Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

टीडीआर धोरणाने बांधकाम क्षेत्र संकटात

$
0
0

टीडीआर धोरणाने बांधकाम क्षेत्र संकटात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरातील ६ आणि साडेसात मीटर रस्त्यालगत वापरण्यात येणारे विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) यापुढे वापरता येणार नसल्याने नाशकातील बांधकाम उद्योग संकटात येणार आहे. राज्य सरकारने १८ महापालिकांसाठी जाहीर केलेल्या टीडीआर धोरणामुळे येत्या काळात विकासनासाठी येणाऱ्या जुन्या बांधाकमांनाही फटका बसणार आहे.
राज्यातील महापालिका क्षेत्रात टीडीआरचे स्वतंत्र धोरण असावे या उद्देशाने राज्य सरकारने गेल्यावर्षी ३० एप्रिल रोजी एक मसुदा प्रसिद्ध केला होता. त्यावर सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यावरील जनसुनावणी झाल्यानंतर सरकारने टीडीआर धोरण गुरुवारी जाहीर केले आहे. या धोरणाचा मोठा परिणाम शहरातील बांधकाम क्षेत्रावर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सद्यस्थितीत ६ ते ७.५ मीटर रस्त्यालगत होणाऱ्या बांधकामांना ०.४ टीडीआर वापरला जातो. नव्या धोरणामुळे हा टीडीआर वापरावर गदा आली आहे. ६ ते ७.५ मीटर रस्त्यालगत टीडीआर लागू होणार नसल्याचे धोरणात म्हटले आहे. महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार (डीसीआर) शहरात ६ ते ७.५ मीटर रस्त्यालगतच बांधकामे सुरू आहेत. तसेच, येत्या काळात बांधकामे होणार आहेत. मात्र, आता टीडीआर वापरता येणार नसल्याने या रस्त्यालगत असलेल्या जागा विकसनासाठी घेण्यात येणार नाहीत. यातून स्वस्तात घरे उपलब्ध होण्यावरही परिणाम होणार असल्याचे बांधकाम क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच, ९ मीटरपुढील रस्त्यालगतही टीडीआर वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. गावठाण सोडून आरक्षित जागांवर २ टीडीआर वापरता येणार. त्यातही या जागांना कंपांऊंड करुन द्यावे लागणार आहे. टीडीआर वापरल्यास ५ टक्के वेगळे चार्जेस द्यावे लागणार आहे. तसेच, सध्या ६ आणि ७.५ मीटर लगत असलेल्या जुन्या इमारती नव्याने विकसनासाठी येणार आहेत. तेथे टीडीआर लागू होणार नसल्याने या इमारतींचे काय, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. एकंदरीतच, टीडीआर धोरणातील अनेक तरतुदींमुळे शहरातील बांधकाम क्षेत्र अडचणीत येणार असल्याचे दिसून येत आहे.

६ आणि ७.५ मीटर ररस्त्यालगत टीडीआर वापरता न येणे हे अन्यायकारक आहे. एकप्रकारे हा टीडीआर स्वातंत्र्यावरच गदा आहे. याचा विपरित परिणाम शहरातील बांधकामांवर होणार आहे.

अविनाश शिरोडे
माजी अध्यक्ष, क्रेडाई

९ मीटर पुढील रस्त्यांलगत टीडीआर वापरण्यासही सरकारने विविध बंधने घातली आहेत. याचा मोठा परिणाम बांधकाम क्षेत्रावर होणार आहे.

विजय सानप
अध्यक्ष, आर्किटेक्ट अँड सिव्हिल इंजि. असो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंजनेरी मंदिराचे नूतनीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

अंजनेरी येथील हेमाडपंथी १६ मंदिराच्या नूतनीकरणासाठी १६ कोटी ९५ लाखाच्या निधीला केंद्राने तत्वतः मान्यता दिली आहे. या कामाला सुरुवात झाली असून तीन वर्षात ते पूर्ण होईल, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

अंजनेरी गावालगत जैन, वैष्णव व शैव समाजाची सुमारे हजार वर्षापूर्वीची १६ मंदिरे आहेत. त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रत्येक मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व आहे. पुरातत्व विभागाकडे मंदिराच्या जतनाची जबाबदारी आहे. खासदार गोडसे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा व महासंचलक तिवारी यांना तीन महिन्यापूर्वी पत्र दिले होते. त्यानंतर केंद्रीय पुरातत्व विभागानेही पथक पाठवून सर्वेक्षण केले होते.

केंद्रीय पुरातत्व विभागाच्या संचालक जानवी शर्मा यांनी १४ जानेवारी रोजी विभागीय कार्यालयाला या प्रस्तावाबाबत नूतनीकरणासाठी लागणाऱ्या निधीची मागणी करावी, काम तीन वर्षात पूर्ण करण्याचा कार्यक्रम पाठवावा तसेच किती निधी लागेल तसे कळविण्यास सांगितले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेत फेरबदलांचे संकेत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपल्याने राजकीय पक्षांनी आतापासून तयारी सुरू केली आहे. भाजपने संघटनात्मक फेरबदल करीत आघाडी घेतल्यानंतर मित्र पक्ष शिवसेनेही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकारिणीत बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. संपर्क प्रमुख अजय चौधरी यांनी नाशिक दौऱ्यात याबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी बदलले जाणार नसले तरी, कार्यकारिणीत फेरबदल केले जाणार आहेत. जुन्यांचा अनुभव आणि नव्यांची आक्रमता साधून दोघांना नव्या कार्यकारिणीत स्थान दिले जाणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नवी कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार असून, त्यासाठी राजकीय पक्षांनी आतापासून व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपने नुकतेच शहराध्यक्ष पदावर आमदार बाळासाहेब सानप यांची नियुक्ती करीत पूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपचे शहरात तीन आमदार आहेत. त्यामुळे भाजप आक्रमक झाल्याने शिवसेनेनेही भाजपचा सामना करण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेचे नाशिक संपर्कप्रमुख अजय चौधरी यांनी गुरुवारी नाशिकच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी कार्यकारिणीबाबत चर्चा केली. पक्षातील जुन्या नेत्यांच्या अनुभवाचीही गरज आहे. तर, नव्या चेहऱ्यांनाही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात स्थान द्यावे लागणार आहे. त्यामुळे चौधरी यांनी कार्यकारिणीत बदल करण्याचे संकेत दिले असून, जुन्यांचा अनुभव घेऊन आणि नव्या चेहऱ्यांना आक्रमकतेसाठी कार्यकारिणीत स्थान दिले जाणार आहे. त्यामुळे नव्या-जुन्यांचा मेळ नव्या कार्यकाणीत घालण्याचे आदेश त्यांना पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

पदाधिकारी राहणार कायम महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षाने कार्यकारिणी बदलण्याचा निर्णय घेतला असला तरी, पदाधिकाऱ्यांना बदलले जाणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सध्याच्या महानगरप्रमुखांसह जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखालीच सेना निवडणूक लढणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल केल्यास त्याचा निवडणुकीतल्या रणनीतिवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुर्तास तरी, महानगर प्रमुखासह जिल्हाप्रमुखांना अभय मिळणार असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६१ गॅस वितरक दोषी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिलिंडरमधून परस्पर एलपीजी गॅस काढून ग्राहकांच्या गळ्यात कमी वजनाचे सिलिंडर मारण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. नाशिक महसूल विभागातील पाच जिल्ह्यांत अशा ६१ एलपीजी गॅस वितरकांवर खटले दाखल केले आले आहेत. विशेष म्हणजे यात सर्वाधिक २१ कारवाया नाशिक जिल्ह्यामध्ये करण्यात आल्या आहेत.

सिलिंडर घरपोच देताना संबंधित वितरकाने ते वजन करूनच देणे अपेक्षित आहे. मात्र, तसे कोठेचे होताना दिसत नाही. परस्पर सिलिंडरमधील गॅस काढून कमी वजनाचे सिलिंडर ग्राहकांच्या माथी मारण्याचे प्रकार नाशिकसह जळगाव, धुळे, अहमदनगर जिल्ह्यात उघडकीस आले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालये आणि महसूल आयुक्तालयाला तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. नाशिकमध्ये सिडकोत असे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात स्वतंत्र मोहीम राबविण्याचे आदेश वैधमापन शास्त्र नियंत्रक तथा विशेष पोलिस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. संपूर्ण राज्यात बुधवार, २७ जानेवारी रोजी अशी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. कमी वजनाचे सिलिंडर देणे, वजन काटे न बाळगणे अशा नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नाशिक महसूल विभागातील दोषी ६१ एलपीजी गॅस वितरकांवर खटले नोंद करून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती प्रभारी उपनियंत्रक स. या. अभंगे यांनी दिली आहे. विशेष तपासणी मोहिमेमध्ये दोषी गॅस वितरकांवर खटले नोंदवून महाराष्ट्र वैधमापन शास्त्र कायद्यान्वये कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्वाधिक २१ दोषी वितरक नाशिक जिल्ह्यामध्ये आढळले आहेत. तर जळगावात १५ वितरक दोषी आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.

येथे करा तक्रार

नागरिकांनी वितरकाकडून सिलिंडर स्वीकारताना त्याचे वजन करून देण्याचा आग्रह धरावा. सिलिंडर घरपोच करणाऱ्याकडे अचूक वजन दर्शवणारा वजनकाटा असणे आवश्यक आहे. ग्राहकांनी वजनाची प्रत्यक्ष खात्री करून सिलेंडर ताब्यात घ्यावा, असे आवाहन वैधमापन शास्त्र नाशिक विभागाचे प्रभारी उपनियंत्रक स.या. अभंगे यांनी केले आहे. याबाबत तक्रारी असल्यास त्यासाठी हेल्पलाइन क्रमांक ०२२-२२८८६६६६ उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर महाराष्ट्रालाही वीज सवलत द्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर तालुक्यात औद्योगिक प्रगती अधिक वेगाने होण्यासाठी तालुक्याचा 'वर्गीकरण डी प्लस' मध्ये समावेश करावा. यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळून उद्योग आकर्षित होण्यास मदत होईल. मराठवाडा व विदर्भास विजेच्या दरात विशेष सवलत देण्याचे शासनाच्या विचाराधीन असून, यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा समावेश करावा, अशी मागणी सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीतर्फे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे करण्यात आली.

उद्योग मंत्री सुभाष देसाई सिन्नर येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता हॉटेल पंचवटी येथे उद्योजकांनी त्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे अध्यक्ष अरुण चव्हाणके, तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे यांनी औद्योगिक प्रगतीबाबत चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भास विजेच्या दरात विशेष सवलत देण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली.

सिन्नर तालुक्याचे वर्गीकरण सी विभागात केल्याने विकासाचा वेग मंदावला असल्याने याकडे लक्ष वेधून तालुक्यात सेझ विकसित होत असताना त्यासही या वर्गीकरणाचा फटका बसत असल्याचे सांगितले. तसेच, अभय योजना बंद झाल्याने पुनरुज्जीवनक्षम बंद उद्योग सुरू करण्यात अडथळे येत आहेत. बंद पडलेले उद्योग नवीन उद्योजकास १५ वर्षे उत्पादन सुरू ठेवण्याची अट शिथिल करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. शासकीय वसाहतींप्रमाणे चटई निर्देशांक १.५० करावा, संस्थेची जिरायत झोनमधील जमीन औद्योगिकमध्ये वर्ग करावी, अशी मागणी करण्यात आली.

सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीत उद्योग वाढले असून, पाण्याचीही मागणी वाढत आहे. अजून एक हजार घनमीटर पाण्याची गरज असून, पाणी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रश्नाबाबत आपण तातडीने कारवाई करू, असे आश्वासन देसाई यांनी दिले. याप्रसंगी व्हा. चेअरमन पंडित लोंढे, संचालक प्रभाकर बडगुजर, अविनाश तांबे, किशोर देशमुख, मीनाक्षी दळवी, रामदास दराडे, सुनील कुंदे, संदीप आवारे, व्यवस्थापक कमलाकर पोटे, सुरेश उगले यांच्यासह अनेक उद्योजक उपस्थित होते.

महामार्गाच्या रुंदीकरणाला द्या वेग नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिक ते सिन्नर रस्त्याचे काम अत्यंत मंदगतीने सुरू आहे. त्याचा उद्योगांना फटका बसत आहे. उद्योजक, कामगारांना प्रवासात अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय ट्रक, कंटेनरने उत्पादीत कच्च्या मालाची वाहतूक करताना अडचणी येतात. हे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच, सिन्नर ते शिर्डी या महामार्गावरील सिन्नरपासून दातलीपर्यंतच्या मार्गाचे सहापदरीकरण तातडीने करावे. अरुंद मार्गामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असल्यामुळे अनेकांना विनाकारण मृत्यूस सामोरे जावे लागल्याने या दोन्ही रस्त्याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणांकन वाढीसाठी महापालिकेची लगबग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
केंद्र सरकारच्या स्मार्टसिटी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात निवड होण्याची संधी हुकलेल्या महापालिकेने आता दुसऱ्या टप्प्यातील निवडीसाठीची तयारी सुरू केली आहे. स्मार्टच्या गुणांकनात ३४ व्या स्थानावर असलेल्या नाशिकचे गुणांकन वाढविण्यासाठी आता आयुक्तांनी कंबर कसली आहे. दुसऱ्या टप्प्यातील शहरांच्या निवडीसाठी केंद्र सरकारने जून अखेर फेरप्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना महापालिकांना शुक्रवारच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये दिल्या आहेत. त्यादृष्ट्रीने प्रशासनाने पहिल्या टॉप थ्री शहरांच्या प्रस्तांवाचा अभ्यास सुरू केला आहे.

पहिल्या टप्प्यात तीन ते चार गुणांचा फटका नाशिकला बसला आहे. पहिल्या यादीत निवड न झालेल्या महापालिका आयुक्तांशी केंद्रीय सचिव पी. के. सिन्हा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. ज्या राज्यांमधून एकही शहर निवडले गेले नाही अशा २३ राज्यांनाही एप्रिलपर्यंत प्रस्ताव देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे मार्गासाठीचे भूसंपादन थांबवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर तालुक्यातील इंडिया बुल्सच्या औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी एकलहरा ते गुळवंच रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या भूसंपादनामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार असून, यासाठी येथील भूसंपादन शासनाने थांबवावे, अशी मागणी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली.

सिन्नर येथे एका कार्यक्रमाच्या निमितान्ने उद्योग मंत्री सुभाष देसाई आले ‌होते. हॉटेल पंचवटी येथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे ही मागणी केली. एकलहरा, हिंगणवेढे, जाखोरी, जोगलटेंभी, नायगाव, देशवंडी, निपाणी, पिंपळगाव, बारागाव पिंप्री, गुळवंच येथील शेतजमीन रेल्वे मार्गासाठी घेतली जाणार आहे. आमचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. या भागात बागायत शेती असून यामध्ये द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, ऊस यासारखी पिके घेतली जातात. या शेतजमिनी भूसंपादनात गेल्यास भूमिहीन होऊन आमची उपासमार होईल. शेतकरी रस्त्यावर येईल, त्यासाठी आमची जमीन रेल्वेमार्गासाठी घेवू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी उद्योग मंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली.

या प्रकरणी शेतकऱ्यांना फसवून एमआयडीसीने जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. गुळवंच व मुसळगाव येथील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प साकारला जात आहे. शेतकऱ्यांचा या प्रकल्पास विरोध असून, येथील राखेमुळे शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. ‌हे सक्तीचे भूसंपादन थांबवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यामध्ये उद्धव सांगळे, भाऊसाहेब कातकाडे, रतन मटाले, दशरथ रोडे, सोमनाथ पानसरे, आयुब सय्यद, हरिभाऊ ताजने, सुभाष जगळे आदी शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही, यासाठी इंडिया बुल्सच्या अधिकाऱ्यांशी बोलून नुकसान टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू. - सुभाष देसाई, उद्योग मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार दुचाकीसह पिकअपची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वेगवेगळ्या भागातून चार दुचाकींसह एक पिकअप व्हॅन चोरट्यांनी लंपास केली. वाहनचोरीच्या गुन्ह्यात काही प्रमाणात घट झाली असली तरी चोरटे अशा पध्दतीने वाहनचालकांना दणका देत असल्याने पोलिसांनी जलद तपास करण्याची मागणी केली जाते आहे. विशेष म्हणजे वाहनचोरीचा गुन्हा लागलीच दाखल होत नसल्याने वाहनचालकांच्या मनस्तापात आणखी भर पडते आहे.

वाहनचोरीची एक घटना सिटी सेंटर मॉलच्या मागील बाजुस २५ जानेवारी रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेदरम्यान घडली. नाशिकरोड येथील नारायणबापू नगर येथे राहणारा वसंत पोपट करंजकर (१६) याने आपल्याकडील दुचाकी (एमएच १५ सीजी ८२२८) पार्क केली होती. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर, सैयद प्रिंपी येथे राहणाऱ्या मोहन नामदेव उखाडे (४२) यांनी पंचवटीतील मार्केट यार्ड येथे पार्क केलेली २५ हजार रुपयांची दुचाकी चोरट्यांनी हातोहात लंपास केली. ही घटना १९ जानेवारी रोजी १२ ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पळसे येथील चौधरी पार्कच्या रूम नंबर दोन जवळ पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी २२ नोव्हेंबरच्या मध्यरात्री चोरी केली. या प्रकरणी केशव रामकृष्ण गायधनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. दरम्यान, दिंडोरी रोडवरील कलानगर येथील आकाश रो हाऊस येथे समित रमेश बिरारी यांनी पार्क केलेल्या दुचाकीवर देखील चोरट्यांनी हात साफ केला.

चोरट्यांनी सातपूर त्र्यंबकरोडवर पार्क केलेली दीड लाख रुपयांची पिकअप व्हॅन चोरी केली. त्र्यंबकरोडवरील मंदिरासमोर राहणाऱ्या कुमार शांताराम जाधव (२८) यांनी आपल्याकडील पिकअप जीप (एमएच १५ ई ४५८२) घरासमोर पार्क केली होती. २६ जानेवारीच्या पहाटे चोरट्याने ती गाडी पळवली. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

भाजी विक्रेत्यांवर गुन्हा

गंगाघाट भाजीबाजार मैदानावर अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. त्यास विरोध केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दिलीप नेरकर, भिमराव शांताराम शिरसाठ यांच्यासह संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाम धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाचे काम साठ टक्के पूर्ण होऊनही या धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडले आहे. या आदिवासी बांधवांना डोंगरावर घरे देऊन माळीणची पुनरावृत्ती होण्यापेक्षा या धरणग्रस्तांचे पुनर्वसन धरणालगतच सपाट जमिनीवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार, जलसंपदा अधिकारी यांनी पुनर्वसनासाठी जागेचा प्रस्ताव देताच सर्व धरणग्रस्तांनी त्यास ग्रीन सिग्नल दिला.

गेल्या वर्षभरापासून नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत इगतपुरी तालुक्यात काळुस्ते शिवारात भाम धरणाचे काम बंद स्थितीत आहे. धरणाचे काम साठ टक्के होऊनही या धरण शिवारातील काळुस्ते, भरवज, निरपण, दरेवाडी, बोरवाडी, सारुक्तेवाडी या गावे, वाड्यांचे पुनर्वसन झाले नाही. धरणग्रस्तांनी पुनर्वसनाचे काम हाती घेतल्याशिवाय धरणांचे काम होऊन देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे हा प्रश्न गंभीर बनला होता.

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार निर्मला गावित यांनी पुढाकार घेतला. धरणग्रस्त, पुनर्वसन अधिकारी जलसंपदा विभागाचे अधिकारी व स्थानिक पदाधिकारी यांची संयुक्त बैठक भाम धरणस्थळावर घेण्यात आली. अध्यक्षस्थानी आमदार निर्मला गावित होत्या. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी मधुमती सरदेसाई, जलसंपदा विभागाच्या शहाणे, माजी जि. प. सदस्य जनार्धन माळी, धरणग्रस्त प्रतिनिधी माजी सभापती रामदास घारे आदी उपस्थित होते.

धरणग्रस्तांचे उंच जागी पुनर्वसन केल्यास माळीणच्या पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. म्हणून आमदारांनी उंच व डोंगराळ भागावर पुनर्वसन करण्यास ठाम नकार दिला. प्रकल्पग्रस्तांनीही धरणालगतच सपाटजागी पुनर्वसन करण्याची मागणी केली. यावेळी पुनर्वसन अधिकारी व भाम धरण अधिकाऱ्यांनी डॅमच्या डाव्या बाजूला बोरवाडी, सारुक्ते वाडीचे तर उजव्या बाजूला भरवज, दरेवाडीचे सपाट जागेवर पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव ठेवला. यावेळी कुटुंब सदस्य निहाय प्लॉट वाटप, बाजारभावाने जागेचे वाढीव पेमेंट आदी विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या सपाट जागेवर पुनर्वसन करण्याला मान्यता देण्यात आली. परंतु, धरणाच्या कामाबरोबरच पुनर्वसनचे काम जलदगतीने करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, पुनर्वसन करताना गावाना पाणी, वीज, शाळा, आरोग्य आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. जमिनींचे वाढीव पेमेंट चालू बाजारभावाने देण्याची मागणीही धरणग्रस्तांनी केली. अधिकाऱ्यांनी या मागण्या मान्य केल्या.

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व सुविधांयुक्त पुनर्वसन करून राज्याला हेवा वाटेल, असा भाम पुनर्वसन पॅटर्न निर्माण करावा. धरणालगतच सपाट जागेवर पुनर्वसन व्हावे ही धरणग्रस्तांची भूमिका रास्त होती. पुनर्वसनबरोबरच धरणग्रस्तांना चांगल्या प्रकारच्या मूलभूत सुविधा देता येणार आहेत. - निर्मला गावित, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवनेरी पॅनलपुढे नम्रता पॅनलचे आव्हान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, शिवनेरी विरुद्ध नम्रता या दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. अपक्षांनी आव्हान निर्माण केल्याने चुरस वाढली आहे. रविवारी (३१ जानेवारी) मतदान होत आहे.

मनमाड बाजार स‌मितीच्या निवडणुकीबाबत जिल्ह्यात सर्वत्र उत्सुकता वाढली आहे. माजी आमदार संजय पवार आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुहास कांदे यांचे शेतकरी विकास पॅनल नांदगावप्रमाणे मनमाड बाजार समितीवर भगवा फडकविण्याच्या इराद्याने निवडणूक रिंगणात उतरले आहे. जिल्हा बँकेचे माजी संचालक चंद्रकांत गोगड यांनी नम्रता पॅनलची निर्मिती केली आहे. शिवनेरी शेतकरी विकासची पतंग आणि नम्रताची छत्री यांच्यातील लढत चुरशीची होण्याची चिन्हे असून, अपक्ष उमेदवारही आपले वेगळे अस्तित्व दाखवण्याची शक्यता आहे.

व्यापारी संघटनेने व्यापारी गटातून माणकचंद गांधी व कल्याणचंद ललवाणी यांना पुरस्कृत केले असून, त्यांची कपबशी करामत करेल अशी व्यापारी गटाला अपेक्षा आहे. आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार अनिल आहेर यांच्यासह माजी सभापती प्रकाश घुगे, राजेंद्र पवार यांचा नम्रता पॅनलला पाठिंबा असल्याचे चंद्रकांत गोगड यांनी सांगितले. रविवारी (३१ जानेवारी) छत्रे विद्यालयात मतदान होत आहे. मतदार कोणाला कौल देतात हे पहाणे महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचार, गैरकारभार तसेच बाजार समितीची थेट उच्च न्यायालयापर्यंत प्रकरणे गेली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक पुत्राला मनपाचा दणका

$
0
0

भारतनगरमध्ये अतिक्रमण काढण्यावरून नुकतीच दंगल झाली होती. त्यात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा पुत्राचा सहभाग असून तो अटकपूर्व जामिनावर आहे. या भागात नगरसेवक पुत्राने खासगीच नव्हे तर महापालिकेच्या आरक्षित जागांवरही अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध धंदेही सुरू होते. नागरिकांनी या संदर्भात वारंवार महापालिकेकडे तक्रारी केल्या. दीपाली नगरमध्ये साईबाबा मंदिराला लागून असलेल्या सर्व्हे नंबर ८०९ मधील शिवाजी येथे महापालिकेच्या जागेवर पक्के बांधकाम करण्यासह पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते. नागरिकांना या ठिकाणी गुंडाचा नेहमीच त्रास होता. हा भाग या अनधिकृत बांधकामामुळे गुन्हेगारांचा अड्डाच बनला होता. तसेच भारत नगरमधील सर्व्हे नंबर ८०९/१ महापालिकेच्या आरक्षित डीपीच्या जागेवर नगरसेवकाच्या आशिर्वादाने झोपड्या वसविण्यात आल्या होत्या.

महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या आदेशानंतर शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रम निर्मूलन विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम यांच्या नेतृत्वाखाली पूर्व विभागाच्या तीन पथकांनी या दोनही जागेवरील अतिक्रमण जमीनदोस्त केले. महापालिकेचे ३५ अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस सहआयुक्त राजू भूजबळ आणि ८० पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण पाडण्याला विरोध होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी मोठा फौजफाटा सोबत नेला. एक जेसीबी, दोन ट्रॅक्टर्स, ३ गाड्यांच्या मदतीने जवळपास दोन ट्रक साहित्य या ठिकाणाहूंन जप्त करण्यात आले आहे. महापालिकेच्या या कारवाईने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नेत्यांनी घेतला कारवाईचा धसका महापालिकेच्या आरक्षित जागांवर अतिक्रमण करून अनेक ठिकाणी राजकीय पदाधिकाऱ्यांनीच आपले अड्डे सुरू केले आहेत. काही ठिकाणी जनसंपर्क कार्यालये, तर समाज मंदिरे उभारून त्याचा वापर चुकीच्या कामांसाठी केला जात आहे. त्यामुळे अशा जागांचा शोध घेवून महापालिकेने आता कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या या कारवाईचा आता धसका घेतला आहे.

फौजफाट्याने तणाव निवळला भारतनगरमध्ये दंगलीची पुनरावृत्ती होवू नये म्हणून महापालिका आणि पोलिसांनी सयुंक्तरित्या मोठ्या फौजफाट्यासह ही कारवाई केली. संबंधित अतिक्रमण हे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या मुलाचे असल्याने स्थानिकांकडून त्याला विरोध होण्याची शक्यता होती. परंतु, अतिक्रमणाला विरोध करण्यास पुढे कोणीच आले नाही.

दीपाली नगर व भारतनगर या दोन्ही ठिकाणी महापालिकेच्या आरक्षित जागांवर अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले होते. सदरील बांधकाम निदर्शनास आल्यानंतर ते जमिनदोस्त करण्यात आले. अतिक्रमणा विरोधात महापालिकेची कारवाई अशीच सुरू राहणार आहे. - रोहिदास बहिरम, उपायुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांगीतुंगी सोहळ्यात वाटणार हजारो कपडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

मांगीतुंगी येथे होत असलेल्या श्री भगवान वृषभदेवांच्या १०८ फूट मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्यात सहभागी होणाऱ्या परिसरातील सुमारे पाच हजार आदिवासी बांधवांना पाच हजार कपडे व साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दि. ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ही माहिती समितीचे कार्याध्यक्ष अनिलकुमार जैन व मंत्री विजयकुमार जैन यांनी दिली.

पंचकल्याण महोत्सवाला दि. ११ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार असून, १७ रोजी सांगता समारंभ होत आहे. महास्तकाभिषेक उत्सवाला १८ फेब्रुवारी रोजी प्रारंभ होत आहे. या उत्सवासाठी देशभरातून जैन समाजाचे १००० अधिक सेवेकरी लवकरच दाखल होणार असून, लाखो भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून सर्वांना आपापली कामे विभागून देण्यात आली आहेत. वीस हजारहून अधिक जैन बांधवांच्या निवासाची व्यवस्था अंतिम टप्प्यात आहे. एक लाख चौरस फुटाचा महल उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावी हॉलतिकीट त्रुटींमुळे गोंधळ

$
0
0

बारावीची परीक्षा ही करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जाते. त्यामुळे कोणतीही रिस्क घेण्यास विद्यार्थी तयार नसतात. मात्र ऐनवेळी हॉल तिकिटातच त्रुटी सापडल्याने गोंधळ उडाला आहे. फोटो, माध्यम, विषय, नाव यामध्ये साम्यताच नसल्याने अभ्यासाची तयारी सोडून या त्रुटी निस्तारण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. या प्रकरणी कॉलेजेस विभागीय मंडळावर तर मंडळ कॉलेज व विद्यार्थ्यांना दोषी ठरवत असल्याचे चित्र यामुळे दिसून येत आहे.

त्रुटी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना सवलत देण्यात आली असून दुरुस्तीचा फॉर्म त्यांना लवकर सादर करावयाचा आहे. फॉर्मची मुख्य प्रत संबंधित प्राचार्यांकडे जमा करावयाची असून झेरॉक्स कॉपी मुंबई नाका जवळील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागाकडे जमा करावयाचे आहेत.

विद्यार्थ्यांनी स्वतःच ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरले असल्याने यात मंडळाची काही चूक नाही. सुधारित फॉर्म भरून हॉल तिकिटांमधील त्रुटींवर तोडगा निघेल. - राजेंद्र मारवाडी, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे मार्चमध्ये वर्ल्ड फेस्टिवल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जगातील देश, धर्म आणि जाती एकत्र आणण्याच्या उद्देशाने आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे वर्ल्ड कल्चर फेस्टिवल प्रदर्शन ११ ते १३ मार्च दरम्यान नवी दिल्ली येथे होत आहे. जागतिक नेतृत्व आणि अंतर धर्म परिषद म्हणून हा कार्यक्रम होणार आहे.

या फेस्टिवलमध्ये १५५ देशांमधून लाखो लोक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात हजारो कलाकार, मान्यवर आणि पाहुणे यांना बसण्यासाठी ७ एकरचे व्यासपीठ तयार करण्यात येणार असून अनेक प्रकारचे संगीत, नृत्य, भोजन आणि संपूर्ण जगातील इतर कला प्रकार एका व्यासपीठावर सादर करणे आणि भावी पिढ्यांसाठी ते जागृत ठेवणे हा उद्देश आहे. रंगांची उधळण, सण, उत्सव, हर्ष, उल्हास आणि सर्वत्र हसरे चेहरे यामुळे सर्व उपस्थितांना भारतातील संस्कृतींची व्यापकता अनुभवता येईल.

या फेस्टिवलमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर, एक 'शांती ध्यान' घेतील, जे जगभरातील लाखो लोक एकाच वेळी करतील. हे आणखी एक 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' होणार आहे.

राष्ट्रपती, पंतप्रधानांची असणार उपस्थिती

या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह परदेशातून येणाऱ्या मान्यवरांच्या यादीत सुरीनाम, झिम्बाब्वे, यूएइ, इंडोनेशिया, अल्बेनिया श्रीलंका, नेदरलंड, फ्रान्स, नॉर्वे, लिथूआना या देशातील नेत्यांचा समावेश आहे. या उत्सवासाठी ना‌शिकहून भक्तगण जाणार आहेत. अधिक माहितीसाठी संतोष कापडणे (७५८८६१७२४४, ७८७५५२७३४४) यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन फॉर्मसाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ

$
0
0

दोन आठवड्यांपूर्वी एस. वाय. बीएससीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर दुसऱ्या सत्राचे फॉर्म भरण्याची सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आली. केवळ पाच दिवसांचा कालावधी व सर्व्हरमधील असंख्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना हे फॉर्म भरणे अशक्य झाले होते. याची दखल घेत ऑनलाइन फॉर्म भरण्याची मुदत ८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

लिंकवर पाच दिवसांची मुदत दाखवत असल्याने सर्वच विद्यार्थी चिंतेत होते. परंतु, विद्यापीठाने फॉर्म भरण्याची मुदत वाढवून दिल्याने दिलासा मिळाला आहे. - गौरव घोरपडे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येवल्याजवळ विदेशी मद्य जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला शहर पोलिसांनी एका वाहनातून पावणे दोन लाखांचे बेकायदेशीर विदेशी मद्य जप्त केले आहे. कोपरगांव तालुक्यातील धामोरी येथून येवला तालुक्यातील चिचोंडी मार्गे ही दारू येवल्यात आणली जात होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

चिचोंडीमार्गे एका वाहनातून विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती गुरुवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास येवला शहर पोलिसांनी अंगणगाव येथील बोटिंग क्लबजवळ सापळा रचला. या पोलिस पथकाला येवल्याच्या दिशेने टाटा एस वाहन येताना दिसले असता त्याची तपासणी करण्यात आली. त्यात हा वाहनात 'बॉम्बे स्पेशल डार्क' या विदेशी कंपनीच्या रमचे ५० खाकी बॉक्स आढळून आले. पोलिसांनी १ लाख ७७ हजार रुपयांच्या विदेशी दारूसह वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी योगेश विनायक मोरे (२१) या चालकास अटक केली. त्याला कोर्टाने १४ दिवसांची कोठडी सुनावली. कारवाईत पोलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, उपनिरीक्षक एस. आर. बैरागी, हवालदार अभिमन्यू आहेर, कॉन्स्टेबल राजेंद्र माळी, योगेश पाटोळे आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चंदनपुरीचे खंडेराय’ मोठ्या पडद्यावरही

$
0
0

महाराष्ट्रातील सगळ्या भक्तांचे लाडके दैवत असलेल्या श्री खंडेराय यांची जेजुरीनंतर मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी क्षेत्राचे विशेष महात्म्य आहे. येथील बाणाईने आपल्या भक्ती आणि प्रेमाच्या बळावर खंडेराय यांना प्रसन्न करीत चंदनपुरीत येण्यास भाग पाडले होते. त्यांची हीच प्रेमकथा सध्या 'जय मल्हार' या मालिकेच्या रूपाने सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. आता याच कथेवर आधारित सिनेमा बनविण्यात आला आहे. शरद शेलार यांनी स्वतः या सिनेमासाठी कथा लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

सिनेमामध्ये मुंबई, पुणे, नाशिक अशा विविध शहरातील कलावंतांची अभिनय केला आहे. 'परतू' या कलात्मक मराठी सिनेमातील सलमान तांबोळी व पल्लवी पवार, महम्मद देशमुख, प्रशांत गरुड, राजू डांगळे, प्रशांत पाटील, स्नेहल पाटील यांची 'चंदनपुरीचे खंडेराय'मध्ये प्रमुख भूमिका आहे. या सिनेमासाठी मालेगाव येथील संगीतकार गीतकार अमोल तिवारी यांनी संगीत दिले आहे. सिनेमातील एकूण सहा गाणी सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत. या गाण्यांमध्ये देखील खंडेरायाच्या जागरण गोंधळापासून ठेका धरायला लावणारी अॅटम साँगपर्यंत अशी विविध गाणी बहार आणणारी आहेत.

कॅमेरामन म्हणून पंकज घोरपडे, व्यवस्थापक म्हणून प्रवीण झोपे व प्रदीप शेवाळे यांनी काम पहिले आहे. सध्या चंदनपुरी येथे यात्रोत्सव सुरू आहे. सेन्सॉर बोर्डने देखील मान्यता दिली असल्याने लवकरच हा सिनेमा राज्यभरात प्रदर्शित केला जाणार आहे. शुक्रवारी (दि. २९) या सिनेमाचा खास प्रिमियर शो मालेगावमधील वैभव सिनेमागृहात मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. यावेळी चित्रपटरसिकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

सिनेमाची आधीपासून आवड होती. यापूर्वी अनेक लघुपट बनविले होते. संपूर्ण सिनेमासाठी जाणीवपूर्वक लोकदैवत श्री खंडेराय यांची जीवनकथा घेतली. सिनमेच्या माध्यमातून जमा होणाऱ्या रकमेतून मालेगाव तालुक्यातील दुष्काळपीडित शेतकरी कुटुंबीयांना मदत केली जाणार आहे. यात्रोत्सव काळात सिनेमा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळावी म्हणून सिनेमा मालेगावी प्रदर्शित करतो आहोत. सिनेमा प्रदर्शित झाल्याने विशेष आनंद होत आहे. - शरद शेलार, दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी बँक अध्यक्षपदी दत्ता गायकवाड बिनविरोध

$
0
0

मावळते अध्यक्ष डॉ. दत्तात्रय पेखळे यांच्या हस्ते गायकवाड यांचा तर ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे आणि मावळते उपाध्यक्ष शामराव चाफळकर यांच्या हस्ते सुधाकर जाधव यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. पेखळे आणि चाफळकर यांचा सत्कार जाधव यांनी केला. जनसंपर्क संचालिका रंजना बोराडे, संचालक अशोक सातभाई, हेमंत गायकवाड, डॉ. प्रशांत भुतडा, अशोक चोरडिया, सुनील आडके, जयश्री गायकवाड, श्रीराम गायकवाड, जग्गनाथ आगळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम, अशोक डेरले, यशवंत पागेरे आदी उपस्थत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाथांबे अडकले लालफितीत

$
0
0

दोन वर्षापासून पालिकेला मिळेना वेळ; मनसेकडून ठरावाची तयारी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी व रिक्षा चालकांचे रस्त्यावर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी दोन वर्षापूर्वी आरटीओ आणि शहर वाहतूक शाखेने महापालिकेला २६३ रिक्षा थांब्याचा प्रस्ताव पालिकेला दिला. परंतु दोन वर्षापासून रिक्षा चालकांचे थांबे हे पालिकेच्या लालफिती कारभारात अडकले असून, त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे रिक्षा चालकांना प्रश्न निकाली काढण्यासाठी मनसे सरसावली आहे. मनसेने रिक्षाचालकांना अधिकृत थांबे देण्यासाठी थेट ठरावाची तयारी सुरू केली आहे. सभागृह नेते सलिम शेख यांनी या थांब्यासंदर्भात शनिवारी शहर वाहतूक पोल‌सिांची भेट घेतली.

शहरातील रिक्षाचालकांच्या बेश‌स्तिीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. रिक्षाचालक आपल्या मनमानीने कुठेही रिक्षा थांबवत असल्याने शहरातील वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे मार्च 2013 मध्ये आरटीओ, पोल‌सि आणि महापालिकेने एकत्र‌ति येऊन रिक्षा थांब्यासंदर्भात सर्व्हेक्षण केले होते. आरटीओ आणि शहर पोल‌सि

वाहतूक शाखेने या समितीने शिफारस केलेल्या रिक्षाथांब्यापैकी २६३ रिक्षा थांब्याची यादी करत, त्याच्यावर अंमलबजावणी करण्याची सूचना महापालिकेला केली होती. महापालिकेने मात्र या प्रस्तावावर लक्षच दिलेले नाही.

शहरात रिक्षाचालकांच्या थांब्याची बोंब असताना महापालिकेत मात्र गेल्या दोन वर्षापासून हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. शहरातील रिक्षाचालकांच्या थांब्यासंदर्भात सभागृह नेते सलिम शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शनिवारी शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक एम. एम. बागवान यांची भेट घेतली. यावेळी संदीप लेनकर, सचिन भोसले, जमीर शेख यांनी रिक्षा चालकांच्या थांब्याचा प्रश्न उपस्थित केल्यावर महापालिकेमुळेच रिक्षाथांबे आडल्याचा दावा केला. पालिकेला रिक्षा थांब्यासंदर्भात दिलेला प्रस्तावच त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या हातात दिला. त्यामुळे पदाधिकारीही आश्चर्य चकीत झाले.

आरटीओ आणि पोल‌सिांनी दिलेल्या या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मनसेने घेतला असून, हे रिक्षाथांबे अधिकृत करण्यासाठी आता महासभेत ठराव आणण्याची तयारी सुरू केली आहे. महासभेत ठराव करून वाहतुकीचा प्रश्न निकाली काढणार असल्याचे सलिम शेख यांनी सांगीतले आहे. त्यामुळे नागरिकांची लवकरच वाहतुकीच्या कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे.


अडीच हजार रिक्षांचा प्रश्न

महापालिकेने शहरात २६३ रिक्षा थांब्याना परवानगी दिल्यास प्रत्येक थांब्यावर जवळपास १० ते १५ रिक्षा थांबू शकणार आहेत. त्यामुळे शहरातील जवळपास अड‌ीच हजार रिक्षांना अधिकृत जागा मिळणार आहे. त्यामुळे रस्त्यात कुठेही रिक्षा थांबवण्याचे प्रमाण कमी होऊन वाहतुकीचा प्रश्नही सुटेल. विशेषता शालिमार, सीबीएस, आरके, अशोक स्तंभ, द्वारका, मुंबईनाका, बसस्टॅन्ड आदी ठिकाणांवरील रिक्षा थांब्याचा ताणही कमी होणार आहे.





शहरात २६३ अधिकृत रिक्षाथांबे तयार झाल्यास कुठेही रस्त्यावर रिक्षा थांबवण्याचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न बऱ्यापैकी सुटणार आहे. महासभेत लवकरच ठराव करून ही रिक्षाथांबे अधिकृत केली जातील.

- सलिम शेख, सभागृहनेते, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांचा रास्तारोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

शिवाजीनगरमधील प्रभाग क्रमांक १७ मध्ये नागरी सुविधा पुरवाव्यात यासह टवाळखोर, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कारवाई करावी, या मागणीसाठी नगरसेवक दिनकर पाटील व नगरसेविका लता पाटील यांनी रहिवाशांसह कार्बननाका येथे रास्तारोको आंदोलन केले. पोलिस प्रशासन व महापालिका अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवदेन देत प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक पाटील यांनी दिला आहे.

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मधील जंगलीदास महाराज रोड, गंगापूररोड येथे दुभाजक टाकण्यात यावेत, कार्बन नाका ते ज्योती ट्रक्चर कंपनीपर्यंतच्या रस्त्याचे रूंदीकरण करावे, गतिरोधक टाकण्यात यावेत, गंगापूररोडवरील अनधिकृत पार्किंग बंद करावी, अनधिकृत लॉन्सवर कारवाई करावी, शिवाजीनगर भागातील गुंठेवारी पद्धतीने बांधलेली घरे अतिक्रमण विभागाने काढावीत, मुख्य रस्त्यांवर अनधिकृत असलेले ट्रान्सपोर्ट व्यवसाय बंद करावेत, उद्यानांची निगा राखावी आदी मागण्यांचे निवेदन नगरसेवक पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहे.

प्रभाग १७ मधील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. धृवनगर, शिवाजीनगर, श्रमिकनगर व अशोकनगर भागातील टवाळखोर, गुन्हेगार, गुंडांचा उवद्रव वाढला आहे. त्यांच्यावर कामयस्वरुपी कारवाई करण्यात यावी, चौकाचौकात घोळके करून उभे राहणारे टवाळखोर मुलींची छेड काढतात. पोलिसांनी शिवाजीनगर भागात गस्त वाढवावी, तलवारीने केक कापणाऱ्यांवर कारवाई करावी व गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना सुरक्षा देतात म्हणून त्यांची तत्काळ बदली करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

रास्तारोको आंदोलनात अमोल पाटील, दिनकर कांडेकर, राजाराम पाटील, दशरथ गुरगुडे, लियाकत शेख, संजू तांबे, सदानंद नाईकवाडी, संजय ठुबे यांसह प्रभागातील शेकडो रहिवाशी सहभागी झाले होते.

महापालिका व पोलिस प्रशासनाला वेळोवेळी समस्यांबाबत पत्रव्यवहार केला आहे. परंतु, महापालिका नागरी सुविधा पुरवत नाही. पोलिस प्रशासन टवाळखोर व गुन्हेगारांवर कारवाईच करीत नाही. यासाठी प्रभाग १७ मधील रहिवाशांना बरोबर घेत रास्तारोको आंदोलन करण्याची वेळ आली. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. - दिनकर पाटील व लता पाटील, नगरसेवक, प्रभाग क्रमांक १७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images