Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 49119

ओवैसीचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

एमआयएमचे खासदार असदूद्दीन ओवैसी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपतर्फे गुरूवारी त्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न झाला. मात्र वेळीच पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला नाही. ओवैसी यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन देशबांधवांच्या भावना दुखविण्याचा प्रयत्न केला आहे, यामुळे देशात वाद निर्माण होईल, असेही यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे त्याच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला गेला.
काही दिवसांपूर्वी खासदार ओवैसी यांनी 'माझ्या गळ्यावर कोणी चाकू ठेवला तरीही आपण 'भारत माता की जय' ही घोषणा देणार नाही', असे वादग्रस्त वक्तव्य दिले होते. यावरून हा सर्व वाद उफाळून आला आहे. त्याच्या विरोधात धुळ्यात भारतीय जनता पार्टीतर्फे रईस हिंदुस्थानी यांच्या नेतृत्वाखाली जमनालाल बजाज रोडलगत शहर पोलिस चौकीजवळ असदूद्दीन ओवैसी यांचा पुतळा दहन करण्यात येणार होता.
मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करुन प्रतिकात्मक पुतळा जप्त केला. तरीही कार्यकर्त्यांनी यावेळी ओवैसी यांच्या विरोधात जोदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी हाजी मुनाफ, मतीन खाटीक, मोहमंद हुसेन, निसार अहमद, आरीफ अहमद, शेख शाहबाज, जमील अहमद आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 49119

Latest Images

Trending Articles



Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>