Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिकरोडला मजुराची हत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

दगडाने डोके ठेचून एका मजुराचा खून करण्यात आल्याची घटना नाशिकरोडला गुरुवारी सकाळी उघडकीस आली. बाळू उर्फ बाळासाहेब दिनकर दोंदे (वय ४५, रा. रोकडोबावाडी, देवळालीगाव) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. अत्यंत वर्दळीच्या वास्को चौकातील भंडारी ब्रदर्स प्लायवुड सेंटरपुढे त्याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.

बाळू यांच्या खुनप्रकरणी त्याचा भाऊ अनिल दिनकर दोंदे (रा. चेहेडी शिव) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या घटनेनंतर एका संशयितास ताब्यात घेतले असून त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे. बाळू यांना दारू पिण्याचे व्यसन होते; त्यामुळे अनेकदा ते घर सोडून बाहेरच राहत असे. रात्री ते विविध बाजारपेठांतील रस्त्यावर फिरून पुठ्ठे व भंगार जमा करून त्याची विक्री करीत असे. गुरुवारी रात्री तीन ते चार वाजेच्या सुमारास पुठ्ठे व भंगार गोळा करीत असताना बाळू यांना अज्ञात तीन व्यक्तींनी मारहाण केल्याची माहिती भंगार जमा करणारा त्यांचा साथीदार संतोष चंदू कटारे याला दिली. तिकडे न जाण्याचा सल्लाही दिला. त्यामुळे घाबरलेला संतोष गोसावीवाडीत जाऊन झोपला. बाळू यांचा डोक्यात दगड मारून खून झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. नाशिकरोड पोलिसात अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मखमलाबादला गॅस चोरास अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मखमलाबाद गावाजवळील भारत गॅस गोडाउनमधून ग्राहकांना डिलिव्हरी व्हॅनद्वारे गॅस सिलिंडरचे वितरण केले जाते. या व्हॅनचा चालक भरलेल्या सिलिंडरमधून गॅस काढून ग्राहकांना कमी वजनाचे सिलिंडर देत असल्याची गुप्त माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ ला मिळाली. पोलिसांनी गुरुवारी (दि. १०) सापळा रचून चालकास ताब्यात घेत सुमारे दोन लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

संजय खंडू चव्हाण (४२, रा. गंगोत्री विहार कॉलनी, अमृतधाम) असे ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव असून, मखमलाबाद गावाजवळ असलेल्या भारत गॅस गोडाउनमध्ये गॅस डिलिव्हरी व्हॅनचालक म्हणून कामास आहे. ग्राहकांना देण्यासाठी असलेल्या गॅस सिलिंडरमधून काही गॅस काढून घेत ग्राहकांची फसवणूक करीत होता. संजय गुरुवारी (दि. १०) गंगोत्री विहार कॉलनीमधील साई बंगल्याच्या मागील मोकळ्या जागेत गॅस काढत असल्याची गुप्त माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलिस निरीक्षक आंनद वाघ यांना मिळाली. त्यानुसार याठिकाणी पोलिसांनी सापळा रचून संशयित संजयला ताब्यात घेतले. यावेळी १३ गॅस सिलिंडर, तान काटा व गॅस ट्रान्सफर निप्पल असा एकूण दोन लाख ३६ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेवी ६०० कोटींवर!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासकीय शिस्तीपाठोपाठ आर्थिक शिस्तीलाही प्राधान्य दिल्याने प्रथमच महापालिकेचा स्पीलओव्हर शून्यावर आल्याने महापालिकेची आर्थिक घडी काहीशी स्थिरावली आहे. आयुक्तांनी एकीकडे नगरसेवकांच्या विकासकामांना आर्थिक स्थितीचे कारण देत ब्रेक लावला असतानाच विविध राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्ये महापालिकेच्या तब्बल ६०० कोटी रुपयांच्या ठेवी असल्याची माहिती पुढे आली आहे.

दहा बॅँकांमध्ये विविध १५ हेडखाली सुमारे सव्वाशे ठेवींच्या माध्यमातून ही रक्कम गुंतविण्यात आली असून, या ठेवींच्या माध्यमातून महापालिकेला वार्षिक ४०.६४ कोटी रुपयांचे व्याज मिळत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांकडून आता पुन्हा विकासकामांचा हट्ट धरला जाण्याची शक्यता आहे. महापालिकेतील कारभाऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून मूलभूत सोयी-सुविधांना प्राधान्य देण्याऐवजी रस्ते आणि डांबरीकरणावरच भर दिल्याने महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली होती. सिंहस्थ कुंभमेळ्यात जवळपास पाचशे व मनसेच्या काळात दोनशे कोटींचे रस्ते झाले असताना भाजपने पुन्हा अडीचशे कोटींचे डांबर ओतण्याची तयारी केली होती. परंतु, आयुक्त मुंढेंनी त्रिसूत्री लावत ही सर्व कामे रद्द केली होती, तसेच प्रभाग समित्या व विषय समित्यांनी सुचविलेली फुटकळ विकासकामेही आयुक्तांनी रद्द केल्याने प्रथमच महापालिकेचा स्पीलओव्हर साडेचारशे कोटींवरून शून्यावर आला आहे. त्यामुळे प्रथमच महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारली आहे. दायित्व शून्यावर असताना महापालिकेची ठेवींच्या माध्यमांतूनही आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे समोर आले आहे.

दुसरीकडे महापालिकेवर सिंहस्थ कामांसाठी घेतलेल्या १३० कोटींच्या कर्जाचा भार आहे. अजूनही सिंहस्थाचे ७० कोटी रुपये देणे बाकी आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंजूर केलेल्या २६० कोटींच्या कर्जाच्या रकमेतूनच ही रक्कम देण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विविध बॅँकांमधील ठेवींचा आढावा घेतला असता महापालिकेला कर्ज उचलण्याची गरजच काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विविध राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्ये महापालिकेच्या ६०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या ठेवींपोटी सुमारे ४० कोटी ६४ कोटींचे व्याजही मिळत आहे. इमारत घसारा निधी, विकास निधी, डीसीपीएस, अग्नि प्रतिबंधनक निधी, जनरल निधी, कामगार कल्याण निधी, महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजना निधी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, वेतन राखीव निधी, सुरक्षा ठेव, सिंकिंग फंड, घनकचरा व्यवस्थापन निधी, वृक्ष निधी, यंत्रसामग्री घसारा निधी, वाहन घसारा निधी या हेडखाली या सव्वाशे ठेवी ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे नीरव मोदीने लुबाडलेल्या पंजाब नॅशनल बॅँकेतही महापालिकेच्या ७८.४५ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. दरम्यान, महापालिकेची आर्थिक सुबत्ता कायम असताना नगरसेवकांच्या विकासकामांनाच कात्री का, असा प्रश्न नगरसेवकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.

--

सिंहस्थ कामे तपासण्याचे आदेश

सिंहस्थ कुंभमेळ्याला तीन वर्षांचा कालावधी उलटला असला, तरी अजूनही काही सिंहस्थ कामे प्रलंबितच असून, या कामांपोटी महापालिकेला सुमारे ७० कोटी रुपयांचे दायित्व शिल्लक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सरकारने मंजूर केलेल्या महापालिकेच्या ९१९ कोटींपैकी ७५ टक्के म्हणजेच ६२६ कोटी रुपयांचे सिंहस्थ अनुदान महापालिकेला सरकारकडून प्राप्त झाले आहे. सिंहस्थाची अनेक कामे अजूनही प्रलंबित असून, त्यात रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. वृक्षतोडीला न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे काही रिंगरोड, रस्तेविकासाची कामे, तसेच वैद्यकीय विभागांसाठी यंत्रसामग्री खरेदी अद्यापही प्रलंबित आहे. या कामांसाठी सुमारे ७० कोटी रुपयांचा खर्च महापालिकेला उचलावा लागणार आहे. ही रक्कम मंजूर कर्जातून घ्यावी, असा प्रयत्न सुरू होता. परंतु, आयुक्त मुंढे यांनी त्यालाही ब्रेक लावला असून, सिंहस्थ कामे तपासण्याचे आदेश दिले आहेत.

------------------------------------------------

बॅँकनिहाय ठेवींची स्थिती

७८.४५ कोटी : पंजाब नॅशनल बॅँक

६२.७५ कोटी : देना बॅँक

५६.९१ कोटी : ओरिएंटल बॅँक

४६.९८ कोटी : बॅँक ऑफ महाराष्ट्र

३८.९४ कोटी : सेंट्रल बॅँक

३८.२१ कोटी : बॅँक ऑफ बडोदा

३५.१४ कोटी : स्टेट बॅँक ऑफ इंडिया

२७.२७ कोटी : इंडियन बॅँक

१९.९६ कोटी : बॅँक ऑफ इंडिया

१६.१४ कोटी : स्टेट बॅँक ऑफ हैद्राबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्होकेशनल’च्या प्रयोगशाळा निधीपासून वंचित

$
0
0

खर्चाची तरतूद करण्याबाबत संस्थांना अजब सूचना

jitendra.tarte@timesgroup.com

नाशिक : 'स्किल एज्युकेशन'च्या प्रचार अन् प्रसारासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असताना व्होकेशनल अभ्यासक्रमांच्या प्रयोगशाळांसाठी सरकारकडे पुरेसा निधीच नाही. व्होकेशनल अभ्यासक्रम असलेल्या संस्थांच्या माथी प्रयोगशाळा आणि संसाधनांचा खर्च मारण्याचे काम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालयाच्या माध्यमातून पद्धतशीरपणे सुरू आहे. पण या निधीच्या खोळंब्यात दोन वर्षांपासून नवीन अभ्यासक्रम शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे.

कौशल्यपूर्ण शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालयाच्या माध्यमातून राज्यभरात विविध अभ्यासक्रम चालविले जातात. यात अधिक दोन स्तरावर सहा गटांमध्ये एकूण २० अभ्यासक्रम चालविले जातात. या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांमधूनही चांगली मागणी आहे. विविध विद्याशाखांमधून विद्यार्थीसंख्येचा कोटा पूर्ण करण्यासाठी होणाऱ्या विद्यार्थी पळपळवीच्या समस्येचा सामना अलिकडे काही वर्षांपासून व्होकेशनल अभ्यासक्रमासही करावा लागतो आहे. तरीही या अभ्यासक्रमांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या समतोल आहे. गेल्यावर्षी या अभ्यासक्रमात उपलब्ध सुमारे ६० हजारांपैकी ५९ हजार प्रवेश झाले. एकीकडे इंजीनिअरिंग अन् पॉलिटेक्निकच्या जागा रिक्त राहत असताना व्होकेशनल अभ्यासक्रमांचे हे यश मानले जायला हवे. पण, दुर्दैवाने शासनास त्याची दखल घ्यावीशी वाटत नसल्याने अद्ययावत साधनांअभावी केवळ पुस्तकातील ओळींवर बोटे फिरवून व्यावसायिक शिक्षणाचे धडे गिरविण्याची वेळ या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांवर आली आहे.

दोनच वर्षांपूर्वी व्होकेशनल विद्याशाखेचा अभ्यासक्रम बदलण्यात आला. नव्या अभ्यासक्रमास पूरक अशा संसाधनांसह अद्ययावत प्रयोगशाळा निर्मितीचीही गरज या बदलापासून आहे. पण या सुधारणा करण्यासाठी वारंवार होणाऱ्या मागणीस उत्तरादाखल निधी नसल्याचे शासनाकडून ऐकविण्यात येते. यावर वरकडी म्हणून गेल्यावर्षी संचलनालयाने या सुविधांच्या उभारणीसाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. हे नवे उद्दिष्ट गाठण्यासाठी अगोदरच आर्थिक प्रतिकूलतेमुळे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर शुल्कवाढ लादणेही योग्य नाही अन् संस्थांना उत्पन्नाचा दुसरा स्त्रोतही नाही. अशा स्थितीत कौशल्य शिक्षणाचे गाडे लोटायचे तरी कसे, असा सवाल आता राज्यातील व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना पडला आहे. राज्यात व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शासनाच्या ५३ व्यावसायिक शिक्षणसंस्था, अनुदानित ९७० संस्था तर अशासकीय विनाअनुदानित ९१७ संस्था आहेत. यातील शासकीय संस्था वगळल्यास इतर संस्थांची अवस्था याबाबतीत संघर्षाचीच आहे.

उच्चस्तरीय समिती गठीत करा

व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांचे महत्त्वाचे प्रश्न सातत्याने प्रलंबित आहेत. या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी शासनाने उच्चस्तरीय समिती गठीत करून त्या शिफारशींवर विचार करावा. अन्य बाबतीत या विभागात देशस्तरावर आदर्श मॉड्युल उभे करण्याची क्षमता महाराष्ट्रातील व्यवसाय शिक्षणात आहे. या क्षमतेचा उपयोग शासनाने करून घ्यावा, असे मत महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष प्रा. जयंत भाबे यांनी मांडले आहे.

लोगो : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’अंतर्गत ३,१९० प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रक्रियेत दुसऱ्या फेरीपर्यंत ३ हजार १९० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले. दुसऱ्या फेरीसाठी दिलेली १० मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, या फेरीतील प्रवेशासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता शिक्षण विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ४६६ शाळांमध्ये ६ हजार ५८९ जागांसाठी आरटीई प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिली फेरीत ३ हजार १ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यातील २ हजार १८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. तर दुसऱ्या फेरी १ हजार ६ विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप निश्चित झाले आहेत. तर राज्यात १ लाख २६ हजार ६८ जागांपैकी ४७ हजार २२० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सपट इंटरनॅशनल’चे जयंत जोशी यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सपट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या उद्योगाचे अध्यक्ष जयंत रामशंकर जोशी (८३) यांचे वृद्धापकाळाने निवासस्थानीच निधन झाले. १२० वर्षांची परंपरा असलेल्या सपट चहाला आंतरराष्ट्रीय उद्योगात रुपांतरीत करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

तिडके कॉलनीतील फार्म हाउसमध्ये जयंत जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांनी १९५५च्या सुमारास सपट चहाच्या व्यवसायाची सूत्रे हाती घेतली. सपट हा लोकप्रिय ब्रँड करण्यात त्यांनी यश मिळविले. खुल्या चहाचे पॅकिंग करून त्याची भारतासह परदेशात विक्री करण्यापर्यंत त्यांनी यश मिळविले. त्यांचे सामाजिक कार्यातही योगदान होते. गरजूंना मदत करण्यात त्यांचा पुढाकार होता. गोखले एज्युकेशन सोसायटीचे ते विश्वस्त होते. पारंपरिक व्यवसायाला उत्पादन उद्योगाची जोड देऊन त्यांनी चहा व्यवसायात मैलाचा दगड गाठला. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी कर्मचाऱ्यांना मार्चपासून पगार नाही

$
0
0

मार्चपासून पगार नाही

नागपूर : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या १३ पंचायत समित्यांमध्ये कार्यरत दहा हजारांवर कर्मचाऱ्यांचे मागील मार्च व एप्रिल या दोन महिन्यांपासून पगारच झालेले नाहीत. पगाराअभावी कर्मचाऱ्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. मात्र, यानंतरही प्रशासनाने काही दखल घेतलेली नाही. आता मे महिन्याचा पहिला आठवडा लोटूनही कर्मचाऱ्यांना मार्च-एप्रिलच्या पगाराची प्रतीक्षा आहे. नियमानुसार, महिन्याच्या १ तारखेला पगार होणे आवश्यक आहे. मात्र, जि. प. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार नेहमी महिन्याच्या १० तारखेपर्यंत होत आहेत. असतात. जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या १३ पंचायत समित्यांच्या बांधकाम, आरोग्य, महिला व बालकल्याण, वित्त, ग्रामीण पाणीपुरवठा, सामान्य प्रशासन, शिक्षण आदी विभागांतर्गत सुमारे १० हजारांवर अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.

आरोग्य व इतर विभागांतर्गत अनेक कर्मचारी हे ग्रामीण भागात सातत्याने आपली सेवा देतात. मात्र, मागील दोन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचे पगारच झाले नसल्याने त्यांची फरफट होत आहे. आता एप्रिल महिनाही लोटला असून, मेचा पहिला आठवडाही संपत आला आहे. यानंतरही कर्मचारी मार्च व एप्रिलच्या पगारापासून वंचित आहेत. ज्याप्रमाणे सीईओ प्रशासनावर अंकुश लावून जिल्हापरिषदेला शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्याचप्रमाणे त्यांनी कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करावा. मार्च महिन्यापासूनचे रखडलेले पगार लवकरात लवकर कसे होतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आता काही कर्मचारी संघटनांकडून होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नसराईत वाढले अपघात

$
0
0

४८ तासात ७ अपघात; चार ठार, नऊ जखमी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात लग्नसराईत वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या ४८ तासात शहराच्या विविध भागात एकूण ७ अपघात झाले. त्यात चार जण ठार झाले आहेत. त्यात दोन पादचारी आहेत. तर एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. या घटनांची दखल घेत पोलिस व महापालिका प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकदा नागरिक जीवाची पर्वा न करता मिळेल त्या वाहनाने ट्रक अथवा टेम्पोत बसून प्रवास करतात. यामुळेच अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरात आडगाव, पंचवटी व गंगापूर भागात प्रत्येकी एक व्यक्ती ठार झाला आहे. औरंगाबाद रोडवरही मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली अपघातांची मालिका पहाता औरंगाबाद रोड हा मृत्यूचा सापळा बनला आहे. औरंगाबादरोडवर लग्नाला येणारे नागरिक हे लॉन्सबाहेर वाहने उभी करतात. त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या इतर वाहनचालकांची गौरसोय होत आहे. अनेकदा रस्त्यावर वाहने पार्क केली जात असल्याने अपघात घडत आहेत. औंरंगाबाद रोडप्रमाणेच गंगापूर रोड येथे देखील मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.

बॅरिकेड्सचा अडथळा

गंगापूर रोडवर चोपडा लॉन्सच्या ठिकाणी लावलेल्या बॅरिकेड्सवर आदळून एका शिक्षकाचा मृत्यू झाला. हनुमानवाडीकडून गंगापूर रोडकडे जात असताना मंगळवारी (दि. ८) रात्री चोपडा लॉन्स येथे उभे केलेल्या बॅरिकेड्सवर धडकल्याने सुनील दौलत मटाले (रा. हनुमानवाडी ) याचा मृत्यू झाला. अपघातानंतर आपल्यावर दोष येऊ नये म्हणून पोलिसांनी लगेचच तेथील बॅरिकेड़्स हटवल्याचा मटाले यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. एरवी शहराच्या अनेक भागात अस्ताव्यस्त पडलेल्या बॅरिकेड्स उचलण्यासाठी पोलिसांना वेळ नसतो; मात्र हा अपघात घडल्यानंतर तेथील बॅरीकेड्स तातडीने हलवण्यात आले.

द्वारका पुन्हा जॅम

द्वारका परिसरात लग्नसराईमुळे अवैध वाहतुकीला जोर आला असून उड्डाण पुलाच्या खाली अनेक ट्रकचालक सीट भरण्यासाठी येथे उभे रहाता. उभ्या असलेल्या गाडीचा अंदाज न आल्याने येथेही अपघात होत आहेत.

पोलिसांनी कारावाई करावी

गंगापूररोडप्रमाणेच सिडको परिसरातही अपघातांची मालिका थांबलेली नाही. भोळे मंगल कार्यालय ते त्रीमूर्ती चौक येथे सातत्याने अपघात होत असून या ठिकाणी पोलिसानी भरधाव वेगाने जाणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागण नागरिक करीत आहेत.

वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. तसेच, सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालणे आवश्यक आहे. तरुणांमध्ये वेगाने वाहन चालविण्याचीही फॅशन आहे. अपघात होणे हे वाईटच आहे. आम्ही त्याची दखल घेतच आहोत. पण, वाहनधारकांनी नियमांचे उल्लंघन करू नये.

- रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

अपघाताची कारणे

- रस्त्यातच वाहनांचे पार्किंग

- हेल्मेट परिधान न करणे

- रस्त्यावरील विविध अतिक्रमणे

- वाहतूक नियमांचा भंग करणे

- वेगाने वाहन चालविणे

- अवैधरित्या गतिरोधक

- सिग्नल न पाळणे

- पादचाऱ्यांना प्राधान्य न देणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुला-मुलीसह आई कामटवाड्यातून बेपत्ता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

कामटवाडे, विठ्ठलनगर येथे विवाहित महिला आपल्या मुला व मुलीसह घरातून निघून गेली आहे. दोन दिवस उलटल्यानंतरही तिघे जण घरी न आल्याने अंबड पोलिस ठाण्यात त्यांच्या हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधव आनंदा साबळे यांनी या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. साबळे यांची पत्नी पंचफुला (२८), मुलगी कीर्ती (१०) आणि मुलगा कृष्णा (दीड वर्षे) हे तिघेजण दोन दिवसांपूर्वी रात्री नऊ वाजता भाजी घेऊन येतो असे सांगून घरातून निघून गेले. दोन दिवस उलटल्यानंतरही ते तिघेजण अद्यापही घरी न आल्याने माधव साबळे यांनी अंबड पोलिसांशी संपर्क साधून या तिघांच्या हरविल्याची नोंद केली आहे. शहरातून मुले, मुली व महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढलेले असताना आई आपल्या दोन्ही मुलांसह घरातून निघून गेल्याने नेमके कारण काय, याचा पोलिस शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव पुढील तपास करीत आहेत.

युवतीचे अपहरण

नाशिकरोड : चेहेडी पंपिंग स्टेशन येथील हनुमान मंदिर परिसरात वास्तव्यास असणारे रमेश धोंडुजी चव्हाण यांच्या १३ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याबद्दल रमेश चव्हाण यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आपल्या कन्येचे सोमवारी (दि. ७) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घरापासून अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचे चव्हाण यांनी गुरुवारी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदाबहार गीतांनी सुवर्णयुगाची अनुभूती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

जुन्या गाजलेल्या हिंदी-मराठी सदाबहार गीतांनी नाशिकरोडच्या नागरिकांना चांगलीच भुरळ घातली. या गीतांनी त्यांना पुन्हा एकदा सुवर्णयुगात नेऊन ताणतणाव-काळजीतून थोड्यावेळ का होईना मुक्त केले.

नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्या वसंत व्याख्यानमालेत नववे पुष्प गायिका गीता माळी, गायक संदिप थाट यांनी गुंफले. 'प्रिया तोसे नैना लागे', 'केव्हा तरी पहाटे', 'ते दिल मुझे बतादे', 'विठू माऊली तू माऊली जगाची', 'चौधवी का चांद हो', 'दिवस तुझे हे फुलायचे', 'सत्य शिवम सुंदरम्', अशा एकापेक्षा एक गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमांची सुरुवात वक्रतुंड महाकाय या गणेश वंदनेनी झाली. गीता माळी यांना साथ दिली ती सहगायक संदीप थाट सिंगार यांनी. राजेंद्र

सोमवंशी यांनी साजेशे निवेदन केले. तुषार बागूल यांनी ध्वनी व्यवस्थापन केले. संदीप थाटसिंगर यांनी किशोरदांचे 'ये शाम मस्तानी' हे गीत सादर करून टाळ्या मिळवल्या. त्यानंतर दोघांनी 'क्या खूब लगती हो', 'सागर किनारे दिले ये पुकारे' आदी ड्युएट सुरेखरित्या सादर केली. प्रसिद्ध भावगीत गायक अरुण दाते यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली म्हणून 'शुक्रतारा मंद वारा' हे त्यांचे गाजलेले गीत या दोघांनी सादर केले. मिमिक्री कलाकार संतोष फसादे यांनी विविध नेत्यांची, समाजसेवकांची तसेच चित्रपट कलाकरांची मिमिक्री करून कार्यक्रमात रंगत आणली.

वसंत व्याख्यानमाला : नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये अवतरणार ग्लोरियस अजिंठा!

$
0
0

Ramesh.padwal@timesgroup.com

Twit : MTRamesh

नाशिक : जागतिक वारसा असलेल्या अजिंठा लेणीतील अद्भुत असा चित्रवारसा डिजिटल स्वरूपात जपण्यासाठी गेल्या २७ वर्षांपासून झटणारे नाशिकचे प्रसिद्ध छायाचित्रकार प्रसाद पवार यांचे नाशिकमध्ये अजिंठा साकारण्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे वाटचाल करू लागले आहे.

नाशिक-पुणे रस्त्यावरील शिंदे गावात साडेतीन एकरांत 'ग्लोरियस अजिंठा' उभारला जाणार असून, येथे अजिंठा लेणी व त्यातील चित्रांच्या प्रतिकृती उभारल्या जाणार आहेत. अजिंठातील चित्र खराब झाल्याने ती समजून घेणे शक्य होत नसल्याने 'ग्लोरियस'मधून हा वारसा जाणून घेण्याचा अनुभव घेता येणार आहे. वारसा जतन क्षेत्रातील हा प्रयोग क्रांतिकारी ठरू शकेल.

प्रसाद पवार फाउंडेशन आणि अजिंठा रिसर्च रिस्टोरेशन सोसायटी यांच्यातर्फे 'अत्त दीप भव' या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून अजिंठा राज्यभर नेण्याचा प्रयत्न झाला. त्यातूनही त्यांनी अजिंठातील ही चित्रे १०० कोटी लोकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. याचाच एक टप्पा म्हणून केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्ली आणि प्रसाद पवार फाउंडेशन यांच्यातर्फे दिल्ली येथे आयोजित ग्लोरियस अजिंठा हे प्रदर्शन नुकतेच पार पडले अन् याला जगभरातून आलेल्या मान्यवरांनी प्रतिसादही दिला. राष्ट्रीय कला केंद्राच्या इतिहासात आतापर्यंतचे हे सर्वांत मोठे प्रदर्शनही ठरले. यातूनच नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांना अजिंठा पाहण्याचा अनुभव देण्यासाठी ग्लोरियस अजिंठा साकारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. रमेश साळवे यांनी शिंदे गावातील साडेतीन एकर जागा या प्रकल्पाला देऊ केली. प्रसाद पवार फाउंडेशनचे डायरेक्टर प्रसाद पवार, रमेश साळवे व नीलेश बोथरे या तिघा मित्रांनी अजिंठा लेणीचा हा वारसा जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

'ग्लोरियस'बाबत प्रसाद पवार म्हणाले, की हा प्रकल्प एक अनोखे स्वप्न आहे. यासाठी साधारण १०-१५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात नाशिककर अन् कलेवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी सहभाग घेतला, तर एक जागतिक आश्चर्य नाशिकमध्ये उभारता येईल. एक जागतिक वारसा जपल्याचा मानही नाशिकला मिळेल. जागेचा प्रश्न मार्गी लागला असून, ग्लोरियसमध्ये काय काय करायचे आहे याचे नियोजन सुरू आहे. आराखडा लवकरच समोर आणला जाईल.

कला अन् कलाकारांसाठी गुरुकुल

'ग्लोरियस अजिंठा' या प्रकल्पात कला आणि कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. येथे कोणालाही आपली कला सादर करण्याची, ती इतरांना शिकविण्याची अन् कलेसाठी वेगवेगळ्या स्वरूपात कार्यक्रम घेण्याची मुभा असेल. कलेचे बीज लहान मुलांमध्ये रुजविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असून, हे भारतातील सर्वांत मोठे व्यासपीठ ठरेल, असे प्रसाद पवार यांनी सांगितले. डिजिटल माध्यमातून वारसा कसा जतन केला जाऊ शकतो, याचेही धडे दिले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचोरी धंदा शहरामध्ये जोरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात वाहनचोरीच्या घटनेत सातत्याने वाढ होत असून दिवसभरात दोन वाहने चोरीला गेली आहेत. वाहनचोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून नाशिकरोड, इंदिरानगर, सातपूर भागातून प्रत्येकी एक वाहन चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

नाशिकरोड पोलिस स्टेशन हद्दीतील शिंदे गावातील रहिवासी अशोक मानकर हे काही कामानिमित्त तुळजा भवानी लॉन्स येथे मंगळवारी (दि. ८) गेले असता त्यांनी आपली स्प्लेंडर (एमएच १५ सीबी २९०७) ही दुचाकी उभी केली होती. आपले काम संपल्यानंतर मानकर हे गाडी लावलेल्या ठिकाणी गेले असता त्यांना आपली गाडी आढळून आली नाही. याबाबत त्यांनी नाशिकरोड पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. दुसरी घटना सातपूर येथील शेरीन अॅटो प्रा. लिमिटेड येथे घडली. या ठिकाणी नाशिकरोड येथील रहिवासी अजिंक्य देविदास भिसे हे आपली पल्सर (एमएच १५ एफ पी २५३९) कंपनीच्या बाहेर लावून कामासाठी आत गेले. परतल्यानंतर त्यांना गाडी आढळून आली नाही. याबाबत त्यांनी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तंत्रज्ञान आणि इंटरनेट यांच्या अतिवापरासून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. विविध टूल्स वापरून पासवर्ड हॅक करणे, बँक किंवा शासकीय माहिती चोरणे, सोशल साइट्सवरील फोटोंचा गैरवापर करणे, असे अनेक प्रकार वारंवार उघड होत आहेत, असे मत सायबर तज्ञ ओंकार गंधे यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे 'सायबर सुरक्षा जनजागृती' या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी गंधे बोलत होते. नुकतीच पुणे विद्यापीठाची हॅक झालेली साईट हे अर्धवट ज्ञानातून घडलेला गुन्हा आहे, एखादी साइट हॅक केली तर त्यातून कायद्याने शिक्षा होतेच, हे ज्ञान आजच्या तरुण पिढीला व्हायला हवे, असेही ते म्हणाले. तसेच सामान्य नागरिकांना या टूल्सचे फारसे ज्ञान नसल्यामुळे स्मार्टफोनमधील माहितीदेखील चोरली जात आहे. अनेक साइट्स आणि अॅप्स धोकादायक आहे. नकळत झालेल्या चुका किंवा अर्धवट ज्ञानामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. तंत्रज्ञान काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. आजच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर सातत्याने वाढत असून त्याबाबत जनजागृतीपर व्याख्यानांची गरज समाजाला आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनीवाल, मनीष चिंधडे, निलेश सोनजे, पराग जोशी, संतोष साबळे, गौरव सामनेरकर आदी यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविधांगी चित्रांतून निसर्गाची उधळण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अॅक्रॅलिक कलरचा वैविध्यपूर्ण वापर, पारदर्शक जलतरंगात रेखाटलेली जलचित्रे, उन्हाळ्यातील सुंदरता अशा विविधांगी चित्रांनी नाशिककरांचे मन मोहून टाकले. निमित्त होते कुसुमाग्रज स्मारकमध्ये आयोजित निसर्गचित्र प्रदर्शनाचे.

वास्तुविशारद संजय पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. कलाकारानी साकारलेली कला पाहण्यासाठी रसिकजन नेहमीच आतुर असतात. त्यामुळे कलाकारांनाही हुरूप येतो. निसर्गचित्र प्रदर्शनातून निसर्गाच्या विविध बाजू साकारण्यात आल्या आहेत. चित्रकार कमलाकर शेवाळे व अविनाश वडघुले यांचे हे संयुक्त चित्र प्रदर्शन आहे. उष्णरंगसंगत, अॅक्रॅलिक कलरच्या माध्यमातून साकारलेली चित्रे या प्रदर्शनातून बघायला मिळत आहेत. अध्यक्षीय भाषणात संजय पाटील यांनी चित्रांचे कौतुक करीत दोन्ही चित्रकारांना शुभेच्छा दिल्या. मिलिंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटनाप्रसंगी चित्रकार अशोक धिवरे, अतुल भालेराव, राहुल भामरे, सुधीर सिंगणे, माजी नगरसेवक अमोल जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिझायनिंगसाठी तंत्रज्ञान ठरतेय वरदान

$
0
0

तंत्रज्ञान दिन लोगो वापरावा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

संगणकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे रोजागारांच्या संधींत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसेंदिवस प्रगत होत असलेल्या तंत्रज्ञानाला कल्पकतेची जोड देऊन अनेक युवक स्वतःच्या उद्योग व्यवसायाकडे वळले आहेत. स्वत:ची कल्पकता आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून इंटेरियर डिझायनिंग आणि आऊटडोअर डिझायनिंगच्या क्षेत्राने रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून दिल्या आहे.

तंत्रज्ञानात प्रगती झाल्याने व्यवसायाच्या अमाप संधी उपलब्ध झाल्या आहेत. संगणकीय तंत्रज्ञान आणि कल्पकता यांचा वापर करून डिझायनिंगच्या क्षेत्रात मोठी उलाढाल होताना दिसून येत आहे. बांधकाम व्यवसाय, हॉटेल्स, साईन बोर्ड, नेमप्लेट्स, शोभेच्या वस्तू, झुंबर, लॅम्प, ट्रॉफी, फर्निचर, प्लास्टिक व काचेच्या वस्तू यांसारख्या क्षेत्रात सध्या तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होऊ लागला आहे. इंजिनीअरिंगच्या क्षेत्रातील बहुतेक युवक-युवती या क्षेत्रात आपले नशिब आजमावताना दिसू लागले आहेत. तंत्रशुद्ध ज्ञान, तंत्रज्ञान आणि कल्पकतेच्या जोरावर डिझायनिंगच्या क्षेत्रातील करियरला अच्छे दिन आल्याचे बाजारात दिसून येते. ॲक्रेलिक, फोम, वुड, रबर, टिन, काच या सेक्टरमध्ये विविध प्रकारच्या डिझायनिंग सध्या बाजारात दिसून येत आहेत. एलईडी दिशादर्शक फलक, सर्व्हिस बोर्ड, साइन बोर्ड लेझर तंत्रज्ञानाच्या आधारे तयार होताना दिसून येत आहेत. केंद्र सरकारच्या डिजिटल धोरणालाही तंत्रज्ञानावर आधारित या व्यवसायाशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहारांसाठी 'भीम ॲप'चा वापर वाढल्याने व्यवहारांतील सुरक्षितता वाढली आहे. विविध बांधकाम साइट्स, शासकीय कार्यालये, हॉटेल्स, कंपन्यांकडूनही लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून डिझाइन केलेल्या कामाला मोठी मागणी येऊ लागली आहे.

लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून एलईडी कामास मोठी मागणी वाढली आहे. इंटेरियर आणि आऊटडोअर डिझायनिंगच्या क्षेत्रात करिअरला आजही मोठा वाव आहे. स्वतःची कल्पकता आणि मार्केटची गरज याची सांगड घालणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानात दररोज सुधारणा होत असते.

- संदीप शिरोळे, लक्ष्मी एंटरप्रायजेस

पूर्वी रंगकाम किंवा रेडियमचा वापर करून हाताने डिझाइन केले जात असे. आता लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून ॲक्रेलिक वर्कमध्ये डिझाइन मिळते.

- गणेश खर्जुल, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिपीन गांधींना अखेरचा निरोप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

रेल्वे प्रवाशांसाठी आपले आयुष्य समर्पित करणारे रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांना साश्रू नयनांनी गुरुवारी अखेरचा निरोप देण्यात आला. गुजरातच्या भूजमधील बिदडा या त्यांच्या जन्मगावी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा राजेश गांधी यांनी अग्नीडाग दिला. यावेळी बिपीन गांधी यांचे कुटुंबीय, मित्र परिवार, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भगीरथ प्रयत्न करून बिपीन गांधी यांनी २२ डब्यांची संपूर्ण पंचवटी ट्रेन नाशिककारांना मिळवून दिली. बुधवारी (दि. १०) सकाळी सव्वासातच्या सुमारास नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यापूर्वीच प्लॅटफार्मवर हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्यांचे पार्थिव देवळाली कॅम्पमधील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. तेथे अंत्यदर्शनासाठी गर्दी झाली होती. नंतर हे पार्थिव बिदडा येथे रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आले. बिपीन गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी पंचवटी ट्रेन आणि देवळाली कॅम्प येथे लवकरच शोकसभा होणार असल्याची माहिती त्यांचे सहकारी गुरुमितसिंग रावल यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवस्थान परिषदेसाठी २९ मेस निवडणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर निवडून आलेल्या सदस्यांमधून व्यवस्थापन परिषदेवर निवडून द्यावयाच्या दोन सदस्यासाठी २९ मे रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी भ. भा. पाटील यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर इलेक्शन पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्या परिषदेतील शिक्षकांमधून एक आणि महिलांमधून एक अशा दोन जागा व्यवस्थापन परिषदेसाठी निवडून द्यावयाच्या आहेत.

निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज १८ मे पर्यंत दाखल करता येतील. २१ मे रोजी या अर्जांची छाननी होऊन पात्र व अपात्र उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जातील. २२ मे रोजी दुपारी १२.३० पर्यंत या यादीवर आक्षेप घेता येतील. २४ मे रोजी कुलगुरू या अपिलावर निर्णय देतील. २५ मे रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. याच दिवशी निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. २९ मे रोजी दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत निवडणूक होणार असून, दुपारी २.३० नंतर मतमोजणीला प्रारंभ होईल. याच दिवशी निकाल घोषित केला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता दर आठवड्याला इंदिरानगरला या…...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

आयुक्त साहेब, तुम्ही दर आठवड्याला आमच्या इंदिरानगरला आले पाहिजे, अशी भावना सध्या इंदिरानगरवासीय सध्या व्यक्त करीत आहेत आणि त्याचे कारण आहे इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकची कधी नव्हे, ती होणारी साफसफाई…

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर हा कार्यक्रम शनिवारी (दि. १२) सकाळी साडेसहा वाजता इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर होणार आहे. त्यासाठी या परिसराची दिवस-रात्र साफसफाई सुरू असल्याचे चित्र आहे. महापालिकेने येथे जॉगिंग ट्रॅक उभारला त्या ठिकाणी म्युझिक सिस्टीमसुद्धा लावली. मात्र, नंतर देखभालीकडे दुर्लक्ष केले गेले. या ट्रॅकवर सकाळी व सायंकाळी मोठ्या संख्येने व्यायामप्रेमी आवर्जून हजेरी लावतात. येथील ग्रीन जिमचाही चांगला वापर होतो. मात्र, या ठिकाणी स्वच्छता विभागाचे कर्मचारी फिरकतच नसल्याने ट्रॅकच्या कडेला पालापाचोळा, केर-कचरा मोठ्या प्रमाणावर साचलेला दिसतो. अनेकदा ट्रॅकवर येणारे नागरिकच या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवीत असतात. या ट्रॅकच्या देखभालीकडे प्रशासन अन् नगरसेवकांचेही दुर्लक्ष झाल्यामुळे त्याला अवकळा आलेली आहे. मात्र, आता खुद्द आयुक्त येथे येत असल्याने येथील पालापाचोळा उचलण्याबरोबरच येथे चक्क जेसीबी आणून स्वच्छता करण्यात येत आहे. या सर्व प्रकारामुळे इंदिरानगरच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आता आयुक्तांनी दर आठवड्यालाच या परिसरात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

--

सायबर क्राईमबाबत कॉलेजांत प्रबोधन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाळी सत्रातील सुट्या संपून नववर्षातील सत्र सुरू होताच शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये सायबर क्राईमबाबत प्रबोधनपर उपक्रम राबविण्याचा निर्णय पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी घेतला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ई मेल आयडी हॅक करून प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकराची पुनरावृत्ती भविष्यात पुन्हा होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांचे सायबर क्राईमबाबत प्रबोधन करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनीच पुणे विद्यापीठाचे ई मेल अकाऊंट हॅक करीत पेपर फोडला होता. ही फोडलेली प्रश्नपत्रिका सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली होती. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा आहे. टेक्नॉसॅव्ही बनलेल्या नवीन पिढीला हॅकिंगसारख्या गोष्टींबाबत सुप्त आकर्षण वाटत असेल, तर ते त्यांच्या भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते. केवळ विद्यापीठच नाही, तर कुठल्याही प्रकारची वेबसाइट हॅक करणे किती धोकादायक असू शकते, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे. प्रामुख्याने शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्राधान्याने कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी हे सत्र आयोजित करण्यात येणार आहे. आयटी कायद्यांमध्ये या गुन्ह्यांसाठी असणारी तरतूद, अशा प्रकारच्या घटनांचे समाजावर होणारे परिणामही या सत्रातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जाणार आहेत. गेल्या वर्षभरात शहरातील सुमारे ४० शैक्षणिक संस्थांमधून सुमारे २० हजार विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही हा विषय घेऊन यापूर्वीच पोहोचलो आहोत. पण, अलीकडची घटना बघितल्यानंतर या प्रकारच्या उपक्रमांची अद्यापही आवश्यकता असल्याचे पोलिसांना वाटते, असेही आयुक्त डॉ. सिंगल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरबसल्या कळणार विद्यार्थ्यांची प्रगती

$
0
0

काकाणी शाळेत पॉकेट अॅप कार्यन्वित

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनी तंत्रज्ञानाची कास धरत आपला नावलौकिक वाढला असून, आता शहरातील शाळादेखील यास अपवाद राहिलेल्या नाहीत. येथील मालेगाव एज्यु. सोसा. संचालित काकाणी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पॉकेट स्कूल या शैक्षणिक अॅपचा वापर सुरू केला आहे.

या अॅप सुरू करण्यात आले असून यावेळी संस्थेचे चेअरमन नितीन पोफळे, सहसचिव सतीष कलंत्री, प्रकाश दातार, विजय कुलकर्णी, भोगीलाल पटेल, प्राचार्य तुकाराम मांडवडे उपस्थित होते. पॉकेट स्कूल अॅपच्या माध्यमातून शिक्षकांनी दिलेले गृहपाठ, परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम, विद्यार्थ्याची प्रगती, शालेय उपस्थिती, विविध सूचना पालकांना घरबसल्या मिळणार आहेत.

हे अॅप म्हणजे पालक, विद्यार्थी, शाळा यांच्यातील दुवा म्हणून काम करणार आहे. पालकांनी या अॅपचा वापर करावा, असे आवाहन चेअरमन पोफळे यांनी केले. कलंत्री यांनी आधुनिक तंत्रज्ञांनाची जोड देवून व विद्यार्थी केंद्रबिंदू मानून या अॅपची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले. पुणे येथील बाबुराव व्हनकोळ व प्रियानं कोतकर यांनी अॅप कसे वापरावे याविषयी मार्गदर्शन केले.

सीसीटीव्ही कार्यान्वित

संस्थेने शाळेतील विद्यार्थ्यांचा सुरक्षेला प्राधान्य देवून ६५ सीसीटीव्ही कार्यान्वित केले आहेत. तयाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष विलास पुरोहित व विजय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआयडीसी’चा विस्तार

$
0
0

दिंडोरी, सिन्नरमध्ये सर्वाधिक मागणी; गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी व सिन्नर येथे औद्योगिक गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात जागेची मागणी असून या ठिकाणी अतिरिक्त एमआयडीसी निर्माण केली जाणार असल्याची माहिती औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांनी दिली. त्यासाठी काही जागेची पाहणी केली असून भविष्यात या ठिकाणी फोकस केला जाणार असल्याचेही ते म्हणाले.

नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी भेट दिल्या. त्यानंतर उद्योजकांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, की पूर्वी नाशिकला मुंबई, पुणे हेच स्पर्धक होते. आता नागपूर व औरंगाबाद येथेही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. त्यामुळे नाशिकला सुद्धा औद्योगिक गुंतवणूक व्हावी, यासाठी जागा उपलब्ध करून देणे व उद्योजकांचे प्रश्न सोडवणे या प्रश्नावर चर्चा झाली. त्यात काही जागेची पाहणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

दिंडोरी तालुक्यात अगोदरच एक एमआयडीसी आहे. त्यानंतर तळेगाव-अक्राळेंचे काम पूर्णत्वाकडे आहे. या व्यतिरिक्त येथे अतिरिक्त एमआयडीसी होणार आहे. तसेच सिन्नर येथे औद्योगिक सहकारी वसाहत, एमआयडीसी व एसीझेड आहे. त्याव्यतिरिक्त जागा संपादित करून नवीन एमआयडीसी केली जाणार आहे. यावेळी त्यांनी मालेगाव येथे केंद्राच्या योजनेचा फायदा मिळावा यासाठी उद्योजकांनी चार उद्योगांनी एकत्र येऊन कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, एमआयडीकडून त्यांना परवानगी हवी आहे. आम्ही आजपर्यंत स्वतंत्र प्लॉटधारक व क्लस्टरला परवानगी देतो. पण, यासाठी धोरणात बदल करावा लागेल व त्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उद्योजकांच्या बैठकीत झालेली चर्चा व त्यानंतर एमआयडीसी काय करणार याची माहिती दिली. यावेळी उद्योग सह संचालक पी. पी. देशमुख, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील-भामरे उपस्थित होते.

प्लॉट वाटप महिनाभरानंतर

दिंडोरी येथील औद्योगिक विकास महामंडळाचे तळेगाव-अक्राळे येथील प्लॉटचे इन्फास्ट्रक्चरचे काम महिनाभरापर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर त्याचे वाटप केले जाणार आहे. उर्वरित जागा संपादन करण्याचे कामही सुरू असल्याचे 'एमआयडीसी' मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images