Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

१५ ऑगस्टला रंगणार गीतलेखन कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानतर्फे लोककवींच्या जयंतीनिमित्त दि. १५ ऑगस्ट रोजी सहावी लोकप्रबोधन गीतलेखन व सादरीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. एचपीटी कॉलेज, कॉलेजरोड येथे दुपारी १२.३० वाजता ही कार्यशाळा होईल.

पहिल्या सत्राचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, साहित्यिक प्रा. डॉ. दिलीप शिंदे यांच्या उपस्थितीत होईल. उद्घाटनपर बीजभाषण उत्तम कांबळे करणार आहेत. ‘ज्वलंत सामाजिक प्रश्न व लोककलावंत शाहीर-गीतकाराची भूमिका, जबाबदारी’ असा त्यांचा विषय आहे.

दुसऱ्या सत्रात वामनदादा कर्डक यांची गीतलेखन प्रेरणा आणि लोकप्रबोधन गीते शरद शेजवळ सादरीकरण करतील. त्यांना लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे कलापथक व नाशिकचे कलावंत सहाय्य करतील. तिसऱ्या सत्रात अहमदनगरचे लोकशाहीर तुळशीराम जाधव लोकप्रबोधन गीतलेखन, सादरीकरण, लोकजागर गीतलेखन, सादरीकरण कसे करावे, या विषयावर मनोगत व्यक्त करणार आहेत.

चौथ्या सत्रात मान्यवर, ज्येष्ठ व नवोदितांचे गीत, शाहिरी लेखन व सादरीकरण होणार आहे. समारोपाप्रसंगी कवी रंगराज ढेंगळे, कवी गायक सोमनाथ गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठान, प्रगतिशील लेखक संघ व एचपीटी कॉलेज, शरद शेजवळ, समाधान पगारे, राकेश वानखेडे, प्रमोद अहिरे आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अन्याय होतोय तर आमच्याकडे या - विधी केंद्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अन्याय होतोय, न्याय मिळवयाचा आहे, तर आमच्याकडे या, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण केंद्राचे सचिव एस. एम. बुक्के यांनी केले आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी किंवा कोर्टात खटला सुरू असला तरी या केंद्रातर्फे अगदी मोफत सेवा दिली जाते. मध्यस्थाचा मार्ग स्वीकारल्यास सर्वसामान्यांच्या अनेक अडचणी वेळीच मार्गी लागू शकतात, असे बुक्के यांनी स्पष्ट केले.

सर्वसामान्यांसाठी शासन स्तरावर अनेक योजना राबवल्या जातात. मात्र, त्याचा लाभ सर्वसामन्यांना मिळतोच असे नाही. समजा एखाद्या अपंग व्यक्तीस तसे सर्टिफिकेट मिळत नसेल तर ती व्यक्ती जिल्हा विधी सेवाकेंद्राकडे न्याय मागू शकते. या व्यक्तीस सर्वतोपरी मदत करण्याची जबाबदारी हे केंद्र पार पाडते, असे बुक्के यांनी स्पष्ट केले. पती-पत्नीतील भांडणे, केस बाउन्स, पेन्शन प्रकरणे, जम‌िनीचे वाद, जादा बिल आकारणीवरून उद्भवलेले वाद अशा अनेक केसेस कोर्टात पोहचतात. यामुळे न्याय व्यवस्थेवरील ताण वाढतो. अशा केसेस जिल्हा विधी सेवा केंद्रात पोहचल्यास त्यावर तोडगा काढता येतो. यामुळे दोन्ही पक्षांचा वेळ आणि पैसा वाचतो.

पती-पत्नीचा वाद मिटवला

याबाबतचे उदाहरण बुक्के यांनी सांगितले की, नुकताच एका डॉक्टर आणि शिक्षक पत्नीमध्ये वादाचा प्रसंग उद्भवला होता. निर्णयाअंती दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात झटपट कारवाई करीत दोन्ही पक्षांना मान्य होईल, असा तोडगा काढण्यात आला. हेच प्रकरण नियम‌ित सुनावणीसाठी गेले असते तर पैसा, वेळ यांचा अपव्यय होऊन मनस्तापच हाती आला असता. कोर्टातील प्रलंबीत खटल्यांचा भार कमी करण्यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

उपेक्ष‌ितांना कायद्याची माहिती

समाजातील उपेक्ष‌ित घटकांना कायद्याची माहिती व्हावी, यासाठी हायकोर्टाच्या आदेशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी कार्यक्रम घेण्यात आला. नुकताच एकटे राहणाऱ्या वृध्दांना त्यांच्याशी संबंधित कायद्यांची, योजनांची माहिती देण्यात आली. लवकरच तृतीयपंथीयांसाठी कार्यक्रम आयोज‌ित केला जाणार असून, या केंद्राच्या माध्यमातून उपेक्ष‌ित आणि माहितीअभावी अडचणींचा सामना करावा लागणाऱ्या व्यक्तींना अगदी मोफत मदत करण्यात येत असल्याचे बुक्के यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेडियम कॉम्प्लेक्सजवळ बचतगटांना मिळणार जागा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महात्मा गांधी रोडवर असलेल्या जिल्हा परिषदेच्या स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये बचत गटांना जागा देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महात्मा गांधीरोडवर जिल्हा परिषदेच्या मालकीचा भूखंड आहे. त्यावर पारख इलेक्ट्रॉनिक्स यांनी अतिक्रमण केले होते. कोर्टाच्या आदेशानुसार हे अतिक्रमण काढून टाकण्यात आल्यानंतर भूखंड मोकळा झाला आहे. अतिक्रमण काढून वर्ष उलटले तरी ही जागा विना वापरात होती. व्यापाराच्या दृष्टीने मोक्याच्या जागी असलेला हा भूखंड विकसित करून ग्रामीण भागातील स्वयंम सहाय्यता गटाद्वारे निर्माण करण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्यास महिला सक्षमीकरणासाठी चांगला वाव निर्माण करुन देता येईल, असे मत बैठकीत मांडण्यात आले. जिल्ह्यात अनेक बचत गट उत्तम प्रकारचे उत्पादने तयार करत असून केवळ मार्केटिंग अभावी त्यांची उत्पादने बाजारात येत नाही. तसेच त्याची उत्पादने शहरात विकायला आली तर नागरिकांना घरची चव मिळेल, बचत गटांनाही नफा होईल. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे. असा निर्णय घेणारी नाशिक ही महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी परंपरेचे शोभायात्रेतून दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी गौरव दिनानिमित्त शहरात आदिवासी बांधवांनी शोभायात्रा काढली. पंचवटीतील श्रीराम विद्यालयापासून निघालेल्या या शोभायात्रेचा सीबीएस येथील हुतात्मा स्मारकात समारोप झाला.

शोभयात्रेच्या कार्यक्रमास माजी मंत्री मधुकर पिचड यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाभरातील विविध ठिकाणांहून आलेले हजारो आदिवासी बांधव या शोभायात्रेत सहभागी झाले. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या तरुणाईने आदिवासी संस्कृती तसेच विविध साहसी खेळांचे दर्शन यावेळी घडविले. ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व सर्व आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचावे आवश्यक हेतूने जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी हा दिवस साजरा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार गावठी कट्टे पेठरोडला जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेठरोडवरील तवलीफाटा, रिक्षा स्टॅण्डजवळ चार गावठी पिस्तुलांची अवैधरित्या विक्री पोलिसांनी रोखली. या प्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
गावठी पिस्तुलांची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिस हवालदार येवाजी महाले यांना मिळाली. त्यांनी म्हसरुळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. त‌ेथे संशयीतरित्या फिरणाऱ्या गणेश सुदाम शेलार (२९, रा. यशोदानगर, मेहरधाम, पेठरोड) आणि लखन दिलीप कानकाटे (२९, रा. राजवाडा, सिध्दार्थनगर, मखमलाबाद) यांची झडती घेण्यात आली. त्यांच्याजवळ चार देशी बनावटीचे पिस्तुले, दोन जिवंत काडतूस असा ८० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस कर्मचारी संदीप भांड, प्रशांत वालझाडे, उत्तम पवार, सोमनाथ शार्दुल, नीलेश पवार, गणेश रहेरे यांनी कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकराजा पावला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
श्रावण सोमवारनिमित्त जिल्हाभरातून सोडण्यात आलेल्या बसेसमुळे राज्य परिवहन महामंडळाला तब्बल ५८ लाख १३ हजार ६०९ रुपयाचे उत्पन्न मिळाले. या यात्रेसाठी २९१ बसेस सोडण्यात आल्या. त्यांनी ४ हजार ७३४ फेऱ्या मारत १ लाख ४२ हजार ५३३ किलोमीटरचा प्रवास केला.
परिवहन महामंडळाच्या या प्रयत्नांच्या माध्यमातून २ लाख ४१ हजार ४६ भाविकांनी प्रवास करत त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. त्यात प्रौढ प्रवाशांची संख्या २ लाख ३० हजार तर लहान मुलांची संख्या ११ हजार ८३४ तर ज्येष्ठ नागरिकांची संख्या २६ हजार १४८ होती. नाशिक आगार दोनमधून सर्वाधिक १०२ बसेस सोडण्यात आल्या. त्यांनी १ हजार २१२ फेऱ्या केल्या तर नाशिक १ विभागातून ५६ बसेस धावल्या त्यांनी ६४६ फेऱ्या केल्या. या यात्रेत एसटी महामंडाळाच्या १३ आगारातून बसेसचे नियोजन करण्यात आले. नाशिक खालोखाल मनमाड व कळवण डेपोमधून २० बसेस सोडण्यात आल्या. गेल्या वेळेपेक्षा भाविकांची संख्या कमी असली तरी ती समाधानाकारक असल्याचे मत महामंडळाच्या सूत्रांनी व्यक्त केले.

तिसऱ्या सोमवारी जिल्ह्यातील १३ आगारातून २९१ बस सोडण्यात आल्या. त्यास भाविकांकडून चांगला प्रतिसाद लाभला. यामुळे एसटीला ५८ लाखाच्या आसपास उत्पन्न मिळाले आहे.
- राजेंद्र जगताप, ‌
जिल्हा वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ

आगार......वापरलेल्या बसेस....फेऱ्या
- नाशिक २......१०२......१,२१२
- नाशिक १......५६......६४६
- मनमाड......२०......६७८
- कळवण......२०......३३६
- येवला......१७......२१८
- मालेगाव......१५......२३२
- सटाणा......११......१८४
- पेठ......११......३१३
- सिन्नर......१०......२३४
- इगतपुरी......१०......१५०
- लासलगाव......१०......११८
- नांदगाव......६......१११
- पिंपळगाव......३......३०२
एकूण......२९१......४,७३४


फेरीतील प्रवासी
- प्रौढ : २ लाख ३० हजार
- लहान मुले : ११ हजार ८३४
- ज्येष्ठ नागरिक : २६ हजार १४८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमधूनही शिवशाही बसेस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी शिवशाही बससेवा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर आता ११ ऑक्टोबर रोजी २० बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. या बसमध्ये स्लिपर कोच सुध्दा असून त्या पुणे, अहमदाबाद, इंदूर, बडोदा येथे सोडण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. या बसला कसा प्रतिसाद मिळतो हे बघून त्याची संख्याही वाढविली जाणार आहे.

शिवशाही बस गाडीच्या प्रति टप्प्याचे भाडे इतर बस गाड्यांच्या तुलनेत कमी ठेवण्याचा निर्णय महामंडळाने यापूर्वीच घेतल्याने प्रवाशांमध्ये या बसचे आकर्षण आहे. खासगी वाहतूकदार आरामदायी बस गाड्यांच्या भाड्यात सवलत देतात. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट होत असल्यामुळे एसटीने या शिवशाही बस सुरू करण्याचा निर्णय घेतला. तब्बल ५०० बस या राज्यभरात टप्या-टप्याने सुरू केल्या जाणार आहेत. राज्यातील विविध शहरांसाठी शिवशाही बस सेवा सुरू झाल्यानंतर खासगी बस गाड्यांचे प्रवासी एसटीच्या शिवशाही वळतील अशी मंडळाला आशा आहे. शिवनेरीपेक्षा या बसेसचे दर कमी असणार असल्याचे मानले जात आहे.

लांब पल्ल्यावर भर
शिवशाही बससाठी लांब पल्ल्याचे नियोजन केले आहे. याबाबत महामंडळाला पत्र आले असून त्यात बसची संख्या नाही. मात्र, २० च्या आसपास या बसेस उपलब्ध होऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. या बस कोल्हापूर व हैदराबाद सोडण्याचाही विचार महामंडळाचा आहे. पण त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटीच्या काळात जादा बसची सुविधा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
यंदा स्वातंत्र्यदिनाला लागून सलग सुट्या येत असल्याने प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने जादा बसेसचे नियोजन केले आहे. प्रवाशांची संख्या ११ ते १५ ऑगस्ट दरम्यान वाढणार असल्याचे गृहित धरून विविध मार्गांवर बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यात पुणे, धुळेसह अन्य मार्गांचा समावेश आहे.
सलग सुट्यांमुळे परिवहन महामंडळाने ११ व १५ ऑगस्ट जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. १२ व १३ रोजी शनिवार रविवार आणि त्यानंतर मंगळवारी १५ ऑगस्टची सार्वजनिक सुटी आहे. या काळात प्रवाशांची गर्दी वाढू शकते, त्यामुळे जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. जादा बससेमध्ये शुक्रवारी (दि. ११) नाशिकला येण्यासाठी पुणे येथून दुपारी चार वाजेनंतर २० बसेस सोडल्या जाणार आहेत. तर कसारा येथे चार बसची व्यवस्था केली आहे. याशिवाय कसारा, मुंबई व पुणे येथे मंगळवारी (दि. १५) बस सोडण्यात येणार आहे. यात पुणे व मुंबई येथील बसची संख्या अधिक आहे.

मागणी तसा पुरवठा
प्रवाशांची मागणी जशी वाढेल तशा पध्दतीने जादा बसेस सोडण्यात येणार आहे. या बस मुंबई, पुणे बरोबरच धुळे, नंदुरबार व जळगाव येथेही सोडण्याचा विचार एसटी महामंडळाचा आहे. मंगळवारनंतर (दि. १५) पुन्हा गुरुवारी (दि. १७) पतेतीची सुटी आहे. त्यामुळे पुढचा आठवडा हा सुट्यांचा असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शालिमारला कापड दुकानात दरोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शालिमारसारख्या बाजारपेठेतील रेडिमेड कपड्यांचे दुकान फोडून चोरट्यांनी रोकड आणि सुमारे १५ हजार रुपयांचे कपडे चोरून नेले. भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भारत रमेश ठाकरे (रा. फुले मार्केट, भद्रकाली) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ठाकरे यांचे शालिमार चौकात वैष्णवी कलेक्शन नावाचे रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. चोरट्यांनी सोमवारी (दि. ७) रात्री दुकानाच्या मागील बाजूच्या भिंतीस लावलेला एक्झीट फॅन काढून दुकानामध्ये प्रवेश केला. गल्ल्यातील रोकड तसेच जिन्स, कॉटन पॅण्ट, शर्ट, टी शर्ट असा सुमारे १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

पाथर्डी फाट्यात दोन घरफोड्या
नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात भरदिवसा वेगवेगळ्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे ३४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दीपक विष्णू नवले (रा. स्वराज्यनगर, नवलेमळा) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. नवले कुटुंबीय मंगळवारी दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यावेळी चोरट्याने संधी साधून रोकड व दागिने असा ३४ हजाराचा ऐवज चोरून नेला. याच परिसरातील शुक्रतारा या इमारतीतही घरफोडी झाली. सुनीता रमेश उन्हवणे या अल्पावधीसाठी घराबाहेर पडल्या असता चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले.

मंदिरात भरदिवसा चोरी
नाशिक : अंबड लिंक रोडवरील केवलपार्क भागातील तुळजाभवानी मंदिरातील दानपेटीसह चोरट्यांनी देवीच्या अंगावरील दागिने चोरून नेले. याप्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. राजू सोपान पटेकर (रा. केवलपार्क) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. चोरट्यांनी मंगळवारी (दि. ८) दुपारी मंदिरात प्रवेश केला. देवीच्या अंगावरील दहा हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व तिजोरीसह रोकड असा १५ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात मृत्यू

$
0
0

नाशिक : भरधाव मोपेडवरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. इंदरलाल तलरेजा (रा. अजेंठानगरी, शिखरेवाडी, नाशिकरोड) असे मृत्यू झालेल्या मोटरसायकलस्वाराचे नाव आहे. मुंबई नाक्याकडून पाथर्डी फाट्याकडे अ‍ॅक्टिव्हा गाडीवरून जात असताना इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरातील एका इमारती समोरील गतिरोधकावर त्यांची मोपेड घसरली होती. अपघातात तलरेजा गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी हॉस्प‌िटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी (दि. ८) सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.

वृध्दाची आत्महत्या
भाभानगर परिसरातील ७५ वर्षीय वृध्दाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. माणिकचंद देवचंद पाटील (७५ रा. श्रीकृष्ण कुंज सोसायटी, भाभानगर) असे या वृध्दाचे नाव आहे. त्यांनी मंगळवारी (दि. ८) विषारी औषध सेवन केले. कुटुंबीयांनी त्यांना पंचवटीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दोन गुन्हेगारांना अटक
सिन्नर फाटा : एटीएम फोडीसह चोरीच्या गुन्ह्यात वर्षभरापासून फरार असलेल्या दोन संशयित गुन्हेगारांना नाशिकरोड येथील शिवाजी पुतळा तसेच सिन्नर फाटा परिसरातील स्टेशनवाडी येथे पोलिसांनी जेरबंद केले.
अक्षय किसन चौधरी (२३, रा. पंचशील कॉलनी, गायकवाड नगर) असे एटीएम चोरीतील आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेचे विशाल पाटील व महेश सावळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तसेच राहुल भरत वाघेला (२८) असे
स्टेशनवाडी येथे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक कुंदन सोनोने, गुन्हे शाखेचे सय्यद कय्यूम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींना हिणवू नका!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव
आदिवासींना वनवासी म्हणून हिणवू नका; कारण आदिवासी हा देशातील मूळनिवासी आहे. हा देश आमचा आहे. आदिवासींवर कोणी अन्याय अत्याचार केला तर तो सहन करणार नाही, असा इशारा माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी दिला.
आदिवासी गौरव दिनानिमित्त आयोजित जनजागृती मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नाशिक विभाग यांच्या वतीने जनजागृती मेळावा व सत्कार सोहळा बुधवारी परशुराम सायखेडकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला. यावेळी मंचावर माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, निवृत्त मुख्य सचिव पी. एस. मीना, आयएस अधिकारी डॉ. योगेश भरसट, नगरसेवक चंद्रकांत खाडे, राजेंद्र वाघले, अध्यक्ष लकी जाधव उपस्थित होते.
पिचड म्हणाले, की अनेक लोक आदिवासी असल्याचे बोगस जातीचे दाखले मिळवून नोकरी आणि शैक्षणिक फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले बोगस दाखले आढळून आल्यास त्यांच्या सर्व सवलती रद्द करण्यात येतील.

संघटित राहण्याची गरज
आदिवासींच्या जमिनी खरेदी-विक्री करताना अडचणी येत असल्याचे सांगूत सरकार कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, तसे झाल्यास आदिवासींकडे जागा शिल्लक राहणार नाही. आदिवासींच्या सर्व जागा बिल्डर व धन दाडग्यांच्या मालकीच्या होतील. त्यामुळे सर्वांनी एकजूट दाखवून संघटीत राहणे गरजेचे आहे, असे मत पिचड यांनी व्यक्त केले.

धनगर आदिवासी नाहीत
धनगर समाज हा आदिवासी नाही. त्यांना आदिवासी समाजामध्ये आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरून विरोध करू. पद्नोत्ती आरक्षण रद्द करून सरकार आदिवासींसह मागासांवर अन्याय करीत आहे‌त, असा आरोप पिचड यांनी केला. याशिवाय दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने योजना सुरू केली त्यामधून मुलांना रोख स्वरुपात पैसे दिले जात आहेत. पण आम्हाला पैसे नको चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असेही पिचड यांनी सांगितले.

मुख्य कार्यक्रम पुण्याला का?
आदिवासी दिनाच्या कार्यक्रमावरून सरकारवर टीकास्र सोडताना पिचड म्हणाले, की आदिवासींची संख्या नाशिकला अधिक आहे. पुण्याला आदिवासी नसूनही राज्य सरकारने आदिवासी दिनाचा मुख्य कार्यक्रम पुण्याला घेतला. आदिवासींची चेष्टा करू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्य सैनिकांचे लाक्षणिक उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
एकसमान पेन्शन द्यावी, बेघरांना घरकुले द्यावीत यांसह विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्य सैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने केली. क्रांती दिनाचे औचित्य साधून हे आंदोलन करण्यात आले.
नाशिक शहर जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समितीच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारकामध्ये सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांना स्वातंत्र्यसैनिकांनी अभिवादन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष पंडित येलमामे, सरचिटणीस वसंत हुदलीकर यांच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
उतारवयात स्वातंत्र्यसैनिकांना न्याय्य हक्कांसांठी सरकारशी संघर्ष करावा लागतो, ही मोठी शोकांतिका आहे. वारंवार पाठपुरावा करूनही स्वातंत्र्यसैनिकांच्या मागण्या सरकारकडून पूर्ण केल्या जात नसल्याबद्दल त्यांनी खेडकरांकडे नाराजी व्यक्त केली. हिंदूमाता स्वातंत्र्य सैनिक हौसिंग सोसायटीसाठी सन २००५ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी महेश झगडे यांनी जागावाटप प्रस्ताव मंजूर करुनही अद्याप ही जागा स्वातंत्र्य सैनिकांच्या ताब्यात मिळालेली नाही. बेघर स्वातंत्र्य सैनिकांना घरकुले मिळायला हवीत. स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरीत १० टक्के आरक्षण मिळायला हवे. भूमिहीन स्वातंत्र्य सैनिकांना जमीन आणि कुटुंबातील सदस्यांना आर्मी किंवा पोलिस भरतीमध्ये प्राधान्य मिळावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी दगडुसा कलाल, मनोहर कुलकर्णी, सरस्वती मोरे, विमल आटवणे, सरस्वती पाटील, सत्यभामा मोजाड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षतोडीकडे पालिकेचे दुर्लक्ष?

$
0
0

टाकळी परिसरातील दोन झाडांवर कुऱ्हाड; हायकोर्टाचे आदेश धाब्यावर

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

टाकळीफाटा परिसरातील तिंगरानिया कंपनीजवळील सौख्य अपार्टमेंटसमोरील दोन मोठी झाडे नुकतीच मुळापासून तोडण्यात आली. नाशिकमधील झाडे तोडण्यास हायकोर्टाची स्थगिती आहे. तरीही या वृक्ष तोडीनंतर महापालिकेचे उद्यान निरीक्षक बी. टी. कटारे यांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. झाडे तोडणाऱ्यांना कटारे यांनी साथ दिल्याचा नागरिकांचा आरोप आहे. कोर्टाच्या निदर्शनास ही बाब आणणार असल्याचे पर्यावरणप्रेमी भारती जाधव यांनी 'मटा'ला सांगितले.

टाकळी, द्वारका परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड सुरू आहे. हायकोर्टाने शहरातील झाडे तोडण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे तांत्रिक कारणास्तव वृक्षतोडीस नागरिकांना परवानगी देण्याचा अधिकार महापालिकेला नाही. असे असतानाही निरीक्षक कटारे यांनी अप्रत्यक्षपणे झाडे तोडण्यास मदत केल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

निरीक्षकांचे दुर्लक्ष

नागरिकांनी सांगितले की, टाकळीतील तिंगरानीया कंपनीजवळ इमारत उभारण्याचे काम केले जाणार आहे. येथे दोन झाडांचा अडथळा नसतानाही ती तोडण्यात आली. दि. ५ ऑगस्टला पहिले झाड तोडण्यात आल्यानंतर पर्यावरणप्रेमींनी कटारे यांना ही बाब कळवली होती. त्यांनी याठिकाणी कर्मचारी पाठवून लाकूड तोड्यांची कुऱ्हाड व अन्य साहित्य जप्त केले होते. यानंतर नागरिकांच्या दक्षतेमुळे दुसरे झाडे वाचले असे वाटले. मात्र बुधवारी, दुसरे झाडही बेधडक तोडण्यात आले. त्यामुळे या प्रकाराकडे निरीक्षक कटारे यांनी दुर्लक्ष केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

महापालिकेची उदासीनता

महापालिकेने झाडे तोडणाऱ्यांवर वेळीच गुन्हा दाखल केला असता तर दुसरे झाडे वाचले असते असे नागरिकांचे म्हणणे आहे. कटारे यांनी अद्याप त्याबाबत गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे संबंधितांचे मनोधैर्य वाढून त्यांनी दुसरे झाडही तोडून टाकले. हायकोर्टाची स्थगिती असतानाही टाकळी परिसरात अनेकदा बेकायदेशीर वृक्षतोड झाली आहे. याला महापालिकेची उदासीनता कारणीभूत आहे. काठेगल्लीत बदामाची सहा झाडे तोडल्याची तक्रार वृक्षप्रेमी शेखर गायकवाड यांनी केली होती. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही. शहरातील इतर ठिकाणीही झाडे तोडण्यात आली. त्यामध्ये जत्रा हॉटेलजवळ शरयू पार्कजवळही दोन झाडे तोडण्यात आली. जेलरोडच्या लोखंडे मंगल कार्यालयासमोर चार दिवसांपूर्वी निलगिरीचे मोठे झाड तोडले. शेजारीच म्हसोबा मंदिराशेजारील बाभळीचे मोठे झाड कापण्यात आले. जेलरोडच्या सैलानी बाबा चौकाजवळही दोन मोठी झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात आली. या सर्व प्रकारानंतरही गुन्हे दाखल करत नसल्याने हा प्रकार किती गंभीर आहे, हे दिसून येते.

दोन झाडे तोडल्याप्रकरणी आज तक्रार केली जाणार असून, याबाबत अधिक माहिती घत संबंधितांना नोटीस दिली आहे. याआधी टाकळी परिसरात झाडे तोडल्याप्रकरणी सात-आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

-बी. टी. कटारे, उद्यान निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानातील वादाची पातळी घसरली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा वाद निवडणुकीनंतर थंडावला, असे वाटत असतानाच नागरिक शिक्षक गौरव समिती अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरुन तो पुन्हा उफाळला आहे. एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करतानाच हा वाद आता थेट व्यक्तिगत पातळीवर पोहचला आहे.

सावानाचे कार्यवाह श्रीकांत बेणी यांनी माजी पदाधिकारी मिलिंद जहागीरदार यांना एक पत्र पाठवून वडिलांच्या श्रद्धांजली सभेसाठी घेतलेल्या सावाना सभागृह वापराचे शुल्क मागणी करुनही आजतागायत भरले नसल्याचा आरोप करतानाच, ते पत्र प्रसिद्धीसही दिल्यामुळे या वादाने आता कशी हीन पातळी गाठली, याचे दर्शन झाले आहे.

सावाना नागरिक शिक्षक गौरव समितीच्या अध्यक्षपदी रमेश देशमुख यांची निवड बेकायदेशीर असल्याच्या सावानाचे माजी कार्यवाह मिल‌िंद जहागीरदार यांच्या प्रतिक्रियेला बेणी यांनी उत्तर पाठवले असून, त्यात त्यांनी या कौटुंबिक घटनेचा उल्लेख करुन नैतिक अधिकाराचाच मुद्दा उपस्थित केला आहे. याच पत्रात बेणी यांनी मिलिंद जाहगीरदार यांचा उल्लेख ‘तो मी नव्हेच’मधील लखोबा लोखंडे असासुद्धा केला आहे. विशेष म्हणजे बेणी यांनी या पत्रात ‘मी सावानाचा प्रमुख सचिव आहे. सावाना कार्यकारी मंडळाने पारीत केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे आणि घेतलेले निर्णय कार्यान्वित करणे हे माझे घटनादत्त कर्तव्य आहे. मी एकटा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे सावानाच्या कामकाजावर आपले मतप्रदर्शन करताना सगळ्या कामास मी एकटाच जबाबदार आहे, ही आपली वृत्ती ही केवळ व्यक्त‌िद्वेषातून निर्माण झालेली पदोपदी दिसते आहे,’ असे म्हटले आहे. त्यामुळे एकमेकांवर दोन्हींकडून व्यक्तिद्वेषाचे दाखले दिले जात असले, तरी हा वाद वैयक्तिक पातळीवर सुरू असून, त्यामुळे सामान्य वाचक निराश झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..अन् कॉइन मशिन गेले परत!

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

वर्षभरापूर्वी नाशिकच्या रेल्वे प्रवाशांचा ताण टाळण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकात दोन कॉइन ऑपरेटेड मशिन बसविण्यात आली होती. त्यापैकी एक मशिन मुंबईला परत पाठविण्यात आले आहे. नाशिककरांचा प्रतिसादच मिळत नसल्याने ही वेळ आली आहे. अनेक रेल्वे प्रवासी अद्याप टेक्नोसॅव्ही नसल्याने नवीन योजनांची अशी वाट लागत आहे.

रेल्वेच्या तिकिटासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते. गर्दीच्या वेळी वाद, ताण-तणाव निर्माण होतात. हे टाळण्यासाठी नाशिकरोड आणि देवळाली रेल्वेस्टेशनमध्ये रोख पैसे टाकून तिकीट घेण्याची मशिन्स दीड वर्षांपूर्वी आली. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे तिकीट खिडकी, रेल्वे बुकींग, एटीव्हीएम व कॉइन मशिन अशा चार माध्यमांतून तिकिटाची सोय झाली.

फोर्ब्स कंपनीचे ही मशिन्स मुंबई कार्यालयातून आली. नाशिकरोड स्थानकात दोन आणि देवळाली स्टेशनमध्ये एक मशिन बसविण्यात आले. मनमाड आणि भुसावळमध्ये ते कार्यरत आहेत. तिकिटासाठी लाइन लावण्याऐवजी या मशिनमध्ये नोटा टाकल्यास तिकीट बाहेर येते. एटीएम मश‌िनप्रमाणेच त्याचे कार्य चालते. इंग्रजी आणि हिंदीतून भाषा निवडता येते. नोटा आणि नाणी टाकण्याची व बाहेर येण्याचे दोन स्वतंत्र मार्ग आहेत. मशिन कसे हाताळायचे याच्या सूचना मशिनवर आहेत.

निरक्षरता नडली

गर्दीच्या वेळी या मशिनमुळे प्रवाशांचा मोठा फायदा होईल, त्यांचा ताण वाचेल, असा उद्देश हे मशिन लावण्यामागे होता. रेल्वे कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला सकाळी एक तास प्रवाशांचे मशिनबाबत प्रबोधनही केले. तेथे एक फॅसिलेटरही नेमला आहे. परंतु, पैसे टाकून तिकीट घेण्याची प्रक्रिया सोपी असतानाही नाशिककरांनी त्याकडे पाठ फिरवली. दिवसाला दहा प्रवाशीही या मशिनकडे फिरकत नाहीत असा अनुभव आहे. त्यामुळे अखेर रेल्वेने दोनपैकी एक मशिन नुकतेच मुंबईला रवाना केले.


कार्डचाही पर्याय

नाशिकरोड स्थानकातून दररोज १२ ते १४ हजार तिकिटे विकली जातात. सुमारे वीस हजार प्रवासी प्रवास करतात. महिन्याला सुमारे नऊ ते अकरा कोटींचा महसूल मिळतो. सध्या मुख्य तिकीट खिडकी, खासगी तिकीट केंद्र आणि एटीव्हीएम (अॅटोमॅटिक तिकीट व्हेंडींग मशिन) स्थानकात आहे. रेल्वे कॉइनप्रमाणेच नाशिकरोड रेल्वेस्थानकात एटीव्हीएम मशिन बसवले आहे. या मोहिमेतंर्गत डेब‌िट कार्डसारखे कार्ड रेल्वे देते. ते रिचार्ज केल्यावर बोनस मिळतो. हे कार्ड मशिनमध्ये टाकून तिकीट काढता येते. तिकिटाचे पैसे वजा होतात. कार्ड पुन्हा रिचार्ज करावे लागते. कॉइन ऑपरेटेड मशिनला अशा कार्डची गरज नाही.

कॉइन मशिनची वैशिष्ट्ये

- मशिन पाच आणि दहाची नाणी आणि पाच रुपयांपासून एक हजाराच्या नोटाच स्वीकारते.

- फक्त गांधी मालिकेतील नोटाच स्वीकारल्या जातात.

- देवाण-घेवाणीत चूक झाली तर पैसे परत बाहेर येतात.

- मशिन हाताळण्यात समस्या आली तर बुकिंग सुपरवायझर मदत करतो.

- जेवढ्या रकमेचे तिकीट आहे, तेवढेच पैसे टाकावेत.

- मशिनने दिलेल्या वेळेतच व्यवहार करावा.

- नोटा स्वीकारण्याचा सिग्नल लागल्यावरच नोटा टाकव्यात.

- नोट व नाणी एक एक करुन टाका.

- तेलकट व खराब नोटा टाकू नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सूचना फलकांचा पुन्हा घाट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक महापालिकेने सिंहस्थाच्या काळात संपूर्ण शहरात सूचनाफलक लावले. परंतु, गेल्या वर्षभरातच त्यातील काही फलक नाहीसे झाले, तर काही खराब झाले आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले. आता पुन्हा हे फलक लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
पश्च‌मि विभागात सूचनाफलक खराब होण्याची संख्या जास्त होती. म्हणून ते पुन्हा नव्याने लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम विभागात या कामाची सुरुवात करण्यात येणार आहे. सिंहस्थाच्या कालावधीत लावलेल्या फलकांचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत.
नाशिक शहरात सिंहस्थाच्या कालावधीत देश-विदेशातून येणाऱ्या नागरिकांना रस्त्यांची माहिती व्हावी, यासाठी नाशिक महापालिकेने दिशादर्शक व सूचना फलक यांच्यावर कोट्यावधी रुपये खर्च केले होते. त्यावेळी शहराच्या प्रवेशद्वारापासून ते विविध भागांत मोठ्या प्रमाणात फलक लावण्यात आले. परंतु, वर्ष संपताच यातील काही फलक गायब झाले आहेत, तर काही फलक खराब झाले. शहरात पर्यटकांचा नेहमीच राबता असतो. अनेकदा रस्ते माहीत नसल्याने लोक शहरात भरकटतात. ट्रॅफिकमधून बाहेर पडताना नाकीनऊ येतात. ही अडचण ओळखून नाशिक महापालिका प्रशासनाने सूचना फलक व दिशादर्शक फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पश्चिम विभागापासून या कामाला सुरुवात होणार असून, त्यासाठी ४ लाख ९९ हजार २०३ रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्तांनी या कामाची नुकतीच निविदा काढली आहे. नवीन कामामुळे बाहेरुन येणाऱ्या नागरिकांना रस्त्याची माहिती होण्यास सोपे होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औद्योगिक वसाहतीत कामगारांचा प्रवास खडतर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने अंबड औद्योगिक वसाहतीत रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचत आहेत. तसेच या खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे कामगारांचा प्रवास या खड्ड्यांतून होत असल्याने खड्डेमय रस्त्यांवरून वाहने चालवताना कामगारांचा प्रवास खडतर झाला आहे. अंबड एमआयडीसीत असलेल्या सर्वच अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांनी चाळण झाली आहे. तरी महापालिकेच्या यंत्रणेने खड्ड्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांसह एमआयडीसीतील उद्योजकांनी केली आहे.

जोरदार पावसाने अंबड एमआयडीसीच्या रस्त्यांची पुरती वाट लागली असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच्या पावसाने या रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसत आहेत. परिसरातील उद्योजकांना त्यांच्या उत्पादन मालाच्या अवजड वाहतुकीस यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कामगारांनाही याचा फटका बसला आहे. रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी चालविणेही जिकरीचे झाले आहे, असेही काही कामगार सांगत आहेत.

काही ठिकाणी डांबरीकरणच नाही

अंबड एमआयडीसीत लघू उद्योजकांसाठी असलेल्या आयमा औद्योगिक संघटनेने रस्ते डांबरीकरणाची मागणी केली होती. यात मुख्य रस्त्यांसह काही रस्ते महापालिकेने डांबरीकरण केलेही होते. परंतु, अनेक अंतर्गत रस्त्यांना डांबरीकरण करण्यात आले नसल्याने खड्ड्यांतून कामगारांना आपली वाहने चालवावी लागत होती. दरम्यान, शहरात झालेल्या जोरदार पावसाने खड्डेमय झालेल्या रस्त्यांवर पावसाचे पाणी साचत असल्याने कामगारांचा प्रवास आणखीनच खडतर बनला आहे.

अवजड वाहनांना त्रास

उद्योजकांची अवजड वाहने कच्चा माल देण्यासाठी व उत्पादन केलेला माल घेऊन जाण्यासाठी येत असताना त्यांनादेखील खड्डेमय रस्त्यांवरून वाहन चालविण्याची वेळ आली आहे. महापालिकेने डांबरीकरणापासून सोडलेल्या रस्त्यांचे काम तातडीने हाती घेतले पाहिजे, अशी अपेक्षा कामगारांसह उद्योजकांनी व्यक्त केली आहे. तसेच खड्डेमय झालेल्या रस्त्यांची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने अंबड एमआयडीसीतील अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. त्यानंतर या पावसाने रस्त्यांची चाळण झाली आहे. तसेच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा प्रवासही खडतर झाला आहे. महापालिकेने किमान रस्त्यांची तत्काळ दुरूस्ती करण्याची गरज आहे.

-अमोल निकम, कामगार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस प्रशिक्षण केंद्राचा आज दीक्षांत समारंभ

$
0
0

धुळे ः शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्यावतीने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीचा आज (दि. १० ऑगस्ट) सकाळी दीक्षांत समारंभ व संचालनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक विजयसिंह जाधव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी प्राचार्य चंद्रकांत गवळी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सन २०१० पासून पोलिस प्रशिक्षण केंद्र धुळ्यात सुरू करण्यात आले. सप्टेंबर महिन्यापासून पुढील प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी दाखल होणार असल्याचेही गवळी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका कर्मचारी आक्रमक

$
0
0

टीम मटा

अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्यांसह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवांचा लाभ मिळावा या मागणीसाठी सटाणा, निफाड, येवला येथील नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन केले.

सेवेत समावेश करण्याची मागणी

निफाड : नवनिर्मित नगरपरिषद व नगरपंचायतीत तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा समावेश करावा, या मागणीसाठी निफाड नगरपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी बुधवारी सामुदायीक रजेच्या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण व तहसीलदार विनोद भामरे यांना निवेदन दिले.

निवेदनात नऊ मागण्यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपंचायत सेवेत सामावून घ्यावे, कर्मचारी समावेशनसाठी विहीत अर्हता ही सरळसेवा भरतीच्या अर्हतेसारखी न ठेवता ज्या पदावर कामावर आहे त्याच पदावर ठेवावे, कर्मचाऱ्यांना पात्रता पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी द्यावा, यापूर्वी नागरपरिषद प्रशासन संचनालयाचे नवनिर्मित नगरपरिषदेच्या कर्मचारी समावेशन प्रक्रियेप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांचे समावेशन करावे, आश्वाशीत प्रगती योजना व इतर सेवा सवलतींचा लाभ द्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.

या आंदोलनात नवनिर्मित नगरपंचायत कर्मचारी अन्याय निवारण कृती समितीचे विभागीय अध्यक्ष बाबुलाल थोरात, जिल्हा सरचिटणीस अनिल कुंदे, जिल्हा सदस्य दिनेश सोनवणे, उज्ज्वल चव्हाण, शरद काकुळते, बापू कुंभार्डे, जालिंदर पवार, रामदास कराटे, हिराबाई धारराव व कर्मचारी उपस्थित होते. निफाड नगरपंचयातीच्या खाली पेंडॉल टाकून सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.

काळ्या फिती लावून निषेध

सटाणा : सटाणा नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी काळ्या फिती लावून सामूहिक रजा आंदोलन केले. पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य नगरपालिका, नगर पंचायत, मुख्याधिकारी, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी आणि संघर्ष समितीच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आल्याचे सांगण्यात आले.

राज्यातील नगर परिषद कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर २००६ पासून सातवा वेतन आयोग लागू करावा, १०० टक्के वेतन शासनामार्फत देण्यात यावे, जि. प. व पं. सं. कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व लाभ पालिका कर्मचाऱ्यांना द्यावा, नगरपरिषद कर्मचाऱ्यांना २४ वर्ष आश्वासित प्रगती योजनेच्या लाभ विनाअट लागू करावी, रोजदारी कर्मचाऱ्यांना विनाअट कायम करावे आदी मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.

आंदोलनात कामगार युनियनचे अध्यक्ष सुभाष पाटील, सरच‌िटणीस पोपटराव सोनवणे, अनिल सोनवणे, संजय सोनवणे, शालीग्राम कोर, प्रशांत पाठक, हिरालाल कापडणीस, किशोर सोनवणे, दीपक सोनवणे, सुनील सोनवणे, विजय सोनवणे, संजय कुलकर्णी, जितेंद्र पवार, हेमंत बोरसे, खंडेराव जाधव, पोपट सोनवणे, कर्मचारी, कामगार सहभागी झाले होते.

आंदोलनाला पाठींबा

नगराध्यक्ष मुकुंद होळकर, उपनगराध्यक्षा चारुशीला कर्डीने, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, नगरसेवक अनिल कुंदे, शिवसेना शहर प्रमुख संजय कुंदे, सुनील निकाळे, विक्रम रंधवे, असिफ पठाण, सुनील श्रीवास्तव, दीपक गाजरे आदींनी या ठिकाणी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.
येवल्यात घोषणाबाजीने दणाणले तहसील

येवला ः गेली अनेक वर्षे सातत्याने रेटा लावूनही विविध मागण्या प्रलंबित असल्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्त्वाखाली येवला नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी बुधवारी शहरातून मोर्चा काढला. हाती मागण्यांचे फलक घेत अन् जोरदार घोषणाबाजी करत शहराच्या विविध भागातून मार्गस्थ झालेला हा मोर्चा येवला तहसीलवर थडकला. तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

पालिकेच्या जुन्या कार्यालयापासून निघालेल्या या मोर्चात पालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते. महागाई भत्ता फरक मिळालाच पाहिजे, सफाई कामगारांना त्वरित घरे मिळावीत, अनुकंपा तत्त्वावरील नेमणुका द्या, रोजंदारीचे

थकीत वेतन अदा करा आदी अनेक मागण्यांचे फलक हाती घेत या मोर्चात पुरुष व स्त्री कर्मचारी सहभागी झाले होते. तहसीलमध्ये नायब तहसीलदार तुरुंगले यांनी निवेदन स्वीकारले. भारतीय मजदूर संघाच्या वतीने शशिकांत मोरे व प्रशांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संजय पोंदे, दत्तात्रय गुंजाळ,किशोर भावसार,श्रीकृष्ण हंडी हे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'पोतराज'चे सरकारला साकडे

$
0
0

इस्लामपूरच्या विजय जाधवांचे आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नांकडे शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष वेधले जावे यासाठी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या विजय जाधव या शेतकऱ्याने राज्यभर ठिकठिकाणी कडकलक्ष्मी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात त्यांनी पोतराजाची वेशभूषा परिधान केली असून, स्वत:च्या अंगावर चाबकाचे फटके मारून घेत आहे. 'इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे' असा संदेश यातून त्यांनी दिला आहे.

विजय जाधव हे नुकतेच राज्य दौरा करताना धुळ्यात दाखल झाले होते. त्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेसमोर एकपात्री पथनाट्य सादर करीत धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले. तसेच येत्या १४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर 'मी बळीराजा बोलतोय' हे पथनाट्य सादर करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जाब विचारणार असल्याचेही त्यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. राज्यात दुष्काळ, नापिकी, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकरी हैराण झाले असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेकदा आंदोलन करण्यात आले. मात्र, सरकारच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील बळीराजा शेतकरी संघाचे विजय जाधव व त्यांचे सहकारी विवेक कदम यांनी राज्यभर कडकलक्ष्मी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. या दोघांनी सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नंदुरबार, तळोद्यानंतर धुळे शहरासह जिल्ह्यातील गावांमध्ये आंदोलन व पथनाट्य सादर केले. बळीराजा शेतकरी संघाचे विजय जाधव व त्यांचे सहकारी विवेक कदम यांनी या आंदोलनातून राज्यभरातील विविध शहरांमध्ये दुचाकीवर जाऊन तब्बल एक हजार किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. त्याद्वारे हे दोघे जनजागृती करीत आहेत.
...तर १४ ऑगस्टला चक्काजाम

राज्यात पहिली आत्महत्या करणारे शेतकरी साहेबराव कर्पे या शेतकऱ्याच्या अस्थी तसेच लातूर जिल्ह्यातील आत्महत्या करणारी शेतकऱ्याची तरुण मुलगी तसेच विविध जिल्ह्यातील २५ शेतकऱ्यांच्या अस्थींचा कलश त्यांनी यापूर्वीच सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न न सुटल्यास १४ ऑगस्टला चक्काजाम करू, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनाला शहर युवक काँग्रेसचे अलोक रघुवंशी यांनी सहकार्य केले. तरी राज्यभरातील शेतकऱ्यांचे कर्ज तातडीने माफ करावे, २०११ पूर्वीची थकित कर्जाची वसुली थांबविण्यात यावी, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या, बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करण्यात यावी, आरोग्याला घातक ठरणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थंच्या उत्पादनावर बंदी घालण्यात यावी, महिला सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images