स्थायी समितीच्या १६ सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे नगरसचिव विभागाने सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यास गती दिली आहे. सदस्यांच्या निवडीचा ठराव महापौरांकडून प्राप्त झाल्यानंतर नगरसचिव विभागाकडून सभापतीपदाची निवडणूक घेण्यासंदर्भातील प्रस्ताव विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या कार्यालयाकडे सादर केला. विभागीय आयुक्तांकडून आता सभापतीपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे सर्वपक्षीयांच्या नजरा आता आयुक्तांच्या निर्णयाकडे लागून आहेत. दरम्यान, हा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर विभागीय आयुक्त एक किंवा दोन दिवसात निवडणुकीची घोषणा करतील. पुढील आठवड्यात २५ मार्चपूर्वी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विभागीय आयुक्तांकडे निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील प्रस्ताव दाखल झाल्यानंतर राजकीय पक्षांनीही निवडणुकीच्या हालचाली गतीमान केल्या आहेत. मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्षांच्या महाआघाडीत सभापतीपदासाठी रस्सीखेच असून मनसेच्या दाव्यानंतर काँग्रेसनेही सभापतीपदाची मागणी केली आहे. तर विरोधकांमध्ये अजूनही दुहीचे
वातावरण आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट