Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘आडगावकर फेस्टिव्हल’मध्ये जिंका घर

$
0
0
नवरात्रीच्या सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना गंगापूर रोड लिंक रोड परिसरात २ बीएचके घर बक्षिस म्हणून जिंकण्याची संधी शहरातील आडगावकर सराफ प्रा. लि. यांनी उपलब्ध करून दिली आहे.

मिळाले १८; देणी ८० कोटी

$
0
0
एलबीटीतील एक टक्का सरचार्ज, शेतसारा तसेच करमणूक कर असे मिळून राज्य सरकारने महापालिकेला सुमारे १८ कोटी रुपये दिले. यातील काही रक्कम महापालिकेच्या तिजोरीत देखील जमा झाली.

आज हरित कुंभाची प्रत‌िज्ञा

$
0
0
‘भोवतालच्या प‌र्यावरण रक्षणासाठी तत्पर राहू’, अशा आशयाची प्रत‌िज्ञा आज शहर आण‌ि ज‌िल्हाभरातील व‌िव‌िध शाळांमधील सुमारे साडेबारा लाख व‌िद्यार्थी घेणार आहेत. कुंभमेळ्याच्या न‌िम‌ित्ताने समाजात पर्यावरण जागृतीचा संदेश जावा, असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

पंचवटीच्या पाण्यासाठी आंदोलन

$
0
0
पंचवटी विभागातील अनेक भागात पाणीच पोहचत नाही. ज्या ठिकाणी पोहचते तिथे पाण्याला दाबच राहत नाही. अनेक वेळा तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. १० ऑक्टोबरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नगरसेविका शालिनी पवार, सिंधू खोडे, रंजना भानसी आदींनी दिला.

निफाडमध्ये पंचरंगी लढत

$
0
0
निफाड विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे या सर्वच प्रमुख पक्षांनी निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केली आहे.

वर्कर मिळंल का वर्कर!

$
0
0
ठकसेनला आज जरा बरं वाटत होतं. घरच्या हायकमांडनं डीपीच्या तेलानं पाठीचं केलेलं मालिश आणि सोबतीला डोक्शाला किक देणारा अतिकडवट काढा पाजल्यानं त्याला आराम पडला होता. परसाकडं जावून आल्यावर तर त्यांनं व्हरांड्यात दोनचार जोरबैठकाही काढल्या होत्या.

महिलेचा गळा आवळून खून

$
0
0
कुरापत काढून पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा नोंदव‌िण्यात आला आहे. या प्रकरणी सासऱ्याने जावयाच्या व‌िरोधात पंचवटी पोल‌िस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

SMS : ग्राहकाला ‘एअरटेल’ने भरपाई द्यावी

$
0
0
ग्राहकांना नकोसे झालेले एसएमएस पुन्हा पुन्हा पाठवून मनस्ताप द‌िल्याप्रकरणी एअरटेल कंपन‌ीने मोबाइल ग्राहकास नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश नाश‌िक ज‌िल्हा ग्राहक पंचायतीने एका सुनावणीदरम्यान द‌िले आहेत.

चांदवडमध्ये लाचखोर पोलिसासह दोघांना अटक

$
0
0
मोटार अपघाताचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच वाहनाची जप्त केलेली कागदपत्रे परत करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षकासह आणखी एकाला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

मालेगाव स्टँडवरील वाहतूक मार्गात बदल

$
0
0
दसऱ्यानिमित्त चर्तुसंप्रदाय आखाडा महंत श्री कृष्णदास चरणदास महाराज यांच्या वतीने रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे. श्रीराम लक्ष्मण सेनेची मिरवणूक निघणार असल्याने गाडगे महाराज पुलाकडून मालेगाव स्टँडपर्यंतचा मार्ग दुपारी ३ ते रात्री १० वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

सातपूरकरांची ‘तपस्या’ ‘समर्पण’च्या दिशेने!

$
0
0
राज्यातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या कार्याची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, या उद्देशाने नाशिकच्या एकनाथ सातपूरकर यांच्या अरुषा क्रिएशनने ‘तपस्या’ ही ५२ स्वयंसेवी संस्थांवर आधारित मालिकेची निर्मिती केली होती.

निवडणुकीच्या घोषणांनी फेसबुक ‘कव्हर’

$
0
0
लोकसभेप्रमाणेच ‌विधानसभा निवडणुकीतही सोशल मीडियाचा अधिक वापर होताना दिसत आहे. निवडणूक काळात फेसबुक कव्हरवर निवडणुकीचा फिव्हर पहायला मिळाला आहे. कोणी मतांचा जोगवा मागत आहे तर, कोणी विकासाचे आश्वासन देणारे घोषवाक्य फोटोसह टाकले आहेत.

काँग्रेस कार्यकर्त्यांना १५ वर्षांनी स्वबळाची संधी

$
0
0
राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधून आघाडीचा धर्म पाळण्याची भाषा करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते स्वबळाचा मार्ग अवलंबला हे बरेच झाले, असे आता उघडपणे बोलू लागले आहेत.

नाशिक मध्यमध्ये रंगले स‌िनेस्टाईल माघारीनाट्य

$
0
0
घरातील भाऊबंधकीच्या नादात नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवार गमावण्याची वेळ बुधवारी राष्ट्रवादीवर ओढवली होती. मात्र उमेदवारांनेच दाखवलेला चाणाक्षपणा आणि प्रशासनाच्या चलाखीमुळे भाऊंबधकी कायम राहत, राष्ट्रवादीची इभ्रत वाचली. काँग्रेस उमेदवार शाहू खैरेंसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार विनायक खैरे यांनी एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असे रचलेल माघारीनाट्य शेवटच्या मिन‌िटापर्यंत रंगले होते.

दिग्गजांच्या सभांनी गाजणार नाशिकचे मैदान

$
0
0
विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर आता निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून, राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी प्रचाराचा अॅक्शन प्लॅनवर काम करायला सुरुवात केली आहे.

‘त्या’ यादीतून कुंभमेळा वगळा

$
0
0
केंद्र सरकारने देशातील धार्मिक उत्सवांसंदर्भात एक यादी तयार करण्याचे काम सुरु केले असून त्यात नाशिक-त्र्यंबकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचाही समावेश आहे.

नाशकात ५७ जण रिंगणात

$
0
0
नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघांमधून एकूण ३५ जणांनी माघार घेतल्याने ५७ जण रिंगणात राहिले आहेत. सर्वाधिक उमेदवार देवळालीत तर सर्वात कमी उमेदवार नाशिक पश्चिममध्ये आहेत.

माघारीनंतरही रंगतदार लढती कायम

$
0
0
विधानसभेसाठी अर्ज माघारीची प्रक्रिया संपल्यानंतर आता जिल्ह्यातील १५ जागांवरील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, आमदार ए. टी. पवार, माणिकराव कोकाटे, वंसत गिते, मौलाना मुफ्ती मोहंमद यांच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

३० तलवारींसह शस्त्रसाठा जप्त

$
0
0
मालेगाव पोलिसांनी येवला येथे छापा टाकून ३० तलवारी, एक गावठी कट्टा, ३ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी मतिन अब्दुल हमिद (वय २०, रा.परदेशपुरा, येवला) व सरफराज खान मेहबुब खान (वय ३१, रा.मोमिनपुरा, येवला) यांना अटक करण्यात आली आहे.

निवडणुकांवर पोलिसांचा वॉच

$
0
0
निवडणुक‌ीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी सुरू केली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images