Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शोषणाविरोधात एल्गार!

$
0
0

विद्यार्थिनी आणि कर्मचाऱ्यांवरील अन्यायास 'सोसायटी ऑफ अॅसम्पशन' या संस्थेच्या ज्ञानज्योती कन्या आश्रमशाळेचे व्यवस्थापन मंडळच जबाबदार असल्याचा आरोपही या कर्मचाऱ्यांनी केला आहे. या शोषणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांपासून आदिवासी विभागाच्या समोर धरणे धरले आहे. दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळी येथे दोन दशकांपासून पुण्याच्या 'सोसायटी ऑफ असम्पशन' या संस्थेच्या माध्यमातून ज्ञानज्योती आश्रमशाळा चालविण्यात येते. नाशिक परिसरातील आदिवासी भागासह दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या आदिवासी तालुक्यातील सुमारे ६०० विद्यार्थिनी येथे शिक्षण घेतात. मात्र, गत दोन वर्षांपासून व्यवस्थापन मंडळ या विद्यार्थिनींना अमानुष वागणूक देत असल्याचा आरोप व्यवस्थापनावर होतो आहे.

विषय शिक्षकांच्या नियमबाह्य नेमणूका, विद्यार्थिनींना होणारी मारहाण, निकृष्ट दर्जाचे जेवण, विद्यार्थिनींना आदिवासी समाजातील असल्याने मिळणारी हीन वागणूक, त्यांच्या आरोग्य सुविधांकडे होणारे दुर्लक्ष आणि विशेष म्हणजे या तक्रारींबाबत पालकांचा पाल्यांशी तोडला जाणारा संपर्क यामुळे आदिवासी मुलींचे शिक्षण केवळ व्यवस्थापनाच्या मनमानीमुळे रखडत असल्याचा आरोप आदिवासी संघर्ष परिषद व स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांची गळचेपी व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणांना विरोध केल्याने यापूर्वीच्या मुख्याध्यापिकेची झालेली हकालपट्टी, विषय शिक्षकांसह मुख्याध्यापक, वसतिगृह अधीक्षक यांच्या नियमबाह्य नेमणूका, शिक्षकांची अपूर्ण संख्या, वेतनातील कपात, मुलींसाठी स्वच्छतागृहांसह जेवणादी सुविधांची वानवा अशा प्रश्नांना कर्मचाऱ्यांनाही सामोरे जावे लागते आहे, अशी माहिती स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटनेने दिली. याप्रश्नी एकात्मिक आदिवासी प्रकल्पामार्फत एकदा चौकशी झालेली असतानाही गुरूवारी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी अपर आयुक्तांनी या मुद्यावर आणखी चौकशी करू, अशी भूमिका मांडल्याने संघटना आणखीच आक्रमक झाल्या आहेत.

आदिवासी भागातून प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसमोर व्यवस्थापनाच्या कार्यपध्दतीमुळे संकट वाढले आहे. कर्मचाऱ्यांची परिस्थिती वेगळी नाही. आदिवासी विभागाने दिरंगाई न करता या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढवा. आश्रमशाळेचे व्यवस्थापन मंडळच बदलण्यात यावे. - विजय घोटे, सल्लागार समिती सदस्य, आदिवासी संघर्ष परिषद

विद्यार्थिनींना धमक्या! व्यवस्थापनाच्या विरोधात बोलल्यास विद्यार्थिनींना धमक्या देखील दिल्या जात असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे. शाळेची झालेली घसरण आणि हाताबाहेर गेलेली परिस्थिती बघता संस्थेचे अनुदान रद्द करून ही संस्था अन्य संस्थेकडे वर्ग करावी, असेही परिषदेने म्हटले आहे.

मॅनेजमेंट नॉट रिस्पाँडिंग! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी जाणवणाऱ्या सर्व समस्या आदिवासी विभागातील अधिकारी वर्गासमोर मांडण्यात आल्या. संघटना आणि विद्यार्थ्यांची बाजू समजल्यानंतर 'मटा' प्रतिनिधीने 'सोसायटी ऑफ असम्पशन'च्या ज्ञानज्योती कन्या आश्रमशाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, व्यवस्थापनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळू शकलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात व्यवस्थापनाची बाजू समोर येऊ शकलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये न्यूड चित्रांचे प्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हार्मनी आर्ट गॅलरीच्यावतीने आयोजित परदेशी चित्रांच्या प्रिंट व भारतीय चित्रकारांच्या मूळ न्यूड चित्रांचे प्रदर्शन नाशिककर रसिकांच्या पसंतीला उतरले. शिल्पकार अनुराधा तांबे, रूचीर पंचाक्षरी व आर्किटेक्ट पंकज देव या मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन झाले.

चित्रप्रदर्शनात भारतातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आधुनिक चित्रकार अकबर पद्मसी यांची दोन मूळ चित्रे असून, जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे पहिले डायरेक्टर रावबहादूर धुरंधर यांनी पेन्सिल माध्यमात केलेले मूळ चित्र प्रदर्शनात मांडण्यात आले. तसेच परदेशी चित्रकारांनी कुंचल्याच्या जोरकस फटकाऱ्यातून चि‌त्रित केलेली ३० चित्रे व ब्लॅक अॅण्ड व्हाईटमधील ४५ चित्रे मांडण्यात आली होती. प्रदर्शनाला रसिकांनी पसंती दिली.

आजपासून मंदिर चित्रांचे प्रदर्शन

आर्किटेक्ट संजय पाटील यांनी काढलेल्या पश्चिम बंगाल येथील बिसनपूरमधील अदभूत टेराकोटा मंदिराच्या छायाचित्रांचे प्रदर्शन हार्मनी आर्ट गॅलरीत आज, ५ फेब्रुवारीपासून भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे उदघाटन सायंकाळी ६ वाजता प्रसिध्द छायाचित्रकार यशवंत पिटकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी दीपक देवरे, प्रसाद पवार, राजेश सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कलारसिकांनी छायाचित्र पाहण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन बाळ नगरकर, समृध्द मोगल व राजा पाटेकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसेस अभावी वारकऱ्यांचे हाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ यात्रेसाठी नाशिकरोड-देवळालीसह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर वारकरी बांधव दर्शनासाठी जातात; मात्र या वारकऱ्यांच्या नशिबी पायपीटच लिहिली आहे की, काय असे चित्र नाशिकरोडच्या बसस्थानकावर पाहायला मिळाले. नाशिकरोडहून त्र्यंबकेश्वरी जाणारी बसच नसल्याने वारकऱ्यांचे प्रचंड हाल झाले.

नाशिकरोडच्या पंचक्रोशी तसेच सिन्नर, इगतपुरी सारख्या ग्रामीण भागातील अनेक गावांमधून हजारो वारकरी षटतिला एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतलेल्या संत निवृत्तीनाथांचे दर्शन घेण्यासाठी जातात. मात्र, राज्य परिवहन विभागाच्या वतीने या यात्रेनिमित्त नाशिकरोडहून जाणाऱ्या वारकऱ्यांचा विचार केला गेला नसल्याचे निदर्शनास आले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेकडो वारकऱ्यांना त्र्यंबककडे जाण्यासाठी बसेस उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे उन्हातान्हात ही वारकरी मंडळी बसच्या दिशेने डोळे लावून उभी असल्याचे चित्र बसस्थानक परिसरात दिसत होते.



बसेस परतल्याच नाही

नाशिकरोड बस स्थानक येथून पहाटे ६ वाजेपासून केवळ १३ शहर बसेस सोडण्यात आल्या. मात्र, पहाटे त्र्यंबकच्या दिशेने गेलेल्या बसेस अद्यापपर्यंत नाशिककरोडला परतल्याच नाही, असे सूत्रांकडून समजते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाल्याचे दिवसभर दिसून आले.



सीबीएसपर्यंत वणवण

वारकऱ्यांना त्र्यंबकला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शहरी बसेस वळविण्यात आल्या. प्रवाशांना सीबीएस येथून जाण्याचा पर्याय उपलब्ध होता; मात्र नाशिकरोड येथून सकाळी ११ पासून दुपारी १ वाजेपर्यंत सीबीएसकडे जाण्यासाठी देखील बसेस उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे आधीच उन्हातान्हात प्रवास करून येथपर्यंत आलेला वारकरी पुढील प्रवासाची आस लावून बस स्थानक परिसरात फिरत असल्याचे चित्र दिसत होते. विचारणा करायला येणाऱ्या वारकऱ्याला सीबीएस येथून जाण्याचे सांगण्यात येत होते.

विचारणेनंतर मागवली बस

यात्रेकरू उन्हात तळपत असतांना देखील बसेस येत नसल्याकारणाने प्रवासी विचारपूस करण्यासाठी चौकशी खिडकी गाठली; मात्र तेथे पोहचल्यावर लगेच आडगाव नाका येथील बस आगारातून येथून बस मागविण्यात आल्याचे वाहतूक नियंत्रक आर. बी. वाघ यांनी सांगितले.



नाशिकरोड जवळील बस स्थानक असल्याने आम्ही मोठ्या आशेने येथे आलो; मात्र येथून बससेवा कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने उन्हात उभे राहावे लागत आहे

- नारायण शिंदे, भाविक, वंजारवाडी



सकाळी कामे उरकून त्र्यंबकला जाऊन समाधीच्या दर्शनासाठी आलो; मात्र अपुऱ्या बसेस अभावी वारकरी बांधवाची गैरसोय झाल्याचे चित्र दिसते आहे.

- ज्ञानेश्वर शिंदे, भाविक, सोनारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी हजर, शिक्षक गैरहजर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महानगरपालिका हद्दीतील १२७ शाळांपैकी तब्बल ५० शाळा बंद असल्याचे विदारक चित्र गुरुवारी दिसून आले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यस्तरीय त्रैवार्षिक अधिवेशन व शिक्षण परिषदेला ऐरोलीत सुरुवात झाल्याने शिक्षकांचा गोतावळा अधिवेशनाच्या नावाखाली शाळेतून पसार आहे.

मनपाच्या शाळांमधील ९४५ शिक्षकांपैकी ५४४ शिक्षक अधिवेशनासाठी १ फेब्रुवारीपासून रजेवर आहेत. हे अधिवेशन ४ ते ६ फेब्रुवारी यादरम्यान होत असल्याने यापूर्वीच्या तीन दिवसांसकट शिक्षकांना सुटी मंजूर करण्यात आली. वास्तविक, गुणवत्तेत कोणतीही शाळा 'अ' श्रेणीनेही उत्तीर्ण नसताना गुणवत्ता विकास करायचा सोडून अशी मोठी सुट्टीच दिल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे काय? शिक्षकांनी शाळा सोडून आठवडाभर अधिवेशनासाठी जाणे कितपत योग्य आहे, असे प्रश्न पालकांनी उपस्थित केले आहेत.

पाचशे रुपयांची पावती संघटनांकडे जमा करून शिक्षक रजेवर गेला आहे. यातील किती शिक्षक प्रत्यक्ष अधिवेशनाला गेले आहेत, याची कोणतीही माहिती मनपा शिक्षणमंडळाकडे नाही. अनेक शिक्षक संबंधित संघटनांकडून अधिवेशनाला हजर असल्याचे खोटे प्रमाणपत्र मिळविण्याचे धाडस करतात. त्यामुळेच बेफिकीर होत या रजांचा आनंद लुटण्यात प्राधान्य देत आहेत.अडीच लाख शिक्षकांनी अधिवेशनासाठी सुट्या घेतल्या आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल झालेल्या जनहित याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. शिक्षकांना दिलेल्या विशेष रजा रद्द कराव्यात, अशी सूचना देण्यात आली आहे.

शिक्षक अधिवेशनाला गेल्याने शाळांची मोठी गैरसोय झाली आहे. शिक्षक खरेच अधिवेशनाला गेले आहे की नाही, यामध्ये पारदर्शकताही नाही. अधिवेशन सुटीच्या काळात होणे आवश्यक होते. - उमेश डोंगरे, प्रशासनाधिकारी, मनपा शिक्षणमंडळ

एकीकडे अभ्यास, दुसरीकडे धिंगाणा

काही शाळांमध्ये एक किंवा दोनच शिक्षक शाळा सांभाळत आहेत. परंतु, आपला वर्ग सांभाळण्यापलीकडे इतर वर्गांकडे लक्ष देण्याचे फार कष्ट हे शिक्षक घेत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे एका वर्गात अभ्यास तर पलीकडच्याच वर्गात धिंगाणा होत असल्याचे चित्र गुरुवारी शाळांमध्ये दिसून आले. शाळांचे मुख्याध्यापकही या परिस्थितीमुळे हतबल झाले आहेत. शिक्षकांना जरी रजा मिळाल्या असल्या तरी शाळा बंद ठेवण्याचे कोणतेही आदेश नसल्याने शिक्षकांना शाळा सांभाळणे कठीण झाले आहे. काही शिक्षकांनी तर शाळेचा भार आपल्यावर येईल, म्हणून रजा घेतल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसी बनले अपघातांचे केंद्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

अंबड व सातपूर या दोन्ही एमआयडीसी तसेच जवळील परिसर अपघाताचे मोठे केंद्र बनला आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अंबड एमआयडीसीतील सिमेंन्स कंपनीच्या समोरील रस्त्यावर स्लाईडवेल कंपनीजवळील वळणावर ट्रकखाली सापडल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. या वेळी दुपारच्या शिफ्टला जाणा-या कामगारांनी अपघातस्थळी मोठी गर्दी केली होती.

दोन दिवसांपूर्वीच अशोकनगरच्या रस्त्यावर महामंडळाच्या बसखाली येऊन एका तरुणाचा मृत्यू झाला. तर आडगाव शिवारात पहाटे फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या महिलेलाही वाहनाने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला होता. गुरुवारी अंबड एमआयडीसीमध्ये ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात संदीपकुमार शिवाजी भगत (२५) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

कंपनीतून काम ओटोपून घराकडे जात असतांना स्लाईडवेल कंपनीजवळील वळणात भगत हा ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच मयत झाला. अंबड पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

अॅम्बुलन्स आली तासाभराने

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी प्रथम १०८ नंबरवर फोन करीत अॅम्बुलन्स मागविली होती. मात्र, अपघातात तरुण जागीच मयत झालेला असल्याने महापालिकेच्या अॅम्बुलन्स ए क तास उशिराने आली. त्यामुळे अपघातस्थळी पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनाही ताटकळत थांबावे लागले. अॅम्बुलन्स येईपर्यंत घटनास्थळी शेकडो लोकांनी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सज्ज झाला २३० किलो चांदींचा रथ

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

सकलही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझ्या मना, विश्वाचा तो गुरू स्वामी निवृत्तीदातारू, धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा अशा अभंगांच्या घोषाने अन् टाळ-मृदूंगाच्या गजराने अवघी पुण्यनगरी दुमदुमली. निमित्त होते, त्र्यंबकेश्वर येथील श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या वतीने लोकवर्गणीतून तयार केलेल्या सुमारे २३० किलो चांदीच्या पालखी रथाच्या मिरवणुकीचे!

शरणपूररोड येथील बाफणा ज्वेलर्सपासून चांदीच्या रथाच्या सवाद्य मिरवणुकीला सुरूवात झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, महापौर अशोक मुर्तडक, बाफणा ज्वेलर्सचे संचालक सुभाष बाफणा, कीर्तनकार रामकृष्ण महाराज लहवितकर, संस्थानचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, जयंत महाराज गोसावी, पालखी सोहळा प्रमुख पंडित महाराज कोल्हे, पुंडलिक थेटे आदि मान्यवर उपस्थित होते. अग्रभागी सजविलेल्या चांदीच्या रथामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांची मूर्ती होती. रथापुढे आधारतीर्थ आश्रमाच्या मुला-मुलींचे टाळ पथक संचलन करीत होते. मिरवणुकीत सहभागी वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात विविध भजन, अभंगांनी नाशिककरांचे लक्ष वेधले होते. ही मिरवणूक शहरातील कॅनडा कॉर्नर, गंगापूर रोडमार्गे अशोकस्तंभ, सीबीएसहून शरणपूर रोडने पुन्हा बाफणा ज्वेलर्स येथे काढण्यात आली.

२३० किलो चांदीचा वापर

रथ निर्मितीसाठी नाशिकच्या शुध्द २३० किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. रथाची निर्मिती सागाच्या लाकडात आहे. रथात विशेष एलईडी, ३ घुमट, दानपेटी, पालखीची जागा, फुलमाळांसाठी विशेष हुक या सर्व गरजा देवस्थानच्या सूचनांनुसार करण्यात आल्या आहेत. रथाची उंची १३ फूट, तर लांबी १२ फूट आहे. हा रथ देवस्थानने मंजूर केलेल्या कागदावरील रेखाचित्रानुसार साकारण्यात आला आहे. रथनि‌र्मितीसाठी महाराष्ट्रासह बंगाली बनारसी, राजस्थानी कारागिरांनी योगदान देऊन केवळ ६० दिवसांत हा रथ तयार केला आहे. ना नफा ना तोटा या तत्त्वावर हा रथ साकारण्यात आल्याचे संचालक नीलेश बाफणा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकजच्या मागावर ईडी नाशकात ?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनी लाँडरिंग प्रकरणात माजी खासदार आण‌ि छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या अटकेनंतर ईडीने आता आमदार पंकज भुजबळ यांच्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. समीर भुजबळांकडून मिळालेली माहिती व ईडीकडे उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ईडीने पंकज भुजबळांची शोध मोहीम सुरू केल्याची माहिती सुत्रांनी दिली. पंकज भुजबळ यांच्या मागावर असलेल्या ईडीच्या चार अधिकाऱ्यांनी गुरूवारी नाशिकमध्ये धाव घेतल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे दिवसभर राष्ट्रवादी कार्यालयासह भुजबळ फार्म हाऊसवर धाडी पडल्याच्या अफवा पसरल्याने कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

मनी लाँडरिंग प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह त्याचे पुत्र पंकज भुजबळ आण‌ि पुतणे समीर भुजबळ यांच्याविरोधात 'ईडी'ने गुन्हे दाखल केले आहेत. समीर भुजबळ यांना ईडीच्या कोर्टाने कोठडी दिली आहे. तर पंकज भुजबळ हेही ईडीच्या रडारवर आहेत. समीर भुजबळ चौकशीला सहकार्य करत नसल्याने व काही कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक असल्याने ईडीने पंकजकडे आपला मोर्चा वळवला आहे. तर ईडी अटक करेल या शंकेने पंकज भुजबळांनी मुंबई सोडल्याची चर्चा आहे. त्यामुळे ईडीचे चार अधिकाऱ्यांचे एक पथक त्यांच्या शोधासाठी नाशिकसह मालेगाव परिसरात आल्याची माह‌िती सुत्रांनी दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी असे कोणतेही पथक आले नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ईडीच्या कारवाई संदर्भात अधिक संभ्रम वाढला आहे. तर नाशिकमधील भुजबळ फार्म हाऊस व राष्ट्रवादी कांग्रेसच्या कार्यालवर धाडी पडल्याच्या अफवा पसरल्याने अनेकांनी फार्म हाऊसवर माध्यमांनी गर्दी केली होती.

भुजबळांचे सूचक स्टेटस

अमेरिकेत असलेल्या छगन भुजबळांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा डीपी टाकल्याने चर्चेला उधाण आले होते. भुजबळांनी आता पुन्हा व्हॉट्सअपवर सूचक स्टेटस टाकले आहे. 'इस आदमी के दुश्मन है बहोत लोग... शायद ये आदमी अच्छा होगा' असे स्टेटस त्यांनी टाकल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. त्यांचे स्टेटस हे स्वपक्षीयांसाठी आहे की, विरोधकांसाठी आहे. यावर आता खल सुरू झाला आहे. भुजबळांना नेमके कोणाकडे बोट दाखवायचे आहे याचीच आता चर्चा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ड्रेनेजच्या कामाने रहिवाशांची ‘नाकाबंदी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर
सातपूर कॉलनीतील म्हाडा वसाहतीमधील आठ हजार स्किममध्ये दोन महिन्यांपासून महापालिकेने सांडपाणी वाहून जाण्यासाठी नवीन ड्रेनेज लाईनचे काम हाती घेतले आहे. परंतु संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे रहिवाशांना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.
आठ हजार स्किम भागातील रहिवाशांना ड्रेनेज चोकअपची समस्या नेहमीच भेडसावत असते. याबाबत 'मटा'ने बातमी देखील प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत महापालिकेने लाखो रुपये मंजूर करुन गेल्या दोन महिन्यांपासून या वसाहतीत नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम हाती घेतले आहे. परंतु हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने त्याचा त्रास रहिवाशांंना सहन करावा लागत आहे. कामासाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून चौकाचौकात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. या खड्ड्यांमधून वाट काढत रहिवाशांना प्रवास करावा लागत आहे.
ड्रेनेज लाईन टाकताना एकावेळी एकाच चौकातील काम ठेकेदाने केले असते तर ते वेळवेवर व तत्काळ होऊ शकले असते. परंतु दोन ते तीन चौकात एकाचवेळी खड्डे खोदल्याने सर्वच चौकामध्ये ही अडचण भेडसावत आहे. महापालिकेने यामध्ये लक्ष घालून संथगतीने सुरू असलेल्या या कामाला गती द्यावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.
'महापालिकेकडे रहिवाश्यांनी नवीन ड्रेनेज लाईन टाकून मिळाव्यात, अशी मागणी केली होती. दोन महिन्यांपासून सुरू असलेले ड्रेनेजचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. यामध्ये महापालिकेने लक्ष घालण्याची गरज आहे. '‍
- दिपक खुर्दळ, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​मदतीला धावून जाणारे अधिकारी थोडेच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
'सरकारी सेवेत अनेक मंडळी काम करतात. मात्र सेवेत राहूनही सामान्यांच्या अडचणींचा विचार करुन त्यांच्या मदतीला धाऊन जाणारे अधिकारी थोडेच असतात. त्यांच्यामुळे सरकार व समाजात दुवा निर्माण होतो', अशा भावना लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. निमित्त होते आरटीओ निरीक्षक प्रकाश उर्फ नंदू बनकर यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्याचे.
बनकर यांनी सामान्य नागरिकांना केलेल्या मदतीचा व सहकार्याचा उल्लेख करुन यावेळी विविध नेत्यांनी बनकर यांच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले. तीस वर्षांच्या सेवेत नागरिक व मित्रांनी दिलेले प्रोत्साहन, सहकार्यानेच सतत चांगल्या कामाची प्रेरणा मिळाली, असे बनकर यांनी सांगितले.
खासदार हरिश्चंद्र चव्हाण, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमित बग्गा, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, आमदार अनिल कदम, नरहरी झिरवाळ, भाजप शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार माणिकराव कोकाटे, माजी खासदार देविदास पिंगळे, परिवहन अधिकारी जीवन बनसोड, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे आदी यावेळी उपस्थित होते. भूषण मटकरी यांनी सूत्रसंचालन केले. बनकर यांच्या जीवनप्रवासाची ध्वनीचित्रफीत यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आली.

-----------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवादातून निर्भयतेकडे...

$
0
0



प्रा. डॉ. विवेक खरे

भारतातील सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक अवकाशात मागील काही वर्षांपासून मळभ दाटल्याचे वातावरण निर्माण झालेले आहे, हे वास्तव नाकारता येण्यासारखे नाही. स्वतःला पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये विवेकाचा आवाज बुलंद करणारे नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या झाल्या. या हत्यांनी सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि पुरोगामी चळवळींना जबरदस्त हादरा बसला. या दरम्यान लोकांनीच निवडून दिलेल्या सरकारने पुरस्कृत केलेल्या दमनकारी घटनांनी आपले सामाजिक पर्यावरण आणि समाजवास्तव ढवळून निघाले आहे. या सर्वच घटनांचा निषेध होणे अपरिहार्य होते. तो निषेध व्यक्त करण्याची प्रत्येकाची रीतही वेगळी होती.

मोर्चा, आंदोलने याबरोबरच सरकारतर्फे मिळालेल्या विविध पुरस्कारांची वापसी यांसारख्या अनेक मार्गांनी देशभर व्यापक निषेध नोंदविला गेला. साहित्य, विज्ञान, चित्रपट, संगीत, नाट्य अशा क्षेत्रातील संवेदनशील कलावंतांनी यात अग्रेसर भूमिका घेतली. याच पार्श्वभूमीवर गुजरात आणि महाराष्ट्रातील लेखक कलावंतांनी एकत्र येवून 'दक्षिणायन' या कार्यक्रमाच्या माध्यमातून नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुणे, कोल्हापूर आणि धारवाड या शहरांमध्ये प्रत्यक्ष जाऊन देशातील असहिष्णू वातावरणाविषयी लोकांशी मुक्तपणे संवाद साधला. यात बुद्धिवादी, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते, वैज्ञानिक, चित्रपट निर्माते, सर्वच क्षेत्रातील कलावंतांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता.

देशातील या दूषित आणि असहिष्णू वातावरणाविषयी गंभीरपणे काहीतरी पावले उचलली जावीत, माणसामाणसातील संवादाची दरी कमी व्हावी या जाणीवेतून विविध राज्यांतील समविचारी साहित्यिक, कलावंतांनी एकत्र येण्याचे ठरविले. आपल्यासमोरील वर्तमानकालीन प्रश्न आणि पुढे निर्माण होणारे प्रश्न यांविषयी सजग भान ठेवून आपला भविष्यकाळ चांगला करण्यासाठी 'सर्व भाषा संवाद' घडवून आणला. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अलीकडची ही अत्यंत महत्त्वाची घटना म्हणायला हवी. कारण गुजरात येथील दांडी या गावी जमलेले पाचशेपेक्षा जास्त कलावंत, साहित्यिकांनी देशातील सद्य परिस्थितीवर मोकळेपणाने एकमेकांशी संवाद साधला. प्रातिनिधिक स्वरूपात दांडी यात्रा काढली. पुरोगामी चळवळीशी संबंधित असलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि गोवा या राज्यातील अनेक कलावंत, साहित्यिकांनी या संवाद कार्यक्रमात सहभाग घेऊन आपले अनुभव व्यक्त केले. निकोप समाजनिर्मितीसाठीचे त्यांचे हे प्रयत्न खरोखरच महत्त्वाचे आहेत.

स्वातंत्र्याच्या चळवळीत ब्रिटिशांकडून मीठावर लावलेल्या कराच्या कायद्याविरुद्ध १९३० साली महात्मा गांधी यांनी काढलेल्या दांडी यात्रेला भारतीय इतिहासात महत्त्वपूर्ण स्थान आहे. याच पार्श्वभूमीवर महात्मा गांधीच्या पुण्यतिथीदिनाचे औचित्य साधून ३० जानेवारीला साहित्यिक, कलावंतांमध्ये हा भाषा संवाद घडवून आणला गेला. नाशिकमधील काही मंडळीही त्यात सहभागी झाली होती. गुजरातमधील प्रसिद्ध लेखक डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकाराने झालेल्या या भाषा संवाद उपक्रमातून देशातील असहिष्णूता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, सांस्कृतिक दहशतवाद हे विषय ऐरणीवर आणले गेले. आपापल्या भाषिक अस्मितेच्या बाहेर पडून सर्जनशील, संवेदनशील कलावंताने देशाची विविधता, एकता, अखंडता यांच्यासाठी एकत्र आले पाहिजे ही काळाची गरज आहे. भारतात प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्यात आज सर्वच राजकीय पक्ष सक्रिय आहेत. जातीय आणि धार्मिक दंगली, जातीयतेतून झालेली रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याची आत्महत्या, स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांची अरेरावी, कोणी काय खावे, काय प्यावे, काय लिहावे, काय लिहू नये यावर कधी नव्हे तेवढे आलेले निर्बंध, सामाजिक चळवळी आणि त्यात काम करणाऱ्यांवर दिवसेंदिवस होणारे प्राणघातक हल्ले अशा असंख्य प्रश्नांनी आजचा समाज वेढला गेला आहे. एका विचित्र अशा कोंडीत सापडला आहे. ही कोंडी जर फोडायची असेल तर परस्पर संवादाची प्रक्रिया गतिमान होणे आवश्यक आहे. सर्वसामान्य माणसापेक्षा सर्जनशील कलावंताला ही कोंडी लवकर उमजते. त्यातूनच तो काहीतरी धडपड करीत राहतो. सर्व भाषा संवाद कार्यक्रम हा त्या धडपडीचाच एक भाग होता असे दिसते.

साहित्यिक, कलावंत यांनी शोषणाविरुद्ध, शासनाच्या दमनकारी ध्येय धोरणाविरुद्ध नेहमी निश्चित भूमिका घेऊन लढा उभा करायला हवा. त्यांनी घेतलेल्या भूमिकांवरच सर्वसामान्य माणसे लढाईसाठी प्रवृत्त होतात हा जगाचा इतिहास आहे. जगात ज्या ज्या सामाजिक क्रांत्या झाल्या त्या घडवून आणण्यात साहित्यिक, कलावंत यांचा सहभाग मोलाचा होता. भारतही त्याला अपवाद नाही. भारतात लोकशाही आहे असे आपण शालेय जीवनापासूनच शिकत आलो आहोत. पण आज प्रत्यक्षात आपण ही लोकशाही जिवंत ठेवली आहे का? या देशातील लोकांना स्वातंत्र्य, समता, बंधुभावाची आणि न्यायाची वागणूक खरोखरच मिळत आहे का? हे प्रश्न संवेदनशील मनाला गंभीरपणे विचार करायला भाग पडणारे आहेत. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय आणि धार्मिक अशा सर्वच स्तरावर आज समाजात दुही माजविण्याचा प्रयत्न होतो आहे. हे प्रयत्न हाणून पाडण्यात कलावंत, साहित्यिक यांनी पुढाकार घ्यावा ही जशी काल गरज होती तशी ती आजदेखील आहे. ही गरज लक्षात घेऊन भविष्यातल्या पिढीसाठी निर्भयपूर्ण वातावरण निर्माण करण्यात देशातील कलावंत, साहित्यिक पुढाकार घेत आहेत ही बाब निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. हिंदीतील सुप्रसिद्ध कवी गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेतील पुढील अजरामर ओळी देशातल्या आजच्या सामाजिक अन्याय अत्याचाराविरुद्ध पुन्हा एकदा सर्वांनाच लढ्यासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत.

अब अभिव्यक्तिके सारे खतरे

उठाने ही होंगे।

तोड़ने होंगे ही मठ और गढ़ सब।

पहुँचना होगा दुर्गम पहाड़ों के

उस पार

तब कहीं देखने मिलेंगी बाँहें

जिसमें कि प्रतिपल काँपता रहता

अरुण कमल एक......

(लेखक एसएमआरके कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घरकुल’चे लाभार्थी बोगस

$
0
0

खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा दावा; कारवाईची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या इंदिरा आवास आणि शबरी घरकुल सारख्या योजनांमध्येच एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांच्या नावांवर घरकुले मिळविल्याचा आरोप लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला. विशेष म्हणजे एका सरकारी शिक्षकानेही या योजनेंतर्गत घरकुल मिळविल्याचा दावा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केला असून, संबंधितांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.

जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये शुक्रवारी दुपारी पार पडली. ग्रामीण भागात द्रारीद्र्य रेषेखालील लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या इंदिरा आवास आणि शबरी घरकुल सारख्या योजनेतील गैरकारभाराची लक्तरे यावेळी वेशीवर टांगण्यात आली. ही योजना दारिद्र्य रेषेखालील गरजवंतांसाठी असताना धनधांडगे तिचा लाभ उठवू लागल्याबाबत खासदार चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. अनेकांनी पत्नीच्या, मुलाच्या, सुनेच्या नावेही या योजनांतर्गत घरकुले बळकावल्याचा दावा चव्हाण यांनी केला. विशेष म्हणजे सरकारी नोकरीत असलेल्या एक दोन शिक्षकांनी देखील या योजनेंतर्गत घरे मिळवली असून, त्यांची नावे देखील आपणास माहिती असल्याचा दावा चव्हाण यांच्याकडून करण्यात आला.

संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार का, असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला. अनेक लोक दारिद्र्य रेषेखाली असूनही त्यांची नावे यादीत नसल्याकडे आमदार राजाभाऊ वाजे यांनी लक्ष वेधले. या लोकांची नावे दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या यादीत केव्हा येणार आणि लाभ केव्हा मिळणार, असा सवाल वाजे यांनी केला. नव्यानेच केलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातीनिहाय सर्व्हेक्षणामध्ये अशी सर्व नावे समाविष्ट केल्याची मा‌हिती जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, असा सर्व्हे केव्हा केला गेला अशी विचारणा आमदारांकडून करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्चपर्यंत ५०० अंगणवाड्यांचे लक्ष्य

$
0
0

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला आदेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात पाचशे अंगणवाड्या उभारणीसाठी निधी मंजूर असतानाही अनेक अंगणवाड्यांची कामे जागेअभावी रखडली आहेत. काही अंगणवाड्यांमध्ये शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. सर्व प्रश्न निकाली काढून मार्चपर्यंत अंगणवाड्या सुरू करा, असे आदेश जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये झालेल्या दक्षता समितीच्या बैठकीत त्यांनी वरील आदेश दिले. बैठकीला खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ, राजाभाऊ वाजे, दीपिका चव्हाण, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंबळे, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अंगणवाडी सेविकांची पदे भरली जात नसल्याने जिल्ह्यात अंगणवाड्या बंद पडू लागल्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. ही पदे तातडीने भरावित, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांची पदे भरण्यात आली. मात्र, तेथे अधिक मेरिट असलेल्या उमेदवारांना डावलून कमी मेरिट असलेल्या उमेदवारांना संधी दिल्याचा आरोप विजयश्री चुंबळे यांनी केला. अशा तक्रारी त्वरित निकाली काढा, असे आदेश कुशवाह यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यात ५०० अंगणवाड्यांना यंदा मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. मात्र, तरीही अद्याप अनेक ठिकाणी अंगणवाड्यांची कामे पूर्ण झाली नसल्याच्या तक्रारी बैठकीत करण्यात आल्या. बागलाण तालुक्यात अंगणवाडी अभावी ८० मुलांना उघड्यावर बसविले जात असल्याची तक्रार आमदार दीपिका चव्हाण यांनी केली. मंजूर अंगणवाड्यांपैकी ५० टक्के अंगणवाड्या आदिवासी तालुक्यांमध्ये बांधण्यात येणार आहेत. ज्या अंगणवाड्यांची कामे पूर्ण झाली आहेत, त्या २८ फेब्रुवारीपर्यंत हस्तांतरीत कराव्यात आणि ज्या अंगणवाड्यांची कामे बाकी आहेत ती मार्चपर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

अन्य विभागांकडून जागा उपलब्ध होत नसल्याने अंगणवाड्यांची कामे थांबल्याची कैफियत काही अधिकाऱ्यांकडून मांडण्यात आली. मात्र, आपापसात चर्चा करून हा प्रश्न निकाली काढा, असे आदेश कुशवाह यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर जशास तसे उत्तर देवू

$
0
0

नाशिक शहर राष्ट्रवादीचा इशारा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भविष्यात सत्ताधारी पक्ष सूड व आकस बुध्दिने भुजबळ कुटुंबीयांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करणार असेल, तर त्यांच्या कारवाईला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. या कारवाई विरोधात वेळेप्रसंगी रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांना भुजबळ कुटुंबीयांची ताकद दाखवून देऊ, असा दम राष्ट्रवादीने सरकारला भरला आहे. राष्ट्रवादीने सत्ताधारी पक्षाच्या या कृतीचा जाहीर निषेधही केला आहे.

मनी लाँडरिंग प्रकरणात माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक झाल्यानंतर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक राष्ट्रवादी भवन, मुंबई नाका येथे पार पडली. या बैठकीत माजी खासदार समीर भुजबळ यांना झालेली अटक तसेच, भुजबळ कुटुंबीयांना शासकीय यंत्रणेमार्फत राजकीय सूडबुद्धीने दिला जाणारा त्रास याचा जाहीर निषेध करण्यात आला. प्रदेश चिटणीस दिलीप खैरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

एकाच प्रकरणात भुजबळ कुटुंबीयांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी तीन तीन वेळेस छापे टाकण्यात आले. एसीबी व ईडीला काहीही मिळून आले नाही. एसीबीने क्लीन चीट दिली असूनही त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्याचा घाट शासनकर्त्यांनी घातला. भुजबळ हे जनसामान्यांचे प्रतिनिधी करणारे नेते आहेत. भुजबळ कुटुंबीयांना लक्ष्य करून सत्ताधारी आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सामाजिक गुन्हेगारी कट्टा, दुष्काळ या सगळ्या विषयावर सत्ताधाऱ्यांना केंद्रात व राज्यात सपशेल अपयश आले आहे. सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले आहे. त्या खचलेल्या मानसिकेतून हे सगळे प्रकार ते करीत आहेत, असाही सूर या बैठकीत होता. या बैठकीसाठी प्रदेश सरचिटणीस नाना महाले, प्रदेश चिटणीस दिलीप खैरे, अर्जुन टिळे, शहर कार्याध्यक्ष छबू नागरे, सुनीता निमसे, अंबादास खैरे, वैभव देवरे, नितीन चंद्रमोरे, रंजन ठाकरे, कविता कर्डक, विक्रांत मते, छाया ठाकरे, राजेंद्र महाले, वैशाली दानी, संजय खैरनार, देवांग जानी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिफ्टच्या पूर्णत्वाबाबत साशंकता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

मांगीतुंगी येथे होणाऱ्या सोहळ्यात वृषभदेव यांच्यावर जलाभिषेक करण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या लिप्टचे काम पूर्णत्वास जाते, की नाही याबाबत विश्वस्तांसह भाविकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.

जैन धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मांगीतुंगी येथे होऊ घातलेल्या भगवान वृषभदेव महाराज यांच्या १०८ फुटी पूर्णाकृती पुतळ्याची प्राणप्रतिष्ठा व महामस्ताभिषेक सोहळा यशस्वी करण्यासाठी सुरू असलेली विकासकामे अंतिम टप्प्यात आहेत. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेल्या १०८ फुटी भगवान वृषभदेव यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व पंचकल्याण महोत्सवासाठी मूर्तीपर्यंत पोहचण्यासाठी चार लिप्टची व्यवस्था करण्यात येणार आहे. मूर्तीच्या खालील बाजूला एक लिप्ट, डाव्या आणि उजव्या बाजूने प्रत्येकी एक-एक तर मागील बाजूने एक लिप्ट असणार आहे. त्यातील डाव्या आणि उजव्या बाजूच्या तसेच खालील बाजूस असलेल्या लिप्टचे काम पूर्णत्वास गेल्याचे म्हटले जात असले तरीही अद्याप त्यांची चाचणी झालेली नाही. देवस्थानच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या लिप्टची सोय करण्यात येत असली तरीही प्रशासनाकडून उभारण्यात येत असलेल्या महत्त्वपूर्ण लिप्टची सोय ही अत्यावश्यक ठरणारी आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची या ठिकाणी कसोटी असणार असून, सदरच्या लिप्टची सोय तातडीने करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महोत्सव कालावधीत पूर्णत्वास जाईल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

अमित शहा यांना निमंत्रण

महोत्सव कालावधीत दि. १४ रोजी मांगीतुंगी येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी येण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रीय मंत्री संजय पापडीवाल, चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी त्यांना निमंत्रण दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीदार रडारवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असतानाही महापालिकेची घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम ही अंत्यत धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे महापालिकेने वसुलीची मोहीम तीव्र केली असून, सोमवार (८ फेब्रुवारी) पासून थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात टॉप अकराशे थकबाकीदारांची यादी महापालिकेने तयार केली असून, त्यांच्या संपत्तीवर टाच आणली जाणार आहे. त्यांची चल संपत्ती जप्त केली जाणार आहे.

स्मार्ट सिटी अभियानात सहभागासाठी महापालिकेने एकीकडे प्रयत्न सुरू केले असतानाच, पालिकेची मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली ही अंत्यत धिम्या गतीने सुरू आहे. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात महापालिकेने १४५ कोटी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु, फेब्रुवारी सुरू असला तरी, अद्याप ६४ कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे घरपट्टीतून निम्यापेक्षा कमी वसुली झाली आहे. यातील निम्म्यापेक्षा जास्त वसुली ही सवलतीतून झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने ही थंड वसुलीची गंभीर दखल घेत उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांना गती वाढविण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे विविध कर विभागाने वसुली मोहीम तीव्र करण्यासाठी कंबर कसली असून, बड्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे.

महापालिकेच्या नोटिसांना उत्तरे न देणाऱ्या ११०७ बड्या घरपट्टीधारकांची यादी तयार केली असून, त्यांच्या चल संपत्तीची जप्ती मोहीम सोमवारपासून सुरू केली जाणार आहे. वारंवार बजावूनही थकबाकीवर महापालिकेला दाद देत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

सहाही विभागात कारवाई सहा विभागातील सहा अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ही धडक वसुली मोहीम सुरू केली जाणार आहे. घरपट्टी रकमेच्या बदल्यात घरातील, टीव्ही, मोटरसायकल, किमती वस्तूंची जप्ती केली जाणार आहे. यासाठी पालिकेने स्वतंत्र पथके तयार केली आहेत. या कारवाईला दाद न देणाऱ्या थकबाकीदारांवर या नंतर थेट संपत्ती जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


११ पंचांवर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पतीच्या मृत्यूनंतर विधवा महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अग्निपरीक्षा देण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी ओझर पोलिस स्टेशनमध्ये जातपंचायतीच्या ११ पंचांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण उजेडात येऊनही गुन्हा दाखल होत नसल्याने सर्वच स्थरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.

नंदुरबार सासर असलेल्या कंजारभाट समाजातील ही महिला सध्या ओझर येथे माहेरी राहात असून, तेथेही तिला जातपंचायत समिती रात्री अपरात्री त्रास देत असल्याने तिने मदतीसाठी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिसांचा दरवाजा ठोठावला होता. त्यानुसार पोलिसांनी पंच दीपक तमायचेकर, राकेश तमायचेकर, मुकेश तमायचेकर, कांती नेकले, विजू नेकले, सुनील नेकले, प्रवीण नेकले, जयपाल नेकले, सासरची मंडळी धरमदास तमायचेकर, गहुबाई तमायचेकर, लक्ष्मी बाटुंगे आदींविरोधात विनयभंग- ३५४(अ) (ब), खंडणी, ३८४, दमदाटी-५०४, शिवीगाळ ५०६, कटकारस्थान १२०(ब) आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला.दि. २१ जून २०१३ रोजी पतीचे निधन झाल्यानतंर संबंधित महिला नंदुरबारमध्येच छोटेसे किराणा दुकान चालवून आपल्या दोन मुलांचे पालनपोषण करते आहे. मात्र, तिच्या विवाहीत मावस दिराने तिला लग्नाची मागणी घातली. तिने नकार दिल्यानतंर त्याने तिच्या सासू आणि दिराकडे तिच्या चारित्र्याविषयी खोटे आरोप केले. मावस दिराने तिच्याशी अश्लील वर्तन करीत विनयभंग केला. तिने याबाबत नंदुरबारमधील पोलिस स्टेशनमध्ये मारहाण आणि विनयभंगाची तक्रार दिली. मात्र, तेथील जातपंचायतीने हे प्रकरण सोडविण्याचा निर्णय घेतला. जातपंचायत बसवूनही या महिलेला येथे न्याय मिळत नव्हता. ही महिला आता ओझर येथे आई वडिलांसमवेत राहाते. हे प्रकरण उघडकीस येऊनही गुन्हा दाखल होत नसल्याने सर्वच स्तरांतून आश्चर्य व्यक्त होत होते. अंनिसचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे तसेच आमदार देवयानी फरांदे यांनी पाठपुरावा केल्यानंतर ओझर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकती सर्व्हेक्षणाची रंगीत तालीम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केवळ उत्पन्नाचे स्रोत कमी असल्याने स्मार्ट सिटीची बस हुकल्याने प्रशासनाने आता उत्पन्न वाढीसाठी शहरातील मिळकती रडारवर घेतल्या आहेत. घरपट्टी व विविध कर वाचवण्यासाठी बिल्डरांसह नागरिकांनी आपल्या मिळकतींसदर्भात सादर केलेली चुकीची माहिती उघड करण्यासाठी महापालिकेकडून मिळकतींचे सर्व्हेक्षण हाती घेण्यात येणार आहे. यासाठी इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार असून, रविवारी शहरात सिडको परिसरात सॅम्पल सर्व्हेक्षण केले जाईल.

सिडकोतील सर्व्हेक्षणासाठी ५० टीम तयार करण्यात आल्या असून, यात घरगुती व व्यावसायिक मिळकतींचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरातील सर्व मिळकतींचे सर्व्हेक्षण हे विद्यार्थ्यांमार्फत केले जाणार आहे. महापालिका हद्दीत असलेल्या शासकीय, खासगी आणि मनपाच्या मिळकतींच्या योग्य नोंदीसह उपलब्ध एरिया मॅपिंग व्यवस्थित न झाल्याने महापालिकेच्या घरपट्टी विभागाचे उत्पन्न वाढत नसल्याचे चित्र आहे. शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला असतानाही आणि लोकसंख्या २० लाखांच्या आसपास पोहचल्यानंतरही महापालिकेकडे केवळ तीन लाख ९६ हजार मिळकतींची नोंद आहे.शहरातील इंजिनीअरिंग कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने रविवारी (७ फेब्रुवारी) ही प्रायोगिक सर्व्हेक्षण मोहीम घेतली जाणार आहे. यासाठी ५० टीम तयार करण्यात आल्या असून, प्रत्येक टीम मध्ये दोन विद्यार्थी व एक मनपाचा कर्मचारी असणार आहे.

या भागाचे होणार सर्व्हेक्षण महापालिकेने सर्व्हेक्षणासाठी सिडकोची निवड केली आहे. सिडकोतील कामटवाडा, शिवाजी चौक, राणेनगर, मोरवाडी या चार भागातील मिळकतींची तपासणी केल्या जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अतिक्रमण हटाव’ला विरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शुक्रवारी मोसमपूल ते मोची कॉर्नर या कॅम्प रस्त्यालगत असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र, यावेळी बाजार समितीच्या परिसरातील व्यापाऱ्यांनी अतिक्रमण हटवण्यास महापालिकेच्या पथकाला विरोध दर्शवला. यामुळे काही काळ मोहीम थांबविण्यात आली होती.

महापालिकेच्‍या अतिक्रमण हटाव पथकाकडून शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून कॅम्प रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करण्यात आली. सायंकाळपर्यंत सुमारे ८० अतिक्रमणे काढण्यात आली. यावेळी प्रभाग एकचे अधिकारी पंकज सोनवणे, अतिक्रमण अधीक्षक दीपक हादगे, बिट मुकादम संजय जगताप, अजय चांगरे, विष्णू जेधे, मनोहर धिवरे, दिलीप निकम, संजय वालखेडे, हर्षल गडरी आदींसह मनपा कर्मचारी पथकाने कारवाई केली.

अतिक्रमण हटाव पथकाने बाजार समिती परिसरातील कॅम्प रस्त्यालगत असलेल्या व्यापारी संकुलासमोरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. त्यावेळी स्थानिक व्यापारी आणि मनपा अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. व्यापाऱ्यांनी अतिक्रमण हटवण्यास विरोध दर्शवित मनपाकडून अतिक्रमण हटवताना कोणतीही पूर्वसूचना दिली नसल्याचा आरोप केला. तसेच, अतिक्रमण काढताना कोणतेही निकष लक्षात न घेता कारवाई होते, असाही आरोप केला. मात्र, यावेळी प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे, अधीक्षक दीपक हादगे यांच्यासह पथकातील अधिकाऱ्यानी व्यापाऱ्यांनी अतिक्रमण बांधकाम करताना परवानगी घेतलेली नाही. तसेच, मनपाने याबाबत आधीच पूर्वसूचना दिली असून, अतिक्रमण हटवण्याची कारवाई नियमांनुसारच सुरू असल्याचे सांगितले. मात्र, व्यापारी संतप्त झाल्याने काही काळ मोहीम थांबवण्यात आली होती.

आज प्रभाग चारमध्ये कारवाई गुरुवारी देखील पथकाने मालेगाव कॅम्प भागातील रावळगाव नाका परिसर, भायगाव रोड परिसरात कारवाई केली. त्यावेळी या भागातील टपरी मालक व व्यापारी यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आज (६ फेब्रुवारी) प्रभाग चारमध्ये रौनकाबाद परिसरातील अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. यासाठी पोलिस निरीक्षक अंकुश इंगळे व भालसिंग यांच्यासह पोलिस पथकाकडून बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मैत्रेय’ग्रुपच्या वर्षा सत्पाळकर अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्लॉट डेव्हलपमेंट क्षेत्रात राज्यभरात बस्तान बसविलेल्या मैत्रेय ग्रुपच्या एजंटांनी शुक्रवारी कोर्टाच्या आवारात अभूतपूर्व गोंधळ घातला. कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांच्यावरील गुन्हा मागे घेऊन त्यांची सुटका करावी, अशी मागणी करीत शेकडो एजंटांनी थेट कोर्टालाच वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांबरोबरच कोर्टालाही शिव्यांची लाखोळी वाहण्यात आली. या घटनेचे वार्तांकन करणाऱ्या छायाचित्रकारांनाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

गुतवणूकदारांना परतावा न दिल्याबद्दल महाराष्ट्रात १०७ शाखा आणि साडेतीन लाख गुंतवणुकदार असलेल्या मैत्रेय ग्रुपच्या संचालिका वर्षा मधूसुधन सत्पाळकर आणि संचालक जनार्दन अरविंद पारूळेकर यांच्याविरोधात गुरूवारी मध्यरात्री सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये कलम ४०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याचवेळी सत्पाळकर यांना ठाणे जिल्ह्यातून अटक केली. कोर्टाने त्यांना शुक्रवारी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. गुन्हा दाखल झाल्यास गुंतवणुकदार पैशांसाठी आपल्याकडे तगादा करतील, या भीतीमुळे दीडशे ते दोनशे एजंट दुपारी चारच्या सुमारास कोर्टाच्या प्रवेशद्वाराजवळ जमा झाले. त्यांनी न्यायालयाविरोधात घोषणाबाजी करीत सदर गुन्हा तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली. पोलिसांचा अपुरा बंदोबस्त असल्याने काही काळ कोर्टातच्या आवारातच दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. एजंटांमध्ये महिलांचाही

मोठ्या प्रमाणावर भरणा होता. काही एजंटांनी वृत्तपत्र व स्थानिक टीव्ही चॅनेल्सच्या कॅमेरामन्सला मारहाण केली. पोलिसांनी तिघा तरुणांसह काही महिलांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

एखाद्या प्रतिष्ठीत अथवा नावाजलेल्या गुन्हेगाराला कोर्टात हजर करताना तिथए नेहमीच तणावाचे वातावरण असते. मात्र, पोलिस बंदोबस्त व न्यायालयाप्रति असलेल्या आदरामुळे शक्यतो कायदा व सुव्यवस्था बिघडत नाही. मात्र, शुक्रवारचा दिवस त्यास अपवाद ठरला.पोलिसांचा कमी बंदोबस्त व आक्रमक एजंट अशा परिस्थितीमुळे कोर्टाच्या आवारात अभुतपूर्व गोंधळ निर्माण झाला. एका जणाने एजंटांना शिवीगाळ केल्यानंतर प्रकरण चिघळले.

एजंटांची मुजोरी

सुनावणीदरम्यान, राज्यभरात बस्तान बसविलेल्या मैत्रेय ग्रुपच्या एजंटांनी शुक्रवारी कोर्टाच्या आवारात अभूतपूर्व गोंधळ घातला. वर्षा सत्पाळकर यांच्यावरील गुन्हा मागे घेऊन त्यांची सुटका करावी, अशी मागणी करत शेकडो एजंटांनी थेट कोर्टालाच वेठीस धरण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप-शिवसेनेत रंगणार लढत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपपे पॅनलची घोषणा केली आहे. येत्या २९ तारखेला निवडणूक होत असून, पॅनलच्या घोषणांमुळे भाजप आणि शिवसेना या निवडणुकीत आमने-सामने असणार आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. भाजपचे (हिरे) कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल, तर शिवसेनेचे (भुसे) शेतकरी विकास पॅनल अशी ही लढत असणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीनेही मोर्चेबांधणी केली आहे. यामळे त्यांचेही या दोन्ही पक्षांपुढे आव्हान असणार आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीच्या माघारीच्या दिवसाच्या पूर्व संध्येलाच भाजप नेते अद्वय हिरे, माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्यासह पॅनलचे उमेदवार व पक्ष पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत भाजप आणि हिरे समर्थकांचे कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलची घोषणा करण्यात आली. पॅनलमध्ये चार महिलांचा समावेश आहे. यावेळी माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी बाजार समितीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी मतदार पॅनलच्या हाती सत्ता देतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दीपक पवार, महानगर अध्यक्ष सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.

शिवसेनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी शेतकरी विकास पॅनलची घोषणा केली. शिवसेना नेते व माजी अध्यक्ष बंडू बच्छाव यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर त्यांच्याच नेतृत्वात ही निवडणूक लढण्यात येणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हिताची कामे व्हावीत, यासाठी मतदार शिवसेनेच्याच पॅनलच्या हाती सत्ता देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या पॅनलमध्ये सोसायटी गट, ग्रामपंचायत गट, व्यापारी गट, हमाल मापारी गट अशा चारही गटातून एकूण १८ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात दोन महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी संजय दुसाने, प्रमोद शुक्ला, भरत पवार, धर्मराज पवार उपस्थित होते.

५८ उमेदवार रिंगणात मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी एकूण १६१ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. माघारीनंतर ५८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलासाने यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडली. अर्ज माघारीसाठी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत मुदत देण्यात आली होती. अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुक उमेदवार, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीने बाजार समिती आवार गजबजून गेले होते.

अशी होणार निवडणूक सोसायटी गटात ३४, ग्रामपंचायत गटात १४, व्यापारी गटात ७ तर हमाल मापारी गटातून ३ उमेदवार असे एकूण १८ जागांसाठी ५८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ही माहिती बाजार समिती सचिव अशोक देसले यांनी दिली.

बळीराजा पॅनलही रिंगणात माघारीच्या दिवस अखेरीस काँग्रेस व राष्ट्रावादीकडून बळीराजा पॅनल जाहीर केले आहे. काँग्रेस नेते प्रसाद हिरे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पवार आदींसह दोन्ही पक्षाच्या अनेक मातब्बर दिग्गजांनी अर्ज भरलेले असल्याने हिरे, भोसले यांनी या पॅनलची घोषणा करण्याबरोबरच उमेदवारांचे नावही जाहीर केले आहे. यामुळे सेना-भाजपपुढे आता बळीराजा पॅनलचे आव्हान असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images