Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शेतकरी हितासाठी ‘सीटू’चे जेलभरो

$
0
0

शेती कर्जमाफीसह कामगार कायदा संरक्षणाची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, शेतमालाला किफायतशीर भाव द्यावा, कामगार कायद्यांचे संरक्षण व्हावे यांसह अनेक मागण्यांसाठी सीटू किसान सभेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी जेलभरोचा पवित्रा स्वीकारल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या आंदोलनामुळे सीबीएस, शालिमार, एम. जी. रोड परिसरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला.

'संरक्षण द्या, संरक्षण द्या कामगारांना कायद्याचे संरक्षण द्या..' 'कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही', अशा आक्रमक घोषणा देत बी. डी. भालेकर मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. सीटू-किसान सभा आणि शेतमजूर संघटनेचे शेकडो कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले. शालिमार, एम. जी. रोड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हा मोर्चा पोहोचला. संघटनेचे राज्य सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड यांनी मोर्चाचे नेतृत्व करीत प्रशासनासमोर आंदोलकांच्या विविध मागण्या मांडल्या. प्रत्येक कामगाराला दरमहा १८ हजार रुपये किमान वेतन द्या, कंत्राटी रोजंदारी आणि मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम करा, बेरोजगारांना काम द्या, मागेल त्याला स्वस्त धान्य मिळायलाच हवे, ५५ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला तीन हजार रुपये मासिक पेन्शन द्या, दुष्काळग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करा, गावपातळीवर मनरेगाची कामे करून सर्व महिला आणि पुरुषांना ३०० रुपये रोज द्या, शेतमजुरांसाठी इंदिरा आवास घरकुल योजना व रमाई आवास योजना राबवून सर्व बेघर कुटुंबांना घरे मंजूर करून द्या, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जेलभरोचा पवित्रा स्वीकारल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. आंदोलनात सीताराम ठोंबरे, अ‍ॅड. तानाजी जायभावे, डॉ. वसुधा कराड, अ‍ॅड. भूषण सातळे, संतोष कुलकर्णी, अशोक लहाने, हरिभाऊ तांबे आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घोटी टोलनाक्यावर ठिय्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

केंद्र व राज्य सरकारचे कामगार विरोधी धोरण, शासनाच्या जागतिकीकरण, खासगीकरण व उदारीकरण या त्रिसूत्री धोरणाचा निषेध करीत विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी माकपच्या सिटू संघटनेने घोटी टोल नाक्यावर रास्तारोको आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी ठिय्या मांडल्याने वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती.

आंदोलकांनी शासनाच्या गलथान धोरणाविषयी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी सुमारे शंभराहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले. यात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनाचे नेतृत्व सिटूचे देवीदास आडोळे, चंदू लाखे, कांतीलाल गरुड यांनी केले.

या आंदोलनामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक दुतर्फा काही काळ ठप्प झाली. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेंद्र पवार यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आंदोलन करणाऱ्या शेकडो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात कॉ. देवीदास आडोळे, चंदू लाखे, कांतीलाल गरुड, अप्पा भोले, सुनील मालुंजकर, विश्राम गवते, भाऊसाहेब जाधव, जनक लंगडे, सदाशिव डाके, हनुमान गतीर, आदीचा समावेश होता.



या आहेत मागण्या

महागाईला लगाम लावावी.

जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीला आळा घालावा.

रेशन व्यवस्थेचे सार्वत्रिकरण करून मागेल त्याला दोन रुपये किलो दराने किमान ३५ किलो धान्य द्यावे.

शाश्वत रोजगार निर्मिती करावी.

किमान वेतनासह सर्व कामगार कायद्याची अंमलबजावणी करावी.

असंघटित कामगारांसह सर्वांना पेन्शन व सामाजिक सुरक्षाचा लाभ द्यावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवण पंचायत समितीवर धडकले आदिवासी

$
0
0

म. टा . वृत्तसेवा कळवण

कळवण येथे वनजमीन हक्क कायद्यासाठी माकपतर्फे आंदोलन करण्यात आले. कळवण पोलिस स्टेशनची जागा आंदोलकांची संख्या बघता कमी पडत असल्याने पंचायत समिती आवारात जेलभरो आंदोलन करण्यात आले.

केंद्र तसेच राज्यशासन सर्वच पातळीवर अपयशी ठरले असून विशेषतः शेतकरी, शेतमजूर आदिवासी यांच्यासाठीकरावयाच्या उपाययोजनांच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवित आहे. शेतमालाला ५० टक्के हमीभाव देण्याच्या आश्वासनाला हरताळ फासण्यात आले आहे. वनाधिकार कायद्याची अन्यायकारक अंमलबजावणी करून लाखो आदिवासी व बिगर आदिवासी कुटुंबांवर अन्याय केला जात आहे. यामुळेच जेलभरो आंदोलन करण्यात आले असल्याचे माकपचे तालुका सरचिटणीस हेमंत पाटील यांनी स्पष्ट केले.

या अन्यायाविरुद्ध आम्ही आवाज उठविणारच. प्रसंगी रक्तरंजित आंदोलन करण्याची वेळ आली तरी करू, असा इशारा त्यांनी दिला. मशाड नाल्याचे पाणी कुठल्याही परिस्थितीत पळवू दिले जाणार नाही असेही पाटील यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी सावळीराम पवार, रशीद मामू यांची भाषणे झाली.

आंदोलनात सहभागी होण्यासाठी गावागावातून आदिवासी बांधव उपस्थित झाले होते. आंदोलकांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात येऊन काही कालावधीनंतर सोडून देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व कॉ. हेमंत पाटील व सावळीराम पवार यांनी केले

दिंडोरीत आंदोलन

दरम्यान, दिंडोरी येथे ही किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. सुमारे पाच तास मोर्चा काढून जेलभरो आंदोलनही करण्यात आले. सुनील मालुसरे व कैलास बलसाने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरवाजाविना स्वच्छतागृह!

$
0
0

हॉस्पिटलच्या अपघात कक्षात २४ बेड आहेत. येथे रुग्णांसाठी दोन स्वच्छतागृहे आहेत. मात्र, स्नानगृहाची सुविधा नाही. स्त्री व पुरुष रुग्ण यांना स्वतंत्र स्वच्छतागृह नाही. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. गांर्भीयाची बाब म्हणजे २४ रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना स्वच्छतागृहाला जाण्यास संकोच वाटतो. कारण दोन्ही स्वच्छतागृहांना दरवाजेच नाहीत. तात्पुरती सोय म्हणून प्लॅस्टिकचा कागद लावण्यात आला आहे. स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील नळाला तोटी नसल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. रुग्णांना प्रशासनाच्या लक्षात ही बाब आणून देऊनही कार्यवाही झालेली नाही. अन्य विभागातील रुग्णांचेही गैरसुविधांमुळे हाल होत आहेत.

अहवालाची औपचारिकता रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले, की अपघात कक्षातील स्वच्छतागृहांना दरवाजे नसल्याचा व कक्षातील गैरसुविधा असल्याबाबत वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे. आम्ही कार्यवाहीच्या प्रतीक्षेत आहोत. मात्र, हॉस्पिटल प्रशासनाने अहवाल पाठविण्याची औपचारिकता पार पाडली असली तरी प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्याने रुग्णांनी नाराजी व्यक्त केली आहे.

थुंकणाऱ्यांचा निर्लज्जपणा अपघात कक्षाच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला येथे थुंकण्यास मनाई आहे असे लिहिले आहे. मात्र, त्यावरच पानाच्या पिचकाऱ्यां मारलेल्या दिसून येतात. आवारात शहाळे, कागद पडलेले आहेत. अशाच अस्वच्छ आवारात ऑक्सिजन सिलेंडर ठेऊन रुग्णांना ऑक्सिजन देण्यात येत असल्याचे चित्र आहे. अतिदक्षता विभागाशेजारीच नवीन रुग्णालयाचे काम सुरू आहे. तेथे पाया घेतल्याने अतिदक्षता विभागाला धोका निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. दौलतराव आहेर यांचे निधन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्याचे माजी आरोग्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. दौलतराव आहेर (वय ७३) यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. आरोग्य विज्ञान विद्यापीठ निर्मिती, भव्य आणि सर्व सोयीसुविधांयुक्त संदर्भसेवा रुग्णालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. देवळा येथील दौलतनगर येथे डॉ. आहेर यांच्या पार्थिवावर सायकांळी सव्वा सहाच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत पुत्र आमदार राहुल आहेर यांनी अग्निडाग दिला. पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून व बिगुल वाजवून डॉ. आहेर मानवंदना दिली.

डॉ. आहेर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. किडनी निकामी झाल्याने ते गेल्या सात-आठ वर्षांपासून डायलिसीस घेत होते. काही दिवसांपासून त्यांनी अन्नाचा त्याग केला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. राहत्या घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. शासनाच्या वतीने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी श्रद्धाजंली वाहिली. महसूल मंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदारांसह सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थितीत होते.

नाशिक जिल्ह्याचे खऱ्या अर्थाने विकासपुरुष, गेल्या तीन दशकातील आक्रमक, झपाटलेला नेता व राजकीय झंझावात अशी डॉ. आहेर यांची ओळख होती. १९८५ मध्ये ते नाशिक विधानसभा मतदारसंघातून प्रथम आमदार म्हणून निवडून आले होते. तर १९८९ साली नाशिक लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्रीपद सांभाळले होते. वसंतदादा साखर कारखाना सुरू होण्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता. देवळा तालुक्याची निर्मिती, सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्य योजनेची संकल्पना, नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठ निर्मिती, नाशिकमध्ये सर्व सोयीसुविधांयुक्त संदर्भ सेवा रुग्णालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तापी महामंडळाचे अध्यक्ष असतांना त्यांनी पाणलोट योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. तापी खोरे महामंडळाचे अध्यक्ष, मविप्र संस्थेचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस ठाण्यातील पाणीगळती बंद

$
0
0

सतत होणाऱ्या पाणीगळतीमुळे पोलिस ठाण्यातील परिसर चिखलमय झाला होता. शहरातील अनेक भागात पाणीटंचाई जाणवत असतांना सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे पाणीगळती होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केला होता. यापार्श्वभूमिवर 'मटा'मध्ये नुकतेच वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर पोलिस प्रशासनाने गळणारा नळ बदलून टाकला. यामुळे शेकडो लिटर पिण्याच्या पाण्याची होणारी नासाडी थांबली आहे. याबद्दल नागरिकांनी व पोलिसांनीही समाधान व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटप्रेसमध्ये ३० कोटींच्या नोटा जाळल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोडच्या करन्सी प्रेसमध्ये सदोष नोटा छपाईप्रकरणी आणखी एक हजाराच्या छापलेल्या तीस कोटी सदोष नोटा प्रेसमध्ये जाळण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तडकाफडकी तीन कामगारांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर हे प्रकरण आणखीनच तापले आहे. प्रेसमधील कामगारांवरील कारवाई मागे घ्यावी, या मागणीसाठी प्रेस मजदूर संघाने महाव्यवस्थापकांना दिवसभर घेराव घातला. विशेष म्हणजे, महाव्यवस्थापकांना दुपारी जेवण्याची संधीही कामगारांनी दिली नाही. हे प्रकरण आणि आंदोलनाचे थेट पडसाद दिल्लीत उमटणार असून कामगार बुधवारीही आंदोलन सुरुच राहणार असल्याचे संघाने स्पष्ट केले आहे. दरम्यान नोटा जाळण्याच्या प्रकाराला प्रेस प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी एकूणच कारवाईने संशयाचा धूर निघाला आहे.

रिझर्व्ह बँकेने एक हजाराच्या पन्नास कोटी नोटा छापण्याची ऑर्डर नाशिक नोटप्रेसला देण्यात आली. त्यानुसार हौशंगाबादहून (मध्यप्रदेश) नाशिक प्रेसमध्ये नोटांचा कागद आला. मात्र, त्यात चांदीची तारच (विशेष फिचर) नव्हती. दहा कोटी नोटा छापून व्यवहारात आल्यानंतर हे लक्षात आले. या प्रकरणी चौकशीसाठी नाशिकरोडला महाव्यवस्थापक म्हणून काम केलेले व आता हौशंगाबादची जबाबदारी सोपवलेले टी. आर. गौडा यांच्य़ा अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली. हौशंगाबादचे व्यवस्थापक एस. आर. वाजपेयी, उपव्यवस्थापक रविंद्र सिंग यांना निलंबित केल्यानंतर सोमवारी नाशिकरोड प्रेसमधील तीन कामगारांना निलंबित करण्यात आले. तर सहा सुपरवायझर्सना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. याची दखल घेत प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांच्या नेतृत्वाखाली नेत्यांनी मंगळवारी दिवसभर महाव्यवस्थापकांना घेराव घातला. त्यांना दिवसभर जेवण्याचीही संधी दिली नाही. तर अन्य नेत्यांनी धरणे आंदोलन केले. घटनेला जबाबदार मुख्य अधिका-यांवर कारवाई करावी, कामगारांना सुळावर चढवू नये, अशी मागणी संघाने केली आहे.

सदोष नोटा छापल्यानंतर उर्वरित ३० कोटी नोटा काय करायच्या असा प्रश्न उपस्थित झाला. हे प्रकरण प्रेसमध्येच मिटविण्यासाठी या नोटा जाळण्यात आल्याची बाब पुढे आली आहे. याप्रकरणी अधिकृतपणे माहिती दिली जात नसली किंवा अधिकारी त्याबाबत बोलत नसले तरी या नोटा जाळण्यात आल्याचे विश्वनीय सूत्रांचे म्हणणे आहे.

चर्चेची मॅरेथॉन फेरी

कारवाई मागे घ्यावी म्हणून प्रेसचे महाव्यवस्थापक संदीप जैन यांच्याशी गोडसे, जुंद्रे, माधवराव लहांगे, राजेश टाकेकर, प्रकाश पगारे, सुनिल अहिरे, सिद्धार्थ पवार आदी नेत्यांनी चर्चा केली. त्यांनी जैन यांना घेराव घातला. सदोष नोटाप्रकरणी हौशंगाबादचे अधिकारी जबाबदार आहेत. नाशिकच्या कामगारांचा संबंध नाही, अशी भूमिका संघाच्या नेत्यांनी घेतली. मात्र, ही कारवाई केंद्रीय अर्थमंत्रालयातून झाल्याचे जैन यांनी सांगितले. जैन यांनी दिल्लीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला पण त्याचा फायदा झाला नाही. अखेर संघाला कुठलेही आश्वासन किंवा आंदोलन थोपविण्यात जैन यांना अपयश आले. त्यामुळे बुधवारीही संघाच्यावतीने धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे गोडसे, जुंद्रे यांनी सांगितले आहे.

सदोषची दोन प्रकरणे?

नोटेमध्ये तार नसल्याचे आणि महात्मा गांधींचे चित्र असलेला वॉटर मार्क उलटा छापलेला असणे अशी दोन सदोष प्रकरणे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नोटप्रेसमध्ये अनागोंदी कारभार सुरु आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महापालिकेकडून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण हटाव मोहीम सोमवारी सुरू करण्यात आली. मंगळवारी दुसऱ्या दिवशी या मोहिमेतंर्गत ५० अतिक्रमणांवर बुलडोजर फिरविण्यात आले. ही मोहीम सुरूच राहणार असून, अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.

सोमवारी नवीन बसस्थानक परिसरातील अग्निशामक केंद्र दलाच्या इमारतीलगत असलेले अतिक्रमण काढल्यानंतर मंगळवारी मनपा अतिक्रमण हटाव पथकाने कुसुंबा रोडवरील अतिक्रमणावर बुलडोझर चालवले. शहरातील कुसुंबा रोडवरील इकबाल डाबी येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. शहरातील नवीन बसस्थानक ते दरेगाव या रस्त्यासोबतच मालेगाव-कुसुंबा रोड देखील रहदारीचा रस्ता आहे. मात्र या रस्त्यालागत अवैध दुकाने, हातगाड्या, टपरी अगदी रस्त्यावरच आल्या असल्याने कुसुंबा रस्त्यावर नियमित वाहतूक खोळंबा होत असे. या भागातील देखील अतिक्रमण काढावे, अशी मागणी केली जात होती. महापालिका आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त कमरुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक दीपक हादगे, प्रभाग अधिकारी सलीम अहमद, बीट मुकादम संजय जगताप, अजय चांगरे आदींसह मनपा पथकातील २५ कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. या कारवाईत पत्री शेड, हातगाड्या, टेबल खुर्ची असे अतिक्रमित साहित्य पथकाने जमा करून घेतले.

कारवाई सुरूच राहणार

अतिक्रम हटवण्याची कारवाई सुरू राहणार असून शहरातील हजारखोली, आझादनगर, डीपी रोड, जुना आग्रा रोड भागातील देखील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. नागरिकांना अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याबााबत आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देवळाली कॅम्पमध्ये स्वच्छता अभियान

$
0
0

बाजार भागासह गवळीवाडा, हौसन रोड, वडनेर रोड आदी भागात सर्व नगरसेवक व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, रोटरी क्लब, इनरव्हील क्लब यांनी या अभियानानात सहभागी होत बाजार भागाची स्वच्छता केली. अध्यक्ष ब्रिगेडीअर प्रदीप कौल यांची उपस्थितीत उपाध्यक्ष सचिन ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार,नगरसेवक प्रभावती धिवरे, भगवान कटारिया, आशा गोडसे, कावेरी कासार, बाबुराव मोजाड, मीना करंजकर, माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, चंद्रकांत गोडसे, भाऊसाहेब धिवरे, रतन कासार यांसह रोटरी क्लबचे अध्यक्ष मनोज कल्याणकर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष मनीषा दोशी आदींनी सहभागी होत परिसर स्वच्छ केला. अभियानात बुधवारी (दि. २०) आडके नगर, डेव्हलप्मेंट एरिया, गुरूवारी (दि. २१) दगड चाळ, मशिद एरिया, पंचामोती सोसायटी, शुक्रवारी (दि. २२) सोनेवाडी, कोळीवाडा, धोंडीरोड परिसरात स्वच्छता केली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने २ जेसीबी व ६ ट्रॅक्टरची मदत घेतली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंदरसूलला स्फोटके जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील अंदरसूल येथे पोलिसांनी टाकलेल्या एका छाप्यात स्फोटक जिलेटीन कांड्या व ताईट (ईडी) चा अवैध साठा जप्त केला. रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मनमाड उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

वैजापूर येथील ओमशेट दरक याने अंदरसूल येथील नंदू गायकवाड व श्रावण साळवी यांना स्फोटके बाळगण्याचा परवाना नसतानाही स्फोटके पुरवल्याचे या छाप्यात पुढे आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. येवला तालुक्यातील अंदरसूल येथील नंदू गायकवाड व दीपक दायमा याच्या शेतातील घरामध्येही स्फोटकाचा साठा आढळून आला. या छाप्यामध्ये पोलिसांनी प्रत्येकी आठ रुपये किमतीच्या ७१० जिलेटीन कांड्या व प्रत्येकी पाच रुपये किमतीचे ३७५० ताईतसह 'एक्स्लोझर मशिन' असा एकूण २४ हजार ४३० रुपयांचा माल जप्त केला. पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील वटाणे यांच्या फिर्यादीवरून येवला तालुका पोलिस ठाण्यामध्ये या प्रकरणी चार जणांवर स्फोटक पदार्थांचा साठा करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुपटीने वाढली धार्मिक स्थळे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिका हद्दीत गेल्या तीन वर्षांत अनधिकृत धार्मिक स्थळांचे पेव फुटले असून, या काळात अनधिकृत धार्मिक स्थळांची संख्या १,००२ संख्या पोहचली आहे. महापालिकेने शहरातील पोलिस स्टेशननिहाय सर्व्हेक्षण केले आहे. तीन वर्षांपूर्वी शहरातील अनधिकृत स्थळांची संख्या ५४३ होती. त्यात गेल्या तीन वर्षांत ४५९ धार्मिक स्थळे वाढली आहेत. त्यामुळे प्रशासनही आता धर्मसंकटात सापडले आहे.

हाय कोर्टाच्या आदेशान्वये महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. सन २००९ पूर्वी शहरात ३७४ धार्मिक स्थळे होती. सन २००९ नंतर त्यात १६९ ने वाढ झाली. सन २०१२ मध्ये शहराच्या हद्दीत तब्बल ५४३ धार्मिक स्थळे होती. त्यात आता नव्याने करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात ४५९ ने वाढ झाली आहे. भद्रकाली पोलिस स्टेशन अंतर्गत सर्वाधिक २६२ अनधिकृत धार्मिक स्थळे आढळली आहेत. त्यापोठापाठ सातपूरमध्ये १०६, पंचवटीत ८४ अनधिकृत धार्मिक स्थळे आहेत

आता करायचे काय?

शहरातील एक हजाराच्यावर असलेली अनधिकृत धार्मिक स्थळे काढायची कशी, असा प्रश्न आता प्रशासनाला पडला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील धार्मिक स्थळे काढण्याचा निर्णय झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही स्थळे स्थलांतरीत करण्यासही मोठा विरोध होणार आहे. त्यामुळे या धार्मिक स्थळांचे करायचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात असून, हा चेंडू पुन्हा शासन आणि प्रशासनाच्या कोर्टात ढकलला जाण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषय समित्यांचे सभापती बिनविरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

मुख्याधिकारीविना असलेल्या कळवण नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवडप्रक्रिया मंगळवारी पार पडली. स्थायी, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा आणि जल निस्सारण, स्वच्छता, आरोग्य, महिला व बालकल्याण तसेच नियोजन आणि विकास समिती या प्रमुख विषय समितींच्या सभापतीपदाची निवड बिनविरोध झाली.

कळवण नगरपंचायत विषय समित्यांची सभापतीपदाची निवडणूक तहसीलदार अनिल पुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली. कळवण नगरपंचायतच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा सुनीता पगार, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्षा अनिता महाजन, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी जयेश प्रकाश पगार, पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी अनिता जैन, स्वच्छताविषयक, वैद्यकीय आणि आरोग्य समितीच्या सभापतीपदी अतुल पगार तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी रोहिणी महाले यांची बिनविरोध निवड झाली.

कळवण नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस विकास आघाडीची सत्ता असून, सत्ताधारी गटाने राष्ट्रवादीचे गटनेते कौतिक पगार यांनी सर्वांना विश्वासात घेवून समन्वयाचे राजकारण केले. नगरपंचायतच्या पाच विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडीत युवा नगरसेवकांना संधी मिळाल्याने या समित्यांची कामगिरी चांगली होईल, अशी अपेक्षा कळवणकर व्यक्त करीत आहेत. यावेळी गटनेते कौतीक पगार, नगरसेवक बाळासाहेब जाधव, साहेबराव पगार, दिलीप मोरे, मयूर बहिरम, जयेश पगार, नगरसेविका रंजना जगताप, अनुराधा पगार, रंजना पगार, भाग्यश्री पगार, सुरेखा जगताप, रोहिणी महाले, अनिता जैन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार, सुनील जैन, हरिश्चंद्र पगार, सागर जगताप, गौरव पगार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाशिक दर्शन’मध्ये तारांगणचा समावेश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी राज्य परिवहन महांमडळाने सुरू केलेल्या नाशिक दर्शन बसला आता यशवंतराव चव्हाण तारांगणचा थांबा देण्यात आला आहे. विभागीय परीक्षा नियंत्रक यामीनी जोशी यांनी महापालिकेची विनंती मान्य केली आहे. त्यामुळे नाशिक दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना तारांगणतील शोचा लाभ येणार आहे. या प्रयत्नामुळे तारांगणची चांगली प्रसिद्धी होणार असून, पर्यटकांची संख्या वाढणार आहे.

यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटरमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पालिकेने विशेष प्रयत्न सुरू केले आहे. राजकीय नेते व अधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त बालकांना तारांगणची सफर घडविण्यापासून ते एमटीडीसीच्या नकाशावर तारांगणचा समावेश करण्याचे प्रयत्न पालिकेने चालविले आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्स धारकांमध्येही जनजागृती केली जात आहे.

पर्यटकांना नाशिक शहर व परिसरातील धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या नाशिक दर्शन बसचा थांबा तारांगण येथे मिळावा यासाठी अतिरिक्त आयुक्त सोनवणे यांनी महामंडळाकडे पाठपुरावा केला होता. त्याला विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी संमती दिली आहे. त्यामुळे नाशिक दर्शन बस आता तारांगण येथेही थांबेल. दररोज दुपारी साडेबारा वाजता नाशिक दर्शन बस तारांगण येथे थांबणार आहे. ज्या पर्यटकांना हा शो बघायचा आहे, त्यांना सोडून बस पुढे मार्गक्रमण करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनाला मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र व राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे शहरातील गोल्फ क्लब मैदानावर आयोजित राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनाला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खास लोक आग्रहास्तव या प्रदर्शनाला २६ जानेवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. ही घोषणा प्रदर्शनाचे सहव्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश्वर बावणे यांनी केली.

गोल्फ क्लब मैदानावर राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, प्रदर्शनासाठी आम्ही साधारणत: दहा कोटींच्या उलाढालीचे लक्ष ठेवले होते. परंतु, जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थिती पाहता प्रदर्शनात पाच कोटींची उलाढाल झाली आहे. प्रदर्शनाचा कालावधी हा दि. २४ जानेवारी पर्यंतच होता. परंतु, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या प्रदर्शनात ना‌शिककर ग्राहकांना मनमुराद खरेदी करता येणार असल्याचे बावणे यांनी नमूद केले. या प्रदर्शनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पश्चिम बंगाल, पदुचेरी, ओरिसा, जम्मू काश्मीर, राजस्थान, दिल्ली आदी राज्यांतील हातमाग कारागिरांचे विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रामुख्याने, सिल्क साड्या, टॉप, ड्रेस मटेरियल, चादर, सतरंजी, शॉल, बेड शिट, गालीचे, खादीचे शर्ट, टॉवेल, आदी वस्तूंचा यात समावेश आहे. या प्रदर्शनाचा ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपासकाम दिरंगाईची चौकशीची मागणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील शौचालयाचे दूषित पाणी संचालक मंडळाच्या बेजबाबदार व्यवस्थापणामुळे परिसरातील शेतशिवारात पसरून या भागातील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. या प्रकरणी पिंपळगाव बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांच्यासह तत्कालीन सोळा संचालकांवर तीन म‌हिन्यापूर्वीच पिंपळगाव पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासकामात पिंपळगाव पोलिसांकडून हेतूपुरस्सर दिरंगाई होत असल्याचे चित्र असून फिर्यादी विश्वास मोरे यांनी मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

राजकीय दबावामुळे पोलिसांकडून हा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळणार की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुस्तकदानाची उभी राहतेय चळवळ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
एका पुस्तकामुळे माणसाच्या आयुष्यात बदल घडून येतो. पुस्तकांमुळे व्यक्तीमत्त्व विकास होतो. हाच विचार आपल्या पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, वाचनसंस्कृती जोपासली जावी यासाठी कोल्हापूरमधील 'थिएटर रिसोर्स' ही संस्था एक नवीन चळवळ घेऊन आली आहे. 'डोनेट बूक' या उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत वैचारिक साहित्य पोहोचावे व त्यांचे जीवन घडावे म्हणून नवीन वर्षाच्या सुरुवातील हा अभिनव संकल्प या संस्थेने केला आहे.

नवीन वर्षात आपण वेगवेगळे संकल्प करतो. मात्र यामध्ये लोकसहभागही महत्त्वाचा आहे असा विचार थिएटर रिसोर्सचे कौस्तुभ बंकापुरे यांनी मांडला आणि पुस्तकदानाची चळवळ उभी राहिली. या उपक्रमाच्या माध्यमातून जमा झालेली पुस्तके कोल्हापूरमधील समर्थ विद्यामंदिर आणि नागपूरमधील अभ्यूदय ग्लोबल व्हिलेज या शाळेतील ग्रंथालयांना भेट दिली जाणार आहेत. समर्थ विद्यामंदिर शाळेत अपंग आणि पारधी समाजातील विद्यार्थी शिकतात, तर ग्लोबल व्हिलेज या शाळेत पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना शेतीविषयी शिक्षण दिले जाते.

डोनेट बूक या उपक्रमांतर्गत पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाची पुस्तके दान करता येऊ शकतील. यामध्ये आत्मचरित्रे, ऐतिहासिक, कादंबरी, गोष्टी, प्रवासवर्णन, भौगोलिक, कला किंवा कोणत्याही गुणात्मक विषयांची पुस्तके देता येतील. हा उपक्रम नाशिक, मुंबई, कोल्हापूर, पुणे, नागपूर या शहरांमध्ये राबवला जात असून, ३१ जानेवारीपर्यंत ही पुस्तके देण्याची मुदत आहे. या सर्व शहरांमधून उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ज्ञानाचा अनमोल खजिना या माध्यमातून समोर आला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर अहमदाबाद, हैदराबाद यांसह परदेशातून पुस्तके मुलांसाठी आली आहेत. ही सर्व पुस्तके या दोन्ही शाळांमधील ग्रंथालयांना भेट दिली जाणार आहेत.

पुस्तक देण्यासाठी

तुम्हाला एकच काम करायचं आहे. तुमच्या घरात असलेल्या पुस्तकांपैकी एक पुस्तक डोनेट करायचे. इच्छा असल्यास नवीन पुस्तक विकत घेऊनही डोनेट करू शकतात. फक्त या पुस्तकांची पाने उत्तम स्थितीतील असावी जेणेकरून ती सर्व मुलांपर्यंत पोहोचतील. मराठी, इंग्रजी दोन्ही भाषांमधील पुस्तके आपल्या इच्छेनुसार देता येतील. नाशिकमध्ये एकबोटे व्हेंचर्स, संत ज्ञानेश्वर संकूल, इंदिरानगर, ४२२००९ या पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन किंवा कुरिअरने हे पुस्तक पाठवता येईल. अधिक माहिती हवी असल्यास ९४२३९८१३११ या क्रमांकावरही संपर्क साधू शकता.

उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. वाचनाची आवड असणारे लोक पुढे येत आहेत. पुढील पिढीसाठी वाचनाचा हा वारसा नक्कीच उपयोगी ठरेल याची खात्री आम्हाला आहे.

कौस्तुभ बंकापुरे

थिएटर रिसोर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नैताळेत शनिवारपासून १५ दिवस यात्रोत्सव

$
0
0

निफाड : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व नैताळे ग्रामस्थांचे आराद्य दैवत श्री मतोबा महाराज यात्रोत्सवास पौष पौर्णिमे (२३ जानेवारी) ला मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहेत. हा यात्रोत्सव सलग १५ दिवस सुरू रहाणार आहे. यात्रोत्सवाची सांगता आठ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ही माहिती श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष केदू बोरगुडे, उपाध्यक्ष सोपान बोरगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नैताळे (ता. निफाड) येथील श्री मतोबा महाराज यात्रोत्सवास यावर्षी मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. त्या निमित्ताने यात्रेच्या पहिल्याच दिवसी श्री मतोबा महाराजांची महापूजा व रथपूजा सकाळी ८ वाजता होणार आहे. महापूजेसाठी पिंपळगाव बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर, जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी बनकर तसेच, नाशिक ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे, जान्हवी गिऱ्हे यांच्या हस्ते होणार आहे. रथपूजेसाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, निफाड पंचायत समितीचे सभापती सुभाष कराड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, चांगदेव होळकर, विजयश्री चुंभळे, रवींद्र पगार, जिल्हा बँकेचे चेअरमन नरेंद्र दराडे आदी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धेतून उलगडले तिळाचे महत्त्व

$
0
0

स्पर्धेत सिंधी भगिनींनी सहभागी होत तिळाचा वापर असलेली विविध पदार्थ बनविले. यामध्ये भावना नागदेव यांनी बनविलेल्या 'सेसेमी चॉकलेट बाइट्स' या पदार्थाला प्रथम क्रमांक मिळाला. चॉकलेटच्या मिश्रणात तीळ मिसळून तयार केलेला हा पदार्थ लहान मुलांना अतिशय आवडतो, असे त्यांनी सांगितले. तृप्ती कलाल यांनी तिळ, गुळ, शेंगदाणे यांच्या सहाय्याने बनविलेल्या 'तिल बहार' या पदार्थाला द्वितीय क्रमांक मिळविला. रेणू कुकरेजा यांनी तिरंगी तिळ चिक्की, रचना करडा यांनी तिळाचे लाडू, विना चावला यांनी पत्तरवेला, बरखा कटारिया यांनी तिळाचे थेपले, प्रीति माखीजानी यांनी धनियावडी असे पदार्थ बनवून सादर केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सखी संगतच्या जिल्हा सचिव अंकिता कटारिया, देवी लखमियानी यांच्यासह देवळालीतील सखी संगतच्या सदस्या प्रयत्नशील होत्या.

आजच्या मुलांना आरोग्यवर्धक तिळाचे पदार्थ खायला नको वाटतात. त्यामुळे चॉकलेट आवडणाऱ्या मुलांना 'सेसेमी चॉकलेट बाइट्स'च्या निमित्ताने तीळ चवीने खाता येईल. - भावना नागदेव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठीतून उर्दू शिकण्याची संधी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

कोणत्याही भाषेला धर्म, प्रांत, प्रदेश किंवा देशाची मर्यादा नसते. शिकण्याची इच्छा असलेल्यांना ती भाषा अवगत करता येऊ शकते. असेच काहीसे चित्र जुने नाशिक येथील नॅशनल उर्दू हायस्कूल येथील शिकवणी वर्गात मराठी माणूस उर्दूचे धडे गिरवतानाचे चित्र दिसत आहे.

उर्दू भाषेच्या गोडव्यामुळे ही भाषा विशिष्ट भागापुरती मर्यादित न राहता ती सात समुद्रापलीकडे गेली आहे. प्रसिद्ध उर्दू शायर दाग यांनी 'उर्दू जिसका नाम सभी जानते हैं दाग, सारे जहाँ में धुम हमारी जुबाँ की' असे शेर सादर करून या भाषेचे वर्णन केले आहे. या भाषेतील शेरोशायरीचा आनंद मिळविण्यासाठी व भाषेतील गोडवा अनुभव्यास भाषेचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे असते. केवळ उर्दू येत नाही म्हणून त्यातील साहित्य विशेषतः शायरीचा आस्वाद घेता येत नसल्याची खंत अनेकांना सतावते. ती खंत दूर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अत्यल्प दरात वर्षभर कालावधीचा उर्दू अभ्यासक्रम शिकणे शक्य झाले आहे. उर्दू भाषेचे विविध पैलू व तिचे बहुरंग जाणून घेण्यासाठी यापूर्वीही अनेक मराठी व अन्य भाषिकांनी नॅशनल उर्दू शाळेत उर्दू व अरबी भाषेचे धडे गिरविले आहेत. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना केंद्र सरकारच्या नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन उर्दू लॅगवेज विभागातर्फे पदविका (डिप्लोमा) प्रमाणपत्र मिळते.

आखाती देशात रोजगारासाठी जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अनेक तरुणांना उर्दू आणि अरबी भाषचे ज्ञान आवश्यक ठरते. त्यांना लाभदायी ठरू शकेल असा उर्दू भाषेचा एक तर अरबी भाषेचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. इच्छुकांना प्रवेश व नावनोंदणी ३१ जानेवारीपर्यंत करता येईल. अधिक माहितीसाठी केंद्रप्रमुख लियाकत पठाण यांच्याशी (९२२५७९८६४८) संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अस्मितेला हवी कृतीशीलतेची जोड!

$
0
0

प्रा. डॉ. विवेक खरे
मराठी भाषा बोलणाऱ्यांचे राज्य म्हणून १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. १९५६ साली भारत सरकारच्या राज्य पुनर्रचना कायद्याद्वारे भारतातील राज्याराज्यांच्या सीमा भाषेच्या आधारावर निश्चित करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्याची निर्मिती सुद्धा याच आधारे झाली. अर्थात यासाठी लढा देखील द्यावा लागला. १०५ जणांच्या हौतात्म्या नंतर हे राज्य निर्माण झाले, मराठी आपली मातृभाषा झाली. आज पंचावन्न वर्षांनतर या मातृभाषेची स्थिती काय आहे हा अभ्यासाचा विषय आहे. अर्थात शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये मराठी भाषा शिकविणाऱ्या शिक्षक, प्राध्यापक यांच्यापुरता हा विषय मर्यादित आहे असे समजण्याचे कारण नाही. महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या प्रत्येकानेच या विषयाकडे जिव्हाळ्याने बघितले पाहिजे अशी स्थिती आज नक्कीच आहे.

हा विषय मांडण्याचे कारण म्हणजे नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ जानेवारी ते १५ जानेवारी यादरम्यान साजरा करण्यात आलेला 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' होय. या निमित्ताने सर्व शासकीय, निमशासकीय, केंद्र सरकारची राज्यातील कार्यालये, सरकारी संस्था, विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून बरेच काही केले गेले. यात खरोखर भाषेविषयी आस्था किती होती व शासकीय सोपस्कार किती होता हा संशोधनाचा भाग ठरू शकतो. भाषेविषयीची आपली अस्मिता आज नेमकी कशी आहे हे सांगणे जरा अवघडच आहे.

आपण आपल्या मराठी भाषेवर खरंच प्रेम करतो का? तिच्या वाढीसाठी, तिच्या संवर्धनासाठी आपण काय आणि कशा प्रकारे योगदान देतो किंवा देण्याचा प्रयत्न करतो? असे प्रश्न आपण स्वत:ला विचारले तर अंतर्मुख होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. भाषेवर आपले प्रेम आहे तर तिच्या संवर्धनाच्या जबाबदारीतून आपण पळ का काढतो? भाषिक अस्मितेसंदर्भात नेहमी भारतातील दक्षिणेकडील राज्यांची उदाहरणे दिली जातात. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ या राज्यांमध्ये आपापल्या भाषेविषयी टोकाची अस्मिता प्रत्येकवेळी बघायला मिळते. सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रात ही भाषिक अस्मिता जोरकसपणे पुढे येते. आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सर्वच स्तरावर ही राज्ये प्रयत्नशील होती व नेहमीच असतात. सर्वसामान्य नागरिक ते साहित्यिक, राजकारणी, उद्योजक अशा प्रत्येकांमध्ये ही अस्मिता ठासून भरलेली असते. या अस्मितेविषयी आपण मराठी माणसंही भरभरून बोलतो, तिचा प्रत्यक्ष अनुभव घेतो. मग हे सगळे आपणाला का शक्य नाही असा प्रश्न निर्माण होतो, आणि तो होणे सहाजिकही आहे. भाषिक अस्मितेबरोबर तिच्या संवर्धनासाठी कृतीशील व्यवहाराची गरजही महत्त्वपूर्ण आहे हेच मुळात आपल्या लक्षात येत नाही. मराठीतील जेष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव म्हणतात त्याप्रमाणे, 'मातृभाषेबद्दल अज्ञान, आळस, गहाळपणा व वरवर चकाकणाऱ्या भाषिक संकाराला सोने समजण्याचा भ्रम यांचे निरसन करण्याची इच्छाशक्तीच आपण हरवून बसलो आहोत.'

मराठीशिवाय इतर भाषा शिकू नये असे कोणताही शहाणा मनुष्य आजतरी बोलणार नाही. पण इतर भाषांच्या प्रभावाने मायभाषेकडे दुर्लक्ष करू नये, तिच्या वापरात संकोच बाळगू नये हेही तितकेच खरे आहे. आपली भाषा आपल्या संस्कृतीची वाहक असते. भाषा टिकली तर संस्कृती टिकेल. मात्र आज सर्रास इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढलेला दिसतो. बोलतांना, मुलांना शाळेत घालतांना इंग्रजीचा पर्याय बहुतेक जण निवडतात. खोट्या प्रतिष्ठेपायी बरेच जण मराठी सोडून इतर भाषांना जवळ करण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. खरे म्हणजे इतर भाषा शिकणे वाईट मुळीच नाही पण आपल्या मातृभाषेला दूर करुन इतर भाषेचा स्वीकार व बडेजाव कधीही चांगला ठरणारा नाही. एखाद्या माणसाला एकापेक्षा जास्त भाषा येत असतील तर तो नक्कीच ज्ञानी असतो. माहितीचे भांडार त्याच्याकडे कांकणभर जास्तच असते असे निदर्शनास येते. भारतात, महाराष्ट्रात अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यात भारताचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, जेष्ठ कन्नड साहित्यिक गिरीश कर्नाड, मराठीतील श्रेष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर, रावसाहेब कसबे, अरुण टिकेकर, जेष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर अशा अनेकांचा समावेश होतो. माझे मार्गदर्शक आणि मित्र असलेले तसेच मराठीतील एक नामवंत समीक्षक व भाषेचे अभ्यासक डॉ. मिलिंद मालशे यांचे उदाहरण या संदर्भात बोलके ठरू शकेल. मुंबई येथील आयआयटी या भारतातल्या नामांकित संस्थेत इंग्रजी विषयाचे प्राध्यापक असलेल्या मालशे सरांनी इंग्रजी बरोबरच मराठी भाषेत मोठ्या स्वरूपात आपले लेखन केले आहे. मराठी भाषेसाठी त्यांनी केलेले काम खचितच महत्त्वाचे आहे. मराठी भाषेसाठी माझी ही सेवा आहे हा त्यांचा यामागील भावदेखील महत्त्वाचा आहे.

शासन आपल्या स्तरावर भाषेच्या विकासाठी, संवर्धनासाठी नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कार्य करण्याचा प्रयत्न करीत असते. महाराष्ट्र शासन देखील याला अपवाद नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मध्यंतरी शासनाने बऱ्यापैकी वातावरण निर्माण केले होते. पण या राज्यातले लोक जे या भाषेचे वाहक आहेत, त्यांनी स्वत:हून काही करायला हवे की नाही. मराठी शाळा बंद पडत आहेत म्हणून नक्राश्रू गाळणारे किती लोक या शाळा जिवंत राहाव्यात म्हणून आपली मुले त्यात घालतात? मराठी कानडी सीमाप्रश्नात किती लोक सीमाभागातील मराठी लोकांच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होतात किंवा आहे त्या ठिकाणांहून आंदोलनाला पाठिंबा देतात. रोजच्या जीवन व्यवहारात मराठीचा जाणीवपूर्वक वापर करणारे किती लोक आहेत? मराठी पुस्तकांची गोडी आपल्या मुलांना लावण्यासाठी कितीजण प्रयत्न करतात?, मराठी पुस्तकांच्या प्रदर्शनास कितीजण आपल्या मुलाबाळांना घेवून जातात आणि पुस्तके विकत घेतात? मराठी नाटक, सिनेमा बघण्यासाठी आपण किती आग्रही असतो? असे अनेक प्रश्न मराठी माणसांनी स्वत:ला विचारले पाहिजेत आणि त्यांच्या उत्तरांसाठी भाषिक कृती केली पाहिजे. नाहीतरी कुसुमाग्रजांनी लिहूनच ठेवले आहेच की....

मायमराठी मरते इकडे

परकीचे पद चेपू नका,

भाषा मरता देशही

मरतो संस्कृतीचाही दिवा विझे,

गुलाम भाषिक होऊन

आपल्या प्रगतिचे शिर कापू नका.

(लेखक एसएमआरके कॉलेजमध्ये मराठीचे

प्राध्यापक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images