Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शाही मार्गाचे होणार रुंदीकरण

$
0
0
शाहीमार्गावरील अतिक्रमण काढून त्याचे रूंदीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी सर्वप्रथम भूसंपादनाचे काम हाती घेण्यात येणार असून तसा प्रस्ताव गुरूवारी स्थायी समिती बैठकीत मांडण्यात आला. त्यास स्थायी समितीने मंजूरी दिली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा चौकशीचा फार्स

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गेल्या दीड वर्षांत पाचव्यांदा चोरीची घटना घडली असली तरी जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ चौकशीचा फार्स सुरू ठेवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी एकावरही कारवाई केलेली नसताना भविष्यात चोरी होऊ नये यासाठी सीसीटीव्ही बसविण्याला अग्रक्रम राहणार असल्याचे मात्र त्यांनी आवर्जून सांगितले आहे.

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

$
0
0
भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्टकारने दुचाकीस्वारास जोरदार धडक देण्याची घटना कॉलेजरोडवरील डॉन बॉस्को हायस्कूलजवळील चौफुली येथे दुपारी दोनच्या सुमारास घडली. कारची धडक इतकी जबर होती की दुचाकीस्वार सुमारे २० फुट दूर फेकला गेला.

जिल्हा बँकेवर प्रशासकाची नियुक्ती

$
0
0
वादग्रस्त कामकाज आणि विविध कारणांमुळे चर्चेत असलेले नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त झाले आहे. राज्याच्या सहकार आयुक्तांनी रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनंतर बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली असून बँकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासक कारभार पाहत आहेत.

सारुळप्रकरणी गंभीर कारवाई

$
0
0
नाशिक शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या सारुळ येथे अनधिकृतपणे खडीक्रशर सुरू असल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाल्याने याप्रकरणी अत्यंत गंभीरपणे कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सट्टेबाजांना ५ दिवसांची कोठडी

$
0
0
सध्या सुरू असलेल्या आयपीएल मॅचेसवर बेटिंग लावणाऱ्या पाच संशयितांना क्राइम ब्रँचने बुधवारी रात्री शिताफीने अटक केली. अटक केलेले सर्व आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवाशी असून, ते आयपीएल सुरू झाल्यापासून बेटिंगचा गोरखधंदा करीत होते. संशयितांना गुरुवारी कोर्टासमोर हजर करण्यात आले असता, कोर्टाने त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली.

३८ टक्के लोक शौचालयांविना

$
0
0
भारताला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे झाली तरी जिल्ह्यातल्या अनेक भागांत आजही शौचालये नाहीत. राज्य सरकारने केलेल्या विशेष पाहणीत नाशिक जिल्ह्यात आजमितीस ३८ टक्के नागरिक उघड्यावर शौचास बसत असून राज्यातील हेच प्रमाण सुमारे ४६.९ टक्के आहे.

लाचखोरांना मनसेचा चोप

$
0
0
सिडकोत पैसे घेऊन आधार कार्ड देण्याचा उद्योग मनसेने गुरुवारी उधळून लावला. स्थानिकांच्या मदतीने मनसेने हा प्रकार उघडकीस आणला. यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांना चोप देत या प्रकाराची तक्रार महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली.

इंधन वाहतूकदार पुन्हा संपावर

$
0
0
भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातील इंधन वाहतूकदारांनी अवघ्या २० दिवसांनंतर पुन्हा बेमुदत संप सुरू केला आहे. इंधन वाहतुकीच्या दरासंदर्भात योग्य ‌न्याय मिळण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या संपात सुमारे १७० वाहतूकदार सहभागी झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या काही जिल्ह्यांत इंधनटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पिण्याच्या पाण्यात लाल अळ्या

$
0
0
जळगाव महापालिकेला एमआयडीसीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पाण्यात लाल अळ्या आढळून आल्यामुळे जळगावकरांमध्ये घबराट पसरली आहे. तापी नदीत सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे हे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे.

धुळे दंगल: १ हजार पानी आरोपपत्र

$
0
0
६ जानेवारी, २०१३ रोजी शहरातील मच्छीबाजार, माधवपुरा परिसरात दोन धर्मियांमध्ये झालेल्या दंगलीसंदर्भात सीआयडीने अटक केलेल्या २१ जणांविरुद्ध एक हजार ५० पानांचे दोषारोपपत्र गुरुवारी धुळे जिल्हा कोर्टात दाखल केले. अटकेत असलेल्यांना जामिनावर सुटण्याची संधी मिळू नये, यासाठी ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

नाशिक जिल्हा बँकेवर प्रशासकाची नियुक्ती

$
0
0
वादग्रस्त कामकाज आणि विविध कारणांमुळे चर्चेत असलेले नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त झाले आहे. राज्याच्या सहकार आयुक्तांनी रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनंतर बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली असून बँकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासक कारभार पाहत आहेत.

पोलिस ना‌शकातील सट्टेबाजांच्या मागावर

$
0
0
आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंगचे धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचले आहेत. नाशिकरो‍ड भागात आयपीएल मॅचेसवर बेटिंग लावणा‍ऱ्या पाच संशयितांना क्राईम ब्रँचने बुधवारी रात्री शिताफीने अटक केली.

नाशिकला हवयं कौशल्यपूर्ण मनुष्यबळ

$
0
0
नाशिक शहर भिक्षूकीचे, सिंहस्थ पर्वणीचे, यज्ञ-याग-कीर्तन-रूढी परंपरांच्या घट्ट पगडयाचे. अशा या एक प्रकारची 'निवांती' असलेल्या शहरात १९७० च्या दशकात 'उद्योग' पर्व सुरु झालं. त्याच्या आधी ओझर येथील 'एचएएल' व नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरीटी प्रेस अशी दोनच मोठी उद्योग केंद्रे नाशिकमध्ये होती.

सटाणावसीयांवर पुन्हा पाणीटंचाईचे संकट

$
0
0
सटाणा शहरासह आरम खोऱ्यातील गावांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी केळझर धरणातून सोडलेले पाण्याचे शेवटचे आवर्तन सोमवारी, २० मे रोजी संध्याकाळी बंद केल्याने नदीपात्राने तळ गाठला आहे.

हवी विवाह संपत्तीची व्याख्या

$
0
0
घटस्फोटित महिलांना त्यांच्या पतीच्या राहत्या घरात ‌अर्धा हिस्सा मिळावा, याकरिता हिंदू विवाह कायद्यात सुधारीत तरतूद प्रस्तावित आहे. यानुसार महिलेला पतीच्या लग्नाआधी व नंतरच्या स्थावर व जंगम मालमत्ता (वडिलोपार्जितही) व पुंजीमध्ये हक्क मिळणार आहे.

'डीएड'चा तपासणी अहवाल आठवडाभरात

$
0
0
जानेवारी महिन्यामध्ये करण्यात आलेल्या डीएड कॉलेज तपासणीचा अंतिम अहवाल राज्य सरकारला आठवड्याभरात सादर केला जाणार आहे.

शिक्षक निवडणूक बंधनात

$
0
0
निवडणुकीची मतदान प्रक्रिया वगळता शिक्षकांना कोणतेही अशैक्षणिक काम लावू नये या संबंधीचा निर्णय सरकारमार्फत जाहीर करण्यात आला होता. परंतु निवडणुकीच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कामावरुन शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

पूररेषेत नव्या बांधकामांना परवानगी नाही

$
0
0
जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाने पूरनियंत्रण रेषा अंतिम केली आहे. त्यामुळे पूररेषेच्या आत कुठल्याही बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही. महापालिकेलाही त्यासंबंधीचे आदेश देण्यात येतील, असे मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी शुक्रवारी सांगितले.

रिक्षाचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा

$
0
0
रात्री-अपरात्री अपप्रवृत्तीच्या रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट होण्याच्या घटनांत आणखी एका घटनेची भर पडली आहे. शालिमार भागातील या घटनेत दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका रिक्षाचालकासह तिघांनी रासेगावातील ग्रामस्थाला मारहाण केली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images