Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मनसे आमदारांच्या प्रचाराचा श्रीगणेशा

$
0
0
निवडणुकीची प्रक्रिया सुरू होवूनही उमेदवारी जाहीर होत नसल्याने इच्छुक उमेदवारांची घालमेल वाढली असतानाच नाशिकमध्ये मनसेच्या आमदारांनी मात्र आपल्या निवडणूक प्रचाराला सुरूवात केली आहे.

सातपूरकरांचे आरोग्य आले धोक्यात

$
0
0
सातपूर भागात वाढत्या लोकवस्तीत महापालिकेने घंडागाड्या वाढविल्या आहेत. परंतु, अनेक गाड्या नादुरुस्त असून, काहींची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे प्रभागांमध्ये गाड्या वेळेवर येत नाहीत.

मॅपकॉन परिषदेचा चर्चासत्रांनी समारोप

$
0
0
पॅथॉलॉजिस्टच्या ३५ व्या राज्यस्तरीय ‘मॅपकॉन २०१४’ परिषदेचा समारोप विविध चर्चासत्रांनी झाला. या चर्चासंत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व पॅथॉलॉजी विषयावर चर्चा झाली.

पर्यावरणाबाबत चित्रांद्वारे जनजागृती हवी

$
0
0
‘कलाशिक्षकांनी पर्यावरणाच्या समस्यांवर चित्रांव्दारे जनजागृती करावी,’ असे आवाहन शिक्षण उपसंचालक भगवानराव सूर्यवंशी यांनी आज केले.

प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरचे प्रवेश सुरू

$
0
0
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत नाशिक येथे नव्याने सुरू झालेल्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात (प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटर) ऑनलाईन प्रवेश परीक्षेची प्रक्रिया सुरु झाली आहे.

म‌‌ीनाताई ठाकरे स्टेडिअमची दैना

$
0
0
एकीकडे क्रीडा धोरणासाठी प्रयत्न करणाऱ्या महापालिकेचे शहरातील इनडोअर आणि आऊट डोअर स्टेडियमकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र अनास्थेचा राहिल्याचे दिसते.

काँग्र‍ेसच्या प्रचाराचा आज शुभारंभ

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या उत्तर महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ काँग्रेस मंगळवारी नाशिकमध्ये फोडणार आहे. प्रचार समिती प्रमुख नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह उत्तर महाराराष्ट्रातील मंत्री, नेते, पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहेत.

अखेर कोकाटेंचे एकला चलो रे!

$
0
0
सध्या राज्यात सूडबुद्धीचे राजकारण सुरू असून, कोणाचीही पक्ष निष्ठा राहिलेली नसल्याने आता तुमचा पक्षही नको आणि तुम्हीही नको असे म्हणत आमदार माणिकराव कोकाटे यांनी एकला चलोचा नारा देत अप्रत्यक्षरित्या अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

जिल्ह्यात ३०९ इच्छुकांनी नेले अर्ज

$
0
0
जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ३०९ इच्छुकांनी ५७९ उमेदवारी अर्ज निवडणूक विभागातून घेतले आहेत. सध्या पितृपक्ष असल्यामुळे ही संख्या कमी असून आणखीही इच्छूक अर्ज नेण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी दोन जणांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

चौघा नगरसेवकांचे सदस्यत्व धोक्यात?

$
0
0
पक्षाशी बंडखोरी करीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या मनसेसहीत काँग्रेसच्या प्रत्येकी दोघा नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

भुजबळांमुळे राष्ट्रवादीचे नुकसान

$
0
0
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अपक्ष सदस्याला दिल्याने राष्ट्रवादीतल्या नाराज गटातील माजी आमदार दिलीप बनकर यांनी सोमवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून राष्ट्रवादीच्या नुकसानीचा पाढा वाचला.

भाजप कार्यकर्त्यांना ‘सोशल’ धडे

$
0
0
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना सोशल मिडीयाद्वारे जोरदार प्रचार आणि प्रसार करतानाच योग्य ती खबरदारी घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोमवारी धडे दिले. मुंबईतून आलेल्या तज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केले.

इनोव्हेशन एक्स्प्रेस आज नाशकात

$
0
0
सॅप प्रणालीचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच योग्य गुणवत्ता आणि व्यवसायाचा दर्जा सुधारण्यासाठीची जागरुकता आणण्यासाठी देशभात फिरणारी ‘इनोव्हेशन एक्स्प्रेस’ मंगळवारी नाशकात येत आहे.

खून प्रकरणी आरोपींना पोलिस कोठडी

$
0
0
कुणाल हॉटेलच्या जखमी व्यस्थापकाचा मृत्यू झाल्याने पंचवटी पोलिसांनी संबंधीत पाच आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांना २५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

महापालिकेला मिळेना ‘तज्ज्ञ’

$
0
0
पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करून त्यांच्यामार्फत वृक्ष प्राधिकरण समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याच्या खटाटोपात असलेल्या महापालिकेला अद्यापपर्यंत तज्ज्ञ व्यक्तिच सापडलेल्या नाहीत.

ह‌िरा होजिअरीची आग शॉटसर्किटमुळे?

$
0
0
हुंडीवाला लेनमधील श्री अन्नपूर्णा संकुल ही इमारत १९९५ पासूनची आहे. आगीसारख्या आपत्कालीन घटनांना प्रतिरोध करू शकेल, अशी यंत्रणा तेथे होती का, याची माहिती अग्निशमन विभाग घेत आहे.

जागा घ्या, पण आहे तशा परत द्या

$
0
0
आगामी सिंहस्थासाठी आवश्यक साधुग्रामच्या जागेचे अधिग्रहण करा मात्र, मूळ स्थितीत असलेली जमीनच उपलब्ध करुन द्या, असे साकडे शेतकरी व जागामालकांनी प्रशासनाकडे मांडले. सोमवारी यासंदर्भात सुनावणी घेण्यात आली.

एमआयडीसीमध्ये तोडफोड

$
0
0
औद्योगिक वसाहतीतील पथदीपांच्या वीज जोडणींची टवाळखोरांकडून तोडफोड केली जात आहे. रात्रीच्या सुमारास कामगारांची लूट करण्याच्या उद्देशानेच हा प्रकार केला जात असल्याचे महापालिका कर्मचारी व अधिका-यांचे म्हणणे आहे. या भागात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणीही करण्यात आली आहे.

पारंपरिक लढतीला तिलांजली?

$
0
0
मालेगाव बाह्य मतदारसंघात यंदा बहुरंगी लढत पहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. विद्यमान आमदार दादा भुसे हे शिवसेनेकडून हॅटट्रीक साधण्यासाठी इच्छुक आहेत.

अखेर घुसमट संपली

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भुसावळचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी पक्षाकडून मिळत असलेल्या मानहानीकारक वर्तनामुळे व्यथित होत सोमवारी भाजपत प्रवेश केला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images