Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अंपग कल्याणाची लोकभावना हवी

$
0
0

याप्रसंगी मंचावर समाज कल्याण विभागाचे विभागीय उपायुक्त यशवंत मोरे, संगिता कोचुरे, रोटरीचे माजी प्रांत पाल दादासाहेब देशमुख, डॉ. सुनील सौंदणकर उपस्थित होते. समाजात वावरतांना सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व सेवाभावी लोकांनी लग्न, वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमांसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात, तोच पैसा कर्णबधिर अपंगासाठी करावा. कर्णबधिरांसाठी अपंग कल्याणाची लोकभावना निर्माण झाली पाहिजे, अशी अपेक्षा कडू यांनी व्यक्त केली. कर्णबधीर, अपंगांसाठी शासकीय मदतीसाठी दारिद्रय रेषेखालील अट देखील रद्द करण्यात आल्याची माहिती आमदार कडू यांनी दिली.

समाजातील दुर्लक्षित व्यक्तींवर काम करणाऱ्या संस्थांना सामाजिक भावनेतून इतरांनी मदत करण्याची गरज आहे. सरकार देखील अशा संस्थेच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून मदत करीत असल्याचे यशवंत मोरे यांनी सांगितले. तसेच 'पडसाद' सारख्या कर्णबधिरांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे कौतुक करावे तेवढे कमी असल्याचे मत मोरे यांनी मांडले. परिषदेत देशभरातील कर्ण बधिरांसाठी काम करणारे २०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यात कान, नाक, घसा तज्ज्ञ, वाचा व उपचार तज्ज्ञ, पुनर्वसन तज्ज्ञ व विशेष शिक्षक, संस्था यांनी विविध विषयांवर आपले मत मांडले. परिषदेचा समारोप शनिवारी (दि. २३) यशवंतराव मुक्त विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या उपस्थित होईल. परिषद यशस्वीतेसाठी पडसाद संस्थेचे शंतनू सौंदणकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप गोंधळे, सचिव सुनील सौंदणकर, भारती गुळवे, नलिनी काळकर प्रयत्न घेत आहेत.

सुचेता सौंदाणकर यांना पुरस्कार कर्णबधिरांसाठी गेल्या २५ वर्षांपासून काम करीत असलेल्या पडसाद संस्थेच्या प्राचार्या सुचेता सौंदणकर यांनी रोटरीचा श्रवणविकलांग सेवा पुरस्कार आमदार कडू व रोटरीचे माजी प्रांतपाल देखमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कर्णबधिरांची अविरत सेवा करत राहणार असल्याचे सौंदणकर यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोटक्लब खरेदीची सरकार करणार चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गंगापूर धरणाच्या ठिकाणी साकारण्यात आलेल्या बोटक्लबच्या ठिकाणी ८ कोटी रुपये खर्चून विदेशी बोटी आणण्यात आल्या आहेत. विविध प्रकारच्या परवानग्या मिळाल्या नसताना या बोटी खरेदी करण्यात आल्याने या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी केली. `तान`च्यावतीने आयोजित पर्यटन प्रदर्शनाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.
नाशिकमधील वातावरण अल्हाददायक असल्याने पुण्या-मुंबईचे नागरिक नाशिकला येत असतात. गंगापूर धरण परिसरात तयार असलेला बोट क्लब जवळपास गेल्या वर्षभरापासून धुळखात आहे. यासंदर्भात माजी पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वीच याचा पाठपुरावा केला. त्यानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळाने हा बोटक्लब चालविण्याबाबत निविदा काढल्या आहेत. येत्या १५ फेब्रुवारीपासून हा बोटक्लब सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, व्हिजीलन्स पथक सतर्क असल्यामुळेच आयसिसमध्ये जाणाऱ्यांना अटकाव होऊ शकला आहे. राज्याच्या सर्व भागातच सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. बीड येथे घडलेल्या घटनेबाबत शिंदे म्हणाले की, या प्रकरणातील चौकशीचे आदेश आधीच देण्यात आले आहेत. बळीराजाला न्याय दिला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीसीएसचे नाशकात पहिले इनोव्हेशन सेंटर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिकमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) नागरिकांसाठीचे पहिले इनोव्हेशन सेंटर मार्चमध्ये सुरू होईल, अशी घोषणा कंपनीचे उपाध्यक्ष हसीद काझी यांनी शनिवारी केली. सहयोगी म्हणून कुंभथॉन काम पाहणार असून, या सेंटरमुळे नागरी समस्यांवरील संशोधनाला चालना मिळेल, असा विश्वास मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आला.

अंबड औद्योगिक वसाहतीमधील इंजिनीअरींग क्लस्टर येथे इनोव्हेटिंग फॉर बिलीयन्स या बूथ कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. २९ जानेवारीपर्यंत हा कॅम्प सुरू राहणार असून, त्याचे उदघाटन शनिवारी झाले. यावेळी काझी यांच्यासह विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, रमेश रासकर, कुंभथॉनचे सुनील खांडबहाले, सचिन पाचोरकर, सुभाष पाटील, जॉन वॉर्नर आदी उपस्थित होते. टीसीएस, एमआयटी, बॉस्टन, कुंभथॉन आणि प्रशासनाची डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने हा बूथ कॅम्प होत आहे. त्यामध्ये देशातील १५० इनोव्हेटर्स सहभागी झाले आहेत. यावेळी काझी म्हणाले, नागरी समस्यांवर उत्तरे शोधण्याचे आव्हान सर्वांसमारच आहे. या समस्या आरोग्य, पर्यावरण, शेती अशा विविध विषयांशी निगडीत आहेत. अशा समस्यांवर दिर्घकालीन आणि व्यापक स्तरावर उत्तरे शोधण्यासाठी हे सेंटर उपयुक्त ठरेल, असा विश्वास काझी यांनी व्यक्त केला.

प्रदुषणामुळे होणारी पर्यावरणाची हानी, कचरा व्यवस्थापन आणि तत्सम नागरी समस्या ही प्रशासनापुढील आव्हाने आहेत. त्यावर उत्तरे शोधण्यासाठी या इनोव्हेशन सेंटरची मदत व्हावी अशी अपेक्षा विभागीय आयुक्त डवले यांनी व्यक्त केली. नवनवीन संशोधनाद्वारे नाशिकचे नाव देशात उज्वल करण्याची आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची संधी या माध्यमातून प्राप्त झाली असून, या संधीचे सोने करावे, असे आवाहन त्यांनी केले. इनोव्हेशनसाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करण्यास तत्पर राहील अशी ग्वाही यावेळी गेडाम आणि कुशवाह यांनी दिली. हे सेंटर खरेतर गुजरातमध्ये सुरू करण्याचा कंपनीचा विचार होता. मात्र, नाशिकमधील संस्थांनी त्यासाठी घेतलेला पुढाकार आणि जिल्हा प्रशासनाने त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची दाखविलेली तयारी यामुळे हे सेंटर येथे सुरू होऊ शकले. इंदिरानगर परिसरात या सेंटरचे काम प्रगतीपथावर असून, मार्चमध्ये ते सुरू होईल. दर सहा महिन्यांनी तेथे नवीन १०० इनोव्हेटर्स येऊन काम करू शकतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट संकल्पनेतही मुलीच ‘स्मार्ट’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिक महापालिकेचा समावेश व्हावा यासाठी घेण्यात आलेल्या स्मार्ट सिटी संकल्पना, लोगोसह विविध स्पर्धामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. पहिल्या क्रमांचे ऑनलाइन स्मार्ट सूचना व संकल्पनेचे ५० हजाराचे बक्षीस आदिती कुलकर्णी या विद्यार्थिनीने पटकावले आहे. तर स्मार्ट नाशिकच्या लोगोमध्येही मुलींनेच बाजी मारली असून, ऋता कानडे या विद्यार्थिने तयार केलेला लोगो महापालिकेने स्मार्ट नाशिकसाठी स्विकारला आहे. या लोगोसाठी पालिकेने अकरा हजाराचे बक्षीस कानडे हिला दिला आहे. जवळपास २५ मुलींनी विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे.

स्मार्ट सिटी अभियानात शहरवासियांचा सहभाग व प्रतिसाद व्हावा यासाठी पालिकेने विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यासाठी लाखांची बक्षीसेही जाहीर करण्यात आली होती. यात लोगो, व्हिजन, स्मार्ट सूचना व संकल्पलना (ऑनलाइन), निंबध, रांगोळी, काव्य, घोषवाक्य चित्रकला स्पर्धांचा समावेश होता. नागरिकांनी त्यांच्या स्मार्ट सिटी संदर्भातील कल्पना मांडाव्यात असा उद्देश होता. या स्पर्धकांनी पाठविलेल्या कल्पना व सूचनांमधून पालिकेने केंद्र सरकारला स्मार्ट सिटी आराखडा सादर केला आहे. या विविध स्पर्धांचे निकाल पालिकेने जाहीर केले आहेत. त्यात ऑनलाइन स्मार्ट सूचना व संकल्पनेचे पहिले ५० हजाराचे बक्षीस आदिती रोहन कुलकर्णी या विद्यार्थीने पटकावले आहे. शहरात टीपी स्कीमबाबत सविस्तर संकल्पना मांडली असून, स्मार्ट सिटी प्रपोजलमध्ये त्याचा समावेश झाला आहे. तर जितेंद्र कन्सारा यांना द्वितीय (३० हजार रूपये), मोहन काळोगे तृतीय (२० हजार रूपये) बक्षीस मिळाले आहे. सोबतच अजय चांडक, ए. गोसावी, शिल्पा धामने, विशाल सांगळे यांना दहा हजार रुपयांचे पाच उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले आहे.

स्मार्ट लोगो स्पर्धेत ऋता कानडे या विद्यार्थिनीने पहिले अकरा हजाराचे बक्षीस मिळवले आहे. कानडे हीने तयार केलेला लोगो पालिकेने स्मार्ट नाशिकसाठी स्विकारला आहे. अम‌िर खान पठाण यांना द्वितीय (५ हजार रूपये) पारितोषिक मिळाले आहे. स्मार्ट सिटी प्रपोजसाठी पाठविलेल्या व्हिजनचे प्रथम पारितोषिक करण मेहता (साडेसात हजार रुपये) द्वितीय पारितोषीक एहसान मुजूमदार (५ हजार रुपये) तृतीय पारितोषिक हेमंत भालेराव (अडीच हजार रुपये) जाहीर झाले आहे. इतर स्पर्धांमध्येही मुलांनीच बाजी मारली आहे. २६ जानेवारीला स्मार्ट सिटी अभियांनातील शहरांची घोषणा केली जाणार आहे.

असा आहे 'स्मार्ट लोगो'

ऋता कानडे हीने तयार केलेला आकर्षक स्मार्ट लोगो पालिकेने स्मार्ट सिटी अभियानासाठी स्विकारला आहे. या लोगोत औद्योगिक प्रगती, रस्ते विकास, पोषक आल्हाददायक हवामान, नवीन संकल्पना, शिक्षण, सुरक्षितता, कृषी यांचे प्रतिबिंब चित्र रुपात समावेश करण्यात आला आहे. स्मार्ट सिटीची संपूर्ण संकल्पना या लोगोतून स्पष्ट होत आहे. येत्या सोमवारी (दि.२५) या स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषकांचे वितरण केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिमोट कंट्रोल जनतेसाठी वापरा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारमधील रिमोट कंट्रोल एकमेकांच्या हातात देण्याऐवजी या रिमोटचा उपयोग जनतेच्या भल्यासाठी करा, नाहीतर जनताच धडा शिकवेल, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री व शिवसेनेच्या कार्यकारी प्रमुखांना लगावला. तसेच, मुंबई महापालिका नालेसफाईत भ्रष्टाचार करणारे कंत्राटदार कोणासाठी काम करीत होते, याचा खुलासा करण्याचे आव्हानही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले. राज्यात एक हजार नव्हे तर, तीन हजार दोनशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचा दावाही मुंडे यांनी यावेळी केला.

नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील सत्तेतवर कोणाचा रिमोट कंट्रोल यावर सध्या शिवसेना आणि भाजपात संघर्ष सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या रिमोट कंट्रोलच्या वादावर मुंडे यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले की, रिमोट कंट्रोलचा उपयोग जनतेच्या हितासाठी कारावा, नाहीतर जनता धडा शिकवेल असा टोला लगावला. राज्य सरकार निष्क्रिय असून, नेते श्रेयवादात अडकले आहे. मुंबई महापालिकेतील नालेसफाई घोटाळ्याप्रकरणी चार कंत्राटदारांना अॅन्टी करप्शन ब्यूरोने अटक केली आहे.

मात्र, भ्रष्टाचार करणारे हे कंत्राटदार कुणासाठी काम करीत होते, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली. आयसिसचे जाळे राज्यात वाढले असल्याबद्दल चिंता व्यक्त करती, मुंडे यांनी पठाणकोठ हल्ल्यापूर्वीच सरकार सतर्क झाले असते, तर दहशतवादी कारवाया वाढल्या नसत्या असा दावा त्यांनी केला. सरकार जागे रा‌हिले असते हा हल्ला झाला नसता, असा आरोपही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चौकशीपेक्षा प्रकल्प मार्गी लावा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणातील मेगा पर्यटन संकुलातील बोटींच्या खरेदीची चौकशीची घोषणा करणाऱ्या गृहमंत्री राम शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीने सडकून टीका केली आहे. नाशिक विमानतळ, कलाग्राम आणि पर्यटन वृद्धीसाठी भुजबळांनी साकारलेल्या शेकडो प्रकल्पांच्या चौकशा अजून बाकी आहेत. त्यांच्याही चौकशी करणार का? असा सवाल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व आमदार जयंत जाधव यांनी केला आहे. आधी भुजबळांनी नाशिककरांसाठी निर्माण केलेले प्रकल्प सुरू करा, मग खुशाल चौकशा करीत बसा असा टोलाही त्यांनी लगावला.

आमदार छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम तसेच पर्यटन मंत्री असताना समर्पित भावनेने नाशिकला अनेक नवीन प्रकल्प साकारले. त्यासाठी त्यांनी राज्य शासनासोबतच केंद्राचा निधी आणून नाशिक शहराच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले जागतिक दर्जाचे मेगा पर्यटन संकुल गंगापूर धरणाजवळ साकारले. या संकुलामध्ये बोट क्लब, ग्रेप पार्क रिसोर्ट, साहसी क्रीडा संकुल, कन्व्हेन्शन सेंटर प्रकल्प साकारले. भारतातील एकमेव अद्वितीय असे अत्यंत सुसज्ज बोट क्लब येथे निर्माण करण्यात आले आहे. त्यानंतर हे बोट क्लब नियमितपणे चालू ठेवणे हे सरकारचे काम होते. मात्र, यांच्या दुर्लक्षामुळे दोन वर्षे उलटूनही हे बोट क्लब अजूनही सुरू करण्यात आलेले नाही. यात भुजबळांचा काय दोष? भुजबळ सत्तेत असते तर कधीच हे बोट क्लब नाशिककर आणि पर्यटकांच्या सेवेत कार्यान्वित झाले असते.

भुजबळांनी अद्ययावत तयार केलेले प्रकल्प तुम्ही सुरू करू शकत नाही, तर तुम्हाला चौकशांचा नैतिक अधिकार आहे का?, असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका कॉलेजकडून अखेर फी परत

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

ऑनलाईन परीक्षा फीद्वारे एनव्हायर्नमेंट सायन्स आणि इंटरनल एक्साम फी पुन्हा उकळण्याचा प्रकार 'मटा'ने उघडकीस आणल्यानंतर कॉलेज प्रशासनाला जाग आली आहे. शहरातील एका कॉलेजने विद्यार्थ्यांना फी परत करण्यास सुरुवात केली असून, इतर कॉलेजला केव्हा जाग येणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून येत्या एप्रिल-मे महिन्यातील वार्षिक परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज मागवले जात आहेत. कॉलेज प्रशासनाने एनव्हायर्नमेंट सायन्स आणि इंटरनल एक्साम फी ही विद्यार्थ्यांच्या प्रवेशावेळी घेतली होती. तरीही ही जास्तीची फी शहरातील कॉलेजेस ऑनलाइन अर्जासोबत घेत असल्याचा प्रकार 'मटा'ने समोर आणला. शहरातील प्रमुख कॉलेजपैकी एक असलेल्या कॉलेजला यामुळे जाग आली असून, त्यांनी विद्यार्थ्यांना अधिकची फी परत देण्यास सुरुवात केली आहे. आर्ट्स शाखेकडून ९९० ऐवजी ४९० रूपये तर सायन्स शाखेकडून ११०० ऐवजी ९०० रूपये फी आकारण्यासही या कॉलेजने प्रारंभ केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडला हटवली होर्डिंग

$
0
0

नाशिकरोड : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने नाशिकरोड येथे बहुतेक सर्वच राजकीय पक्षांचे फलक न्यायालयाच्या आदेशाने काढून दणका दिला. राजकीय २१, व्यावसायिक ६२ असे ८३ फलक हटविण्यात आले. त्यामध्ये रिपब्लिकन व पीपल्स रिपब्लिकनचे प्रत्येकी चार, श्रमिक सेना व शिवसेनेचे प्रत्येकी तीन, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व छावा संघटनेचे प्रत्येकी दोन, बिझनेस बँकेच्या कर्मचारी सेनेच्या फलकाचा समावेश होता. अधीक्षक सुधाकर वसावे, सहाय्यक एस. टी. कारवाल, नंदू गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू झाली. यात दोन ट्रक माल जप्त करण्यात आला. शनिवारी शिवाजी पुतळा, जेलरोड, दुर्गा गार्डन, मुक्तीधाम मंदिर, दत्तमंदिररोड येथील फलक हटविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घोटीत ६३ लाखांची घरफोडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

घोटी येथील डहाळे ज्वेलर्सचे मालक कैलास डहाळे हे आपल्या कुटुंबासह तीन दिवस देवदर्शनासाठी गेले असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६३ लाख रुपयांची रोख रक्कम व पाच तोळे सोन्याचे दागिने असा एकूण जवळपास ६५ लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी धाव घेत बंगल्याचा पंचनामा केला. श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना बोलावूनही तपासाबाबत दिशादायक धागेदोरे मिळू शकलेले नाहीत.

घोटी शहरातील कैलास तुकाराम डहाळे यांचा नरहरिनगर परिसरात डहाळे निवास हा बंगला आहे. डहाळे यांनी घोटी बाजारपेठेतील दुसऱ्या घराच्या खरेदीच्या व्यवहारासाठी नातलगाकडून काही रक्कम गोळा करून त्यात वडिलांच्या सेवा निवृत्तीचे पैसे अशी एकूण ६३ लाख २५ हजार रोख असे हे पैसे बंगल्यातील गोदरेजच्या कपाटात एका बॅगमध्ये ठेवले होते. डहाळे कुटुंबीय १९ जानेवारी रोजी कुलूप लावून तीर्थयात्रेला रवाना झाले. तीर्थयात्रा आटोपून शुक्रवार रात्री आठ वाजेच्या सुमारास घरी परतले. दर्शनी दरवाजाने घरात प्रवेश करताच घरातील मागील दरवाजा उघडा दिसला. त्यांनी तत्काळ बेडरूममध्ये जाऊन कपाट बघितले तेही तुटलेल्या अवस्थेत दिसले. त्यातील पैशांची भरलेली बॅग व सोने गायब झाल्यामुळे त्यांना धक्का बसला. या घटनेची माहिती त्यांनी घोटी पोलिसांन दिली. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलिस अधिकारी मनोहर पाटील, पोलिस उपनिरीक्षक कमलेश बच्छाव, गणेश शेळके, पोलिस कर्मचारी नवनाथ संदीप शिंदे आदींनी घटनास्थळी जाऊन तपास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इराणीच्या अटकेने आठ गुन्हे उघडकीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रीरामपूर येथील एका इराणीस अटक केल्यानंतर इंदिरानगर पोलिस स्टेशन व उपनगर पोलिस स्टेशन हद्दीत घडलेले आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कोल्हार येथील एका सराफास जेरबंद केले असून, त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील २५ तोळे वजनाचे सोने हस्तगत केले आहे.

शहरातील इंदिरानगर आणि उपनगर पोलिस स्टेशन हद्दीत २०१५ मध्ये घडलेल्या चेन स्नॅचिंग व तोतया पोलिसांच्या गुन्ह्यात पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना इंदिरानगर पोलिसांना श्रीरामपूर येथील कंबर नूर अली या संशयिताची माहिती मिळाली. इंदिरानगर पोलिसांच्या पथकाने श्रीरामपूर येथे सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने इंदिरानगर पोलिस स्टेशन हद्दीत केलेल्या चार पोलिस बतावणी व दोन चेन स्नॅचिंगची कबुली दिली.

अलीने उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत सुध्दा दोन वेळेस तोतया पोलिस बनून वृध्द व्यक्तींकडील सोन्याची चोरी केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. चोरी केलेला सर्व मुद्देमाल अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हार येथील अजय विजय देडगावकर या सराफाकडे विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी लागलीच कारवाई करीत संबंधित सराफाला अटक केली. त्याच्याकडून २५ तोळे वजनाचे सोने हस्तगत केल्याची माहिती पोलिस उपायुक्त धिवरे यांनी दिली.


आत्महत्येस प्रवृत्त ‌केल्याप्रकरणी गुन्हे दाखल


वेगवेगळ्या घटनांमध्ये ​दोन विवाहितांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पंचवटी तसेच, उपनगर पोलिस स्टेशनमध्ये सासरच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पंचवटीतील हिरावाडी परिसरातील भगवतीनगर येथील गोकुळ सदन येथे राहणाऱ्या वैशाली नितीन दळवी (वय ३५) व संशयित आरोपी अर्चना प्रताप दळवी या नात्याने जावा आहेत. श्रीरामपूर येथे राहणाऱ्या अर्चनाने वेळोवेळी वैशाली यांचे पती व त्यांच्यात भांडणे लावली. अर्चनामुळे होणाऱ्या सततच्या गैरसमजांमुळे वैशाली यांनी २१ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात रॉकेल टाकून पेटवून घेतले. वैशाली दळवी यांच्यावर उपचार सुरू असताना घेतलेल्या जबानीनुसार पोलिसांनी अर्चना दळवीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.

विवाहितेने आत्महत्या करण्याची आणखी एक घटना जेलरोडवरील दसक ​परिसरातील सदगुरू मंगल कार्यालयाजवळ घडली. सन २०११ मध्ये विवाह झालेल्या पूनम ऊर्फ रूपाली विशाल महाजन या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून शुक्रवारी आत्महत्या केली. हुंड्यासाठी छळ होत असताना पूनमला दुसरी मुलगी झाल्याने पती विशाल महाजन, सासू कमलबाई महाजन, सासरे खंडू महाजन, नणंद मीनल महाजन आदींनी पूनमला मानसिक व शारीरिक त्रास दिला. या प्रकरणी रमेश दोधू माळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला.

वृध्देचा मृत्यू

भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत ७० वर्षाची वृध्दा ठार झाली. ही घटना त्र्यंबकेश्वररोडवरील सातपूर पोलिस स्टेशनजवळील चौकात १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. शांताबाई रामचंद्र जाधव असे या वृध्द महिलेचे नाव आहे. उत्कर्षनगर परिसरातील घर नंबर ४२ येथे राहणाऱ्या शांताबाई जाधव रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या एका दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक मारली. यानंतर दुचाकीस्वार फरार झाला. तर, जाधव यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उपचार सुरू असताना जाधव यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजी रामचंद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला.

घोडेस्वाराविरोधात गुन्हा

इंदिरानगर येथील सिटी गार्डन परिसरात धोकादायक पध्दतीने घोडस्वार करून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी, साईनाथनगर येथे राहणाऱ्या सचिन राजू जाधव यांनी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. सचिन जाधव यांचे वडील राजू देवराम जाधव (वय ५४) आपल्या नातीला घेऊन फिरण्यासाठी सिटी गार्डन येथे गेले होते. घोड्याने राजू जाधव यांना जोराची धडक दिली. रस्त्यावर पडल्यामुळे जाधव यांना दुखापत झाली. या घटनेनंतर घोडेस्वाराने धूम ठोकली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी अज्ञात घोडेस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला.

प्रेमवीराच्या हल्ल्यातील दुसऱ्या युवकाचाही मृत्यू

नाशिकरोड : जेलरोड येथे सूडाने पेटलेल्या प्रेमवीराने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुमेध सुनील गुंजाळ या दुसऱ्या युवकाचाही शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी स्वप्निल दोंदे या जखमी युवकाचा मृत्यू झाला होता. या दोघांच्या हत्येप्रकरणी उपनगर पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अटक केली असून, ते न्यायालयीन कोठडीत आहेत. गेल्या शनिवारी जेलरोडच्या भीमनगर शेजारील संघमित्र हौसिंग सोसायटीजवळ नंदादीप जाधव, सुमेध गुंजाळ व स्वप्निल दोंदे हे युवक उभे होते. मुख्य संशयित विठ्ठल आव्हाड एका मुलीशी प्रेसच्या भिंतीजवळ बोलत उभा होता. स्वप्निल दोंदे व नागरिकांनी आव्हाडला तेथून जाण्यास सांगितले. रात्री आव्हाड, आशिष पगारे व काळू पगारे या तिघांनी नंदादीप जाधव यांना शिविगाळ करून लोखंडी पाइपने मारहाण केली होती.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेतील २६ तोळे सोने गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोने तारण कक्षाच्या लॉकरमध्ये ठेवलेले जवळपास २६ तोळे वजनाच्या सोन्याचे दागिने गायब झाले आहेत. या कक्षाची जबाबदारी असलेल्या तिघा उपव्यवस्थापकांवर अपहाराचा गुन्हा दाखल झाला असून, हा प्रकार बँक ऑफ महाराष्ट्राच्या शरणपूररोडवरील शाखेत घडला आहे. दर तीन महिन्यांनी होणाऱ्या बँकेच्या ऑडिटमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर व्यवस्थापनाची एकच धावपळ उडाली.

याप्रकरणी बँकेचे मॅनेजर लक्ष्मीकांत बहरराव संगणबटला यांनी निशा प्रियदर्शनी, अर्चना मगर आणि जयेश आंबेकर या तिघा उपव्यवस्थापकांविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. शरणपूररोडवरील सुयोजित संकुलमध्ये असलेल्या शाखेत सोने तारण विभाग कार्यरत असून, बँकेच्या एका खातेदाराने त्यांच्याकडील २५ तोळे ७७ ग्रॅम वजनाचे​ सोने बँकेकडे गहाण ठेवले होते. अशा पध्दतीने जमा होणारे सोने बँकेच्या एका लॉकरमध्ये बंद पाकिटात ठेवले जाते. या पाकिटावर दागिन्यांचा तसेच कर्जदाराचा सर्व तपशील नमूद असतो. खातेदाराने आपल्या कर्जाची रक्कम जमा केल्यानंतर हे पाकीट कर्जदाराला परत करण्यात येते. या लॉकरमध्ये असलेल्या सर्व दा​गिन्यांबाबत दर तीन महिन्यांनी ऑडिट केले जाते. मागील तिमाहीच्या ऑडिटनुसार खातेदार डॉ. रामनाथ पाटील यांचे खात्याचे पाकीट क्रमांक जी/४३ गायब असल्याचे व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यानुसार बँक व्यवस्थापकांनी या विभागाची जबाबदारी असलेल्या प्रियदर्शनी, मगर आणि आंबेकर यांच्याकडे चौकशी केली. मात्र, त्या पाकिटाबाबत काहीच माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. सोने तारण विभागाच्या चाव्या वरील तिघा उपव्यवस्थापकांकडेच असल्याने याठिकाणी अन्य कोणाचा जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो आहे. त्यानुसार तिघा अधिकाऱ्यांवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय व्यवस्थापकांनी घेतला.

या घटनेची चौकशी सुरू आहे. दागिने गहाळ असल्याची माहिती ऑडिटच्या माध्यमातून समोर आली आहे. या ऑडिटचा तपशील पाहून संशयितांचा माग काढण्यात येईल. गुन्हा दाखल असलेल्या तिघा उपव्यवस्थापकां​व्यतिरिक्त आणखी कोणाचा सहभाग असू शकतो. तशी शक्यता नाकरता येत नाही.

- डॉ. सिताराम कोल्हे,

वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सरकारवाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व्हिस रोड आजपासून खुला

$
0
0

पंचवटी : आडगांव नाका ते आडगांव दरम्यानचा नवीन बळी महाराज मंदिर समोरील सर्व्हिस रोडचे काम झाले आहे. सर्व्हिस रोड सर्व प्रकारच्या वाहनासाठी वाहतुकीस सोमवारपासून (दि. २५) खुला होणार आहे.

महामार्गाचे रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर सर्व्हिस रोडचे काम त्वरित होईल, अशी नाशिककरांना आशा होती. पण वर्षभर काम रखडले. गेल्या महिन्यात सर्व्हिस रोडच्या कामास सुरुवात झाली आणि पूर्ण झाले व सोमवारपासून रोड खुला होणार असल्याने परिसरातील रहिवाशी आणि वाहनचालक यांनी समाधान व्यक्त केले आहे. सर्व्हिस रोडमुळे आडगावकडून स्टेडियम आणि के. के. वाघ कॉलेजपर्यंत प्रवास सोपा होणार आहे. अपघाताचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तराजुचा समतोल हवाच!

$
0
0



- वृन्दा भार्गवे

दारिद्र्यरेषेखालील वस्त्यांमध्येच हट के स्टाईलचा प्रभाव असतो असे नव्हे. मध्यम वा उच्च मध्यमवर्गीय अशा काही घरांमध्ये जगण्याच्या पद्धतीत नकळत गोंधळ झालेला दिसतो. या घरात अगोदरच्या पिढीला, तुम्हाला नाही कळणार.. या गटात टाकले जाते परवलीचे हे तीन शब्द आजकाल शस्त्रासारखे वापरले जातात. या शब्दात उपेक्षा अवहेलना असते असे नाही. पण यातील सूर मात्र तुमचे अज्ञान दर्शविण्याचा असतो. तुम्हाला नाही कळणार असे ठासून सांगण्यामागे तुमचा काल तुम्ही कवटाळून बसला आहात. तो जरा बाजूला ठेवा असे सांगणे असते. स्मार्ट फोनचे फंक्शन असो किंवा शॉपिंग, तुम्ही नका येऊ, तुम्हाला त्यातले नाही कळणार, कॉलेजच्या डेजची मजा पाहायला येऊ का असा प्रश्न घरातल्या वडिलधाऱ्याच काय पण पालकांनी (मुळात तो असा प्रश्न विचारणे अशक्य) विचारला तर तुम्हाला नाही कळणार.. हे उत्तर ठरलेले. आपल्याला गरज भासते ती निव्वळ तांत्रिक बाबतीत हे पालकांचे म्हणणे. जसे पासवर्ड बदलायचा असल्यास.. राऊटर जोडण्यासंदर्भात, वायफाय कसे कोठून मिळवायचे, फाईल अटॅच कशी करायची, एखादा मजकूर कसा सेव्ह करायचा, कॉपी पेस्ट केल्यावर पुढे काय? विशेषत: PDF कसे करायचे, सेव्ह केलेला मजकूर कुठे आहे हे लक्षात कसे ठेवायचे?

अत्यंत साध्या सोप्या शाळकरी मुलगा सोडवू शकेल अशा या शंका आहेत,असे वाटू शकेल. पण अनेकांची गोची होते ती वरवर वाटणाऱ्या साध्या बाबतीत. आपल्या आई-वडिलांनी घेतलेला नवीन स्मार्ट मोबाइल या तरुणांसाठी डोकेदुखी ठरते. घरच्यांना कितीवेळेस समजावून सांगितले तरी ते चकित नजरेने त्याकडे पाहात राहतात. अरे, तू हे केले कसे, हा त्यांचा प्रश्न निरागस वाटला तरी तो आम्हाला irritate होऊ शकतो, हे या तरुणांचे स्पष्टीकरण. मुलभूत गोष्टींमध्ये घरचे अडकतात. contact list मधील नंबर त्यांना सापडत नाही. मेसेज लिहिताना तो खालीवर लिहिला जातो, मध्येच अक्षर मध्येच आकडे लिहिता येत नाही. एकाचा मोबाइल नंबर दुसऱ्याला कसा पाठवायचा हा त्यांना पडणारा गहन प्रश्न.

मुलांना अजिजी करत, शिकव की तू, बैस आमच्याजवळ, वडिलधाऱ्याजवळ बसायचे नाही त्यांना नीट समजावयाचे नाही ही तुमची सवय, आम्ही प्रयत्न करतो शिकण्याचा. हे पालुपद म्हणणारे, आपल्या जगण्याची पद्धत अत्यंत वाईट कशी यावर बोलत राहतात तेंव्हा त्यांच्याशी नेमके कसे वागावे हे या तरुण-तरुणींना समजत नाही. तीनतिनदा समजावले तरी या विषयात त्यांना स्वारस्य नाही, हे या तरुणांना कळते. त्यांचा वेळ त्यांना या गोष्टीत घालवायचा नसतो. आपल्या एखाद्या मित्राचे वा मैत्रिणीचे वडील जर मुलभूत प्रश्न विचारून भंडावून सोडत असतील तर मात्र मोफत मार्गदर्शन करायला ते तयार असतात. हेच आपल्याच घरातल्यांना समजावून सांगायचे म्हटले की त्यांच्या अंगावर काटा येतो आणि हे पुन्हा एकदा समजावल्याने काय बिघडणार आहे? नाही कळत एखाद्याला तंत्रज्ञान. लागतो वेळ शिकायला. अशा लंगडया सबबी दिल्या तरी मुलगा ऐकत नाही म्हटल्यावर त्याच्या लाईफस्टाइलवर मोठ्यांकडून आक्षेप घेतला जातो.

शेवटी तंत्राला शरण जाणारे तरुण तुम्हाला नाही कळणार म्हणत समजावण्याचा कंटाळा करतात. त्यांच्या स्मार्टफोनवर अपलोड आणि डाऊनलोडचा ते खेळ खेळत असतात. हे या गटाला कळत नाही. अत्यंत वेगाने त्यांची बोटे चालतात, ती गेमचा स्कोर करण्यासाठी. दुसरीकडे तंत्रज्ञान अवगत करणारे साधे कोर्सेस करून इ-पेपर वाचणारे, यू-ट्यूबवर गुलजार वा चेतन भगतची मुलाखत पाहणारे, इ-साहित्य संमेलन घरबसल्या पाहिले पाहिजेच हे समजणारे, अनेक सिनेमे उत्तमोत्तम मुलाखतीचा यू-ट्यूबवर आस्वाद घेणारे, ऑनलाइन शॉपिंग लीलया करत घरात काय हवे नको ते पटकन ऑर्डर करणारे ज्येष्ठ नागरिक तुम्हाला नाही कळणार या नव्या लाईफस्टाइलने आम्हाला काय दिले, असे दाखवून देतात आणि हा जगण्याचा अपरिहार्य भाग आहे, तो आता जाणून घेतला पाहिजे हे मान्य करतात तेंव्हा त्या विचारसरणीचे कौतुक करावेसे वाटते.

वरवर पाहता यात जीवनशैलीचा संबंध येतो कुठे असे वाटेल, पण घर तेच असते. त्यात एकजण दुसऱ्याला नाकारण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. एकाचे सतत मोबाइलशी खेळणे दुसऱ्याला सहन होईनासे होते, पहिल्याला त्याचा उपयोग नीट न करता येणे याची चीड वाटणे, काही वेळेस तंत्राशी आपण खेळायला हवे हा आग्रह तयार होतो. आपल्या जीवनशैलीवर साठी उलटलेल्यांनी अतिक्रमण का करावे असे वाटू लागते. त्यांनी मोबाइल वापरावा, तो केवळ फोन कॉल घेण्यासाठी किंवा करण्यासाठी. बाकी इतर फंक्शन येत नसतील तर एवढा आटापिटा कशाला? याचे पर्यवसान वेगळीकडे होते. बरेचदा साठीत पोहोचलेल्यांना ज्या भेटी दिल्या जातात त्यात समई, निरांजन, शाल, मफलर, स्वेटर, अशा वयाची चाहूल सांगणाऱ्या भेटी दिल्या जातात. चांगले शुज, उत्तम पेन ड्राईव्ह, चांगले gazette असे फार कमी वेळेस भेट दिले जाते. आता याच भेटी आपल्यासाठी योग्य. हा समजुतीचा घोटाळा मग सुरू होतो. प्रौढांसाठीची ही जीवनपद्धती घरादारात स्वीकारली जाते.

दुसऱ्या बाजूला आपल्याला अधिक कळते, कारण घरबसल्या आपण ट्रेनचे, विमानाचे तिकीट काढू शकतो, २९९९ रुपयात दिलवाले सिनेमात शाहरुखने घातलेले काळे जॅकेट ऑनलाइन मागवू शकतो. टीव्हीचा रिचार्ज भरू शकतो. मुख्य म्हणजे सांगाल ते काम सोपे करू शकतो. आपल्यावर अनेक बाबतीत आपले घर अवलंबून आहे. याचा अहंगंड निर्माण झाला की यांना काय कळते हा प्रश्न गडद होऊ लागतो.

पहिल्या गटाचा तुम्हाला नाही कळणार हा गतकाळावर आधारित,अनुभव निष्ठ असा आतला स्वर. जो उच्चारल्यावर ते भावूक होणार. गेलेले दिवस, आपले तारुण्य, त्या काळात केलेले धाडस. आपले वाचन, कॉलेज आणि नोकरी दोहोंचा समतोल साधत जगण्याची ती धडपड, हे कोणी ऐकून घेत नाही म्हणून खंतावलेली स्थिती. त्या अवस्थेत दुसऱ्या गटाशी रोज होणारा सामना. तुम्हाला नाही कळणार असे निव्वळ तंत्रावर हुकुमत असलेल्या तरुण गटाने आपल्याला म्हणणे वडिलधाऱ्यांना खटकत राहते. यावर उपाय एकच. परस्परांना समजून घेणे, नाही कळणारपासून कळण्याच्या शक्यतांपर्यंत जाणे.

(लेखिका साहित्यिक तसेच तरुणांच्या भावविश्वाच्या अभ्यासक आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग शिक्षणाचा प्रचारक

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

वयाच्या एका टप्प्यापर्यंत किसन जाधव यांना जगण्याचा अर्थ उमजत नव्हता, दिशा मिळत नव्हती, काय करावे हे सुचत नव्हते मात्र त्यावेळी योगाशी त्यांचा संपर्क आला आणि संपूर्ण जीवनाला कलाटणी मिळाली. याच योगाने सामाजिक प्रतिष्ठा तर मिळवून दिली. पण ताठ मानेने, अभिमानाने कसे जगायचे हे देखील शिकवले. वयाची ७० व्या वर्षी योग प्रचार आणि प्रसाराचे कार्य किसन जाधव करित आहेत.

किसन जाधव हे मुळचे नाशिकचे अत्यंत कमी वयात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) येथे नोकरीला लागले. एचएएलमध्ये ओव्हर टाईम असल्याने जेवणाच्या वेळा पाळल्या जात नव्हत्या. त्यामुळे नोकरीला असलेल्या अनेक तरुणांना कोणत्या ना कोणत्या व्याधीने ग्रासायला सुरुवात केली. यावेळी किसन जाधव यांना देखील पोटदुखीने त्रस्त केले. सुरुवातीला किरकोळ वाटत असलेल्या आजाराने कालांतराने अत्यंत रौद्ररुप धारण केले. या आजारातून बाहेर पडण्यासाठी जाधव यांनी आटोकाट प्रयत्न केले. जिल्ह्यातीलच नव्हे तर मुंबई पुण्याच्या डॉक्टरांकडील औषधे घेऊन देखील फरक पडत नव्हता. त्याचवेळी एका मित्राने सांगितले तुझी सर्व औषधे घेऊन झाली असतील तर मी एक पत्ता देतो, तेथे जा आणि काही फरक पडतो का ते बघ. असे म्हणून त्यांनी नाशिकच्या योग विद्याधामचा पत्ता दिला. साधारणता १९८० च्या सुमारास किसन जाधव हे योग विद्याधामच्या संपर्कात आले आणि योगाभ्यास करण्यास सुरुवात केली.

एक महिन्याचा योग वर्ग पूर्ण केल्यानंतर पोट दुखी काही अंशी कमी होत असल्याचे जाणवले. हजारो रुपये खर्च करुन जी गोष्ट साध्य झाली नाही ती काहीही पैसे न खर्च करता नियमित योगाने पोटदूखी पूर्णतः बंद झाली. येथूनच खऱ्या अर्थाने योगाभ्यासाला सुरुवात झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यानंतर याच संस्थेत योग प्राध्यापक पर्यंतचे शिक्षण पूर्ण करुन योग प्रचाराच्या कार्याला वाहून घेतले. कामगार वर्गात काम करताना चारचौघात बोलण्याची भीती वाटत असे तीदेखील या अभ्यासाच्या माध्यमातून दूर झाली. चारचौघांमध्ये आपले विचार पटवून देता येऊ लागले. आपल्या परीने योगाचा प्रसार व्हावा म्हणून नोकरीच्या जवळील ओझर टाऊनशिप, ओझरगाव, कसबे सुकेणे, साकोरा, भाऊसाहेब नगर अशा ठिकाणी योग वर्ग सुरू करुन प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक ठिकाणी योगावर व्याख्याने देण्याचा, लेख लिहिण्याचा योग आला आणि स्वतःची एक ओळख निर्माण झाली. पंचवटीतील स्वामीनारायण मंदिरात त्यांनी पंधरा वर्षे लोकांना योग शिक्षणाचे धडे दिले असून सीबीएस जवळील बिटको हायस्कूलमध्ये मागील आठ वर्षांपासून योगाचे शिक्षण देण्याचे काम करीत आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी ६ ते ७ या कालावधीत पंचवटीमध्ये योग वर्ग घेण्याचे काम जाधव करतात. सकाळी ४ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत अखंड योग याच विषयावर त्यांचे कार्य सुरू असते. आजपर्यंत १० हजारावर लोकांना योग शिक्षणाचा लाभ करुन दिला आहे. सुरुवातीला त्यांच्या योग शिक्षणावर टिंगल टवाळी करणारेही त्यांच्या कार्याला जुंपले आहे. त्यांनाही योगाची अनुभूती मिळाली आहे. एचएएलमध्ये अनेक रशियन लोक कामानिमित्त येतात त्यांना देखील योगाचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य जाधव करतात. त्यांच्या कामाचे महत्त्व पटल्याने जनरल मॅनेजरपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत अनेक लोक सन्मानाची व आदराची वागणूक देतात. याच योगामुळे मला प्रतिष्ठा, सन्मान मिळाला असे ते म्हणतात. ईश्वराने मानवाला दिलेली ती देणगी आहे. मला लाभ झाला तो मी इतरांना देण्याचा प्रयत्न करणार. कितीही वय झाले तरी अखेरच्या श्वासापर्यंत योग प्रसार व प्रचाराचे कार्य सुरुच ठेवणार असे ते म्हणतात.
ज्येष्ठ नागरिक म्हटलं की वयाचा उत्तरार्ध आणि त्यामुळे कमी झालेला अॅक्टीव्हनेस असाच बऱ्याचजणांचा समज असतो. पण अनेक ज्येष्ठ हे केवळ वयाने वृध्द असतात, त्यांचं मन मात्र तरुणच असतं. त्यांच्या कामातून, समाजेसेवेतून किंवा अन्य अॅक्टीव्हीटीजमधून ते आपण अजूनही तरुण आहोत हे दाखवून देतात. अशाच ज्येष्ठांसाठीचं हे व्यासपीठ म्हणजे आमचा 'यंग सिनियर्स' कॉलम. चला तर मग तुम्ही जर असे यंग सिनियर असाल तर थेट आमच्याशी संपर्क करा किंवा तुमच्या ओळखीत, पाहण्यात असं कोणी असेल तर त्यांचा नाव सुचवा. योग्य व्यक्तींना या सदरातून नक्कीच प्रसिध्दी दिली जाईल.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डींग, तिसरा मजला, डिसुझा कॉलनी कॉलेज रोड, ना‌शिक

समन्वय : फणिंद्र मंडलिक ९४२३१७४४९५

ई-मेल : fanindra.mandlik@timesgroup.com

(पाकीट आणि ई-मेलवर 'यंग सीनिअर्स' उल्लेख करावा)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण संवर्धनासाठी बहुउद्देशीय चूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथील नवनाथ पवार या शेतकऱ्याने पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेत पर्यावरणपूरक आणि कमी खर्चात जास्त कार्यक्षम बहुउद्देशीय चूल तयार केली आहे. चूलीत या जाणारे इंधन व त्यामुळे होणारी पर्यावरण हानी टाळण्यासाठी त्यांनी ही चूल तयार करून आजच्या पिढीपुढे आदर्श उभा केला आहे.

केवळ तिसरीपर्यंत शिक्षण घेतलेल्या पवार यांनी ५१व्या वर्षी हे संशोधन केले आहे. दररोज वापरात येणारी चूल ५५ ते ६० टक्के कार्यक्षम असते. उर्वरित ४० ते ४५ टक्के ऊर्जा ही चुलीतून रेडीएशनच्या रुपाने वातावरणामध्ये वाया जाते. तसेच या चुलीमध्ये हवा व इंधनाचे प्रमाणही आवश्यकतेनुसार मिळत नाही. त्यामुळे इंधन अर्धवट जळते आणि कार्बनडाय ऑक्साईड आणि सल्फरही जास्त प्रमाणात उत्सर्जित होतो. त्यामुळे प्रदूषणवाढीची समस्याही निर्माण होते. हे टाळण्यासाठी काय करता येईल, हा विचार पवार यांच्या मनात आला आणि त्यानुसार त्यांनी यावर पर्याय शोधण्यास सुरुवात केली. संपूर्ण जग हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे त्रस्त झाले असतांना या संशोधनामुळे हे वाढत असणारे तापमान कमी होण्यास हातभार लागेल, असा विश्वास त्यांना वाटतो.

या नवीन संशोधनामुळे वाया जाणाऱ्या उष्णतेपासून एकाचवेळी चुलीवर स्वयंपाक बनविणे, पाणी गरम करणे या कामांबरोबरच इंधनाची मोठ्या प्रमाणात बचतही होणार असल्याचा दावा पवार यांनी केला आहे. चुलीची कार्यक्षमता वाढणार असल्याने इंधनाची बचतही मोठ्या प्रमाणात होणार आहे. या अनोख्या चूलचे संशोधनाचे पेटंट लवकरच नवनाथ पवार यांच्या नावे होणार आहे. तसेच लवकरच ही चूल बाजारात आणण्याचा त्यांचा निर्धार आहे.

--

मुलाच्या कामातून घेतली प्रेरणा

नवनाथ पवार यांचा मुलगा राजेंद्र पवार यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक.मध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांच्या नावे ऑटोमोबाइल एनर्जी, इरिगेशन यासारख्या विविध क्षेत्रातील पेटंटही आहेत. मुलाच्या या कार्याने प्रेरित होऊन नवनाथ पवार यांनी 'उष्णता कार्यक्षम आणि बहुउद्देशीय अशी चूल' बनविण्याचा अनोखा निर्णय घेऊन एक प्रकारे पर्यावरणाचे संतूलन राखण्यास मदत केली आहे.

--

भारत, दक्षिण आफ्रिका, झिमाम्बे यांसारख्या विकसनशील देशांमध्ये आज पण जेवण बनविण्यासाठी चुलीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जगामध्ये साधारणतः आठ ते दहा कोटी झाडांची तोडणी ही चुलीसाठी लागणाऱ्या इंधनाकरिता केली जाते. या संशोधनामुळे इंधन कमी लागणार असून, परिणामी इंधनाची बचत आणि प्रदूषण कमी होण्यास नक्कीच मदत होईल. - नवनाथ पवार, संशोधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मुक्त’ विधाने, ‘आरोग्य’ शहाणे

$
0
0

- अशांत किरकिरकर
असहिष्णुतेच्या वादाची झालर असलेल्या समाजाला सध्या शैक्षणिक क्षेत्रातील तत्त्वज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज असताना एखाद्या क्षुल्लक कारणावरून त्यांनीच आपआपसात भांडण सुरू केले तर सामान्य माणसाने कुणाच्या तोंडाकडे पाहायचे असा गंभीर प्रश्न निर्माण होतो. असेच काहीसे झाले आहे, मुक्त विद्यापीठ कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. अरूण जामकर यांच्यात. एका अभ्यासक्रमावरून या दोघांमध्ये चांगलाच वाद पेटलेला असून मुक्त विद्यापीठाने हा विषय प्रतिष्ठेचा केल्याने प्रश्न सुटण्याऐवजी त्यातील गुंता आणखी वाढला आहे.

कुलगुरू आणि वाद हे आता जणु समीकरणच झाले आहे. सध्या तर विद्यापीठातील वादग्रस्त पद म्हणूनच कुलगुरूपदाकडे पाहिले जाते याचे कारण म्हणजे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी निवृत्तीवेतनावरून पेटवलेला वाद, नालंदा विद्यापीठाचा कुलपती नेमणुकीचा वाद किंवा गडचिरोलीमधील गोंडवाना विद्यापीठातील पहिल्या आदिवासी कुलगुरूपदाच्या वादाची उदाहरणे अगदी ताजी आहेत. त्यांचाच वादाचा कित्ता नाशिकच्या दोन्ही विद्यापीठांनी गिरवला आहे. शहराचे नाक असलेली शैक्षणिक क्षेत्रातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ही दोन विद्यापीठे सध्या एकमेकांना भिडली आहेत. मुक्त विद्यापीठाने विज्ञान शाखेअंतर्गत बीएएमएसनंतरचे पदव्युत्तर प्रमाणपत्र शिक्षणक्रम सुरू करण्याचे जाहीर केले. त्याला आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आक्षेप घेतला. त्यासंदर्भात एक मोठे पत्रच 'आरोग्य'ने 'मुक्त'ला पाठवले असून असा कोणताही अभ्यासक्रम घेण्याचा अधिकार मुक्त विद्यापीठाला नसल्याचे पत्रात म्हटले आहे. मात्र कुलपतींनी अभ्यासक्रम निवडीचे स्वातंत्र्य मुक्त विद्यापीठाला दिले असल्याचे सांगत कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी या पत्राला खरमरीत उत्तर पाठवले आहे. 'हे आम्हाला विचारणारे कोण?' अशा संतापजनक शब्दात डॉ. साळुंखे यांनी 'आरोग्य'विरोधात तोफ डागली असून आम्ही हा शिक्षणक्रम सुरू करणारच असे जाहीरही केले आहे. त्यांच्या या विधानांमुळे दोन्ही विद्यापीठामधील वाद चव्हाट्यावर आला असून शैक्षणिक क्षेत्रातील उच्च प्रभूतींनीच असे वाद घातले तर समाजाने दिशादर्शक म्हणून कुणाकडे पाहायचे असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरूण जामकर यांचा कार्यकाल डिसेंबर महिन्यामध्ये संपुष्टात आल्याने कुलपती सी विद्यासागर राव यांनी कुलगुरूपदाचा कार्यभार विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे सुपूर्द केला आहे. कार्यसंभारामुळे त्यांना अद्याप विद्यापीठाचे कामकाज समजून घेण्याची संधीच मिळालेली नसल्याने तत्कालीन कुलगुरू डॉ. जामकर यांच्या कार्यकालात उद्भवलेला हा वाद आता कोण मिटवणार असा संभ्रम निर्माण झाला आहे.

मूळात कुलगुरू हे पद वादग्रस्त असेच आहे, त्यात त्यांनी अशी काही विधाने करून आपला तोल ढासाळू देणे योग्य नाही. दोन्ही कुलगुरू हे सारख्याच पदावर काम करतात त्यामुळे एकाने दुसऱ्याला कमी लेखून तसे बोलणे हे कितपत योग्य आहे, याचाही विचार करण्याची गरज आहे. बोलता-बोलता डॉ. साळुंखे अनेक गोष्टींवर घसरले त्यात ते म्हणाले की, मागच्या कार्यकाळात अनेक त्रुटी होत्या त्या मी दुरूस्त केल्या आहेत. त्यामुळे आता मुक्त विद्यापीठाचे कार्य पूर्वीपेक्षा चांगले चालले आहे. मूळात कुलगुरू किंवा यापैकी वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक ही चांगली कामे करण्यासाठीच असते. त्याचे श्रेय लगेचच घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल याकडे कुलगुरूंनी लक्ष दिले पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारला खूष ठेवण्यासाठी भाषण छापले नाही

$
0
0

कैलास येवला, सटाण

साहित्य मंडळाच्या अध्यक्षांचे हितसबंध सरकारच्या सांस्कृतिक विभागाशी जुळलेले असल्याचे मराठी साहित्य संमेलनातील मंत्र्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले. यामुळेच सरकारला खूश ठेवण्यासाठी मंडळाच्या अध्यक्षांनी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे भाषण न छापण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केला आहे.

सटाणा तालुक्यात एका समारंभासाठी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आले होते. यावेळी त्यांनी मटाशी बोलताना वरील आरोप केला. डॉ. सबनीस म्हणाले की, ८८ वर्षांच्या साहित्य संमेलनाच्या इतिहासात ८८ अध्यक्षांचे भाषणे महामंडळाने प्रसिद्ध केली आहेत. मात्र, यंदाच्या संमेलनातील लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या अध्यक्षांचा भाषण छापण्यासाठी महामंडळ पदाधिकारी तयार नाहीत. याची कारणे उघड करण्यासाठी व पदाधिकाऱ्यांचे लोकशाही विरोधी अंतरंग दर्शन घडविण्यासाठी आपण २७ जानेवारी रोजी उपोषणाला प्रारंभ करीत आहोत.

साहित्य परिषदेच्या प्रांगणातील जागेवर पत्नीसह या उपोषणाला प्रारंभ करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. सबनीस पुढे म्हणाले की, हे उपोषण हैदराबाद येथील वेमुला या दलित संशोधन विद्यार्थ्याला श्रद्धांजली अर्पण करून सुरू करणार आहोत. मंडळाच्या अध्यक्षांचा स्वतःचा निर्णय ते महामंडळाच्या नावाने लादू पहात आहेत. वृत्तपत्राला दिलेली कारणे लक्षात घेता अध्यक्षीय भाषण १२९ पानांचे आहे. भाषण प्रदीर्घ असून, भाषणात शेतकऱ्यांचे प्रश्न, घटना कलम ३२३ ब अनुसार अ‍ॅग्रीकल्चर, आदिवासी, दलित, मुस्लिम, ख्रिश्चन भटके आदी ग्रामीण अशा उपेक्षित समाज घटकांच्या साहित्याची सविस्तर मांडणी आहे.

भाषणावर सेन्सॉरशिप लादण्याचे कारण नाही. कोणतेही सबळ कारण नसताना भाषण न छापणे हे मराठी संस्कृतीचा व घटनेचा अपमान असल्याचेही सबनीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आपले भाषण नेताजी खंडागळे, कैलास भेंगारे यांच्या दोन संघटनांच्या वतीने स्वतंत्रपणे प्रकाशित करण्यात आले असून, त्याचे वितरण आपण याच दिवशी करणार असल्याचेही यावेळी सबनीस यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माऊंट अबू येथे जाण्याची घाई असल्याने ते सन्मानपूर्वक गेले. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आपणास कोणताही शंका नसल्याचे त्यांनी नमूद केले. तर, पंतप्रधानांबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मोदी यांना व्यक्ती म्हणून ग्रामीण भाषेत एकेरी बोलीत बोलण्यात आले. यावरून इतका गजहब होण्याचे कोणतेही कारण नव्हते. मात्र, मोदी भक्तांना बळी आपण पडलो नाही, असा दावाही यावेळी सबनीस यांनी केला.

दरम्यान, यंदाचे साहित्य संमेलन सर्वांगाने ऐतिहासिक ठरले असून त्याचे सारे श्रेय श्रोतृवर्ग, साहित्य रसिक, महामंडळ व आयोजकांना जाते. चार दिवसात सुमारे सहा लाखांहून अधिक रसिकांनी हजेरी लावून काही कोट्यवधी रुपयांची पुस्तके व साहित्य विक्री झाल्याने आपण समाधानी असल्याचेही शेवटी सबनीस यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘योगधारा’तून भारतीय संस्कृतीचे दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सात देशातील युवा कलाकार, १५ शहरांचा प्रवास अन् भारतीय संस्कृतीचे त्यांच्यामार्फत घडणारे दर्शन सध्या सबंध देशातील नागरिकांना अनुभवण्यास मिळत आहेत. परदेशातील कलाकारांमार्फत आपल्या संस्कृतीचे घडणारे दर्शन हे देशातील प्रत्येक नागरिकांसाठीच औत्सुक्याचे असल्याचे दिसून येते. आता याच सांस्कृतिक सोहळ्याचे दर्शन नाशिककरांनाही मिळणार आहे.

सहजयोग परिवारातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त 'योगधारा' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील विविध देशांचे युवा कलाकार भारतीय संस्कृतीचे दर्शन या कार्यक्रमातून घडवणार आहेत. शिवसत्य मैदान, तुळजा भवानी मंदिर, माणिकनगर, गंगापूर रोड येथे मंगळवारी (दि.२६) सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. युक्रेन, रशिया, इंग्लंड, चायना, इटली, स्पेन व बेल्जियम येथील चोवीस कलाकारांमार्फत या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. भारत देशाची संस्कृती कशी आत्मसात केली, याचे प्रदर्शन हे कलाकार घडवणार आहेत. त्या अंतर्गत देशभक्तीपर गीते, कुचीपुडी नृत्य, शास्त्रीय संगीत तसेच मराठी व हिंदी भजन असे विविध कार्यक्रम वाद्यवृंदासहित हे सर्व कलाकार सादर करणार आहेत. भारतातील सात राज्यातील १५ शहरांमध्ये २५ कार्यक्रम या कलाकारांमार्फत करण्याचे नियोजन असून, दोन जानेवारीपासून त्यास प्रारंभ करण्यात आला आहे. आतापर्यंत नोएडा, हरिद्वार, जयपूर, इंदोर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, नांदेड याठिकाणी हे कार्यक्रम सादर करण्यात आले आहेत.

--

येथे होणार कार्यक्रम

नाशिक जिल्ह्यातील तीन ठिकाणी हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.२६) सकाळी ८ वाजता येवला तालुक्यातील एसएनडी कॉलेज कॉलेजमध्ये, सायंकाळी ६ वाजता गंगापूर रोडवरील शिवसत्य मैदानावर तर बुधवारी (दि.२७) दुपारी २.३० वाजता कळवण तालुक्यातील साई लॉन्स येथे हा कार्यक्रम होणार आहे. युक्रेन व भारत यांच्या दुतावासांनी हा कार्यक्रम प्रायोजित केला असून, सर्वांसाठी तो खुला असणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक जिल्हा सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. ५ फेब्रुवारीला देशभरात होत असलेल्या या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अमरधाम येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीवर परप्रांतीयांनी अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी अनेक अवैध धंदे चालत असल्याची बाब वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. यामुळे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून कारवाईचे आदेश देण्याची मागणी केली आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून लिंगायत समाजातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तसेच, समाजातील नागरिकांनी नाशिक महानगरपालिका, पोलिस स्टेशनसोबत वेळोवेळी पत्रव्यवहार करून तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन स्मशानभूमी अतिक्रमणाचा विषय कानावर घातला आहे. मात्र, त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. समाजातील ज्येष्ठ दर गुरुवारी मनपा आयुक्तांची भेट घेतात व स्मशानभूमीबाबत चर्चा करतात. मात्र, त्यातून कोणताही तोडगा निघत नाही. समाजाच्या पदरात वेळोवेळी फक्त आश्वासने पडली आहेत. दोन वर्षांपासून सिंहस्थाचे कारण पुढे करीत मनपाने हा मुद्दा पुढे ढकलला. त्यानंतर मनपाने अतिक्रमण मोहीम सुरू केली. या मोहिमेत अतिक्रमित असलेल्या बांधकामावर, शेडवर फुल्या मारण्याचे काम प्रशासनाने केले. कृतीतून मात्र काहीही उतरले नाही. प्रशासनाकडून समाजाच्या सम्शानभूमीबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून ही शोकांतिका समाजाने कळवली आहे.

या स्मशानभूमीला अतिक्रमणाचा विळखा तर पडलेला आहेच परंतु, येथे अनेक अवैध धंदेदेखील चालतात. वीरशैव लिंगायत समाज अल्पसंख्याक असला तरी दिवसेंदिवस संख्या वाढत आहे व कुणाही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास बऱ्याच दिवसांपूर्वी पुरलेल्या व्यक्तींवरच त्यांना पुरावे लागत आहे.

पत्रकावर संघाचे अध्यक्ष अरुण आवटे, उमाकांत उदार, सदाशिव तुप्पद, राहुल दिवटे, विश्वनाथ दंदणे, अनिल महमाने, संजय वाळेकर, आंधळकर, खोडदे, भुसारे, हिंगमीरे यांच्या सह्या आहेत.

--

...तर मनपा प्रवेशव्दारावर पुरणार मृतदहे

प्रशासनाने योग्य आदेश देऊन जागेचे निरिक्षण करावे व अतिक्रमण काढून तेथील अवैध धंद्यांना आळा घालावा. तसे न झाल्यास समाजामध्ये आधीच असंतोषाचे वातावरण आहे. त्याचे रूपांतर आंदोलनात होऊन मृत व्यक्तीस मनपाच्या प्रवेशद्वारातच पुरण्यात येईल असा इशारा वीरशैव तरूण संघाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांगीतुंगी सोहळ्यासाठी सूक्ष्म नियोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मांगीतुंगी येथील सोहळ्यासाठी सुमारे १५ लाख भाविक येण्याची शक्यचा गृहीत धरून जिल्हा आणि पोलिस प्रशासनाने त्यांच्या सुरक्षिततेवर विशेष भर दिला आहे. कोणतीही आपत्कालीन दुर्घटना घडू नये, यासाठीही सिंहस्थाप्रमाणेच या सोहळ्यासाठी सूक्ष्म नियोजनावर भर दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

श्री मांगी शिखराजवळ भगवान ऋषभदेवांच्या १०८ फूट उंच मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना आणि महामस्तकाभिषेक सोहळ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ११ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या या सोहळ्याला देशभरातून भाविक येणार आहेत. सिंहस्थानंतर आता हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे. मांगीतुंगी तीर्थक्षेत्र डोंगराळ भागात वसले आहे. भाविकांच्या आणि व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेचे नियोजन चार सेक्टरमध्ये करण्यात आले आहे. डोंगरावरील भागात एक सेक्टर, निवासस्थळ, वाहनतळ आणि आवश्यकतेनुसार आणखी एक अशा चार सेक्टरच्या निर्मितीवर प्रशासनाने भर दिला आहे. तहसीलदार किंवा समकक्ष अधिकाऱ्याकडे या सेक्टर्सच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असणार आहे. सोहळ्याशी वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून संबंध येणाऱ्या प्रत्येक विभागानेही सूक्ष्म नियोजन केले असून, ते यशदाकडे सादर केले आहे. तेथील तज्ज्ञ त्याला अंतिम रूप देणार आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी एकीकडे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतानाच नैसगिर्क अथवा मानवनिर्मित आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

प्रशासनाला सिंहस्थाचा अनुभव असला तरी हा सोहळा नदीकाठी तर मांगीतुंगीचा सोहळा डोंगराळ भागात होणार आहे. दोन्ही ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगळी असल्याने आव्हानेही वेगळी आहेत. सुदैवाने सिंहस्थाप्रमाणे पावसाळ्यात हा सोहळा नसल्याने प्रशासनाचा बराचसा त्रास कमी झाला आहे. भाविकांना प्रामुख्याने पायथ्यापासून अभिषेकाच्या ठिकाणापर्यंत सुखरूप पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाला पार पाडावी लागणार आहे. या तीर्थस्थळी १३०० पायऱ्या असल्या तरी ट्रस्टकडून वाहनांची व्यवस्था केली जाणार असल्याने भाविकांना केवळ ३०० पायऱ्यांचाच वापर करावा लागणार आहे. अभिषेकाच्या ठिकाणी मुबलक जागा असली तरीही एकाचवेळी क्षमतेपेक्षा अधिक गर्दी होऊ नये, यासाठी होल्ड आणि रिलीजचा पर्याय पोलिसांकडून अवलंबिला जाणार आहे. या कालावधीत आपत्कालीन परिस्थिती हाताळताना इर्मजन्सी ऑपरेशन सेंटरची मदत घेण्यात येणार आहे.

--

एनडीआरएफचे पथक राहणार दक्ष

एनडीआरएफचे एक पथक या सोहळ्याच्या ठिकाणी तैनात असणार आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी हे पथक सज्ज ठेवण्यात येणार आहे. कापडी तंबूंना आगीपासून तत्काळ सुरक्षितता मिळावी, यासाठी त्यामध्ये फायर एक्स्टींगविशरची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images