Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पथदिप बंद अन् अधिका-यांचे मोबाईलही बंद

$
0
0
नाशिकरोडच्या राजमाता जिजाऊ तरण तलावाच्या परिसरात अनेक दिवसांपासून पथदिप बंद असून अधिकाऱ्यांना तक्रार करण्यासाठी फोन केला असता फोन उचलत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

तात्काळ तिकीटासाठी सेल्फ अॅटेस्टेड प्रत

$
0
0
रेल्वेचे तात्काळ तिकीट घेताना येणा-या अडचणी लक्षात घेता मूळ परिचयपत्रासह स्वयं साक्षांकित (सेल्फ अटेस्टेड) प्रतही सादर करावी लागणार आहे. १५ जूनपासून मध्य रेल्वेने या नियमाची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे.

अखेर त्या जळीत मृलीचा मृत्यू

$
0
0
रावेर तालुक्यातील दोधे विनयभंगाच्या प्रयत्नामुळे जाळून घेतलेल्या अल्पवयीन तरूणीचे सकाळी निधन झाले. गेल्या आठ दिवसापासून तिच्यावर उपचार सुरू होते.

गोकुळाडीत पाइपलाइन फुटल्याने पाणीच पाणी

$
0
0
गंगापूर रोडवरील राठी आमराई परिसरात तीन दिवसांपासून पुटलेली पाइपलाइन अद्याप दुरूस्त झालेली नाही. यामुळे या परिसरात पाणीच पाणी चुहूकडे झाल्याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. ही पाइपलाइन दुरूस्त करून पाण्याचा अपव्यय त्वरीत टाळावा, अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे.

राज्याची ठिबक सिंचन योजना

$
0
0
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यापुढे राज्यात शेतीसाठीच्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणेच राज्य सरकारची ठिबक सिंचन योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला.

घंटागाडी ठेक्यावरून मनसेत धुसफूस

$
0
0
गेल्या सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या घंटागाडीच्या प्रस्तावावरून मनसेत धुसफूस सुरू झाल्याच्या शक्यतेस बळकटी मिळाली आहे. स्थायी समितीच्या बैठकीपूर्वी मनसे गटनेत्याने काही नगरसेवकांच्यावतीने घंटागाडीच्या प्रस्तावास मंजुरी देऊ नये असे पत्र दिले होते.

उड्डाणपुलावर टू, थ्री व्हिलरला बंदी

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेवर उभारण्यात आलेल्या नाशिक शहरालगतच्या एकूण पाच उड्डाणपुलांवर दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना बंदी करण्यात आली आहे. तसेच, उड्डाणपूल आणि त्यालगतचा सर्व्हिसरोड हा नो पार्किंग झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. वाहतुकीचे हे नवे आदेश शुक्रवारपासून लागू होणार आहेत.

'रासबिहारी'च्या पालकांचा उद्रेक

$
0
0
शाळा सुरू होऊनही दाखले परत दिलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत परत न घेतल्याने रासबिहारी शाळेच्या संतप्त पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन यावर त्वरीत तोडगा काढण्याची मागणी केली.

वृत्तपत्र विक्रेत्यांना म्हाडाची घरे?

$
0
0
जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना म्हाडा गृहनिर्माण योजनेतून सदनीका मिळाव्यात, सरकारकडून पेन्शन योजना सुरु करण्यात यावी अशा प्रमुख मागण्यांसाठी नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेत्या सेवाभावी संस्थेच्या पदाधिका-यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली.

लैंगिक छळाप्रकरणी उपायुक्त निर्दोष

$
0
0
मानसिक आणि शारीरिक छळ करून महिला कर्मचा-याकडे शरीर सुखाची मागणी केली असा आरोप असलेले उपायुक्त दीपक कासार निर्दोष असल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.

शरद पवार उद्या नाशिक दौ-यावर

$
0
0
केद्रीय कृषीमंत्री शरद पवार शुक्रवारपासून नाशिक दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी नाशिकसह येवल्यातील विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. यात येवल्यातील नाट्यगृह, पैठणी क्लस्टरच्या इमारतीचे भूमिपूजन यासह नाशिकमधील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

ओवेसींचा मालेगाव दौरा रद्द?

$
0
0
वादग्रस्त भाषणाद्वारे जातीय तेढ निर्माण करणा-या खा. असदउद्दीन ओवेसी यांना नाशिक व धुळे जिल्ह्यांत येण्यास थेट गृहमंत्रालयानेच बंदी घातली आहे. त्यामुळे ओवेसींच्या शुक्रवारीपासूनच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता व्यक्त केली जात आहे.

सावदा येथे दंगल, कर्फ्यू लागू

$
0
0
सावदा येथे बुधवारी रात्री दोन गटात दंगल उसळून त्यात दगडफेक, वाहनांची जाळपोळ करण्यात आली. दंगलीत सहाजण जखमी झाले असून पोलिसांनी दंगलग्रस्त भागात २४ तासांसाठी संचारबंदी लागू केली. दंगल प्रकरणी २८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज, गुरुवारी सावदा गावाला छावणीचे स्वरूप आले असून येथील वातावरण तणावपूर्ण पण नियंत्रणाखाली आहे.

शहरातील फुलबाजार हटवणार

$
0
0
सराफ बाजारातील अतिक्रमण, फुलबाजार, मसालेवाल्यांची बसण्याची जागा तसेच कचऱ्याची समस्या इत्यादी प्रश्न मार्गी लावण्यासाठी याठिकाणी गुरूवारी सकाळी महापौर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

‘न्यू इरा’च्या उमा पार्वती यांना पुरस्कार

$
0
0
न्यू इरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका उमा पार्वती यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल दिल्लीस्थित सिल्व्हर फाउंडेशनच्या वतीने ‘एज्युकेशनिस्ट ऑफ द इअर’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

धन्वंतरी कॉलेजतर्फे इंटेरिअर डिझाइन सेमिनार

$
0
0
त्रिमुर्ती चौकातील धन्वंतरी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये इंटेरिअर डिझाइन या विषयाचा पदवी अभ्यासक्रम सुरू होत आहे. यानिमित्त रविवारी १६ जून रोजी करिअर इन इंटेरिअर डिझाइन या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

जळगावला आजपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा

$
0
0
जळगाव शहराला पाणी पुरवणा-या वाघूर धरणातील पाणीसाठा संपला असून काटकसरीचे धोरण म्हणून ऐन पावसाळ्यात शुक्रवारपासून शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे.

शिक्षिकेची आत्महत्या

$
0
0
शहरातील व्ही. पी. एन. विद्यालयातील उपशिक्षिका विजया यमाजी सोनवणे (वय ४६) यांनी गुरुवारी सकाळी राहत्या घरात पेटवून घेत आत्महत्या केली. त्या शहरातील नववसाहतीत वास्तव्याला होत्या.

भविष्यात कॉर्पोरेट आयटीआय!

$
0
0
कुशल मनुष्यबळाची गरज पाहता बड्या खासगी समुहांकडून स्वतःचे आयटीआय उभारले जातील असे सांगत भविष्यात राज्यात 'कॉर्पोरेट आयटीआय' येतील अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

स्वीट मार्टमध्ये बेकायदा उत्पादन

$
0
0
शहर परिसरात केवळ मिठाई विक्रीचा परवाना मिळालेल्या अनेकांनी बेकायदेशीररित्या मिठाई आणि इतर अन्न पदार्थांचे उत्पादन सुरु केले असल्याची माहिती पुढे आली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images