Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 49119

शिवसेनेचा भाजपविरोधात आक्रोश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक नाशिकच्या प्रश्नांवरअन्यायाविरोधात राज्यात सत्तेत असूनही शिवसेनेचे ऐकूनघेणाऱ्या भाजप विरोधातील तीव्र संताप शिवसेनेने शनिवारी रस्त्यावर उतरून व्यक्त केला. शिवसेनेने धडक मोर्चाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करत, भाजपविरोधात एल्गार पुकारला. हजारोच्या संख्येने शिवसैनिकांना रस्त्यावर उतरून भाजपाला सडेतोड उत्तर देत, नाशिककरांवरील अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा दिला. पाणी, वीज, उद्योग, एकलहरे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विभाजनावरून शिवसेनेने भाजपला घेरत जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नाशिककरांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या भाजपचे स्थापत्य महासंघापाठोपाठ शिवसेनेच्या धडक मोर्चामुळे तोंडचे पाणी पळाले आहे.

भाजप सरकारच्या नाशिक संदर्भातील अन्यायी धोरणासंदर्भात शिवसेनेतर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालवर धडक मोर्चा काढण्यात आला. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणूका असल्याने शिवसेनेने एकाचवेळी धडकमोर्चाद्वारे शक्तीप्रदर्शन करत, भाजपलाही प्रतिउत्तर दिले आहे. संपर्क प्रमुख अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखालील मोर्चात, माजी मंत्री बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह खासदार, आमदार सहभागी झाले होते. शालीमार येथून बारा वाजता या धडकमोर्चाला सुरूवात झाली. मोर्चात बैलगाडी, चित्ररथ, कलापथके, रिकाम्या हंड्यांसह महिला व गाड्यांवर लावलेले कार्टून्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. भाजपविरोधातील तीव्र संताप व्यक्त करणारा मजकूर नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला होता. संपूर्ण मोर्चात शिवसेनेच्या वतीने भाजपलाच लक्ष करण्यात आले होते. भाजपने केलेल्या अन्यायाचे पोस्टर्स व छायाचित्र मोर्चात लावण्यात आले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला असता, यावेळी शिवसैनिक व पोलीस आमने सामने आले. शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु पोल‌िसांनी तो हाणून पाडला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर लोटालोटी झाल्याने शिवसैनिकांनी गेट तोडले. त्यामुळे आंदोलकांना आवरण्यासाठी पोल‌िसांनी सौम्य लाठीमार करावा लागला. त्यांनतर शिवसेनेनेच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी डॉ. दिपेद्रसिंह कुशवाह यांच्याशी चर्चा करत, निवेदन दिले. सरकार नाशिकवर अन्याय करत असल्याच्या भावना नेत्यांनी व्यक्त केल्या, तर तुमच्या भावना सरकारपर्यंत पोहचवतो असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

गिरीश महाजनांना शिव्याशाप संपूर्ण धडक मोर्चात शिवसेनेकडून भाजप आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांना लक्ष करण्यात आले होते. मोर्चात सहभागी मोर्चेकऱ्यांनी गिरीश महाजन यांच्याबद्दल अश्लील घोषणा देत, त्यांची टिंगलटवाळी केली. नाशिकचे पाणी पळविणाऱ्या महाजनांच्या नावाने अक्षरश: खडी फोडण्यात आली. 'गिरीश महाजनचे करायचे काय, खाली डोके वरती पाय', 'भोंगळा कारभार भाजपचा, सत्यानाश नाशिकचा', 'धरण उशाशी नाशिककर उपाशी','नागपूरकरांना प्रकाश नाशिककरांना करून भकास' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिवसैनिकांच्या या घोषणा ऐकून रस्त्यावरील नागरिकसुद्धा आश्चर्यचकीत झाले होते.

नाशिककर वेठीस रम्यान, शिवसेनेच्या मोर्चाने शहरातील सर्व वाहतुकीचे नियोजन कोलमडले होते. मोर्चासाठी बाहेरून वाहने आल्याने सगळीकडे ट्रॅफिक जाम झाल्याने नाशिककरांना हालअपेष्टांचा सामना करावा लागला. शाल‌िमार, सीबीएस, रविवार कारंजा, जुने नाशिकच्या परिसरात हा मोर्चा असल्याने पोल‌िसांनी या भागातील वाहतूक बंद केल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे भाजपच्या अन्यायाविरोधात सेनेने काढलेला मोर्चा हा उलट नाशिककरांसाठी डोकेदुःखी ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 49119

Latest Images

Trending Articles



Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>