Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नगरपंचायतीसाठी कळवणकरांचा पाठिंबा

$
0
0
येथील ग्रामपालिकेचे रुपांतर नगरपंचायतीत करण्यासाठी शासनस्तरावरून हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी कळवणला विशेष ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी एकमुखाने हात उंचावत नगरपंचायतीसाठी एकमुखी ठराव मंजूर केला.

नांदगावच्या भारनियमनप्रश्नी निर्देश

$
0
0
शहरातील जनतेवर कोणत्या निकषावर भारनियमन लादण्यात आले, याची विचारणा करीत भारनियमनाबाबत वस्तुस्थिती दर्शक अहवाल दोन दिवसात सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दिंडोरीकरांकडून नगरपरिषदेची मागणी

$
0
0
दिंडोरी ग्रामपालिकेचे रुपांतर नगरपंचायतमध्ये करण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून दिंडोरी ग्रामपालिकेने मंगळवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी ग्रामस्थांनी नगरपंचायतीला विरोध करत नगरपरिषद करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी केली.

आरोग्य व‌िद्यापीठाने अखेर नेमली चौकशी सम‌िती

$
0
0
जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील मेड‌िकल कॉलेजमधील व‌िद्या‌र्थिनी प्र‌ियंका मुखर्जी ह‌िच्या आत्महत्येप्रकरणी नाश‌िकच्या आरोग्य व‌िज्ञान व‌िद्यापीठाने चौकशी सम‌ितीची नेमणूक केली आहे. व‌िद्यापीठातील अॅण्टी रॅग‌िंग सेलच्या माध्यमातून ही सम‌िती या प्रकरणी तपास करुन व‌िद्यापीठाला अहवाल सादर करणार आहे.

झाड कोसळल्याने महापालिकाही अंधारात

$
0
0
पावसाच्या जोरदार तडाख्याने राजीव गांधी भवनमधील दोन ते तीन वृक्ष उन्मळून पडली. यातील एक झाड महापालिकेच्या जनरेटरवर पडल्याने महापालिकेत अंधार पसरला होता. शहरातील अनेक भागात झाडे पडून मोठे नुकसान झाल्याने महापौरांनी विविध ठिकाणांची पाहणी केली.

`नको आम्हाला हे अच्छे दिन...`

$
0
0
जेलरोडसह नाशिकरोड परिसरात अनेक ठिकाणी नेत्यांच्या समर्थकांनी अभिनंदनाचे फलक लावले आहेत. महापालिका आणि पोलिस त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. विशेष म्हणजे नवीन खासदार तसेच आमदारकीसाठी उत्सुक असलेल्यांचे समर्थक होर्डिंग्ज जास्त प्रमाणात आहेत.

निम्म्या शहराने अनुभवला अंधार

$
0
0
वळवाच्या पावसाने मंगळवारी जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यासह शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडीत झाला. दुपारी अचानक आलेल्या पावसाने अनेक ठिकाणी विजेच्या खांबांवर वृक्ष उन्मळून पडल्याने संपूर्ण शहरातील वीज खंडीत झाली.

अनुदानाचा नवीन पॅटर्न नुकसानकारक

$
0
0
‘मराठी चित्रपट निर्मात्यांना आता पहिल्या चित्रपटापासूनच अनुदान दिले जाते, तसेच अनुदानातून सी कॅटॅगरीच्या चित्रपटांना वगळण्यात आले आहे. हा निर्णय नुकसानकारक आहे.’ असे मत अभिनेत्री, दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांनी व्यक्त केले. ‘हुतूतू’ चित्रपटाच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याबाबत संवाद साधला.

सिंहस्थ निधी त्वरित द्या

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कार्यरत झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जास्तीत जास्त निधी देण्याची मागणी केली. शहर शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी यावेळी हजर होते.

‘मान्सूनपूर्व’चा तडाखा

$
0
0
नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत मंगळवारी दुपारी मान्सूनपूर्व पावसाने गारा आणि वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर त्र्यंबकला वीज पडून दोन जण ठार आणि दोघे जखमी झाले. याच काळात विजेचा खेळखंडोबा झाल्याने संपूर्ण जिल्हावासीय प्रचंड त्रस्त झाले होते.

आम्ही कुठलेच नाह‌ी

$
0
0
संत सूरदास आणि संत कबीर यांच्या रचनांवर आधारीत मैफलीची सर्वांनाच ओढ लागली होती. मैफलीला सुरुवात होणारच होती. मंचावर गायक, वादक, निरुपणकार आणि समोर दर्दी रसिकांची मांदियाळी असा मेळ कुर्तकोटी शंकराचार्य न्यासात जुळून आला होता.

नाशिक-पुणे वाहतूक होणार वेगवान

$
0
0
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील प्रवरानदीवर असलेल्या जुन्या पुलास नवीन समांतर जोडपुलाचे काम पूर्णत्वास येत असून लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी संगमनेर बाह्यवळण हा विना टोल ९ किमीचा रस्ता मंजूर झाला आहे.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; चौघे ताब्यात

$
0
0
लासलगाव पोलिस स्टेशन हद्दीतील कोळगाव येथे एका अल्पवयीन मुलीला मारहाण करत तिचा विनयभंग करून अपहरण करण्यात आल्याच्या आरोपावरून लासलगाव पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. एपीआय शशिकांत चव्हाण यांनी चारही आरोपींना अटक केली आहे.

गोपीनाथ मुंडेंबाबत भाजपची स्टंटबाजी

$
0
0
भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना कृषी खाते देण्याबाबत राजनाथसिंह यांनी जाहीर सभेत केलेली घोषणा ही एक राजकीय स्टंटबाजी असल्याची टीका बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी केली आहे.

त्र्यंबकेश्वरला ‌सिंहस्थाच्या नियोजनाचे वाजले बारा

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळा उंबरठ्यावर येवून ठेपला असताना जिल्हा प्रशासनाचा त्र्यंबकेश्वर येथील साधू महंतांशी संपर्क तुटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अवघे १३ महिने हाती असतांना पूर्वनियोजनाचे बारा वाजले आहेत. याबाबत येथील साधू महंतांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

पिंपळगावात शेड कोसळले

$
0
0
शहर व परिसरात दुपारी चार वाजता जोरदार पाऊस झाला. यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. जोरदार वाऱ्यामुळे नाफेड परिसरात पत्र्याचे शेड उडाले. तसेच परिसरातीले अनेक कांद्यांचे शेड कोसळले.

सटाणा, मालेगावात जोरदार पाऊस

$
0
0
सलग दुसऱ्या दिवशीही सटाणा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह वीस मिनिटे जोरदार पाऊस झाला. वादळामुळे दोनशेच्यावर घरावरील पत्रे उडाली तर झाडे उन्मळून पडून मोठ्या प्रमाणात हानी झाली. अनेक भागात कांद्याचेही अतोनात नुकसान झाले.

लेखानगरचा भूखंड बनला अवैध पार्किंगचा अड्डा

$
0
0
सिडकोतील लेखानगरच्या मोकळ्या भूखंडावर गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत पार्किंग होत आहे. बाराही महिने या ठिकाणी वाळूच्या गाड्यांचा मुक्काम असतो. या गाड्यांतील वाळू तेथे सर्रासपणे ओतली जाते आणि तेथेच तिची विक्री केली जाते. या अवैध व्यवसावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

वृक्ष याचिका निकाली

$
0
0
नाशिक शहरातील झाडांची सुरू असलेली तोड, वृक्ष प्राधिकरण समितीचे कामकाज, शहरातील वृक्षांची गणना याप्रश्नी दाखल करण्यात आलेली याचिका पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने निकाली काढली आहे. यापूर्वीच हा विषय मुंबई हाय कोर्टाने हाताळल्याने याचिकाकर्त्यांना हाय कोर्टात म्हणणे मांडण्यास ट्रिब्युनलने सांगितले आहे.

सव्वाशे झाडांची बेकायदेशीर कत्तल

$
0
0
त‌िडके कॉलनी ते इंद‌िरानगर जॉग‌िंग ट्रॅक या रस्त्यावर सुमारे १३० वृक्षांची बेकायदेशील कत्तल करण्यात आल्याची तक्रार आम आदमी पार्टीने महापाल‌िकेकडे केली आहे. या प्रश्नी दुर्लक्ष करणाऱ्या महापाल‌िकेचे कर्मचारी आण‌ि अध‌िकारी वर्गावर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही मनपा आयुक्तांकडे न‌िवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images