Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सायन्स फेस्ट‌िव्हलने वेधले लक्ष

$
0
0
तीन द‌िवसांपासून यशवंतराव चव्हाण तारांगण येथे सुरु असलेल्या सायन्स फेस्ट‌िव्हलने व‌िद्यार्थ्यांचे लक्ष वेधले आहे. आज (४ मे) रोजी‌ या उपक्रमाचा समारोप होणार आहे. व‌िज्ञान प्रबोध‌िनीच्या व‌िद्यार्थ्यांनी वर्षभर तयार केलेले व‌िव‌िध प्रकल्प सादरीकरण, व‌िज्ञान व‌िषयक व्याख्याने आण‌ि व‌िज्ञानावर आधारित माह‌ितीपटांचे सादरीकरण अशा उपक्रम पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. रव‌िवारी द‌िवसभर हे उपक्रम सुरु राहणार आहेत.

काँग्रेसला प्रतीक्षा विधानसभा निरीक्षकांची

$
0
0
काँग्रेसतर्फे राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात असल्याचे सांगत लवकरच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाचा समन्वयक पाठविणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत केली. ठाकरे यांच्या घोषणेनंतर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आशा पल्लवित झाल्या असून, सर्वांना निरीक्षकांच्या दौऱ्याची प्रतीक्षा आहे.

जानोरी फडकला उलटा ध्वज

$
0
0
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज उलटा फडकाविल्याचा प्रकार अर्ध्या तासानंतर उघडकीस आला. नंतर पुन्हा हा ध्वज व्यवस्थित करण्यात आला.

जेलरोडला दोन घरफोड्या

$
0
0
जेलरोड येथे दोन घरफोड्या झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुट्यांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्या घरांवर पाळत ठेऊन घरफोड्या करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

गँसटँकर-बस धडक

$
0
0
ना‌शिकहून मालेगावकडे निघालेल्या गॅसटँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटीवर आदळून झालेल्या अपघातात चार प्रवासी ठार तर १९ प्रवासी जखमी झाले. चांदवड-मालेगाव रोडवरील राहूड घाटात शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला.

कारच्या धडकेत बिबट्या ठार

$
0
0
नाशिक-औरंगाबाद हायवेवरील चांदोरी गावाजवळ कारने धडक दिल्याने बिबट्या ठार झाला. शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. भक्ष्याच्या शोधात हा बिबट्या बाहेर पडल्याचे वनविभागाने सांगितले आहे.

गोदाघाटाचे काम सुरु होणार

$
0
0
अवघ्या १३ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थाच्या कामांना खऱ्या अर्थाने आता सुरुवात होण्याची शक्यता असून, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील गोदाघाटाच्या कामाला आठवड्याभरातच प्रारंभ होणार आहे. विभागीय महसूल आयुक्तांनी शनिवारी सिंहस्थ कामांचा आढावा घेतला.

चुकीच्या जागेवर ‘एन्ट्री’

$
0
0
आजच्या गुंतागुंतीच्या व्यवहारात बँकेची कागदपत्रे, हिशोब ज्याला कळले तो तरला असं म्हणायला हरकत नाही. पैशांच्या व्यवहारात कच्चं असलेल्या एका महाशयांनी चेकसाठीची स्लीप त्यांच्यापेक्षा थोडं हुशार असलेल्या त्यांच्या मित्राकडून भरून घेतली.

दोन दिवसात विद्यार्थ्यांना निकालपत्रक

$
0
0
सटाणा शहरातील व्ही. पी. नाईक विद्यालयातील निकाल रोखल्या प्रकरणी चौकशीसाठी आलेल्या अधिकारी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्येच जोरदार खंडाजंगी झाल्याचे चित्र बघायला मिळाले.

बिल थकल्याने टँकरही थांबणार

$
0
0
बागलाण तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. सुमारे एकोणावीस गावांची तहान सध्या १३ टँकरने भागवली जात आहे. मात्र, पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरचे सुमारे तीस लाख रुपये डिझेलचे बिल थकल्यामुळे टँकरला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

मनमाड पोलिसांच्या दक्षतेच्या सूचना

$
0
0
उन्हाळ्याच्या सुटीत बाहेरगावी जात असाल तर ज्यांच्या घरी जाणार आहात त्यांच्या बरोबरच पोलिसानाही कळवा, असा फतवा मनमाड शहर पोलिसांनी नुकताच काढला आहे.

खेळाडंुच्या २५ गुण प्रस्तावास मुदतवाढ

$
0
0
महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा विभागातर्फे राज्य पातळीवर व राष्ट्रीय पातळीवर प्राविण्य दाखवलेल्या खेळाडूंना माध्यामिक शालांत परिक्षेत २५ गुण विशेष दिले जातात. या खेळाडूंची यादी जिल्हा क्रीडा कार्यालयाल ३१ मार्चपर्यंत द्यावी असे जाहिर करण्यात आले होते.

आयएसपी सोसायटीस २.१७ कोटींचा नफा

$
0
0
नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेस कामगारांच्या आयएसपी एम्प्लॉईज सोसायटीस २०१३-१४ या अार्थिक वर्षात २.१७ कोटीचा निव्वळ नफा झाला आहे.

फुटपाथ विक्रेत्यांना आंदण

$
0
0
नाशिकरोड परिसरातल्या फुटपाथवर अनेक व्यावसायिकांनी ठाण मांडल्याने नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. त्यामुळे परिसरात अतिक्रमण मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली जात आहे.

नगरचा संकर्ष, नागपूरची दिव्या प्रथम

$
0
0
नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघेटनेतर्फे आयोजित केलेल्या ११ वर्षांखालील मुलामुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धेत मुलांमध्ये अहमदनगरच्या संकर्ष शेळके याने तर मुलींमध्ये नागपूरच्या दिव्या देशमुख हिने प्रथम क्रमांक मिळवला.

रेल्वे स्टेशन बनले माणुसकीचे मंदिर

$
0
0
कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेले नाशिकरोड रेल्वे स्थानक माणुसकीचे मंदिर बनल्याची प्रचिती आली आहे. पोलिस, अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांनी दाखविलेल्या सजगतेमुळे हे शक्य झाले आहे. गेल्या महिनाभरातील काही घटनांतून हे स्पष्ट झाले आहे.

रांजणगिरीच्या टाक्यांची साफसफाई

$
0
0
त्र्यंबकेश्वरच्या उपरांगेत असलेल्या रांजणगिरी किल्ल्यावरील शिवकालीन तळ्याची खोदाई अन साफसफाई करून शिवकार्य गडकोट मोहिमेचा १२ वा टप्पा उत्साहात पार पडला. भर उन्हात कार्यकर्त्यांनी अवघड चढाई पूर्ण करून गडावर साफसफाई मोहीम राबवली.

अपघातातील १२ जणांची प्रकृती गंभीर

$
0
0
गॅस टँकरने एसटीला तसेच दुधाच्या टँकरला धडक दिल्याने जखमी झालेल्या २० जणांपैकी १२ जणांवर अजूनही वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत. ८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळ मृतांच्या नातलगांना ३ लाख रुपये भरपाई देईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

आरोग्य उत्तम असेल तरच साधना

$
0
0
मनुष्यधर्म हा देण्यासाठी म्हणून ओळखला जातो. परंतु, आपण मनुष्यधर्मात येऊन फक्त मागतच असतो, असे न करता आपले मूळ ओळखून त्यानुसार वागायला हवे. अध्यात्मामध्ये आरोग्याचे महत्त्व अपरंपार आहे. आरोग्य चांगले असेल तर आपण साधना करण्याच्या योग्यतेचे असतो, असे प्रतिपादन योगीराज सर्वेश सोनी यांनी केले.

डॉक्टरकडून खंडणी उकळणाऱ्यांना अटक

$
0
0
औषधात किडे निघाल्याचा तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा आरोप करीत डॉक्टरकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागून त्यापैकी ५० हजार रुपये उकळल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images