Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘हागणदारीमुक्त मालेगाव’ फसवे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महापालिका प्रशासनाच्या वतीने स्वच्छता व औषध फवारणी नियमित होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहर हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली गेली मात्र हा केवळ फार्स ठरला असल्याचा आरोप करीत मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ बुधवारी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ ‘आम्ही मालेगावकर’ विधायक संघर्ष समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

या उपोषणात समितीचे निखिल पवार, देवा पाटील, राहुल देवरे, रविराज सोनार, योगेश निकम, सतीश कलंत्री, दीपक भोसले, हाजी सलाम कुरेशी, शेखर पगार, कुंदन चव्हाण, दीपक पाटील, विवेक वारुळे, प्रदीप पहाडे, सुरेश पिंगळे, हरीश मारू, गणी शाह, दीपक महाजन, लोटन शेवाळे आदींसह कार्यकर्ते नागरिक सहभागी झाले होते. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे नायाब तहसीलदार सायनकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात शहरातील छोट्यामोठ्या गटारिंसह प्रमुख गटारीही तुडुंब भरल्या आहेत. मनपाच्या घंटागाड्या कचरा गोळा करण्यासाठी नियमित फिरत नाहीत. शहर स्वच्छतेसाठी वॉटरग्रेस कंपनी कुचकामी व अकार्यक्षम ठरली असून, कोणतीही कारवाई करायला प्रशासन धजावत नाही. तसेच कागदोपत्री करोडो रुपये खर्च करून घेतलेले औषध फवारणी यंत्रणा कुठे आहे? असा प्रश्न समितीने उपस्थित केला. आंदोलनस्थळी उपायुक्त राजू खैरनार यांनी भेट देऊन चर्चा केली. ४ जानेवारी रोजी येणाऱ्या सर्वेक्षण टीमला काळे झेंडे दाखविण्याचा ईशारा आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितिने दिला.

शौचालयांचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे

समितीच्या कार्यकर्त्यांनी शहर केवळ कागदोपत्री हागणदारीमुक्त झाल्याचा आरोप केला. शौचालयांच्या कमतरतेमुळे नागरिकांना सकाळी शौचासाठी ताटकळत उभे राहावे लागते. सार्वजनिक शौचालयांची बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असून अवघ्या काही महिन्यातच बांधकाम ढासळत चालले आहे. व्यक्तिगत शौचालय व सार्वजनिक शौचालयांची कमतरता व दुरवस्था हागणदारीमुक्त मालेगाव ही घोषणा केवळ कागदोपत्री ठरली असल्याचा आरोपही करण्यात आला.

पंतप्रधानांना पाठविणार निवेदन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना याबाबत निवेदन पाठवून हागणदारीमुक्त मालेगावचे पुन्हा सर्वेक्षण करावे, गुप्तवार्ता विभागातर्फे गोपनीय अहवाल घ्यावेत, शौचालय बांधकामाची सखोल चौकशी शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात यावी, मालेगाव शहरात स्वछता औषध फवारणी नियमित करण्याचे आदेश द्यावेत, हागणदारी मुक्त मालेगाव निर्माण करण्यासाठी शाश्वत उपाय योजना कराव्यात अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इगतपुरी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी खान

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी

इगतपुरी नगरपाल‌किेच्या उपनगराध्यक्षपदी नईम खान यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स्वीकृत नगरसेवकपदी माजी नगरसेवक योगेश चांडक व ज्येष्ठ शिवसैनिक विनोद कुलथे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगरपालिका निवडणुकीनंतर बुधवारी पहिली सर्वसाधारण सभा झाली. मुघ्याधिकारी डॉ. विजय कुमार मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.

उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नईम खान यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे उपनगराध्यक्षपदी नईम खान यांची बिनविरोध निवड केल्याची घोषणा नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी केली. तर स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी नगर परिषदेवर शिवसेनेचे स्पष्ठ बहुमत असल्यामुळे शिवसेनेकडून योगेश चांडक व विनोद कुलथे यांचे दोन अर्ज दाखल झाले. दोन्ही स्वीकृत पदाचा अधिकार शिवसेनेला असल्यामुळे त्यांचीही निवड बिनविरोध करण्याची घोषणा इंदुलकर यांनी केली.

नगरसेवक सुनील रोकडे, मीना खातळे, उमेश कस्तुरे, उज्वला जगदाळे, आशा सोनवणे, गजानन कदम, सिमा जाधव युवराज भोंडवे, किशोर बगाड, रोशनी परदेशी, आरती करपे, रंगनाथ चौधरी, भाजपचे नगरसेवक अपर्णा धात्रक, गीता मेंगाळ, साबेरा पवार, दिनेश कोळेकर, अपक्ष नगरसेवक संपत डावखर आदी उपस्थित होते. शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून या निवडीचे जंगी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी सोडविला पाण्याचा प्रश्न

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पाणीटंचाईग्रस्त चांदवड तालुक्यातील दरेगावात मनमाड महाविद्यालयाच्याराष्ट्रीय सेवा योजनेच्या शिब‌रिादरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अथक परिश्रमातून बंधारा बांधल्याने या गावात पाणी साठविण्यासाठी सोय झाली आहे. या उपक्रमाचे दरेगावच्या सरपंचांसह ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिब‌रि दरेगाव येथे पार पडले. या शिबिरात सेवा योजनेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रा. जे. के. देसले, प्रा. ज्योती बोडके व प्रा. पी. व्ही. आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात बंधारा बांधण्याचे ठरवले. या गावातील बंधारा पावसाळ्यात वाहून गेल्याने पाणीसमस्या तीव्र झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी श्रमदान करून बंधारा बांधायचे ठरवले. शिब‌रिात रोज सकाळी ८ ते १ या वेळेत श्रमदान करून बंधारा बांधला. सरपंच अनिल देवरे व इतर पदाधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे या कामामुळ कौतुक केले आहे. प्राचार्य डॉ. आर. पी. भामरे यांनी या राबणाऱ्या हातांचे व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या प्राध्यापकांचे कौतुक केले.

गुडमॉर्निंग पथकही बनविले

या शिबिरात मुलांनी पहाटे लवकर उठून दरेगाव येथे हागणदारीमुक्त गाव व्हावे म्हणून गुड मॉर्निंग पथकाचे देखील काम केले. प्लास्टिक टाळण्यासाठी ग्रामस्थांना प्रबोधन केले. स्वच्छतेचा मूलमंत्र गावातील लोकांच्या मनात पेरला. त्यामुळे हे शिब‌रि अधिक लोकाभिमुख ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुजच्या बलिदानाचा विद्यापीठाला विसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जगातील पहिल्या २० विद्यापीठांच्या यादीत येण्याचे नवे ध्येय बाळगणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ब्रिटनमध्ये पाच वर्षांपूर्वी हत्या झालेल्या दिवंगत विद्यार्थ्यांचा विसर पडला आहे. विद्यापीठाची परिसीमा इतकी की हल्लेखोराच्या हल्ल्यात बलिदान गेलेल्या अनुजच्या नावे दिली जाणारी मोठी स्कॉलरशीप पहिली दोन वर्षे दिली गेली. मात्र, त्यानंतर विद्यापीठाने माहितीच अपडेट न केल्याने या स्कॉलरशीपचा लाभ कुणीही विद्यार्थी घेऊ शकला नाही.

अनुज सुभाष बिडवे हा अवघा २३ वर्षांचा मूळ पुण्यातील निवासी विद्यार्थी युकेमध्ये लँकशायर विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेला होता. अनुजचे आजोळही नाशिक येथील होते. अनुज तेथे ‘मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स’ या विषयात ‘एम. एससी.’ अभ्यासक्रमात शिक्षण घेत होता. त्याच्यावर २६ डिसेंबर २०११ च्या रात्री एका माथेफिरू विद्यार्थ्याने गोळीबार केला. यात अनुजचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय युवकांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला होता.

या घटनेनंतर लँकशायर विद्यापीठाने अनुजच्या सद्गुणांची दखल घेत त्याच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठात अनुजच्या नावाची कोनशीला उभारण्यासह त्याच्या नावे एका स्कॉलरशीपचीही घोषणा केली. ‘अनुज बिडवे स्कॉलरशीप’ धारण करणाऱ्या विद्यार्थ्याला परदेशातील विद्यापीठात इंजीनिअरिंग विद्याशाखेतील उच्च शिक्षणासाठी या स्कॉलरशीप अंतर्गत २२ ते २५ लाख रुपयांची मदत देण्याचे नियोजन होते.

यानंतर पुढच्या वर्षी पुण्यातील ऋषीकेश देशपांडे या विद्यार्थ्याला स्कॉलरशीपचा लाभ झाल्याचा फोन अनुजच्या वडिलांना लँकशायर विद्यापीठातून आला. त्यांच्यानंतर आणखी एका विद्यार्थ्याला या स्कॉलरशीपचा लाभ मिळाल्याचे त्यांच्या ऐकिवात आहे. मात्र, याबाबतचा तपशील अनुजच्या कुटुंबीयांकडे नाही.

विशेष बाब म्हणजे २६ डिसेंबर रोजी अनुजचा सहावा स्मृतीदिन झाला. पण दरम्यानच्या काळात पुणे विद्यापीठाच्या वेबसाइटवर ‘अनुज बिडवे स्कॉलरशीप’बाबत माहिती अपडेट करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. याबाबत गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशीपची माहिती देण्याचीही तसदी घेतली गेली नाही. विद्यापीठाला अनुजच्या बलिदानाचा विसर पडल्याबद्दल हवाई दलातून निवृत्त झालेले अनुजचे वडील सुभाष आणि आई योगिनी बिडवे यांनी खंत व्यक्त केली आहे.

म्हणून पुणे विद्यापीठाकडून अपेक्षा
‘अनुज बिडवे मेमोरिअल स्कॉलरशीप’ ही लँकशायर विद्यापीठाकडून दिली जात असली तरीही ती केवळ पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाच दिली जाते. इतर कुठल्याही विद्यापीठातील विद्यार्थी यास पात्र ठरत नाही. पुणे विद्यापीठाच्या दिवंगत विद्यार्थ्याच्या नावे देण्यात येणाऱ्या एवढ्या मोठ्या स्कॉलरशीपची माहिती किमान वेबसाईटवर समाविष्ट आणि अद्यावत ठेवण्यात यावी, अशी अनुजच्या पालकांची अपेक्षा आहे. ते ही कार्य विद्यापीठाकडून होत नसल्याने विद्यापीठ अनुजचे बलिदान विसरल्याची भावना आहे.

आमच्यासाठी २०११ मध्ये झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र, अनुजच्या नावे देण्यात येणारी स्कॉलरशीप अत्यंत मोठी आणि गरजू विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देणारी आहे. ही स्कॉलरशीप विद्यापीठाच्या उदासिनतेमुळे लुप्त झाल्याचे चित्र आहे. ही स्कॉलरशीप पुनरुज्जीवीत व्हावी.
- सुभाष बिडवे, दिवंगत अनुजचे वडील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भर वस्तीत जेव्हा पेटतो वणवा...!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेळ भर दुपारची दोनच्या सुमाराची... थेट गंगापूर रोडवरून आकाशामध्ये धुराचे उंच लोट दिसत होते. जणू मोठी आग लागली असावी, असे भासते. धुराच्या दिशेने धाव घेतली असता येवलेकर मळ्याजवळील बाइज टाउन हायस्कूलच्या मागील बाजूस धुराचे लोट निघत असल्याचे दिसले.

कला महर्षी वा. गो. कुलकर्णी मार्गालगत भर नागरी वस्तीत मोकळ्या जागेत मोठा वणवा पेटलेला. परंतु, येथे हा वणवा पेटला कसा? हे अनुत्तरीतच राहते. अग्निशमन दलाची वाहनेही येथे नाहीत. आजूबाजूचे नागरिकही कुतूहलाने आगीकडे बघताना दिसतात. एका खासगी जागेत वीज वितरणच्या खांबावर शॉर्ट सर्किट झाले आणि गवताला आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. अग्निशमन दलाकडे या वणव्याबाबत चौकशी केली असता त्यांनी कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे, येथील सुरक्षारक्षकही निश्चिंत होते. अग्निशमनला पाचारण करण्याची गरज नाही. फक्त गवतच जळत आहे, असे सांगत त्यांना या घटनेबाबत गांभीर्य नसल्याचे दाखवून दिले. निष्काळजीपणामुळे झाडांचे नुकसान तर होतेच पण नागरी वस्ती असलेल्या भागात वायू प्रदूषणाचाही प्रश्न निर्माण होतो, याबाबत कोणीही विचार करतांना दिसून आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा-मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात; ७ ठार

$
0
0

सटाणा:
सटाणा- मालेगाव रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास अपे रिक्षाला ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षातील सात प्रवासी जागीच ठार झाले. हे सातही जण व्यावसायिक असल्याचे समजते. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

सटाणा-मालेगाव रस्त्यावर पहाटे हा अपघात झाला. शेमळीजवळ अपे रिक्षाला एका ट्रकने धडक दिली. यात रिक्षातील सात प्रवासी ठार झाले. हे सर्व प्रवासी व्यावसायिक असल्याचे समजते. ते रिक्षातून माल घेऊन जात होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अपघाताच्या ठिकाणी पोहोचले आहेत. अपघाताची नोंद करण्यात आली असून रिक्षाला धडकलेल्या ट्रकच्या चालकाचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये एकाच रात्री तीन जणांची हत्या

$
0
0

नाशिक :

नाशिक शहरात बुधवारी रात्री वेगवेगळ्या ठिकाणी तीन खून झाल्याने शहरात खळबळ माजली आहे. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अंबडमधील साहेबराव जाधव या रिक्षाचालकाचा खून झाला. त्या नंतर इंदिरानगरजवळील राजीवनगर झोपडपट्टीलगत जुन्या वादातून दोघांचा खून करण्यात आला.

इंदिरानगरजवळील राजीवनगर झोपडपट्टी परिसरात शंभरफुटी रस्त्यावर ही घटना झाली. मध्यरात्री सात ते आठ जणांच्या टोळक्याने जुनं भांडण उकरून काढत तलवार व कोयत्याने दोघांवर हल्ला केला. यात देविदास इगे व दिनेश नीलकंठ बिरासदर यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारानंतर इंदिरानगर पोलिसांनी राजीवनगर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. चार संशयितांना पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले. एकाच रात्री असे तीन-तीन खून झाल्याने नाशिकमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्रचिन्ह उभे राहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ कारखाना मालकावर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

हिरावाडी परिसरातील शिवकृपानगरमधील दोन मजली इमारतीच्या छतावर सुरू असलेल्या पाणीपुरी कारखाना सुरू होता. त्याला मंगळवारी (दि. २६) रोजी पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. तसेच येथील सिलिंडरचे स्फोट झाले. या प्रकरणी कारखान्याचा मालक अखिलेश केशव चौहान याच्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकवस्तीच्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे पाणीपुरी बनविण्याचा कारखाना सुरू होता. इमारतीच्या गच्चीवरच पाणीपुरी बनविण्याची भट्टी सुरू केली होती. त्याच ठिकाणी खाद्यतेल आणि गॅस सिलिंडरच्या टाक्या ठेवण्यात आलेल्या होत्या. या कारखान्यात सात कामगार काम करीत होते. त्यांनी सिलिंडरच्या नळीने पेट घेतलेला बघतात, गच्चीवरून खाली पळ काढला त्यामुळे जिवितहानी झाली नाही. मात्र, त्यानंतर सिलिंडरचे झालेल्या स्फोटामुळे हिरावाडी परिसर हादरून गेला. त्या इमारतीच्या भिंतीला तडे गेले. या आगीमुळे शेजारीच्या रहिवाशांनाही धोका निर्माण झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग त्वरित आटोक्यात आणली म्हणून पुढील धोका टळला.

पंचवटी पोलिसांनी कारखाना मालक चौहान यांच्याविरोधात इमारतीच्या छतावर पाणीपुरी बनविण्याचा कारखाना चालवित असताना सुरक्षितेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली नाही. निष्काळजीपणे तसेच असुरक्षितपणे ज्वलनशील गॅस सिलिंडरचा साठा केला होता. घरगुती गॅस सिलिंडर वापर कारखान्यासाठी केला जात होता. तेथे काम करणाऱ्या कामगारांच्या आणि शेजारी राहणाऱ्या रहिवाशांच्या जिवितास धोका निर्माण केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कसून चौकशी होणार
आग लागल्याची घटना घडल्यानंतर सुरक्षेसाठी आग विझविण्याची यंत्रणा उपलब्ध नसल्याचे तसेच अन्य कोणत्याही उपाययोजना करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कारखाना उभारणीसाठी महापालिकेची परवानगी, गॅस सिलिंडरबाबत पुरवठा अधिकाऱ्यांची परवानगी अशा विविध मुद्यांवर कारखाना मालकाची कसून चौकशी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयपीएस होण्यासाठी हातभार लागणार

$
0
0

विधानसभाध्यक्ष आमदार बागडेंचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्हा ग्रंथालय कार्यालय म्हणजे धुळ्यातून आयएएस व आयपीएस अधिकारी तयार होण्यासाठी मोठे योगदान ठरणार आहे. असे काम कर्तृत्ववान माणूसच करू शकतो, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी धुळ्यात केले. ते मंगळवारी सायंकाळी शहरातील पांझरा नदी किनारी स्व.उत्तमराव पाटील स्मारकाजवळ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

या वेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दादा भुसे, आमदार अनिल गोटे, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय म्हस्के आदी उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा ग्रंथालयाच्या नवीन इमारतीसाठी आमदार गोटे प्रयत्न करीत होते आणि अखेर ते आता पूर्णत्वास आले आहे, असेही विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे बोलतांना म्हणाले. या इमारतीला स्वर्गीय नानासाहेब उत्तमराव पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्तावदेखील मार्गी लागला आहे. या ग्रंथालयात ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करण्यात यावी, यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक

क्षमता वाढण्यास मदत होईल, असेही बागडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'लोकसंख्या नियंत्रण कायदा आणा'

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

आज भारताची लोकसंख्या १३५ कोटींच्या पुढे गेली आहे. हे असेच चालू राहिल्यास उद्या जगणे कठिणच होईल. खाण्यासाठी अन्न मिळणार नाही. या लोकसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधानांनी तत्काळ सर्वांसाठी समान स्तरावर लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू केला पाहिजे, अशी मागणी भाग्यनगर (हैदराबाद) येथील आमदार टी. राजासिंह यांनी केली. ते धुळे येथील हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते.

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने येथील गिंदोडिया कंपाउंडच्या मैदानामध्ये २५ डिसेंबर यादिवशी आयोजित केलेल्या धर्मसभेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या वेळी धर्मप्रेमी व हिंदुत्वनिष्ठांनी आदर्श ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेची प्रतिज्ञा केली. सभेत सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव, महाराष्ट्र संघटक सुनील घनवट आणि रणरागिणी शाखेच्या क्षिप्रा जुवेकर उपस्थित होते.

ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश राज्यात योगी सरकारने मदरशांवर नियंत्रण आणले आहे. तसे महाराष्ट्रातही नियंत्रण आणले पाहिजे, अशी मागणीही आमदार टी. राजासिंह यांनी केली. महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही मोठ्या प्रमाणावर गोहत्या केली जात आहे. नुकतेच सिल्लोडमध्ये २५० बैल पकडण्यात आले. उघडपणे त्यांची हत्या केली जात आहे. या संदर्भातही एक विशेष तपास पथक स्थापन करून कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. सभेत वारकरी संप्रदाय, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू एकता आंदोलन पक्ष, सनातन संस्था, शिवसेना, शिवसेना महिला आघाडी, भाजप, भाजयुमो आदी पक्ष-संघटना सहभागी झाल्या होत्या. पुढील धर्मकार्याची दिशा ठरवण्यासाठी अग्रवाल भवन, ऊस गल्ली, धुळे येथे आज (दि. २८) सायंकाळी ७ वा. आढावा बैठक ठेवण्यात आली आहे. तरी सर्व हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समितीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदुरबार जिल्ह्यात थंडीचे दोन बळी

$
0
0

धुळे ः खान्देशात गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचा चांगलाच तडाखा बसत आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यात दोन जणांचा थंडीने गारठून मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे. सध्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील तापमानाची ११ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे.

राजू दाजमल भिल (वय २७) आणि देवीसिंग वेडू ठाकरे (वय ७५) यांचा थंडीने गारठून मृत्यू झाला आहे. हे दोघेही उघड्यावर झोपलेले होते. त्यांच्या मृत्यूची नोंद नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तापमानात लक्षणीय घट झालेली आहे. त्यासोबतच सातपुड्याच्या दुर्गम भागात सपाटी भागापेक्षा थंडीचे प्रमाण अधिक जाणवत असल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उबदार कपडे आणि शकोटीचा आधार घेताना दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक दिवसाचा दारू परवाना विक्रेत्यांकडेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नववर्षाच्या स्वागतासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य बाळगण्यासाठी व प्राशन करण्यासाठी लागणारा परवाना देण्याची व्यवस्था थेट विक्रेत्यांकडे केली आहे. त्यामुळे नागरिकांना उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जाण्याची आवश्यक्त राहिलेली नाही.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ३१ डिसेंबर रोजी दारू पिण्यासाठी एक दिवसाचा परवाना घेणे आवश्यक आहे. परमीट रुम, बिअरबार, वाइन शॉप, देशी दारू दुकानचालक यांना त्याबद्दल सूचना देण्यात आल्या. परवाना नसलेल्या व्यक्तीला मद्यविक्री केल्यास दुकानदारावरही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या इशाऱ्यामुळे अनेक हॉटेलचालकांनी ग्राहकांसाठीचे परवाने स्वतःच घेऊन ठेवण्यास सुरुवात केली आहे.

फार्म हाउस किंवा शेतात होणाऱ्या पार्टीत मद्यप्राशनासाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. विनापरवाना खासगी पार्टीत मद्यप्राशन करणाऱ्यांसह आयोजकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. मद्य खरेदी करणाऱ्यांपैकी जवळपास ८० टक्के नागरिकांकडे कायदेशीर परवाना नसतो. मद्याचा परवाना काढणे म्हणजे समाजात वेगळीच प्रतिमा निर्माण होईल, या भीतीपोटी परवाना काढण्यासाठी कार्यालयात जाण्यास बहुतांश नागरिक संकोच करतात. मात्र, आता हा परवाना ऑनलाइन उपलब्ध झाला आहे. त्यामुळे अनेक जण हा पर्याय स्वीकारत आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सर्व ऑनलाइन सेवा www.exciseservicesmahaonline.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. त्यावर नाव, मोबाइल क्रमांक आदी तपशील देऊन नोंदणी (लॉग इन) केल्यास ऑनलाइन सेवेचा लाभ घेता येतो. ऑनलाइन सेवांमध्ये हव्या असणाऱ्या परवान्यावर क्लिक केल्यास अर्ज दिसतो. हा अर्ज भरण्यासाठी नाव, पत्ता आदी तपशिलांबरोबरच आधार क्रमांक आणि एका डिजिटल छायाचित्राची गरज असते.

असे आहेत परवान्यासाठी शुल्क
‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने विदेशी मद्य पिण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून ५ रुपये तर देशी मद्यासाठी २ रुपये परवाना शुल्क आकरण्यात येणार आहे. तसेच कायम परवान्यासाठी एक हजार रुपये, वर्षभराच्या परवान्यासाठी शंभर रुपये शुल्क आकारले जाते. हे शुल्क नेट बँकिंग किंवा डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे भरण्याचे पर्यायही उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता एअर अॅम्ब्युलन्सची नांदी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात विमानसेवा कार्यरत झाल्याची दखल विविध पातळ्यांवर घेतली जात आहे. मुंबईतील एका एअर अॅम्ब्युलन्स कंपनीने नाशिकला सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठीच इंडियन मेडिकल असोसिएशनशी (आयएमए) पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.

नाशिककरांना बहुप्रतिक्षा असलेली विमानसेवा रविवारपासून सुरू झाली आहे. एअर डेक्कन या कंपनीच्यावतीने उडान योजनेअंतर्गत मुंबई आणि पुणे या शहरांसाठी सेवा दिली जात आहे. आता दुसऱ्या टप्प्यात दिल्ली, बेंगळुरूसह अन्य शहरांसाठी सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील एका एअर अॅम्ब्युलन्स कंपनीने नाशिकला सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी कंपनीने आयएमएच्या नाशिक शाखेशी पत्रव्यवहार केला आहे. कंपनीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सुविधा, त्यांचे दर आणि अन्य बाबींची माहिती ‘आयएमए’ला दिली आहे. सहा आसनी सी - ९० आणि ७ आसनी बी - २०० ही दोन विमाने कंपनीकडे उपलब्ध आहेत. मुंबई, चेन्नई, बंगळुरूसह अन्य शहरांमध्ये ही सेवा दिली जाईल, असे कंपनीने सांगितले आहे. कंपनीकडे अद्ययावत विमान असून संपर्क करताच सेवा देण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे.

सेवेचे दर महाग
कंपनीने नाशिकला सेवा देण्याचे जाहीर केले असले तरी त्यासाठीचे भाडे मात्र काहीसे महाग आहेत. सहा आसनी एअर अॅम्ब्युलन्ससाठी प्रती तास ७० हजार तर सात आसनी एअर अॅम्ब्युलन्ससाठी प्रती तास एक लाख १० हजार रुपये असे दर आकारले जाणार आहेत. हे दर महाग वाटत असले तरी मागणी वाढल्यास ते कमी होऊ शकतात. तसेच, एअर अॅम्ब्युलन्सच्या अन्य कंपन्याही नाशिकला येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास किफायतशीरदरात सेवा मिळू शकते, असे वैद्यकीय क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले आहे.

प्रत्यारोपणाला फायदा
नाशिकमधून पुणे आणि मुंबई येथे यापूर्वी रस्तेमार्गे ग्रीन कॉरिडॉर करून यकृत, किडनी आणि हृदय प्रत्यारोपणासाठी पाठविण्यात आले आहे. एअर अॅम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध झाल्यास अवयवांची वाहतूक करण्यासाठी ही बाब महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे नाशिकला अन्य शहरातील हॉस्पिटल्सची सेवा जोडली जाईल. तसेच, विविध अवयवांचे प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेलाही चालना मिळेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

नाशिकमध्ये एअर अॅन्ब्युलन्सची सेवा मिळणे अतिशय सकारात्मक आहे. येथील आरोग्य क्षेत्राच्या विकासाला ती बाब चालना देणार आहे. काही महिन्यांपासून वैद्यकीय पर्यटन वाढले आहे. त्यावरही परिणाम होईल.
- मंगेश थेटे, अध्यक्ष, आयएमए, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिटकोच्या डॉक्टरांवर गुन्हा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील अर्भक मृत्यू आणि महिलेची हेळसांड झाल्याची घटना ताजी असताना आता बिटको हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर चुकीचे उपचार केल्याचा आरोप मृत महिलेच्या पतीने केला आहे. नोव्हेंबरमधील ही घटना असून यासंदर्भात उपनगर पोलिस ठाण्यात संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

बिटको आणि आडगाव येथील डॉ. वसंत पवार मेडिकल हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी संबंधित महिलेच्या पतीने महापालिका आयुक्त आणि सिव्हिल सर्जन यांच्याकडे केली आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, संबंधित महिलेवर मृत्यू चुकीच्या उपचाराने नव्हे तर किडनी निकामी झाल्याने ओढावल्याचा खुलासा वैद्यकीय विभागाने केला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील स्वाती प्रल्हाद होळकर या महिलेला प्रसूतीसाठी १४ नोव्हेंबर रोजी बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीवेळी कोणताही त्रास नसतांना डॉक्टरांनी स्वाती यांचे सिझर करत, संतती नियमनाची शस्रक्रियाही केली. प्रसूती व संतती नियमनाच्या शस्रक्रियेनंतर स्वाती यांना त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी महिलेला ‘आयसीयू’मध्ये दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती खालावल्याने तिला डॉ. वंसतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. बिटको आणि पवार मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तसेच चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेचे पति प्रल्हाद होळकर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी उपनगर पोलिसात दोन्ही हॉस्पिटलच्या डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा आणि सिव्हिल सर्जन यांच्याकडे तक्रार केली आहे.

महापालिकेच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये अर्भक मृत्यूची घटना ताजी असतानाच बुधवारी पुन्हा एका महिलेच्या प्रसूतीदरम्यान डॉक्टर व परिचारकांनी हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे. उपचार करण्यावरून दोन डॉक्टरांमध्येच जुगलबंदी रंगल्याचा आरोप संबंधितांनी वैद्यकीय अधीक्षकांकडे केला होता. त्यामुळे वैद्यकीय विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असताना गुरूवारी बिटको हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर थेट चुकीच्या उपचारप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

किडनीच्या त्रासाने मृत्यू
प्रसूतीदरम्यान महिलेच्या मृत्यूसंदर्भात महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी संबंधित महिलेच्या मृत्यूची आधीच चौकशी झाल्याचा दावा केला आहे. माता मृत्यू प्रकरणात संबंधित महिलेच्या मृत्यूची चौकशी केल्यानंतर संबंधित महीलेला किडनीचा त्रास होता. त्यामुळे डायलिसिससाठी ‌तिला डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. किडनी निकामी झाल्यानेच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणा व चुकीचा उपचाराचा आरोप चुकीचा असून पोलिसांना त्यांसदर्भातील कागदपत्र सादर केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. तसेच गरज पडल्यास अधिक चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांकडून ‘गोल्फ’ची पाहणी

$
0
0

महाराष्ट्र टाइम्सने गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅकच्या दुरवस्थेबाबत वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत आमदार देवयानी फरांदे यांनी गुरुवारी सकाळी ट्रॅकची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी जॉगर्सशी संवाद साधला. तेथील अडी-अडचणी जाणून घेत जॉगर्सच्या सूचनाही ऐकून घेतल्या. आमदार निधीतून या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शस्त्र तस्करांना आठवडाभराची कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शस्त्र लूट आणि तस्करीच्या गुन्ह्यात नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या बद्रीनुजमान अकबर बादशाह उर्फ सुमीत उर्फ सुका पाचासह इतर संशयितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई झाली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या पाचही संशयितांची पोलिस कोठडी गुरुवारी संपली. विशेष न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना आठवडाभराची म्हणजेच ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबईत गँग सुरू करून त्याद्वारे दहशत निर्माण करण्याचा उद्देश असलेल्या बादशहाने आपल्या साथिदारासह १३ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील शस्त्रांची विक्री करणाऱ्या दुकानावर दरोडा घातला होता. या टोळीने रिवॉल्व्हर आणि वेगवेगळ्या रायफल्स मिळून ४१ शस्त्रे आणि जवळपास तीन हजारच्या वर जिवंत काडतुसे चोरी केली होती. एवढा मोठा शस्त्रसाठा घेऊन संशयित आरोपी मुंबईच्या दिशेने प्रवास करीत असताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्यांना चांदवड टोलनाक्याजवळ अटक केली. बादशहा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात मुंबईत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या शस्त्रांच्या मदतीने तो मुंबईत सराईत गुन्हेगारांना एकत्र करून नवीन टोळी तयार करण्याच्या प्रयत्नात होता. दुसरीकडे, मुंबईत तो घातपात करण्याचीही शक्यता होती. पोलिसांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणातील तथ्य बाहेर पडू नयेत, म्हणून खबरदारी घेतली. पोलिसांनी १४ डिसेंबर रोजी बादशहासह नागेश राजेंद्र बनसोडे (२३) आणि सलमान अमानुल्ला खान (१९, रा. शिवडी मुंबई) यांना अटक केली होती. पोलिसांनी तपास करून याच गुन्ह्यात मुंबईसह अन्य एका ठिकाणाहून दोघांना जेरबंद केले. एकीकडे नाशिक पोलिस तपास करीत असताना दुसरीकडे मुंबईतही पोलिसांनी तपास करून दोघांना जेरबंद केले. आतापर्यंत सात संशयित आरोपी जेरबंद झाले असून, नाशिक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या पाच संशयितांना ४ जानेवारीपर्यंत कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विद्यापीठासाठी ४९ टक्के मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध प्राधिकरणांसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे राबविण्यात आलेल्या निवडणूक प्र्रक्रियेत गुरूवारी मतदान झाले. राज्यातील ३२ मतदान केंद्रांवर या मतदानाची आकडेवारी ४९.३३ इतकी नोंदविली गेली तर नाशिकमध्ये ५३.४३ टक्के मतदान नोंदविण्यात आले. या निवडणुकीसाठी विद्यापीठाच्या दिंडोरी रोड येथील मुख्यालयात शनिवारी (दि. ३०) मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

निवडणूक प्रक्रिया राज्यात शांततेत पार पडली. विविध प्राधिकरणांमध्ये सिनेट, अभ्यास मंडळ व प्राध्यापक वगळता शिक्षक गटातील मतदान मतपेटीत बंद झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कालिदास चव्हाण यांनी दिली. राज्यात सर्वाधिक म्हणजे ७६.२७ टक्के मतदान गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय केंद्रावर झाले. तर सर्वात कमी मतदानाची नोंद जळगाव येथील चामुंडा माता होमिओपॅथिक कॉलेज केंद्रावर झाले. तेथे अवघे २५ टक्के मतदान नोंदविण्यात आले.


केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी

क्र. .......मेडिकल कॉलेज ...................................मतदान (टक्क्यांमध्ये)

१.... ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई ..........................२७.४२
२.... सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज, मुंबई ..............४१.४७
३.... टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज, मुंबई........३५.३०
४.... पोतदार आयुर्वेद कॉलेज, वरळी.....................३५.७१
५.... लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज, सायन.......३५.१२
६.... योगिता डेंटल कॉलेज, खेड, जि. रत्नागिरी.......४६.१३
७.... येरला आयुर्वेदिक कॉलेज, खारघर..........४७.८८
८.... आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे.................३०
९.... बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे...........................४७.००
१०.... टिळक आयुर्वेद कॉलेज, पुणे ..................६७.६२
११.... पी. डी. ई. एस. कॉलेज, आकुर्डी, पुणे ...................५३.२७
१२.... शासकीय मेडिकल कॉलेज, मिरज, सांगली...............७१.६२
१३.... मुथा आर्यांग्ल आयुर्वेद कॉलेज, सातारा....५३
१४.... राजर्षी शाहू महाराज मेडिकल कॉलेज, कोल्हापूर.....६४.६०
१५.... डॉ. वैशंपायन मेडिकल कॉलेज , सोलापूर............५५.२३
१६.... आयुर्वेद सेवा संघ आयुर्वेद कॉलेज, नाशिक....५३.४३
१७.... भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज, धुळे...................३५.६३
१८.... चामुंडामाता होमिओपॅथीक कॉलेज, जळगाव..........२५.००
१९.... गंगाधर शास्त्री गुणे कॉलेज, नगर...........................५६.२६
२०.... श्रीमती थोरात डेंटल कॉलेज, संगमनेर..............४३.३८
२१.... शासकीय वैद्यकीय कॉलेज, औरंगाबाद............४८.३५
२२...शासकीय वैद्यकीय कॉलेज, नांदेड .................४१.४४
२३....शासकीय वैद्यकीय कॉलेज, लातूर ..................६२.३४
२४....स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज, आंबेजोगाई....६२.६६
२५....महात्मा गांधी मेडिकल कॉलेज, सेवाग्राम, वर्धा ....५६.९८
२६....शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर..........५३.१५
२७....इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज, नागपूर ..........४६.८०
२८....एन.के.पी. साळवे मेडिकल कॉलेज, नागपूर........५२.६१
२९....विदर्भ आयुर्वेद कॉलेज, अमरावती........५६
३०....वसंतराव नाईक मेडिकल कॉलेज , यवतमाळ.....५७.१४
३१....शासकीय वैद्यकीय कॉलेज, अकोला........४०
३२....शासकीय वैद्यकीय कॉलेज, गोंदिया.......७६.२७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्त संवादाने तणावावर करा मात

$
0
0

मटा डिबेट


--


मना सज्जना


--


मुक्त संवादाने तणावावर करा मात


अलीकडे जीवनमान दिवसेंदिवस धावपळीचे बनत आहे. शैक्षणिक करिअर अन् दैनंदिन जीवनातदेखील स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांत ताण-तणाव निर्माण होताना दिसतात. परंतु, सकारात्मक विचार, छंद जोपासणे, यश मिळविण्यासाठी प्रामाणिकपणे केलेली मेहनत व प्रत्येक गोष्टीचे नियोजन, आपल्या आवडत्या गोष्टींना प्राधान्य देणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिक्षक, पालकांशी मुक्त संवाद साधणे या गोष्टी केल्यास नक्कीच ताण-तणाव दूर सारून आयुष्यात यशस्वी होता येते, असा आशावाद मेंटल वेलनेस संकल्पनेंतर्गत आयोजित ‘मटा डिबेट’मध्ये व्यक्त झाला. क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेत पार पडलेल्या या उपक्रमास तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

--

(संकलन ः अक्षय शिनकर, अक्षय सराफ कॉलेज क्लब रिपोर्टर)

--

तज्ज्ञांकडून मोलाचा सल्ला...

‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे मेंटल वेलनेस या संकल्पनेनुसार ‘मना सज्जना’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात वृत्तमालिकेच्या माध्यमातून विषयाची मांडणी झाल्यानंतर आता ‘मटा डिबेट’च्या माध्यमातून थेट तरुणांशी संवाद साधला जात आहे. नाईक शिक्षण संस्थेत झालेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी परीक्षा, करिअरमधील अपयश, कौटुंबिक व वैयक्तिक समस्या, प्रेमभंग, साध्या-साध्या गोष्टी व प्रसंगांमधून येणारे अपयश या विषयांवर मनमोकळेपणाने मते व्यक्त केली. ‘युवकांच्या मनावर येणारा ताणतणाव व कारणे’ या विषयावर चर्चासत्र झाले. त्यात कॉलेजमधील मानसशास्त्र विभागप्रमुख जयश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे एकूण घेत या विषयावर मार्गदर्शन केले. आज विद्यार्थी व पालकांचा संवाद हरवत चालला आहे. विद्यार्थी एकलकोंडे बनत चालले आहेत. काही ठिकाणी विद्यार्थी पालकांना प्रतिसाद देत नाहीत, तर काही ठिकाणी पालकांना आपल्या मुलांसाठी वेळच नाही, असे प्रकर्षाने जाणवते. आजची तरुणाई व विद्यार्थी हे मोबाइल फोन, सोशल मीडिया यातच व्यस्त दिसतात. आपल्या मनातील प्रश्न व समस्या शेअर न केल्याने त्यांच्यात तणाव वाढत असून, ते नैराश्याच्या गर्तेत सापडताना दिसतात, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. यावर उपाय म्हणजे विद्यार्थ्यांचा पालक व शिक्षकांशी मुक्त संवाद वाढणे, चांगले मित्र-मैत्रिणी निवडणे, अपयशातून यशाकडे यशस्वी वाटचाल केलेल्या व्यक्तींचा आदर्श ठेवणे गरजेचे आहे, असा सल्लाही पाटील यांनी दिली.

--

कारणांएेवजी शोधावेत यशाचे मार्ग

यश-अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात सुरूच असते. परंतु, विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता आपले ध्येय समोर ठेवून यशाकडे वाटचाल करणे गरजेचे आहे. अपयशाची करणे शोधण्याएवजी यशाचे मार्ग शोधावेत, असे मार्गदर्शन उपप्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांनी केले. १५ ते २० या वयोगटातील तरुण नैराश्याला जास्त बळी पडल्याचे दिसून येते, याचे कारण म्हणजे व्यसनाधीनता व नातेसंबंध असल्याचे दिसून येते. ज्या वयात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रांत स्वतःला झोकून देऊन करिअर घडविणे गरजेचे आहे त्या वयात तरुण व्यसनाधीनता व नातेसंबंध या गोष्टींकडे वळत आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर टीव्ही, चित्रपटांतील नकारात्मक प्रसंगांचा प्रभाव पडत असल्याचे दिसून येते. मोबाइल, सोशल मीडिया या गोष्टींचा सदुपयोग करण्याएेवजी दुरुपयोगच जास्त होत असल्याचे दिसून येते अादी मुद्देही यावेळी पुढे आले.

---

विद्यार्थी म्हणतात...

--

करिअर निवडीचे हवे स्वातंत्र्य

बऱ्याचदा विद्यार्थ्याला आवडीच्या क्षेत्रात करिअर करायचे असते. मात्र, पालक दबाव टाकून त्याला भलत्याच क्षेत्रात करिअर करायला लावतात. परंतु, त्यात जर अपयश येत आहे असे दिसले, तर संबंधित विद्यार्थी तणावग्रस्त होताना दिसतात. त्यामुळे पालकांनी हे टाळायला हवे.

-किशोर नागरे

--

प्रत्येकाने करावे व्यवस्थापन

माझ्यावर शैक्षणिक परीक्षेच्या अभ्यासाचा ताण बऱ्याचदा येतो. इतरांशी याबाबत चर्चा करून मी आता अभ्यासात सातत्य ठेवून माझा अभ्यासवरील ताण दूर केला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना आपापल्या परीने तणावाचे असे व्यवस्थापन करण्याची आवश्याकत आहे.

-आदित्य देव

--

मोबाइल नियंत्रित जीवनशैली

सोशल मीडियामुळे अनेक तरुण रात्री लवकर झोपत नाहीत, परिणामी सकाळी लवकर उठतही नाहीत. त्यांचे सर्व जीवन हे जणू मोबाइलवर चालताना दिसते. आपल्या पालकांशीदेखील ते संवाद साधत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात ताणतणावाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

-अमित खराटे

--

योग्य नियोजनाची निकड

अनेक विद्यार्थी वर्षभर अभ्यास न करता ऐनवेळी पेपरच्या महिनाभर अगोदर जास्त वेळ अभ्यास करून किंवा रात्रभर जागे राहून अभ्यास करताना आढळतात. त्यामुळे ते निष्कारण ताणतणाव ओढावून घेताना दिसतात. हे टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे.

-उमेश शेलार

--

वाईट संगत टाळावी

बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा वाईट संगतीमुळे अनेकदा लहान वयातच विद्यार्थी व्यसनांच्या अाहारी जाताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यातील एकलकोंडेपणा वाढताना दिसतो. त्यांच्या व्यसनाची बाब पालकांना कळल्यावर ताण-तणाव वाढतो. त्यासाठी व्यसने टाळावीत.

-समित सातवी

--

अवास्तव अपेक्षा लादू नयेत

बरेच पालक आपले स्वप्न पूर्ण करता न आल्यामुळे आपल्या पाल्याने आपले स्वप्न पूर्ण करावे, अशी अपेक्षा बाळगताना दिसतात. मात्र, पाल्यांचा कल वेगळ्याच क्षेत्रात असल्यास अशा विद्यार्थ्यांमध्ये निराशा निर्माण होऊन ताण-तणाव वाढण्याची शक्यता वाढते. हे टाळायला हवे.

-शंकर ईस्ते

--

वास्तवाचे राखावे भान

अलीकडच्या काळात मित्र-मैत्रीण करणे, फिरणे, मजा करणे अशीच काहीशी प्रेमाची व्याख्या तरुणाईने बनविली आहे. परंतु, यामध्ये ज्यावेळी अडचणी येतात, त्यावेळी अशा विद्यार्थ्यांत ताण-तणाव वाढून दुर्दैवी घटना घडताना दिसतात. त्यासाठी वास्तवाचे भान राखणे गरजेचे आहे.

-गणेश भावळे

--

खेळ, योगाला द्यावे प्राधान्य

अनेक विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांच्या कालावधीत किंवा इतर प्रसंगांमध्ये मानसिक तणाव येताना दिसतो. त्यामुळे अशा तणावावर मत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी निकटच्या व्यक्तींशी संवाद साधण्यासह मैदानी खेळ खेळावेत, योगा करावा, ज्यामुळे मन शांत होण्यास निश्चितच मदत होऊ शकेल.

-कावेरी आहेर

--

आप्तांशी सुसंवाद गरजेचा

अनेकदा मित्रांच्या छोट्याशा वादाचे रुपांतर भांडणात होताना दिसते. अशावेळी संवादाअभावी पालक अन् समाजही त्याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांत ताण-तणाव निर्माण होतो. हे टाळण्यासाठी निकटच्या व्यक्तींशी सुसंवाद ठेवणे उपयक्त ठरू शकेल.

-दीक्षा राहंगडाळे

--

प्राधान्यक्रम ठरवू द्या!

बऱ्याचदा विद्यार्थ्यांना नाटकात, खेळामध्ये, संगीतामध्ये सहभागी व्हायचे असते. परंतु, त्यांच्या पालकांकडून त्यांना अशा गोष्टींसाठी पाठिंबा नाही मिळत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नको असलेल्या विषयांनाच प्राधान्यक्रम द्यावा लागतो. परिणामी त्यांच्यात तणाव वाढतो. अशी बाब टाळावी.

-मयूर वाघ

--

ध्येयासक्तीने लाभ शक्य

जर सर्वच विद्यार्थी नियोजनबद्धतेने आणि सातत्य ठेवून अभ्यास करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत असतील, तर मला नाही वाटत की अशा विद्यार्थ्यांत ताणतणाव निर्माण होईल. त्यामुळे ध्येयाप्रति पुरेशी आसक्ती ठेवून नियोजन केल्यास नक्कीच लाभदायक ठरू शकेल.

-मयूर चव्हाण

--

पालकांनी द्यावे पुरेसे स्वातंत्र्य

पालकांनी विद्यार्थ्यांना समाजात वावरण्याचे, राहण्याचे स्वातंत्र्य द्यावे. बऱ्याचदा अनेक विद्यार्थी स्वातंत्र्य न मिळाल्यामुळे आईवडिलांशी पुरेसा संवादाच साधत नाहीत. प्रसंगी त्यांच्या मनाविरुद्ध कृती करतानाही दिसतात. त्यामुळे कुटुंबामध्ये तणाव निर्माण होतो.

-अदिती मोढे

---

गुरुजन म्हणतात...

--

पालकांना दोष देणे टाळावे

विद्यार्थ्यांनी पालकांच्या प्रेमाचा कधीही गैरफायदा घेऊ नये. पालकांना दोषी ठरवून अपयशाची करणे शोधू नयेत, तर यशाची कारणे शोधावीत. सकारात्मक बनावे, जेणेकरून सर्व ताणतणाव दूर होईल.

-प्रा. शरद काकड

--

वेळच्या वेळी करावा अभ्यास

बऱ्याचदा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या कळताच तणाव जास्त प्रमाणात जाणवताना दिसतो. विद्यार्थ्यांनी दररोज कॉलेज, लेक्चर अॅटेंड करून वेळच्या वेळी अभ्यास केल्यास नक्कीच तणाव दूर होईल.

-डॉ. वसंत वाघ, माजी प्राचार्य

--

चर्चेतील सकारात्मक मुद्दे...

--

-कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगू नये.

-पालक, नातेवाईक, मित्र यांच्याशी मुक्तपणे साधावा संवाद.

-पालकांनी मुलांना आपले क्षेत्र निवडण्याची मुभा द्यावी.

-आपल्या अपेक्षांचे ओझे पालकांनी मुलांवर लादू नये.

-वेगवेगळे छंद जोपासावेत, मोबाइलऐवजी मैदानी खेळांकडे वळावे.

-प्राणायाम व योगा या गोष्टींमुळेदेखील तणाव कमी होतो.

-मोबाइल व सोशल मीडियाचा मर्यादित व सदुपयोग करावा.

-प्रारंभापासूनच मानसशास्त्र विषयाची अभ्यासक्रमात गरज.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेची कामे दाखविण्याचा 'स्मार्ट'पणा

$
0
0

सीएसआरची कामे दाखवली योजनेत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत नाशिकचा समावेश होऊन सव्वा वर्षांचा कालावधी लोटला तरी अजूनही कंपनीला स्मार्ट कामगिरीसाठी मनसेच्याच प्रकल्पांचा आधार घ्यावा लागत आहे. गुरुवारी (दि. २८) नाशिक म्युनिसिपल स्पेशल पर्पज व्हे‌ईकल कंपनीच्या संचालक मंडळाच्या वार्षिक सभेत पुन्हा मनसेच्या कार्यकाळात सीएसआर फंडातून पूर्ण झालेल्या प्रकल्पांना मंजुरी देऊन 'स्मार्ट' कामगिरी केल्याचा भास निर्माण करण्यात आला.

विशेष म्हणजे पुरातत्त्व विभागाकडून करण्यात येणाऱ्या सरकार वाड्याच्या पुनर्विकास प्रकल्पावरही डल्ला मारण्यात येऊन ही कामे स्मार्ट सिटीतून मंजूर करून घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, कंपनी कायद्यात तशी तरतूद असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नाशिक म्युनिसिपल स्पेशल पर्पज व्हे‌ईकल कंपनीच्या संचालक मंडळाची वार्षिक सभा गुरुवारी, स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. स्मार्ट सिटी एसपीव्ही कंपनीची नोंदणी कंपनी कायद्याप्रमाणे असल्याने कंपनीच्या संचालक मंडळाला वार्षिक सभा घेऊन संचालकांना कामकाजाचा आढावा देणे बंधनकारक असल्याने ही सभा घेण्यात आली. त्यात नवीन संचालकांची नियुक्ती आणि वर्षभरात झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या नव्या प्रकल्पांसह मनसेच्या पंचवार्षिक काळात सीएसआरमधून झालेल्या कामांचे सादरीकरण करून त्याला मंजुरीही घेण्यात आली.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या प्रकल्पांना मंजुरी या बैठकीत देण्यात आल्याने या कंपनीने 'स्मार्ट' सफाई केल्याचे समोर आले आहे. गेले सव्वा वर्ष चमकदार कामगिरी करता न आल्याने कंपनीने थेट मनसेच्या काळात पूर्ण झालेल्या प्रकल्पावरच आपली वर्षपूर्ती साजरी केली आहे. त्यांच्या खर्चासकट मंजुरी देण्याचा पुन्हा प्रताप केला आहे. यात होळकर पुलावरील फाऊंटन, स्व. बाळासाहेब ठाकरे इतिहास वस्तुसंग्रहालय, ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क, उड्डाणपुलाखालील सुशोभीकरण आणि नेहरू वनोद्यानातील वनौषधी उद्यान, कालिदास नाट्यगृह नूतनीकरण, सरकारवाडा नूतनीकरण, घनकचरा व्यवस्थापन या प्रकल्पांना पुन्हा मंजुरी देवून ती कामे पूर्ण केल्याचा दावा करण्यात आला आहे.

स्वत:ची पाठ थोपटण्याचा प्रयत्न

यामधील होळकर पुलावरील फाऊंटन हा शिर्के उद्योग समुहाने, इतिहास वस्तुसंग्रहालय जीव्हीके कंपनी, उड्डाणपुलाखालील सुशोभीकरण एल अ‍ॅण्ड टी, ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क नाशिक फर्स्ट तर वनौषधी उद्यान हे टाटा ट्रस्टने आपल्या सीएसआर उपक्रमांतून विकसित केलेले आहेत. सरकारवाडा नूतनीकरणाचे काम पुरातत्त्व खात्यामार्फत सुरू आहे. त्यासाठी केंद्राकडून खात्याला स्वतंत्र निधी आलेला आहे. या कामांचा स्मार्ट सिटीशी कोणताही संबंध नसतांना ती कामे स्मार्ट सिटीत समावेश करून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न कंपनीने केला आहे.

वार्षिक सभेत मंजूर प्रकल्प.........अंदाजित रक्कम (रुपयांमध्ये)

..........................

होळकर पुलावरील फाऊंटन.........९५ लाख

स्व. बाळासाहेब ठाकरे इतिहास वस्तुसंग्रहालय.........२ कोटी

चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क.........४ कोटी

उड्डाणपुल सुशोभीकरण.........१.५ कोटी

नेहरू वनोद्यानातील वनौषधी उद्यान.........१२ कोटी

सरकारवाडा नूतनीकरण टप्पा १.........८.५ कोटी

घनकचरा व्यवस्थापन.........१.२५ कोटी

कालिदास नूतनीकरण.........९ कोटी ५१ लाख

............................

या प्रकल्पांना दिली मंजुरी

स्मार्ट रोड.........१६ कोटी

सोलर पॅनल.........४ कोटी ५० लाख

प्रोजेक्ट गोदा टप्पा एक.........२३० कोटी

स्किल डेव्हलपमेंट सेंटर.........१६ कोटी

पब्लिक बायसिकल शेअरिंग

पंडित पलुस्कर नाट्यगृह पुनर्विकास

सार्वजनिक शौचालय

सीसीटीव्ही प्रकल्प

स्मार्ट पार्किंग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पटेल फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे सहाव्यांदा यश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिरपूर येथील शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचालित एच. आर. पटेल औषधनिर्माणशास्त्र कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सलग सहाव्यांदा आविष्कार संशोधन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या यशामुळे आज (दि. २९) सुरू होणाऱ्या विद्यापीठस्तरीय आविष्कार-२०१७ स्पर्धेसाठी कॉलेजमधील एकूण सहा संशोधन प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे.

शिरपूर येथील एस. पी. डी. एम. कॉलेजमध्ये जिल्हास्तरीय आविष्कार-२०१७ संशोधन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत एकूण ६४ विद्यार्थी व शिक्षकांनी, पदवी, पदव्युत्तर व शिक्षक गटातून औषधनिर्माण व वैद्यकशास्त्र, सामाजिकशास्त्र, शेती व पशुपालन अशा वेगवेगळ्या विषयांत ३६ शोधनिबंध सादर केले. त्यापैकी प्रा. राकेश मुथा, प्रा. पायल पाटील व ग्रंथपाल विनोद पटेल यांची निवड पुढील फेरीसाठी करण्यात आली. तर विद्यार्थी गटातून कुणाल बारी व गोपाल साळुंखे, नूतन निकम, श्वेता पाटील, दर्शन महाले व भूषण मराठे यांच्या प्रकल्पांची निवड करण्यात आली. यापूर्वी विद्यार्थ्यांनी जिल्हा, विद्यापीठ व राज्य स्तर अशा विविध पातळीवर आविष्कार संशोधन स्पर्धेत यश मिळविले आहे.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिश पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भूपेश पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, नगरसेवक तपन पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, संचालक डॉ. के. बी. पाटील, प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांनी कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images