Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

खंडणीप्रकरणी तिघांना अटक

$
0
0
अनैतिक संबंध असल्याची बदनामी करण्याची धमकी देत संगनमताने दीड लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी मुंबईतील एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. मैत्रीचा गैरफायदा घेत हा प्रकार घडल्याचे पुढे आले आहे.

पोलिसांची 'बेदखल' बेफिकीरी

$
0
0
चार लाखाच्या मुद्देमालाची लूट करण्याचा तिघांचा प्रयत्न एका तरुणाने समर्थपणे हाणून पाडल्यानंतर, त्या लुटारुंचा तपास करण्याऐवजी पोलिसांनी हा संपूर्ण प्रकार बेदखल (एनसी) ठरविल्याची बाब बुधवारी पुढे आली. त्यामुळे गुन्हेगारांना पकडण्यासाठी सर्वसामान्यांना आधी स्वतःचे नुकसान होण्याची वाट पहावी लागणार की काय असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

कुरापत काढत ५० हजार लंपास

$
0
0
फसवणूक, लूट, चेनस्नॅचिंग आणि घरफोडीसारख्या घटनांसोबतच आता कुरापत काढत वाहनधारकांना लूटण्याचा नवा फंडा चोरट्यांनी अवलंबिला आहे. कॉलेजरोडवरील अशाच एका प्रकरणात मोटरसायकलवरील दोघांनी कारमधील ५० हजारांची रोकड लंपास केली.

एकही अर्ज अवैध नाही

$
0
0
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत ४० जागांसाठी प्राप्त झालेल्या ११० अर्जांमध्ये एकही अर्ज अवैध ठरलेला नाही. त्यामुळे सर्वच्या सर्व म्हणजे ११० अर्ज वैध ठरविण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिका-यांनी सांगितले आहे.

रेल्वेने कापला प्रवाशांचा खिसा

$
0
0
रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी तिकीटाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली होती. या दरवाढीची प्रत्यक्ष अमलबजावणी सोमवारपासून (२१ जानेवारी) करण्यात आली. मात्र तिकीटाच्या दराच्या राऊंड फिगरसाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचा खिसा चांगलाच कापला आहे.

एलईडीबाबत याचिका दाखल

$
0
0
एलईडीसंदर्भात बुधवारी हायकोर्टात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या. नगरसेविका कोमल मेहरोलिया यांनी निविदा प्रक्रियेतील गोंधळ आणि कॉमन वेल्थ गेम्सच्या ठेकेदारासंदर्भातील आक्षेप याआधारे याचिका दाखल केली. तर नाशिक विकास आघाडीच्या वतीने नगरसेवक गुरुमित बग्गा आणि संजय चव्हाण यांनी याचिका दाखल केली.

सप्तश्रुंग गडावर होणार विविध विकासकामे

$
0
0
उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान व साडेतीन शक्ती पीठांपैकी अर्धे शक्ती पीठ असलेल्या आदिशक्ती सप्तश्रुंग गडाचा कायापालट होऊन विविध विकासकामांना लवकरच सुरुवात होणार आहे. देशातील महत्त्वाकांक्षी अशा प्रथमच साकारणारी ट्रॉली सिस्टीम येत्या काही महिन्यांतच कार्यान्वित होणार असल्याची माहिती आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग कळवणचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर विजय पाटील यांनी दिली.

'शिक्षण विभागा'वरुन गोंधळ

$
0
0
शिक्षण विभागातील बदल्यांतील राजकारण, पदाधिका-यांच्या प्रश्नांकडे होणारी डोळेझाक आणि शिक्षणाची चाललेली हेळसांड अशा विविध मुद्द्यांवरुन जिल्हा परिषदेची बुधवारी झालेली सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. रजेवर असतानाही हजेरी दाखवलेल्या मुख्याध्यापिकेचे वेतन काढणा-या अधिका-याच्या निलंबनाचे आदेशही यावेळी सीईओ रणजितकुमार यांनी दिले.

पानेवाडी प्रकल्पात कामबंद आंदोलन

$
0
0
मनमाडपासून जवळ असलेल्या इंडियन ऑइल कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातील काही अधिका-यांच्या मनमानी वागणुकीला कंटाळून सुमारे २५० टँकर ड्रायव्हर व क्लीनर यांनी बुधवारी सकाळी अचानक कामबंद आंदोलन पुकारले. या आंदोलनामुळे प्रकल्पातून होणारा इंधनपुरवठा काही तास ठप्प झाला. अखेर अधिका-यांनी ड्रायव्हर व क्लीनरच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर संप मागे घेण्यात आला.

वृक्ष प्राधिकरण समिती पुन्हा लांबणीवर

$
0
0
शिवसेना, भाजप आणि काँग्रेसने आपल्या सदस्यांची नावे महापौरांकडे अद्याप न दिल्याने वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांच्या नियुक्त्या पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांच्या नियुक्तीविषयी महापौर बुधवारी घोषणा करणार होते. प्रत्यक्षात या तिन्ही पक्षांनी आपल्या सदस्यांची नावेच महापौरांकडे न दिल्यामुळे नियुक्तीची प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे.

वडाळा गावात ७० म्हशींचा बळी

$
0
0
वडाळागावात असलेल्या गोठ्यातील म्हशींना घटसर्पाची लागण झाल्याने गेल्या महिनाभरात ७० म्हशींचा बळी गेला आहे. सोमवारी दिवसभरात एका गोठ्यातील सहा म्हशी जागीच गतप्राण झाल्याने ही घटना उघडकीस आली.

स्मारक इतिहास उद्यानातच

$
0
0
बाळासाहेब ठाकरे यांचे नाशिकमधील स्मारक गंगापूर रोडवरील इतिहास उद्यानातच साकारण्यात येईल असा दावा करत नाशिकमधील स्मारकाबाबत महापालिका गंभीर नसल्याचा आरोप शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी केला. बुधवारी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेना कार्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

अंबड दरोडाप्रकरणी ५ जण अटकेत

$
0
0
जुलै महिन्यात अंबडच्या वेल्डकॉन इंडिया प्रा.लि. कंपनीवर पडलेल्या दरोडाप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एका इनोव्हा कारसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दरोडेखोरांनी वेल्डकॉनवर दरोडा घातल्याची कबुलीही पोलिसांना दिली आहे. त्यांना गुरुवारी कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.

कुंभमेळ्यासाठी १२ विभागांचे प्रस्ताव

$
0
0
येत्या दोन वर्षांनी होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात सरकारी पातळीवर उदासिनता असल्याचे दिसून येत आहे. अत्यंत तातडीच्या कामासाठी प्रस्ताव देण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिल्यानंतरही दिलेल्या मुदतीत अवघ्या १२ विभागांनी त्यांचे प्रस्ताव सादर केले आहेत.

'इंटरेस्ट'चे विषय महासभेत

$
0
0
शहरवासियांशी संबंधित प्रस्तावच महासभेत सादर होणे अपेक्षित असताना आयुक्त त्यांना 'इंटरेस्ट' असलेलेच ‌प्रस्ताव महासभेवर ठेवत असल्याचा आरोप करीत माजी उपमहापौर प्रा. देवयानी फरांदे यांनी साडेसतरा कोटींचे रोबोटिक मशिन्स खरेदीच्या प्रस्तावाला पत्रकार परिषदेत विरोध दर्शविला.

आंतरविद्यापीठ : खेळाडूंना डावलले

$
0
0
अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये पुणे विद्यापीठातील रायफल शुटींगच्या खेळाडूंना डावलल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. काही तांत्रिक त्रुटी दाखवत १६ खेळाडूंना स्पर्धेपासून वंचित ठेवल्याची तसेच त्यांना शिवीगाळ केल्याची माहिती या संघातील नाशिकची खेळाडू वैशाली पेखळेने 'मटा'शी बोलताना दिली.

'इको टुरिझम'ची वाट अडखळलेलीच

$
0
0
जिल्ह्यातील अनेक ठिकाणांमध्ये इको टुरिझमची मोठी क्षमता असल्याने या स्थळांचा विकास करण्यासाठी पर्यटन विभाग उत्सुक आहे. वनविभागाच्या कार्यक्षेत्रात ही स्थळे येत असल्याचे हा विकास वनविभागाच्या माध्यमातून प्रस्तावित आहे. मात्र, वनाधिका-यांमधील निरुत्साह या स्थळांच्या विकासावर परिणाम करणारी ठरली आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील इको टुरिझमची वाट अजूनही अडखळलेलीच दिसून येत आहे.

शिक्षण विभागात पदोन्नती मोहीम

$
0
0
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामध्ये लवकरच पदोन्नती मोहीम हाती घेतली जाणार असून विविध पदांसाठी १७० जणांना येत्या महिन्याभरात पदोन्नती मिळणार आहे. मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या पदासाठी ही पदोन्नती केली जाणार असून शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी जिल्हा बदलीने आलेल्या अर्जांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.

एजंटकडून ६ कोटी रूपयांची फसवणूक

$
0
0
वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणा-या एका टोळीने अपहार करीत ६ कोटी १६ लाख ५६ हजार ३३० रूपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या टोळीतील १७ जणांविरूध्द सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

डिप्लोमाचे ग्रहण सुटले

$
0
0
गेल्या तीन वर्षांमध्ये इंजिनिअरींगच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाला लागलेले अनुत्तीर्णतेचे ग्रहण काही प्रमाणात सुटले आहे. या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा राज्यभरातील डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या निकालामध्ये सुधारणा झाली असून या निकालामध्ये जवळपास १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ३५ टक्क्यांवर अडकलेल्या या निकालाने ५२ टक्क्यांचा टप्पा गाठला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images