गुरुवारी इतिहास, राज्यशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना शहरातील महात्मा गांधी हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर बोगस (डमी) विद्यार्थी पेपर लिहीत असल्याची तक्रार नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे आली. भरारी पथकातील उपशिक्षण आधिकारी एस. जी. मंडलीक यांनी परीक्षा केंद्रावर धाड टाकली असता आठ बोगस विद्यार्थी सापडले. या बोगस विद्यार्थ्यांनी लिहलेले पेपर सील करून शिक्षण विभागाकडे जमा करण्यात आले आहेत. इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून संशयीत विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट