Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

चाळीसगाववर शोककळा

$
0
0
उत्तराखंडात अडकलेल्या आपद‍्ग्रस्तांना वाच‌वण्यासाठी धावून गेलेल्या नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ)च्या पथकात वडाळा-वडाळी गावातील गणेश हनुमान अहिरराव (३२) याचाही समावेश असल्याचे समजल्यानंतर गावक‍ऱ्यांना त्याचा अभिमान वाटला होता.

महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद

$
0
0
उत्तराखंडवर ओढवलेल्या अभूतपूर्व अस्मानी संकटातून लोकांना वाचवण्यासाठी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी)च्या जवानांना तातडीने पाचारण करण्यात आले. या पथकात धुळे जिल्ह्यातील बेटावद (ता. शिंदखेडा) येथील शश‌िकांत रमेश पवार (३२) याचाही सहभाग होता.

एसटीत ३० टक्के पगारवाढ

$
0
0
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील जे कर्मचारी ३१ मार्च २००८ रोजी कनिष्ठ वेतन श्रेणीत होते अशा कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनावर २९.५ टक्के पगारवाढ देण्यात आली आहे.

ठाकरेंच्या बडग्याने महापौरांना जाग

$
0
0
स्वतःच्या प्रभागात पाणी तुंबूनही घटनास्थळी तत्काळ हजर न होणा-या महापौरांची 'कामगिरी' मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सांगितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महापौरांच्या प्रभागात नाले व गटार साफसफाई मोहीम सुरू करण्यात आली.

रामदास आठवलेंना काँग्रेसचे आवतन

$
0
0
'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चे अध्यक्ष रामदास आठवले हे चांगले व समविचारी नेते आहेत. त्यांना आजही आम्ही समविचारी नेते समजतो. ते परत स्वगृही आल्यास त्यांचे स्वागतच होईल, असे सांगून प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आठवलेंना जाहीर निमंत्रण दिले.

अतिक्रमणांचे संगोपन करणाऱ्यांचे काय ?

$
0
0
शहर विकासात अडथळा ठरणारे अतिक्रमण त्वरित हटविण्याचा 'ठाकरी शैलीतला' आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे महापालिका अधिकाऱ्यांना देऊन गेले आहेत. मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अतिक्रमणे असले तरी, प्रशासनाने दबावाला बळी पडू नये, असे आवाहन करताना पुढील महिन्यात नाशिकमध्ये आल्यावर कारवाई झालेली दिसली पाहिजे, असा कडक डोस त्यांनी दिला आहे.

निवडणुक प्रक्रियेत कुचराई नको

$
0
0
जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांची गैरसोय होता कामा नये. तसेच कायद्याचे तंतोतंत पालन झाले पाहिजे. या प्रक्रियेत कुठल्याही प्रकारची कुचराई खपवून खेतली जाणार नाही असे सक्त आदेश राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिले.

'भाजप'ची आज विकास परिषद

$
0
0
भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीतर्फे शुक्रवारी नाशिक विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात दुपारी १२ वाजता होणाऱ्या या परिषदेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत.

वाहन खरेदीची होणार चौकशी

$
0
0
बांधकाम विभागासाठी लागणाऱ्या वाहन खरेदीच्या प्रस्तावावर चर्चा करत असताना स्थायी समिती सदस्यांनी खतप्रकल्पासाठी कोट्यवधी रूपये खर्च करून विकत घेण्यात आलेल्या आणि सध्यस्थितीत बंद असलेल्या वाहनाचा मुद्दा उपस्थित केला. सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सभापती रमेश धोंगडे यांनी वाहन खरेदी आणि सद्यस्थितीबाबत चौकशी करण्यासाठी एका समितिची​ नियुक्त केली.

वसाका पुन्हा सुरू होण्याचे संकेत

$
0
0
राज्य सहकारी बँकेने शुक्रवारपर्यंत कामगारांच्या थकित वेतनासंदर्भात योग्य निर्णय देण्याचे आश्वासन दिल्याने वसाकाची चाके पुन्हा सुरू होतील असे संकेत मिळत असून ऊस उत्पादक, सभासद, कामगारांना दिलासा मिळाला आहे.

शहिदांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी

$
0
0
उत्तराखंडमधील आपद्‍ग्रस्तांना मदत पुरवताना झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २० पैकी नऊ जवानांची ओळख पटविण्याचे आव्हान आता उभे ठाकले आहे. या नऊ जवानांमध्ये खान्देशातील शशिकांत पवार आणि गणेश अहिरराव यांचाही समावेश आहे. त्यांचे नातेवाईक डेहरादूनला पोहोचले असून दोघांच्याही आई-वडिलांच्या रक्ताचे नमुने डीएनए चाचणीसाठी हैद्राबाद येथे पाठविण्यात आले आहेत.

नगररचना विभागासाठी एकच वर्षाची नियुक्ती?

$
0
0
'आगामी कुंभमेळा नजरेसमोर ठेऊन अधिकाऱ्यांनी कामे करणे आवश्यक आहे. मात्र, कुंभमेळा अवघा दोन वर्षावर येऊन ठेपला तरी नियोजनानुसार कामे केली गेली नाहीत', या शब्दात स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे यांनी नगररचना विभागाबद्दल नाराजी व्यक्त केली. अनेक कर्मचारी बिल्डर्ससाठी कामे करीत आहेत. त्यांना लगाम घालण्यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची एका वर्षांसाठी नियुक्ती का करण्यात येऊ नये असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ट्रकचालक व क्लिनरचे अपहरण

$
0
0
अज्ञात चोरट्यांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून माल ट्रक चालक व क्लिनरचे अपहरण करून ट्रकसह ९ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटाच्या पायथ्याशी बुधवारी पहाटे हा प्रकार घडला.

टँकर्सच्या संख्येत लक्षणीय घट

$
0
0
पावसाळ्याला प्रारंभ होऊन महिना उलटत असताना जिल्ह्यातील टँकर्सच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. ऐन उन्हाळ्यात चारशेच्या आसपास गेलेली टँकर संख्या आता १८४वर येवून ठेपली आहे. मात्र, सिन्नरमधील पाणी टंचाई अद्याप कमी न झाल्याने तेथे सर्वाधिक म्हणजे ५८ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

अटीतटीच्या लढतीत ठाकरेंचा विजय

$
0
0
नाशिक बार असोसिएशनच्या अध्यक्ष व इतर पदांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. अध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत अॅड. नितीन ठाकरे यांनी अॅड. दिलीप वनारसे यांच्यावर अवघ्या ३० मतांनी सरशी करत विजय खेचला.

पाच हजार वाहनांची तपासणी

$
0
0
स्वच्छ आरोग्य व पर्यावरणाच्या प्रचारासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहकार्याने बॉश कंपनीने शहरात राबविलेल्या 'स्वच्छ हवा मोहिमे'त पाच हजार वाहनांची पीयुसी तपासणी करण्यात आली. त्यात पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही वाहनांचा समावेश आहे.

११७ क्रशरला सशर्त मान्यता

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील ११७ खडी क्रशरला पर्यावरण समितीनी सशर्त परवानगी दिली आहे. या क्रशरला परवानगी मिळाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक विकास कामांना दिलासा लाभणार आहे. मात्र, हे खडी, क्रशर किमान दीड महिना तरी सुरू होण्याची शक्यता नाही.

'जलाराम'च्या मालकांवर गुन्हा

$
0
0
कॉलेजरोडवरील श्री जलाराम स्वीट मार्ट या दुकानास १२ जून रोजी सकाळी सात वाजता लागलेल्या आगीच्या घटनेबाबत दुकानमालकांनी निष्काळजीपणा दाखवल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पण झाल्याने सरकारवाडा पोलिसांनी दुकानमालकांविरोधात गुरूवारी गुन्हा दाखल केला.

सजगपणे भरा ऑप्शन फॉर्म

$
0
0
'ऑप्शन भरणे म्हणजे केवळ एक प्रक्रिया नसून प्रवेश निश्चित करण्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे हा फॉर्म भरताना प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी सजग राहावे', असा सल्ला 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'डीटीई'मार्फत आयोजित 'डिप्लोमाला प्रवेश घेताना' या मार्गदर्शन सत्रामध्ये तज्ज्ञांनी दिला. विद्यार्थी आणि पालकांच्या भरघोस प्रतिसादामध्ये प. सा. नाट्यगृहात गुरुवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला.

अल्पसंख्याकांना दुय्यम समजू नका

$
0
0
राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम गुरुवारी अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीसाठी नाशिकला आले होते. मात्र या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक व महापालिका आयुक्त अनुपस्थित राहिल्याने हकीम यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images