Quantcast
Are you the publisher? Claim or contact us about this channel


Embed this content in your HTML

Search

Report adult content:

click to rate:

Account: (login)

More Channels


Showcase


Channel Catalog


Articles on this Page

(showing articles 1 to 25 of 25)
(showing articles 1 to 25 of 25)


Channel Description:

News from India by India number one website
  0 0

  दीड कोटींची होणार वसुली

  ...

  म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

  मार्च जवळ येत असल्याने महापालिकेने घरपट्टीच्या बड्या थकबाकीदारांविरोधात पुन्हा कारवाईचे अस्र उगारले आहे. वारंवार जप्तीच्या नोटिसा देऊनही मालमत्ता कर न भरणाऱ्या ४४ बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव येत्या २ जानेवारी २०२० रोजी केला जाणार आहे. या ४४ जणांकडे जवळपास दीड कोटींची थकबाकी आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील बड्या १७२ थकबाकीदारांपैकी १२८ जणांनी पैसे भरले असून, ४४ जणांनी अद्याप नोटिसांना उत्तर दिलेले नाही. त्यामुळे २ जानेवारीला होणाऱ्या लिलावात कोणी बोली लावली नाही, तर थेट त्यांच्या मिळकतींवर पालिकेचे नाव लावले जाणार आहे.

  चालू आर्थिक वर्षात घरपट्टीचे थकबाकीसह २१८ कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु, कराच्या गोंधळामुळे हा आकडा गाठणे तुर्तास तरी शक्य नसले तरी विविध योजनांच्या माध्यमातून वसुली वाढविण्यासाठी थकबाकीदारांवर कारवाईचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमेंनी विविध कर विभागाला दिले आहेत. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या वसुलीसह थकबाकीदार असलेल्यांवरही कारवाईचा बडगा पालिकेने उगारला आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात महापालिकेने थकबाकी असलेल्या शहरातील तब्बल १,०५४ थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. या जप्त केलेल्या १,०५४ मालमत्ताधारकांना थकबाकी भरण्यासंदर्भात शेवटची नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, या १,०५४ पैकी अनेकांनी थकबाकीदारांनी थकबाकी जमा केली आहे. त्यापैकी ८८२ थकबाकीदारांनी थकबाकी जमा केली होती. वारंवार नोटिसा देऊनही थकबाकी जमा न करणाऱ्या १७२ थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. …या जप्त मालमत्तांपैकी १७२ मालमत्तांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया सुरू केली होती. त्यापैकी १२८ जणांनी थकबाकी जमा केली असली तरी ४४ जणांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे या थकबाकीदारांना महापालिकेने पुन्हा रडारवर घेतले आहे. या थकबाकीदारांकडे जवळपास दीड कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे या वसुलीसाठी त्यांच्या मालमत्तांचे २ जानेवारी २०२० रोजी पुन्हा जाहीर लिलाव काढले आहेत. दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी ११ वाजता हे लिलाव होणार आहेत.

  ...

  आता थेट मिळकतींवरच नाव

  महापालिकेच्या स्थायी समितीने ६ सप्टेंबर २०१८ मालमत्ता कर थकवणाऱ्या बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांच्या सातबाऱ्यावर महापालिकेचे नाव लावण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. हा ठराव आता विविध कर विभागाला प्राप्त झाला आहे. मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करताना, त्यात महापालिकेतर्फे बोली लावता येणार आहे. जप्त मालमत्तांच्या लिलावात कोणी बोली लावण्यास आले नाही, तर महापालिकाच थेट नाममात्र एक रुपयाची बोली लावून त्या मालमत्तांवर आपले नाव लावून घेणार आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  दुसऱ्या टप्प्यातील मदत प्रशासनाकडे

  म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

  ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दुसऱ्या टप्प्यातील मदत पाठविली आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमधील अवकाळी ग्रस्तांसाठी १ हजार २२५ कोटी १७ लाख ५६ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचा निर्णय सरकारने शुक्रवारी घेतला असून, नाशिक जिल्ह्यासाठी ३९६ कोटींचा निधी मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाने ५९८ कोटी रुपये मदतीची मागणी केली असताना आतापर्यंत ५७८ कोटी रुपये प्राप्त झाल्याने २० कोटी रुपयांसाठी प्रशासनाला पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार आहे.

  सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस पडणे अपेक्षित असताना यंदा नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरूच राहीला. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामूळे उभी पिके आडवी झाली. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी उध्वस्त झाले. या पावसामुळे जिल्ह्यात ६ लाख ४७ हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये द्राक्ष, डाळींब बागांसह मका, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे ५९८ कोटी रूपयांचा निधी मागितला. पहिल्या टप्प्यात प्रशासनाला १८१ कोटी ५० लाख रुपयांचा निधी देण्यात आला. या निधीचे वाटप पूर्णत्वाकडे आले असताना आता दुसऱ्या टप्प्यात पुन्हा ३९६ कोटी ६२ लाख ४५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारच्या महसूल विभागाने शुक्रवारी घेतला. उर्वरीत २० कोटी रुपयांच्या निधीसाठी प्रशासनाला प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना या निधीचे वाटप सुरू करण्यात येणार आहे.

  -

  दुसऱ्या टप्प्यात मिळालेला निधी

  जिल्हा निधी (लाखांत)

  नाशिक ३९६६२.४५

  धुळे १६३६०.५१

  नंदुरबार २४८.४५

  जळगाव ३९३२६.०२

  अहमदनगर २९६२०.१३

  एकूण १२२५१७.५६

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

  शहरात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रकार वाढत आहेत. १६ ते १७ वयोगटातील तीन मुली बेपत्ता असल्याच्या तक्रारी म्हसरूळ आणि देवळाली पोलिस स्टेशन्समध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.

  कोळीवाडा भागातील गणेश चौकात राहणारी १६ वर्षीय युवती बुधवारपासून (दि.११) बेपत्ता आहे. तर तवलीफाटा येथील शंकरनगर परिसरातील १७ वर्षीय युवती मंगळवारपासून (दि. १०) बेपत्ता असल्याची कैफियत त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे मांडली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. लॅमरोड भागातील धुर्जड मळा परिसरात राहणारी १७ वर्षीय तरुणी शुक्रवारपासून (दि. ६) बेपत्ता आहे. देवळाली कॅम्प पोलिस तिचा शोध घेत आहेत.

  दीड लाखांची घरफोडी

  नाशिक : शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून आडगाव नाका परिसरात चोरट्यांनी भरदिवसा दीड लाखाचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जयेश मगनभाई लिखिया (रा. रानूजी अपार्टमेंट, गांधी पेट्रोल पंपामागे) यांनी फिर्याद दिली आहे. ते व त्यांचे बंधू एकाच इमारतीत वेगवेगळ्या सदनिकांत राहतात. बंधू कुटुंबियांसह बाहेरगावी गेले आहेत. हीच संधी साधून चोरट्यांनी बंद फ्लॅटचे लॅचलॉक उघडून कपाटातील दीड लाखांचा ऐवज चोरून नेला.

  चोरट्यांनी कार पळविली

  नाशिक : मित्राच्या सोसायटीत पार्क केलेली स्विफ्ट कार चोरीस गेल्याचा प्रकार देवळाली गावात घडला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल संजय चव्हाण (रा. जोशी चाळ, पाटील गल्ली मागे) यांनी फिर्याद दिली आहे. चव्हाण यांनी आपली कार बुधवारी (दि.११) रात्री मित्र अत्तर अहमद सय्यद यांच्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. चोरट्यांनी ती चोरून नेली.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. वृत्तसेवा, येवला

  महाविद्यालयीन जीवनातील पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाचे धडे गिरवतानाच नव्या पिढीने तंदुरुस्त व्हावे या दृष्टिकोनातून येवला शहरातील कला व वाणिज्य महाविद्यालयात योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन होतानाच या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी योगचे धडे आत्मसात केले. महाविद्यालयातील कार्यक्रमात स्वामी दत्तानंद सरस्वती यांचेकडून या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे महत्त्व विशद करतानाच या योग कार्यक्रमात सहभागी झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील शिक्षकांना देखील आपल्या उतारवयात ऊर्जा निर्मिती करून गेली.

  महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित येवला शहरातील कला व वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात घेण्यात आलेला योग प्रशिक्षण कार्यक्रम सर्वांनाच आपल्या तंदुरुस्त जीवनासाठीचे योगा अभ्यासाचे धडे देऊन गेला. योग प्रशिक्षक स्वामी दत्तानंद सरस्वती यांनी या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह उपस्थित प्राध्यापकांना देखील योगा अभ्यासाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते. कनिष्ठ महाविद्यालयीन प्रमुख डी. बी. मामुडे यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी योगाचे महत्व सांगताना, योग ही केवळ क्रिया शारीरिक नसून मानसिक व अध्यात्मिक जडण घडणी करिता व विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासा करिता देखील महत्त्वाची आहे हे विचार मांडले. प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांच्या हस्ते स्वामी दत्तानंद महाराज यांचा सत्कार करण्यात आला. योगप्रशिक्षक स्वामी दत्तानंद महाराज यांनी हसत खेळत विविध योगासने,कपालभाती,अनुलोम विलोम, बसरिका इत्यादी क्रिया विद्यार्थ्यांना शिकवल्या.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

  विधानसभा निवडणुकीनंतर निवडून आलेल्या आमदारांना आपल्या मतदारसंघात काम करण्यासाठी चार महिन्यांचा ६५ लाख रुपये आमदार निधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत अद्याप कोणताही शासन निर्णय आला नसला तरी आतापर्यंतच्या अनुभवावरून अधिकाऱ्यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे. यात राज्य सरकार निधीची वाढही करू शकते.

  विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी विलंब आणि घडलेल्या नाट्यमय घडामोडी यामुळे आमदारांचाही हिरमोड झाला. मुख्यमंत्र्यांनी २८ नोव्हेंबरला शपथ घेतली त्यानंतर ३० नोव्हेंबरला विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला. त्यानंतर सरकारचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले. शेतकऱ्यांची मदत, कर्जमाफी व अवकाळी नुकसान या विषयांना अग्रक्रम देण्यात आला. त्यानंतर विविध विभागाचा आढावा घेणे सुरू झाले. आता तर हिवाळी अधिवेशनाची तयारी केली जात आहे. त्यामुळे आमदार निधीचा विषय अद्याप पुढे आलेला नाही.

  कोणत्याही आमदाराला आपल्या मतदारसंघात तातडीने काम करण्यासाठी हक्काचा असा दरवर्षी दोन कोटी रुपयांचा निधी मिळतो. हा निधी आमदार त्यांच्या मतदार संघात विकास कामासाठी खर्च करत असतो. या कामासाठी आमदारांना कोणत्या कामासाठी किती निधी दिला याचे पत्र अगोदर जिल्हा नियोजन मंडळाला द्यावे लागते. त्यानंतर त्याचे इस्टिमेट काढून त्याला प्रशासकीय मान्यता घ्यावा लागते. या सर्व कामांना उशीर लागत असल्याने हा निधी लवकर मिळावा, ही अपेक्षा आमदार करत आहे.

  नव्या आमदारांची अडचण

  नव्याने आलेल्या आमदारांनी अनेक कामांसाठी आश्वासन दिले आहे. त्यामुळे त्यांना तातडीने आपल्या हक्काच्या निधीतून हे पैसे देता येणार आहे. पण, दीड महिना उलटूनही त्यांना हा निधी मिळालेला नाही. त्यामुळे त्यांची अडचण झाली आहे. पुन्हा निवडून येणाऱ्या आमदारांना मात्र यातले बारकावे सर्व माहीत आहे. त्यांनी अगोदर अनेक तातडीचे काम आपल्या निधीतून अगोदरच केले आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  सटाण्यात यात्रोत्सवासाठी पोलिस, पालिका ट्रस्ट सज्ज

  म. टा. वृत्तसेवा, सटाणा

  श्री संत शिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या १३३ व्या पुण्यतिथीनिमित्ताने २२ डिसेंबरपासून साजरा होत असलेल्या यात्रोत्सवासाठी देवस्थान विश्‍वस्त मंडळ, पालिका प्रशासन, पोलिस यंत्रणा तसेच देवस्थान समिती सज्ज झाले आहेत. यात्रोत्सवासाठी दाखल होणाऱ्या यात्रेकरू, भाविक, तसेच व्यापाऱ्यांसाठी सोयीसुविधा देण्यासाठी सटाणावासीय सज्ज झाली आहेत.

  शहरातील आरमनदी पात्रालगत असलेल्या सुकड नाल्या मैदानावर यात्रोत्सव साजरा केला जात असतो. या निमित्ताने देवस्थान समितीने मैदानावरील स्वच्छता करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या सहकार्यने गती घेतली आहे. मंदिर परिसरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत असून रंगरगोटी व स्वच्छता मोहीम पूर्ण झाली आहे.

  सांडपाण्याची समस्या जैसे थे

  यात्रा मैदानावरच शहरातील निचरा होणारे सांडपाणी सोडण्यात येत असल्याने दरवर्षी होणारा हा त्रास कमी करून पालिका प्रशासनाने यासाठी ठोस उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. सांडपाण्याची पर्यायी व्यवस्था होत नाही, तो पर्यंत यात्रेकरूंचे वाहने, मोठ्या ट्रक्स व अवजड वाहने या ठिकाणी प्रवेश करू शकत नसल्याने सांडपाणी निर्मूलन वेळोवेळी देवस्थान समितीला करावे लागत असल्याने समितीने नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे यात्रा परिसरात आरोग्याला देखील बाधा निर्माण हेावू शकते.

  १८ ते २१ डिसेंबर दरम्यान यात्रेकरुंसाठी दुकाने, पाळणे यांच्याकरिता जागा वाटप करण्यात येणार असून या ठिकाणी ३०० हून अधिक दुकानांना देवस्थान जागा वाटप करित असते. या व्यावसायिकांकडून नाममात्र दरात फी आकारली जावून, व्यावसायिकीकरण होवू नये याची देवस्थान काळजी घेत असते. शहरातील पालिका प्रशासनाच्या वतीने दरवर्षी ५१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात असतो. तसेच यात्रापरिसर स्वच्छता, साफसफाई करणे, आरोग्य निरीक्षकांच्या माध्यमातून काळजी घेण्यात येत असते.

  पोलिस फौजफाटा सज्ज

  सटाणा पोलिस ठाण्याचे वतीने यात्रा उत्सव काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, तसेच यात्रा परिसरात दिवसा व सांयकाळी महिला व तरुणीची छेडछाड होवू नये, चोरी व गैरप्रकार टाळण्यासाठी जायखेडा, वडनैर भैरव आदी पोलिस ठाण्यातून विशेष महिला पोलिस व अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे. यात पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक चार, ५० पोलिस व २० महिला पोलिसांची मागणी करण्यात आली आहे.

  ५० सीसीटीव्ही

  देवस्थान समितीच्या वतीने मंदिर परिसराबरोबरच यात्रापरिसरात सुमारे ५० हून अधिक सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याने त्यांचे संपूर्ण नियंत्रण विशेष पोलिस चौकी स्थापन करण्यात येवून त्या ठिकाणाहून होणार आहे. सोबत वॉकीटॉकी व वायरलेस यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून यात्रा काळात २४ दिवस वीज उपलब्ध करण्यात येवून विना व्यत्यत व अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी कटीबद्ध असून वीज चेारी होवू नये यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार आहेत. यंदा प्रथमच यात्रेकरू व भाविकांना उत्तम व दर्जेदार खाऊ, मिठाई, तसेच हॉटेल मधील अन्न चांगले मिळावे यासाठी यात्राकाळात अन्न निरीक्षक यांची मागणी करण्यात आली असून तहसीलदार व देवस्थान समितीने अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे याबाबत पाठपुरावा केला आहे.

  महिलांची दंगल

  शनिवार २८ डिसेंबर रोजी आरम नदीपात्रात कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. गत दोन वर्षांपासून महिलांसाठी विशेष कुस्ती दंगल होत असल्याने यंदा गर्दीचा अंदाज घेवून विर्स्तीण मैदान आखण्यात येणार आहे.

  देवस्थान परिसरासोबतच यात्रा परिसरात स्वच्छता मोहिमेने वेग घेतला आहे. उत्सव समितीने प्रमुख अधिकारी, व्यापारी, समाजसेवकांच्या बैठका घेवून आराखडा व यशस्वी नियोजन केले आहे.

  - भालचंद्र बागड, देवस्थान विश्‍वस्त अध्यक्ष.

  देहू, आळंदी या सारख्या मोठ्या यात्रांच्या अनुभव गाठीशी असल्याने सटाणा शहरातील यात्रा कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिस प्रशासानाने जय्यत तयारी केली आहे.

  - नंदकुमार गायकवाड, पोलिस निरीक्षक

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  कायद्यात तरतूद नसल्याचा कर विभागाचा दावा

  ...

  म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

  शहरात ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणाऱ्या मिळकतधारकांना घरपट्टीत पाच टक्के सवलत देण्याची मागणी सभागृहनेते सतीश सोनवणे यांनी केली असली तरी कायद्यात याबाबत तरतूद नसल्याचे सांगत प्रशासनाने या प्रस्तावाला नकारघंटा कळवली आहे. महापालिकेकडून विविध प्रकारे मिळकतधारकांना १६ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात असल्याने अधिकची सवलत देण्यास आता प्रशासनाचा नकार आहे. त्यामुळे सोनवणे यांच्या प्रस्तावाबाबत महासभा काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागून आहे.

  केंद्र शासनाने नागरी घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम २००० लागू केला आहे. या अधिनियमातील तरतुदींची अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे. घनकचऱ्यावर विल्हेवाटीसाठी महापालिकेने पाथर्डी येथे खत प्रकल्पाची उभारणी केली आहे. शहरात दररोज सुमारे ५०० ते ५५० टन घनकचरा तयार होतो. या कचऱ्याचे ओला, सुका व धोकादायक कचरा असे वर्गीकरण करून घंटागाड्यांमार्फत ते खत प्रकल्पावर विल्हेवाटीसाठी नेले जातात. कचरा संकलनावर महापालिकेचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. ओला कचरा हा अल्पावधीत विघटन होणारा असल्याने या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा हॉटेल व्यावसायिक व अन्य मिळकतधारकांनी निर्माण केल्यास महापालिकेचा कचरा संकलनावरील कोट्यवधींचा खर्च वाचू शकणार आहे. शहरातील हॉटेल, खानावळ व मंगल कार्यालय व्यावसायिक तसेच, स्वतंत्र मिळकत व गृहनिर्माण संस्थांना महापालिकेने घरपट्टीत काही प्रमाणात सूट दिल्यास हे व्यावसायिक व मिळकतधारक स्वयंस्फूर्तीने ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खतनिर्मिती घरच्या घरी करतील. त्यामुळे पालिकेवरील कचरा संकलनाचा भार कमी होऊ शकेल, असा प्रस्ताव सोनवणे यांनी दिला होता. परंतु, याबाबत महापालिका कायद्यात तरतूद नसल्याचे सांगत विविध कर विभागाने या प्रस्तावाला नकारघंटा कळवली आहे. महाापलिकेने विविध प्रकारचे कर भरण्यासाठी १६ टक्क्यांपर्यंत करसवलत देऊ केली आहे. अधिकची सवलत देण्यास प्रशासन तयार नाही. त्यामुळे महासभेच्या कोर्टात आता हा चेंडू गेला आहे. महासभेने मान्यता दिली असली तरी या ठरावाबाबत प्रशासन शासनाकडे मार्गदर्शन मागविणार आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

  महापालिकेच्या ७०० सफाई कर्मचाऱ्यांची आऊटसोर्सिंगने भरती करण्याच्या ठेक्याविरोधात उच्च न्यायालयात काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे याच आऊटसोर्सिंग ठेक्याच्या समर्थनार्थ पंचवटीतील भाजप नगरसेविका पूनम सोनवणे तसेच नाशिक मेहतर समाज सोशल ग्रुपतर्फे महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनासमोर शुक्रवारी 'झाडू मारो आंदोलन' करण्यात आले. त्यामुळे सफाई कर्मचारी संघटनांमध्ये या ठेक्यावरून फुट पडल्याचे चित्र आहे.

  सफाई कर्मचाऱ्यांच्या आऊटसोर्सिंने भरती करण्याचा ठेका आता दिवसेंदिवस वादग्रस्त होत चालला आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या आऊटसोर्सिंगला होणाऱ्या विरोधामुळे मेहतर समाजातील बेरोजगार युवकांची रोजगाराची संधी हिरावली जात असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष अनिल बेग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनाद्वारे केला. यावेळी भाजप नगरसेविका पूनम सोनवणे, अनिल बेग, सचिन चौधरी, वैभव गांगुर्डे, प्रणित गांगुर्डे, जय काळे, रोहित काळे, शुभम अहिरे, ललित तेजाळे, प्रणव मोरे, महेश तेजाळे, कार्तिक तेजाळे, वैभव तेजाळे आदी सहभागी झाले होते.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

  शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली असून, शुक्रवारी महाबळेश्वरपेक्षाही नाशिक कूल ठरले. राज्यातील सर्वांत नीचांकी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली असून, हे यंदाच्या हंगामातील जिल्ह्यातील सर्वांत कमी तापमान ठरले आहे.

  नाशिकमध्ये तापमानाचा पारा घसरत असून, राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान शुक्रवारी नोंदविले गेले आहे. महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी १३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर नाशिकमध्ये १२.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. शहरात गुरुवारी सकाळी किमान तापमान १६.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. शुक्रवारी ते ३.८ अंश सेल्सिअसने घसरले. त्यामुळे भल्या सकाळी घराबाहेर पडलेल्या नाशिककरांनी बोचऱ्या थंडीचा अनुभव घेतला. नाशिकमध्ये रविवारी (दि. ८) १३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले होते. त्यामुळे शुक्रवारी (दि. १३) नोंदविले गेलेले तापमान या हंगामातील सर्वांत नीचांकी तापमान ठरले आहे. नाशिकमध्ये दरवर्षी अगदी पाच ते सहा अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाची नोंद होत असल्याने नाशिककरांना अजूनही कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0
 • 12/13/19--14:30: आदरांजली
 • वसंतराव नारायणराव नाईक

  (क्रांतिवीर)

  पुण्यतिथी

  १४-१२-१९६८

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  वसतिगृहांना सुविधा पुरविण्याचे 'एनजीओं'वर बंधन

  म. टा. प्रतिनिधी, नाशिक

  राज्यातील सामाजिक न्याय विभागाची वसतिगृह उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने वसतिगृहाची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते. पण या वर्गातील वसतिगृहाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जागेच्या अडचणीसह विविध समस्यांना सामोरे जावे लागते. अशा आशयाच्या तक्रारींचा डोंगर झाल्यानंतर सामाजिक न्याय विभागाने आता कठोर पावले उचलली आहेत. तीन महिन्यांच्या आत सुधारणा न केल्यास एनजीओ संचलित वसतिगृहांची मान्यताच धोक्यात येणार असल्याचा इशारा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिला आहे.

  राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारे संचलित अनुदानित वसतिगृह इमारतींमध्ये आवश्यत त्या सुविधा पुरविण्याच्या बंधनासह किमान जागेचे निकषही ठरवून देण्यात आले आहेत. मागास वर्गातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये शिक्षणासाठी निवासाची आवश्यकता असते. अद्यापही बहुसंख्य ठिकाणी समाजकल्याण विभागाची वसतिगृहे उपलब्ध नाहीत. अशा ठिकाणी सामाजित संस्थांद्वारे वसतिगृह चालविण्यासाठी अनुदान दिले जाते. पण सामाजिक संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या या वसतिगृहांमध्ये अपूर्ण जागेसह पायाभूत सुविधांअभावी संघर्ष करावा लागत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी अन् विविध संघटनांकडून उपलब्ध होत होत्या.

  विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात स्वतंत्र स्वयंपाकघर, भोजनकक्ष, कोठीघर, प्रसाधनगृह, स्नानगृह, प्रसाधनगृह व अधिक्षकांचे निवासस्थान अशा सुविधांनी युक्त अशी वसतिगृहाची इमारत असावी अशी या संदर्भातील सरकारच्या निर्णयात तरतूद आहे. याशिवाय विद्यार्थीनिहाय जागा निश्चिती करताना शयनकक्ष व भोजनकक्ष यासाठी किमान २४ ते कमाल ४० चौरसफूट या प्रमाणात जागा आवश्यक असल्याचे शासन निर्णय सांगतो. पण इतर सुविधांसाठी जागेबाबतच्या तरतूदी स्पष्ट नव्हत्या. या रचनेत सुधारणा करताना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अवर सचिव अनिल आहिरे यांनी नवीन अध्यादेश काढला आहे. त्यानुसार, या प्रकारातील वसतिगृहांसाठी भाडे निश्चित करण्याच्या अनुषंगाने जागेचे किमान व कमाल क्षेत्रफल निश्चित करण्यात आले आहे.

  असे आहेत एनजीओ संचलित वसतिगृहांसाठी नवे निकष :

  \Bविद्यार्थी संख्या.................किमान जागा (चौरस फूट)................कमाल जागा (चौरस फूट)

  २४ ..............................४००० ........................................४९००

  ४८ ..............................६००० ........................................७३१५

  ७५ ..............................९१२० ........................................११०५०

  १०० \B ..............................११२०० ......................................१३६३०

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  समितीकडून होणार तीन वर्षांची चौकशी; अधिकाऱ्यांना भरली धडकी

  म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भुवनेश्वरी एस. यांच्या कामकाजाबाबत पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीनंतर बुधवारपासून सहा सदस्यीय समितीने चौकशी सुरू केली. यात ही समिती तीन वर्षाचा ताळेबंद तपासत असून त्यामुळे काही पदाधिकारी व अधिकाऱ्यांना धडकी भरली आहे. भुवनेश्वरी एस. यांचा कार्यकाळ अवघ्या पाच महिन्यांचा आहे. पण, या समितीने मागील सर्व चौकशी सुरू केल्याने यात नेमके काय पुढे येते हे महत्त्वाचे ठरणार आहे.

  तीन दिवसांपासून सहा सदस्यीय समिती कार्यालयीन वेळेत ही चौकशी करत आहे. या समितीमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाचे विकास योजना उपायुक्त ए. एस. मोरे, नियोजन उपायुक्त प्रदीप पोतदार, सहाय्यक आयुक्त (तपासणी) एस. जी. सांगळे, सहाय्यक संचालक (विकास) चंद्रकांत वानखेडे, सहाय्यक लेखा अधिकारी विकास अस्थापना एस. टी. जगताप, प्रभारी सहाय्यक गट विकास अधिकारी (प्रशासन) शरद पवार यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात या समितीने ठाण मांडले असून त्यामुळे अनेकांचे धाबेही दणाणले आहे. दरम्यान, या तक्रारीत पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांचे भुवनेश्वरी एस. यांनी गुरुवारी खंडन केले होते. त्यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समितीच्या सभापतीचा कार्यकाळ २० डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे ही चौकशी त्यांच्या कार्यकाळात पूर्ण होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

  सीईओ यांच्या कामकाजावर असमाधान व्यक्त करत जिल्हा परिषदेच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रार करणाऱ्यांमध्ये अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित तसेच विशेष समितीचे सभापती, सर्व पक्षाचे गटनेते यांचा समावेश आहे. या तक्रारीत जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीत अखर्चित निधी हा प्रमुख मुद्दा आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  पीएफ निधीकडे दुर्लक्ष पडले महागात

  म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

  कामगारांच्या भविष्य निधी भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या २७८ कंपन्यावर आठ महिन्यात ईपीएफ कार्यालयाने कारवाई करत त्यांचे बँक खाते व चल संपत्ती यावर टाच आणली आहे. या कंपन्याकडून आतापर्यंत या कार्यालयाने १७ कोटी ८४ लाख वसूल केले आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व अहमदनगर या पाच जिल्ह्यातील कंपन्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

  कामगारांचे पैसे व कंपन्याचा वाटा असे पैसे कर्मचारी भविष्य निधीत कंपनीने भरणे आवश्यक असते. पण, ईपीएफ कार्यालयाने चौकशी केल्यानंतर अनेक कंपन्या हे पैसे भरत नसल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर ७ अ अंतर्गत या कार्यालयाने ६५० कंपन्यांची चौकशी सुरू केली. त्यातील आतापर्यंत १४० कंपन्याची चौकशी पूर्ण झाली असून ५१० कंपन्याची चौकशी सुरू आहे. यात चौकशी अतंर्गत १४० कंपनीकडे १३ कोटी ९८ लाख ८० हजार थकबाकी असल्याचे आढळले. त्यानंतर यातील ७१ कंपन्यांनी १० कोटी १९ लाख ७२ हजार रुपये आतापर्यंत भरले आहे. ६९ कंपन्याकडे अजूनही ३ कोटी ७९ लाख बाकी आहे. त्यांचे बँक अकाउंट व चल संपत्तीवर टाच आणली आहे.

  पैसे न भरणाऱ्या कंपन्याबरोबर लेट निधी जमा करणाऱ्या कंपन्यावरही या कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला. कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी १५ तारखेपर्यंत भरणे अपेक्षित असतो. तो भरला नाही तर दंड व व्याजही आकारले जाते. या कारवाईत ईपीएफ कार्यालयाने १४ ब व ७ क्यू अंतर्गत कारवाई केली आहे. त्यात १ हजार ४७८ कंपन्या कर्मचारी भविष्य निधी उशिरा भरत असल्याचे आढळले. त्यातील ६९९ कंपन्याची चौकशी पूर्ण करून त्यांच्यावर १३ कोटी ९५ दंड निश्चित केला आहे. त्यातील ७ कोटी ६४ लाख ५७ हजार दंड आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे. यातील १६९ कंपन्याचे बँक अकाऊंट जोडण्यात आले आहे.

  कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाधी निधी वेळेवर भरावी यासाठी आठ महिन्यात पाच जिल्ह्यात कारवाई केली. त्यात कंपन्याचे बँक अकाऊंट, चल संपत्तीवर टाच आणली आहे. त्यात वसुली सुद्धा करण्यात आली आहे.

  - एम. एम. अशरफ,

  विभागीय आयुक्त, कर्मचारी भविष्य निधी कार्यालय

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  महापालिकेतर्फे गांधी तलावात कामाला सुरुवात

  ...

  म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात गोदावरी नदीपात्रात काँक्रिटीकरण करण्यात आले होते. यामुळे पात्रातील प्राचीन कुंड आणि जलस्त्रोत बुजले गेले. पात्राची खोली कमी झाल्यामुळे थोड्या पावसातही पुराचा धोका निर्माण होऊ लागला होता. पात्रातील काँक्रिटीकरण काढण्यासाठी देवांग जानी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी (दि. १३) गांधी तलावातील काँक्रिटीकरण काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यासाठी तलावातील गाळ, वाळू आणि दगड काढण्याचे काम पोकलंडच्या साह्याने सुरू करण्यात आले.

  सिंहस्थाच्या विकासकामात अहिल्याबाई होळकर पूल ते टाळकुटेश्वर पुलापर्यंतच्या सुमारे दीड किलोमीटरच्या अंतरापर्यंतचे गोदापात्र काँक्रिटीकरण करण्यात आलेले आहे. थेट गोदापात्रात काँक्रिटीकरण केल्याने पात्रातील नैसर्गिक जलस्त्रोत आणि १७ प्राचीन कुंड बुजले गेले. उन्हाळ्यात या जलस्त्रोतातून तसेच कुंडातून पाण्याचे झरे वाहत होते. या अगोदर गोदावरीचे पात्र कधी कोरडे पडले नाही. सन २०१६ च्या दुष्काळावेळी गोदापात्र कोरडेठाक पडले होते. जलस्त्रोत आणि १७ प्राचीन कुंड पुनर्जिवीत करावे, यासाठी देवांग जानी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने गोदावरी पात्रातील काँक्रिटीकरण काढण्याचे आदेश दिले होते.

  स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात येणाऱ्या गोदा प्रोजेक्टनुसार गोदापात्रातील गांधी तलावातील काँक्रिटीकरण काढण्याच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली. गोदाप्रेमी देवांग जानी, स्मार्ट सिटीचे कन्सल्टंट शब्बीर सय्यद, प्रोजेक्ट मॅनेजर संजय कुमार, उदय शंकरकुमार यांच्या उपस्थितीत कामाला सुरुवात करण्यात आली. त्यासाठी अगोदर गांधी तलावात साचलेला गाळ, वाळू आणि दगड काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अहिल्यादेवी होळकर पूल ते गाडगे महाराज पुलापर्यंतच्या नदीपात्रातील काँक्रिटीकरण टप्याटप्य्याने काढण्यात येणार आहे. त्यामुळे गोदापात्राची खोली वाढणार आहे. पुराचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. नैसर्गिक जलस्त्रोत पुनर्जिवीत होणार असल्याने गोदावरी प्रवाहीत होणार असल्याचा आनंद व्यक्त करीत स्थानिक नागरिकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

  गांधी तलावातील काँक्रिटीकरण काढण्याचे काम साधारतः १५ दिवसांत पूर्ण होण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. गोदापात्रातील काँक्रिटीकरण काढण्याच्या कामाच्या शुभारंभास लोकप्रतिनिधी व महापालिकेचे अधिकारी यांनी पाठ फिरवली.

  ......

  विरोधकांची चुप्पी

  गोदापात्रातील काँक्रिटीकरण काढण्याच्या कामाला विरोध होत आहे, अशी चर्चा होत आहे. मात्र, कोणी विरोधक थेट विरोध करीत नसल्याचे दिसते. गांधी तलावातील काँक्रिटीकरण काढताना विरोध करण्यासाठी समोर कुणी आले नाही. त्यामुळे विरोधक कोण आहे, हे समजत नाही.

  ....

  गोदापात्रातील नैसर्गिक जलस्त्रोत व प्राचीन १७ कुंड पुनर्जिवीत करण्यासाठी गेली पाच वर्षे उच्च न्यायालयात लढा दिला. गोदापात्रातील काँक्रिटीकरण काढण्याच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. गोदावरी पूर्वीप्रमाणे प्रवाहीत होण्यास मदत होणार आहे.

  - देवांग जानी, अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती

  ...

  काँक्रिटीकरण काढल्याने गोदापात्रातील जलस्त्रोत मोकळे होतील. नदी प्रवाहीत होईल. काँक्रीट काढल्याने पात्रात गाळ साचू शकतो, तो वेळोवेळी काढावा लागेल. पात्रातील काँक्रीट काढणे योग्य आहे.

  - गिरीश टकले, इतिहास अभ्यासक

  .......

  काँक्रिटीकरणाने प्राचीन कुंडातील जिवंत झरे होते, ते बुजले गेले आहेत. त्यामुळे काँक्रीट काढले पाहिजे. नदीपात्रात पुन्हा काँक्रीट होऊ नये, यासाठी योग्य नियोजन केले पाहिजे.

  - देवेंद्र पांड्या, अभ्यासक

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

  शहरातील संगमेश्वर भागातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या रामसेतू पुलाचे कठडे ऑगस्ट महिन्यात मोसम नदीला आलेल्या पुरामध्ये वाहून गेले होते. मात्र आता सहा महिने उलटून देखील या पुलाच्या कठड्यांचे काम प्रलंबित असून, पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत बुधवारी (दि. ११) शहरातील जनाधिकार रक्षा मंच यांच्यावतीने करण्यात आला. यासाठी पुलावर स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. पुलाच्या कठड्याचे काम तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

  संगमेश्वर परिसरातील रामसेतू पूल शहरातील मुख्य बाजारपेठ व संगमेश्वर परिसराला जोडणार महत्वाचा पूल आहे. पुलाच्या पूर्वेकडे व्यापारी पेठ, बाजार, मनपा मुख्य इमारत, वाडिया रुग्णालय, जामा मशीद, तांबा काटा, काकाणी शाळा असा परिसर असून पश्चिमेस देखील महात्मा फुले मार्ग, वर्धमान शाळा, संगमेश्वर परिसर आहे. त्यामुळे या पुलावरून नेहमीच वाहतूक वर्दळ असते. ऑगस्ट महिन्यात मोसम नदीला आलेल्या पुरामध्ये या पुलाचे कठडे वाहून गेले. त्यानंतर पालिकेकडून तात्पुरते बांबू याठिकाणी बांधण्यात आले होते. मात्र सहा महिने उलटून देखील येथील कठड्याचे काम पालिकेकडून झालेले नाही. सध्या हा पूल कठडे नसल्याने धोकादायक झाला आहे. यावेळी जनाधिकार रक्षा मंचचे नेविल कुमार तिवारी, कपिल शर्मा, राम गवळी, कपिल डांगचे, कैलास शर्मा, अर्जुन भाटीया, जगदीश गो-हे आदींसह मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनावर ७००हून अधिक विद्यार्थ्यांनी सह्या केल्या आहेत.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

  भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदेनी गोदावरी नदीवरील प्रस्तावित ३६ कोटी रुपये किंमतीच्या दोन नवीन पुलाबाबत आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेने जलसंपदा विभागाकडे मागवलेला अभिप्राय महापालिकेला मिळाला आहे. महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या गोदावरी नदीबाबतीत शहर विकास आराखड्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी, असा मोघम अभिप्राय जलसंपदा विभागाने दिल्याने पूल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपच्या अंतर्गत वादामुळे जलसंपदा विभागाने या पुलांबाबत 'नरो वा कुंजरो वा'ची भूमिका घेतल्यानंतर फरांदे याबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.

  गोदावरी नदीपात्रात पंपिग स्टेशनसह शिंदे मळ्यालगत नवीन दोन पूल उभारण्यासाठी स्थायी समितीच्या तत्कालिन सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी पालिकेच्या बजेटमध्येच तरतूद केली होती. महासभेने या पुलांच्या उभारणीला हिरवा कंदिल दाखविला होता. मात्र नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी मात्र या पुलांच्या उभारणीस कडाडून विरोध दर्शवित हा पूल बिल्डरांसाठी बांधले जात असल्याचा आरोप केला होता. या पुलांच्या उभारणीवरून विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये अंतर्गत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. आहेर-आडके यांनी या पुलांच्या उभारणीची गरज व्यक्त करताना समर्थन केले होते. तर दुसरीकडे फरांदे यांनी पूल उभारल्यास अर्धे शहर पाण्यात जाईल, असा दावा केला होता.

  'नवीन पूल बांधून नका' असे सांगत, आधीचेच पूल पाडण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले होते. केंद्रीय विद्युत व जल विभागाने गोदावरीच्या पुरासंदर्भात अभ्यास केल्यानंतर आधीच्याच पुलामुळे पाणी आडून पुररेषा वाढल्याचाही निष्कर्ष त्यांनी मांडला होता. शिंदे मळा व पपिंग स्टेशन येथे नवीन पूल तर सोडाच; मात्र आहे ते फॉरेस्ट नर्सरी पूल आणि आसाराम बापू पूल पाडून त्याच ठिकाणी नवीन पूल बांधावेत, असा पर्यायही त्यांनी सुचविला होता. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत सुरू असलेल्या वादामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या पुलांच्या उभारणीसंदर्भात जलसंपदा विभागाकडून अभिप्राय मागविण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर आता जलसंपदा विभागाचा अभिप्राय पालिकेला प्राप्त झाला असून, पुलांच्या उभारणीसंदर्भात शहर विकास आराखड्यानुसार निर्णय घ्या, असे उत्तर पाठविले आहे. त्यामुळे हा अप्रत्यक्षपणे पूल उभारणीसाठी ना हरकत दाखलाच असल्याचे सांगत, पालिकेने पुलांचे टेंडर काढण्यास सुरूवात केली आहे.

  फरांदेच्या भूमिकेकडे लक्ष

  आमदार देवयानी फरांदे यांनी या पुलांच्या उभारणीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. या पुलाच्या उभारणीत माजी पालकमंत्री तथा तत्कालिन जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या निकटवर्तीयाचा संबंध असल्याची चर्चा होती. त्यामुळे महाजन यांनीही आमदारांना पालिकेच्या राजकारणात हस्तक्षेप न करण्याचा सल्ला दिला होता. परंतु, आता राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. जलसंपदा विभागानेच या पुलांबाबत अप्रत्यक्षरित्या ना हरकत दाखलाच दिल्याने पुलांची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे जलसंपदाच्या निर्णयाबाबत फरांदे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, नाशिक

  महाराष्ट्र राज्य सतरावा आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठात नुकताच झाला. या सांस्कृतिक महोत्सवात नृत्य, नाट्य, संगीत, ललितकला आदी कला प्रकारांमध्ये इंद्रधनुष्य स्पर्धा झाली. यात केटीएचएम महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या प्रणव कोंटुरवार या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने फोक ऑर्केस्ट्रॉ या प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला. तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे स्पर्धेत सहभागी झाला होता. फोक ऑर्केस्ट्रॉ या प्रकारात महाराष्ट्रातील २० विद्यापीठे सहभागी झाले. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. या यशाबद्दल मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सरचिटणीस नीलिमा पवर, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघोनाना अहिरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, सर्व संचालक मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्रा. तुषार पाटील, प्रा. योगेशकुमार होले यांनी प्रणवचे अभिनंदन केले आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

  रस्ते आणि महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी इंडियन ऑइल आणि महाराष्ट्र पोलिसांनी 'महामार्ग शिष्टाचार' ही मोहीम सुरू केली आहे. त्यात राज्यभरातील महामार्गावर जागृती करण्यात येणार आहे. महामार्गावर होणाऱ्या जीवघेण्या आणि इतर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हा उपक्रम आहे. यात वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सुरक्षित वाहतुकीसाठी काय दक्षता घ्यावी, याच्या टीप्स देण्यात येणार आहे. वर्षभर हा उपक्रम सुरू राहणार असल्याची माहिती इंडियन ऑइल कंपनीने दिली आहे.

  मुंबई येथे इंडियन ऑइलचे कार्यकारी संचालक (ब्रँडिंग) सुबोध डाकवाले आणि राज्याच्या वाहतूक विभागाचे अतिरीक्त पोलिस महासंचालक विनय कारगावकर यांनी या मोहिमेचे उद्घाटन केले. नाशिकमध्येही जानेवारीपासून हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती उपव्यवस्थापिका अंजली भावे यांनी दिली. राज्यातील प्रमुख राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर ही मोहीम राबविण्याचे काम आता सुरू झाले आहे.

  दिवसेंदिवस रस्ते वाहतूक असुरक्षित होत असून, ती सध्या धोकादायक पातळीवर आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी वाहनचालकांच्या सवयी बदलल्या पाहिजेत. राज्य महामार्ग पोलिसांच्या सहकार्याने सुरू केलेल्या या मोहिमेमुळे वाहन चालकांना सुरक्षित पद्धतीने वाहन चालविण्याची सवय लागेल. महामार्ग वाहतूक सुरक्षेबाबतही जागृती निर्माण होईल, असे इंडियन ऑईलतर्फे सांगण्यात आले.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, नाशिक

  चक्रदार, परण, तिहाई, कायदे पलटे असे तबल्यातील एकापेक्षा एक प्रकार नाशिककर रसिकांना ऐकायला मिळाले. निमित्त होते, पवार तबला अकादमी सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'तालाभिषेक' या कार्यक्रमाचे. पं. भानुदास पवार स्मृती संगीत महोत्सव (वर्ष २२ वे) आणि तालाभिषेक (चौथे पुष्प) या निमित्त हा कार्यक्रम शुक्रवारी कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड येथे पार पडला.

  महोत्सवाची सुरुवात पवार तबला अकादमीचे विद्यार्थी दुर्गेश पैठणकर, राधिका रत्नपारखी आणि सारंग तत्त्ववादी यांच्या तबला सहवादनाने झाली. त्रितालातील तिस्त्र जातीत त्यांनी तबला सहवादन केले. यावेळी त्यांनी सादर केलेल्या पेशकार, कायदे, रेले, गत, तुकडे, चलन, चक्रदार यांच्या वादनाने रसिक मुग्ध झाले. त्यांना इश्वरी दसककर यांनी हार्मोनियमची साथ केली. त्यानंतर डॉ. अविराज तायडे यांचे शिष्य रिया पोंदे, दिशा दाते, ओंकार कडवे, मानसी सबनीस जोशी यांचे गायन झाले. रिया पोंदे यांनी राग बागेश्री, दिशा दाते यांनी राग कलावती, ओंकार कडवे यांनी राग ओडव बागेश्री तर मानसी सबनीस यांनी भजन सादर केले. गौरव तांबे यांनी यांना तबल्याची तर संस्कार जानोरकर यांनी संवादिनीची साथ केली.

  कार्यक्रमाची सांगता डॉ. अलका देव मारुलकर यांची शिष्या सुप्रसिद्ध गायिका कल्याणी दसककर तत्त्वावादी यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी राग संपूर्ण मालकंस सादर केला. बडा ख्याल बंदीश सादर केली. विलंबित एकतालात सादर केलेल्या 'ऐरी मै कैसे खेलू वसंत' आणि 'छोटा ख्याल प्रितम प्यारे' सादर केला. यानंतर 'सजनवा सावन बिता जाय' ही भैरवी सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. त्यांना ईश्वरी दसककर, संस्कार जानोरकर (संवादिनी), गौरव तांबे आणि सारंग तत्त्ववादी (तबला) यांनी साथसंगत केली. या कार्यक्रमाला पं. ओंकार गुलवडी, पं. शशिकांत मुळये यांची विशेष उपस्थिती लाभली.

  महोत्सवात आज

  महोत्सवाची शनिवार (दि. १४) सुरुवात गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी सहा वाजता नाशिकचे सुप्रसिद्ध गायक व गुरू डॉ. अविराज तायडे यांच्या शास्त्रीय गायनाने होईल. यानंतर नाशिकच्या सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना विद्याहरि देशपांडे या कथक नृत्य सादर करतील. पं. योगेश समसी यांचे शिष्य यशवंत वैष्णव (मुंबई) यांच्या स्वतंत्र तबलावादनाने कार्यक्रमाची सांगता होईल.

  लोगो : कल्चर वार्ता

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  नाशिक : संदीप फाउंडेशन संचलित संदीप इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच युनिव्हर्सल ह्यूमन व्हॅल्यूज या विषयावर सात दिवसीय कार्यशाळेला सुरुवात झाली.

  कार्यशाळेत शिक्षकांची जबाबदारी, युनिव्हर्सल ह्यूमन व्हॅल्यूज, कृतज्ञता, परिवार मूल्य, आजची शिक्षण व्यवस्था आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्राध्यापकांसाठी होणाऱ्या या कार्यशाळेत तंत्रशिक्षण परिषदेतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. योगेश पाटील यांनी परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली. डॉ. सुरेंद्रकुमार के. पाठक यांनी इंडक्शन कार्यक्रमाचे महत्त्व तसेच विद्यार्थी व शिक्षक यांचे परस्पर संबंध याविषयी माहिती दिली. अभ्यासक्रमातील बदल तसेच परिषदेने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन केले.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

  महापालिकेत नगरसेवकांना दिल्या जाणाऱ्या नगरसेवक निधीतील कामांमध्ये भ्रष्टाचार सुरू असून, या कामांच्या नावावर जनतेच्या पैशांची अक्षरश: लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला आहे. नगरसेवक निधीतील कामांचा आयुक्तांनी हिशेब द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

  महापालिकेची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत, शहरातील विविध प्रश्नांबाबत आपण येत्या मंगळवारी (दि. १७) आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेणार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून महापालिकेत सुरू असलेल्या अनागोंदी कारभारावर जोरदार टीका केली. शहरातील पाणीप्रश्न, वाहतूककोंडी, एमआयडीसीतील अनागोंदी आणि शहरातील रस्त्यांच्या दूरवस्थेकडे लक्ष वेधत पाटील यांनी महापालिकेतील पदाधिकारी आणि प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. महापालिकेतील लोकप्रतिनिधीच भ्रष्ट कामांमध्ये गुंतल्याने शहरविकास ठप्प झाल्याचा आरोप करत जनतेच्या करातून जमा झालेल्या निधीचा चुकीच्या कामांवर खर्च सुरू असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

  नगरसेवक निधीची पालिकेच्या कायद्यात तरतूद नसताना नगरसेवकांना लाखो रुपयांचा नगरसेवकनिधी दिला जात आहे. या निधीतून ठोस कामे उभी राहत नसल्यामुळे नागरिकांना त्याचा काहीही लाभ होत नाही. प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारावर पालिकेतील पदाधिकारी बोलण्यास तयार नाहीत, असे नमूद करत पालिकेच्या कामकाजाचे शासनाने ऑडिट करावे, अशी मागणी पाटील यांनी केली. नगरसेवक निधीतील कामांचा हिशेब आयुक्तांनी सात दिवसात द्यावा, अशी मागणी करताना यासंदर्भात मंगळवारी आयुक्तांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  एकही रिंगरोड नाही

  शहरात रस्त्यांवर दरवर्षी कोट्यावधीचा खर्च केला जातो. महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन हे रस्त्याच्या ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे. शहरात गेल्या दहा वर्षात एकही नवीन रिंगरोड झाल्याचे दाखवून दिल्यास आपण राजकारण सोडू, असा दावाही पाटील यांनी केला. नगरसेवक आणि प्रशासनाने आपल्या कामांचा हिशेब जनतेला द्यावा, असे आव्हान पाटील यांनी दिले आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

  भरधाव आयशर ट्रकने एसटी बसला धडक दिल्याने प्रवासी, ट्रकचालकासह १५ जण जखमी झाले आहेत. कन्नड घाटातील महादेव मंदिराजवळील वळणावर दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात ट्रकची व बसची समोरची बाजू दाबली गेली. सुदैवाने जीवितहानी टळली. अमळनेर आगाराची पुणे-अमळनेर बस (एमएच २०/बीएल २५१८) औरंगाबादकडून चाळीसगावकडे येत होती. एसटीत एकूण २१ प्रवासी होते. त्या वेळी भरधाव आयशर ट्रकने (एमएच २०/डीई७३८४) बसला धडक दिली. जखमींना तातडीने चाळीसगावच्या ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्र राज्य सतरावा आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठात नुकताच झाला. या सांस्कृतिक महोत्सवात नृत्य, नाट्य, संगीत, ललितकला आदी कला प्रकारांमध्ये इंद्रधनुष्य स्पर्धा झाली. यात केटीएचएम महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या प्रणव कोंटुरवार या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने फोक ऑर्केस्ट्रॉ या प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला. तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे स्पर्धेत सहभागी झाला होता. फोक ऑर्केस्ट्रॉ या प्रकारात महाराष्ट्रातील २० विद्यापीठे सहभागी झाले. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. या यशाबद्दल मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सरचिटणीस नीलिमा पवर, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघोनाना अहिरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, सर्व संचालक मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्रा. तुषार पाटील, प्रा. योगेशकुमार होले यांनी प्रणवचे अभिनंदन केले आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. वृत्तसेवा, मनमाड: जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पदाचा जबाबदारीने वापर करीन. मला सत्ताधारी पक्ष असो की विरोधी पक्ष दोन्ही सारखेच आहेत, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी मनमाड येथे केले. खासगी कौटुंबिक कामासाठी मालेगाव येथे जात असताना येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोंडभरून स्तुती केली. शेतकऱ्यांचे, जनतेचे प्रश्न जाणणारा सक्षम व संवेदनशील मुख्यमंत्री राज्याला लाभला असून, ते जनतेचे प्रश्न नक्की सोडवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  पटोले म्हणाले, की मी ज्या पदावर आहे, त्या पदामुळे मला कुणाचीही खदखद ही विधानसभेतच मिटवता येईल. मला सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांचे सदस्य सारखेच आहेत. खडसे आणि पंकजा मुंडे यांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे मी यावर बोलू शकत नाही. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष आपल्याला नवीन नाहीत. त्यांचा स्वभाव मला माहीत असून, विधानसभेत होणाऱ्या गोंधळामुळे जनतेचे प्रश्न मागे पडतात. त्यामुळे दोन्ही पक्षांना हाताळून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक कशी करता येईल, हाच माझा प्रयत्न राहील. चांगल्या कामांना विरोधी पक्षदेखील साथ देईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. आमदार सुहास कांदे, माजी आमदार अनिल आहेर, मनमाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष अफजल शेख, नगरसेवक संजय निकम, रवींद्र घोडेस्वार, सुनील गवंदे, संतोष आहिरे, तहसीलदार मनोज देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. जी. खैरनार, ऑल इंडिया एससी-एसटी असोसिएशनचे सतीश केदारे आदींनी पटोले यांचे स्वागत केले.

  विधानसभेत होणाऱ्या गोंधळामुळे जनतेचे प्रश्न मागे पडतात. त्यामुळे दोन्ही पक्षांना हाताळून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक कशी करता येईल, हाच माझा प्रयत्न राहील. चांगल्या कामांना विरोधी पक्षदेखील साथ देईल.

  नाना पटोले, अध्यक्ष, विधानसभा

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  नाशिक: 'नागरिकत्व सुधारणा कायदा (कॅब - citizenship amendment bill) हा देशासाठी आवश्यक आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाला बळी न पडता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात या कायद्याची अंमलबजावणी करावी. त्यावरून काही पेचप्रसंग निर्माण झाल्यास सरकार वाचवण्यासाठी भाजप शिवसेनेशी तडजोड करण्यास तयार आहे,' अशी खुली ऑफरच आमदार आशिष शेलार यांनी आज शिवसेनेला दिली.

  नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारनं आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी नुकतीच मंजुरी दिली. मात्र, हा कायदा महाराष्ट्रात लागू होणार की नाही, यावरून संभ्रम आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनं या कायद्याच्या अंमलबजावणीला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यामुळं हिंदुत्ववादी विचारांच्या सेनेची कोंडी झाली आहे. हीच संधी साधत भाजपनं शिवसेनेला ऑफर दिली आहे. 'महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचं सरकार आहे. हे सरकार वाचविण्यासाठी शिवसेनेनं देशहिताकडं दुर्लक्ष करू नये. शिवसेनेनं कोणालाही न घाबरता आपला मूळ बाणा दाखवावा,' असं शेलार म्हणाले. 'सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण हा भाजपचा कधीच हेतू नव्हता. घुसखोरांना घालवलंच पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यामुळंच आम्ही शिवसेनेशी तडजोडीला तयार आहोत, असं ते म्हणाले.

  दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसनं आयोजित केलेल्या 'भारत बचाव' रॅलीची शेलार यांनी खिल्ली उडवली. 'या आंदोलनाचं नाव 'भारत बचाव' असं असलं तरी हेतू वेगळा आहे. भारतात घुसलेल्या पाकिस्तानी व अफगाणिस्तानी घुसखोरांना वाचवा, हीच काँग्रेसची भूमिका आहे. 'भारत बचाव' केवळ नौटंकी आहे,' असा टोला त्यांनी हाणला.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट