Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

टेम्पो ट्रॅक्स उलटून वाहनचालक ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पो ट्रॅक्सचे टायर फुटून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. गिरणारे रोडवर शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यात १२ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अर्जुन सोळे (वय ४५) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जातेगाव येथून १० ते १२ नागरिक व काही मजूर हे गिरणारे येथे जाण्यासाठी टेम्पो चालक सोळे यांच्या वाहनांत बसले होते. गिरणारे रस्त्याने हा टेम्पो जात असताना ड्रायव्हरच्या पुढील भागाजवळील टायर फुटले. यामुळे टेम्पो ट्रॅक्स (एमएच ११ एके २०६३) उलटला. यात टेम्पोच्या कॅबिनमध्ये दबल्याने वाहनचालक सोळेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मदतकार्य सुरू केले. सर्व जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात परशुराम साळधावे, रामदास जामू सोळे, भीमा गणपत पवार, भास्कर राजाराम

पवार, यादव मारूती वाघेरे, शंकर पवार, कृष्णा मोहन लोखंडे, अंबादास रायडे, दीपक वाघेरे हे जखमी झाले आहेत. या अपघाताबाबतच अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सोलंके करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उघड्या घरातील दागिन्यांवर डल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून घरात प्रवेश केलेल्या चोरट्याने ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. काठेगल्ली परिसरातील सिध्दटेक सोसायटीत शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

या प्रकरणी लता अशोक शहरकर (वय ५७) यांनी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. शहरकर यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना चोरट्याने घरात प्रवेश करून खुर्चीवर काढून ठेवलेले ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.

एक लाख रुपयांची चोरी बंद घराचे कुलूप, कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी एक लाख रुपयांची चोरी केल्याची घटना गंगापूर रोडवरील रामेश्‍वर नगर येथे घडली. शुक्रवारी ही घरफोडी उघडकीस आली. गंगापूररोडवरील रामेश्वरनगर येथील नितीन युवराज चौधरी (वय २३) यांच्या घरी ७ ते १० मार्चदरम्यान चोरट्यांनी ही घरफोडी केली. बाहेरगावी गेलेले चौधरी घरी परतल्यानंतर त्यांना दरवाजा उघडा दिसला. घराची पाहणी केली असता घरातील एक लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास झाल्याचे समजले.

मुलीचा विनयभंग सिडकोतील पंडितनगर भागात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या बहिणीने अंबड पोलिसांकडे तक्रार दिली असून, संशयिताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित १६ वर्षांची मुलगी मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घराकडे पायी जात असताना दर्पन (पूर्ण नाव माहित नाही) या संशयिताने मुलीस अडवून तिच्याशी अंगलट केली. याची माहिती मुलीने बहिणीस दिल्यानंतर त्यांनी शुक्रवारी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.

ट्रकची चोरी बनावट चावीचा वापर करून भगूर येथून चोरट्यांनी ट्रक चोरी केला. बारा लाख रुपये किमतीच्या ट्रकवर चोरट्यांनी हात साफ केला. भगूर येथे राहणाऱ्या आनंद भास्कर गायकवाड यांचा टाटा कंपनीचा ट्रक (एमएच १५ डीके ३१०६) घराजवळ लावलेला होता. चार मार्च रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्याने बनावट चावीचा वापर करून डंपर चोरून नेला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकमालकाची फसवणूक ट्रक विकून देतो असे सांगत त्याचा परस्पर अपहार करणाऱ्या संशयिताविरोधात भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडाळारोडवरील अक्तरखान मेहमूद खान (वय ५०) यांचा एमएच १५ बीजे ७३०९ क्रमांकाचा चार लाख रुपये किमतीचा ट्रक विक्री करायचा होता. १५ एप्रिल २०१५ च्या आधी चौकमंडई येथील संशयित गुड्डू बजरंगी पांडे आणि सारडा सर्कल येथील इम्रान शेख यांनी तुमचा ट्रक विकून देऊ असे खान यांना सांगितले. दोघांनी ट्रकही दिला नाही किंवा पैसेही दिले नाही. खान यांनी दिलेल्या अर्जाची चौकशी पूर्ण केल्यानंतर घटनेच्या तब्बल ११ महिन्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.

कामगार गंभीर जखमी नाशिकरोड : एकलहरा औष्णिक वीज केंद्रातील चिमणीवर काम करताना पडल्याने कामगार गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिटल इंजिनीअरिंगध्ये कामास असलेला कामगार बबलू सैय्यद (वय ३७) हा केंद्राली चिमणीवर काम करीत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीची विद्यार्थी कार्यकारिणी जाहीर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कार्यकारिणी शहराध्यक्ष गौरव गोवर्धने यांनी जाहीर केली असून, त्यात ३८ जणांना स्थान दिले आहे. तसेच महिला राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारीणी अध्यक्षा सुनीता निमसे जाहीर केली आहे.

या कार्यकारिणीत पक्षाच्या निष्ठावंत विद्यार्थी व महिला कार्यकार्त्यांसमवेत नवीन व जुन्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. विद्यार्थ्यांना उद्भवणारे प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करावे, असे आवाहन शहराध्यक्ष गौरव गोवर्धने यांनी केले.

कार्यकारिणी : शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, कार्याध्यक्ष दिलीप सैनी, उपाध्यक्ष सागर पाटील, दत्ता कुटे, सुरज सरोवर, केविन संचेती. सरचिटणीसपदी राहुल गायकवाड, यशराज गोवर्धने, श्रीकांत राऊत, मेराज जोशी. चिटणीसपदी संकेत निमसे, सुरज चव्हाण, वाल्मिक पाटील, मयूर आत्रे. संघटकपदी कृष्णा पाटील, विक्रांत पवार, अमित बुरकुल, किशोर सोनवणे. संघटक प्रसिद्धी प्रमुखपदी रोहित धोंड, खजिनदार जयदीप पिसुटे.

महिला काँग्रेसची कार्यकारिणी: उपाध्यक्षपदी लिला शेवाळे, रुपाली गावंड, संगीता अहिरे, रंजना पवार, पदमा वाघ यांची वर्णी लागली. वंदना चाळीसगावकर यांना सरचिटणीस करण्यात आले आहे. चिटणीस पदावर नजमा शेख, अलका दिवे, मीना स्वामी, संजीवनी म्हैसफके, कल्पना शेब्के, अर्चना जाधव तर प्रणाली पाटील यांना खजीनदार पद देण्यात आले आहे. यासोबतच विभागीय अध्यक्षपदेही देण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘काहीतरी नवीन शोधणे म्हणजेच विज्ञान’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनुष्याला एका गोष्टीची दृष्टी मिळाली की, त्यालाच तो विज्ञान समजतो. पण, त्या दृष्टीच्या पलीकडे जाऊन प्रश्न उपस्थित झाले पाहिजे. त्यातील फरक तपासून त्याची शहानिशा केली पाहिजे. या नेमकेपणातूनच काहीतरी नवीन शोधणे हेच विज्ञान असते, असे प्रतिपादन महाराष्ट्र विज्ञान परिषदेचे पुणे येथील प्रमुख विनय र. र. यांनी केले.

आविष्कार शिक्षणसंस्था संचलित आनंद निकेतन शाळेतर्फे आयोजित पालकसभेत ते बोलत होते. शंकराचार्य न्यास सभागृहात शनिवारी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. 'वैज्ञानिक जीवनशैली' या विषयावर त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. पुढे ते म्हणाले की, अनुभवांना नवनवीन ज्ञानाची जोड देण्यातून विज्ञानाची अनुभूती येत असते. यातून प्रश्न पडले पाहिजे. शंका उपस्थित झाल्या पाहिजेत. कारण प्रश्न व शंकांमधूनच नावीन्याचा पाया रचला जातो. निरीक्षणातून संशोधन करणे सोपे जात असल्याने निरीक्षणही उत्तम असायला हवे. निरीक्षण नसेल तर तर्कही चुकतात. निरीक्षणातून पंचेंद्रियांचा विकास होतो व पुढे हीच पंचेंद्रिये विज्ञानाचा शोध घेतात. अनेकांना विज्ञान म्हणजे केवळ निरनिराळ्या वस्तूंचा अभ्यास करणे हेच वाटते. मात्र, रोजच्या व्यवहारातही खूप विज्ञान सामावलेले आहे. ते शोधण्याची गरज आहे. आपल्याकडे जी संकलित माहिती आहे की नाही, हे शोधण्यासाठी वैज्ञानिक दृष्टी लागते. त्यासाठी विज्ञानाचा अभ्यास पद्धतशीरपणेच केला गेला पाहिजे. यावेळी संस्थेचे अरुण ठाकूर, मुख्याध्यापक दीपा पळशीकर आदी उपस्थित होते.

धर्म व विज्ञानावर मांडले मत धर्मातील नियमांना तपासण्यास वाव नाही. तेथे बंधने अधिक आहेत. मात्र, विज्ञानात ही बंधने नाही. विज्ञानातील प्रत्येक नियम तपासण्यास वाव आहे. विज्ञानात ही लवचिकता आहे की त्याची पडताळणी केली जाऊ शकते. संशोधनाची पुढची पायरी तपासण्याची मुभाही विज्ञान देते. ही मुभा जेथे मिळत नाही ते विज्ञान नाही, असे धर्म व विज्ञानाची तुलना करताना विनय र. र. यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे महापालिकेची करवसुली २२ कोटींवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिकेतर्फे मालमत्ता कराच्या शास्तीसाठी अभय योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मालमत्ता कराच्या वसुलीचा आलेख उंचावला आहे. मार्चअखेर पूर्वीच धुळे महापालिकेची तब्बल २२ कोटी रुपयांपेक्षा जास्त वसुली झाली आहे.
महापालिका हद्दीत ६५ ते ७० हजार मालमत्ता धारक आहेत. मालमत्ता कराच्या थकबाकीवर दरमहा २ टक्क्यांप्रमाणे शास्तीची आकारणी केली जाते. महासभेच्या शिफारसीनुसार प्रशासनाने शास्तीत माफी देण्यासाठी अभय योजना घोषित केली आहे. याची अंमलबजावणी १६ फेब्रुवारीपासून सुरू आहे. यात ५ मार्चपर्यंत एकरकमी कराचा भरणा केल्यास थकबाकीवर ५० टक्क्यापर्यंत सूट देण्यात आली. त्यात २० मार्चदरम्यान २५ टक्के सूट देण्यात येत आहे. मात्र यापुढे अशा प्रकारची योजना राबविण्यात येणार नसल्याचे सूत्रांनी कळविले आहे.
नागरिकांनी स्वत: मनपात येऊन कराचा भरणा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यास नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. मालमत्ता कर भरण्याची कार्यालयाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. ९ मार्चपर्यंत २२,०६,७३,००० रुपयांची वसुली झाली आहे. तर शास्तीतून २२,६१,४७,७६३ रुपयांचा भरणा झाला असल्याची माहिती मनपा सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ कार्यालयाचा महावितरणाचा दणका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ४ लाख रुपये वीज बिल थकल्याने विज वितरण कंपनीने कार्यालयातील वीज पुरवठा शुक्रवारी दुपारी खंड‌ित केला आहे. यामुळे परिवहन कार्यालयात वाहन परवानासह इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांची मोठी दमछाक झाली आहे. काहींना तर आरटीओ एजंटांनी माघारी घरी पाठविले, यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला .
दरम्यान आरटीओ कार्यालयाची एकूण चार लाख रुपयांची वीजबील थकबाकी आहे. ती वेळेवर न भरल्याने कार्यालयात विज पुरवठा खंड‌ित केला गेला आहे. अशा परिस्थितीत आरटीओ कार्यालयात असा भ्रमनिरास होत असल्यास नेमका काय उपयोग असल्याची प्रतिक्रिया यावेळी नागरिकांकडून देण्यात आली. विशेष म्हणजे या कार्यालयात शुक्रवारी कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता.

संबंधित अधिकाऱ्यांची पाठ

प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे येथील गेल्या सात ते आठ महिन्यांपासून वीज बील थक‌ित आहे. मात्र याकडे जबाबदार अधिकाऱ्यांनी पाठ फिरविली आहे. वीज वितरण कपंनीने वारंवार सुचना देऊनही वीज बील भरण्यात न आल्याने अखेर शुक्रवारी परिवहन कार्यालयातील वीज पुरवठा खंड‌ित करण्यात आला. आरटीओ कार्यालयाचे जवळपास ४ लाख ४३ हजार रुपये एवढे बील थकले आहे. तरीदेखील या विभागाने कोणतेही गांभीर्य घेतले नसल्याचे दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणाशिवाय परिवर्तन अशक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

कोणत्याही समाजात शिक्षणाशिवाय परिवर्तन घडत नाही. शिक्षणाचे अत्यअल्प प्रमाण हे मुस्लिम समाजाच्या मागासपणाचे मुख्य कारण आहे. शैक्षणिक क्रांती घडल्याशिवाय ते दूर होणार नाहीत. यासाठी मुस्लिम मुलींना समानतेचे हात देत शिक्षणात मदत करायला हवी, असे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.

जेएमसीटी तंत्रनिकेतनच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केट बॉल कोर्टचे राज्यपाल पाटील यांच्या हस्ते रविवारी उदघाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, की मुस्लिम समाजाची अवस्था दयनीय आहे. गॅरेजमध्ये वाहन दुरुस्ती करणारे बहुतांश मुस्लिम असतात. हे चित्र बदल्याचे असल्यास समाजात शैक्षणिक क्रांती घडवावी लागेल. समाज साक्षरतेचा मुख्य कार्यक्रम हाती घ्यावे लागेल. मुस्लिम मुली व महिलांना समानतेचे व आदराचे स्थान देत उच्च शिक्षणाची दारे खुली केली गेली तर त्या निश्चितच करिष्मा करून दाखवतील, असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला.

जेएमसीटीचे अध्यक्ष हाजी मोहम्मद रऊफ पटेल यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास खासदार हेमंत गोडसे, जिप अध्यक्षा विजयश्री चुंभळे, उपमहापौर गुरुमित बग्गा, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार बाळासाहेब सानप, विश्वास ठाकूर, निलिमा आमले, खतीब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन मियाँ खतीब, आदी उपस्थित होते. अनिता पगारे यांनी सूत्रसंचालन केले. तय्यबा शेख या विद्यार्थिनीने आभार मानले.

भारतवादी झाल्यावरच प्रगती

नाशिकरोड : 'बचेंगे तो और भी लढेंगे' ही ईषा सहकारात येईल, भेदभाव बाजुला ठेऊन सर्वजण एकजुटीने काम करतील तेव्हाच सहकाराची प्रगती होईल. आपण जात धर्म, राजकारण विसरून भारतवादी होऊ तेव्हाच पुढे जाऊ, असे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले. राज्यपाल पाटील यांनी नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेला सदिच्छा भेट दिली. सत्कारानंतर ते बोलत होते. बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी स्वागत तर ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे यांनी प्रास्तविक केले. उपाध्यक्ष सुधाकर जाधव, संचालक मनोहर कोरडे, रामदास सदाफुले, डॉ. दत्तात्रय पेखळे, रंजना बोराडे, दिनकर आढाव, सीईओ एकनाथ कदम आदी उपस्थित होते.

सासुरवाडीला आल्याचा आनंद

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वेळा खासदार राहिलेले श्रीनिवास पाटील म्हणाले, की बँकेत सर्वच पक्षाचे संचालक असून एकोप्याने ते कारभार करतात म्हणून मी आलो. माझी पत्नी रंजना बिटको कॉलेजची माजी विद्यार्थिनी असून देवळालागावच्या बर्जे यांच्या कन्या आहेत. त्यामुळे येथे आल्यावर सासुरवाडीला आल्याचे समाधान वाटते, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारुबंदीसाठी एकवटल्या आदिवासी महिला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुरगाणा तालुक्यातील पश्चिमेला गुजरात सीमेवरील केळीपाडा येथील आदिवासी महिला दारूबंदीसाठी एकवटल्या आहेत. तसेच वनसंवर्धनासाठी सर्व गावाने कुऱ्हाड बंदीचा निर्णय घेतला आहे.

केळीपाडा, रघतविहीर, सोनगीर, करंजूल, पांगारणे, बोरचोंड या भागात अनेक वर्षांपासून दारूची तस्करी व सागवान लाकडाची तस्करी सुरू होती. यामुळे या भागात अवैध धंद्याला ऊत आला होता. याचे गांभीर्य लक्षात आल्याने सर्व महिलांनी एकत्र येऊन दारूबंदीचा निर्णय घेतला. या भागातील युवक व्यसनाधीनतेकडे वळले होते. याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत होते. गुजरात मार्गाने होणाऱ्या दारू तस्करीला पोलिसांचे अभय असल्याचे बोलले जात होते. मात्र, सध्याचे पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या ही बाब निदर्शनास आल्याने त्यांनी ताबडतोब पावले उचलली. ग्रामस्थांची सभा बोलावून याबाबत आदिवासी महिलांना एकत्र करून गावपातळीवर दारूबंदीचा निर्णय घेतला. केळीपाडा गावातील तंटामुक्ती कमिटी व संयुक्त वनव्यवस्थापन कमिटी यांनी एकत्र येऊन हे दोन्ही निर्णय घेतले.

या सभेत पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे यांनी दारूचे व्यसनाधीनतेचे कुटुंबात होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. तर, वनरक्षक डी. एम. बढे यांनी वनसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक बी. बी. खाडे, वनव्यवस्थापन कमिटी अध्यक्ष नवसू मेघा, तंटामुक्ती अध्यक्ष धेडा वाघ, भारजीबाई वाघ, उषा वाघ, रमेश महाले, सोन्या पाडवी, उपसरपंच संतू पालवा, बाबूराव चौधरी, जयवंत मेघा, शेवंता वाघ, लता वाघ, भावड्या पवार, गोंदू बागुल, किसन कणसे, मणिराम भोये, कांती धूम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लेखा परीक्षणात दलालांचं चांगभलं!

$
0
0

नाशिक तालुका उपनिबंधक कार्यालयाकडून हौसिंग सोसायटीधारकांना अचानक लेखा परीक्षणाच्या (ऑडिट) नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक हौसिंग सोसायटीधारकांचे धाबे दणाणले आहेत. रो हाऊसेस किंवा अर्पाटमेंट असलेल्या सोसायटीधारकांना लेखा परीक्षणाच्या जाचामुळे सर्वाधिक त्रास होत असल्याने सहकार खाते अनेक वर्षांपासून झोपले होते काय, असा प्रश्न सोसायटीधारकांनी केला आहे. आर्थिक व्यवहार होत असलेल्याच हौसिंग सोसायटीधारकांवर सहकार खात्याने कारवाई करावी अशी मागणीही होत आहे. तालुका उपनिबंधक कार्यालयाकडून हजारो सोसायट्यांना लेखा परीक्षण (ऑडिट) करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. महाराष्ट्र सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या १७ जून २०१५ च्या परिपत्रकानुसार सहकारी सोसायट्यांचे सर्व्हेक्षण म्हणजेच लेखा परीक्षण मोहीम राबविण्याचे जाहीर केले. यात तालुका उपनिबंधक कार्यालयाने हजारो हौसिंग सोसायटी धारकांना लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याबाबतच्या नोटीसा बजावल्या होत्या. लेखापरीक्षण अहवालाबाबत माहिती नसल्याने लेखा परीक्षणाचा आर्थिक फटका सोसायटीधारकांना सहन करावा लागत आहे.

घरगुती सोसायट्यांना सहकार खात्याने नोटिसा बजावल्यानंतर सदस्य असलेल्यांकडून ऑडिट करण्यासाठी पैसै गोळा करतांना सोसायटी अध्यक्षांना पाया पडण्याची वेळ आली आहे. सोसायट्यांना बजावण्यात आलेल्या नोटिसांना सुनावणीसाठी ११ मार्चला तालुका उपनिबंधक कार्यालयात बोलण्यावत आले होते. यावेळी २ हजार हौसिंग सोसायटी धारकांपैकी केवळ चारशे ते पाचशे सोसायटीधारक सुनावणीला उपस्थित राहिले. तसेच अनेक हौसिंग सोसायटीधारकांनी लेखा परीक्षण करतांना खासगी व्यक्तींकडून अहवाल तयार करून उपनिबंधक कार्यालयात सादर केले आहेत. सहकार खात्याने सोसायट्यांना बजावलेल्या लेखा परीक्षणाच्या नोटीसांमध्ये सातशेहून अधिक सोसायट्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. तसेच उर्वरित सोसायट्यांना लेखा परीक्षण अहवाल उपनिबंधक कार्यालयात सादर करण्यासाठी २८ मार्चपर्यंतचा अवधी देण्यात आल्याचे सुनावणी दरम्यान अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

खासगी ऑडिटरकडूनही लूट सहकार खात्याने लेखा परीक्षणाच्या बजावेल्या नोटिसांनंतर अनेकांनी खासगी ऑडिट करणाऱ्यांकडून सोसायटीचे लेखा परीक्षण केले. मात्र, यात त्यांची लूट झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये सहकार खात्याचे प्रतिवर्ष ३५ रुपये प्रतिघर खर्च असतांना खासगी ऑडिटर्सने तो ७५ रुपये प्रतिवर्ष दराने सोसायटीधारकांकडून वसुल केला आहे. यामुळे सहकार खात्याच्या लेखा परीक्षणाचा फटका सर्वांनाच सहन करावा लागत आहे.

सहकार खात्याने हौसिंग सोसायटीधारकांना लेखा परीक्षणाच्या नोटिसा बजावल्याने सोसायटीधारक हैराण झाले आहेत. यात उपनिबंधक कार्यालयातील काही दलालच सोसायटीधारकांची फसवणूक करताना दिसत आहेत. यात सोसायटीधारकांनी योग्य माहिती घेऊन लेखापरीक्षण केले पाहिजे. - राजू देसले, अध्यक्ष, हौसिंग सोसायटी हक्क बचाव समिती

बांधकाम व्यावसायिकाने शहरात अनेक ठिकाणी रो हाऊसेस किंवा इमारती उभारल्यानंतर ग्राहकांसाठी सोसायटी स्थापन केल्या. परंतु, सोसायटीधारकांनी लेखा परीक्षण न केल्याने आता नोटिसा बजावल्या. सोसायटीधारकांनी घाबरून न जाता नियमानुसार लेखा परीक्षण करून घेतले पाहिजे. - पंडित देशमाने, संस्थापक, सहकारी संस्था फेडरेशन

सहकार खात्याने हौसिंग सोसायटीला अचानक नोटीस बजावत लेखापरीक्षणाचा अहवाल सादर करण्याबाबत सांगितले. परंतु, लेखा परीक्षणाबाबत उपनिबंधक कार्यालयात माहिती घेतली असता ४० हजारपासून ८० हजार रुपयांपर्यंत खर्च येणार असल्याचे कर्मचारी नसलेल्या दलालांनी सांगितले. सोसायटीधारकांची यामुळे सरकार लूट करत आहे. नागरिकांना उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी-अधिकाऱ्यांनी योग्य माहिती दिली पाहिजे. - सविता पाटील, संचालक, हौसिंग सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असा नावलौकिक असलेल्या लासलगाव बाजार समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. एप्रिलमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत माजी सभापती नानासाहेब पाटील, माजी आमदार व माजी सभापती कल्याणराव पाटील, माजी सभापती जयदत्त होळकर, माजी सभापती पंढरीनाथ थोरे या दिग्गजांची पुन्हा कसोटी लागणार आहे.

सुमारे सातशे कोटींची वार्षिक उलाढाल व किमान सहा ते सात कोटींचा वार्षिक नफा असणाऱ्या लासलगाव बाजार समितीच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निफाडचे प्रांत डॉ. शशिकांत मंगरूळे हे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार संदीप आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २४ एप्रिल रोजी मतदान व दि.२५ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला.

लासलगाव बाजार समितीची सत्ता ही छगन भुजबळांसाठी महत्त्वाची आहे. गेल्‍या निवडणुकीत भुजबळांनी नानासाहेब पाटील आणि जयदत्त होळकर या दोन विरोधी गटांना एकत्र आणून सत्ता काबीज केली होती. सत्ता प्राप्तीनंतर सुरुवातीला जयदत्त होळकर व नानासाहेब पाटील यांना सभापतीपदाची संधी देऊन दोन्ही गटांना संधी दिली. पण, बाजार समितीच्या प्रक्रियेत हे दोन्ही गट मनाने एकत्र आले नसल्याचे मध्यंतरी झालेल्या मानापमान नाट्यावरून समोर आले. लासलगावच्या राजकारणात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या होळकर आणि पाटील घराण्याची स्पर्धा सर्वशृत आहे.

विधानसभा निवडणुकीत विरोधी पॅनलचे नेते माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी विकासाच्या मुद्द्यावर भुजबळांना खुलेआम मदत केली होती. शिवाय तत्कालीन विरोधक पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे हेही सध्या भुजबळांच्या बरोबर आहेत. त्यामुळे भुजबळ निवडणुकीत रस घेतील की नाही, याकडे लक्ष लागले आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

पिंपळगाव बाजार समितीची बिनविरोध निवड करून निफाडच्या आजी-माजी आमदारांनी राजकारणात काहीही होऊ शकते असे दाखवून दिले. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या निवडणुकीकडे किती गांभीर्याने पाहतात हेही महत्त्वाचे आहे. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी युती पहायला मिळाली होती. शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांच्यावर भुजबळांनी निवडणुकीची जबाबदारी दिली होती. राष्ट्रवादीचेच दिलीप बनकर हे शिवसेनेचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या मदतीला होते. त्यामुळे निवडणूक पक्षांच्या पलीकडे जाऊन गटातटावर झाली. आता पिंपळगाव बाजार समितीच्या निमित्ताने बिनविरोधचा अध्याय निफाडच्या राजकारणात लिहिणारे आमदार अनिल कदम आणि सभापती दिलीप बनकर हे लासलगाव बाजार समितीसाठी बिनविरोधसाठी सहभाग घेतात का? आणि त्यांचा सहभाग हा बाजार समितीच्या उमेदवार आणि पूर्व भागातील नेत्यांना रुचेल का?असे प्रश्न सध्या चर्चिले जात आहेत. शिवाय भाजपाचे नेते सुरेशबाबा पाटील यांची याबाबतची भूमिका काय हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. त्यानंतर लासलगाव बाजार समितीच्या निवडणुकीची दिशा खऱ्या अर्थाने स्पष्ट होईल.

१८ जागांसाठी मतदान

गट - जागा - मतदार

सोसायटी - ११ - ७५२

ग्रामपंचायत - ४ - ५४४

व्यापारी - २ - ३९०

हमाल मापारी - १ - ३९०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेचार लाखांसाठी हत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील टकलेनगर येथे झालेल्या हत्येच्या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी शिक्षिकेच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीच्या जावयास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले चार लाख ५० हजार ५०० रुपये हस्तगत केले आहेत.

पंचवटीतील टकलेनगर येथे राहणाऱ्या ५५ वर्षीय भारती पाटील या शिक्षिकेची गुरुवारी रात्री हत्या करण्यात आली होती. पाटील यांच्याकडे घरकाम करणारी महिला शुक्रवारी दुपारी पाटील यांच्या घरी आल्यानंतर खुनाला वाचा फुटली. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, कुटुंबापासून विभक्त राहणाऱ्या पाटील यांच्याकडे घरकाम करण्यासाठी येणाऱ्या मोलकरणीच्या मुलीचा गणेशवाडी परिसरात राहणाऱ्या सचिन रामदास गांगुर्डे या संशयित आरोपीशी काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर सचिन सुध्दा पाटील यांच्याकडे कामानिमित्त येत होता. वीज बिल भरणे किंवा इतर छोट्या मोठ्या आर्थिक बाबी सचिन करीत असल्याने पाटील यांच्या घरी त्याचे येणे-जाणे नेहमीच होत असे. त्यातूनच भारती पाटील एकट्याच राहतात, त्यांच्याकडे किती पैसे आहेत, याचाही अंदाज

स​चिनला आला. कमी श्रमात पैसे मिळवण्यासाठी त्याने हत्येचा कट रचला.

घर घेण्यासाठी खून

खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. सदर मोलकरीण व तिच्या मुलीची पोलिसांनी कसून चौकशी केली. मात्र, त्यात फार काही समोर आले नाही. पाटील यांच्या घरी सातत्याने येणारा सचिन मात्र कामावर येत नसल्याचे पोलिसांना समजले. इंदिरानगर येथील एका गॅरेजमध्ये काम करणारा संशयित घरीही येणे टाळत असल्याची खात्री पोलिसांना पटताच त्यांनी सापळा रचून भद्रकाली परिसरातून त्याला अटक केली. मला घर घ्यायचे होते. त्यासाठी पैशांची आवश्यकता होती. पाटील यांच्याकडे पैसा होता. त्यातूनच खून करण्याचा विचार केला असल्याचा कबुलीजबाब सचिन गांगुर्डेने पोलिसांना दिला. या गुन्ह्याचा तपास क्राईम ब्रँचचे एसीपी सचिन गोरे, एसीपी विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिस तसेच क्राईम ब्रँचच्या कर्मचाऱ्यांनी केला.

गुरुवारी रात्रीच हत्या

मृत पाटील यांचे इतरांशी पटत नव्हते, याची माहिती सचिनला होती. त्यामुळे त्यांची हत्या केल्यानंतर काही होणार नाही, असा कयास सचिनने बांधला होता. गुरुवारी रात्री सचिन पाटील यांच्या घरी पोहचला. जेवणाच्या तयारीत असलेल्या पाटील यांच्याशी काही चर्चा करून सचिनने एका कामाचे त्यांना पैसे मागितले. ते देण्यासाठी त्या स्वयंपाक घरात पोहचल्या असता पाठीमागून आलेल्या संशयित आरोपीने लोखंडी हत्याराने त्यांच्या डोक्यात वार केला. यानंतर गळा आवळून कपाटातील पैसे घेऊन तो फरार झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्विफ्ट कारच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट कारने धडक दिल्याने ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आठवा मैल परिसरात झाली. दीपक निवृत्ती शिरसाठ असे मृत तरुणाचे नाव असून, तो गौळाणे परिसरातील रहिवाशी आहे.

संध्याकाळच्या सुमारास दीपक रस्त्याच्या कडेला उभा असताना भरधाव वेगात आलेल्या स्विफ्टकारने त्याला जोरात धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या दीपकला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सासऱ्यास मारहाण

चारित्र्याच्या संशयावरून मारहाण होत असलेल्या मुलीस सोडविण्यास गेलेल्या सासऱ्यास जावई, त्याचे दोन भाऊ व वडिलांनी मारहाण केली. ही घटना पाथर्डी शिवारातील ज्ञानेश्वरनगरमध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. माऊली लॉन्सजवळ राहणाऱ्या देवराव हनवटे यांच्या मुलीचा विवाह ज्ञानेश्वर खंदारेसोबत झाला आहे. मात्र जावई ज्ञानेश्वर, त्याचे दोन भाऊ बालाजी व संतोष व वडील विठ्ठल खंदारे हे मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करतात. शनिवारी सायंकाळच्या सुमारास जावई मुलीस मारहाण करीत असताना हनवटे मुलीला सोडविण्यासाठी गेले असता वरील संशयितांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

चाकूच्या धाकाने लुटले

निफाड तालुक्यातील चेहेडी खुर्द येथील सोमनाथ वामन शिंदे हे आठवडे बाजारासाठी शनिवारी सकाळी नाशिकला आले होते. ओढ्याजवळील नाशिक-औरंगाबाद चौफुलीवर उभे असताना संशयित फुलेनगर येथील गणेश गौतम गायकवाड (वय १८) व विशाल प्रभाकर मोहिते (वय १९) या दोघांनी शिंदे यांच्या पोटास चाकू लावून त्यांच्याकडील आठ हजार रुपये किमतीचा मोबाइल दमदाटी करून काढून घेतला. या प्रकरणी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांनी ‘मटा’ संगे अनुभवली दिमाखदार रॅली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक आत्मविश्वास, सामर्थ्य आणि धडाडी यांचं सार्थ दर्शन घडविणाऱ्या 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'ऑल वूमन्स बाइक रॅली'मधून महिलांनी 'हम किसीसे कम नहीं...' हाच संदेश दिला. बुलेट, अॅव्हेंजर, करिझ्मा, एफझी, एंटायसर, या बलदंड गाड्या चालविण्याचा विचार जरी केला तरी अनेकांना धडकी भरते. पण याच गाड्या दिमाखात राईड करत होत्या त्या नाशिकच्या बाइकर्णी. मी, माझी बाइक आणि सोबत माझ्यासारख्या मैत्रिणींचा धम्माल ग्रुप, अशा धुंदीत महिलांनी या रॅलीचा आनंद लुटला.

अठरा वर्षांची तरुणी असो वा पन्नाशीची महिला प्रत्येकीने या रॅलीमध्ये हिरारीने सहभागी होत नारीशक्तीचे दर्शन घडविले. नऊवार साड्या, डोक्यावर केशरी, गुलाबी फेटे असा अस्सल मराठमोळा पेहराव आणि जीन्स, टी शर्ट असा वेस्टर्न ड्रेसकोड परिधान केलेल्या महिलांचा जणू संगमच या रॅलीमध्ये पहायला मिळाला. 'जय शिवाजी.. जय भवानी...', 'नारी शक्तीचा विजय असो...', अशा दमदार घोषणांनी महिलांनी रॅलीचा रस्ता दणाणून सोडला.

मिसेस इंडिया क्वीन ऑफ सबस्टन्स २०१६ स्नेहा शेरगील, बाजीराव मस्तानी चित्रपटाची आर्ट डायरेक्टर सलोनी धात्रक, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमीतसिंग बग्गा, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागाचे सहकार्यवाह अाशुतोष रहाळकर, कलाकार नुपूर सावजी, श्रध्दा देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत फ्लॅग ऑफने रॅलीला सुरुवात झाली. आमदार देवयानी फरांदे यांनी स्वत: बाइक चालवत महिलांना प्रोत्साहन दिले. महापौर मुर्तडक यांनी वाहतूक नियोजनाची स्वत: पाहणी करुन रॅलीच्या अपडेट्स घेतल्या. 'मटा'चे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे तसेच रिस्पॉन्स हेड मंजिरी शेख यांनी बाइक रॅलीचा उद्देश स्पष्ट करत रॅलीचा आनंद लुटण्याचे आवाहन केले.







मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निसाकाच्या वाटचालीबद्दल आज बैठक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याप्रश्नी आज (दि.१४) निफाडचे आमदार अनिल कदम यांनी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील व सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या दालनात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय होऊन गुड न्यूज मिळणार का? याकडे निसाकाचे सभासद, ऊस उत्पादक, कामगार यांचे लक्ष लागले आहे.

दुपारी तीन वाजता ही बैठक होत आहे. निसाकाला जिल्हा बँकेसह आयकर विभागानेही जप्तीची नोटीस दिल्याने निफाड तालुक्यातील तरूण शेतकऱ्यांसह कामगारांनी गेल्या आठवड्यात निसाका बचाव कृती समिती अंतर्गत मोर्चा काढला होता. शासनच आता निसाका जप्तीपासून वाचवू शकते, त्यामुळे आजच्या बैठकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. आमदार अनिल कदम यांनी या बैठकीला सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यांना बोलावले आहे. त्यामुळे निसाकाविषयी निव्वळ राजकारण न करता खरोखरच राजकीय मतभेद दूर ठेऊन निफाडचे नेते या बैठकीत सहभागी होतात का? याकडेही लक्ष लागले आहे.

पवारांसोबत १६ला बैठक

सायखेडा येथे उद्घाटन कार्यक्रमासाठी आलेल्या माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी निसाकाबाबतची भावना लक्षात घेऊन बुधवारी (दि.१६) निफाड तालुक्यातील नेते व कार्यकर्त्यांची मुंबई येथे बैठक बोलावली आहे. त्याची जबाबदारी माजी आमदार दिलीप बनकर यांच्याकडे सोपवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काकडी, मिरची, गवार, वांगे महागले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाणीटंर्चाइची झळ जाणवू लागल्याने काही भाज्यांचे दर कडाडले आहेत. मिरचीची तेजी अद्याप ओसरली नसून गवार, वांगे, काकडीचे दर पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत. तसेच उपवासाच्या पदार्थ बनविण्यासाठी बटाट्याची मागणी वाढली आहे.

गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांचे नुकसान झाले होते. यामुळे दरही घसरले होते. मात्र, आता पाणीटंचाईमुळे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. गवारचे दर ५० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. काकडीही पाच रुपयांनी महागली आहे. तसेच वांगेही चाळीस रुपये किलोने मिळत आहेत. आगामी काळात पाणीटंचाईमुळे पालेभाज्यांसह इतर भाज्यांचेही दर वाढण्याची शक्यता आहे. कोबी, फ्लॉवरची आवक चांगली होत असल्याने दर स्थिरावले आहेत. कारले, गिलके, दोडके यांचे दरही ‌स्थिर आहेत. शेपू व पालकच्या दरात चढउतार सुरू आहे. मिरची तेजी अद्यापही ओसरलेली नाही. मिरचीचे दर ६० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. वाळलेल्या मिरचीचे दरही वाढले आहेत. दीडशे ते दोनशे रुपये किलोप्रमाणे वाळलेली मिरची मिळत आहे.

द्राक्ष, टरबुजांची बाजारात वाढली आवक

सध्या नाशिककरांचे आवडते व सर्वांच्या तोंडाला पाणी आणणारे द्राक्ष मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहेत. दरही आवाक्यात असल्याने नाशिककर द्राक्षांवर ताव मारत आहेत. तसेच, टरबूजची आवक चांगली असून ३० रुपयांपासून ८० रुपये नग याप्रमाणे मिळत आहेत.

उन्हाळा लागला की, पोटाला थंडावा देणाऱ्या फळांची प्रतीक्षा लागते. आज बाजारात सर्व प्रकारची फळे उपलब्ध आहेत. मात्र, टरबूज व द्राक्षांची आवक सर्वाधिक आहे. संत्र्यांची आवक घटल्याने दर वाढून चाळीस रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तसेच पपईही तीस रुपये किलो झाली. केळीच्या मागणीत फारशी वाढ न झाल्याने २५ ते ३० रुपये डझनचा भाव कायम आहे. इतर फळांच्या दरातही फारशी वाढ झालेली नाही. तसेच गेल्या महिन्यात भरमसाठ दिसणारे अॅपल बोर तसेच साध्या बोरांची आवक मात्र घटली आहे. यामुळे दर वाढले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीप्रश्नी होताहेत आरोप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

उन्हाळ्याच्या तीव्रतेत वाढ होऊन पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या असताना सटाणा नगरपरिषदेच्या वतीने उपाययोजनांऐवजी ठराविक व्यक्तींचे हित जोपासण्यासाठी संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचे षडयंत्र केले जात असल्याचा आरोप माजी पाणीपुरवठा सभापती अरविंद सोनवणे यांनी केला आहे.

शहरालगत सुकडनाला परिसरात सनपाने विहीर बांधकामाचे नियोजन केले. परंतु, देवमामलेदार देवस्थानच्या वतीने यात्रोत्सवाचे कारण पुढे करून विहीर खोदकामास विरोध करण्यात आला. या कामाचा ठेकेदार अद्याप विहिरींच्या जागा निश्चितीसंदर्भात संभ्रमात आहेत. ठेंगोडा येथे जॅकवेल जवळ विहीर बांधकाम करण्यात आले. परंतु, विहीर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाही. पाणी आर्वतनात या विहिरीचा वापर करण्याची गरज आहे. तेथे सबमर्सिबल बसविण्याची आवश्यकता आहे. मळगाव पांथा परिसरातील विहिरीतून सध्या एकावेळी आठ तास पाण्याचा उपसा केला जात असून, त्या ठिकाणी २४ तास वीजपुरवठ्यासाठी एक्सप्रेस फिडरची गरज आहे.

उपरोक्त विहिरीतून पाणीपुरवठ्याचे नियोजन झाल्यास सामान्य जनतेस दिलासा मिळू शकेल. पंरतु, शहर परिसरातील शेतीक्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी विहिरी मालकांनी पालिकेतील पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून उपरोक्त कामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचे उद्योग सुरू केले आहेत. असे दुटप्पी धोरण राबविणाऱ्यांना आगामी नगरपरिषद निवडणुकीत नागरिक धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही सोनवणे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व शाळा एकाच छताखाली

$
0
0

देवळाली परिसरात ब्रिटीश राजवटीपासून शैक्षणिक सुविधांना प्राधान्य देत बार्न्स स्कूल, सेंट पेट्रिक्स हायस्कूल यांची उभारणी करण्यात आली. मात्र, गरीब विद्यार्थ्यांसाठी परवडणारी शिक्षण व्यवस्था नसल्याकारणाने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची जाणीव ठेवून आनंदरोड मार्गावर कॅन्टोन्मेंट बोर्डाची पहिली प्राथमिक शाळा सुरू झाली. त्यानंतर गुरूद्वारा रोडवरील हायस्कूल हौसन रोडवर मुलींची प्राथमिक शाळा, मिठाई स्ट्रीटवरील उर्दू माध्यमाची शाळा तसेच स्टेशनवाडी परिसरात अंगणवाडीसह प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली.

वेगवेगळ्या ठिकाणी भरणाऱ्या या शाळांमुळे नियंत्रण ठेवणे कठीण होत असल्याने गत पंचवार्षिकमध्ये तत्कालीन बोर्डाने एकत्रित शैक्षणिक संकुल उभारण्याचा निर्णय घेतला. वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी मिळविली. तत्कालीन उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्या कार्यकाळात सन २०१४ मध्ये दक्षिण विभागाचे उपसंचालक जोगनेश्वर शर्मा व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कामाला प्रारंभ झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपोलो फार्मसीचा परवाना रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रिस्क्रीप्शनवर नमूद केलेल्यापेक्षा अधिक औषधे ग्राहकाच्या माथी मारणाऱ्या आणि मागणी करूनही बील न देणाऱ्या औषध दुकानाचे परवाने अन्न व औषध प्रशासनाने रद्द केले आहेत. महात्मानगर येथील अपोलो फार्मसी या दुकानावर ही कारवाई झाल्याने शहरातील अन्य औषध विक्रेत्यांचेही धाबे दणाणले आहे.

खुटवडनगर परिसरात राहणारे भूषण देवरे यांनी याबाबतची तक्रार केली होती. ते २९ नोव्हेंबर २०१५ रोजी अपोलो फार्मसीमध्ये औषधे खरेदी करण्यासाठी गेले. त्यावेळी विक्रेत्याने त्यांना जास्तीची औषधे देऊ केली.

देवरे यांनी जास्तीची औषधे नको असे सांगितले. मात्र, गोळ्यांची संपूर्ण स्ट्रीप विकत घ्यावी लागेल, असे सांगून त्यांना प्रिस्क्रीप्शनवर नमूद केलेल्यापेक्षा अधिक औषधे विकत घेण्यास भाग पाडण्यात आले. मागणी करूनही बिल न मिळाल्याने देवरे यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली. तक्रारीनंतर काय कारवाई केली याचा माहिती अधिकाराद्वारे पाठपुरावा केला. अन्न आणि औषध प्रशासनाचे निरीक्षक रा. बा. बनकर यांनी अपोलो फार्मसी या दुकानात जाऊन पाहणी केली असता तेथे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याचे विविध नियम धाब्यावर बसविल्याचे स्पष्ट झाले.

या त्रुटींवर बोट

दुकानात मालक तसेच फार्मसिस्ट उपस्थित नसल्याचे तसेच प्रिस्क्रीप्शनशिवाय सेल्समन औषधांची विक्री करीत असल्याचे आढळून आले. प्रिंटर खराब असल्याने ग्राहकांना बिल देत नसल्याची माहिती त्याच्याकडून देण्यात आली. औषधांची विक्री केल्यानंतर पोच देण्यासाठी supplied by चा शिक्का उपलब्ध नसल्याचे पाहणीत आढळून आले. काही औषधांच्या खरेदी विक्रीचा तपशील मागितला असता तो सादर करण्यात आला नाही. फार्मसिस्टचे नातलग आजारी असल्याने त्या मेडिकलमध्ये उपस्थित नव्हत्या. फार्मसीतील कर्मचाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे हा प्रकार घडला. यामध्ये अपोलो फार्मसी कंपनीची चूक नाही. ग्राहकांना चांगली सेवा देण्यास आम्ही बांधिल आहोत. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाई विरोधात आम्ही कोर्टात न्याय मागणार आहोत.

- सुनील कुलकर्णी, सिनियर एक्झ्युकेटीव्ह, अपोलो फार्मसी

डॉक्टरांनी मला सहा गोळ्या घेण्यास सांगितले. मात्र, अपोलो फार्मसीत मला १० गोळ्यांची स्ट्रीप घेण्यास भाग पाडण्यात आले. अन्य मेडिकलमध्ये तीच गोळी एक दोनच्या संख्येतही देत असल्याचा अनुभव मला आला. अपोलोत फसवणूक झाल्याने मी अन्न व औषध प्रशासन आयुक्तांकडे तक्रार केली.- भूषण देवरे, ग्राहक

... अन्यथा कायदेशीर कारवाई

औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम १९४५ अंतर्गत विविध नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका संबंधित व्यावसायिकावर ठेवण्यात आला. खुलाशाबाबत स्मरणपत्र देऊनही व्यावसायिकाने बाजू न मांडल्याने सर्व दोष मान्य असल्याचे गृहीत धरून प्रशासनाने दुकानाचे औषध विक्री परवाने रद्द केले आहेत. यानंतरही औषध विक्री सुरूच ठेवल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त भु. पो. पाटील यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसाला १२५ वाहनांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नो पार्किंग परिसरात लावण्यात आलेली किंवा रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या ४ हजार ६४१ वाहनांवर गेल्या ४० दिवसांत कारवाई झाली. सरासरी २० हजार रुपये प्रती दिवस याप्रमाणे वाहनचालकांकडून सात लाख ९७ हजार ४७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यावर वाहने पार्क करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी शहर पोलिस वाहतूक विभागाने टोईंग व्हॅन सुरू करण्याचा निर्णय जानेवारी महिन्यात घेतला. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच चार चाकी व दुचाकी वाहने हटवण्यासाठी एका ठेकेदारामार्फत काम सुरू झाले. नियमबाह्य काम होत असल्याचा आरोप सुरुवातीलाच झाल्याने सदर ठेकेदार वादात सापडला. त्यातच चारचाकी वाहने घेऊन जाताना त्यांचे नुकसान होत असल्याने वाहनमालक आणि ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवले. अशा तक्रारींची संख्या वाढल्यानंतर पोलिस उपायुक्त विजय पाटील यांच्या आदेशाने चारचाकी वाहने हटवण्याचे काम बंद करण्यात आले. या वाहनांना आता जागेवरच दंड केला जातो. दुचाकीवाहने उचलण्याचे काम मात्र सुरूच आहे. दरम्यान, वाहतूक विभागात जमा झालेली वाहने सोडवण्यासाठी गेलेल्या नागरिकांना अरेरावी सहन करावी लागते, असा आरोप होत आहे. याबाबत बोलताना पोलिस निरीक्षक एम. एम. बागवान यांनी सांगितले की, जमा करण्यात आलेली दुचाकी सोडवण्यासाठी येणाऱ्या वाहनमालकास ते वाहन आपलेच आहे हे सिध्द करावे लागते. यासाठी वाहनाची कागदपत्रे, वाहन चालवण्याचा परवाना इत्यादीची मागणी केली जाते.

आवश्यक कागदपत्रे नसतील तर त्यानुसार दंड आकारला जातो. वाहनमालकाची सत्यता तपासली गेली नाही तर एकाचे वाहन दुसरा कोणी घेऊन जाऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी कागदपत्रांची मागणी होते. त्यातून काही व्यक्ती दुखावल्या जातात. मात्र, त्याला पर्याय नसल्याचे बागवान यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दुचाकी चालकांनी पार्किंग नियमांचे पालन करण्याचे आवाहन बागवान यांनी केले.

दुचाकीसाठी १७० रुपये शुल्क

दिवसभरात जवळपास १२५ वाहनांना शहर पोलिस वाहतूक शाखेच्या शरणपूररोडवर जमा करण्यात येतात. जमा झालेल्या वाहनमालकांकडून १०० रुपये दंड आणि ७० रुपये दुचाकी उचलण्याचा खर्च असे १७० रुपये शुल्क घेतले जाते. साधरणत‍ः ३ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत ७ लाख ९७ हजार ४७० रुपयांचे शुल्क वाहतूक विभागाकडे जमा झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा रुग्णालयातील परिचारिका झाल्या हमाल

$
0
0

नूतन इमारतीत स्थलांतरावेळी प्रशासनाचा कामचुकारपणा उघड
म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्हा रुग्णालयातील विविध विभागांचे शहराबाहेरील नूतन इमारतीत स्थलांतर होत आहे. अशावेळी प्रशासनाच्या नियोजन शुन्य कारभाराचा फटका रुग्णालयातील परिचारिकांना बसत आहे. त्यांना या स्थलांतरात सामान उचलून नेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी परिचारिकांनी आंदोलन करीत प्रशासनावर आपला रोष व्यक्त केला.



जिल्हा रुग्णालयात सोमवारी सकाळी परिचारिका कामाला गेल्या असता हजेरीपत्रक असलेली खोली बंद होती. काही काळ उलटूनही कोणताही कर्मचारी त्या ठिकाणी आला नाही. यामुळे सुमारे दीडशे परिचारिकांनी नाराजी व्यक्त केली. सध्या जिल्हा रुग्णालय सुरत-नागपूर महामार्गालगत चक्करबर्डी परिसरातील नूतन इमारतीत दाखल होत आहे. त्यासाठी रुग्णालयातील विविध विभागांतील साहित्य नेण्याचे ओझे परिचारिकांवर लादण्यात आल्याने परिचारिका फेडरेशन आणि महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी याविरूद्ध रुग्णालयाच्या परिसरात आंदोलन पुकारले. त्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात प्रशासनाविरूद्ध घोषणाबाजी करीत आंदोलन केले. यावेळी सुजाता चव्हाण, कल्पना कुंभार, साधना वसावे, पंकज अहिरराव, दीपक रासणे, प्रिती ढालवाले, अजीत वसावे उपस्थित होते.



वाहनव्यवस्था असूनही प्रशासनाची डोळेझाक

रुग्णालयाच्या नूतन इमारतीत स्थलांतराकरीता सरकारकडून सुमारे पंधरा लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. तरी देखील फक्त दोन वाहनांवरुन सामान नेण्यात येत आहे. दुसरीकडे नूतन इमारतीत हे सामान आणल्यानंतर ते आवारातच टाकून दिले जाते. उलट हा सामान परिचारिकांकडून रुग्णालयात नेण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे रुग्णालयात सफाई कर्मचारी व शिपाई असताना देखील परिचारिकांना हमालीचे काम करावे लागत आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>