Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 49119

ब्रह्मा व्हॅलीत अनुवादीत बहुभाषी सा‌हित्य संमेलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंजनेरी येथील ब्रह्मा व्हॅलीच्या शैक्षणिक संकुलात येत्या २६ आणि २७ मार्चला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय अनुवादित बहुभाषी साहित्य संमेलन होणार आहे. योकोहामा येथील इंडो जपान इंटरनॅशनल रिसर्च सेंटरच्या राजकुमारी गौतम या प्रमुख भाषण करणार असून, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू सुधीर मेश्राम उद्‍घाटक असतील. दहा भाषांतील अनुवादित साहित्यावर यावेळी चर्चा होणार आहे.

संमेलनात विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भाषा, त्यातील साहित्य, अनुवादाची प्रक्रिया यावर मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. त्यात फ्रेंच, संस्कृत, प्राकृत, इंग्रजी, अमेरिकी इंग्रजी, उर्दू, अहिराणी, लेवा पाटीदार, गुजराती, हिंदी आणि मराठी या भाषांतील साहित्य आणि अनुवादाची पध्दत यावर मंथन होणार आहे.

अंजनेरीच्या ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलात हे संमेलन होणार असून, सकाळी नऊला उद्‍घाटन होणार आहे. प्राचार्य डॉ. बापूराव देसाई प्रास्ताविक करतील. पुणे विद्यापीठाच्या बीसीयुडीचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, आयएमसी बँकेचे संचालक अशोक सोनवणे, भाषा संचलनालयाचे डॉ. संजय पवार, भगवान खैरनार, ज्योती स्टोअर्सचे वसंत खैरनार, शिवाजी पाटील, निळकंठ देसाई उपस्थित राहतील.

फ्रान्सचे लुईस व्हास्ट प्रोव्ही, अमेरिकेतील डॉ. विद्या चिटको फ्रेंच भाषेच्या अनुवादासंदर्भात चर्चा करणार आहेत. न्यू जर्सी येथून सिंधुमती वरणगावकर, डी. एल. ठाकूर संस्कृत प्राकृतवर मार्गदर्शन करणार आहेत.

इंग्रजी साहित्य अनुवादावर डॉ. आसाराम बागूल, प्राचार्य डॉ. ए. पी. पाटील, प्रा. मोनाली धांडे, डॉ. राजेश झनकर मार्गदर्शन करतील. उर्दू भाषेसंदर्भात डॉ. रफिकोद्दीन काझी, मुंबईचे मोहतरम अलहाज, अब्दुल मजीत झकेरिया, डॉ. समीर सय्यद चर्चा करणार आहेत.

अहिराणी लेवा पाटीदार भाषेवर डॉ. सुरेश पाटील, डॉ. बाळासाहेब गुंजाळ, प्रा. भगवान पाटील, डॉ. के. के. बच्छाव मंथन करतील. गुजराती भाषेतील अनुवादित साहित्यावर बडोद्याच्या डॉ. लता सुमंत, डॉ. कल्पना गवळी, मनाली जोशी, जयू पटेल चर्चा करणार आहेत. हिंदी भाषेवर दिल्लीच्या डॉ. अनुराधा सिंगर, रांचीच्या डॉ. बालेन्दूशेखर तिवारी, डॉ. रामप्रकाश वर्मा आणि डॉ. प्रतिभा धारासूरकर, चर्चा करतील. मराठी भाषेवरील अनुवादित साहित्यावर मराठी लक्ष्मीकमल गेडाम, डॉ. निलकांत चव्हाण, प्रा. देविदास गिरी मार्गदर्शन करणार आहेत.

२७ मार्चला समारोप

२७ मार्चला दुपारी ३ वाजता राष्ट्रीय हिंदी भाषा सल्लागार सुभाष चंदर यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होणार आहे. यावेळी केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे भाषा विभाग संचालक डॉ. म. सु. पगारे, डॉ. सुनील कुलकर्णी, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्राचार्य दिलीप पानगव्हाणे प्रमुख पाहुणे असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 49119


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>