Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

चारित्र्याच्या संशयावरून अग्न‌िपरीक्षेचा जाच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पतीच्या मृत्यूनंतर चारित्र्यावर संशय घेऊन एका महिलेला अग्निपरीक्षा देण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा उद्वेगजनक प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारला सासर असलेल्या कंजारभाट समाजातील ही महिला सध्या ओझर येथे माहेरी राहात असून, तेथेही तिला जातपंचायत समिती रात्री-अपरात्री त्रास देत असल्याने तिने मदतीसाठी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिसांचा दरवाजा ठोठावला आहे.

पोलिसांकडे तिने आपली कहाणी कथन केली आहे. त्यानुसार, पतीच्या निधनानंतर तिच्या विवाहित मावस दिराने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला लग्नाची मागणी घातली. मात्र तिने नकार दिला. यानंतर तिच्याविषयीच आरोप करण्यात आले. अखेर तिने नंदुरबारमधील पोलिस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाची तक्रार दिली. महिलेचे बाजूच्याच एका तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप सासरकडील मंडळींनी जातपंचायतीत केला. कलंकित असल्याने तिला घरात ठेवण्यास सासू आणि दिराने नकार दिला. तिने नाशिकच्या सिडकोतील महिला मंडळाकडे प्रकरण दाखल केले आहे.

अघोरी शिक्षा

महिला दोषी आहे वा नाही हे ठरविण्यासाठी तिच्या मुलाला अग्नपरीक्षा द्यावी लागेल, असे जातपंचायतीने तिला सांगितले. शेणाच्या तीनशे गौऱ्यांमध्ये एक कुऱ्हाड सात दिवस तापविली जाते व हातावर पाच रुईची पाने ठेवून त्यावर ती कुऱ्हाड ठेवून मुलाला सात पावले चालण्यास सांगितले जाते. मुलाचे हात भाजले तर संबंधित महिलेवर लावण्यात आलेले आरोप खरे असल्याचे सिद्ध होते. त्यानंतर महिलेला निर्वस्त्र करून तिला आगीत चालवून पापक्षालन केले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कामगारांचा स्वरक्षणासाठी संघर्ष!

0
0

श्रीधर देशपांडे

चांगले राहणीमान चांगले जीवन जगता यावे, अन्याय नको अशा कितीतरी गोष्टींसाठी देशात स्वातंत्र्यपूर्व व नंतरही कामगार चळवळ अखंडितपणे यशस्वी मार्गक्रमण करीत आहे. सततच्या चळवळीमधून कामगारांच्या मागण्या व लाभांबरोबर चळवळीने एक मूलगामी हत्यार संपादन केले. ते म्हणजे विविध कामगार कायदे. देशाच्या घटनेने दिलेल्या युनियन करण्याच्या मूलभूत अधिकाराला पायाभूत धरून चळवळीने आपल्या ८०-९० वर्षांच्या कारकिर्दीत अनेक कायदे मिळविले. त्यासाठी पोटाला टाच देऊन, प्राण पणाला लावत मोठी आंदालने, संप, प्रचंड त्याग, पोलिस केसेस, तुरुंगवास यासह कामगारांनी त्याग केला.

काही प्रमुख कायद्यांनी वानगीदाखल किती फायदे, कसे संरक्षण दिले ते बघा. संप करण्याचा, सामुदायिक सौदेबाजीचा अधिकार, तंटा वा अन्यायाविरोधात कोर्टात जाण्याचा अधिकार असे अनेक मौलिक अधिकार औद्योगिक कलह कायद्याने दिले. त्याचवेळी उद्योजकाला लॉकआऊट करण्याच्या अधिकाराला न्यायाच्या तत्त्वानुसार मान्यता दिली गेली. घरातल्या चुली बंद करून संप करणाऱ्या कामगारांना संपकाळात मालक लोक मागील दाराने प्रॉडक्शन चालू ठेवतात हे किती जाचक व अन्यायकारक आहे हे अर्थातच सांगण्याची गरज नाही. एका वर्षात २४० दिवस काम केल्यानंतर कायम होण्याचा अधिकार 'इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर अ‍ॅक्ट'ने दिला. अ‍ॅप्रेंटिस म्हणून १ वर्ष काम केल्यानंतर कायमच्या नोकरीसाठी प्राधान्य मिळण्याचा अधिकार 'अ‍ॅप्रेंटिस कायद्या'ने दिला. 'फॅक्टरी अ‍ॅक्ट'ने कामाचे तास, ओव्हरटाईम, आरोग्य, सुट्ट्या, सुरक्षितता, महिलांना रात्रपाळीपासून सुटका असे अनेक अधिकार दिले. मोठ्या आंदोलनामधून पीएफ, पेन्शनचे अधिकार कायद्यातून मिळाले. नंतर झालेला बोनसचाही कायदा आहे. किमान वेतनामागे आयएलओ, आयएलसी सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. घटना व लोकशाही मूल्यांना धरून हे कायदे झाले.

देशात ५० एक कोटी कामगार कष्टकरी आहेत. संघर्षाशिवाय कामगारांना काही मिळत नाही व मिळणार नाही हे प्रचलित समाजव्यवस्थेचे वैशिष्ट्य वा दंडक आहे हे कामगार जाणून आहे. म्हणून कामगार कायद्यांचे महत्त्व हे महान व मूलभूत आहे. असे असूनही मुठभर उद्योजक लोकांची संपत्ती किती महाकाय प्रचंड प्रमाणात वाढली. नंतर जागतिकीकरणाच्या काळात फारच विशेषतः वाढली.

इतके प्रभावी कायदे अस्तित्वात असूनही मालक-कामगारांमधील आजच्या जागतिकीकरणाच्या काळात देशातील ९० टक्के तंटे हे केवळ कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आहेत! दुसरी गोष्ट म्हणजे याच काळात विषमतेने उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय दोहा परिषद म्हणाली 'जगात मुठभरांच्या हातात फार सत्ता आणि मत्ता एकवटली आहे, हा खरा प्रश्न आहे' तर वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष म्हणतात 'नुसत्या बाजारपेठेवर अवलंबून राहून चालणार नाही. मानवालाही महत्त्व आहे!' परंतु, अतिशय धक्कादायक बाब म्हणजे आपल्या देशातले आजचे सरकार कामगार कायद्यांमध्ये बदल करून त्यांना सुरूंग लावायला निघालेत! त्यावर एक कटाक्ष टाकू. फॅक्टरी अ‍ॅक्टमध्ये कामाचे तास १२ शक्य. ओव्हरटाईमला नकार, शक्य. फॅक्टरी अ‍ॅक्ट लागू होण्यासाठी कामगार संख्या ४० पर्यंत वाढविणार. बहुसंख्य कारखान्यात ४० हून कमी कामगार संख्या असल्याने देशातील ७० टक्के कामगारांना या अ‍ॅक्टचे संरक्षण राहणार नाही. ते कायद्याच्या कक्षेबाहेर फेकले जाणार. भाजप सरकार 'मेक इन इंडिया' प्रोजेक्ट व त्यासाठी परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी इतकी उत्सुक आहे की त्यांना कामगार कायद्यात बदल करणे ही अगदी सर्वसाधारण बाब वाटते. लोकसभेतील फॅक्टरीज अ‍ॅक्ट (अमेडमेंट बील) मधील दुरूस्ती ही मंजुर करण्यासाठी त्यांचा खटाटोप हे त्याचेच निर्देशक आहेत. ३०० पर्यंत कामगारसंख्या असलेल्या सर्व आस्थापनांमध्ये कामगारांना काढून टाकण्याचा अधिकार (हायर अॅण्ड फायर) राहील. किमान वेतन, आयएलसी निकष व सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार २५ टक्के वाढ धरून २०,८६१ रुपये ठरते. या सर्व बाबींचा विचार करून सध्याच्या सरकारने मात्र ते ६०९८ रुपये इतके ठरवले. ६०९८ रुपयांमध्ये ३ जणांचे कुटुंब तरी जगू शकेल का?

प्रचंड त्यागातून मिळवलेल्या या कायद्यांना देशातल्या आतापर्यंतच्या सर्व सरकारांची संमती आहे. आंतरराष्ट्रीय व भारतीय श्रम संमेलनाचा पाठिंबा आहे. घटनेतील युनियन करण्याचा मूलभूत अधिकार व संविधानात्मक पाया या कायद्यांमागे आहे.

या सर्वांचा विसर पडून सरकार अशी कामगार विरोधी गंभीर पाऊले उचलत असेल तर कामगारांवर ही गुलामगिरी लादण्याचाच प्रकार नव्हे काय? म्हणूनच २ सप्टेंबर २०१५ च्या देशातल्या सर्वात मोठ्या ऐतिहासिक संपात १५ कोटी कामगार कष्टकऱ्यांनी सहभाग घेत हे कामगार विरोधी कायद्यातील बदल आम्ही सहन करणार नाही असे सरकारले बजावले होते. कामगारांचे अंततः होणाऱ्या आर्थिक नुकसानीमुळे त्यांच्या खिशाला कोट्यावधी रुपयांची कात्री लागणार. हे कोट्यावधी रुपये अर्थातच बड्या उद्योजकांच्या खिशात जाणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. यातून ते श्रीमंत होणार आणि कामगार, शेतमजूर अधिकाधिक गरीब. पण मंदी म्हणजे काय? भरपूर प्रॉडक्शन आहे पण खरेदीसाठी जनतेच्या खिशात पैसा नाही. परिणामतः हीच मंदीची परिस्थिती देशात निर्माण होऊ शकते. सबब, कोट्यवधी कामगार, शेतकरी शेतमजुरांची क्रयशक्ती - विकत घेण्याची क्षमता कशी वाढेल, हे सरकारला बघणे आवश्यक आहे.

नोबेल प्राइज विजेते विख्यात अर्थशास्त्रज्ञ प्रा. अमर्त्य सेन म्हणतात 'राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ म्हणजे प्रगती हे समीकरण झाले आहे'. पण त्याचा दुष्परिणाम असा होत आहे की 'राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाटपाकडे दुर्लक्ष होत आहे' आणि पुढे जाऊन ते म्हणतात, की त्यामुळे लोकांची क्रयशक्ती कमी होते. अन्नधान्य घेण्यसाठी सुद्धा गरीबांकडे पैसा राहत नाही. तेव्हा शेवटी हे लक्षात घ्यावयास पाहिजे की सध्याचा कामगार कष्टकऱ्यांचा लढा हा स्वसंरक्षणाबरोबरच देशासाठी आहे.

(लेखक कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेते आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेआयटीत 'प्रोजित-२०१६'

0
0

लखन सावंत, कॉलेज क्लब रिपोर्टर

जवाहर एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च (जेआयटी) इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये 'प्रोजित २०१६' या राष्ट्रीय पातळीवरील प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (१३ फेब्रुवारी) रोजी ही स्पर्धा होणार असून यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर आहे.

तांत्रिक शिक्षणाचा भर प्रामुख्याने विज्ञान-तंत्रज्ञान विषय समजून घेण्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक कुशलतेवर असतो. त्यात चिकित्सक वृत्तीत वाढ करणाऱ्या गोष्टींचा अंतर्भाव नसतो. शिकविणाऱ्यांना सर्व उत्तरे माहित असतात व विद्यार्थी प्रयोगातून तिच अपेक्षित उत्तरे शिक्षकांच्या समोर सादर करतात. विद्यार्थ्याने आपलं ज्ञान किती विकसित केलं आहे आणि कितपत उपयोजित होणार आहे, या गोष्टींचे आकलन प्रोजितसारख्या प्रोजेक्ट प्रदर्शन व स्पर्धेतून होणार आहे. विद्यार्थ्यांमधील विविध गुणांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न 'जेआयटी' इंजिनीअरिंग कॉलेज सलग तीन वर्षांपासून करत आहे.

यात मेकॅनिकल, सिव्हील, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स-टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग संबंधित प्रोजेक्टवर आधारित मॉडेल यात मांडता येणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या संकल्पना आणि कौशल्य दाखविण्याची संधी 'प्रोजित २०१६' मधून मिळणार असल्याचे मत प्राचार्य डॉ. एम. व्ही. भटकर यांनी व्यक्त केले. देशपातळीवरील विविध प्रोजेक्ट एकाच छताखाली आणण्याचा या स्पर्धेचा उद्देश आहे. मागील वर्षी जवळपास १५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यात १५० प्रोजेक्टचे सादरीकरण करण्यात आले होते. ही स्पर्धा अभियांत्रिकीच्या पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता खुली आहे.

ऑनलाईन रजिस्ट्रेशन महाविद्यालयाच्या www.jitnashik.edu.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. एका ग्रुपमध्ये जास्तीत जास्त चार विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल. आपल्या प्रोजेक्टचा सारांश शनिवार (६ फेब्रुवारी) पूर्वी ई-मेलद्वारा पाठविता येईल. सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रोजेक्ट व्यतिरिक्त एनएफएस, रोबो रेस, ब्रीज मेकिंग यासारख्या स्पर्धा होणार आहेत.

विजेत्या विद्यार्थ्यांना दीड लाखापर्यंत बक्षिसांचे वितरण करण्यात येणार असल्याचे या स्पर्धेच्या समन्वयक प्रा. गीतांजली मोहोळे व सहसमन्वयक प्रा. एस. बी. घोरपडे यांनी सांगितले. स्पर्धेत भाग घेण्यासाठी मेकॅनिकल (९५२७५१०६८८), सिव्हील (९६२३३४४९७७), कॉम्प्युटर (८३८०८१४०४५), इलेक्ट्रॉनिक्स-टेलीकम्युनिकेशन (९५४५६४००२२), इलेक्ट्रिकल (९९७०४४९१९१) या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची मुजोरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

माजी खासदार समीर भुजबळ यांना 'इडी'ने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेल्या आंदोलनामुळे आता थेट नागरिक वेठीस धरले जात आहेत. अमृतधाम येथे पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रास्ता रोको करत, एसटीवर दगडफेक केली. कार्यकर्ते एवढ्यावर न थांबत त्यांनी दमदाटी करत प्रवाशांना गाड्यांमधून उतरण्यास भाग पाडले. त्यामुळे या आंदोलनामुळे आता नागरिकांमध्येच असंतोष निर्माण झाला आहे.

अमरधाम बळी महाराज मंदिरासमोर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने शहराच्या महिला अध्यक्षा सुनीता निमसे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनाने मात्र सर्वसामान्य नागरिक वेठीस धरले गेले. यावेळी कार्यकर्त्यांनी बसेसवर दगडफेक करत जबरदस्तीने वाहनांची अडवणूक केली. प्रवाशांना बसेसमधून खाली उतरवत त्यांना पायी जाण्यास भाग पाडले. कार्यकर्त्यांनी प्रवाशांशी दादागिरीही केली. त्यामुळे प्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांशी कार्यकर्त्यांनी हुज्जतही घातली. त्यामुळे या ठिकाणी तणाव पसरला असतांना पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत होते. त्यामुळे सर्वसामान्यांमध्येच असंतोष निर्माण झाला. कार्यकर्त्यांच्या या दादागिरीमुळे शाळेतल्या मुलांचीही होरपळ झाली. नागरिकांच्या तक्रारीनंतर आडगांव पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेवून वाहतूक सुरळीत करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

नाशिकरोडला आंदोलन

नाशिकरोड : माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नाशिकरोड येथे बिटको चौकात बुधवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. पक्षाचे नाशिकरोडचे अध्यक्ष मनोहर कोरडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नगरसेविका वैशाली दाणी, रंजना बोराडे, प्रशांत वाघ, रामू जाधव, भाई मंडलिक, बाळासाहेब मते, दिनकर आढाव आदींनी सहभाग घेतला. नाशिकरोड व उपनगर पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

देवळाली कॅम्प, भगूरला निषेध

देवळाली कॅम्प : खोटे आरोप करून समीर भुजबळ यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाने कारवाई केल्याचा आरोप करीत देवळाली कॅम्प राष्ट्रवादी काँग्र‍ेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भगूर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली 'रास्ता रोको' करीत निषेधांचे फलक झळकविण्यात आले. यावेळी रेखा निमसे, पूनम बर्वे, वर्षा साळवे, कोमल साळवे, पूजा डावरे​ आदींसह राष्ट्रवादी युवतीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडी कंत्राटासाठी २१ ठेकेदार इच्छूक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या घंटागाडी कंत्राटाच्या निविदेची प्रक्रिया सुरू असून महापालिकेने केलेल्या आवाहनाला आतापर्यंत २१ ठेकेदारांनी प्रतिसाद दिला आहे. बुधवारी झालेल्या प्राथमिक प्रक्रियेमध्ये मुंबई, ठाणे व सुरतसह ठेकेदारांनी सहभाग घेवून घंटागाडी निविदे संदर्भात अटी व शर्ती जाणून घेतल्यात. निविदा १७ फेब्रुवारीपर्यंत दाखल केल्या जाणार असून २१ फेब्रुवारीला घंटागाडीचा ठेकेदार निश्चित होणार आहे.

महापालिकेतर्फे घंटागाडीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून पाच वर्षासाठी घंटागाडीचे कंत्राट दिले जाणार आहे. त्याची कारवाई सध्या सुरू असून या ग्लोबल निविदा प्रक्रियेत ठेकेदारांनी सहभाग घ्यावा यासाठी महापालिकेने दहा लाख लोकसंख्येवरील देशातील ७५ शहरातील ठेकेदारांना कॉल करण्यात आले आहे. निविदा प्रक्रियेसंदर्भातील माहिती देण्यासाठी इच्छुक ठेकेदारांना आरोग्य विभागाकडून पाचारण करण्यात आले होते. यात २१ जणांनी सहभाग घेतला. या ठेकेदारांनी अटी शर्तीची माहिती जाणून घेतली. घंटागाडी कर्मचाऱ्यांचे वेतन, सुविधा, घंटागाडी उशिरा आल्यास आकारण्यात येणारा दंड आदींची माहिती ठेकेदारांनी जाणून घेतली. महापालिकेने नव्या शासकीय आदेशाप्रमाणेच कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे लागेल, अशी माहिती या ठेकेदारांना दिली.

ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना 'नो एन्ट्री'

महापालिकेने सध्या कार्यरत असलेल्या चारही ठेकदारांना किमान वेतन दिले नाही म्हणून महापालिकेने काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेत त्यांना सहभागी होता येणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. या निविदाधारकांनी सध्याच्या कामगारांना किमान वेतन दिल्यास आणि माफीनामा दिल्यास सहभागी होता येणार आहे. त्यामुळे आता या ठेकेदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१८ दिवसाआड पाणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील नामपूर येथे उन्हाळ्याची दाहकता जाणवू लागली असून, ऐन उन्हाळ्याच्या सलामीपूर्वीच गावात तब्बल १८ दिवसाआड पाणीपुरवठा होऊ लागला आहे. यामुळे नामपूरसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या भीषण पाणीटंचाईमुळे महिलांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आताच आल्याने मार्च, एप्रिल व मेमधील परिस्थितीने तर अंगावर शहारे आणले आहेत.

सटाणा शहरानंतर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून नामपूरला ओळखले जाते. मोसम खोऱ्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण व संवेदनशील म्हणून या गावाचा उल्लेख होतो. आजमितीस या गावाची लोकसंख्या ३५ हजारांच्या आसपास आहे. आजही या ठिकाणी सुमारे ४५ वर्षापूर्वींच्या जुन्या विहिरींद्वारेच पाणीपुरवठा होत आहे. गावाबरोबरच परिसरात नववसाहतींनी नवनिर्मिती केली आहे. नववसाहत वगळता संपूर्ण गावाला जुन्या जॅकवेलद्वारे सार्वजनिक पाणीपुरवठा होतो. नामपूर ग्रामपंचायतीच्या एकूण पाच विहिरी आहेत. या पाच ही विहिरींचे पाणी एकत्रित करून जॅकवेलच्या माध्यमातून नामपूरला पाणीपुरवठा होत असतो.

मोसम खोऱ्याची जीवनवाहिनी असलेल्या हरणबारी धरणातून जानेवारी महिन्यात सुमारे ५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग आला. मात्र, सदरचे पाणी पूर्णत: पिण्यासाठी आरक्षित केल्याने पाटचाऱ्यांना लाभ मिळू शकला नाही. परिणामी सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींना या पाण्याचा लाभ झाला नाही. ग्रामपंचायतीच्या विहिरी आटल्याने गावातील ग्रामपंचायत सदस्या पुष्पा मुथ्या, किरण अहिरे, ग्रामपुरोहित किरण भातखळे यांच्या विहिरीतून पाणी उपलब्ध होऊन देखील पाण्याची टंचाई कमी होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. उन्हाळ्याला सुरुवात होत नाही तोच ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट गडद झाल्याने टँकरची संख्या वाढणार आहे. ‌

नामपूरचा पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी सन २००७ मध्ये सुमारे एक कोटी रुपयांची जलस्वराज योजना मंजूर झाली होती. या योजनेला दीड वर्षात पूर्ण करण्याची अपेक्षा असताना ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे सदरची योजना तब्बल सात वर्षाचा कालावधी योजना पूर्णत्वासाठी घेण्यात आला. मात्र, योजना साकार होऊन देखील पाण्यासाठी तीळमात्र सुधारणा झाली नसल्याने योजनेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

नामपूर गावात नळपाणीपुरवठा योजना असताना नळांना पाण्याचा थेब नाही. नववसाहत परिसरातील नागर‌िकांना वर्षभर दुष्काळाचे चटके बसत असतात. वर्षभरापेक्षाही उन्हाळ्यातील परिस्थिती नववसाहतमधील नागरिकांना जीवघेणी ठरत असते. यामुळे कायमस्वरूपी पिण्याचे पाण्याचे संकट सोडविण्यासाठी ग्रामपालिकेने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.

नामपूर गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, विहिरीची खोलीकरण करून आडवा बोअर मारण्यासाठी प्रयत्न सुरू असून, मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. - प्रमोद सावंत, सरपंच नामपूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदापात्र हरवले पानवेलींच्या जाळ्यात

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

ना‌शिक जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदी प्रदूषण अन् पानवेलींच्या विळख्यात सापडली आहे. शिंगवे, करंजगाव, चापडगाव, मांजरगाव भागात पानवेलींनी गोदावरीचे पात्रच झाकले गेले आहे. या गोदापात्रातून पानवेली हटविण्याची मागणी परिसरातून होत आहे.

निफाड तालुक्यातील चाटोरी, सायखेडा, चांदोरी, कोठुरे, शिंगवे भागात वाहणारी गोदावरी नदी वाढलेल्या पानवेलींमुळे दिसेनाशी झाली आहे. सायखेडा, करंजगाव पुलाजवळ पानवेलींनी जणू वेढाच टाकला आहे. नाशिक रस्त्यावरील पुलाला तर निफाड-करंजगाव रस्त्यावरील करंजगाव येथील पुलाला अडकून आहेत. यामुळे या पुलांना धोका पोहचण्याची शक्यता वाढीस लागली आहे. पाटबंधारे विभागाने या गोदावरी नदीपात्रातील पानवेली तत्काळ हटवाव्यात, अशी मागणी गोदाकाठ भागातील ग्रामस्थांनी केली आहे.

सध्या गोदावरी पात्राची पाणीपातळी घटली आहे. यामुळे आता पानवेली काढणे शक्य आहे. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्याने पानवेली काढणे अवघड जाते. तसेच पाण्याचा प्रवाह वाढल्यास पानवेलीमुळे पाणी अडवून करंजगाव पुलाला धोका पोहोचू शकतो. यामुळे या पानवेली लवकरात लवकर हटविण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

गोदावरी नदीपात्रातील पानवेली हटविण्यात याव्यात. या पानवेलींमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊन हानी झाल्यास संबंधित विभागच जबाबदार राहील. - खंडू बोडके, सरपंच, करंजगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेमुला प्रकरणी संघटना आक्रमक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आंध्र प्रदेशातील रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाची केंद्रीय गुप्तचर विभागातर्फे चौकशी करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली.

निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना दोन्ही संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठामध्ये पीएच. डी. करणाऱ्या रोहित याला सामाजिक बहिष्कृततेला सामोरे जावे लागले. म्हणूनच त्याने गळफास घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपविल्याचा आरोप करण्यात आला. रोहित आणि अन्य चार विद्यार्थ्यांवर सरकारमधील काही मंत्री, हिंदुत्ववादी संघटना व विद्यापीठ प्रशासनाने जातीय द्वेषातून अन्यायकारक सामाजिक बहिष्कृतता लादली. विद्यापीठाची इमारत, वसतिगृह कॅन्टिन आणि ग्रंथालयातही त्यांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. परिणामी त्यांना रस्त्यावर दिवस काढावे लागले.

या प्रकरणातील सत्य जनतेसमोर यावे यासाठी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू पी. अप्पा राव यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी आरपीआयचे उत्तर महाराष्ट अध्यक्ष प्रकाश पगारे, रमेश म्हस्के, संजय सानप, प्रविण गांगुर्डे, फुलचंद जाधव, सचिन म्हसदे यांनी केली आहे.

स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियानेही याबाबत निवेदन दिले आहे. रोहितच्या मृत्युस कारणीभूत व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेवर बंदी घालावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. दिल्ली येथील एसएफआय संघटनेवर झालेल्या लाठीमाराचा फेडरेशनचे शहराध्यक्ष भरत घाटोळ, चेतन शिवरे, दिनेश वाघसरे, प्रणाली गायकवाड, जयश्री लहानगे आदींनी निषेध नोंदविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बंडू बच्छाव यांचा उमेदवारी अर्ज वैध

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील बाजार समितीच्या निवडणूक अर्ज छाननी प्रक्रियेत शिवसेनेच्या बंडू बच्छाव यांच्यासह चौघांचे अर्ज अवैध ठरले होते. या प्रकरणी त्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अपील केले होते. त्यावर निर्णय होऊन बंडू बच्छाव यांच्यासह चारही इच्छुकांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. उद्या माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण २७६ अर्ज दाखल झाले होते. अर्ज छाननी प्रक्रियेनंतर १८ अर्ज अवैध ठरवण्यात आले होते. यात शिवसेनेच्या बंडू बच्छाव यांच्या अर्जाचा देखील समावेश होता. अर्ज अवैध ठरल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बालसाने यांच्या निर्णयाबाबत पाचही उमेदवारांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अपील दाखल केले होते. त्यावर निर्णय देण्यात आला असून, या पाचही उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. यात बंडू बच्छाव यांच्यासह सुरेश पवार, मोठाभाऊ आहिरे, एल. जी. बच्छाव यांचा समावेश आहे. बंडू बच्छाव यांचा अर्ज अवैध ठरल्याने शिवसेनेच्या पॅनल निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे पक्षाला देखील दिलासा मिळाला आहे. दरम्यान, ५ फेब्रुवारीला होणाऱ्या माघारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप व ‌शिवसेना हे दोन्ही मित्रपक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत. यामुळे निवडणूक चुरशीची होणार असून काँग्रेस व राष्ट्रवादीचेही सेना-भाजपपुढे आव्हान असणार आहे. ग्रामीण भागात ‌शिवसेना भक्कम आहे. मनमाड व नांदगाव बाजार समितीत याची प्रचिती आली आहे. यामुळे मालेगावात भाजपला जोर लावावा लागणार असून, हिरे बंधूंचीही प‌रीक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात वाढतोय कॅन्सरचा धोका !

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक बदलती जीवनशैलीपर्यावरणाचा इफेक्ट मानवी ‌जीवनावर दिसू लागला आहे. क्व‌चित जाणवणारा कॅन्सर नाशिक शहरात झपाट्याने आपली पाळमुळं रुजवत असून, दरवर्षी सरासरी चार हजार पेशंटना कॅन्सर होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहरात कॅन्सरच्या पेशंटमध्ये वाढ होत असली तरी कॅन्सर पेशंट बरे होण्याचे प्रमाणही ९५ टक्क्यांपर्यंत वाढल्याचा दावा कॅन्सर तज्ज्ञांनी केला आहे.

कॅन्सरच्या पेशंटमध्ये तरुणांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. ताणतणाव त्यामुळे उद्भवणारी व्यसनाधिनता, विकोपाला जाणाऱ्या सवयी आणि अनुवंशिकता हे या आजारा मागील प्रमुख कारणे आहेत. अमेरिकन किंवा युरोपियन स्कूल ऑफ थॉटनुसार सर्वच पेशंटवर उपचार केले जातात; मात्र कॅन्सर रुग्ण कोठे राहतो, तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार पेशंटला कोणत्या प्रकारच्या उपचाराची गरज आहे, याचा सारासार विचार करुन उपचार होणे गरजेचे आहे. अनेक संशोधनातून हा नवीन विचारही समोर येत असल्याचेही दिसते.

पूर्वी कॅन्सरचे निदान करणे अवघड जायचे मात्र आता बदलत्या तंत्रज्ञानामुळे व पेट सिटी स्कॅनमुळे नाशिक शहरात अचूक निदान करणे व त्याची स्टेज समजणे सोयीचे झाले आहे. स्टेज समजल्यानंतर त्यावर उपचार देखील तातडीने झाल्यास पेशंट लवकर बरा होऊ शकतो. यामुळे औषधोपचार, नियम‌ित व्यायाम यामुळे तिसऱ्या पातळीतील कॅन्सरही बरे झालेले पेशंट अनेक वर्ष चांगल्या प्रकारे जीवन जगत असल्याची उदाहरणे आहेत. पेट स्कॅन प्रणालीमुळे अचूक निदान झाल्याने अचूक औषधोपचार होत आहेत.

२०१३ या वर्षात नाशिक शहरातील एका रुग्णालयात २ हजार ७२४ पेशंटवर उपचार करण्यात आले. २०१४ मध्ये ३ हजार ६८१ पेशंटवर उपचार करण्यात आले तर २०१५ मध्ये ४ हजार २०० पेशंटवर उपचार करण्यात आले. तीन वर्षात १० हजार ६०५ पेशंटवर उपचार करण्यात आले. यातील ९ हजार २00 पेशंट १०० टक्के पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे ज्या प्रमाणात आजार बळावतो आहे. त्या प्रमाणात तो बरा देखील होत असल्याने पेशंट व त्यांच्या कुटुंबीयांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार सुरू करणे गरजेचे आहे. अनेकदा वेळेत उपचार न घेतल्याने कॅन्सरचा धोका वाढत असल्याचेही समोर आले आहे.

पूर्वी टीबी झाला की, पेशंट व त्याचे नातेवाईक घाबरून जातात. तशीच काहीशी परिस्थिती कॅन्सरबाबत आहे. २०२५ पर्यंत कॅन्सर पेशंटची संख्या पाच पटीने धोका वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र प्रगत तंत्रज्ञानामुळे यावर मात करणेही शक्य आहे. पेशंटने वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे.

डॉ. राज नगरकर, कॅन्सर तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयशानगरच्या अतिक्रमणावर हातोडा

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव व अवैध नळजोडणीधारकांवरची कारवाई सुरूच आहे. बुधवारी प्रभाग दोनमधील अतिक्रमण काढण्यात आले, तर प्रभाग एकमध्ये अवैध नळजोडणीवर दंडवसुली करण्यात आली. आयशानगर भागातील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले.

महापालिका आयुक्त किशोर बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील मनपा अतिक्रमण हटाव पथकाने बुधवारी शहरातील प्रभाग दोन आयशानगरमधील मुख्य रस्त्यांवर बांधलेल्या अतिक्रमणांवर बुलडोजर चालवला. सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान सुमारे ५० ते ६० अतिक्रमण हटविण्यात आले. या भागात व्यावसायिकांसह अनेक घरमालकांनी अतिक्रमण केल्याचे आढळून आले. मनपा पथकाने या बांधकामांवर देखील कारवाई केली. शेड्स, पत्रे अन्य सामान जप्त केले. तसेच, बांधकाम जमीनदोस्त केले.

प्रभाग दोनच्या अंतर्गत व प्रभाग अधिकारी किशोर गिडगे यांच्यासह अतिक्रमण नगररचनाकार सय्यद, अधीक्षक दीपक हादगे, बिट मुकादम संजय जगताप, अजय चांगरे, विष्णू जेधे, राजू वाघ, हर्षल गडरी, कॅमेरामन गौरव पवार आदींसह मनपा पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. यावेळी स्थानिकांचा विरोध लक्षात घेत पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.

प्रभाग एकमध्ये मनपाच्या पथकाने अवैध नळजोडणीधारकांवर कारवाई केली. यात दिवसभरात एकूण २० नळजोडणीधारकांकडून दंड वसूल करून अधिकृत करण्यात आल्या. तर, तीन नळजोडण्या बंद करण्यात आल्या. यात एकूण १ लाख ६५ रुपये दंड वसुली करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ डर्टी कंपनीवर होणार कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

शहरातील एका नामांकित औषध उत्पादक कंपनीत कामगारांना कॅन्सरसारख्या आजाराला सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव समोर आले. याबाबत मटाने 'मल्टिनॅशनल कंपनीचे डर्टी काम' असे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कडून कंपनीचा शोध सुरू झाला आहे. त्या संबंधित कंपनीवर लवकरच कारवाई करणार असल्याचे 'एफडीए' नाशिक विभागाचे सहाय्यक आयुक्त भूषण पाटील यांनी सांगितले.

औषधांचे उत्पादन करणाऱ्या नाशिकमधील नामांकित असलेल्या कंपनीत ८ जणांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केले होते. यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडून संबधित औषध उत्पादन करणाऱ्या कंपनीची चौकशी सुरू असल्याचे एफडीएचे सहाय्यक आयुक्त पाटील यांनी 'मटा'शी बोलतांना सांगितले. या औषध कंपनीतील काही कामगारांनी आर्यवेदातील तज्ज्ञ एका ज्येष्ठ डॉक्टरांच्या सल्ल्यावरून काम सोडले आहे. तर कंपनीच्या विरोधात आवाज उठविण्याऱ्या काही कामगारांना कंपनीने चुकीच्या कारणांवरून कमी केले आहे. कंपनी व्यवस्थापन कामगारांवर दबाब आणत असल्याने कॅन्सरबाबत कुणीही बोलाण्यास धजावत नसल्याचे निवृत्त व कमी केलेले कामगारांचे म्हणणे आहे. यासाठी सरकारच्या अन्न व सुरक्षा विभागानेच कंपनीची माहिती घेत कठोर कारवाईची मागणी कामगारांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळातही फुलवली लाल कोबी

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

दुष्काळावर मात करता येते हे येवला तालुक्यातील वडगाव बल्हे येथील एका तरूण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. उपलब्ध पाण्यावर ठिबक सिंचनाचा वापर करीत गणेश तुकाराम कापसे यांनी 'रेड कॅबीज' अर्थातच लाल कोबीची शेती खऱ्या अर्थाने फुलवली आहे. अगदी कमी खर्चात भरीव असं लाल कोबीचं उत्पादन काढताना अधिक उत्पन्न मिळविण्याची किमया कापसे यांनी केली आहे.

बदलत्या जमान्यात काळ्या आईच्या कुशीत नवेनवे प्रयोग शेतकरी करू लागले आहेत. वडगाव बल्हे येथील गणेश कापसे हे त्यातील एक म्हणावे लागतील. यापूर्वी त्यांनी 'अॅपल बोर' लागवडीचा यशस्वी प्रयोग केला होता. सध्या त्यांनी लाल कोबीचा मळा चांगलाच फुलवला आहे. ठिबक सिंचनचा वापर करीत कापसे यांनी अवघ्या अडीच महिन्यात फुलविलेल्या या लाल कोबीच्या उत्पादनामुळे त्यांच्या शेतात लालेलाल रंगाचे कोबी चांगलेच बहरले आहेत. कापसे यांनी १० गुंठ्याचा एक प्लॉट याप्रमाणे ५० गुंठ्यात एकूण पाच प्लॉट पाडले. त्यात त्यांनी लाल कोबीची रोपे टाकली आहेत.

एकरी तीन लाख नफा लाल कोबी लागवड करताना गणेश कापसे यांना ड्रिपसाठी २० हजार रुपये, शेतीची मशागत, लागवड अन् कीटकनाशके फवारणी आदीसाठी २५ हजार असा एक एकरामागे जवळपास ४५ हजार रुपये इतका खर्च आला होता. सप्टेंबरमधील लागवडीनंतर साधारण अडीच महिन्यात प्लॉटमधील लाल कोबी परिपक्व होत निघण्यास सुरुवात झाली. डिसेंबरच्या २० ते २५ तारखेपासून 'हार्वेस्टिंग' होताना आता कापसे यांच्या या लाल कोबीला अनेक ठिकाणहून मागणी होत आहे. एकरी ४५ हजारांचा खर्च करताना एका एकरात सुमारे १३० क्विंटल उत्पादन निघाले.

मेहनत कमी, पाणी कमी अन् अधिक उत्पन्नाची हमी यामुळे लाल कोबी हा पर्याय निवडला. इतर पारंपरिक भाजीपाल्यापेक्षा शेती करताना शेतकऱ्यांनी हा पर्याय निवडल्यास नक्कीच अधिकचे दोन पैसे त्यांच्या हातात पडतील. - गणेश कापसे, शेतकरी

लाल कोबी ही हिरव्या कोबीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून देते. महानगरात तसेच पंचतारांकित हॉटेल्समध्ये याला अधिक मागणी असते. मार्केट उपलब्ध झाल्यास अन् वर्षभर मागणी राहिल्यास शेतकऱ्यांनी हा पर्याय नक्कीच निवडावा. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. - हितेंद्र पगार, फायटो सॅनिटरी इन्स्पेक्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवस्थाने असुरक्षित

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

देवळा शहरात चोरीच्या घटनांची मालिका सुरूच असून, विशेषतः देवस्थानाच्या दानपेटींच्या चोरीचे सत्र कायम आहे. दुर्गामाता मंदिरातील दानपेटीच्या चोरीच्या घटनेनंतर लगेच साईबाबा मंदिरातील दानपेटीची चोरी करून अज्ञात चोरट्यांनी आपले अस्तित्व कायम असल्याने पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे.

देवळा गावात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी मध्यरात्री देवळा पोलिस ठाण्यासमोरील दुर्गामाता मंदिरातील जड लोखंडी दानपेटी घेऊन चोरटे पसार झाले. तत्पूर्वी विजय हरी गहिडे यांच्या घराचे कुलूप तोडून सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व मुद्देमाल चोरीस गेला होता. त्यांनतर एका मंदिरातून दानपेटीची चोरी करून पोबारा केला होता. गावातील साईबाबा मंदिरातील दानपेटीची चोरी करून त्यातील रक्कम लुटून नेली आहे. या प्रकारामुळे पोलिस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नो हॉकर्स झोनचा दिलासा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शहरातील प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी हॉकर्समुळे वाहतूक कोंडी व शहराला बकालपणा आला होता. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी नॅशनल हॉकर्स पॉलिसीअंतर्गत शहरातील फेरीवाल्यांना (हॉकर्स) हक्काची जागा देण्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या आराखड्यावर बुधवारी शहर फेरीवाला समितीने शिक्कामोर्तब केले. महापालिकेने आता शहरातील नऊ हजार ६२० फेरीवाल्यांसाठी २३८ हॉकर्स झोन तर प्रमुख रस्ते व चौक अशी ८३ ठिकाणे नो हॉकर्स झोन म्हणून जाहीर केले आहे. यामुळे शहरातील प्रमुख रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत.

नॅशनल हॉकर्स पॉलिसीची अंमलबजाणी करण्यावर पालिकेकडून गेल्या वर्षभरापासून काम सुरू होते. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखालील शहर फेरीवाला समितीकडून शहरातील हॉकर्सधारकांची निश्चित करून त्यांना हक्काच्या जागा देण्याचे काम सुरू होते. अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे, उपायुक्त डी. टी. गोतीसे यांनी वर्षभर मेहनत घेऊन या आराखड्याला अंतिम रुप दिले असून, त्या धोरणाला बुधवारी समितीने अंतिम मान्यता दिली आहे. यानुसार शहरातील प्रमुख वर्दळीचे सीबीएस, शाल‌िमार चौक, रविवार कांरजा, भद्रकाली परिसर, नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसर, गंगापूर, कॉलेजरोड या ठिकाणांसह प्रमुख रस्ते नो हॉकर्स झोन असणार आहेत. त्यामुळे या ठिकाणांवरील वाहतूक मोकळा श्वास घेणार आहे. फेरीवाल्यांसाठी दरही निश्चित करण्यात आले असून, त्यांना थेट बँकेत पैसे जमा करता येणार आहेत. डॉ. गेडाम, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हॉकर्स व नो हॉकर्स झोनची निश्चिती करून त्याला अंतिम मान्यता देण्यात आली आहे. समितीने सहा विभागात एकूण ९६२० हॉकर्सधारक निश्चित केले असून, त्यांच्यासाठी २३८ ठिकाणे हॉकर्स झोन निश्चित केले आहेत. त्यात नाशिक पूर्व-१५, पश्चिम-४७, पंचवटी-६६, नाशिकरोड-५२, सिडको-३१, सातपूरमध्ये २८ ठिकाणांचा समावेश आहे. यात १७२ ठिकाणे ही पूर्णवेळ हॉकर्स झोन असणार असून, ६६ ठिकाणे ही प्रतिबंध‌ित हॉकर्स झोन असणार असून त्या ठिकाणी विश‌िष्ट वेळेतच हॉकर्सधारकांना व्यवसाय करता येणार आहे.

शहरातील वर्दळीची व मुख्य रस्ते अशा ८३ ठिकाणी नो हॉकर्स झोन जाहीर करण्यात आले आहे. या ठिकाणी हॉकर्सधारकांना आता व्यवसायाला बंदी घालण्यात येणार आहे. या ठिकाणी हॉकर्सधारक आढळल्यास त्याच्यावर कारवाई होणार आहे. नो हॉकर्स झोन ही शहरातील मुख्य वर्दळीची ठिकाणे असल्याने या ठिकाणची वाहतूक मोकळा श्वास घेणार आहे. येत्या पंधरा दिवसात या हॉकर्सधारकांना लॉटरीपद्धतीने त्यांच्या जागेचे वाटप केले जाणार आहे. जागा निश्चिती झाल्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेवर ठेवला जाणार असून, महासभेच्या मान्यतेनंतर हॉकर्सधारकांना ओळखपत्र व विक्री परवाना दिला जाणार आहे. दरम्यान, या हॉकर्स धोरणाला हॉकर्सधारकांनी विरोध केला आहे.

दरमहा एक कोटी रुपये महापालिकेने या हॉकर्सधारकांसाठी व्यवसाय दरही निश्चिती केली आहेत. हॉकर्सझोनचेप्लस, अ, ब, क, ड अशी श्रेणी केली असून, त्यातप्लसला दररोज शंभर रुपये, अ ला ५० रुपये, ब - २५ रुपये, क- १५ रुपये, ड - ५ रुपये प्रतिदिन भाडे असणार आहे. हॉकर्सधारकांना थेट महापालिकेचा बँक खाते क्रमांक दिला जाणार असून, हॉकर्स हे भाडे दररोज महापालिकेच्या खात्यात भरतील. त्यामुळे हॉकर्सधारकांचा सर्व कारभार हा ऑनलाइन पद्धतीने पाहिला जाणार आहे.

वाहतुकीच्या सोयीसाठी मुख्य रस्ते व चौक नो हॉकर्स झोन करण्यात आले आहेत. परंतु याच जागांसाठी हॉकर्सधारकांचा हट्ट आहे. परंतु वाहतुकीच्या दृष्टीने या जागा देणे संयुक्तिक होणार नाही. जीवन सोनवणे, अतिरिक्त आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस मोजणार हवेतील गोंगाट

0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी हायकोर्टाने पोलिसांवर जबाबदारी टाकली असून हवेतील गोगांटाचा स्तर मोजण्याचे काम पोलिस करणार आहेत. त्यानुसार कारवाई होणार असून सध्या मुंबई येथे डेसीबल मॉनेटरिंग मशिन्स खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाहतूक विभागासहीत प्रत्येक पोलिस स्टेशनसाठी हे यंत्र मिळण्याची शक्यता आहे.

ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढत असून त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत असल्याचा दावा करीत एक जनहित याचिका २००९मध्ये मुंबई हायकोर्टत दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणाच नसल्याची बाब हायकोर्टाच्या लक्षात आली. त्यानुसार, हायकोर्टाने शहरी भागात पोलिस आयुक्त, ग्रामीण भागात पोलिस अधीक्षक यांच्यावर ही जबाबदारी टाकली. एखादा आवाज झाल्यानंतर त्याचा पुरावा सापडत नाही. पोलिसांकडे डेसिबल मॉनेटरिंग मशिन्स नसल्याने ध्वनी प्रदूषण मोजायचे कसे असा प्रश्न उपस्थित झाला. त्यानुसार गृह विभागाकडून सदर मशिन्स खरेदी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. आजमितीस डीजे, फटाके, हॉर्न, कारखाने यामुळे ध्वनी प्रदूषण होते. मात्र, त्याची नोंद होऊन पुढे कारवाई होत नसल्याने या गंभीर प्रकाराकडे सर्रास दुर्लक्ष होते. प्रत्यक्षात मशिन्सने मोजमाप झाल्यास शहरातील कुठल्या भागात सर्वाधिक ध्वनी प्रदूषण होते याचे वास्तव समोर येईल. तसेच ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल झाल्यास त्याचाही सकारत्मक परिणाम होऊ शकतो, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

ध्वनी प्रदूषणास कारणीभूत घटक

औद्योगिकरण

लोकसंख्या वाढ व बदलती जीवनशैली

वाहनांची संख्या, वाहतूक कोंडी व दळणवळण

सणसमारंभ, उत्सव यांच्या निमित्ताने होणारा ध्वनीवर्धकांचा वापर

मोठ्या आवाजाचे फटाके.

ध्वनी प्रदूषणामुळे उद्‌भवणाऱ्या समस्या

मानसिक ताण, चिडचिडेपणा, बहिरेपणा, मानवी कार्यक्षमतेवर परिणाम

१०० डेसिबलपेक्षा जास्त तीव्रतेच्या ध्वनीमुळे बहिरेपणा

रक्तदाब वाढणे, एकाग्रता न होणे, चिडचिड, मानसिक व शारीरिक असंतुलन, अर्धशिशी

गोंगाटामुळे पक्षी व प्राण्याच्या स्थलांतरावर परिणाम

गर्भवती स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा येरे माझ्या मागल्या!

0
0

एअर इंडियाची अनावश्यक काळातच फेऱ्यांची घोषणा; २७ मार्चपासून सेवा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरने नाशिक ते मुंबई विमानसेवेची घोषणा करून पुन्हा 'येरे माझ्या मागल्या'चीच पुनरावृत्ती सुरू केली आहे. दररोज चार फेऱ्या देण्याचे जाहीर करून नाशिकची विमानसेवा बंदच पाडायची आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अलायन्स एअरने येत्या २७ मार्चपासून नाशिक-मुंबई-नाशिक ही विमानसेवा देण्याचे घोषित केले आहे. नाशिकहून दररोज दोन आणि मुंबईहून दोन अशी आठवड्यातून सहा दिवस सेवा देण्याचे अलायन्स एअरने निश्चित केले आहे. तसेच, ओझरच्या हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडला कळविण्यात आले आहे. २७ मार्चला दुपारी १२.४५ वाजता या सेवेचा मुंबईत शुभारंभ होणार आहे.

संध्याकाळी ५.४५ वाजता नाशिकहून मुंबईला जाण्यासाठीची सेवा मिळणार आहे. ७० आसनी ATR72-600 या विमानाद्वारे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी सेवा दिली जाणार आहे. शनिवारी ही सेवा राहणार नाही. मात्र, या सेवेबाबत साशंकता उपस्थित झाली आहे.

येत्या २७ मार्चपासून आम्ही विमानसेवा देणार आहोत. विमानसेवेच्या वेळा आम्ही एचएएलला कळविल्या आहेत. त्यानुसार त्यांच्याकडून सहकार्य अपेक्षित आहे.

- विनीत भल्ला, व्यवस्थापक, अलायन्स एअर

सेवेबाबत काही प्रश्न

दररोज नाशिक आणि मुंबईहून प्रत्येकी १४० म्हणजे २८० प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता राहणार आहे. एवढे प्रवासी लाभतील का?

सकाळच्या सुमारास सेवा देण्याची मागणी असताना दुपार आणि संध्याकाळच्या सेवेला प्रतिसाद लाभेल का?

केवळ सेवा द्यायची म्हणून घोषणा झाली आहे की, अलायन्स एअरने काही सर्वेक्षण केले आहे?

मुंबई-नाशिक अंतर जवळ असताना ही सेवा किती फायदेशीर ठरेल?

हॉपिंग फ्लाईटची मागणी असताना पुन्हा नाशिक-मुंबई-नाशिक हीच सेवा का दिली जात आहे? मुंबईसेवा यापूर्वी अनेकदा बंद पडली असताना त्याचा कुठलाही धडा का घेण्यात येत नाही?

प्रतिसादाअभावी सेवा बंद पडावी हाच हेतू आहे का? त्यामुळे पुन्हा सेवा देण्याचा प्रश्नच उदभवणार नाही? अशा असतील फेऱ्या

मुंबईहून निघेल - दुपारी १२.४५

नाशिकला पोहचेल - दुपारी १.३०

नाशिकहून निघेल - दुपारी २.००

मुंबईला पोहचेल - दुपारी २.४५

मुंबईहून निघेल - दुपारी ३.३०

नाशिकला पोहचेल - सायंकाळी ४.१५

नाशिकहून निघेल - सायंकाळी ४.४५

मुंबईला पोहचेल - सायंकाळी ५.३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात विकले घोटाळ्यातील धान्य

0
0



दोघांना अटक; सात दिवसांची पोलिस कोठडी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बहुचर्चित धान्य घोटाळा प्रकरणी पोलिसांनी कोल्हापुरातील दोघांना अटक केली आहे. मोक्का कोर्टाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. धान्य घोटाळ्यातील चोरीचे धान्य त्यांनी खरेदी केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली असून, अजूनही पोलिस दोघांचा शोध घेत आहेत.

या प्रकरणात कोल्हापूरच्या गणपती रोलर फ्लोअर मिलचे मालक अश्‍विन सुरेश जैन आणि व्यवस्थापक प्रकाश माधवराव शेवाळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी त्यांना विशेष मोक्का कोर्टात हजर करण्यात आले. धान्य घोटाळ्यातील सुमारे २३ लाख ७८ हजार किलोपेक्षा अधिक धान्य जैन याने खरेदी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. व्यवहारात सुमारे सव्वातीन कोटी रुपयांचे धनादेश मुख्य सूत्रधाराच्या बनावट कंपन्यांच्या नावे देण्यात आले आहेत. साईबाबा अॅग्रो, ग्रीनफिल्ड, शिवशक्‍ती आदी कंपन्यांच्या नावे हे धनादेश वटविले आहेत. पोलिसांनी जैन व शेवाळे यांना अनेकदा चौकशीसाठी बोलाविले. मात्र, त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची बाजू सरकार पक्षातर्फे मांडण्यात आली.

बचाव पक्षाने केलेल्या युक्तीवादानुसार, जैन व शेवाळे यांनी धान्य खरेदी केल्यानंतर त्याचे रितसर धनादेश दिले आहेत. ते कोणत्या ठिकाणी द्यावे याच्याशी संबंधितांचा कोणताही संबंध नाही. आत्तापर्यंत त्यांचा संशयितांमध्ये समावेश नसताना, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याने पोलिसांनी त्यांना अटक केल्याचे कोर्टाला सांगण्यात आले. मात्र मोक्काअंतर्गत दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामिनाची तरतूदच नसल्याचे सरकारी पक्षाने निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर विशेष मोक्का कोर्टाच्या न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांनी संशयितांना सात दिवसांची कोठडी सुनावली. या प्रकरणात घोरपडे बंधूंसह तेरा जणांची संशयित म्हणून नावे आहेत. संपत घोरपडे, विश्‍वास घोरपडे व अरुण घोरपडे सध्या न्यायालयीन कोठडीत असून, घोटाळ्याच्या मुख्य सूत्रधारासह एक महिला फरार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात दोघांचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव मोटरसायकल दुभाजकावरून घसरून इलेक्ट्रीक पोलला धडकल्याने दोघांचा मृत्यू झाला. पवारवाडी ते जेलरोडकडे मार्गावर मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. योगेश बन्सीलाल काकळीज आणि रमेश पंडित बागुल (दोघे रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी, एकलहरे) अशी त्यांची नावे आहेत. नाशिकरोड पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

तरुणाची आत्महत्या

नाशिकरोड येथील कॅनोलरोड परिसरात अनिल दिलीप शिंदे (वय २६) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, असे नाशिकरोड पोलिसांनी सांगितले.

एसटी वर्कशॉपमध्ये चोरी

एसटी वर्कशॉपच्या आवारातील टँकरची महागडी बॅटरी चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशोक नारायण कुलकर्णी (रा. राणेनगर, सिडको) यांनी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. ही बॅटरी चार हजार रुपये किमतीची असावी, असे फिर्यादीत म्हटले आहे.

जुगार अड्ड्यावर छापा

पंचवटीतील कालिकानगर परिसरात जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश्‍वर दादाजी जाधव, शंकर किसन सिंग, रवींद्र विष्णू राखवसरे, लखन मनोज सोनवणे आणि सागर सुरेश आव्हाड अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

रिक्षाचालकावर गुन्हा

वाहतुकीस अडथळा तसेच अपघात होईल, अशी स्थिती निर्माण करणाऱ्या रिक्षाचालकावर गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुनील राजू काळोखे (वय २७, रा. संसारी गाव, देवळाली कॅम्प) असे त्याचे नाव आहे. त्याने सायंकाळी पाचच्या सुमारास कॉलेजरोडवरील फास्ट ट्रॅक शोरूमसमोर रिक्षा उभी केली होती. मात्र या रिक्षामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तसेच, अपघाताची शक्यताही बळावल्याने पोलिस शिपाई गांगोडे यांनी त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

बसचालकाला मारहाण

एकलहरा येथे रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांनी बसचालकाला मारहाण केली. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बसचालक अशोक निवृत्ती कागदे (पाथरी आगार, सिन्नर) यांनी दिलेल्या तक्रारीचा आशय असा - रविवारी सायंकाळी कागदे हे एसटी बसमध्ये प्रवासी घेऊन नाशिकरोडहून एकलहरामार्गे जात असताना एकलहरा कॉलनी गेटजवळ संशयीत रिक्षाचालक (एम. एच. १५, वाय ०५८९) भास्कर कचरू भंडारे व त्याच्या दोन साथीदारांनी बस थांबवली. तुम्ही रोज आमच्या रिक्षाला पाहून बस जोरात चालवतात, अशी कुरापत काढून कागदे यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

मोबाइल पळवला

दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी वृध्दाच्या हातातील मोबाइल हिसकावून धूम ठोकल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी कामटवाडे परिसरातील शांताराम चेना राठोड (७४) यांनी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. राठोड हे पेठ फाटा सिग्नलजवळ उभे राहून मोबाइलवर बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हातातील चार हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून पळ काढला.

एकावर कोयत्याने वार

जुन्या भांडणातून दोन अल्पवयीन संशय‌ितांनी एकावर कोयत्याने वार केल्याची घटना मल्हारखान झोपडपट्टी परिसरात घडली. घटनेनंतर पोलिसांनी दोघा मुलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत कार्तिक शिंदे हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी क्रांतीनगर परिसरात राहणाऱ्या प्रणित धात्रकने (२४) दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मल्हारखान झोपडपट्टी येथे मित्राच्या वाढदिवसासाठी धात्रक व शिंदे हे केक घेऊन जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा कोटींची फसवणूक; महिलेला पोलिस कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहन खरेदीच्या नावाखाली मंजूर कर्ज बनावट बँक खात्यात वटवून तब्बल सव्वासहा कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने एका महिलेला अटक केली आहे. कोर्टाने तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सायली किरण महाजन (रा. ईश्वरपार्क अपार्टमेंट, पाथर्डी रोड, इंदिरानगर) असे तिचे नाव आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संशयित किरण महाजन याचे बनावट खाते उघडण्यासाठी सायली महाजन हिने मदत केल्याने तिला अटक करण्यात आली. रिलायन्स कॅपिटल लिमिटेड या कंपनीमध्ये संशयित किरण महाजन सेल्स एक्झिक्युटीव्ह अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्यावेळी त्याने अन्य २२ जणांच्या मदतीने वाहन कर्जाच्या नावाखाली कर्ज मंजूर करून आर्थिक फसवणुकीचे कुंभाड रचले. त्यासाठी आरटीओ, शॉप अॅक्ट विभागाचे बनावट सरकारी शिक्के तयार केले. नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या इंदिरानगर शाखेत महेश ऑटो इंजिनीअरिंग वर्क्स या नावाने बनावट खाते उघडले. त्यानंतर कंपनीमार्फत ३२ वाहन कर्ज मंजूर करवून सुमारे सहा कोटी रुपये बनावट खात्यात मागविले. सन २०१३ मध्ये घडलेल्या या प्रकरणात सरकारवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. फसवणुकीचा आकडा कोट्यवधीच्या घरात गेल्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. विश्वास को-ऑप बँकेच्या इंदिरानगर शाखेत सायली महाजन हिच्या मदतीने कर्ज मंजुरीनंतर मिळणाऱ्या कर्जाची रक्कम महेश इंजिनअीर वर्क्स नावाने बनावट खात्यात वर्ग करण्यात आली. ही रक्कम महाजन दाम्पत्यासह अन्य २० संशयितांनी वाटून घेतली. मात्र, रक्कम वाटपावरून त्यांच्यात मतभेद झाले. त्यापैकी सायली हिने १० लाख रुपयांची रक्कम कट्स अॅण्ड कर्ल्स ब्यूटीपार्लरच्या खात्यात वर्ग केली. ही बाब तपासात पुढे आल्याने तिला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images