Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मनमाडचा फॉर्म्युला रोखणार

$
0
0
हत्तीरोग व जलजन्य रोगांसाठी कारणीभूत असलेल्या डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी मनमाड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याने सुचविलेली योजना स्वीकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला आहे.

‘आम आदमी’ पोस्टाच्या तिकीटावर

$
0
0
पोस्टाच्या ‌तिकीटावर आतापर्यंत केवळ थोरामोठ्यांच्याच छबी उमटत होत्या. परंतु आता आम आदमीची छबीही सहजगत्या उमटणार आहे. टपाल विभागाने ‘माय स्टॅम्प’ ही योजना आणली असून नाशिकमध्येही ती शनिवारपासून कार्या‌न्वित होणार आहे.

मनसे सभासद नोंदणी सुरू

$
0
0
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेतर्फे संघटनात्मक बळकटीवर भर देण्यात येत आहे. पक्षाची विद्यार्थी संघटना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे (मनविसे) जिल्ह्यात सभासद नोंदणी अभियान हाती घेतले आहे

दोनशे किलो लाडू अन् ७३ किलोंचा केक !

$
0
0
एकीकडे पक्षाचे अध्यक्ष साधेपणाचा आग्रह धरत असताना त्यांचे कार्यकर्ते मात्र दोनशे किलो लाडू वाटप, ७३ किलोंचा केक कापण्यासह मिठाई वाटप, फळे वाटप असे खर्चिक कार्यक्रम हाती घेत आहेत.

मनपा शिक्षकांवर ‘मन:शांती’ प्रयोग

$
0
0
शिक्षकांचा व्यक्तिमत्त्व विकास योग्य झालेला असल्यास त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना मिळू शकतो. मुलांचा दृष्टीकोन व्यापक करण्यासाठी शिक्षकांची वैचारीक बैठक मजबूत होणे आवश्यक आहे.

गृहखरेदीपूर्वी क्षमतेचा विचार करा

$
0
0
‘ग्राहकाचे आर्थिक बजेट व स्वप्नातील घर यामध्ये मोठी तफावत असते. या स्वप्नातील घराची किंमत जमविण्याच्या नादात गृहखरेदी पुढे ढकलली जाते. दरम्यानच्या काळात घराच्या किंमती वाढतच जातात.

‘वाहन’ प्रणाली कार्यान्वित

$
0
0
‌प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अद्ययावत ‘वाहन’ प्रणाली बुधवारपासून कार्या‌न्वित झाली. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून खोळंबलेल्या कमर्शियल वाहनांशी संबंधित कामांना गती आली आहे.

गाठला ११-१२-१३ चा मुहूर्त

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीवर सीसीटीव्हीचा वॉच ठेवायचा की नाही यावरू रंगलेल्या चर्चेनंतर अखेर तेथे सीसीटीव्ही बसविण्यात आले. मात्र, ते सुरू कधी होणार यावरही चर्चा रंगू लागली.

प्राध्यापकांना हवाय हक्काचा अॅरिअर्स

$
0
0
सहाव्या वेतन आयोगाच्या अॅरिअर्ससह आंदोलन काळातील पगार आण‌ि व‌िव‌िध समस्यांना तोंड देताना प्राध्यापकांच्या नाकी नऊ आले आहेत. उच्च श‌िक्षणाचा डोलारा सांभाळणाऱ्या प्राध्यापकांच्या मागण्यांच्या वाट्याला केवळ आश्वासनांची खैरातच येत आहे.

पुस्तक वाचा अन् पैसे मिळवा

$
0
0
आपल्याला हवे ते आवडीचे पुस्तक खरेदी करा, पुस्तक वाचून होईपर्यंत आपल्याकडेच ठेवा व वाचून झाल्यानंतर ते सार्वजनिक वाचनालयाकडे खरेदीच्या पावतीसह जमा करा आणि वाचनालयाकडून पुस्तकाचे पैसे घेऊन जा.

‘त्याची’ लग्नपत्रिकाही फिल्मीच

$
0
0
लग्नपत्रिका म्हटल्यावर 'आमचे येथे श्री कृपेने...' सुरू होणारा व आमच्या... च्या लग्नाला यायचं हं'ने संपणारा मजकूर अपेक्षित असतो. मात्र चित्रपट दिग्दर्शक असलेल्या नाशिककर नितीन गायकवाड या तरूणाने चित्रपटाच्या स्टाईलने छापलेली स्वत:ची लग्नपत्रिका चर्चेची ठरते आहे.

भरतीवर प्रतिज्ञापत्राचा उतारा

$
0
0
महसूल विभागात यापुढे होणाऱ्या भरती प्रक्रियेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह परीक्षार्थींचे प्रतिज्ञापत्र घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

महापालिकेत लवकरच भरती ?

$
0
0
महापालिका प्रशासनाला तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी दिली आहे. सध्या रोस्टर तपासण्याचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर भरती प्रक्रियेचा विचार होऊ शकतो असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

नाशिकमध्ये तापमानाचा निच्चांक

$
0
0
राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद बुधवारी अहमदनगरमध्ये झाली असली तरी त्याखालोखाल तापमान नाशिकचे असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच, या वर्षातील सर्वात कमी तापमानाची म्हणजेच ७.९ अंश सेल्सिअस एवढी नोंद नाशकात झाली आहे.

मधुमक्षिका पालनासाठी क्लस्टर योजना

$
0
0
पूर्वी कोठेही पाहिले की मधमाश्यांचे पोळे दिसायचे, मात्र आता पर्यावरणाचा ढासळता आलेख यातून मधाचे उत्पादन घटत चालले आहे. औषधी गुणधर्म असलेल्या मधाचे उत्पादन वाढवण्यासाठी मधुमक्षिकापालन हा पर्याय पुढे आला आहे.

औद्योगिक भूसंपादनासाठी जिल्हाधिकारी आग्रही

$
0
0
केंद्र सरकारने केलेला नवा भूसंपादन कायदा येत्या जानेवारीपासून लागू होण्याची चिन्हे असल्याने जिल्ह्यातील औद्योगिक भूसंपादनासाठी आग्रही असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दिंडोरी तालुक्यातील जवळपास एक हजार हेक्टर जागेच्या संपादनाबाबत गुरुवारी बैठक होणार आहे.

अन् त्यांचा जीव पडला भांड्यात

$
0
0
डोक्याचे केस खांद्याच्याही खालपर्यंत वाढलेले. कानांमध्ये बाळी. आडदांड देहयष्टीची माणसे मोटारीतून खाली उतरली. यश मैदानावर खेळत होता. त्याला चॉकलेटचे आमीष दाखवून बोलावले.

भाजपची फसलेली ‘युनिटी’

$
0
0
गुजरातमध्ये साकारण्यात येणाऱ्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या माध्यमातून राजकीय प्रतिष्ठा मिळविण्यासाठी भाजपकडून जोरदार कार्यक्रम सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून १५ डिसेंबरला देशभरात ‘रन फॉर युनिटी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या या उपक्रमासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.

विभागप्रमुखांचा पत्ता कट

$
0
0
महसूल विभागातील प्रमुख ४० अधिकाऱ्यांना टॅब देण्याच्या संकल्पनेतून विभागप्रमुखांची गच्छंती करण्यात आली आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, प्रांत आणि तहसीलदार यांनाच टॅबचा लाभ मिळणार आहे.

एलईडीचा फैसला कोर्टाच्या निकालानंतर

$
0
0
वादात सापडलेल्या एलईडी फिटिंग्जचा तिढा कोर्टाच्या निकालानंतरच सुटण्याची चिन्हे आहेत. एलईडीवर सध्या स्थगिती नसली तरी पुढील कार्यवाही थांबवण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी दिली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images