Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वर्षभरापासून रस्त्याचे काम सुरूच

$
0
0
डीजीपीनगर दोन ते प्रणय टॅपिंगपर्यंतच्या रस्त्याचे काम अनेक महिन्यापांसून कासव गतीने सुरू आहे. वर्ष होऊनही हा एक किलोमीटरच्या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना पाठदुखीचा त्रास सहन करावा लागतोय.

इंटर्नशीपसाठीची यंदा नाशकात राष्ट्रीय परीक्षा

$
0
0
इंटेल, फ्लिपकार्ट, इबे, एचपी, फिलिप्स यासह विविध नामांकित आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये इंटर्नशीप करण्यासाठीची राष्ट्रीय परीक्षा यंदा नाशिकमध्ये होत आहे. येत्या रविवारी, २८ डिसेंबर रोजी ही परीक्षा के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये होणार आहे.

बतावणी करून दागिने लांबविले

$
0
0
सीआयडी पोलिस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी महिलेजवळील सात तोळ्यांचे सोन्याचे लांबवून पोबारा केला. गंगापूर रोडवरील मामा मुंगी कार्यालयाजवळ शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली.

वंचित बालकांचा मेळावा ‘निराधार’

$
0
0
निराधार आणि वंचित बालकांच्या मेळाव्याला अद्यापपर्यंत मुहूर्त मिळू शकलेला नाही. बालदिनाचे औ​चित्य साधून महिला व बालकल्याण समितीमार्फत दरवर्षी हा मेळावा घेतला जातो. मात्र, यंदा डिसेंबर महिना उलटला तरी प्रशासनाने कार्यक्रमाच्या आयोजनास गती दिलेली नाही.

‘प्रेस’च्या वारसांना नववर्षाची भेट

$
0
0
भारत प्रतिभूती व चलार्थ मुद्रणालयाच्या (प्रेस) मयत कामगारांच्या वारसांना जानेवारी २०१५ पासून सेवेत घेतले जाणार आहे. कामगार पॅनेलचे नेते आणि वारसांनी तब्बल दीड तप लढा दिला. त्यास आता कुठे यश मिळाले. सन १९९६ पासून हा प्रलंबित होता. तो आता प्रश्न मार्गी लागला आहे.

येवला औद्योगिक वसाहतीच्या हरकतींवर आज सुनावणी

$
0
0
येवला तालुक्यातील अंगणगाव येथील औद्योगिक सहकारी वसाहतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजकारण रंगात आले आहे. प्रसिध्द मतदारयादीत अपात्र मतदारांचे नावे समाविष्ट केल्याने पाच जणांनी या बेकायदेशीर मतदारयादीवरच हरकती घेतल्याने आता या हरकतींवर सोमवारी (दि. २२) सुनावणी होणार आहे.

मनमाड शहरात लवकरच नळांना मीटर बसविणार

$
0
0
सदैव पाणीटंचाईचे सावट असलेल्या मनमाड शहरात नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे भान यावे, यासाठी नळांना मीटर बसविण्याच्या महत्वपूर्ण ठरावासह शहर अस्वच्छ करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे तसेच, शहरातील नेहरू उद्यान बीओटी तत्वाने देणे, शहराला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळणे यासह विविध ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आले.

दिंडोरीत राष्ट्रवादीचे रास्तारोको आंदोलन

$
0
0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गारपीटग्रस्तांना चांगली मदत देवू, असे आश्वासन दिले होते. मात्र, तुटपुंजी मदत जाहीर करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

आदर्श नव्हे, घाणीच्या साम्राज्याचे गाव

$
0
0
स्वच्छ व सुंदर गावाचा पुरस्कार पटकावणाऱ्या येवला तालुक्यातील सायगावला आज घाणीच्या साम्राज्याने वेढले आहे. गावालगतचे रस्ते, शालेय परिसर, आरोग्य केंद्राचा परिसर, गाव अंतर्गतसह दलित वस्तीच्या गटारी आदी सर्वत्र अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाल्याने गावाच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

व्हावे मराठी भाषा विद्यापीठ

$
0
0
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि वि. वा. शिरवाडकर यांचा मराठी भाषा संवर्धनात मोठा वाटा आहे. या दोघांनी अनेक इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द उपलब्ध करून दिले.

जगातील सर्वात मोठे प्रतिज्ञा पुस्तक साकार

$
0
0
जगातील सर्वात मोठ्या प्रतिज्ञा पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असून, या पुस्तकाची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. शेल्टर प्रदर्शनाला भेट देणाऱ्या १६ हजार जणांनी या पुस्तकासाठी स्वाक्षरी केली आहे.

बोगस विद्यापीठाचा पर्दाफाश

$
0
0
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नता असल्याचे भासवत योग नॅचरोपॅथीचे दुकान मांडणाऱ्या बोगस विद्यापीठाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

$
0
0
शहरात वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. राणेनगर येथील भुयारी मार्गाजवळ एका अज्ञात वाहनधारकाने धडक दिल्याने लक्ष्मण किसन कापडी (वय ५०, रा. म्हाडा वसाहत, पाणीनी सोसायटी, पाथर्डी फाटा) यांचा मृत्यू झाला.

आयशर उलटून १० जण जखमी

$
0
0
मोटरसायकलस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात आयशर ट्रक उलटल्याने त्यातील १० जण जखमी झाले. दिंडोरीजवळ रविवारी सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींची प्रकृती स्थिर आहे. रविवारी दिंडोरीचा आठवडे बाजार असतो.

बागलाण आणेवारी ५० पैशांच्या आत

$
0
0
बागलाण तालुक्यातील १७१ गावांची सन २०१४-१५ या वर्षातील खरीप पिकांची अंतिम पीक आणेवारी घोषित करण्यात आली आहे. सटाणा शहरासह तालुक्यातील सर्व गावांची पीकपैसे आणेवारी ५० पैशांच्या आत असल्याची माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.

आरोग्य विभागात CCTV

$
0
0
महापालिकेच्या आरोग्य विभागात सीसीटीव्ही बसवण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. सीसीटीव्ही बसवण्यात आल्यानंतर लागलीच सफाई कर्मचाऱ्यांची बायोमेट्री​क हजेरी घेण्याच्या दृष्टीकोनातून डेटा संकलनाचे काम सुरू करण्यात येणार आहे.

मार्केट यार्ड बंद!

$
0
0
अडत, हमाली, तोलाई आदी खर्च शेतकऱ्यांकडून वसूल न करता खरेदीदाराकडून वसूल करण्याच्या पणन संचालकांच्या निर्णयाला व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.

फूल, नारळ वाहण्यास बंदी

$
0
0
त्र्यंबकेश्वर मंदिरात फूल, नारळास बंदी घालण्याचा निर्णय त्र्यंबकेश्वर देवस्थान संस्थान ट्रस्टने घेतला असून, तसे फलक संपूर्ण शहरात लावण्यात आले आहेत. यामध्ये मंदिर सुरक्षेचे कारण देण्यात आले आहे. १ जानेवारी २०१५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

यात्रोत्सवात रंगली कुस्त्यांची दंगल

$
0
0
देवमामलेदार यशंवतराव महाराज यात्रोउत्सवानिमित्त भरविण्यात आलेली कस्त्यांची विराट दंगल कुस्ती शौकिनांच्या डोळयांचे पारणे फेडणारी ठरली. मानाची पहिली कुस्ती सटाणाच्या निलेश पाकळे या पहिलवानाने जिंकली, तर दोन कुस्त्या बरोबरीत सुटल्या.

आंबेवणी ग्रामस्थ सरसावले

$
0
0
दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी येथील ग्रामस्थांनी अनेकवेळा मागणी करूनही बंद न झालेले परिसरातील अवैध धंदे (दारू व मटका ) कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंबंधी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, अवैध धंदे बंद न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images