Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कॉलेजेमधून मिळणार सॉफ्टस्कीलचे धडे

$
0
0
केवळ अभ्यासक्रम आणि पुस्तकी ज्ञान यावर विद्यार्थ्यांचा विकास आणि रोजगारप्राप्ती शक्य नसल्याने कॉलेजमध्ये युवक कल्याण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.

विकतच्या 'थ्री-जी'चा फुकटचा मनस्ताप

$
0
0
मोबाईल सेवेच्या तीव्र स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपन्यांकडून ग्राहकांना उत्कृष्ट सेवेसोबतच विविध ऑफर्स दिल्या जात असताना, सेवेबाबत सातत्याने ओरड असलेल्या 'बीएसएनएल'चा मात्र या स्पर्धेशी काही संबंधच नसल्यासारखी परिस्थिती आहे.

मनमाड, येवलासाठी रोटेशनचे पाणी

$
0
0
मनमाड, येवला व येवला तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनांसह सहा पाणीपुरवठा योजनांसाठी शुक्रवार, २६ एप्रिल रोजी पालखेड डाव्या कालव्यातून रोटेशनचे पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

भ्रष्टाचारी धोरणांमुळे नैसर्गिक स्त्रोतांचा बळी

$
0
0
'जमीन आणि पाण्याशी निगडीत असणारे घोटाळे हे केवळ पैशांशी निगडीत नाहीत. तर, सरकारच्या भ्रष्टाचारी धोरणांमुळे माणसाच्या जगण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांचाच बळी जात आहे,' असा आरोप 'नर्मदा बचाव' जनआंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी केला.

ज्येष्ठांना हवाय पोलिसांचा भावनिक आधार

$
0
0
एखाद शहर मोठं होऊ लागलं की तेथील वातावरणात रमणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्या समस्यांवर मात करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पातळ्यांवर मदतीची गरज भासते. ज्येष्ठांवर वाढलेले हल्ले व लुबाडणूकीचे प्रकार अलिकडे बरेच वाढले आहेत.

कामटवाडे परिसरात रस्त्यावरच मांसविक्री

$
0
0
कामटवाडे, अंबड परिसरात रस्त्यावरच मांसविक्री होत असल्याने अस्वच्छता व कुत्र्यांचा त्रास वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

तळवाडे भामेर कालव्यासाठी ४.५ कोटी

$
0
0
बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर पोहोच कालव्यासाठी चालू आर्थिक वर्षात साडेचार कोटी रुपये निधी दिला जाणार आहे, अशी माहिती तापी खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक प्र. रा. भामरे यांनी दिली. मेरी (महाराष्ट्र इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) कार्यालयात शेतकऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

'मान्यता रद्द'च्या मनमानीला अटकाव

$
0
0
शिक्षण हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीदरम्यान नियमभंग करणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांबाबत सरकारने कडक धोरण स्वीकारले आहे.

५ वाहनांची तोडफोड करून कारटेपची चोरी

$
0
0
म्हसरूळ परिसरातील स्नेहनगरमध्ये चोरांनी धुमाकूळ घातला. इमारतींच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या पाच वाहनांची तोडफोड करीत चोरांनी महागडे कारटेप चोरी केले. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

जळगावकरांनी रिचवली ५० लाख लिटर बिअर

$
0
0
सन २०१२-१३ मध्ये जळगाव जिल्ह्याने तब्बल ५० लाख ८५ हजार लिटर बिअर रिचवली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दहा टक्क्यांनी वाढले आहे.

महापौराकडून आरोग्याची झाडाझडती

$
0
0
'शहरात स्वाईन फ्लूमुळे तीन जणांचा बळी गेला आहे. त्यास आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार कारणीभूत असून अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे भान ठेवावे अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.'

लग्नाला विरोध : प्रेमीयुगलाची आत्महत्या

$
0
0
फेसबूकच्या माध्यमातून ओळख झालेल्या प्रेमीयुगलाने शहरातील लॉजमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली. आत्महत्या केलेली मुलगी शहरातील द्वारका परिसरातील तर मुलगा नांदेड येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

'आदर्श' वर आयोगाचा रिपोर्ट विश्लेषणहीनच

$
0
0
देशभरात गाजलेल्या आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी सरकारने नेमलेल्या आयोगाचा रिपोर्ट विश्लेषणहीनच असल्याची कठोर टीका नर्मदा बचाव जनआंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केली.

एटीएमकार्ड कोणत्या बँकेचं आहे ?

$
0
0
व्यवस्था म्हटली की व्यत्यय हा असणारचं, असं गणित जनसामान्यांमध्ये रूढं झालयं. यामुळे एखाद्या सरकारी ऑफीसमध्ये, बँकेत एवढचं नाही तर 'एटीएम'मध्येही थोडसं नडल्या शिवाय कामच होत नाही असं गणित काहींच्या मनात पक्क बसलेलं असतं.

पाण्याला पोलिस बंदोबस्त

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणातून मनमाड व येवल्यासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याची चोरी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्याचे ठरविले आहे. यात पोलिस, पाटबंधारे, जिल्हा परिषद अधिकाऱ्यांसह तलाठी, स्थानिक पोलिस पाटलांना कालवा मार्गात गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले.

राज्यात 'हात ओले' करण्याचा सुकाळ!

$
0
0
भ्रष्टाचाराविरोधात देशभर विविध आंदोलने, जनजागृती होत असली तरी राज्यात लाचखोरीचा सुकाळ असल्याचे निदर्शनास आले आहे. दिवसाकाठी 'हात ओले' करण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची मागणी होत असल्याचेही उघड झाले आहे.

लाचखोरीत पोलिसच अव्वल

$
0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यापासून लाचखोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी कडक मोहीम राबवली आहे. त्यास एसीबीचे नवनियुक्त महासंचालक राज खिलानी यांनी साथ देत एसीबीच्या कार्यपद्धतीत बदल करण्याचे सुतोवाच केले होते.

काँग्रेसचा भर सोशल नेटवर्किंगवर

$
0
0
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसतर्फे सोशल नेटवर्किंवर भर देण्यात येत आहे. त्यासाठी प्रदेश पातळीपासून जिल्हास्तरावर सोशल नेटवर्किंचे जाळे वाढविण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले.

पारंपरिक बोहाड्याच्या वर्तुळात

$
0
0
लोककला हा मोठा व्यापक विषय असून त्यातला एक प्रकार म्हणजे बोहाडा. बोहाडा हे एक नाचकाम करताना करण्याचे नाट्य असून खानदेश, जव्हार, मोखाडा, पेठ, सुरगाणा आणि नाशिक भागातील पिंपळगाव येथे हे प्रचलित आहे.

नाशिक मार्केटिंगमध्ये अजूनही मागास!

$
0
0
स्वित्झर्लंडचे कॉन्स्युलेट जनरल सोमवारी नाशिक दौऱ्यावर होते. युरोपियन देशांचा एक घटक असलेल्या स्विसमध्ये गुंतवणूक, व्यापार, शिक्षण आदिंना किती संधी आहे, याची परिणामकारक मांडणी करण्यात आली. त्या तुलनेत नाशिकचे मार्केटिंग करण्याची संधी मात्र गमावण्यात आली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images