Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिक बाजार समितीने भरली थकबाकी

$
0
0
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जमुक्त झाल्याचा दावा सभापती देविदास पिंगळे यांनी केला आहे. शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डच्या विकासकामांसाठी राज्य सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची बँकेच्या सामोपचार योजनेत परतफेड करण्यात आल्याचे पिंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

ठिकाण एक मेळावे दोन

$
0
0
नाशिक महापालिकेत नुकत्याच झालेल्या महापौर निवडणुकीत मनसेची साथ सोडत भाजपाने शिवसेनेशी युती केली. मात्र, विधानसभा निवडणुकीत एकमेंकापेक्षा वरचढ दाखविण्याची स्पर्धा लागली आहे. सिडकोतील भोळे मंगल कार्यालयात शिवसेना व भाजपाचा बुथ मेळावा घेण्यात आला.

कर्मचारी शोधण्याचा वनवास संपला

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १५ मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी कर्मचारी आणि अधिकारी वर्गाची जुळवाजुळव पूर्ण झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडे २५ हजार कर्मचारी व अधिकारी उपलब्ध झाले असून, दोन दिवसात या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.

मतदार नावनोंदणीसाठी लांबच लांब रांगा

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी नावनोंदणीला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नावनोदणीची बुधवारी शेवटची संधी असल्याने जिल्हातील पंधरा मतदारसंघामध्ये असलेल्या नावनोंदणी केंद्रावर मोठी गर्दी झाली होती.

संकल्पित रिपाइं जिल्ह्यात ६ जागा लढवणार

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्ह्यात सहा जागा लढवणार आहे. ही माहिती पक्षाचे नेते प्रकाश पगारे यांनी दिली.

आमदार मौलाना मुफ्ती राष्ट्रवादीच्या वाटेवर?

$
0
0
मालेगाव मध्यचे जनसुराज्य आघाडीचे आमदार मौलाना मुफ्ती मोहमंद ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलण्याच्या तयारीत असून, ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मौलानांच्या या खेळीने काँग्रेससह राष्ट्रवादीच्या इच्छुकांची कोंडी झाली आहे.

शहरात होर्डिंग हटावला वेग

$
0
0
विधानसभेच्या आदर्श आचरसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील एक हजार आठशे होर्डिंग, बॅनर काढले असून शहरातील कारवाई पूर्णत्वाकडे असल्याची माहिती अतिक्रमण उपायुक्त बहिरम यांनी दिली.

चिमुरडीवर अतिप्रसंग

$
0
0
सहा वर्षांच्या बालिकेवर घरासमोर राहणाऱ्या एका १९ वर्षीय युवकाने अतिप्रसंग केल्याचा प्रकार विंचूरमध्ये उघडकीस आला आहे. लासलगाव पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाईची शक्यता

$
0
0
नाशिकरोड कारागृहात होत असलेल्या गैरप्रकारांबाबत जेलचे अधिकारी सुनील कुंवर यांनी उधळलेल्या मुक्ताफळांची जेलच्या आवारात बुधवारी दिवसभर चर्चा होती. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

ट्रकच्या धडकेने सायकलस्वार ठार

$
0
0
भरधाव ट्रकने धडक दिल्याने सिकंदर भोख या सायकलस्वाराचा मृत्यू झाला. वडाळा नाका येथील नागजी चौफुलीवर गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला.

महापालिकेचे निधीसाठी प्रधान सचिवांना साकडे

$
0
0
महापौर अशोक मुतर्डक, उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा, प्रभारी आयुक्त सोनाली पोंक्षे यांनी प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांची भेट घेऊन सिंहस्थासाठी जादा निधी देण्याची मागणी केली. तसेच, कायमस्वरुपी आयुक्त त्वरित नेमण्याची विनंतीही केली.

अबू जिंदालच्या जामिनावर आज युक्तीवाद

$
0
0
महाराष्ट्र पोलिस अकादमी, पोलिस आयुक्तालय आणि आर्टिलरी सेंटरसारख्या ठिकाणांची रेकी करणाऱ्या तसेच दहशतवादी कारवायांसाठी प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अबू जिंदाल याच्या जामिन अर्जावर नाशिक कोर्टात गुरूवारी युक्तीवाद होणार आहे.

लिपिकाला रंगेहाथ अटक

$
0
0
राज्य कामगार विमा रुग्णालयातील वरिष्ठ सहाय्यक लिपिक आर. एन. माकरे याला दोन हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. सातपूर विभागात गेल्या पंधरा दिवसांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही दुसरी कारवाही आहे.

मुक्त व‌िद्यापीठाच्या परीक्षा नोव्हेंबरमध्ये

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे पुनर्परीक्षांसाठी ऑक्‍टोबरमध्ये घेण्यात येणारी परीक्षा विधानसभा निवडणूक आणि दिवाळीमुळे आता नोव्हेंबर मह‌िन्यात होणार आहे. २० ऑक्टोबरपासून द‌िवाळी आहे.

मुक्त विद्यापीठाच्या कारभाराला न‌िकालाच्या दुरुस्तीचे प्रायश्च‌ि‌त

$
0
0
मे-जून २०१४ मध्ये राज्यातील व‌िव‌िध केंद्रांवर घेण्यात आलेल्या मुक्त व‌िद्यापीठाच्या परीक्षांच्या न‌िकालानंतर यंदा मोठ्या प्रमाणावर व‌िद्यापीठाकडे तक्रारी आल्या आहेत. व‌िव‌िध केंद्रांवरील न‌िकालात दुरुस्ती करण्यासाठी आता यशवंतराव चव्हाण मुक्त व‌िद्यापीठाने मोह‌िम हाती घेतली आहे.

प्रधान सचिवांनी महापालिकेला फटकारले

$
0
0
आर्थिक स्थिती चांगली असल्याने शासनाने नाशिक महापालिकेचे प्रमोशन `ब` वर्गात केले आहे. त्यामुळे सिंहस्थासाठी निधी कमी असल्याचे रडगाणे बंद करून महापालिकेने सिंहस्थासाठीचा आपला पूर्ण वाटा उचलावा, अशा शब्दांत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी महापालिकेला फटकारले.

सुनावणी काही मिनिटांची, खर्च मात्र लक्षावधींचा!

$
0
0
दहशतवादी कारवायांशी संबंधीत आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर काह‌ी मिनिटांत सुनावणी संपली; परंतु त्यासाठी सरकारचा खर्च काही लाखांत होतो आहे.

नाशिकमध्ये ‘मनसे’त शांतता

$
0
0
राज्यात आघाडी,महायुतीत जागावाटपावरून घमासान सुरू असताना राज्यात तिसरा पर्याय देण्याची भाषा करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मात्र निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतरही स्मशान शांतता आहे.

SSC ची परीक्षा रद्द करा

$
0
0
निवडणुकीची आचारसंहिता आणि दिवाळीमुळे नाशिकमध्ये १९ आणि २६ ऑक्टोबर रोजी होणारी स्टाफ सिलेक्शन कमीशनची परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय संचालकांकडे केली आहे.

सभांच्या जागांचे दर निश्चित

$
0
0
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभांसाठी लागणाऱ्या शहरातील अकरा जागांचे दर महापालिकेने निश्चित केले असून, राजकिय पुढाऱ्यांनी बुकिंगसाठी जागा आरक्ष‌ित करण्यास सुरुवात केली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images