Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गोई काठच्या शेतक-यांचे उपोषण अखेर मागे

$
0
0
पालखेड डाव्या कालव्यातील अतिरिक्त पाणी गोई नदीला सोडण्यात यावे या प्रलंबित मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली गेल्या चार दिवसांपासून विंचूरला बेमुदत उपोषण सुरू केले होते.

आम्ही एकशे पाच आहोत !

$
0
0
माणूस जेव्हा त्वेषात येऊन बोलतो, तेव्हा वाक्याच्या सुसंगतीचा नियम तो विसरून जातो. अन् सार्वजन‌िक ठ‌िकाणी असे काही घडले की इतरांसाठी ती हास्याची पर्वणी व चेष्टेचा विषय ठरते. शुक्रवारी झालेल्या महापाल‌िकेच्या सभेत एका विषयांवरून वातावरण बरेच गरम झाले होते.

युवती ‘राष्ट्रवादी’चा घरचा आहेर

$
0
0
मुंबईतील सामूहीक बलात्कारप्रकरणी सत्ताधाऱ्यांविरोधात भाजप व श‌िवसेना आक्रमक असताना नाश‌िकमध्ये मात्र शिवसेना व भाजपपूर्वीच राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसने निषेध मोर्चा काढून सरकारला घरचा आहेर दिला आहे.

घरकुलाच्या हिशेबाची ‘जुळवाजुळव’

$
0
0
घरकुल योजनेबाबत दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने महापालिकेच्या कारभारावर तोंडसुख घेत या योजनेचा सर्व तपशील हायकोर्टासमोर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी २० सप्टेंबरपर्यंतची मुदत महापालिकेला देण्यात आली असून महापालिकेने हिशेबाची जुळवाजुळव सुरू केली आहे.

महापालिकेचे रस्ते नकोच

$
0
0
एमआयडीसी क्षेत्रातील रस्ते व पथदीप दुरूस्तीचे काम महापालिकेकडून काढून ‘एमआयडीसी’कडे देण्यात यावे अशी आग्रही मागणी नाशिक ​जिल्हा उद्योग व निर्यातदार संघटनेने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.

स्पर्धांमुळे विश्वकोश कोशातून विश्वात आला

$
0
0
‘मराठी विश्वकोषाची जाडी पाहून तरुण त्याला हात लावण्याचे धाडस करीत नाहीत, शाळा-कॉलेजांमध्येही विश्वकोश फक्त शोकेसची शोभा वाढवीत आहे. अशा परिस्थितीत मंडळाने कन्याकोश व विश्वराजकोश या स्पर्धा सुरू करून कोशाविषयीची भीती सर्वसामान्यांच्या मनातून काढून टाकली.

‘आधार’ मिळणार शाळेतच

$
0
0
आधार कार्ड केंद्रावर होणारी विद्यार्थी आणि पालकांची फरफट ‘मटा’मार्फत निदर्शनास आणून दिल्यानंतर आधार नोंदणी मश‌िन शाळेमध्येच उपलब्ध करुन देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आला आहे. चारच दिवसात ही मशिन शाळेत उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागामार्फत देण्यात आली.

हॉलतिकिटात पुन्हा घोळ

$
0
0
वेळेत हॉल‌तिकीट न पोहोचवू शकलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) गैरनियोजन उमेदवारांनी रविवारी पुन्हा एकदा अनुभवले. एकाच विद्यार्थ्याच्या हॉलतिकिटावर दोन दोन आसन क्रमांक छापण्यात आल्याचा प्रकार काही केंद्रांवर उघडकीस आला.

मी दीड महिन्यांपासून कैदेत..!

$
0
0
माझे नाव एसटीबस थांबा. मला कुणी रस्त्यातला अडथळा तर कुणी मोकाट जनावरांच घर म्हणते. पण विद्यार्थी, महिला व ज्येष्ठांसाठी मात्र मी आधार ठरतो. माझा पत्ता गेल्या काही महिन्यांपासून डिजीपीनगर, अंबड लिंक रोड असा आहे.

कदमांना उद्धव ठाकरेंचे प्रमाणपत्र

$
0
0
‘आमदार अनिल कदम यांनी वापरलेल्या भाषेचे मी समर्थन करणार नाही. मात्र, कदम हे कुटुंबवत्सल असून त्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट का झाला हे तपासले पाहिजे’, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे आमदार कदम यांचा बचाव केला आहे.

'...तर जादूटोणा विधेयकाला विरोध!'

$
0
0
‘शिवसेना जादूटोणा, चेटूक, तंत्रमंत्र, बाबागिरी, अंधश्रद्धेच्या विरोधात आहे. पण; राज्य सरकार आणू पाहत असलेल्या जादूटोणा विधेयकाद्वारे श्रद्धेवर गदा आणली जाणार असेल तर, आम्ही त्या विधेयकाला विरोध करू’, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी नाशिकमध्ये आयोजित बुथप्रमुख व पदाधिकारी मेळाव्यात दिला.

आ. कदम यांच्या अटकेची शक्यता

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेवरील पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांच्यावर पिंपळगाव पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.

बलात्कार : शेजा-याला अटक

$
0
0
निफाड तालुक्यातील नांदगाव येथील २३ वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी लासलगाव पोलिसांनी तिच्या शेजारी राहणाऱ्या एकास अटक केली आहे.

मला बोलायचं नाही!: राज

$
0
0
‘नाशिकमधील खड्ड्यांचे खापर माझ्यावर फोडू नका, ते पाप आधीच्या सत्ताधाऱ्यांचे (शिवसेनेचे) आहे’, असे सांगणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर रविवारी नाशिकला आलेल्या उद्धव ठाकरे यांनी ‘आमच्या काळातील रस्ते चांगले असून तुमच्या सत्तेला दीड वर्ष उलटलंय, आता तरी जबाबदारी घ्या’, असे म्हणत जोरदार टीका केली.

आ. कदम यांचा जामीन अर्ज दाखल

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेवरील पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले शिवसेनेचे आमदार अनिल कदम आज कोर्टासमोर आले.

साहेब येऊनही गेले...!

$
0
0
शहरात एखादा मोठा राजकीय नेता येणार असेल तर सर्वाधिक टेन्शन पोलिसांना असते. चौकाचौकात उभे रहा, मध्येच कुणी घुसणार नाही याची काळजी घ्या, नेता येईपर्यंत डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा असे सारेच पोलिसांना करावे लागत असल्याने त्यांची बरीच धावपळ उडते.

राजेही उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत

$
0
0
नाशिकरोडच्या प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जिर्णोध्दार होऊन महिना लोटला तरी उद्‌घाटनाच्या श्रेयासाठी येथील दोन नगरसेवकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. त्यातच उद्‌घाटनाला राष्ट्रवादी आणि आरपीआयचे नेते एकत्र यायला तयार नसल्याने खुद्द राजेंनाही प्रतीक्षा करावी लागत आहे.

टॅक्सी सेवेअभावी प्रवाशांचे हाल

$
0
0
संघटनेतील पदाधिका-यांच्या वादातून नाशिक-कसारा आणि मनमाड-शिर्डी या दोन्ही मार्गांवरील टॅक्सी सेवा बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

शांतता समितीच्या सदस्यालाच अटक

$
0
0
शांतता समितीमध्ये सदस्य म्हणून काम पाहणा-या तुषार जगताप यास पंचवटी पोलिसांनी आर्थिक फसवणूक प्रकरणात अटक केली.

चिमुकल्यांनी उलगडला विज्ञानाविष्कार

$
0
0
कुठे वीज वाचविण्याची धडपड तर कुठे वीजनिर्मितीचा प्रयत्न, एकीकडे इंधनाला शोधलेला पर्याय तर एकीकडे पर्यावरण संवर्धनाची आखणी करणारे चिमुकले हात असे अनेक प्रयोग पंचवटीतील आर. पी. विद्यालयामध्ये आयोजित पहायला मिळाले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images