी इज्जत घालविली असे म्हणून त्याने हे कृत्य केले. त्यावेळी चार जणांनी हा प्रकार पाहिल्यानंतर तिघांनी पीडित मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. एकाने त्याचे चित्रीकरण मोबाइलमध्ये केले होते. पीडित मुलीस पुन्हा वडिलांजवळ आणून सोडले व कोणास काही सांगितले तर तुम्हास मारून टाकू, असा दम देऊन करंजीच्या दिशेने पळून गेले.

ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरल्यावर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी याबाबत मुलीस झालेल्या प्रकाराची विचारणा केली. मुलीने तिच्यावरील अत्याचाराचा उलगडा केला. त्यानंतर सायखेडा पोलिस स्टेशनला नराधाम पित्यासह मंगेश सुधाकर तांबेकर (वय १९), सुकदेव सुधाकर तांबेकर (वय २५), उध्दव सोपान अडसरे (वय २३) तर विकास बाळू शिंदे (वय १७) यांच्याविरुध्द भादवि कलम ३७६ (ड) (फ) ५०६, ३४, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२ चे कलम ५ (जी), ६, ९ (एन), १३, १४ अन्वये पीडित मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. मंगेश तांबेकर, सुकदेव तांबेकर व उध्दव अडसरे यांना १ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. निफाडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना आठ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना २२ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, नराधम पिता अद्याप फरार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेल्फीद्वारे थेट पोस्टाचे तिकीट !

$
0
0

महापेक्समध्ये मिळणार संधी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोबाईलद्वारे सेल्फी काढण्याचा ट्रेंड आता चांगलाच रुढ झाला आहे. पण, आपण सेल्फी काढल्यानंतर थेट हातात स्वतःच्या फोटोचेच पोस्टाचे तिकीट मिळाले तर! येत्या शनिवारपासून सुरु होणाऱ्या महापेक्स प्रदर्शनाद्वारे ही संधी सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहे.

नाशिकचे वैशिष्ट्य असलेले पांडवलेणी, डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी, श्रीमती कुसुम धीरुभाई मेहता, नाशिक डोल, काळाराम मंदिर, नाशिक सिटी ऑफ ग्रेप्स यांचे लवकरच टपाल पाकिट पहायला मिळणार आहे. टपाल विभागातर्फे येत्या शनिवारपासून महापेक्स २०१६ फिलैटली या राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने टपाल तिक‌‌िटांचा प्रवास उलगडून दाखविणारा महाकुंभमेळा नाशकात होणार आहे.

नाशिकमध्ये तब्बल १७ वर्षांनंतर टपाल तिकिटांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जगात टपाल तिक‌िटे संग्रही ठेवणारे १० करोड लोक आहेत. त्यापैकी ५० लाख लोक भारतात आहेत. देशाच्या भविष्याला दिशा देणाऱ्या महान व्यक्तींना टपाल तिक‌िटांवर चित्रित केले जाते. आपल्या पाल्यांची जिज्ञासा तीव्र करण्यासाठी, त्यांचे ज्ञान वाढविण्यासाठी आणि त्यांचे मानसिक क्षितीज विस्तृत करण्यासाठी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन नाशिक टपाल विभागाने केले आहे.

दीडशेहून अधिक संग्राहक आणि नाशिकची करन्सी नोट प्रेसही प्रदर्शनात सहभागी होणार आहे. संग्राहक त्यांच्या जवळील तिक‌िटे एका थीमनुसार मांडून नागरिकांचे लक्ष वेधून घेणार आहेत. उपनगरमधील पोस्टल स्टोअरेज डेपो येथे १६ ते १८ जानेवारी या कालावधीत हे प्रदर्शन होणार आहे. सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत ते खुले राहणार आहे. प्रदर्शनात सर्वांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

कार्यशाळा, स्पर्धाही

प्रदर्शनात तिकीट संग्राहकांवर (फिलैटेलीवर) आधारीत कार्यशाळा घेण्यात येणार आहे. याखेरीज प्रश्नोत्तरी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. महापेक्स २०१६ स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महानगर नियोजनची निवडणूक बिनविरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महानगर नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सर्वच्या सर्व म्हणजेच ३० जागांवर बिनविरोध निवडून आलेले उमेदवार निवडणूकी निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. सर्वच राजकीय पक्षांनी तडजोडीचा पवित्रा घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. प्रथमदर्शनी या समितीमध्ये शिवसेना भाजपचा वरचष्मा दिसून येत आहे.

निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे बुधवारी शेवटच्या क्षणापर्यंत माघारींचे नाट्य सुरु होते. तीनही गटांमधील इच्छुकांनी बिनविरोधला कौल देत माघार घेतल्याने तीसही जागा बिनविरोध निवडल्या गेल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यामध्ये जिल्हा परिषद मतदार संघाच्या ११ जागा बिनविरोध झाल्या. अलका चौधरी, नवनाथ गायधनी, नंदकुमार गांगुर्डे, पांडूरंग मुरादे, माधुरी तुंगार, मोहन भोर, विजयश्री चुंबळे, शिवराम दोबाडे, शैला ठुबे, सुनिता सानप व संपत धोंगडे या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. या मतदार संघामधून मंदा निकम, सुनिता मोरे, जान्हवी कदम, सुभाष कराड, स्मिता म्हस्के, दिलीप मुसळे, सुलोचना आभाळे व संजय खर्जे यांनी माघार घेतल्याने अन्य उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

नगरपालिका मतदार संघांच्या एका जागेसाठी तीन इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी दिपक बलकवडे व संजय शिंदे यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. नाशिक महापालिका क्षेत्रातील १८ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये नगरसेवक सतीश सोनवणे, ज्योती गांगुर्डे, डॉ. दिपाली कुलकर्णी, उषा शेळके,रुचीकुमार कुंभारकर, अर्चना जाधव, अर्चना थोरात, कन्हैय्या साळवे, सुनिल वाघ, कोमल मेहरोलिया, कविता कर्डक, सुनिता निमसे, छाया ठाकरे, सचीन भोर, कुणाल वाघ, सूर्यकांत लवटे, अश्विनी बोरस्ते व उध्दव निमसे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले. ४५ सदस्यांची ही समिती असून त्यात ३० जागा लोकप्रतिनिधींमधून निवडल्या जातात. उर्वरीत १५ जागांवर सरकार नियुक्त प्रतिनिधींची नेमणूक केली जाते. या जागांच्या नियुक्तीकडे आता लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असहकार आंदोलनाचा निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सचिवांनी केलेल्या मध्यस्थीनुसार स्वस्त धान्य दुकानदार संघटनांनी मंगळवारी संप मागे घेतला. बुधवारी अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांच्याशी मागण्यांसंबंधी चर्चा करून मार्ग काढण्यात येणार होता. मात्र, बापट यांनी व्यस्त दिनक्रमामुळे भेट नाकारल्याने संघटना पदाधिकाऱ्यांची निराशा झाली. त्यामुळेच संघटनेने आता असहकार आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसिन विक्रेत्यांना कमिशनमध्ये वाढ मिळावी, थेट दुकानापर्यंत धान्य पोहोच मिळावे, शंभर टक्के धान्याचा कोटा दिला जावा, आदी मागण्यांसाठी दुकानदारांनी एक जानेवारीपासून बेमुदत संप पुकारला होता. धान्याची उचल आणि वाटप थांबल्याने लाभार्थी धान्यापासून वंचित राहात होते. सचिवांनी मध्यस्थी केल्याने संघटनेने संप मागे घेतला. गिरीष बापट यांच्याशी याबाबत बुधवारी चर्चा करण्याचेही निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी संघटनेचे पदाधिकारी मुंबईत गेले होते. मात्र बापट यांनी व्यस्त दिनक्रमामुळे भेट नाकारली. त्यामुळे रेशन संघटनांनी असहकार पुकारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी दिली. ते म्हणाले, रेशन दुकानदारांना सध्या नको ती सरकारी कामे करावी लागतात. ग्राहकांकडून आधारकार्ड गोळा करणे, त्यांचे फॉर्म भरून घेणे, लाभार्थ्याची पडपडताळणी करणे अशी कामे रेशन दुकानदार करतात. मात्र, तरीही पुरवठा मंत्री दखल घेणार नसतील, तर अशा कामकाजाविरोधात आम्ही यापुढे असहकार आंदोलन पुकारणार आहोत. सध्या धान्य उचल सुरू असली तरी मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर पुन्हा बेमुदत संप पुकारला जाईल असा इशाराही कापसे यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॅटसाठी अखेरचे दोन दिवस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मूल्यवर्धीत कर कायदा अर्थात व्हॅटचे विवरणपत्र सादर करण्यासाठी अखेरच्या दोन दिवसांची मुदत राह‌िली असल्याने व्यापारी वर्गाने हे विवरण पत्र त्वरीत सादर करावे, असे आवाहन विक्रीकर निरीक्षक विभागातर्फे अप्पर विक्रीकर आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी केले आहे. हे विवरणपत्र सादर करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत म्हणजे केवळ दोनच दिवस मुदत शिल्लक असल्याची माहितीही विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

हे विवरणपत्र भरण्याची व यानंतर सीए, आयसीडब्ल्युए यांनी प्रमाण‌ित केलेला लेखापरीक्षण अहवाल या प्रक्र‌ियेत व्यापारी वर्गास सादर करायचा आहे. अर्ज क्रमांक ७०४ मध्ये हा अहवाल सादर करता येईल. आर्थिक वर्ष २०१४-१५ यासाठी अर्ज क्रमांक ७०४ हा १५ जानेवरीपर्यत ऑनलाइन पध्दतीने सादर करावा. ज्या व्यापाऱ्यांची उलाढाल १ कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे किंवा सामूहीक प्रोत्साहन योजनेखालील सवलत प्रमाणपत्रधारक व्यापाऱ्यांनी हे विवरणपत्र व अहवाल द्यावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साईबाबा आयुर्वेद हॉस्पिटल सेवेत दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अल्पावधीत उत्तर महाराष्ट्रात हृदयरोग पेशंट्सना आरोग्य सेवा देणारे श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे हृदयरोग चिकित्सा व प्रतिबंध यांच्यासाठी साईबाबा आयुर्वेदचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते साईबाबा आयुर्वेदचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी साईबाबा आयुर्वेदच्या शुभारंभप्रसंगी सांगितले की, भारतातील एकमेव पहिले अॅलोपॅथी व आयुर्वेद या दोहोंची सांगड असलेले हे रुग्णालय आहे. अॅलोपॅथीमध्ये फक्त आजारावर उपचार होतो परंतु, आयुर्वेदामध्ये संपूर्ण शरीरावर उपचार होतो. हृदय हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे.

हृदय जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अविरत काम करीत असते. म्हणूनच हृदयाच्या संपूर्ण चिकित्सेसाठी श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट, आधुनिक वैद्यकशास्त्र व प्राचीन आयुर्वेदिक शास्त्र या दोहोंच्या संगमाने सर्वोत्तम उपचारास प्राधान्य देत आहे. या सयुंक्त चिकित्सा उपक्रमात योग व ध्यान धारणा, आहार-विहार, शमनचिकित्सा, पंचकर्म, अभ्यंग/ स्नेहन, हृदयबस्ती, शिरोधारा, बस्ती व हृदयरोग टाळण्यासाठी अमृतचिकित्सा, हृदयरोगासाठी धन्वंतरीचिकित्सा, या सुविधा उपलब्ध आहेत. हृदयरोग असणाऱ्या रुग्णांना याचा फायदा घेता येईल. हृदयरोग चिकित्सा व प्रतिबंध यांच्यासाठी श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे साईबाबा आयुर्वेद नाशिककरांसाठी उपलब्ध करून दिले आहे. यावेळी डॉ. पल्लवी धर्माधिकारी, डॉ. राजदत्त देवरे, धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे, नगरसेवक दिनकर पाटील, सलीम शेख, गुलझार कोकणी, नाना महाले, अश्विनी बोरस्ते आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चित्र अन् शिल्पाची रंगली जुगलबंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जीवा-शिवाची भेट घडवून आणणारा सुमधूर वेणूनाद, त्यावर ध्यानस्थ झालेले भक्त आणि त्या वेणूधुनेवर तितक्यात तन्मयतेने सासरे-जावयाची सुरू असलेली चित्र-शिल्पाची जुगलबंदी. निमित्त होते श्री श्री रविशंकर यांच्या वेणूनाद वर्षपूर्ती सोहळ्याचे.

नाशिकचे व्यंगचित्रकार अवि जाधव आणि त्यांचे दिल्लीस्थित जावई प्रसिध्द शिल्पकार आशिष देवरे यांनी आपली कलाकारी सादर करून भक्तगणांची मने जिंकली. देवरे यांनी समोर श्री श्री रविशंकर यांचा फोटो ठेवून त्यावरून त्यांचे हुबेहुब शिल्प साकारले. याच वेळी जाधव यांनी श्रीश्रींच्या विविध मुद्रा असलेली अनेक चित्रे कॅन्व्हॉसवर रेखाटली.

मुंबई नाका येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्री श्री रविशंकर परिवारातील संत वैशंपायन स्वामी या सोहळ्याला उपस्थित होते. देवरे यांनी यापूर्वी बाहुबली या विक्रमी गल्ला जमविणाऱ्या सिनेमासाठी मूर्ती तयार करण्याचे काम केले आहे. खोपोलीच्या इमॅजिका पार्कमधील रॅपुंझल या कार्टून मालिकेतील अनेक कॅरेक्टर्स त्यांनी शिल्पांच्या रुपांतून जीवंत केली आहेत. वडील एकनाथ देवरे स्वतः मूर्तीकार असल्यामुळे मूर्तीकलेचा वारसा घरातून होता. त्याला स्कल्प्चर डिप्लोमाची जोड देत त्यांनी यातील शास्त्रशुध्द शिक्षण घेतले.

श्री श्री रविशंकर यांचा सत्संग असल्यामुळे युनिव्हर्सलचे अविनाश आव्हाड यांनी त्यांना या कार्यक्रमात आपली कला सादर करण्याची विनंती केली. अगदी हुबेहुब शिल्प बनलेले पाहून अनेकांना या शिल्पासमवेत सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. वैशंपायन स्वामी यांनी या दोघांच्या कलेचे कौतुक केले.


डीपीएसमध्येही पर्यावरणजागृती

दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विद्यार्थ्यांशी पर्यावरण या विषयावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी पर्यावरणावर सांगितलेले सर्व मुद्दे व्यंगचित्रकार अवि जाधव यांनी त्याच वेळी चित्रांच्या स्वरुपात रेखाटले आणि शाळेला भेट दिले. शाळा ही चित्रे पर्यावरण मंत्रालयाला पाठवणार आहे.



माझी कला सादर करण्याचे सत्संगासारखे दुसरे माध्यम नव्हते. बासरीच्या नादात कलेचे सादरीकरण करणे हा अनोखा अनुभव होता. शिल्प सर्वांना आवडले.

- आशिष देवरे, शिल्पकार

श्रीश्रींच्या सत्संगाचे व्यासपीठ असल्यामुळे चित्रे काढताना खूप मजा आली. त्यातच बासरीचे मधूर सूर कानी पडत असल्यामुळे एक पवित्र अनुभूती येत होती.

- अवि जाधव,

व्यंगचित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहाणपण देगा देवा !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकीकडे जूनपर्यंत पिण्यासाठी पाणी कसे पुरणार या काळजीने महापालिका आणि जिल्हा प्रशासनाची झोप उडाली असताना नागरिकांकडून पाण्याची सर्रास उधळपट्टी सुरू आहे. पाणी जपून वापरण्याचे शहाणपण त्यांच्याकडून केव्हा दाखविले जाणार हा खरा प्रश्न आहे. सोशल ऑड‌िट, पाणी कपातीसारखी बुळबुळीत धोरणे कवटाळणारे महापालिका प्रशासन पाण्याची उधळपट्टी करणाऱ्यांवर थेट कारवाईस का धजावत नाही, असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये अवघा ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जुलैअखेरपर्यंत पावसाची शक्यता नसल्याने तोपर्यंत हे पाणी पुरविण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. सध्या गंगापूर धरणातील उपलब्ध आरक्षण आणि शिल्लक दिवसांच्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनामध्ये ४९ दिवसांचा तुटवडा जाणवत असल्याने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र तेवढ्यानेही जूनपर्यंत पाणी पूरेलच अशी परिस्थिती नसल्याने पाणीबाणीची स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता बळावली आहे.

महापालिकेकडून सध्या शहरात १५ टक्के पाणीकपात लागू असली तरी आठवड्यातून एक दिवस पाणी कपात लागू करण्याचा निर्णय नुकतेच घेण्यात आला आहे. उपलब्ध पाणीसाठ्यातून महापालिकेच्या वाट्याला तीन हजार दशलक्ष घनफूट पाणी आले आहे. त्यापैकी ११०६ दशलक्ष घनफूट पाणी वापर करण्यात आला आहे. उर्वरित २०२ दिवसांसाठी फक्त १८९३ दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा उपलब्ध असून, तो १५२ दिवसच पुरेल असा अंदाज आहे. त्यामुळे ४९ दिवस पाण्याचा तुटवटा निर्माण होण्याची भीती महापालिका प्रशासनाला सतावते आहे. एकीकडे तुटवडा भरून काढण्यासाठी महापालिका पाणीकपातीचे धोरण अवलंबत असताना नागरिकांकडून मात्र सर्रास पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. सिडकोसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरात तर लोक टंचाईसदृश परिस्थितीपासून अनभिज्ञ आहेत की, काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सावतानगर परिसरात तर सकाळी गल्ली बोळांतून पाणी वाहात असल्याचे पहावयास मिळाले. महापालिकेने सोशल ऑड‌िट करताना या परिसरातही पाहणी केली होती. येथे मोठ्या प्रमाणावरी पाण्याची उधळपट्टी होत असल्याचे समोर आले होते. मात्र त्यानंतरही या परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली नाही. पाण्याची उधळपट्टी करण्याची जणू येथे स्पर्धाच लागत असल्याचे पहावयास मिळते आहे.

आयुक्त कारवाई करणार का?

एक‌ीकडे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन केले जात असताना सिडको परिसरात अशा प्रकारे पाण्याची उधळपट्टी सुरू असेल तर त्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून कारवाईची दिशा ठरविली जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याचे महत्त्व न जाणणाऱ्या आणि सर्रास उधळपट्टी करणाऱ्या नागरिकांवर किमान दंडात्मक किंवा तत्सम कारवाई व्हायला होणे आवश्यक आहे. पाण्याचा अपव्यय सुरूच राह‌िला तर एप्र‌िलनंतरच भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेआयटी कॉलेज झाले रोबोटमय

$
0
0

लखन सावंत, कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिक : उद्योगाच्या क्षेत्रात रोबोटीक प्रणालीला असणारी वाढती मागणी अन् या क्षेत्रामधील बारकावे विद्यार्थ्यांना समजावून सांगत तज्ज्ञांनी जेआयटी कॉलेजचे वातावरण रोबोटमय केले होते. निमित्त होते, गंगापूर रोडवरील जेआयटी नॅशनल नेटवर्क चॅम्पियनशीप या इव्हेंटचे. या उपक्रमात 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर आहे.

रोबोट म्हणजे काय, त्याचे प्रकार, त्याचा उपयोग, रोबोट यंत्रणेची निर्मिती यासारख्या अनेक मुद्द्यांवी यावेळी तज्ज्ञांनी प्रकाश टाकला. आयआयटी कानपूर यांच्या सहकार्याने ही देशपातळीवरील स्पर्धा आयोजित केली होती. औद्योगिक क्षेत्रात मानव निर्मित रोबोटची भविष्यातील गरज लक्षात घेता रोबोटचे तंत्रज्ञान अधिक विकसित होण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात बीई, पॉलिटेक्निक, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

नेटवर्क बुल्सचे रुपेश सिंघल यांनी वर्कशॉप घेतले. चॅम्पियनशिपचे उद्घाटन कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. भटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. गीतांजली मोहोळे, प्रा. चेतन पाटील, प्रा. जयेश तिरपुडे उपस्थित होते. डॉ. एम. व्ही. भटकर यांच्या हस्ते रुपेश सिंघल यांचे स्वागत करण्यात आले. प्रा. स्वाती थेटे व जयेश तिरपुडे स्पर्धेचे समन्वयक होते. पंकज शेलार याने आभारप्रदर्शन केले.

स्पर्धा तीन विभागात घेण्यात आली. पहिल्या भागात 'रोबोटिक्स व इलेक्ट्रॉनिक कम्पोनंट' यावर वर्कशॉप झाले. यात रुपेश सिंगल यांनी डायोड, रजिस्टर, आयसी, एलइडी, कंट्रोलर, सेन्सर त्याचे प्रकार यांची माहिती दिली. जीएसएम बेस रोबोट कशापध्दतीने कंट्रोल करतात हे प्रात्यक्षिकाव्दारे दाखवले. ग्रुप स्पर्धाही घेण्यात आली. यात संदीप पॉलिटेकनिकच्या पूजा लाड, आरवायके कॉलेजच्या प्रंशु टोपले, जेआयटी कॉलेजच्या गायत्री फासे यांचे ग्रुप विजयी ठरले. तिसऱ्या भागात आयआयटी कानपूर येथे होणाऱ्या नॅशनल नेटवर्क चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हे तीनही ग्रुप पात्र ठरले आहेत. राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्यास एक लाखापर्यंतचे बक्षिस देण्यात येणार असल्याची माहिती जेआयटीतर्फे देण्यात आली.

रोबोटिक्सबद्दल आवड असणाऱ्या विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी ही चॅम्पियनशिप महत्त्वपूर्ण ठरली. यातून रोबोटिक्सबद्दलची इथ्यंभूत माहिती मिळाली.

- डॉ. एम. व्ही. भटकर, प्राचार्य

चॅम्पियनशिपमधील स्पर्धक, प्राध्यापक रोबोटबद्दल खूपच उत्साही होते. यात काहींना पुढे करिअर देखील करायचे आहे. वर्कशॉपदरम्यान आलेल्या शंका लगेच उपस्थित केल्याने त्याचे निरसन करता आले.

- रुपेश सिंघल, प्रशिक्षक

या चॅम्पियनशीपमधून आम्हाला रोबोट विषयीची माहिती मिळाली. याचा आम्हाला भविष्यात फायदा होणार आहे. आमच्या ग्रुपने शंभर टक्के योगदान दिल्याने आम्ही विजयी झालो. - प्रंशु टोपले, विजेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारात पतंगाच्या खरेदीला ढ‌‌ील !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिवाळा संपल्याची नांदी देणाऱ्या मकरसंक्रांतनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण असून, भद्रकाली येथील बाजारात पतंगांची खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. यंदा बाजारात स्थानिक येवल्याच्या पतंगाबरोबरच चायनीज पतंगांची विक्रीही जोरात आहे. दरवर्षी नाशिकमध्ये संक्रांतीनिमित्त पतंगाची लखो रुपयांची उलाढाल होत असते. यंदाची भाववाढ गेल्या वर्षी पेक्षा जास्त असल्याने पतंग उडवण्याच्या उर्मीला आवर घालावा लागत असला तरीही तरुण, बालकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

शहरातील विविध भागात संक्रांतीची तयारी जोरात सुरु आहे. किती पतंग आणायच्या आणि कुठल्या पतंग आणायच्या यावर तरुण वर्गाचे विचारमंथन सुरु आहे. याशिवाय पतंगाची खरेदी कुठून करायची व ती कुठून उडवायची, त्या ठिकाणाची निवड अशा लगीनघाईत युवक कामाला लागले आहेत. सध्या बाजारात वेगवेगळ्या धाटणीचे, रंगांचे, कलाकुसरीचे पतंग विक्रीस आले आहेत. रंगीबेरंगी पतंगांनी बालगोपाळांच्या उत्साहाला उधाण आले आहे. शहरात रविवार कारंजा, अभोणकर गल्ली, गाडगीळ गल्ली, लोणार गल्ली, बोहरपट्टी, भद्रकाली, पंचवटी आदी भागात पतंग विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. यंदा १० ते १५ टक्क्य़ांनी पतंग, दोरा, आसारींच्या किमती वाढल्या आहेत. पूर्वी मांजा तयार करण्यासाठी गंगेवर मोठ्याप्रमाणात तरुण वर्गाची स्पर्धा असायची. आता मात्र बाजारात रेडिमेड मांजा मिळू लागल्याने मांजा तयार करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

तीन पिढ्यांपासून पतंग विक्रीचा व्यवसाय करणारे बॉम्बे पतंगवाले सय्यद शहाबुद्दीन म्हणाले,'अहमदाबाद, नाशिक, औरंगाबाद, तसेच येवला येथील आकर्षक पतंग विक्रीस उपलब्ध आहेत. यंदाच्या वर्षी चायनाच्या पतंगाना विशेष मागणी आहे. त्यात गरुड, स्पयडरमॅन, फिश, अॅग्रीबर्ड या पतंगाचा समावेश आहे. नेहमीच्या येवल्याच्या धोबी पतंगांची मागणी चाचनीजच्या तुलनेत कमी झालेली नाही ती मात्र तशीच आहे. विशेष म्हणजे बरेलीच्या लघु पतंग तीनकाडी यांनाही चांगला उठाव आहे. ही पतंग उडायला सॉफ्ट असून, यात वापरणारी काडी भाजुन त‌िला वाक दिला जातो. विशेष म्हणजे कमी हवा असतानाही ही पतंग चांगली उडते.

अंडेदार, गोंडेदार, डोळेदार, कल्लेदार, डिस्को, झब्बू, समोसा, गोल्डन, गरुड, स्पायडरमॅन, फिश असे तर लहानांसाठी कार्टूनचे टॉम अॅन्ड जेरी, छोटा भीम, बेनटेन अशी पतंगही बाजारात आले आहेत. आता पीव्हीसी मटेरियलचे अहमदाबाद येथून आलेले पतंगांनाही चांगली मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुभमंगलसाठी सरसावले महिला बालविकास खाते

$
0
0

शुभमंगलसाठी सरसावले महिला बालविकास खाते

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गरीब शेतकरी, शेतमजूर तसेच निराधार, परित्यक्ता व विधवांच्या मुलींच्या विवाहासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत शुभमंगल सामूहिक व नोंदणीकृत विवाहासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे योजना राबविण्यात येते. ज्या गरजूंना या योजनेविषयी माहिती हवी असल्यास किंवा याचा लाभ घ्यायचा झाल्यास अशांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, वर्ग-१ नाशिक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेचा मुख्य हेतू गरीब शेतकरी, शेतमजूर याच्यावर विवाहाच्या सोहळ्याच्या अर्थिक बोजा पडू नये, त्यासाठी त्यांनी कर्ज घेऊ नये असा आहे. या सुधारित शुभमंगल सामूहिक, नोंदणीकृत विवाह योजने अंतर्गत जे जोडपे सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणीकृत विवाह करतील त्यांना १० हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे.

योजनेच्या अनुदानास पात्र ठरण्यासाठी वार्षिक कमाल उत्पन्न मर्यादा १ लाख रुपये इतकी असून, अशा कुटूंबातील मुलींच्या विवाहासाठी प्रती जोडपे रुपये १० हजार एवढे अनुदान वधुच्या आईच्या नावाने, आई यात नसल्यास वड‌िलांच्या नावाने व आई-वडील दोन्हीही यात नसल्यास वधुच्या नावाने देण्यात येते. तसेच सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रती जोडप्यामागे रुपये २ हजार एवढे प्रोत्साहानात्मक अनुदान देण्यात येते. खुला तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्ग यांचेकरिता ही योजना लागू आहे. तसेच या योजने करिता अनुदान जिल्हा नियोजन विकास समिती (डीपीडीसी) यांचेमार्फत प्राप्त होते. अधिक माहिती व योजनेचा अर्जासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक कल्ब समोर, नाशिक-पुणे रोड, नाशिक. २२३६३६८ येथे संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकारची ही एक उत्तम योजना आहे. ज्यांना या योजनेची माहिती हवी असल्यास त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. योग्य प्रकरणांना तातडीने मदत करण्यात येर्ईल

देवेंद्र राऊत, महिला बाल विकास अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images