Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 49119

नाशिकच्या सागरचे राष्ट्रीय स्तरावर यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी आयआयटी मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या 'आकार' या टेक्निकल स्पर्धेत नाशिकच्या सागर शिंदे या विद्यार्थ्याने राष्ट्रस्तरावर यश मिळवले. देशभरातून २७४ ग्रुप्सने सहभाग नोंदवलेल्या या स्पर्धेत सागरने पहिला क्रमांक मिळवला.

देशाची वाटचाल स्मार्टनेसकडे होते आहे. या वाटचालीत विद्यार्थ्यांच्या कल्पना जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. त्या जाणून घेण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन आयआयटी मुंबईच्या सिव्हिल विभागातर्फे करण्यात आले होते. 'ब्रीज मेकिंग' ही थीम विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी देण्यात आली होती. 'कमीतकमी वजनाचे मॉडेल व जास्त भार उचलण्याची क्षमता' या नियमाखाली विद्यार्थ्यांना हे मॉडेल तयार करायचे होते. त्या अनुषंगाने सागर याने आईसक्रिम स्टिक्स, फेव्हिकॉल व कॉटनचा दोरा यांचा वापर करून ब्रीज तयार केला. २७८ ग्रॅम इतके वजन असलेले मॉडेल तयार केले. ९४ किलो वजन पेलण्याची ताकद या मॉडेलमध्ये असल्याने परीक्षकांच्याही ते पसंतीस उतरले.

केबीटी इंजिनीअरिंग कॉलेजच्या सिव्हिल विभागात इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षास शिकत असलेल्या सागर शिंदेने इंटरनेटवरून विविध प्रोजेक्ट्सचा अभ्यास करून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. यापूर्वी आयआयटी मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या टेकफेस्टमध्येही सागरने पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.

इंटरनेटवरून वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास करून हा प्रोजेक्ट तयार केला. या स्पर्धेत त्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्या साठी फायदा झाला. पुढचे शिक्षणही स्ट्रक्चर संबंधित विषयात घेऊन अशा प्रोजेक्टवर भर देणार आहे.

- सागर शिंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 49119

Latest Images

Trending Articles



Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>