Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

लोकशाही दिन रद्द

$
0
0

नाशिक : जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीची आाचारसंहिता लागू झाली आहे. ३१ मेपर्यंत ही आचारसंहिता लागू राहणार असल्याने ७ मे २०१८ रोजीचा लोकशाही दिन होणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बालनाट्य शिबिर

$
0
0

नाशिक : अक्षरमानव आणि रचना विद्यालयातर्फे उन्हाळी सुटीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी ५ ते २० मेदरम्यान शरणपूर रोडवर बालनाट्य शिबिर होणार आहे. शिबिरात अभिनव विकास, संवादकौशल्य, वेशभूषा, व्यक्तिमत्त्व विकास यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी अंधशाळेची प्रवेशप्रक्रिया सुरू

$
0
0

नाशिक : शासकीय अंधशाळेच्या २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता अंध विद्यार्थ्यांच्या दहा रिक्त जागांसाठी प्रवेशप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. प्रवेशासाठी नाशिक-पुणे रोडवरील नासर्डी पुलाजवळील शासकीय अंध शाळेच्या अधीक्षक कार्यालयाशी सुटीचा दिवस वगळून सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करवून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय सहा ते चौदा वर्षे वयोगटातील असावे, विद्यार्थ्यांचा जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालयाकडील कमीत कमी ४० टक्के अंधत्वाचा वैद्यकीय दाखला असावा. विद्यार्थ्यांना अंधत्वाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचे अपंगत्व नसावे. विद्यार्थ्यास संसर्गजन्य गंभीर आजार नसावा. जास्त अर्ज आल्यास बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य व अटीवर प्रवेश देण्यात येईल. सरकारमार्फत निवास, भोजन, शैक्षणिक व वैद्यकीय सोयी-सुविधा मोफत पुरविल्या जातील, असे अधीक्षकांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संसरी नाक्यावर वाहतूक कोंडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

आपापसात दोन रिक्षाचालकांच्या भांडणामुळे सोमवारी सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा दरम्यान संसरी नाका येथून चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कॅन्टोन्मेंट प्रशासनासह पोलिसांची तारांबळ उडाली.

देवळालीत सहसा वाहनांची कोंडी होत नाही; मात्र लामरोडवर सोमवारी दोन रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. तब्बल एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत भांडण मिटवित रखडलेली वाहतूक सुरळीत करण्यास हातभार लावला. अर्ध्या तासाभराने वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत प्रमोद मोजाड, भीमा आहेर, संतोष पवार, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यातील कर्मचारी कृष्णा चव्हाण आदींनी वाहतूक सुरळीत करण्यास प्रारंभ केला.

रुग्णवाहिकेला दिला मार्ग

वाहतूक पोलिस दाखल झाले. लामरोडवरील देवळाली प्लाझा परिसरात रुग्ण घेऊन जाणारी रुग्णवाहिका गर्दीत अडकली होती. याची माहितीी मिळताच पोलिस कर्मचारी कृष्णा चव्हाण यांनी तरुणांच्या मदतीने रुग्णवाहिकेस मार्ग उपलब्ध करून दिला. या समस्येमुळे रखडलेल्या लामरोड रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

फोटो : प्रशांत धिवंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू घाट लिलावांना ब्रेक

$
0
0

निवडणूक आचारसंहितेमुळे सव्वा महिने प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारचे धोरण आणि उच्च न्यायालयाचे निर्देश अशा कचाट्यात सापडलेल्या वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग पर्यावरण संवर्धनाच्या अहवालाद्वारे मोकळा होत असतानाच आता ही वाळू आचारसंहितेच्या निर्बंधांमध्ये अडकणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लिलाव प्रक्रियेला ब्रेक लागणार असून त्यासाठी आता जिल्हा प्रशासनाला ३१ मे पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे जिल्ह्यातील ५२ घाटांचे लिलाव थांबविण्यात आले. आजमितीस केवळ तीन वाळू घाटांमधून उपसा सुरू असून यामध्ये कळवणमधील दोन तर दिंडोरीतील एका घाटाचा समावेश आहे. वाळू उपलब्ध होत नसल्याने त्याचा विपरित परिणाम बांधकाम व्यवसायावरही होतो आहे. जिल्हा प्रशासनाचाही महसूल बुडू लागला आहे. वाळूची मागणी वाढत असून प्रशासनाने सात नवीन घाटांचे लिलाव एप्रिल अखेर करण्यासाठी तयारी सुरू केली होती. परंतु, निवडणूक आयोगाने विधान परिषदेची निवडणूक जाहीर केली असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. यामुळे प्रस्तावित विकास कामांवर मर्यादा आल्या असून सर्व प्रकारच्या टेंडर प्रक्रियाही आचारसंहितेमुळे लांबणीवर पडल्या आहेत. जिल्ह्यातील वाळू घाटांपैकी सात घाटांची लिलाव प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली होती. चेन्नई येथील एका कंपनीला घाटांवरील पर्यावरण संवर्धनाबाबतचे वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याने ही लिलाव प्रक्रिया राबविण्यासाठीचे अडसर दूर झाले. काही घाटांचे पर्यावरण संवर्धनाबाबतचे अहवाल या आठवडाभरात प्राप्त होणार होते. त्यानंतर जिल्हास्तरीय पर्यावरण समितीची मंजुरी घेऊन घाटांचे लिलाव केले जाणार होते. परंतु, आयोगाने विधान परिषद निवडणूक जाहीर केल्याने वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेवरही मर्यादा आल्या आहेत.

वाळूचे दरही वाढले

नाशिक जिल्ह्यात पुरेशी वाळू उपलब्ध होत नसल्याने वाळू वाहतूकदार नंदुरबार, जळगाव आणि नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून वाळू आणत आहेत. वाढती मागणी आणि वाळूचा तुटवडा यांमुळे वाळूचे दर सुमारे दुपटीने वाढले आहेत. एरवी तीन ते चार हजार रुपये ब्रास दराने खरेदी केली जाणारी वाळू आता सहा ते सात हजार रुपये ब्रासप्रमाणे खरेदी करावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इको फ्रेंडली’ लग्नपत्रिकेतून पर्यावरणाचा जागर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा म्हटले की बडेजाव आणि त्यासाठी होणारा अवाढव्य खर्च ठरलेलाच. याशिवाय आजकालच्या लग्नसोहळ्यातून अन्नाची नासाडी आणि प्रदूषणही वारेमाप होते. परंतु शिंदे (ता. जि. नाशिक) येथील पांगारकर कुटुंबियांनी अशा प्रकारच्या रूढ लग्नसोहळ्याला फाटा देत चक्क रद्दीच्या कागदापासून लग्नपत्रिका बनवली असून, या लग्नपत्रिकेतून पाच वृक्षांच्या आणि फुलझाडांच्या बिया घरोघरी पोहचवून वृक्ष लागवडीचा व वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला आहे.

शिंदे गावातील आशा आणि संजय पांगारकर यांची कन्या ऋतुजा हिच्या विवाहाची इको फ्रेंडली पत्रिका आजुबाजूच्या गावांतील नातेवाईक आणि मित्रपरिवारांत चर्चेचा विषय ठरली आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कल्याण येथील कार्यालयात सेवेत असलेल्या संजय पांगारकर आणि नववधू ऋतुजाचे चुलते महेंद्र पांगारकर यांनी सर्व कुटूंबियांच्या चर्चेतून लग्नत्रिकेसाठी नवीन कागद वापरण्याऐवजी रद्दी कागदाचा वापर करुन लग्नपत्रिका तयार केल्या. कागदाच्या बचतीतून नकळतपणे वृक्षसंवर्धनाचे काम पांगारकर कुटूंबियांनी केले. याशिवाय या इको फ्रेंडली लग्नपत्रिकेत छोट्या कागदाच्या पाकिटात फुलझाडे आणि काही फळझाडांच्या बिया ठेवण्यात आल्या आहेत. या पत्रिकेत नावांची जत्रा भरविण्याऐवजी पांगारकर कुटुंबाने लग्नपत्रिकेसोबत देण्यात आलेल्या फुलझाडे आणि फळझाडांच्या बियांचे घराभोवती रोपण करण्याची विनंती छापील स्वरुपात केली आहे. या बियांतून फुलणाऱ्या फुलझाडांवरील फुलांच्या सुगंधाबरोबरच ऋतुजाच्या शुभविवाहाच्या आठवणींचा सुगंधही दरवळत ठेवण्याची विनंतीही केलेली आहे. अशा प्रकारची इको फ्रेंडली लग्नपत्रिका तयार करून पांगारकर कुटुंबाने बडेजावाच्या नादात गुरफटलेल्या आजच्या आधुनिक समाजापुढे एक अनोखा आदर्श उभा केला आहे.

लग्नपत्रिकेमुळेही मोठ्या प्रमाणात कागदाचा अपव्यय होतो. हा कागद लाकडापासून तयार होत असल्याने अप्रत्यक्षरित्या वृक्षतोडीलाच आपण प्रोत्साहन दिल्यासारखे होते. त्याऐवजी जुन्या व वापरलेल्या कागदाचा पुनर्वापर करून लग्नपत्रिका तयार केल्या तर एका अर्थाने आपण वृक्षतोडीला आळा घालू शकतो. या विचारातुन जुन्या व वापरलेल्या कागदाचा पुनर्वापर करुन पुतणीच्या लग्नाच्या लग्नपत्रिका तयार केल्या.लग्नात अक्षदाही फुलांच्याच वापरल्या जाणार असून सर्व आप्तेष्टांना वृक्षाचे एक रोप दिले जाणार आहे.

- महेंद्र पांगारकर, शिंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिक हे संस्काराचे विद्यापीठ

$
0
0

आमदार देवयानी फरांदे यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सगळीकडे विभक्त कुटुंब पद्धती वाढत आहे. अशा कुटुंबांमधील नातवांवर पाहिजे ते संस्कार होत नाहीत. नोकरी करणाऱ्या आई-वडिलांना मुलांकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे ही पिढी नको त्या मार्गाने भरकटत आहे. आजी-आजोबा असलेल्या घरांमध्ये संस्काराचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे संस्कार ज्यांच्यावर रुजले ते समाजात सर्वच ठिकाणी पुढे असल्याचे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले.

लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे विवाहास ५० वर्षे पूर्ण झालेल्या ५० दाम्पत्यांचा सत्कार झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार फरांदे बोलत होत्या. यावेळी लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच हा उपक्रम १२ वर्षांपासून करीत असून आजतागायत ६०० जोडप्यांचा सत्कार या संस्थेने केलेत याबद्दल लोकज्योतीचे विशेष अभिनंदन केले. मंचावर मधुकर झेंडे, डॉ. अनुज तिवारी, मंचचे अध्यक्ष सुरेश विसपुते, कार्याध्यक्ष डी. एम. कुलकर्णी, सचिव रमेश डहाळे, संजय घरटे, कोषाध्यक्ष जितेंद्र येवले, मनीषा पगार, रंजनभाई शाह आदी उपस्थित होते.

यावेळी ५० दाम्पत्यांपैकी वसंतराव व उषा कोठावदे तसेच यशवंतराव चौधरी व सौ. चौधरी या प्रातिनिधिक दोन दाम्पत्यांचा मानपत्र, लघुवस्त्र, भेटवस्तू देऊन आमदार फरांदे व मधुकर झेंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर उर्वरित ४८ जोडप्यांचा त्यांच्या जागेवर जाऊन सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिक संघांचाही गौरव

लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचाचे माजी कार्याध्यक्ष कै. पुंडलिकराव घरटे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी देण्यात येणाऱ्या कार्यक्षम ज्येष्ठ नागरिक संघ पुरस्काराचे वितरण झाले. यामध्ये नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ, शिवाजी चौक सिडको, श्री समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, प्रमोदनगर, गंगापूर रोड व जीवनसंध्या ज्येष्ठ नागरिक संघ गांधीनगर या तीनही संघांना गौरविण्यात आले.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासरच्या जाचामुळे तिला ग्रासले नैराश्याने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लाडाकोडात वाढलेल्या लेकीच्या विवाहासाठी तब्बल ३० लाखांचा खर्च केला. कमी पडायला नको म्हणून तिच्या नावे पाच लाखांची ठेव ठेवली. मात्र, मिळाले की हाव वाढते असा अनुभव सासरच्या मंडळींनी दिला. माहेरहून आंनदाने गेलेल्या या लेकीला सासरच्या मंडळींकडून पैशांच्या मागणीसाठी सतत होणाऱ्या मारहाणीने नैराश्याने ग्रासले आहे. पतीसह सासरच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला; पण संसार भंगल्याचे दु:ख पचविणाऱ्या सुपन आणि तिच्या मुलीला न्यायासाठी लढा देण्याची वेळ आली आहे.

अखिल चतरथ (पती), हर्षा चतरथ (सासू), शैव्या आकाश मेहरा (नणंद) आणि आकाश मेहरा (नणंदेचा पती) अशा चौघा जणांविरोधात या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सुपन अखिल चतरथ या विवाहितेने तक्रार दिली आहे. विनीत चोप्रा (सिरीन मेडोज, गंगापूररोड) यांची मुलगी सुपन हिचा विवाह २०१४ मध्ये पुण्यातील अखिलशी झाला. एका बांधकाम कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या अखिलसह तिच्या प्राध्यापक सासूने लग्नाच्या महिनाभरात वेगवेगळ्या कारणाने पैशांसाठी तगादा सुरू केला. माहेरीच राहणारी नणंद आणि तिचा पती, सासूही यासाठी मागे नव्हते. अगदी नवीन जोडप्याला दुबई येथे फिरायला जाण्यासाठीही सुपनच्या नावे असलेले पैसे देण्याची मागणी झाली. सुखी कुटुंबाचे स्वप्न पाहणाऱ्या सुपनसह तिच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. मात्र, यानंतर माहेरी राहून आले की काही तरी किंमती वस्तू आणयालाच हवी, असा दंडक सुपनच्या सासरच्यांनी घातला. आपला विवाह संसारासाठी झाला की पैशांसाठी, असा प्रश्न सुपनला पडला. पती अखिल मद्यप्राशन करून सतत मारहाण करायचा. काही कुटुंबीयांच्या मध्यस्थीने अखिल व सुपनने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, यासाठी अखिलने तब्बल ८० लाख रुपयांची मागणी केली. ही मागणी सुपनने पूर्ण करता येणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्याचा अत्याचार आणखी वाढला. याच काळात सुपनला एक मुलगीही झाली. त्यांनतरही सुपनवरील अत्याचार कमी झाले नाही.

मध्यस्थांचे प्रयत्न व्यर्थ

मागील वर्षी एक दिवस मद्याच्या नशेत अखिलने सुपनच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेत तिला घरातून हाकलून दिले. सुपनच्या वडिलांसह इतर नातेवाइकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण, उपयोग झाला नाही. अखेर या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. मानसिक धक्का बसलेल्या सुपनला यातून बाहेर काढत न्यायालयीन लढा लढण्याचे आव्हान चोप्रा कुटुंबीयांपुढे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करवाढ रद्दचा ठराव अडकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जनतेचा प्रक्षोभ पाहून विशेष महासभेने केलेला करवाढीच्या स्थगितीचा ठराव जिल्हा प्रशासनाने स्वीकारण्यास असमर्थता दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले. महापौर रंजना भानसी मात्र स्थगितीचा ठराव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यावर ठाम आहेत. या निर्णयामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत नसल्याचा दावा महापौरांनी केला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने घेतलेली भूमिका संशयास्पद असून, एकाचवेळी आयुक्त तुकाराम मुंढे व महापौर रंजना भानसी यांना वाचविण्याचे प्रयत्न केले जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेमुळे लोकप्रतिनिधी विरुध्द अधिकारी हा संघर्ष तीव्र होणार आहे.

नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुचवलेली करवाढ रद्द करावी या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून महापालिकेतील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यासाठी सोमवारी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्याचवेळी महापालिकेत महासभा सुरू होती. यावेळी दहा तास चाललेल्या महासभेत ही करवाढ रद्द करावी असा सर्वानुमते ठराव करण्यात आला. हा ठराव जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात येणार होता. याबाबत महापौर रंजना भानसी यांनी हा ठराव जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्याची तयारी केली. परंतु, हा ठराव पाठवून तुम्ही अडचणीत याल असे जिल्हा प्रशासनाकडून महापौर रंजना भानसी यांना सांगण्यात आले. त्यामुळे महापौर द्विधा मनस्थितीत सापडल्या. परंतु, जनतेचा प्रक्षोभ बघता हा ठराव शासनाकडे पाठवणारच असा महापौर रंजना भानसी यांनी निर्धार केला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एकीकडे करवाढीच्या विरोधात जनता प्रक्षोभ करीत असताना जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे तर्कविर्तकांना उधाण आले आहे. त्यामुळे हा ठराव जिल्हा प्रशासनाने न स्वीकारल्यास पुन्हा हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

प्रशासनाकडून आयुक्तांना वाचवण्याच्या हालचाली

ही करवाढ ही आचारसंहितेच्या काळात झाली असल्याने हा आचारसंहितेचा भंग असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यावर आयुक्त तुकाराम मुंढे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांना वाचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ही चाल खेळली जात असल्याचे काही नगरसेवकांचे म्हणणे आहे. एकीकडे आयुक्त करवाढ मागे घेण्यास तयार नाहीत व दुसरीकडे नगरसेवकांनी व आमदारांनीही याला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या वादावर मुख्यमंत्र्यांनाच हस्तक्षेप करावा लागणार असल्याचे दिसते.

जनतेच्या भावना लक्षात घेऊन विशेष महासभेने करवाढीचा ठराव रद्द केलेला नाही तर स्थगित ठेवण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे हा ठराव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला जाणार आहे.

- रंजना भानसी, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी युवकांची मागण्यांसाठी एकजूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या समस्या, बेरोजगारांपुढील आव्हाने आणि महिला व समाजघटकांचे अद्यापही होणारे शोषण अशा विविध मुद्द्यांशी निगडीत मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे आदिवासी विकास विभागावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात युवकांचा सहभाग लक्षणीय होता.

आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांमधील विविध पदांवर मानधनावर त्वरित नियुक्त करण्यात यावी, पेसा कायद्याच्या आधारे आदिवासी विकास विभाग व जिल्हा परिषदेत शिक्षक भरती त्वरित काढली जावी, इंजिनीअरिंग व मेडिकलच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय उभारणीसाठी दहा लाखांपर्यंत कर्ज द्यावे, राज्यात आदिवासी कुटुंबांतील एका आदिवासी बेरोजगार सदस्याला पाच ते दहा लाख रुपये व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज द्यावे, आदिवासी भागातील महिला व पुरूष बचत गटांसाठी १० ते २० लाख रुपये बिनव्याजी कर्ज द्यावे, आदिवासी वसतिगृहांमधील भोजन ठेके बचतगट व आदिवासींनाच मिळावे, पंडित दिनदयाल उपाध्याय योजनेपासून आदिवासी विद्यार्थ्यांना लाभ मिळालेला नाही त्यामुळे ही योजना बंद करून नवीन वसतिगृहांची संख्या वाढावावी, ६ जुलै २०१७ च्या सुप्रिम कोर्टाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करून आदिवासींच्या नोकऱ्या बळकाविणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावेत, आदिवासी समाजातील अत्याचाराला बळी पडलेल्या महिला व मुलींना दोषींवर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा, ५ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णय वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी आहाराचे पैसे खात्यावर टाकण्यात येणार आहेत, त्याची अंमलबजावणी नाशिक प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शहरी व ग्रामीण सर्व वसतिगृहांनी राबवावा अन्यथा हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा यांसह विविध मागण्यांचा समावेश या मोर्चात होता.

एकूण २३ मागण्यांचे निवेदन आदिवासी विकास विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांना देण्यात आले. या निवेदनावर संघटनेच्या वतीने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लकी जाधव, युवा जिल्हाध्यक्ष गणेश गवळी आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तू-तू मैं-मैं’चे उद्योग बंद करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

औद्योगिक क्षेत्राशी संबंधित प्रश्न सुटावेत, गोलगोल उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचे धोरण न ठेवता स्पष्ट शब्दांत उत्तरे देऊन तक्रार निवारणावर भर द्यावा, असे आदेश देत जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला फटकारले. 'तू-तू मैं-मैं' बंद करून कामाला लागा, असे आदेशच त्यांनी दिले. जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठक दर महिन्यात घेण्याचा निर्णयही जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांनी जाहीर केला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात मंगळवारी जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठक झाली. बैठकीला जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. पी. रेंदाळकर, 'एमआयडीसी'च्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, महापालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील, कामगार उपायुक्त जी. जे. दाभाडे, 'निमा'चे अध्यक्ष मंगेश पाटणकर, मनीष रावळ, माथाडी कामगार संघाचे उत्तम कर्डक आदींसह उद्योजक, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सातपूर, अंबड, माळेगावसह जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात मूलभूत सुविधांची वानवा असल्याचा उद्योजकांच्या तक्रारींचा रोख होता. त्यावर सरकारी यंत्रणांकडून वरवर उत्तरे दिली जात असल्याचा आक्षेप उद्योजकांकडून बैठकीत नोंदविण्यात आला. जिल्ह्यात नवीन उद्योग कसे येतील, उद्योगवाढीला आणि पर्यायाने रोजगारनिर्मितीला चालना कशी मिळेल, उद्योजकांच्या समस्या दूर होऊन औद्योगिक विकास गतिमान कसा होईल, यावर बैठकीत चर्चा अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी त्या-त्या विभागांनी आपल्या स्तरावर निकाली काढाव्यात, असे आदेशही यावेळी दिले. दिंडोरीतील अक्राळे औद्योगिक वसाहतीत अद्याप भूखंड वाटप सुरू न झाल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. आतापर्यंत दोन बैठकांत हा चर्चिला गेला, तरीही कार्यवाही का झाली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माझ्या कार्यकाळात किमान भूखंडांचे वाटप सुरू व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मेच्या पंधरवड्यापर्यंत पहिल्या टप्प्यात २२ भूखंड वाटपासाठी उपलब्ध होतील, अशी माहिती पाटील यांनी त्यांना दिली.

--

निम्म्या तक्रारी निकाली

अंबड एमआयडीसीतील गाळेवाटपाचा प्रश्न समन्वयातून निकाली काढा, असे निर्देश राधाकृष्णन बी. यांनी दिले. अंबड परिसरात फायर स्टेशन सुरू करणे, मोकळ्या भूखंडांना कुंपण करणे, रस्त्यांची डागडुजी, पथदीप दुरुस्ती, घंटागाडीच्या फेऱ्या वाढविणे, प्रथमोपचार केंद्र, सायकल ट्रॅक सुरू करणे, वैद्यकीय बिले मुदतीत मिळणे, अवैध व्यवसाय याबाबतच्या तक्रारींवर बैठकीत चर्चा झाली. ३६ पैकी सुमारे निम्म्या तक्रारी निकाली निघाल्या.

--

एमआयडीसीला व्हॅक्युम क्लीनर व्हॅन

शहरातील औद्योगिक वसाहतींमध्ये महापालिकेने ड्रेनेज सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी 'आयमा' आणि 'निमा'ने केली आहे. परंतु, महापालिकेने त्यास नकार दिला आहे. उद्योजक करांच्या रूपाने महापालिकेला मोठ्या प्रमाणावर महसूल देतात. तरीही महापालिकेची भूमिका अडेलतट्टूपणाची असल्याबाबत उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली. या मुद्द्यावरून उद्योजक आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वादावादीही झाली. सिव्हेज वहनासाठी व्हॅक्युम क्लीनर व्हॅनचा पर्याय पुढे आला. त्यासाठी जिल्हा प्रशासन महापालिकेला निधी उपलब्ध करून देईल. या निधीतून महापालिकेने औद्योगिक वसाहतीसाठी ही व्हॅन उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलगी झाली म्हणून अधिकारी पत्नीचा छळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मुलगा-मुलगी समानतेच्या आपण कितीही गप्पा मारत असलो तरी अजूनही वंशाचा दिवा मुलगाच असतो, हा भ्रम समाजात ठाण मांडून बसला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुलगी झाली म्हणून थेट पत्नीला मारझोड करून तिला घर सोडण्यास प्रवृत्त करण्याची मजल मुंबई पोलिस दलातील एका पोलिसाने मारली आहे. पैसा आणि कायदा आपल्या हातात असल्याची दर्पोक्तीही या पोलिस कर्मचाऱ्याने केल्याने सहाय्यक विक्रीकर निरीक्षक असलेल्या पत्नीला नाइलाजाने माहेरी येऊन पोलिसांत फिर्याद देण्याची दुर्दैवी वेळ आली.

या धक्कादायक प्रकाराबाबत पीडित महिला माया महेंद्र पगारे यांनी पती महेंद्र निंबा पगारे (रा. रोझविव्ह चाळ कमिटी, अंधेरी पूर्व, मुंबई) याच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात जिल्हा विधी प्राधिकरण समितीच्या आदेशानुसार फिर्याद दिली आहे. मुलगी झाली म्हणून माझा छळ केला जात असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. माया पगारे यांचा विवाह २०१० मध्ये मुंबईतील महेंद्र पगारेशी झाला होता. मात्र, भांडणाला कंटाळून माया यांनी २०१३ मध्ये पती महेंद्र पगारे याच्याशी घटस्फोट घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडित वीजपुरवठ्याने जेलरोडवासीय हैराण

$
0
0

खंडित वीजपुरवठ्याने जेलरोडवासीय हैराण

जेलरोड : उन्हाळा लागल्यावर भारनियमन हमखास होते. महावितरणने यंदा पुरेशी वीज उपलब्ध असल्याने भारनियमन केले जाणार नसल्याचे सांगितले असतानाच जेलरोडला मात्र वीजपुरवठा खंडित होत आहे. मंगळवारी सायंकाळीही सातत्याने वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी सात ते आठ वाजेदरम्यान पाच-सहा वेळा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे भारनियमन केले जाणार असेल, तर तसे नागरिकांना अगोदर कळविण्याची मागणी होत आहे.

गार्डनसाठी श्रमदान

जेलरोड : जेलरोड येथील टाकेकर वसाहतीतील गार्डनमध्ये नागरिकांनी पशुपक्ष्यांसाठी मातीचे मोठे भांडे ठेवले आहे. त्याचा उपयोग भटकी कुत्री, गायी, तसेच पक्ष्यांना होत आहे. या गार्डनमध्ये कोणतीही झाडे किंवा हिरवळ नाही. त्यामुळे एक भूखंड म्हणूनच त्याचा वापर होत आहे. नागरिकच या गार्डनची झाडलोट करतात. नागरिकांनी हे गार्डन स्वच्छ ठेवले असून, आता त्याता जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. या गार्डनमध्ये शोभेची झाडे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रेसजवळच पार्किंग

जेलरोड : जेलरोड येथील नोट प्रेसने पार्किंग न करण्याची सूचना भिंतीवर लावलेली आहे. परंतु, प्रेस कामगारच मोठ्या प्रमाणावर भिंतीशेजारी वाहनांचे पार्किंग करीत आहेत. त्यामुळे प्रेसची सुरक्षा धोक्यात आल्याची नागरिकांची तक्रार आहे. सामान्य नागरिक प्रेसच्या भिंतीजवळ वाहने उभी करत नाहीत. प्रेस कामगारांसाठी पार्किंगकरिता स्वतंत्र शेड व्यवस्था आहे. मात्र, तरीही प्रेसच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराशेजारी, तसेच भिंतीशेजारून भीमनगर गेट क्रमांक दोनकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी वाहने, तसेच सायकली उभ्या केल्या जात आहेत. सुरक्षा कर्मचारीही त्यांना रोखत नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस कडक वागतात

$
0
0

सिडको वसंत व्याख्यानमाला

मधुकर कड यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, सिडको

पोलिस हे कडक वागत असले तरी ते केवळ गुन्हेगारासाठीच कडक असतात. पोलिस हा पण माणूस असून त्यांच्यातील माणुसकीचा अभ्यास नागरिकांनी केला पाहिजे. अनेक गुन्हे समोपचाराने मिटविण्याचेही काम पोलिस करतात. पोलिस हे नागरिकांचे शत्रू नसून मित्रच असतात, याचेही भान नागरिकांनी ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी केले.

माय मराठी मोफत ग्रंथघर, सूर्यादय परिवार आणि नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्यातर्फे आयोजित माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमालाचे दुसरे पुष्पातील 'पोलिसांमधील माणूस' या विषयावर कड बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर कावळे, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष देवराम सैंदाणे आदी उपस्थित होते. यावेळी कड यांनी सांगितले, की गुन्हेगारांसाठी वचक बसवा म्हणून पोलिस कडक वागतो. पोलिस सणवार, वेळकाळ याचे बंधन न पाळता नागरिकांच्या सेवेसाठी तयार असतात. पोलिस कर्तव्याला जागून अनेकदा आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करतात. पोलिसांमधील माणूस प्रत्येकाने ओळखला पाहिजे. पोलिसांना नागरिकांनी समजून घेत सहकार्य केल्यास अनेक गुन्हे घडण्यापासून रोखणे शक्य होऊ शकेल.

व्याख्यानमालेचे अध्यक्ष किरण सोनार यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार दुसानिस यांनी वक्त्यांचा परिचय केला. जयराम गवळी यांनी आभार मानले. व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी श्रीकांत सोनार, शालिग्राम चौधरी, विजय गोसावी, मधुकर पाटील, देविदास निकम, बाळकृष्ण गोळे आदी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

महासत्तेसाठी सर्वांनी

एकत्र येण्याची गरज

सिडको : स्वांतत्र्यानंतरच धार्मिक आणि जातीची व्यवस्था बिघडली असून भारताला महासत्ता करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने यांनी केले.

सिडको वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुफंताना स्वातंत्र्याच्या '७० वर्षांनंतरचा भारत' या विषयावर माने बोलत हेाते. आजही भारत विकासाच्या वाटेवर आहे. काळानुरूप विकासाची गती बदली असून माणूस माणसापासून दूर जात आहे. सध्याच्या सोशल मीडिया व आधुनिक तंत्रज्ञानामुळे मनुष्य हा मनुष्यापासूनच दूर जात आहे. भारतात जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. स्वातंत्र्य पूर्वी ब्रिटिशांमुळे भारताला आधुनिक जगाचे दरवाजे उघडले गेले. विकासासोबत सामाजिक सुधारणाही झाल्याचे त्यांनी सांगितले.

आजचे व्याख्यान : स्वामी विवेकानंदाचे विचार

वक्ते : प्रा. प्रवीणसिंग गिरासे

वेळ : सायंकाळी - ६.३०

स्थळ - स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागातील मदरशांची आकडेवारीच नाही!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक विभागात मदरशांची संख्या किती आहे याची खात्रीलायक आकडेवारीच प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण समितीचे अध्यक्ष सतीश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. २४) विभागीय बैठक झाली. मदरशांसाठी राज्य व केंद्र सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीतच हे वास्तव समोर आले आहे.

विभागातील विविध जिल्ह्यांत सध्या किती मदरसे कार्यरत आहेत, याची खात्रीलायक माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे विभागात किती मदरसे कार्यरत आहेत याची आकडेवारी पुन्हा एकदा गोळा करण्याचे आदेश या बैठकीत पाचही जिल्ह्यांच्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्ह्यात मोठ्या संख्येने मदरसे कार्यरत आहेत. मात्र त्यापैकी नोंदणीकृत मदरशांची संख्या अल्प असल्याची बाब नियोजन विभागाच्या अहवालातून उघड झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मध्ये सरकारच्या अनुदान मागणीसाठी विभागातून अवघ्या ३६ मदरशांचे अर्ज प्रशासनाकडे आले होते. त्यापैकी २१ प्रस्तावांना मान्यता मिळून त्यांना ३८ लाख ३५ हजारांचे अनुदान मिळाले होते. २०१६-१७ वर्षात विभागातून मदरशांचे अनुदानाच्या प्रस्तावात मोठी घट आली.

पाच मदरशांनाच मंजुरी

यंदा विभागातून अवघ्या १४ मदरशांचे अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले. त्यापैकी अवघ्या पाच मदरशांचे प्रस्ताव मंजूर झाले. या पाच मदरशांना १९ लाख ४० हजारांचे अनुदान मिळाले होते. २०१७-१८ या वर्षी विभागातून अवघे १३ प्रस्ताव आले. त्यापैकी सहा प्रस्तावांना मंजुरी मिळाली. त्यांना २१ लाख ९० हजारांचे अनुदान वितरित करण्यात आले. असे असले तरी विभागात प्रत्यक्ष कार्यरत मदरशांची संख्या शेकडोच्या घरात आहे. मात्र, यापैकी नोंदणीकृत मदरशांची संख्या अगदी किरकोळ आहे.

'रोजगाराभिमुख शिक्षण हवे'

मदरशांतील विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षणासोबत शालेय शिक्षण मिळाल्यास त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण समितीचे अध्यक्ष त्रिपाठी यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात मदरसा आधुनिकीकरणाबाबत आयोजित विभागीय बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर आयुक्त ज्योतिबा पाटील, उपायुक्त रघुनाथ गावडे, डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण समितीचे सदस्य ज. मो. अभ्यंकर, तहसीलदार एस. डी. मोहिते आदी उपस्थित होते. या वेळी त्रिपाठी यांनी मदरशांसाठी सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनिकेत पाटील यांना भाजपकडून उमेदवारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

येत्या जुलैमध्ये होणाऱ्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी भाजपतर्फे माजी मंत्री विजय नवल पाटील यांचे पुत्र अनिकेत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दि. २५ फेब्रुवारी रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पाठोपाठ त्यांना पक्षातर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपचे विद्यमान आमदार अपूर्व हिरे हे सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व करीत असून, त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपने अगोदरच अनिकेत पाटील यांना उमेदवारी देऊन निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर होताच भाजपनेही येत्या जुलैमध्ये होणाऱ्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच आपला उमेदवार जाहीर केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मुंबई शिक्षक मतदारसंघात अनिलकुमार राजेसिंग देशमुख व नाशिक शिक्षक मतदारसंघात अनिकेत विजय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारांच्या विजयासाठी भाजपचे कार्यकर्ते सर्वतोपरी प्रयत्न करतील, असे त्यांनी सांगितले. या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन त्यांनी शिक्षक मतदारांना केले. अनिकेत विजय पाटील हे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे प्रवक्ते आहेत, तसेच संजय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत. विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी मिळावी या उद्देशानेच ते भाजपत गेले होते. भाजपकडून दुसऱ्यांदा आयात उमेदवाराला या निवडणुकीत संधी देण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाल्याने ‘चलाखी’ उघड!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापालिकेच्या येथील दुर्गा उद्यानाजवळील नाशिकरोड विभागीय कार्यालयाची इमारत बांधताना या ठिकाणावरून वाहणारा नैसर्गिक नाला बुजविण्यात आल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. दोन दिवसांपूर्वी याच नाल्यावरील स्लॅब कोसळून मुरूम वाहणारा ट्रक फसल्याची घटना घडल्यानंतर बुजविलेला नैसर्गिक नाला उघडा पडल्याने महापालिका प्रशासनाची चलाखी उघड झाली होती. ही उघडी पडलेली चलाखी झाकण्यासाठी मंगळवारी दिवसभर या खचलेल्या स्लॅबच्या ठिकाणी पडलेल्या खड्डयात माती टाकण्याचे काम सुरू होते.

दुर्गा उद्यानाच्या जवळून पूर्वी मोठा नैसर्गिक नाला वाहत होता. परंतु, काही वर्षांपूर्वी दुर्गा उद्यानाजवळील जागेवर महापालिकेने विभागीय कार्यालयाची भव्य इमारत उभारली. या इमारतीच्या उभारणीसाठी या नैसर्गिक नाल्याचा बळी दिल्याची महापालिका प्रशासनाची चलाखी दोन दिवसांपूर्वी या नाल्यावरील स्लॅब खचल्याने उघड झाली. उघड झालेली आपली चलाखी झाकण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोठी घाई केली. मंगळवारी दिवसभर या नाल्यावरील स्लॅब कोसळलेल्या ठिकाणी माती टाकण्याचे काम सुरू होते. या नैसर्गिक नाल्यावरील स्लॅब कोसळल्याने मोठा खड्डा निर्माण झाला होता. या खड्ड्यामुळे पूर्वीचा नैसर्गिक नाला स्पष्टपणे दिसून आला. पूर्वी या नाल्याचे दगडी बांधकाम सुस्थितीत दिसून आले. या दगडी बांधकामावर बसविण्यात आलेली संरक्षक लोखंडी जाळीही अजून सुस्थितीत दिसून आली. या नाल्यावर सिमेंट काँक्रीटचा स्लॅब घालून हा नाला कायमचा बंद करण्यात आला होता. देवळालीगावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेने व महापालिकेच्या सध्याच्या विभागीय कार्यालयापुढील उद्यानाखालून हा नाला सिमेंटचे पाइप टाकून वळविण्यात आला होता. मूळच्या नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहावरच महापालिकेने विभागीय कार्यालयाची इमारत उभारली होती. त्यासाठी टाकण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या स्लॅबचे काम अत्यंत सुमार दर्जाचे करण्यात आल्याने काही वर्षांतच हा स्लॅब कोसळला. याच स्लॅबवर गेल्या काही वर्षांपासून फळबाजार भरत होता. तो स्थलांतरित करण्यात आल्यावर या ठिकाणी रस्ताकामासाठी ट्रकद्वारे मुरुम वाहून आणाला जात होता. या अवजड वाहनांमुळे या नाल्यावरील स्लॅब कोसळल्यानेच महापालिका प्रशासनाने नैसर्गिक नाल्यावर केलेल्या अतिक्रमणाला वाचा फुटली.

दुर्गा उद्यान भाजीबाजाराजवळून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर महापालिकेनेच अतिक्रमण केले आहे. येथील नाला बुजवून त्याच्यावरच विभागीय कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले आहे. आता स्लॅब कोसळल्याने निर्माण झालेल्या खड्ड्यातही केवळ माती भरून महापालिकेकडून डागडुजी केली जात आहे. मात्र, नैसर्गिक नाल्याने पुन्हा काही दिवसांनी हा रस्ता खचण्याचा धोका आहे.

-मनोज ठाकरे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्टसाठी

$
0
0

अपघातात युवतीचा मृत्यू

सटाणा : सटाणा-नामपूर रस्त्यावर दोधेश्वर फाट्याजवळ सोमवारी (दि. २३) दुपारी चारचाकी व पिकअप या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात साक्षी संजय शेवाळे (वय १७, रा. चौगाव, ता. बागलाण) या युवतीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातानंतर जखमींना नाशिक येथे रुग्णालयात हलविण्यात आले असून, सटाणा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मनमाडमध्ये प्रबोधन रॅली

मनमाड : जागतिक हिवताप दिनानिमित्त शहरात प्लास्टिक मुक्त शहर, ओला सुका कचरा संदर्भात मंगळवारी प्रबोधन रॅली कढण्यात आली. नागरिकांनी हिवतापाचे निर्मूलन करण्यासाठी सहकार्य करावे, घर परिसरातील डास व डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावी, शहरातील व्यापारी, नागरिक यासह सर्वांनी प्लास्टिकचा वापर टाळावा. प्लास्टिकचा वापर करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, ओला व सुका कचरा वर्गीकरण करून कचरा गाडीत टाकावा, असे विविध संदेश रॅलीनिमित्त देण्यात आले. हस्तपत्रकाचे वाटप झाले. मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, अन्न निरीक्षक संदीप तोरणे यांनी आशा स्वयंसेविका, सफाई कर्मचारी, मलेरिया कर्मचारी, नगरपरिषद कार्यालयीन कर्मचारी, करुणा हॉस्पिटल नर्सिंग स्टाफ यांना यावेळी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करप्रश्नी कृती समिती लवकरच घेणार बैठक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

महापालिका आयुक्तांनी नाशिककरांवर लादलेल्या अन्याय्य करवाढीविरोधात शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीने आंदोलन सुरू केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता सर्वांना सोबत घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे. त्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, उन्मेष गायधनी, दत्ता गायकवाड, नितीन ठाकरे यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.

एक एप्रिलपासून महापालिकने बेकायदेशीररीत्या करवाढ केल्यानंतर कृती समितीने करवाढ करणारा आदेश क्रमांक ५२२ हा बेकायदेशीर असल्याची खात्री केली. राज्यघटना व कायद्याची होणारी पायमल्ली रोखण्यासाठी ठोस भूमिका घेतली. या आदेशाने शेतकरी, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, व्यावसायिक, शाळा तसेच नागरिक बाधित झाले आहेत. या सर्वांना एकत्र आणून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी समितीने मेळावे घेत मी नाशिककर जनआंदोलन सुरू केले. शहरातील विविध संघटनांना एकत्र आणले. दि. २३ एप्रिल रोजी महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत आदेश क्रमांक ५२२ रोखण्यात आला. मात्र, रद्द झालेला नाही. ही करवाढ पूर्णपणे मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. आंदोलनात सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, उद्योजक, डॉक्टर, वकील आदी सर्वांना सोबत घेण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार असल्याचे कृती समितीचे शिवाजी म्हस्के, जयराम शिंदे, सोमनाथ बोराडे, हरपालसिंग बाजवा, भास्कर निमसे, तानाजी जायभावे नितीन निगळ, संजय माळोदे आदींनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळिंब उत्पादकांसाठी गुरूवारी परिसंवाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व नाशिक जिल्हा डाळिंब उत्पादक संघातर्फे सेंद्रीय डाळिंब शेती या विषयावर गुरुवारी (दि. २६) परिसंवाद होणार आहे. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इ. वायुनंदन यांच्या हस्ते राज्यातील २० डाळिंब उत्पादकांना 'डाळिंब मित्र पुरस्कार' देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच 'डाळिंब शेतीतील तंत्र' या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार असल्याची माहिती आयोजक कृषी विज्ञान शाखेचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ व बाळासाहेब म्हैसधुणे यांनी दिली.

मुक्त विद्यापीठात होणाऱ्या या परिसंवादास प्रमुख पाहुणे म्हणून राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकळ, डाळिंब निर्यातदार सचिन देशमुख, 'न्युट्रिशन मॅनेजमेंट' या विषयावर भूषण गोसावी यांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच जिल्हा डाळिंब उत्पादक संघाचे बाळासाहेब म्हैसधुणे यांचे 'सेंद्रिय डाळिंब शेती तंत्रज्ञान' या विषयावर व्याख्यान होणार आहे. याचबरोबर राज्यभरातील यशस्वी डाळिंब उत्पादकांचे मनोगत सादर होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सूर्या गुंजाळ, बाळासाहेब म्हैसधुणे, रवींद्र डेरे, धनंजय गायखे, मदन चौधरी, ललित चोपडा, पोपटराव पवार, तेजस भागवत, रमेश आव्हाड, रमेश खापरे यांनी केले आहे.

यांचा होणार गौरव

गायत्री निचित, डॉ. उज्ज्वला कापसे, मनीषा हरदे, मंगला ठाकरे (नाशिक), शिवाजी तावरे, गणेश पाऊलबुद्धे, गजानन दहिभाते, प्रवीण उकिरडे, राधेश्याम कोळकर (जालना), संभाजी काटे, गंगासागर डोईफोडे (औरंगाबाद), डॉ. अशोक वर्मा (नागपूर), नामदेव फलके (वर्धा), नितीन मुळीक (पुणे), विजय गायकवाड (सांगली), धर्मेश पटेल (गुजरात), कादीर मन्सुरी (मध्य प्रदेश), सचिन देशमुख (अमरावती), अमर देशमुख (अकोला), अनिलराज शेवतकर (सोलापूर) यांचा गौरव करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images