Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 49119

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मागण्यांसाठी ‘थाळीनाद’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून मानधन थकले आहे. त्यांना विविध भत्त्यांना मुकावे लागत आहे. तसेच त्यांच्या इतर मागण्यांसाठी गुरूवारी जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नवापूर चौफुलीपासून थाळीनाद मोर्चा काढला. याविषयी प्रश्न सुटेपर्यंत धरणे आंदोलन करणार असल्याचे राज्य संघटनेचे युवराज बैसाणे यांनी 'मटा' शी बोलताना सांगितले. नंदुरबार जिल्ह्यातील विविध प्रलंबित मागण्यासाठी गुरूवारी सकाळी जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नवापूर चौफुलीपासून हा थाळीनाद मोर्चा काढला.



यात अमृत आहार योजना सुरू करण्याबाबत सक्ती थांबविण्यात यावी, अंगणवाडी कर्मचारी यांचे जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांचे मानधन तत्काळ अदा करावे, दोन वर्षांचा थकीत प्रवास भत्ता, बिले देण्यात यावीत यासारख्या मागण्यांचा समावेश आहे. तसेच योजनेच्या कामासाठी लागणारे साहित्य, रजिस्टर, अहवाल, शेरेपुस्तक, हजेरीपत्रक विनाविलंब पुरविण्यात यावे. सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांचे एक रकमी पेन्शन योजनेचे प्रस्ताव सरकारकडे तत्काळ पाठविण्यात यावे यांचीही मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 49119

Latest Images

Trending Articles



Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>