Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

ही तर उद्याची रंगभूमी...!

$
0
0

अभिनेता भरत जाधव यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या कलाकारांनी घडवलेले नाट्याविष्कार राज्यभरात गाजत असून, मुंबईतील अभिनेत्यांनाही नाशिकच्या कलाकरांचा अभिमान वाटतो. या बालनाट्य स्पर्धेत सादर होणारी नाटके देखील अगदी व्यावसायिक प्रयोगांप्रमाणे सादर होत आहेत. त्यामुळे बालनाट्यातून धडपडत शिकणारा कलाकार हीच उद्याची रंगभूमी आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेता भरत जाधव यांनी केले. बालनाट्य स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि सुविचार हॉस्पिटल यांच्यातर्फे बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी पाच वाजता झाले. यावेळी ते बोलत होते. स्पर्धेचे यंदा तिसरे वर्ष असून, कालिदास कलामंदिरात ही स्पर्धा होत आहे. उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, सुविचार हॉस्पिटलचे संचालक डॉ. अविनाश आंधळे हे प्रमुख पाहुणे, तर नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनिल ढगे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, माजी नगरसेवक शैलेश ढगे, जयप्रकाश जातेगांवकर, परीक्षक डॉ. राजीव पाठक, प्रणव प्रभाकर आणि श्रिया जोशी पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रख्यात सिनेनाट्य अभिनेते रमेश भाटकर यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

रसिकांशी संवाद साधताना भरत जा‌धव म्हणाले, की नाशिक हे रंगभूमीचे माहेरघर असून, नवोदित कलाकार उत्कृष्ट नाट्यविष्कार सादर करत आहेत. त्यामुळे नाट्य परिषेदेने पुढील स्पर्धांच्या वेळी शहरातील नवोदित आणि उत्तम कलाकृती सादर केलेल्या रंगकर्मीला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करणे गरजेचे आहे. आजच्या नव्या कलाकारांना प्रोत्साहन मिळेल तेव्हा भविष्यातील रंगभूमी बळकट होईल. तसेच बालनाट्य व्यावसायिक दृष्टीकोनातून सादर केली जाऊ लागली आहेत. ही अतिशय अभिमानास्पद बाब असून, व्यावसायिक पणा हा पैशात नव्हे तर आत्मविश्वासात यावा. जेणेकरून बाल कलाकारांमध्ये रंगभूमीची उत्कंठा अधिकाधिक वाढेल, असे ते म्हणाले. स्पर्धेत सादर झालेल्या बालनाट्य संघांना गौरविण्यात आले. सुनील ढगे यांनी प्रास्ताविक केले. ईश्वर जगताप यांनी आभार मांडले.

\Bरसिकांनो, प्रेक्षक आणा!

\Bबालनाट्य स्पर्धेत बाल कलाकार जेव्हा कला सादर करतो, तेव्हा त्याला कौतुकाची आणि शाबासकीची अपेक्षा असते. त्यामुळे बालनाट्य स्पर्धेला प्रेक्षकांची गर्दी असणे आवश्यक आहे. अन्यथा, रिकाम्या खुर्च्या आणि न मिळणारी दाद बाल कलाकाराच्या मनात घर करू शकते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ढासाळू शकतो. म्हणून, बालनाट्य सादर करणाऱ्या संस्थांनी आणि रसिकांनी नाट्यगृहात प्रेक्षकांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत अभिनेता भरत जाधव यांनी मांडले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण गुरुवारी (दि. ७) रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे.

\Bआज सादर होणारी बालनाट्ये

\Bमोल अनमोल - प्रबोधिनी विद्यामंदिर

आम्हाला पण शाळा पाहिजे - म.गांधी हायस्कूल, इगतपुरी

बापू एक खोज - समिज्ञा फाउंडेशन

देवाचं दान - कृपा शैक्षणिक सामाजिक संस्था

ताटी उघड - विद्या प्रबोधिनी प्रशाळा

माँ - नाट्यसेवा

..

फोटो : पंकज चांडोले

लोगो : बालनाट्य स्पर्धा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांनी मागविले कामाचे शेड्युल

$
0
0

पोलिसांनी मागविले कामाचे शेड्युल

स्मार्ट रोडचे काम रेंगाळल्याचा सर्वाधिक ताण वाहतुकीचे नियोजन करणाऱ्या पोलिसांवर येऊन पडल्याने पोलिसांनीही आता कंत्राटदाराला कात्रीत पकडण्यास सुरूवात केली आहे. वाहतुकीच्या नियोजनाद्वारे नागरिकांची गैरसोय टाळता यावी याकरीता या कामाचे शेड्युल तातडीने सादर करा, अशा सूचना कंत्राटदाराला करण्यात आल्या आहेत. स्मार्ट रोडच्या कामासाठी अत्यंत वर्दळीचे मेहेर आणि सीबीएस हे दोन चौकही काही दिवसांनी वाहतुकीसाठी बंद करावे लागणार असल्याने त्यावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी आतापासून पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. हेमलता पाटील समन्वयकपदी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांना आता महिला संघटन वाढवण्यासाठी उत्तर महाराष्ट्र समन्वयकाची नवीन जबाबदारी काँग्रेसने दिली आहे. त्यांची ही नियुक्ती नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यासाठी करण्यात आली आहे. याअगोदर पाटील यांच्याकडे जळगाव जिल्ह्याची प्रभारीपदाची जबाबदारी होती.

महिलांचे संघटन वाढविण्याबरोबरच डॉ. पाटील यांना काँग्रेसचे असलेले विविध सेल मजबूत करण्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसचे डॉक्टर सेल, लिगल सेल, प्रोफेशनल सेल यांची कार्यकारणी तयार करणे, पदाधिकारी निवड करणे यासारखे कामही त्यांच्यावर सोपविण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांची जबाबदारी मिळाल्यामुळे डॉ. हेमलता पाटील यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्राचे निरीक्षक वामसी चांद रेड्डी यांनी ही नियुक्ती केली असून, तसे पत्र डॉ. पाटील यांना दिले आहे. महिला संघटना वाढवितांना बुथ लेव्हल, तालुका लेव्हल बरोबरच काँग्रसने निश्चित केलेले प्रोग्राम घेण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महिलांचे संघटन मजबूत होईल, असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नर ग्रामीण रुग्णालय सज्ज

$
0
0

अपघातग्रस्तांसह परिसरातील नागरिकांना दिलासा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर येथे ३० खाटांचे अद्ययावत रुग्णालय सज्ज झाले असून लवकरच ते सेवेत रुजू होण्याची चिन्हे आहेत. या रुग्णालयामुळे महामार्गांवरील अपघातग्रस्तांसह सिन्नर परिसरातील रुग्णांना त्याचा लाभ मिळणार आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक पदांना यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. फर्निचर आणि अन्य सुविधा उपलब्ध झाल्यानंतर हे रुग्णालय सेवेत येणार आहे.

घोटी-सिन्नर, नाशिक-सिन्नर, सिन्नर-शिर्डी, सिन्नर-संगमनेर असे विविध महामार्ग सिन्नर तालुक्यातून जातात. शिर्डीकडे पायी जाणाऱ्या पालख्या, भाविक यांची संख्याही मोठी आहे. परिणामी, सिन्नर तालुक्यात अपघातांचे प्रमाण अधिक आहे. अपघातातील जखमींना उपाचारासाठी ३० किलोमीटरवर थेट नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणावे लागते. अनेकदा तर वेळेत उपचार न मिळाल्याने अपघातग्रस्त दगावतात. त्यामुळे सिन्नर येथे अद्ययावत असे ग्रामीण रुग्णालय साकारण्यात यावे, अशी मागणी होती. अखेर त्यास यश आले आहे.

परिसरातील काही गर्भवती महिलांची गुंतागुंतीची प्रसुती योग्य पद्धतीने होण्यासाठी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविले जाते. मात्र, सिन्नर ग्रामीण रुग्णालयात सिझेरियनची सुविधा उपलब्ध होणार आहे. गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टरची सुविधा या रुग्णालयात राहणार असल्याची माहिती सिन्नर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रशांत खैरनार यांनी दिली आहे. महामार्गांवरील अपघातानंतर अॅम्ब्युलन्सद्वारे आता थेट अपघातग्रस्तांना या रुग्णालयात आणले जाणार आहे.

लवकरच भरती प्रक्रिया

ग्रामीण रुग्णालयाची इमारत बांधून सज्ज असून आता तेथे आवश्यक ती उपकरणे आणि फर्निचरची उपलब्धता होणे गरजेची आहे. रुग्णालयासाठी लागणाऱ्या पदांना सरकारी पातळीवर मंजुरी यापूर्वीच मिळाली असून त्याची भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच हे रुग्णालय सेवेत येणार आहे. इमारतीला लागणारा वीज पुरवठा व पाण्याची वाहिनीही जोडण्यात आली आहे.

रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदेही मंजूर आहेत. वैद्यकीय उपकरणे आणि अन्य सुविधा उपलब्ध होताच रुग्णालय सुरू होईल.

- सुरेश जगदाळे, सिव्हिल सर्जन

लोगो : शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा कृषी महोत्सव आजपासून

$
0
0

कृषी विभागातर्फे गोल्फ क्लब येथे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांनी पिकविलेला माल थेट ग्राहकांना उपलब्ध व्हावा, यशस्वी शेतकऱ्यांची यशोगाथा इतरांपर्यंत पोहोचून त्यांनाही प्रेरणा मिळावी या उद्देशाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने गुरुवारी (दि. ७) जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गोल्फ क्लब मैदान येथे दुपारी दोन वाजता महोत्सवाचे उद्घाटन होईल. महोत्सव ११ पर्यंत सुरू राहणार आहे.

जिल्ह्यात अनेक शेतकरी, शेतकरी गट शेतीमध्ये प्रयोग करीत असतात. परंतु, हे प्रयोग त्यांच्यापुरतेच मर्यादित राहतात. प्रयोगशील शेतकऱ्यांची त्यांच्या उत्पादनांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी या उद्देशाने यंदाही कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी दुपारी दोन वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यात यंदा २१४ स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये सेंद्रीय भाजीपाला, फळे, हातसडीच्या तांदळासह सर्व प्रकारचा तांदूळ, कडधान्य, बचत गटांनी तयार केलेले रुचकर खाद्यपदार्थ ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. याखेरीज शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी विविध विषयांवर परिसंवाद घेतले जाणार आहेत.

सेंद्रिय शेती, गट शेती व शेतकरी उत्पादक कंपन्या या विषयावर शुक्रवारी (दि. ८) परिसंवाद होईल. खरेदीदार व विक्रेता यांचे संमेलन शनिवारी (दि. ९), कांदा व भाजीपाला पिक परिसंवाद रविवारी (दि. १०), द्राक्ष, डाळींब व कृषी यांत्रिकीकरण या विषयावर सोमवारी (दि.११) परिसंवाद होतील. सकाळी ११ ते दुपारी दोन या काळात परिसंवाद होणार असून त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ त्यामध्ये सहभागी होणार आहेत.

सरकारी विभागांचेही स्टॉल्स

महोत्सव सकाळी १० ते सायंकाळी सात या वेळेत सर्वांसाठी खुला असेल. त्यामध्ये सरकारी विभागांचे ४८ स्टॉल्स असतील. त्यात सरकारी योजनांची माहिती दिली जाणार आहे. धान्य महोत्सवाचे ४०, कृषी तंत्रज्ञान व सिंचनाशी संबंधित ४८, शेती अवजारांचे १०, खाद्य पदार्थांचे २०, गृहोपयोगी वस्तूंचे ४८ स्टॉल्स असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजी स्टेडियमचा होणार कायापालट

$
0
0

अद्ययावतीसाठी सहा कोटींच्या निविदा प्रसिद्ध

...

- खेळाडूंसाठी अद्ययावत होस्टेल उभारणार

- संपूर्ण स्टेडियममध्ये छत टाकणार

- लॉन टेनिसचे ग्राऊंड तयार करणार

- बास्केटबॉलचे प्रशिक्षणही घेता येणार

…..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिडको येथील संभाजी स्टेडियमचा लवकरच कायापालट होणार आहे. या ठिकाणी अद्ययावत क्रीडा संकुल तयार करण्यासाठी नाशिक महापालिकेने सहा कोटी रुपयांची निविदा काढली आहे. हे काम केंद्र सरकार व महापालिका यांच्या संयुक्त निधीतून होणार आहे.

नाशिक शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना शहरात विविध प्रकारच्या सोयी सुविधा असणे गरजेचे आहे. त्याच पार्श्वभूमीवर सिडको येथील क्रीडा संकुलाचा कायापालट केला जात आहे. हे क्रीडा संकुल अनेक वर्षांपासून बांधून तयार आहे. मात्र त्याचा वापर होत नसल्याने अनेक गैरसोयी होत्या. केंद्र सरकारचे क्रीडा मंत्रालय व महापालिका या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी क्रीडांगणाची पाहणी करून या ठिकाणी कोणत्या सुविधा देता येतील, याचा आढावा घेतला होता. त्यानंतर हा अहवाल केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाला पाठवून खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून या क्रीडांगणासाठी सहा कोटी रुपये मंजूर झाले. यातील कामे ही टप्प्याटप्प्याने होणार आहेत. या ठिकाणी स्पोर्ट्स अॅकेडमी प्रस्तावित असून, विविध खेळांचे प्रशिक्षण केंद्र साकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बाहेरगावाहून नाशिक येथे क्रीडा प्रशिक्षणासाठी येणाऱ्या खेळाडूंच्या निवासाची सोय व्हावी, याकरिता येथे अद्ययावत होस्टेल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आदिवासी भागातून येणाऱ्या खेळाडूंच्या निवासाचा प्रश्न सुटणार आहे. सध्याच्या स्टेडियममध्ये ज्या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी आहे, त्या ठिकाणी छत नसल्याने उन्हाळ्यात व पावसाळ्यात प्रेक्षकांना बसता येत नव्हते, त्याकरिता संपूर्ण स्टेडियममध्ये छत टाकण्यात येणार आहे. नाशिक शहरात लॉन टेनिस खेळाचे ग्राऊंड अत्यल्प आहेत. सिडको परिसरात ग्राऊंड नसल्याने तेथील खेळाडूंना नाशिक शहरात येऊन सराव करावा लागतो. या ठिकाणी लॉन टेनिसचे ग्राऊंड तयार केले जाणार असल्याने खेळाडूची गैरसोय टळणार आहे. बास्केटबॉलचे प्रशिक्षणदेखील खेळाडूंना घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौरव ओझा एसएसबी उत्तीर्ण

$
0
0

नाशिक : सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला करियर अॅकॅडमीचा गौरव ओझा हा विद्यार्थी एसएसबी अर्थात सशस्त्र सीमा बल परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. काही वर्षांपासून गौरवने सैन्यात जाण्याचे स्वप्न पाहत त्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. सैन्यात अधिकारी व्हावे यासाठी त्याच्या पालकांनीही त्याला नेहमी प्रोत्साहन दिले आहे. त्याला पंकज पाठक व भावसार यांचे मार्गदशन लाभले.

अभ्यासाबरोबर विविध खेळात उत्तम प्राविण्य मिळवणारा विद्यार्थी असल्याचे गौरवच्या शिक्षकांनी सांगितले. यापूर्वीही तो एनडीएच्या लेखी परीक्षेत नोव्हेंबर २०१८ला उत्तीर्ण झाला आहे. एसएसबी व एनडीए या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणारा विद्यार्थी म्हणून संस्थेत त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. वैद्यकीय चाचणीनंतर तो 'एनडीए'मध्ये दाखल होणार आहे.

संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर आणि कार्यवाह हेमंत देशपांडे यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यवधींची जमीन परस्पर लाटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बनावट वाटणीपत्र आणि संमतीपत्राच्या आधारे एका दाम्पत्याने भिवंडी येथील वृद्धाची कोट्यवधी रुपयांची जमीन परस्पर लाटल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. तिडके कॉलनीत राहणाऱ्या एका दाम्पत्यासह अन्य एका संशयितावर सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडी येथे अंजूर फाट्यालगत राहणाऱ्या शंकरलाल रामेश्‍वर गुप्ता (वय ६०) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित हरिष ऊर्फ हरेश पारसनाथ गुप्ता (रा. गुप्ता बंगला, कुलकर्णी गार्डन, कॉलेज रोड, नाशिक) व वैशाली हरिष ऊर्फ हरेश गुप्ता (वय ४२, रा. गौरव हाऊस, चांडक सर्कलजवळ, तिडके कॉलनी, नाशिक) या दाम्पत्यासह भूषण सानप यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शंकरलाल गुप्ता यांची गंगापूर शिवारात दोन हेक्टरहून अधिक मालकी व कब्जे वहिवाटीची जमीन आहे. संशयितांनी संगनमताने नाशिक तहसील कार्यालय तसेच मेघदूत शॉपिंग सेंटर येथे गुप्ता यांच्या मालकीची जमीन स्वत:च्या नावे करून घेण्यासाठी बनावट वाटणी व संमतीपत्र २८ मार्च २०१६ रोजी तयार करून घेतले. त्यानंतर जमिनीची वाटणी करून मिळण्याबाबतचा अर्ज तयार करून त्यावर गुप्ता यांची खोटी स्वाक्षरी केली. ही कागदपत्रे ६ मे २०१६ रोजी नाशिक तहसील कार्यालयात सादर केली. नाशिक तहसीलदारांनी ही जमीन वाटणी व वाटपाबाबत ७ मे २०१६ रोजी तातडीने मूळ जमीनमालक शंकरलाल गुप्ता व संशयित हरिष आणि वैशाली सानप या दाम्पत्याच्या नावाने नोटीस काढली. ही नोटीस शंकरलाल गुप्ता यांना मिळाली नसतानाही संशयित दाम्पत्याने शंकरलाल गुप्ता हे नाशिक तहसील कार्यालयात १० मे २०१६ रोजी हजर असल्याचे भासवित रोजनाम्यावर गुप्ता यांची बनावट स्वाक्षरी केली. सदरचे क्षेत्र संशयित हरिष गुप्ता याच्या नावावर केल्याचे आदेश तहसीलदारांनी १८ मे २०१६ रोजी काढले. त्यानुसार संशयितांनी बनावट कागदपत्रे बनवून, तसेच मूळमालकाची जमीन लाटून ती नावावर करून घेत काही क्षेत्राची विक्री करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीड कोटी रुपयांचाविदेशी मद्यसाठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य उत्पादन शुल्कच्या नाशिक विभागाच्या भरारी पथकाने सुमारे दीड कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. चाळीसगाव तालुक्यातील धुळे-औरंगाबाद रोडवरील मेहुणबारे येथे ही कारवाई करण्यात आली. भारताबाहेरील देशांत विक्रीस परवानगी असलेला अवैध मद्यसाठा आणि हा साठा वाहून नेणारा कंटेनर जप्त करण्यात आला असून, पाच संशयितांना अटक केली आहे. त्यामध्ये या प्रकरणी असलम अली महमंद खान, मोहंमद समिम अब्दुल गफूर, खुर्शीद सरीफ खान आणि शौकीन इदू खान (चौघे रा. हरयाणा), रवींद्र हिमंतसिंग पावरा (रा. नंदुरबार) यांचा समावेश आहे.

कंटेनरमध्ये केवळ परदेशात विक्रीस परवानगी असलेला मद्यसाठा आढळून आला. मालेगाव निरीक्षक कार्यालयात मद्याचे मोजमाप करण्यात आले असून, संशयितांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, तसेच द महाराष्ट्र थेट वाहतूक नियम १९९७ चे नियम ३ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. कंटेनरसह त्यामधील कोट्यवधींचा अवैध मद्यसाठाही जप्त केला. त्यामध्ये परदेशात विक्रीस परवानगी असलेले ७५० मिली क्षमतेचे १५०० बॉक्स आणि इतर मद्याच्या २४ बाटल्या असा एकूण एक कोटी ४२ लाख दोन हजार ९१२ रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. उपायुक्त प्रसाद सुर्वे, जळगावचे अधीक्षक सुधीर आढाव, धुळ्याचे अधीक्षक मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखालील भरारी पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे मालधक्का कामगारांचा तिढा कायम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

कार्टिंग एजंटच्या मक्तेदारीतून नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावर उद्भवलेल्या वादातून न्यू हैदराबाद मेडक ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कामाला स्थानिक कामगारांनी विरोध केल्याने बुधवारी (दि. ६) या परप्रांतीय कंपनीला परजिल्ह्यातून कामगार आणण्याची नामुष्की ओढवली. मात्र मालट्रकचालकांना स्थानिक कामगारांनी धमकावत चार गाड्यांचे नुकसान केल्याने मालट्रक माघारी गेल्याचा आरोप कंपनी प्रतिनिधी बद्रुद्दीन यांनी केला आहे. परिणामी रेकमधील २ हजार ६०० मेट्रिक टन धान्य रेल्वे मालधक्क्यावरच पडून राहिले.

नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावरील शासकीय धान्य पुरवठ्याचा ठेका ऑनलाइन पद्धतीने न्यू हैदराबाद मेडक ट्रान्सपोर्ट कंपनीने मिळवला आहे. गेल्या काही वर्षांपासून हा ठेका स्थानिक कार्टिंग एजंटांनाच मिळत होता. त्यामुळे परराज्यातील या कंपनीला स्थानिक कार्टिंग एजंटांनी सक्त विरोध दर्शविला आहे. कामगारांनाही स्थानिक कार्टिंग एजंटांनी कामगार उपायुक्तांकडे यापूर्वी नोंदविलेल्या एका कराराच्या आधारे या नवीन कंपनीचे काम करण्यावर आक्षेप घेतला आहे. परिणामी घाबरलेल्या कामगारांनीही या नवीन परप्रांतीय कंपनीचे काम करण्यास असमर्थता दर्शविली आहे. काही दिवसांपूर्वीच या कंपनीचा एक रेक नाशिकरोड मालधक्क्यावर आला असता, स्थानिक कामगारांनी या कामास विरोध दर्शविला होता. त्यावेळीही मोठा तणाव निर्माण झाला होता. या कंपनीने बाहेरून कामगार आणून काम करावे, असा निर्णय कामगार उपायुक्तांनी दिल्याने या वादावर पडदा पडला होता. त्यानुसार बुधवारी या कंपनीचा एक रेक मालधक्क्यावर आला. त्यात एकूण ५३ हजार २२३ पोती धान्य होते. या रेकमधील माल खाली करून मालट्रकमध्ये भरण्यासाठी या कंपनीने औरंगाबाद, जालना आणि परभणी येथून १७५ कामगार आणले होते. या कामगारांनी रेक मालधक्क्यात खाली केला. परंतु, बाहेरून आणलेल्या मालट्रकचालकांना स्थानिक कामगारांनी पहाटेच्या सुमारास धमकावत त्यांच्या गाड्यांवर दगडफेक केली. त्यामुळे घाबरलेल्या या मालट्रकचालकांनी माघारी निघून जाणे पसंत केले. काही मालट्रक सिन्नर फाटा येथेच थांबून होते. त्यामुळे धान्य मालधक्क्यावरच पडून राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमएसएमई’चे उद्योजक शिबीर उद्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एमएसएमई सपोर्ट प्रोग्रॅम अंतर्गत निमाच्या सातपूर येथील सभागृहात शुक्रवारी (दि. ८) दुपारी १ वाजता उद्योजकता शिबीर होणार आहे. यात विविध बँकांचे अधिकारी उपस्थित असणार आहेत. उद्योजकांनी आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक बाळासाहेब टावरे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी भरत बर्वे, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष संजय महाजन यांनी शिबिरात सहभागी होण्याचे उद्योजकांना आवाहन केले आहे.

जिल्ह्यातील अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र तसेच उद्योग क्षेत्राशी संबंधित सर्व शासकीय कार्यालयातर्फे हे शिबिर घेतले जात आहे. बँक व उद्योजकांशी संबंधित शासकीय कार्यालयाने १०० दिवस उद्योजकांना शिबिराद्वारे मार्गदर्शन करावे, असे निर्देश पंतप्रधानांनी दिल्यानंतर जिल्ह्यात २१ शिबिरे घेण्यात आली.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांस चालना मिळावी यासाठी उद्योगाभिमुख अशा १२ योजना केंद्र सरकारने जाहीर केल्या. या योजनांचा लाभ गरजू व होतकरू उद्योजकांपर्यंत पोहोचून प्रगती साधण्यास सहाय्य्य व्हावे, यासाठी हे शिबिर घेण्यात आले. शिबिरासाठी उद्योजकांची प्रमुख संस्था असलेल्या 'निमा'ने संयोजन केले. त्यामुळेच सर्व बँकांनी यात सहभाग घेत २७ नोव्हेंबर व ८ फेब्रुवारी दरम्यान २१ शिबिरे घेतली. या सर्व शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अखेरचे शिबीर इच्छुक उद्योजक, महिला उद्योजिकांसाठी उपयोगी ठरणार असल्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ निधीपोटी ८५ कोटी प्राप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने ८५ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे. या निधीचे लवकरच शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने बुधवारी दिली.

जिल्ह्यातील आठ तालुके आणि १७ मंडळांचा दुष्काळी परिस्थितीत समावेश आहे. तेथील रहिवाशांना पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा सामना करावा लागत आहे. पाण्याअभावी हातची पिकेही गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळेच दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याअंतर्गत बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये तर कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी सहा हजार ८०० रुपये मदत दिली जाणार आहे. फळबागांसाठी हेक्टरी १६ हजार ८०० रुपये मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने पहिल्या टप्प्यात १७० कोटींचा निधी मंजूर केला असून त्यापैकी ८५ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या निधीचे लवकरच शेतकऱ्यांना वाटप केले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ रस्ता पावसाळ्यापूर्वीच

$
0
0

रुंदीकरण कामाला लवकरच होणार सुरुवात

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर विमानतळ ते मुंबई-आग्रा हायवे या दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे. त्यामुळे विमान प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सद्यस्थितीत केवळ एकाच बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ओझर येथील विमानतळावरून नवी दिल्ली, हैदराबाद आणि अहमदाबाद या तीन शहरांसाठीची सेवा सुरू झाली आहे. येत्या १३ फेब्रुवारीपासून आणखी एका कंपनीची अहमदाबाद सेवा सुरू होत आहे. त्यामुळे ओझर विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, मुंबई-आग्रा हायवे ते ओझर विमानतळ या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था आहे. एकूण पाच किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. दुतर्फा हा रस्ता विस्तारीत करण्याचे प्रस्तावित आहे. सध्या या रस्त्याची एकच बाजू वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. काही ठिकाणी कच्चा रस्ता आहे, तर काही ठिकाणी रस्ता अतिशय निमुळता आहे. त्यामुळे अवघ्या पाच किलोमीटरसाठी प्रवाशांना १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागत आहे. यामुळे विमान प्रवासासाठी जाणाऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा करूनही रस्त्याचे काम का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मध्यंतरी या रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी रखडल्याचे सांगितले जात होते. मात्र, या रस्त्याचे भूसंपादन पूर्ण झाले असून, कुठलीही अडचण नसल्याचे उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढून एका कंपनीला रस्त्याचे काम दिले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. येत्या काही दिवसांतच हे काम सुरू होणार असून मेपर्यंत ते पूर्ण होईल, असे किसवे यांनी स्पष्ट केले.

...

विविध संघटनांची मागणी

खड्डे आणि मातीच्या या रस्त्यामुळे उद्योजक चिंतेत आहेत. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी निमा, आयमा, क्रेडाई, नाशिक सिटिझन फोरम या संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाला यापूर्वीच केली आहे. हे काम करण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले.

...

विमानतळ ते हायवे या रस्त्याचे काम देण्यात आले आहे. येत्या मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यामुळे पावसाळ्यात कुठलीही अडचण राहणार नाही.

- राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आसरखेड्याततरुणाची आत्महत्या

$
0
0

चांदवड : तालुक्यातील आसरखेडे येथील तेजस नितीन बनकर (वय १८) या तरुणाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

आसरखेडे गावातील खांगळ वस्ती येथील पांडू साळवे यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या झाडाला गळफास लावून घेतला. बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास लक्षात आला. या घटनेची खबर पोलिसपाटील मनोज पाटील यांनी पोलिसात दिली. तेजस हा शिक्षणासाठी मामाच्या घरी राहत होता. याबाबत चांदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ नवविवाहितेचा मृत्यू शॉक लागल्यानेच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अशोकनगर, राधाकृष्णनगर भागातील अर्चना फापाळे या नवविवाहितेचा मृत्यू शॉक लागून झाल्याचे पूर्ण तपासणी केल्यानंतर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. जिन्याच्या वरील भागात पावसाचे पाणी पडू नये म्हणून भंगाराचे साहित्य ठेवण्यात आले होते. तेथेही वीजप्रवाह असलेल्या गजाला स्पर्श झाल्याने अर्चना यांना आपले प्राण गमवावे लागले.

अर्चना फापाळे यांचा मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शॉक लागून मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत महावितरणाच्या अधिकाऱ्यांसह अनेक जण संभ्रमात होते. अर्चना या कपडे वाळत टाकण्यासाठी गेल्या होत्या. उंच दोरीवर लोखंडी वस्तूच्या सहाय्याने कपडे टाकतांना त्यांना विजेचा शॉक लागल्याचे अनेकांनी सांगितले. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नव्हता. महावितरणची तांत्रिक निरिक्षण करणारी टीम बुधवारी दिवसभर अपघात नेमका कसा झाला असावा, याची माहिती घेत होती. अर्चना जिन्याच्या वरच्या बाजूवरील भंगार काढत असाव्यात, असा अंदाज महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. याबाबत त्यांनी शेजारी राहणाऱ्यांशी चर्चा करून माहितीही घेतली. यात भंगारातील लोखंडी गज जिन्यात पावसाचे पाणी येऊ नये म्हणून उभारण्यात आलेल्या जागेवरून उचलतांना विद्युत तारांना स्पर्श झाल्याने महिलेचा शॉक लागून मृत्यू झाल्याचा निष्कर्ष महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गझलप्रेमींसाठी उद्या खास पर्वणी

$
0
0

'होशवालों को खबर क्या' मैफलीचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सतारीच्या सुरावटीचा वेध घेत, एकेक स्वराची ओळख करून घेताना अन् जादुई स्वराविष्काराच्या भारावलेल्या वातावरणाची सुरेल मैफल प्रत्येक रसिकाला हवीहवीशी असते. संगीताने फुलून गेलेली एक अविस्मरणीय सायंकाळ नाशिककरांनी अनुभवावी, अशी 'होशवालों को खबर क्या...' ही गझल मैफल. गंगापूर रोडवरील सीएमसीएस कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी ६ वाजता ही मैफल होईल.

संगीताने भारावलेल्या वातावरणात रागातील स्वर, त्याचा विस्तार याचा बारकाईने उलगडा होतो अन् रसिकांना शुद्धसारंग रागाची सफर घडते. याची अनुभूती गझलप्रेमींना घेता यावी, यासाठी 'होशवालों को खबर क्या...' या गझल मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. पद्मभूषण स्वर्गीय जगजीतसिंह यांची ७८ वी जयंती आणि शायर पद्मश्री निदा फाजली यांचे तिसरे पुण्यस्मरण यानिमित्ताने ही मैफल होणार आहे. या कार्यक्रमाचे 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर आहे. पद्मभूषण सिंह आणि पद्मश्री फाजली यांनी गायलेल्या गझलांचे गायन प्रसाद गोखले आणि वीणा गोखले करणार आहेत. गौरव तांबे यांची तबला वादनाची सुरेल साथ मैफलीत असणार आहे. दीपक तरवडे हे कीबोर्ड, आशिष ठेकणे गिटार आणि सागर मोरस्कर तालवाद्यांची साद देणार आहेत. त्यांच्या जुगलबंदीचा अविष्कार मैफलीत रसिकांना श्रवण करता येणार आहे.

मैफलीचे सूत्रसंचालन शशांक कांबले करणार असून, ध्वनी संयोजन किरण गायधनी करणार आहेत. या मैफलीत रसिकांना 'होशवालों को खबर क्या, सफर में धूप तो होगी, किसका चेहरा अब मै देखू, जीवन क्या है, अपनी मर्जी से कहां, अब खुशी हैं ना, दुनिया जिसे कहते है, हर तरफ हर जगह बेशुमार आदमी, गरज बरस प्यासी धरती पर, दोहे, कहीं कहीं से हर चेहरा' या लोकप्रिय गझलांचे श्रवण करता येणार आहे. मैफलीत एक्सप्रेशन्स म्युझिक अकादमी आणि सिम्बॉयसिस शाळेचे विद्यार्थी देखील गझल प्रार्थना आणि दोहे सादर करतील. ही मैफल सर्वांसाठी विनामूल्य असून, रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे.

\B२९९ रुपयांत व्हा 'मटा कल्चर क्लब'चे सभासद\B

मनोरंजनाची पर्वणी अनुभवण्यासह विविध प्रकारच्या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी 'मटा कल्चर क्लब'चे सभासद व्हा. आता फक्त २९९ रुपयांत 'मटा कल्चर क्लब'चे सभासद होण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. 'मटा'च्या कार्यालयात किंवा www.mtcultureclub.com या वेबसाईटवर जाऊन सभासदत्वाची नोंदणी करता येणार आहे.

\B'गच्चीवरील बाग' \B

\Bकधी : \B८ फेब्रुवारी २०१९, शुक्रवार \B

कुठे : \Bसेमिनार हॉल, सीएमसीएस कॉलेज, गंगापूर रोड

\Bकिती वाजता: \Bसायंकाळी ६

..

लोगो : कल्चर क्लब लोगो, मीडिया पार्टनर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिंत उभारणीवरून वाद!

$
0
0

काकडबाग वस्तीत व्यावसायिकांची शाब्दिक चकमक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस मुख्यालयाच्या जागेत अतिक्रमण असलेली काकडबाग वस्ती गेल्या महिन्यात उद्ध्वस्त करण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणी संरक्षण भिंतीचे बांधकाम पोलिसांकडून हाती घेण्यात आले. मात्र, पोलिसांनी भिंतीसाठी आखणी केलेल्या जागेत शेजारील इमारतीची जागा येत असल्याचा दावा तेथील व्यावयासिकांनी केला. त्यामुळे भिंत बांधण्यास आलेले मजूर आणि पोलिसांशी व्यावसायिकांची बुधवारी शाब्दिक चकमक झाली. सायंकाळी उशिराने या वादावर पडदा पडला.

गंगापूर रोडवरील पोलिस मुख्यालयाच्या लगत ५० वर्षांपासून काकडबाग वस्ती होती. न्यायालयाच्या आदेशानुसार या वस्तीवरील अतिक्रमण १८ जानेवारी २०१९ रोजी उद्ध्वस्त करण्यात आले. या जागेच्या शेजारी युनिटी कॅम्पस ही व्यावसायिक इमारत आहे. त्या इमारतीच्या भूखंडातील जागा धरून पोलिस संरक्षण भिंत बांधत असल्याचा दावा तेथील व्यावसायिकांनी केला. गेल्या आठ‌वड्यात त्या ठिकाणी पोलिसांनी जागेची मोजणी केल्यानंतर भूखंड व्यवस्थित पाहून त्यानंतरच भिंत बांधावी, असे पत्र इमारतीच्या बिल्डरने दिले होते. पोलिसांनी मोजमाप करून बुधवारी सकाळी १० च्या सुमारास त्या ठिकाणी भिंत बांधायला घेतली. मात्र, पोलिसांनी योग्य प्रकारे जागेचे मोजमाप केलेले नसून, पोलिस ज्या ठिकाणी भिंत बांधत आहे. तेथील १० ते १२ फूट जागा इमारतीची असल्याचा दावा तेथील व्यावसायिकांनी केला. त्यामुळे पोलिस व व्यावसायिकांत बराच वेळ शाब्दिक चकमक उडाली.

मोजणीनंतर कार्यवाही

अखेरीस पुन्हा महापालिका व भूखंड कार्यालयातर्फे दोन्ही जागेचे व्यवस्थित मोजमाप करुन घ्यावे, असे व्यावसायिकांनी सांगितले आहे. त्यानुसार योग्य मोजमापेनुसारच भिंत बांधू, असे सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांनी व्यावसायिकांना सांगितले. सायंकाळी उशिराने पोलिस व व्यावसायिकांनी जागेच्या भूखंडाची खात्री करून वादास पूर्ण विराम दिला. योग्य मोजमाप केल्यानंतर आता त्या ठिकाणी पोलिस भिंत उभारणार आहेत.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काम २८ दिवसात पूर्ण करा

$
0
0

केंद्र सरकार, राज्य सरकार व नाशिक महापालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंर्तगत सुरू असलेल्या अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या मार्गाचे काम २८ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदारास देण्यात आले आहेत. मंगळवारी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्यासह अधिकाऱ्यांनी या मार्गाची पहाणी केली.

अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या मार्गावरील जंक्शन नाशिक महापालिकेच्या ताब्यात नसल्याने या ठिकाणी काम करता येत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही जंक्शन ताब्यात आल्यानंतर २८ दिवसात याचे कामे मार्गी लागणार आहे. या संदर्भात मंगळवारी नाशिक महापालिकेचे अधिकारी व पोलिस अधिकारी यांनी या पायलट मार्गाची संयुक्त पहाणी केली. यात पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, एसीपी नखाते, नाशिक स्मार्ट सिटी पी.एम.सी. चे प्रतिनिधी व नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता घूगे, चव्हाणके हे अधिकारी उपस्थित होते. पायलट स्मार्ट रोडच्या डाव्या बाजूचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्योति स्टोअर्स जवळील स्मार्ट पार्किंग ची पाहणी करुन पार्किंग लवकर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता लवकरच खुला करण्यात येईल. खुला झाल्यावर वाहतुकीचे योग्य प्रकारे चौकात नियोजन करून एका बाजूने वाहतूक सुरळीत ठेवून अर्ध्या बाजूचे कामही २८ दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारास दिलेल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्तांना बसणार बॉसची बोलणी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तुम्ही वाहतुकीचे नियम मोडत असाल तर सावधान! यापुढे वाहतुकीचा नियम मोडला तर थेट तुमच्या कामाच्या ठिकाणचे प्रमुख तुम्हाला जाब विचारणार आहेत. 'तुमच्या कर्मचाऱ्यास वाहतूक नियम पाळण्याचे भान नाही. त्याला समज द्या' अशा स्पष्ट शब्दांत कार्यालय प्रमुखांना पोलिसांकडून पत्र लिहिले जात आहे. नोकरीच्या ठिकाणी बॉसकडून कानउघाडणी होऊ नये, असे वाटत असेल तर वाहतुकीचे नियम पाळा असा संदेशच या माध्यमातून पोलिस देऊ लागले आहेत.

वाहन तपासणी, दंडात्मक कारवायांचा बडगा उगारूनही बहुतांश नागरिक वाहतुकीचे नियम पाळत नसल्याचे चित्र पोलिसांना रोजच पहावे लागते. हेल्मेट वापराचा आग्रह धरूनही अनेक मोटरसायकलस्वार हेल्मेट परिधान करीत नसल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे. यामुळेच रस्ते अपघातात अनेक वाहनधारक जीव गमावत आहेत. दंडात्मक कारवाईनंतरही बेशिस्त वाहनचालकांच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने पोलिस आयुक्तांनी आता अनोखी शक्कल लढविली आहे. सरकारी कार्यालये, बँका, खासगी कंपन्या, कार्यालये यांमधील कामगारांनी वाहतुकीचे नियम मोडले तर त्यांच्याकडून दंड वसूल करतानाच संबंधित वाहनचालक कोठे नोकरी करतो, त्याच्या कार्यालयाचा पत्ता, कार्यालय प्रमुखांचे नाव याबाबतची माहिती घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. ही सर्व माहिती नोंदवून घेण्यात येत आहे. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याच्या कार्यालयीन प्रमुखांना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह पत्र पाठविले जात आहे. ज्यामध्ये आपल्या कर्मचाऱ्यास वाहतुकीचे पाळण्याबाबतची समज द्या, असे नमूद केले जात आहे. आतापर्यंत कारवाई केलेल्या विविध विभागांच्या ८० कर्मचाऱ्यांची यादी पोलिसांकडे तयार झाली असून, त्यापैकी २० कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन प्रमुखांना अशा प्रकारची पत्रे पाठविण्यात आली आहेत. ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, फॉरेन्सिक लॅब, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महावितरण यांसारख्या कार्यालयीन प्रमुखांना त्यांच्या बेशिस्त कर्मचाऱ्यांबद्दलची माहिती पाठविण्यात आली आहे.

दंड वसुली करणे हा आमचा उद्देश नाही. लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, यासाठी आम्ही कारवाई करतो. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. ते कमी करणे आमचा उद्देश आहे. वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत कार्यालय प्रमुखांनी कर्मचाऱ्यांना सूचना आणि समज द्यावी, यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

-रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटी कामांची सखोल चौकशी व्हावी

$
0
0

नगरसेवक राहुल दिवे यांची मागणी

…..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार होत असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक राहुल दिवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिवे यांनी एक निवेदन पंतप्रधान कार्यालयात, तर दुसरे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना भेटून दिले.

सरकारने देशभरात निवडक महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी प्रकल्प तयार करण्याचा निर्णय घेतला. परंतु, ज्या संस्थांनी हे काम घेतले आहे, त्या संस्था केंद्र व पंतप्रधान कार्यालयाशी निगडीत आहेत म्हणून याची सखोल चौकशी व्हावी, असे निवेदनात म्हटले आहे. नाशिक शहरात अशोकस्तंभ ते मुंबई नाका हा रस्ता स्मार्ट सिटीअंतर्गत येतो व त्याचे कामदेखील चालू आहे. परंतु, काम वेळेत पूर्ण होत नाही. या संस्था कामाची मुदत वाढून घेत आहेत. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून स्मार्ट सिटी कामांची ६० टक्के जादा दराने कामे मंजूर करण्यात आली आहेत. काही ठराविक राजकीय संबंध असलेल्या संस्थांसाठी हे निर्णय घेण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

केंद्र सरकारने स्मार्ट सिटीअंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीचा गैरवापर होत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम शहराचे हिताचे होत नसल्याचे समोर येत आहे. स्मार्ट सिटी कामांचा आढावा घेऊन योग्य ती चौकशी करावी, अशी मागणी दिवे यांनी नाशिककरांच्या वतीने पंतप्रधानांकडे केली आहे. यावेळी खासदार हेमंत गोडसे व उदय सांगळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images